Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन बेवारस बालिका दाखल

$
0
0
दोन चिमुकल्या बालिकांना पालकांनी रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. यापैकी दोन महिन्यांची चिमुरडी घाटी हॉस्पिटलमध्ये आणि एक वर्षाची मुलगी पंढरपूर यात्रेत पोलिसांना सापडली.

समांतर’साठी ७९२ कोटीच

$
0
0
‘समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी महापालिका ७९२ कोटी रुपयांवर ठाम आहे. यापेक्षा एक छदामही वाढवून मिळणार नाही’, अशी स्पष्ट भूमिका महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी गुरुवारी घेतली.

एटीएम सुरक्षेचे धिंडवडे

$
0
0
शहरात एटीएमची सुरक्षा बॅँकांनी चक्क वाऱ्यावर सोडली आहे. रेल्वे स्टेशनजवळी स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम खचल्यामुळे पडण्याच्या मार्गावर आहे, तर कॅनरा बॅँकेच्या एटीएमला कुणीच वाली उरला नाही.

औद्योगिक वसाहतीला हव्या सवलती!

$
0
0
उस्मानाबाद येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना लातूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांप्रमाणे देण्यात येणाऱ्या विशेष सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी तरूण उद्योजक संघ, उस्मानाबादचे अध्यक्ष विद्यासागर गोडभरले आणि लघु उद्योग भरतीचे अध्यक्ष प्रवीण काळे यांनी केली आहे.

पिकविमा भरल्यास सूट द्या!

$
0
0
विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील अवर्षनग्रस्त (टंचाईग्रस्त) तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम भरण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात यावी. विदर्भापेक्षा जास्तीची वाढीव पिकविमा रक्कम रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

परभणी,हिंगोलीत पाऊस

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कोरड्या जमिनीत पेरण्याचे धाडस शेतकरी करीत नसून, पेरणीसाठी अजून किती वेळ थांबायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

भूसंपादनाची कोंडी सुटली

$
0
0
प्रस्तावित सोलापूर-औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादनाची कोंडी सुटली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकताच ३१८ हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव गॅझेटसाठी पाठवला आहे. दरम्यान वाल्मीचा प्रश्न अजून कायम आहे.

३२ लाखांची कार धूत मोटर्समधून पळवली

$
0
0
बत्तीस लाखांची कार धूत मोटर्समधून पळवल्याची घटना शुक्रवारी (२५ जुलै) घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना आव्हान

$
0
0
काँग्रेसच्या विद्यमान आमदारांपेक्षा आम्हीच उजवे आहोत, असा दावा करीत काही इच्छुकांनी थेट दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीन जागा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, पण ‘अब की बार मैं’ या तत्त्वानुसार फुलंब्री व सिल्लोड वगळता अन्य मतदारसंघांतून इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे.

'वारणा'ला दंड

$
0
0
कमी दर्जाचे दूध उत्पादन करून विकल्याप्रकरणी वारणा डेअरीस एक लाख दहा हजारांचा दंड औरंगाबादच्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ठोठावला आहे.

पेरण्या सुरू

$
0
0
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शेतीच्या कामांचा संक्षिप्त आढावा...

बीडमध्ये पेरणीचे रेकॉर्ड

$
0
0
पावसाळ्याचे सुरुवातीचे दोन महिने संपले असून बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ सरासरी १११ मिलि मीटर पाऊस पडलेला आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या केवळ साडे सोळा टक्के आहे. खरीपाच्या पेरण्या सहा लाख वीस हजार हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या एकशे दहा टक्के पेरण्या उरकलेल्या आहेत.

नांदेड मनपाचा अर्थसंकल्प

$
0
0
महापालिकेचा सन २०१४- १५चा १ हजार ४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरूवारी स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांनी अंदाजपत्रकीय विशेष सभेत महापौर अब्दुल सत्तार यांच्याकडे सादर केला.

दर दहा मिनिटांनी सिटीबस

$
0
0
एस.टी. महामंडळाने जालना रस्त्यावर चिकलठाणा ते महावीर चौक मार्गावर दर दहा मिनिटांनी व शहागंज ते रेल्वेस्टेशन या मार्गावर दर पंधरा मिनिटांनी सिटीबस सोडली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.

औरंगाबादमध्ये पेरण्यांना वेग

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात सतत तीन दिवस पडलेल्या रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. सोयगाव, सिल्लोड व कन्नड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

बजाजनगरात डेंगीने तरुणाचा बळी

$
0
0
बजाजनगरात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. डेंगीसदृष्य रोगामुळे येथील एका २४ वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

खून करून मृतदेह विहिरीत फेकला

$
0
0
वाळूज परिसरातील येसगाव येथील एका ३० वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृणरित्या खून केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. खून करण्यात आलेल्या तरुणांचा मृतदेह विहिरीत आढळला.

रेशीम शेतीसाठी निधी देणार

$
0
0
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये होणारी घट भरून काढण्यासाठी पारंपरिक शेतीला रेशीम शेतीची जोड दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे असे मत राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले.

‘आयआयएम’साठी शिफारसपत्र द्या

$
0
0
‘आयआयएम’च्या सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबादेत यावी, यासाठी राज्य सरकारच्या निर्णयाची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला फक्त एक शिफारसपत्र द्यावे. पुढील पाठपुरावा आम्ही करू, अशी खणखणीत मागणी राज्यातील काँग्रेसचे दोन्ही खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव यांनी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात केली.

मोदी सरकार लोकशाहीला घातक

$
0
0
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील घटना निंदनीय, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सानिया मिर्झा प्रकरणानंतर त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा समोर येत आहे. त्यामुळे मोदी सरकार लोकशाहीला धोकादायक आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images