Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उजनीचे पाणी ठरले ‘मृगजळ’

$
0
0
उस्मानाबादमध्ये सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापर्यंत चार वेळा नगरपालिकेच्या निवडणुका लढल्यानंतरही शहराला नियोजित पाणीपुरवठा करण्यात पालिकेला अपयश आले आहे.

फक्त ७ टक्के पेरण्या

$
0
0
मराठवाड्यात आतापर्यंत फक्त खरिपाच्या फक्त ७.१४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाने जुलै महिन्यातही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेच. जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसानंतर काही भागात पेरण्या झाल्या आहेत.

पॉलिटेक्निकचे ‘तंत्र’ अवघड

$
0
0
ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे ‘तंत्र’ यंदा अवघड होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २६ हजार ९४६ प्रवेश क्षमता आहे, तर इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ५१५ आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नाही

$
0
0
संभाव्य दुष्काळ व अत्यल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य शासनाचा कोणताही विचार नाही.

सिटीबसचा पाय गाळात

$
0
0
शहरात सिटीबस सेवा सुरू करून एसटी विभागाचा पाय गाळात गेला आहे. त्यामुळे तब्बल तीन कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीला आता महापालिकेच्या एलबीटी आणि मालमत्ता करातून सूट हवी आहे.

महिला वाहकांसाठी स्वच्छतागृहेही नाहीत!

$
0
0
कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हाच अधिकार महिलांना देताना मात्र कुचराई होते. राज्य परिवहन मंडळही यातून सुटले नाही. कामाच्या मोबदल्यात पगार मिळतो, पण महामंडळात काम करणाऱ्या महिला वाहकांना साधी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे मंडळास जमले नाही.

४८ तासांचे ‘शट डाउन’

$
0
0
पैठण ते औरंगाबाददरम्यान होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी तब्बल ४८ तासांचे शट डाऊन घेण्याचा निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सलग चार किंवा पाच दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

पोलिसाकडूनच घेतली लाच!

$
0
0
पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस कॉलनीत शासकीय निवासस्थान देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना लाइन हवालदाराला सोमवारी (१४ जुलै) दुपारी अटक करण्यात आली. क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोरील मोटार परिवहन विभागाजवळ ही कारवाई करण्यात आली.

स्कूल व्हॅन पेटली

$
0
0
जाधववाडी येथील सनी सेंटर भागात स्कुल व्हॅनने स्पार्किंगमुळे पेट घेतल्याचा प्रकार सोमवारी (१४ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजता घडला. सुदैवाने वाहन चालक विद्यार्थी सोडून येत असताना हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला.

साताऱ्यासाठी गुडन्यूज

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून सातारा-देवळाई नगरपालिका होणार असलेल्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी नगरपालिका स्थापनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कन्या मुदतठेव कागदावरच

$
0
0
महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या नावाने जाहीर झालेली ‘कन्या मुदतठेव योजना’ सहा महिन्यांपासून लालफितीत अडकली आहे.

व्ही. जी. पाटील खूनप्रकरणी स्थगिती

$
0
0
जळगावातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. जी. पाटील यांच्या खूनप्रकरणी सेशन्स कोर्टाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

राम मंदिर सहकार्यातून उभारणार

$
0
0
‘अयोध्येतील बाबरी मशिद ही ‘मशिद’ असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तो एक ढाचा आहे. अयोध्येत उभारण्यात येणारे राममंदिर हे संघर्षातून नव्हे, तर सहकार्याने उभारण्यात येईल,’ असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्राचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उस्मानाबादेत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी ते उस्मानाबादेत आले होते.

काँग्रेसचे बंडखोरांना ‘बाय-बाय’

$
0
0
पक्षात राहून पर्यायी नेतृत्व तयार करणाऱ्यांना काँग्रेसने बाय-बाय करण्याचे धोरण अवलंबले आहे. ज्यांना पक्षात राहायचे नसेल, त्यांनी वेगळी चूल मांडण्यास हरकत नाही, असे मत माजी मंत्री आमदार दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

पाणी पुरवठ्यासाठी आयुक्तांना घेराव

$
0
0
शासकीय रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांना घेराव घालण्यात आला. पाणीपुरवठा नसल्याने तीन दिवस शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या.

बीडमध्ये चार नगराध्यक्ष बिनविरोध

$
0
0
बीड जिल्ह्यातील सहा नगराध्यक्ष पदांसाठी मंगळवारी अर्ज भरण्यात आले. जिल्ह्यातील सहापैकी बीड, अंबाजोगाई, माजलगाव आणि गेवराई या चार नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या चार ठिकाणी नगराध्यक्षबिनविरोध होणार आहेत.

स्वतंत्र रेल्वे झोनची लोकसभेत मागणी

$
0
0
नांदेड येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी सातत्याने होत आहे. ही मागणी मान्य करणे शक्य नसेल तर, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र झोन स्थापन करावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत रेलवे अर्थसंकल्पावरील चर्चेत केली.

गुरूजींच्या पदोन्नतीचा विद्यार्थ्यांना फटका

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. दररोज ३०० शिक्षक मुख्यालय सोडून झेडपीत येत असल्याने अनेक वर्ग बंद आहेत. गुरुजींबरोबर पाठीराखेही आल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.

सहा नगरसेवकांच्या घरावर व्हिप चिकटवला!

$
0
0
नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी (१५ जुलै) शहनाज टेकडी यांची उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. अकरा पैकी पाच नगरसेवकांनी व्हिप स्वीकारला असून सहा नगरसेवकांच्या घरांवर व्हिप चिटकवण्यात आला.

‘बीएड’चे यंदा चांगभले...

$
0
0
डीटीएड, इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची शक्यता असताना, राज्यात यंदा बीएड अभ्यासक्रमाचे मात्र चांगभले आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषद (एनसीटीई) बीएड अभ्यासक्रमाची कालमर्यादा दोन वर्षांची करणार असल्याची आवई उठली आणि पाहता-पाहता बीएडला गर्दी झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images