Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘राज’दरबारात मुलाखतींचा फार्स

$
0
0
मुलाखतस्थळी नियोजनाचा अभाव, गर्दीमुळे त्रासलेले कार्यकर्ते, दुखावलेले इच्छुक उमेदवार आणि वैतागलेले राज ठाकरे, अशा वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुलाखतींचा सोपस्कार पार पडला.

तरीही ‘लता’वेल बहरतोय!

$
0
0
जन्मत:च हात नाहीत. आई-बाबांना नातेवाईकांसह सग्यासोयऱ्यांनी सांगितले, ‘मारून टाका मुलीला. सोडून द्या मुलीला, नाही तरी उपयोग काय अशा मुलीचा,’ असा सल्ला नातेवाईक, सग्या-सोयऱ्यांनी आई-बाबांना दिला. ‘मुलगी झाली अन् त्यात तिला हातही नाहीत तरी चालेल.

उड्डाणपुलांना महापालिकेचा अडसर

$
0
0
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे जालना रस्त्यावर तीन उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. पुलाचे बांधकाम करताना वाहतुकीस अडथळा येऊ नये, म्हणून सोडण्यात आलेली रस्त्याची जागा अपुरी पडत असल्याने तिन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

‘शटडाउन’मध्ये व्हॉल्व्ह गळतीमुक्त

$
0
0
महापालिका आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे घेण्यात ‘मेगा शटडाउन’अंतर्गत सोमवारी सुमारे ६४ व्हॉल्व्ह, जलशुद्धीकरण केंद्रातील तीन गळत्यांसह १४०० मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीला क्रॉसकनेक्शन करण्याचे काम करण्यात आले.

आणि राज ठाकरेंचा मूड गेला

$
0
0
मनसे इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनासाठी केलेली हुल्लडबाजी पाहून चिडलेल्या राज ठाकरे यांच्या रुद्रावताराने दिवसभर स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. ‘प्रगल्भ’ उमेदवार नसल्यामुळे राज यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना फटकारले. मुलाखती घेऊनही सक्षम उमेदवार सापडले नाहीत.

आरोग्य केंद्रात दारू अड्डा

$
0
0
औरंगाबादची अनेक आरोग्य केंद्रे हे मद्यपी-जुगारी आणि टवाळखोरांचे अड्डे बनले आहेत.

गुंठेवारी पाडू शकते!

$
0
0
गुंठेवारी प्रश्नाचा सामना करणारे जवळपास पन्नास हजार मतदार पूर्व विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे भवितव्य निश्चित करणार आहेत.

आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल

$
0
0
राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतरही राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) गाड्यांवरील सरकारी जाहिराती कायम असल्यामुळे, या प्रकरणात जाहिरात एजन्सीविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागांचा तिढा बाबांनी सोडवला असता

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा तिढा आहे. हा तिढा सोडविण्यासाठी माझे बाबा हवे होते, असे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची अनुपस्थितीची जाणीव व्यक्त केली.

महायुतीची सत्ता येणे महत्त्वाचे

$
0
0
राज्यात सत्ता परिवर्तन करून महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी ‘संघर्ष यात्रे’चा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, याहीपेक्षा महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी व्यक्त केली.

सहा महिन्यांची ‘हाजी’

$
0
0
चिकलठाणा विमानतळावरून मंगळवारी (१६ सप्टेंबर) हज यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान रवाना झाले. या विमानाने सहा महिन्याची चिमुकली गेली आहे. औरंगाबाद येथून एकूण २३३० हाजी यात्रेसाठी गेले आहेत.

५८ जलकुंभ कोरडे

$
0
0
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनींवरील गळती दुरूस्ती करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पाणीपुरवठा सुरू झालाच नाही. त्याचा परिणाम म्हणून शहरातील सर्वच्या सर्व ५८ जलकुंभ कोरडे पडले आहेत. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

दगडाबाईंचे कुटुंबीय वाऱ्यावर

$
0
0
मराठवाडा मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. झाशीच्या राणीप्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक तर, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविली. सरकारी यंत्रणेने मात्र, दगडाबाईंच्या कुटुंबीयांना दीड वर्षांपासून त्रस्त केले आहे.

औरंगाबादकरांना बिलांचा शॉक

$
0
0
ऑक्टोबरच्या वीजबिलात औरंगाबादकरांना वाढीव बिलाचे पैसे मोजावे लागणार आहे. थकित एलबीटीचे वीस कोटी रूपये, जीटीएल कंपनीला २० सप्टेंबरपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. ही रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जाणार असल्याने ऐन सणासुदीला औरंगाबादकरांना अतिरिक्त वीजबिलाचा शॉक बसणार आहे.

...तर २८८ जागा स्वबळावर

$
0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही आपल्या जागांच्या मागणीवर अडून बसल्याने निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. जागांचा तिढा लवकरच सुटेल.

मर्दानी दगडाबाईचे कुटुंबीय वाऱ्यावर

$
0
0
मराठवाडा मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. झाशीच्या राणीप्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक तर, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविली.

शिवसैनिकांना फुकटचा हेलपाटा

$
0
0
मुंबईहून औरंगाबादकडे निघालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काल मंगळवारी अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईत ‘मातोश्री’ वर बोलावण्यात आले. काही तरी विशेष घडणार आहे, असे मानून पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. मुंबईत पोचल्यावर बुधवारी सकाळी त्यांना पुन्हा औरंगाबादला जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना निष्कारण हेलपाटा मारावा लागला.

मनसैनिकांचे मुंबईकडे लक्ष

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा विधानसभेच्या उमेदवार निवडीसाठी ग्रेडिंग तयार केले आहे, त्यामुळे इच्छुकांचे आता मुंबईच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.

युतीचे पानिपत होईल!

$
0
0
जाहिरातबाजी आणि मोदींचे पॅकेज करून भाजपने केंद्रात सत्ता मिळविली, पण गेल्या १०० दिवसांत मोदींच्या सरकारने देशपातळीवर घेतलेले निर्णय जनतेची दिशाभूल करणारे ठरले. नवीन सरकारकडून केलेली अपेक्षा निराशेचे पडसाद मंगळवारी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून उमटले, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

एमआयएम रिंगणात

$
0
0
मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम हा पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. राज्यात ४० जागा लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images