Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मतदारसंघात पंचरंगी लढत

$
0
0
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ वगळता औरंगाबाद पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्व मतदारसंघात तीस उमेदवार राहिले आहेत.

भाजपचे ‘मिशन औरंगाबाद’

$
0
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जिंकण्याचा चंग बांधत भाजपने राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये भाजपचे राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील आमदार, खासदार, पक्षाचे राष्ट्रीयमंत्री १३ ऑक्टोबरपर्यंत ठाण मांडणार आहेत.

उस्मानाबादचा कॅप्टन पाटील शहीद

$
0
0
उत्तर प्रदेशातील बरेली कॅन्टोन्मेंट भागातील लष्करी तळावर बुधवारी सकाळी लष्कराच्या ‘चिता’ हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात उस्मानाबादमधील कॅप्टन अविनाश यशवंत पाटील (वय २७) यांचा समावेश आहे.

...तर राजकीय दुकान बंद करीन

$
0
0
महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या चारही पक्षांना विधानसभा निवडणुकीत लाथा मारा. सत्ता माझ्या हाती सोपवल्यानंतर तुमची आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, तर राजकीय दुकान बंद करीन,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

...झाकली मूठ सव्वा लाखाची!

$
0
0
सॅँडी सरांना भेटून विद्यापीठातून बाहेर पडला. पीएचडीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं. विधानसभा निवडणूक, असा विषय त्यानं निवडलेला. आता निवडणुका लागल्यानं उमेदवारांच्या मुलाखती, त्यांचं प्रचार तंत्र यावर काहीबाही त्याला शोधनिबंधात लिहायचं होतं.

जप्त केलेले ५६ लाख हवाला व्यवहाराचे!

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कन्नड येथे दिल्ली येथील तरुणांकडून जप्त करण्यात आलेली ५६ लाख रुपयांची रोकड ही हवाला व्यवहाराची असल्यामुळे ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी दिली.

‘पूर्व’मध्ये गुंठेवारीची डोकेदुखी

$
0
0
औद्योगिकदृष्ट्या वाढलेल्या औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर कामगार, कष्टकरी येऊन स्थायिक झाले. शहरात घर घेणे आवाक्याच्या बाहेर असल्याने ‘२० बाय ३०’चे प्लॉट घेण्याकडे ओढा वाढला.

शिवसेना - भाजप दुबळे

$
0
0
‘भाजपा- शिवसेना दुबळे आहेत. हे विरोधी पक्ष बळकट असते तर, राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने पंधरा वर्ष राज्य केलेच नसते. सत्ताधारी व विरोधकांची आतून हातमिळवणी झालेली आहे,’ असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

सुटकेपूर्वीच घेतला जगाचा निरोप

$
0
0
निवडणुकीच्या काळात वाँटेड आरोपींवर कारवाई करताना पोलिसांनी दोन भावांना पकडले. कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर जामीनही मिळाला, पण आदेश जेलपर्यंत वेळेत पोचलेच नाहीत.

साऱ्या शहरात स्वच्छतेचा जागर

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’ने (सीएमआयए) गुरुवारी (२ऑक्टोबर) औरंगाबाद व जालना येथील औद्योगिक क्षेत्रात एकाचवेळी सात ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.

दसऱ्याला भाव खाणार झेंडू

$
0
0
स्थूलपुष्प या नावाने संस्कृतमध्ये ओळखला जाणारा झेंडू ग्रामीण महाराष्ट्राला गोंडा या गोंडस नावानेच परिचित आहे. त्यामुळे आपल्या कृषिप्रधान संस्कृतीच्या बहुतेक सण, उत्सव शिवाय धार्मिक कार्यक्रम व मंगलकार्यात झेंडूच्या फुलांची हजेरी असते. त्यामुळेच झेंडूच नवरात्र, दसऱ्याला भाव खाऊन जातो.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

$
0
0
सण उत्सवाची धामधूम सर्वत्र चालू असताना विजेच्या लपंडावामुळे नवरात्र मंडळ व शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकीकडे वीज बिलासाठी तगादा लावणारी महावितरण कंपनी मात्र सुरळीत वीज पुरवठा देण्यात अपयशी ठरली आहे.

बीड झेडपीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

$
0
0
बीड जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चारही विषय समित्या कायम राखल्या आहेत. विषय समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बिफोर टाइम इज राइट टाइम

$
0
0
निर्मलदादांचा जन्म तसा पाकिस्तानातल्या कराचीतला. फाळणीनंतर ते भारतात आले आणि औरंगाबादेत स्थिरावले. त्यांचा स्वतःचा संसार नाही. त्यांनी सुरू केलेली मुकुल मंदिर शाळा हाच त्यांचा संसार.

‘हिंदुत्व म्हणजे जीवनप्रवाह’

$
0
0
‘हिंदुत्व म्हणजे जीवनप्रवाह, सर्वांना सामावून घेण्याची शक्ती आहे. स्वयंसेवक हे त्या हिंदुत्वाचे पाईक असून, यात सर्व पंथ, जाती, प्रवाह सामावले आहेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक सघांचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले.

भाजपला मदत नाही : शरद पवार

$
0
0
आघाडी तोडून राष्ट्रवादी कॉँग्रेसने भारतीय जनता पक्षाला मदत केल्याचा आरोप चुकीचा असून केवळ राजकीय स्टंट आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिले.

...तर राजकीय दुकान बंद: राज

$
0
0
स्वार्थासाठी युती आणि आघाडीतील चार पक्षांनी महिनाभर जागा वाटपावरून तमाशा केला. महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या या चार पक्षांना विधानसभा निवडणुकीत लाथा मारा.

औरंगाबाद, बीडमध्ये आज मोदी

$
0
0
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचाराची संपूर्ण भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवली आहे. औरगाबाद आणि जालना जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची गरवारे स्टेडियम मैदानावर शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार आहे.

बघ्यांच्या हुर्योने मनसे चिंतेत

$
0
0
ऐन विधानसभा निवडणुकीत प्रचारात पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची प्रतीक्षा होती. राज यांनी त्वेषपूर्ण भाषणातून पक्षात उत्साह निर्माण केला; मात्र प्रत्येक उमेदवाराची भाषणात ‘बघ्यांनी’ हुर्यो केल्यामुळे मनसेच्या गोटात चिंता वाढली आहे.

लढतीला किनार सहानुभूतीची

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मतदारसंघात मुंडेंची कन्या पंकजा आणि त्यांचे पुतणे धनंजय यांच्यात थेट लढत होत आहे. मुंडेंच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती पंकजांच्या बाजूने असली, तरी जनसंपर्काद्वारे त्यावर मात करण्याचा प्रयत्न धनंजय करीत आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images