Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पेपरफुटी प्रकरणी ४९४ पानी आरोपपत्र

$
0
0
यवतमाळ जिल्हा परिषद नोकरभरती पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने ११ आरोपींविरुद्ध ४९४ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी (२९ डिसेंबर) कोर्टात सादर केले आहे. १ नोव्हेंबर रोजी या टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परीक्षेची उत्तरतालिका हस्तगत केली होती. याप्रकरणी यवतमाळचे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांचीही चौकशी सुरू आहे.

विकासाच्या दृष्ट‌ीने संशोधन व्हावे

$
0
0
मुंबईमध्ये जानेवारीत सायन्स काँग्रेस होत आहे. या पार्श्वभूमीवर, औरंगाबादमध्ये ‘प्री-सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार फरीद झकेरिया उपस्थित होते. भारतातील शैक्षणिक संस्था आणि त्यांची वाटचाल यांविषयी त्यांच्याशी केलेली बातचित...

शैक्षणिक संस्था पैसे कमावण्यासाठी!

$
0
0
‘भारतात शैक्षणिक संस्था केवळ पैसे कमावण्यासाठी काढल्या जातात असे विदारक चित्र आहे. त्यामुळे महासत्तेचे स्वप्न पाहण्यापेक्षा ह‌े चित्र अगोदर बदला,’ असे परखड मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, पत्रकार फरीद झकेरिया यांनी व्यक्त केले. मंगळवारी (३० डिसेंबर) विद्यापीठातील ‘प्री-सायन्स काँग्रेस’मध्ये आले असता त्यांनी ‘मटा’शी संवाद साधला.

काठीने वार करून मोबाइल चोरी

$
0
0
चालत्या रेल्वेमध्ये दरवाजाजवळ उभे राहून मोबाइलवर बोलत असाल तर सावधान... कधी तुमच्या हातावर काठीचा अथवा दगडाचा फटका बसेल अन् तुमचा मोबाइल खाली पडेल सांगता येत नाही. काठीचा फटका मारून चालत्या रेल्वेतील प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

समांतरविरोधात ‘आप’ रस्त्यावर

$
0
0
महापालिकेचे काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या दुराग्रहामुळेच समांतर पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढत गेला आहे. संबंधित कंपनीनेही वेळेत काम सुरू केलेले नाही. त्यात कंपनीला फायदा व्हावा, यासाठी पाणीपट्टीत भरसाठ वाढ करून जनतेवर विनाकारण बोजा टाकण्यात आला आहे, असा आरोप करत आम आदमी पार्टीने केला आहे.

उपचाराविना ‘ती’ शिव्या देत राहिली

$
0
0
घाटीची ओपीडी. दुपारी १२ ची वेळ. एक पस्तीशीतली महिला अखंडपणे आरडा-ओरड करत होती. मोठमोठ्याने शिव्या देत होती. नको-नको ते ओरडून बोलत होती. भयंकर अस्वस्थ होती. या दोन चिमुकल्यांच्या आईला तातडीने उपचारांची गरज होती. पण उपचार मिळत नसल्याने तिचा त्रागा सुरू होता. हा प्रकार तब्बल दोन तास सुरू होता.

पोलिस करणार तरुणांत जनजागृती

$
0
0
नव्या वर्षात नेटवर्क वाढविण्यासाठी तरुणांत जनजागृती करणे, बिट सिस्टीम सुधारणे, गुन्हेगारांची कार्यपद्धती विभाग अपडेट करण्याचा निर्धार पोलिस खात्याने नव्या वर्षात केला आहे.

नव्या वर्षात मिळणार दोन उड्डाणपूल

$
0
0
वर्ष नवे, हर्ष नवे. २०१५ हे साल औरंगाबादच्या वैभवात भर घालणारे असेल. येत्या महाराष्ट्र दिनी दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण, सुसज्ज मिनी घाटी, प्राणिसंग्रहालयाचे विस्तारीकरण, व्यवसाय शिक्षणात झेप आणि उभ्या महाराष्ट्राला खुणावणारे पर्यटन. ही सारी शिदोरी आपल्या संघर्षमय वाटचालीत सुखकारक ठरेल यात शंकाच नाही.

नवे पर्यटनस्थळ टप्प्यात

$
0
0
नवीन ‘टुरिझम स्पॉट’च्या शोधात असलेल्या औरंगाबादकरांसाठी वन विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या गाढे जळगाव (ता. औरंगाबाद) परिसरात वन पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे.

‘फाइव्हस्टार लूक’ देण्याचे काम गुलदस्त्यातच

$
0
0
उस्मानाबाद बसस्थानकाला पंचतारांकित लूक (फाइव्ह स्टार) देण्याच्या कामाचा श्रीगणेशा होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही या कामासंदर्भाने कसलीही हालचाल होताना दिसत नाही.

आत्महत्या रोखण्याचा महिलांचा निर्धार

$
0
0
मराठवाडा आणि महाराष्ट्रभर शेतकरी आत्महत्या प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र रोखण्यासाठी महिला सरसावल्या असून त्यासाठी समुपदेशन करण्याचा निर्धार महिलांनी बचत गटाच्या मेळाव्याप्रसंगी व्यक्त केला.

पाणीपुरवठा योजनेसाठी टाळाटाळ

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबवून त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषदेकडे दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वारंवार विनंत्या करूनही ही कामे वर्ग करून घेण्यास जिल्हा परिषद टाळाटाळ करीत आहे.

एफडीएला मिळणार हक्काची इमारत

$
0
0
शहरातील नागरी सुविधा देणा‍ऱ्या विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये येत्या वर्षात अनेक नवीन बाबी पूर्ण होणार आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाला हक्काची इमारत मिळेल, तर सिडकोचा कारभार इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे.

एसटीचा प्रवास आरामदायी होणार

$
0
0
भंगार निमआरामचा त्रासदायक प्रवास नवीन वर्षात संपणार आहे. एअर सस्पेशनच्या नवीन गाड्यांचा आरामदायी प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार असून या गाड्यांच्या निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. लवकरच या गाड्या विविध मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.

नव्या-जुन्या योजनेची बेरीज; खुलाशातही आयुक्तांची कबुली

$
0
0
सध्याच्या पाणीपुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा समावेश समांतर जलवाहिनीमधून मिळणाऱ्या पाण्यामध्ये असणार आहे. महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनीच बुधवारी खुलाशात ही कबुली दिली आहे.

‘समांतर’चे मुंबईतील अधिकारी शहरात दाखल

$
0
0
तोडफोड आणि मारहाणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांना धीर देण्यासाठी ‘समांतर’ चे मुंबईतले अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी फारोळा येथे अतिरिक्त पंप बसवण्यात आला आहे.

विज्ञान जनकल्याणासाठीच

$
0
0
‘विज्ञानाचा उपयोग हा जनकल्याणासाठीच आहे, मात्र याचा उपयोग कोण कशासाठी करतो हे त्या-त्या माणसांवर अवलंबून असते. भारत हा प्रतिभावंतांचा देश असून येथे विज्ञानाच्या दृष्टीने मोठे काम होत आहे,’असे प्रतिपादन नोबल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ प्रा. अडा ई योनाथ यांनी केले.

लाखाच्या व्हीलचेअर कवेत

$
0
0
तब्बल लाख-दीड लाखाच्या बॅटरी ऑपरेटेड व्हीलचेअर आता औरंगाबादकर सर्रास वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. साठ हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या व्हीलचेअरची शहर-परिसरात आणि संपूर्ण मराठवाड्यात-विदर्भात अलीकडे शब्दशः डझनांनी विक्री झाली आहे.

पालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने

$
0
0
महापालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पध्दतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आणि तसे पत्र बुधवारी (३१ डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पोलिस बनायला आला, झाला आरोपी

$
0
0
स्पोर्टस कोटयातून जालन्यातील राज्य राखीव पोलिस दलात झालेली निवड टिकविण्यासाठी पोलिस समादेशकाची बनावट स्वाक्षरी करुन थेट क्रीडा व युवक संचालनालयाशी पत्रव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images