Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वनोद्यानात पर्यटक फिरकेना

$
0
0
गांधेली-देवळाई परिसरात निसर्ग पर्यटन वाढवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या वनोद्यानाची वाताहत झाली आहे. सध्या वनोद्यान बंद असल्यामुळे पर्यटक संरक्षक भिंतीवरील तार वाकवून प्रवेश करीत आहेत.

टीव्ही चोरणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक

$
0
0
दोन वर्षापूर्वी खडकेश्वर येथील पुल टेबल पार्लरमधून तीन एलसीडी टीव्ही चोरी प्रकरणात पोलिसांनी इंजिनिअरिंग व लॉच्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे दोघेही तेथे खेळण्यासाठी जात होते.

...रुख रुख लागली जीवाला!

$
0
0
गेले दहा दिवस आशेचे, उत्साहाचे, आनंदाचे गेले. आता उद्या सोमवारी बाप्पा प्रस्थान करतील. त्यांच्या जाण्याने घर उदास होईल. घरातील झिरमिळ्या काढल्या जातील. लाइटिंगची मिणमिण थांबलेली असेल. बाहेर वाजणारे ढोल-ताशे, चौकाचौकात उभारलेले स्टेज सगळीकडे एक निशब्द शांतता अनुभवायला मिळेल.

‘सेट’चा सस्पेन्स कायम

$
0
0
प्राध्यापकपदासाठी दीड वर्षांपूर्वी घेतलेल्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल दीड वर्षांपासून रखडला आहे. या परीक्षेचा गुणांसह निकाल विद्यार्थ्यांच्या हाती आलेला नाही, त्यामुळे पुन्हा परिक्षा द्यावी का, याविषयी या विद्यार्थ्यांमधून संभ्रमाचे वातावरण आहे.

बाप्पांना आज निरोप

$
0
0
दुष्काळाची टांगती तलवार असणाऱ्या मराठवाड्यासाठी पाऊस घेऊन आलेल्या गणरायाला उत्साही आणि भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

NCPला अमरावतीत धक्का

$
0
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रवी राणा आणि संजय खोडके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अमरावती महापौरपदाच्या निवडणुकीत खोडके गटातील रिना नंदा यांनी बाजी मारली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १६ लाखांचे नुकसान

$
0
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या एक लाखापर्यंतच्या पीक कर्जावर बँकांनी व्याजाची आकारणी करू नये, असे शासन आदेश असतानाही, शासन आदेश डावलून मनमानी पद्धतीने व्याजाची आकारणी करणाऱ्या उस्मानाबाद येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेचा पर्दाफाश झाला आहे.

नांदेड जिल्ह्याला रस्ते दुरुस्तीसाठी ९५ लाख

$
0
0
नांदेड महापालिकेने गेल्यावर्षीच रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडे २१ कोटींची मागणी केली होती. निधी मिळाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे या निधीची प्रतीक्षा करण्यात येत होती.

दीड महिन्यापासून मुख्याधिकारी गायब

$
0
0
पैठण येथून बदली करून घेण्यासाठी एक वर्षापासून प्रयत्नशील असलेले मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप दीड महिन्यापासून नगर पालिकेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे नगर पालिकेचे कारभार ढेपाळला आहे. मुख्याधिकारी घरी बसून काही ‘महत्त्वाची’ कामे करीत असल्याची चर्चा आहे.

दासावाडीतील शाळेच्या भिंती कोसळल्या

$
0
0
खुलताबाद शहर व तालुक्यात रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे दासावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या आहेत. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली.

खरीप पिकांच्या उत्पादनात २० टक्के घट

$
0
0
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पिके तरारली आहेत. यंदा पाऊस लांबल्यामुळे खरीप उत्पादनात ४० टक्के घट होण्याची भीती होती; मात्र आतापर्यंत ५८ टक्के पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादकता वाढली आहे.

तुंबलेल्या नाल्याने रोगराई उंबरठ्यावर

$
0
0
सातारा गाव व परिसरात असलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई झाली नाही. त्यामुळे परिसरातील नाले तुंबले आहेत. शहरात डेंगी, काविळ, साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. तरीही या नाल्याच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.

लिंगायत समाजाचा ओबीसीत समावेश

$
0
0
लिंगायत समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करण्याचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला. लिंगायत संघर्ष समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सुरक्षा रक्षक नसलेले एटीएम मशीन फोडले

$
0
0
सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे हेरून सिडको एन- ६ मधील स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरट्यांला मशीनमधील रक्कम ठेवलेल्या लॉकरपर्यंत पोहोचता न आल्याने २९ लाख रुपयांची रक्कम बचावली.

सुभेदारीतील डासांमुळे पालिका आयुक्त त्रासले

$
0
0
डासांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना त्रस्त केले आहे. डासांच्या त्रासाला कंटाळून त्यांना अखेर सुभेदारी विश्रामगृहाचा सूट बदलावा लागला आहे.

पदोन्नतींचा बाजार

$
0
0
नागरी सुविधांच्या माध्यमातून मिळणारा ‘मेवा’ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती किंवा पदस्थापनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘मेव्या’पेक्षा अनिश्चित स्वरुपाचा असतो. त्यामुळे ‘शाश्वत’ मानल्या जाणाऱ्या पदोन्नतीबद्दल आयुक्तांपासून सर्वचजण आग्रही असतात.

पालिकेचा खर्च उत्पन्नाएवढाच!

$
0
0
खर्चा एवढेच उत्पन्न होऊ लागल्यामुळे महापालिकेची तिजोरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था ‘राम भरोसे’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी रविवारी (७ सप्टेंबर) रात्री अचानक भेटी देत सुरक्षेचा आढावा घेतला. विद्यापीठातर्फे नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी १५ जण गैरहजर आढळले तर, काही रक्षक चक्क झोपले होते.

मॅरेथॉनपटू भरत धायेला ५० हजारांची मदत

$
0
0
कोठाळा (ता. अंबड, जि. जालना) या खेडेगावातील मॅरेथॉन धावपटू भरत धायेची नैरोबीच्या (केनिया) अॅथलेटिक्स संघटनेने दखल घेतली. आर्थिक मदतीसाठी भरतची धावाधाव सुरू असताना स्वाभिमान क्रीडा मंडळाने ५० हजार रुपयांची मदत करून त्याच्या कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या.

लाखमोलाचे डाळींब मातीमोल

$
0
0
पावसाने दडी मारल्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी घाईत काढणी केलेल्या डाळींबाची आवक वाढली आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रतवारी नसलेल्या डाळींबाचा दर अवघा १५ ते ३० रुपये प्रतिकिलो आहे. ऐन हंगामात डाळींबाला मातीमोल भाव मिळाल्यामुळे फळबागधारक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images