Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जकात नको, तूर्त एलबीटीच राहू द्या

$
0
0
जकात कराचा विषय काढू नका. तूर्त एलबीटीच राहू द्या, असे स्पष्ट आदेश मंगळवारी (१९ ऑगस्ट) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्योगाच्या गरजेचे हवे शिक्षण

$
0
0
शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचा परस्पर सहभाग वाढावा या दृष्टीने सर्वंकष विचारविनिमय होणे आवश्यक आहे. राज्यातील उद्योजकांना स्थानिकांमधूनच कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी अनेक व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात उद्योजकांचा सहभाग घेण्यात आला आहे.

सीए: विस्तारणारे करिअर

$
0
0
दशकभरापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) क्षेत्रातील करिअरकडे वळणारे विद्यार्थी मोजकेच होते. आता या क्षेत्रातील करिअरचा विस्तार होऊ लागला आहे. औरंगाबाद शहरामध्येच सीए होण्यासाठीचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे.

कौशल्य विकास: काळाची गरज

$
0
0
भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला कौशल्य विकासाची जोड देऊन भारताच्या सकळ राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. यासाठी २०२२पर्यंत ५० कोटी युवकांमध्ये तांत्रिक-व्यवस‌ायिक कौशल्य विकसित करणे त्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

'त्याला' आबा भेटले

$
0
0
काही वर्षांपूर्वी झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत तडीपार करण्यात आलेला, तसेच खुनाचा प्रयत्न, धुळे दंगल यांसारखे गंभीर आरोप असलेल्या गाजी सादोद्दिन याच्या कार्यालयावर जाऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सत्कार स्वीकारला.

काँग्रेस मुलाखतींसाठी गर्दी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मुंबईत मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असतानाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांनी दांडी मारली.

उद्योजकाला धमकावणारा गजाआड

$
0
0
उद्योजक उमेश दाशरथी यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. महत्त्वाची सीडी हात लागली असल्याचे सांगत तो दाशरथी यांना धमकावत होता.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा कारभार रामभरोसे

$
0
0
उस्मानाबाद राज्यातील अनेक सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. उस्मानाबाद येथील या कार्यालयात गेल्या १६ महिन्यांपासून पूर्णवेळ सहाय्यक धर्मादाय आयुक्त नसल्यामुळे या कार्यालयाचे कामकाज पूर्णतः खोळंबले आहे.

कोरड्या दुष्काळाचे बैलपोळ्यावर सावट

$
0
0
बळीराजासाठी आनंदाची पर्वणी असलेल्या बैलपोळा सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ सजली आहे. बळीराजाचे दैवत आणि शेतीत राबणाऱ्या बैलांना सजविण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढ झाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

$
0
0
उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, जिल्हा सहकारी बँकेच्या मोठ्या थकाबाकीदारांविरूद्ध तातडीने गुन्हे नोंदविण्यात यावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

उद्‍‍घाटनांचा धडाका

$
0
0
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा नांदेड येथे गुरुवारी होत आहे. केंद्रात सत्ता गेल्यानंतर धास्तावलेल्या काँग्रेसने राज्यात चौथ्या वेळेस आपलीच सत्ता यावी या हेतूने हा डामडौल, समारंभ आयोजित केला आहे.

मराठवाड्यात भूकंपाची अफवा

$
0
0
मंगळवारी मध्यरात्रीनंतर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील काही भागात भूकंप झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.

तुळजाभवानीला सव्वा किलो सोन्याचा मुकूट अर्पण

$
0
0
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थान समितीच्या दृष्टीने २० ऑगस्ट हा भाग्याचा दिवस ठरला. या दिवशी सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा सव्वा किलो सोन्याच्या वस्तूची दान रूपी भेट देवस्थान समितीला प्राप्त झाली आहे.

रेल्वेगाड्या कोल्हापूरपर्यंत न्या

$
0
0
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या पुढे कोल्हापूरपर्यंत न्याव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मनमाडमार्गे जाणारी नांदेड- पुणे, लातूरमार्गे धावणारी पुणे एक्स्प्रेस व अमरावती- पुणे या रेल्वेगाड्या पुण्यात पोहोचल्यावर तेथेच फलाटावर उभ्या केल्या जातात.

शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याचा दावा

$
0
0
मार्च महिन्यात सिल्लोड- सोयगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन हाती आलेले रब्बीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे सहा महिन्याचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

फुलंब्री तालुक्यात कडधान्यावर कीड

$
0
0
तालुक्यातील खरीप हंगामातील कडधान्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यात किडीच्या चरख्यात कडधान्य भरडली जात आहे. त्यामुळे हातातोंडला आलेले पीक वाया जाईल, या भीतीने शेतकरी औषध फवारणी करीत आहे.

कायगाव येथे गोदापात्रात दोन मृतदेह सापडले

$
0
0
एका ३५वर्षीय अनोखळी महिलेचा मृतदेह कायगाव येथील गोदावरी नदीवरील जुन्या पुलाजवळ बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी सापडला. प्रथमदर्शनी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

बेपत्ता खड्ड्यांचा शोध लागेना

$
0
0
जिल्ह्यात ‘शतकोटी वृक्ष लागवड योजने’अंतर्गत रोजगार हमी योजनेतून रोपवाटिका निर्मिती आणि रोपांची लागवड सुरू आहे; मात्र बहुतेक खड्डे फक्त कागदावर आहेत.

मापात पाप नाही...!

$
0
0
मुख्तारभाई. २८ वर्षांपूर्वी त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी सुरू केली. या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं. पेट्रोलच्या किंमती वाढल्या. वाहनांची संख्या वाढली. ते मात्र तिथंच आहेत. आजही पेट्रोल पंपावर येणारा त्यांना ओळख दाखवून हसतो, दोन क्षण गोड बोलतो.

साताऱ्याच्या सरपंचांविरुद्ध ‘अविश्वास’

$
0
0
साताऱ्याच्या सरपंच अलका शिरसाठ यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून १३ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध बुधवारी (२० ऑगस्ट) तहसीलदारांकडे अविश्वास ठराव सादर केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images