Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘टीईटी’कडे विद्यार्थ्यांची पाठ

$
0
0
नोकरीच्या रोडावलेल्या संधी, पहिल्या टीईटीचा घसरलेला निकाल याचा परिणाम डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेवर दिसण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियेकडे शिक्षण शास्त्र पदविकाधारकांनी (डीटीएड) पुरती पाठ फिरविली आहे.

सभास्थळी चेंगराचेंगरी

$
0
0
मोदींच्या सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मैदानावर जागा नसल्याने पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेर अडवून ठेवले. भाषण सुरू होताच जनतेच्या संयम सुटला आणि गर्दीने प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश मिळविला.

कॉन्व्हाय पासिंग एमआयडीसी

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी (४ ऑक्टोबर) पाचच्या सुमारास विमानतळावरुन गरवारे स्टेडियमकडे रवाना झाले. दिल्ली येथून मागविलेल्या विशेष सफारी कारमधून मोदी सभास्थळी दाखल झाले.

गर्दीला ‘मोदीदर्शना’ची आस

$
0
0
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही ‘मोदी फिव्हर’ असल्याचे चित्र शनिवारी (४ ऑक्टोबर) शहरात दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली.

अनुभवली रेकॉर्डब्रेक सभा

$
0
0
पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच औरंगाबादला येणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेची उत्सुकता होती. गरवारे मैदानावर झालेली विक्रमी गर्दी, सभा संपल्यानंतर चारही बाजुंनी जाणारे लोकांचे लोंढे, वाहनांच्या लांबच लांब रांगा या वैशिष्ट्यांनी शहरवासीयांनी प्रचंड गर्दीची सभा अनुभवली.

उद्या ‘मटा डिबेट’

$
0
0
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ऑक्टोबर हिटसोबत राजकीय वातावरणही तापले आहे. औरंगाबादकरांचा आवाज उठविण्यासाठी सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी ‘मटा डिबेट’चे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी

$
0
0
तुम्ही आतापर्यंत युतीची अनेक सरकारे पाहिली असतील. आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत देऊन सरकार बनवा. महाराष्ट्रासाठी मी समर्पित होतो, महाराष्ट्राची जबाबदारी मी घेतो, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) जनसमुदायाला दिला.

गडकरींचा ‘लक्ष्मीदर्शना’चा सल्ला

$
0
0
निवडणुकांच्या प्रक्रियेवर पैशांचा प्रभाव पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे कसोशीचे प्रयत्न सुरू असताना केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्याने वादंग निर्माण झाला आहे.

गुजराती लोकांनी व्यापारच करावा

$
0
0
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. गुजराती लोकांनी व्यापार करावा, राजकारण करू नये, असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

अस्तित्वाची लढाई

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावरील पराभवाची नामुष्की यामुळे उस्मानाबाद मतदारसंघातील निवडणूक पाटील कुटुंबियांसाठी अस्तित्वाची लढाई आहे.

सीताराम घनदाट, रत्नाकर गुट्टे यांना अटक

$
0
0
तीन दिवसांपूर्वी पेसै वाटप केल्याप्रकरणातील सहआरोपी तथा आमदार सीताराम घनदाट यांना अटक करण्यात आली. त्यासोबतच शनिवारी रात्री पैसे वाटप केल्याप्रकरणी उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली.

पवार म्हणाले, ‘झक’ मारली का?

$
0
0
तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मधुकर चव्हाण यांच्या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाचा दर्जा घसरला. उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय ‘झक’ मारीत होते का ? अशी खालच्या पातळीवरची टीका केली आहे.

कामगारांच्या ‘पीएफ’वर डल्ला

$
0
0
मराठवाड्यातील आठ नामांकित कंपन्यांनी कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पीएफवर डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपन्यामध्ये औरंगाबादसह बीड, नांदेड, कन्नड, परभणी शहरातील कंपन्यांचा समावेश आहे.

अपहरणनाट्यामुळे पोलिसांची दमछाक

$
0
0
एका तरुणाच्या कथित अपहरण नाट्यामुळे क्रांती चौक पोलिसांची शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री चांगलीच दमछाक झाली. वस्तुतः या तरुणाला मनमाड पोलिसांनी दारूच्या नशेत गोंधळ घालतांना अटक केली होती.

सुप्रिम कोर्टानुसारच कामे

$
0
0
सुप्रिम कोर्टाने २००७ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली जातील, अशी हमी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने असिस्टंट सॉलीसिटर जनरल एम. बी. देशपांडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली.

‘औरंगाबाद टू पुणे’ फुल्ल

$
0
0
गांधी जयंतीपासून सुरू झालेली सहा दिवसांची सुटी संपली. अन् औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची एकच झुंबड उडाली. शिवनेरी, सेमी लक्झरी गाड्यांत पाय ठेवायला जागा नव्हती.

आवाहनाला मोजका प्रतिसाद

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छता अभियनाचा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकरत्यांनाच विसर पडला आहे. मोदींची गरवारे स्टेडियमवर भव्य सभा झाली. आयोजकांनी सभेनंतर कार्यकर्त्यांना सोबत आणलेले साहित्य कचरा म्हणून न फेकता जमा करण्याचे आवाहन केले.

पाण्याचे वेळापत्रक आज कोलमडणार

$
0
0
ढोरकीन येथील बुस्टर पंप येथील ‘महावितरण’चे अचानकपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.

विद्यार्थी संघटनांकडे तक्रारी नको

$
0
0
वसतिगृहातील सोयी-सुविधांच्या तक्रारी घेऊन विद्यार्थी संघटनांकडे जाऊ नका. संघटना तुम्हाला वेठीस धरतात व त्यांची काम करून घेतात, असे सांगत तक्रारी असतील तर वॉर्डन, विद्यार्थी कल्याण विभागाकडे करा, असा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून विद्यार्थिंनीना दिला गेला.

‘लक्ष्मीदर्शना’च्या सल्ल्याने वाद

$
0
0
निवडणुकांच्या प्रक्रियेवर पैशांचा प्रभाव पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे कसोशीचे प्रयत्न सुरू असताना केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्याने वादंग निर्माण झाला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images