Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ठिबक’च्या अनुदानाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा

$
0
0
‘नॅशनल मिशन फॉप मायक्रो इरिगेशन’ (एनएमएमआय) योजनेत ठिबक सिंचन करणाऱ्या राज्यातील सुमारे १ लाख ४५ हजार ६०० शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून सरकारी अनुदानाची प्रतीक्षा आहे. या शेतकऱ्यांचे सुमारे ३९७ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान थकित आहे.

टंचाई अडकली टक्केवारीत

$
0
0
लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे पिके वाळत आहेत. चापोलीसारख्या गावात तर शेतकऱ्यांनी पिकावरच नांगरणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे, ते स्पिंक्लरने सोयाबीनला पाणी देऊन पिके जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लातूर तालुक्यात गारपिटीने नुकसान

$
0
0
लातूर तालुक्यातील तीन गावांना गारपिटीचा फटका बसला असून त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता

$
0
0
येथील ग्रामीण रुग्णालयात अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाली आहे. दवाखान्याचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. गुणवत्ता समितीने अलीकडेच ‘अ’ दर्जा दिलेल्या ग्रामीण रुग्णालयांची पुरेशा डॉक्टराअभावी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.

निवडणुकीच्या कामात आडकाठी

$
0
0
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पुढ्यात निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी, विविध विभागांनी परत मागितले आहेत. कार्यालयांच्या या भूमिकेमुळे निवडणूक कामात पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

दोन दिवसानंतर शाळा सुरू

$
0
0
शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाने मुख्याध्यापकाला मारहाण केल्याने दहशतीखाली असलेल्या शिक्षकांना तहसीलदार संजय पवार यांनी धीर देऊन भविष्यात, असे प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा गुरुवारी (२१ ऑगस्ट) सुरू झाली.

तीन तालुक्यांत सुकाळ?

$
0
0
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या टंचाईसदृश तालुक्यांच्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड व वैजापूर तालुक्यांना वगळण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात आजमितीला केवळ तीस टक्केच पाऊस झाल्यामुळे का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संत सेना महाराजांची पुण्यतिथी

$
0
0
दौलताबाद येथे संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी‌निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाला बुधवारी (२० ऑगस्ट) सुरुवात झाली. एका जर्नादनी संत सेना महाराज आश्रमात बाबा महाराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला आहे.

जन्मजात असंख्य वैगुण्यांवर यशस्वी मात

$
0
0
अन्ननलिका बंद, हृदयाला छिद्र, शुद्ध-अशुद्ध रक्त मिसळण्याचा जन्मजात विकार, गर्भाशय-मूत्राशय-मोठे आतडे एकमेकांना जोडलेले...अशा एकाचवेळी असंख्य जन्मजात विकृती एका नवजात बालिकेमध्ये होत्या. एमजीएमच्या डॉक्टरांनी अथक परिश्रमांनी तिला अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले.

एकात्मता जपणारी पूर्वा सोसायटी

$
0
0
कासलीवाल पूर्वा सोसायटी ही एक सुखी, समृद्ध आणि एकोप्याने राहणारी वसाहत. कुठलाही सण असो, की महोत्सव सारे आवर्जून सहभागी होतात. मनभेदाला इथे थारा नसतो. इथली एकी हेच त्यांचे बळ आहे.

संघर्षमय संधीचे शिस्तीतून सोने

$
0
0
सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण केले. कर्तृत्वाच्या जोरावर ते उच्चपदी पोहचले. पद हे भूषविण्यासाठी नव्हे, तर अधिक जोमाने व जबाबदारीने काम करण्यासाठी असते. याचा प्रत्यय त्यांच्या कार्यशैलीतून वारंवार येतो.

अविश्वास ठराव आणणारे ग्रामपंचायत सदस्य सहलीवर

$
0
0
साताऱ्याच्या सरपंच अलका शिरसाठ यांच्याव‌िरुद्ध अविश्वास ठराव आणणारे १३ ग्रामपंचायत सदस्य एकत्र‌ सहलीवर गेले आहेत. सातारा ग्रामपंचायतीचे १७ सदस्य आहेत. त्यापैकी १३ सदस्यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीचे लग्न परराज्यात दिले लावून

$
0
0
औरंगाबादच्या एका अल्पवयीन मुलीचे परस्पर परराज्यात लग्न लावून दिल्याचा कारनामा राहुल राऊतने केल्याचे तपासात उघड झाले आहे. राहुल राऊत हा महिला तस्करी प्रकरणातला मुख्य आरोपी असून, त्याला जालना पोलिसांनी महिला तस्करी आणि बलात्काराप्रकरणी नुकतीच चंबळ खोऱ्यात अटक केली आहे.

बहुत दिन बीते...

$
0
0
‘बहुत दिन बिते........’, ‘धन धन सुहाग तेरो...’ या सारख्या मोठ्या बंदिशींनी स्वराध्यास आर्ट सर्कलची तिसरी मैफल रंगवून पंडित जयतीर्थ मेवुंडींनी मंत्रमुग्ध केले.

आरक्षणाच्या निर्णयामुळे पोलिस बॉईजमध्ये आनंद

$
0
0
पोलिसांच्या मुलांना भरतीत आरक्षण द्यावे या पोलिस बॉईज असोशिएशनच्या मागणीला अखेर यश मिळाल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. असोशिएशनतर्फे एक वर्षापासून दहा टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करण्यात येत होता.

अकरा हजार रुपये लुबाडले

$
0
0
नोकरीसाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून ११ हजार रुपये पळविल्याची घटना बुधवारी (२० ऑगस्ट) सिडको एन-२ भागात घडली. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘डॉ. हेडगेवार’चे कर्मचारी संपावर

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील २७९ कायम कामगार-कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारपासून (२१ ऑगस्ट) बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे रुग्णालयातील भरतीही गुरुवारपासून बंद करण्यात आली आहे.

उस्मानपुऱ्यातील बंगल्यात घरफोडी

$
0
0
उस्मानपुरा परिसरात गुरुवारी (२१ ऑगस्ट) झालेल्या घरफोडीमध्ये एक लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज पळविण्यात आला. चोरट्यांनी वॉचमनच्या दरवाजाला बाहेरून कडी घालून बेडरुमच्या ‌खिडकीचे ग्रिल काढून घरात प्रवेश केला. दरम्यान घरातील जेष्ठ महिलेला जाग आली.

‘समांतर’चे सोशल ऑडिट करा

$
0
0
समांतर जलवाहिनीचा खर्च अवास्तव वाढवण्यात आला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. जुनी कामे परत दाखवून खर्च वाढवण्यात आला आहे, त्यामुळे या प्रकल्पाचे ‘सोशल ऑडिट’ करा, अशी मागणी औरंगाबाद सामाजिक मंचाने केली आहे.

मृगनयनीची कलाकुसर आजपासून भुरळ पाडणार

$
0
0
चोखंदळ खरेदी करणाऱ्या शहरवासीयांना, शुक्रवारपासून (२२ ऑगस्ट) मध्यप्रदेशातली सुंदर कलाकुसर केलेली हस्तशिल्पे, सिल्कमधील साड्या खरेदी करायची संधी मिळणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images