Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जुन्या शहरासाठी ‘हर्सूल’ धावले

$
0
0
पावसाने दडी मारली असली, तरी हर्सूल तलावात सध्या तेरा फूट पाणी आहे. त्यामुळे जुन्या शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता करण्याचे कारण नाही. योग्य नियोजन करून या तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.

एक गाडी, दोन सर्वेक्षणावर बोळवण

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे बजेटकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले असताना, मराठवाड्या विकासासाठी महत्त्वाच्या गाड्यांची घोषणा होईल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, मराठवाड्यातील जनतेची ही आशा फोल ठरली आणि एक गाडी, दोन मार्गांचे सर्वेेक्षण एवढ्यावरच जनतेची बोळवण करण्यात आली.

अबब वाहने ८ लाख ९९ हजार ९३३

$
0
0
शहरात सध्या लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अत्यंत वेगाने वाढली असून, घरटी मोटार सायकल, फोर व्हीलर, रिक्षा यांच्या पैकी एक वाहन नक्कीच आहे. यावर्षी जिल्ह्यातील वाहनांची संख्या आठ लाखाहून अधिक झाली आहे. मर्सिडिझमुळे गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी हे शहर अधिक प्रकाशझोतात आले होते.

लातुरात शिवसेना-मनसेची निवडणूक लगबग

$
0
0
आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लातूर जिल्हा शिवसेनेने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ मेळाव्यात तडाखेबंद भाषण केले.

बीड जिल्ह्यात चार ठिकाणी अतिवृष्टी

$
0
0
बीड जिल्ह्यात रविवारपासून सुरू झालेला पाऊस दररोज पडतो आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात वरुणराजाने दमदार हजेरी लावली. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला.

राष्ट्रवादीच्या हाती सत्तेची चावी

$
0
0
विधानसभा निवडणुकीआधी सप्टेंबरमध्यो होणाऱ्या पंचायत समिती सभापतिंपदासाठी राजकीय पक्षांनी व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. हे पद पुन्हा एकदा महिलांसाठी राखीव झाले आहे. या निवडणुकीत सभापतिकपदाची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहे.

दीड लाख वारकऱ्यांची पैठणमध्ये उपस्थिती

$
0
0
आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथील गोदावरी नदीत जवळपास दीड लाख भाविक व वारकऱ्यांनी स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतले. दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी आषाढीवारीसाठी पैठणला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली आहे.

पॉलिटेक्निक मध्ये ‘टू व्हीलर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सेंटर’

$
0
0
वाहन उद्योग क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज लक्षात घेत, येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दुचाकी दुरुस्तीचे शिक्षण दिले जाणार आहे. दुचाकीमधील नामांकीत कंपनी ‘यामाहा’च्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

‘सीव्हीटीएस’ विभाग अजूनही ‘सर्जन’विनाच

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमधील (घाटी) उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा (सीव्हीटीएस) विभागाला सहा महिने लोटले तरी हृदयरोग शल्यचिकित्सक (सर्जन) मिळालेला नाही. परिणामी, घाटीतील सर्व हृदय शस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून ठप्पच आहेत.

वारकरी पोलिसांनी पकडले पाकिटमार

$
0
0
विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी प्रती पंढरपूर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली त्याच फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न असलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (९ जुलै) आवळल्या.

अवघे दुमदुमले छोटे पंढरपूर

$
0
0
मोठ्या पंढरपूराप्रमाणे मराठवाड्यातील वाळूज परिसरातील छोट्या पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुधवारी (९ जुलै) सुमारे पाच लाख भाविकांनी गर्दी केली होती. विठ्ठलनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमले होते.

पाणीपट्टी वाढीत पालिकेची बनवाबनवी

$
0
0
पाणीपट्टी वाढीच्या निर्णयात महापालिकेचे प्रशासन नागरिकांची बनवाबनवी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनमानी करून दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढीचा बोजा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या खिशावर टाकला आहे.

मोबाइल विसरला अन् चोरटा अडकला

$
0
0
घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण सव्वा लाखाहून अधिक किमंतीचा ऐवज लंपास केला, परंतु घाईगडबडीत त्याचा मोबाइल फोनच घटनास्थळी विसरला. मोबाइलच्या आधारे पोलिसांनी चोरट्याला पकडले.

चिकलठाण्यातून विमान उड्डाणे धोक्यात

$
0
0
विमानतळाच्या आसपासच्या परिसरातील अस्वच्छता, नाले सफाईबाबत महापालिकेचा उदासीनपणा, यामुळे या परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरील विमान वाहतूक धोक्याची बनत चालली आहे.

सिडको परिसराला डेंगीचा विळखा

$
0
0
सिडको एन ११ आणि एन ८ भागात डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळल्याची माहिती मिळाली आहे. या रुग्णांच्या संदर्भात माहिती मिळताच महापालिकेचे सभागृह नेते किशोर नागरे यांनी स्वच्छता निरीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली, पण महापालिकेचे प्रशासन डेंगीचे रुग्ण सापडल्याचे मान्य करण्यास तयार नाही.

महामार्गाच्या कामात जिल्हा प्रशासनाचा खोडा

$
0
0
प्रस्तावित सोलापूर-औरंगाबाद-धुळे महामार्गासाठी अन्य जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत भूसंपादन पूर्ण झालेले असताना, या कामाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या ‌ढिलाईमुळे ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकसहभागाच्या ‘मॅजिक’साठी कम्युनिटी रेडिओ

$
0
0
गीत-संगीताचा आस्वाद घेतानाच लोकसहभागातून सामाजिक प्रश्नांना वाट करून देण्याच्या उद्देशाने औरंगाबाद शहरामध्ये लवकरच ‘मॅजिक रेडिओ’ सुरू होत आहे. प्रतीक्षा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे हा रेडिओ चालविण्यात येणार असून हा मराठवाड्यातील पहिलाच कम्युनिटी रेडिओ आहे.

आभाळाला हात लाव तू...!

$
0
0
बुधवारी आषाढीचे औचित्य साधत व्हॉटस् अॅप, फेसबूक आणि मंदिरातून भाविकांनी विठुरायाला पाऊस पाडण्यासाठी साकडे घातले. महागाई, जून महिना पूर्ण कोरडा असे वातावरण असतानाही शहरात मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी झाली.

३२५ किलो मीटरचा फेरा टळणार

$
0
0
औरंगाबाद-मनमाड, मनमाड-भुसावळ हा ३२५ किलो मीटरचा फेरा टाळण्यासाठी औरंगाबाद-चाळीसगाव हा नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, ही मागणी मान्य करून सर्वेक्षणासाठी तरतूद केल्याबद्दल आमदार प्रशांत बंब यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

विधानसभेत मनसेचा सफाया होईल!

$
0
0
मनसेचे लोकसभेत जे झाले त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होईल. विधानसभा निवडणुकीत मनसेचा सफाया होईल, असे मत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images