Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जीप टेम्पोवर आदळून दोन ठार

$
0
0
शहरातील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी जीप एका उभ्या टाटा टेम्पोला भरधाव वेगात येऊन धडकली. या अपघातात टेम्पोमध्ये सामान टाकणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये मरण पावला.

मॉडेल डिस्पेन्सरीला मुहूर्त मिळेना

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या स्थापनेला शुक्रवारी (१ ऑगस्ट) ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु वाळूज एमआयडीसीमधील कामगारांच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

कंजूस म्हटल्यामुळे तरुणाचा खून

$
0
0
चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या घोळक्यामध्ये कंजूस म्हणाल्याचा राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मित्राचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

भोंदूबाबाला अभय

$
0
0
मांत्रिकाला हाताशी धरून कारवाईचे नाटक करीत लाखो रुपये लुबाडणाऱ्या पीएसआय व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून अभय देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

खाऊच्या पैशांतून गुणवंतांना मदत

$
0
0
आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिक्षण घेऊन दहावीत नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आपलाही हातभार लागावा या भावनेतून नववीतील काही मैत्रिणी एकत्र आल्या.

डास निर्मूलनासाठी सिडकोत ‘कोंबिंग’

$
0
0
शहरात उसळलेला डेंगीचा प्रादूर्भाव रोकण्यासाठी डास निर्मूलनावर लक्ष केंद्रित करण्याचे महापालिकेच्या प्रशासनाने ठरवले आहे. त्यासाठी शुक्रवारपासून सिडको एन ९ आणि एन ११ भागात कोंम्बिग ऑपरेशन पद्धतीने डास निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

फुलांच्या राजाचं उद्यान

$
0
0
गुलाबपुष्पाकडे सगळेच आकर्षित होतात. घरी कुंडीत गुलाबाचं एखादं रोपटं हौसेनं लावण्यात येतं. विविध रंगांच्या गुलाबाचं एक मोठ उद्यान उभारलं तर..., ही कल्पनाच आपल्यासमोर विविधरंगी गुलाबपुष्प फुलविते.

राष्ट्रीय खेळाडूचा डेंगीने मृत्यू

$
0
0
अॅथलिटची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी सहादू बोलकर (वय २१) हिचे बुधवारी (३० जुलै) रात्री उपचार घेताना डेंगीने निधन झाले. तिच्या निधनामुळे डेंगीने मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे.

पर्यटकांना औरंगाबाद लेणीची भीती

$
0
0
पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे जगप्रसिद्ध औरंगाबाद लेणीची झपाट्याने झीज सुरू असून डोंगरकडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. आठ वर्षांपूर्वी मोठी दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केली होती.

घरीच बनविलं होम थिएटर

$
0
0
‘शौक बडी चीज है’ असं त्याचं म्हणणं नेहमी असतं. यासाठीच त्यानं आपल्या स्वतःच्या घरात होम थिएटर, म्यूझिक हॉलची संकल्पना पूर्णत्वास आणली. व्यवसायात दिवसभर व्यस्त असल्यामुळे खास चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायला वेळ नसतो, पण चित्रपट बघण्याचा छंद तर भारीच.

मुंडेंच्या अपघाताची चौकशी पूर्ण करा

$
0
0
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी तातडीने पूर्ण करून जनतेला त्यांच्या मृत्युची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पावसाअभावी वीज संकट

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची वीज निर्मिती क्षमता ११३० मेगावॅट आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका ऐन पावसाळ्यात या औष्णिक वीज निर्मिती केंद्रास बसला आहे.

दीड वर्षाने उकलले खुनाचे गुढ

$
0
0
गेल्या आठवड्यात शहरातील एका व्यापाराला मारहाण करून लुटीच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती शहरातील अट्टल गुन्हेगारांची टोळी लागली आहे. या टोळीने शहरात मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी, लुटमार व एक खून केल्याचे उघडकीस आले आहे.

जालना जिल्हा परिषद सभेत मोडतोड

$
0
0
जालना जिल्हा परिषदेच्या गुरुवारी (३१ जुलै) झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईवर चर्चा करावी व मागील सभेचा अनुपालन अहवाल सादर करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहातील टेबलांची तोडफोड केली.

'पाहुण्याने पाहुण्यासारखे रहावे'

$
0
0
‘भैय्युजी महाराजांचा कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र न घेता गंगापूरमध्ये का,’ असा सवाल करीत माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी ‘गंगापूरची उमेदवारी बाहेरच्याला देऊ नये. पाहुण्याने पाहुण्यासारखे राहावे, घरात घुसू नये,’ असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना दिला.

मका केंद्राचे दहा दिवसांत उद्घाटन

$
0
0
‘तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन होते. त्यामुळे पणन महासंघ व शासनातर्फे येत्या दहा दिवसांत अकरा कोटी रुपयांच्या मका प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्याच येईल,’ अशी घोषणा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

टीका, तुलना दोन्ही टाळाच

$
0
0
दुसऱ्यावर टीका करताना ज्या प्रकारचे हानीकारक विचार व भावना निर्माण होतात किंवा ज्या जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात, त्याचा विपरीत ‌परिणाम सर्वांत आधी टीका करणाऱ्या व्यक्तीवर होत असतो आणि नंतर समोरच्या व्यक्तीवरही होतो; परंतु टीका करणाऱ्या माणसाच्या हे कधीच लक्षात येत नाही.

घाटीत पाच कोटींची उपकरणे दाखल

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (घाटी) जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीसी) निधीतून पाच कोटी ८० लाख रुपयांची उपकरणे खरेदी करण्यात आली आहे.

अश्विनीचा मृत्यू, मनसे आक्रमक

$
0
0
राष्ट्रीय खेळाडू अश्विनी बोलकरचा डेंगीने झालेल्या मृत्यूप्रकरणी, शुक्रवारी (१ ऑगस्ट) मनसेने सिडकोच्या वॉर्ड ई कार्यालयासमोर जोरदार निदर्शन केले. याप्रकरणी मनपातील दोषींवर गुन्हे दाखल करा, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

उंच माझा झोका; चुके काळजाचा ठोका

$
0
0
नाग आणि जिवतीच्या प्रतिमेची पूजा करीत शुक्रवारी (१ ऑगस्ट) घरोघरी नागपंचमी सण उत्साहात साजरा झाला. नागपंचमी सणानिमित्त शहरातील महिला मंडळांनी विविध उपक्रम आयोजित केले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images