Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्जाच्या नादात फसवणूक

$
0
0
तीन लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवूत दोघांनी मुकुंदवाडीतील एका किराणा दुकानदाराची १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या दोघांनी बीड बायपासवरील एका सिमेंट विक्रेत्याचीही याच प्रकारे फसवणूक केल्याबद्दल क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नववर्षाला किरकोळ गालबोट

$
0
0
नववर्ष साजरे करताना मद्याच्या नशेत झालेल्या किरकोळ हाणामाऱ्या व अपघातामुळे नववर्षाला गालबोट लागले. बुधवारी मध्यरात्री २५ जणांनी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले.

घराचे स्वप्न महागले

$
0
0
नवीन वर्षात रेडी रेकनरच्या दरात महापालिका हद्दीमध्ये चक्क ११ टक्के, सातारा-देवळाई नगरपालिका क्षेत्रामध्ये १० ते २५ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा जबर झटका आहे. औरंगाबाद परिसरात घर घेण्याचे स्वप्न आता आवाक्याबाहेर गेले आहे.

इंडस्ट्रिअल सोल्यूशनचे मास्टर

$
0
0
औरंगाबादच्या एन्ड्युरन्स उद्योग समूहाने देशातच नव्हे तर विदेशातही आपल्या नाविन्यपूर्ण व दर्जेदार उत्पादनामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेला आहे.

धास्ती उदगीरच्या ‘पायगुणा’ची

$
0
0
साहित्य संमेलन आणि वादाचे नाते उदगीरला भरविण्यात येणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनातही कायम आहे. उदगीरला जो नेता पाहुणा म्हणून जातो, त्याला लवकरच पद गमवावे लागते, असे समीकरण तयार झाल्यामुळे आता हे संमेलन उदगीरऐवजी देवणीला भरवण्याबद्दल काथ्याकूट सुरू झाला आहे.

चिमुरड्यांची होणार डीएनए

$
0
0
दीनवाणी चेहरे, फाटके कपडे आणि हातपाय पडत एक-दोन रुपये तरी द्या, अशी याचना करत रस्त्यावर भीक मागणारी बालके रस्त्यावर कायम दिसतात. अशाच पाच बालकांचे माता-पिता शोधून काढण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा बाल कल्याण समितीने घेतला आहे.

वॉर्ड रचनेचे काम सोमवारपासून

$
0
0
आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना मोडीत काढून वॉर्ड रचना करण्याचे काम येत्या सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. हे काम किमान २० दिवस चालणार असून, १ फेब्रुवारीच्या सुमारास वॉर्डांच्या आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी!

$
0
0
मराठवाड्यात सलग दुसऱ्या वर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, ऐन हिवाळ्यात बरसलेल्या या पावसामुळे रबीच्या पिकांना संजीवनी मिळणार आहे.

राज्यात शिक्षक भरती बंद

$
0
0
राज्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या भरमसाठ आहे. सरकारसमोर त्यांचे समायोजन करण्याचा पेच आहे. शाळांमध्ये नवीन शिक्षकांची गरज नसल्यामुळे राज्यात शिक्षक भरतीचा विचारही शक्य नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना येथे स्पष्ट केले.

रोहयो शेतकऱ्यांच्या मुळावर

$
0
0
रोजगार हमी योजना राबविताना पैठण तालुक्यातील अधिकाऱ्यांची अनियमितता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नियमबाह्य कामांची चौकशी सुरू असल्याने रोहयोतून मंजूर झालेल्या विहिरींचे पेमेंट थांबविले आहे. त्यामुळे आतापर्यंत केकत जळगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

‘त्या’ इमारतीवर दुसऱ्यांदा हातोडा

$
0
0
एकदा पाडलेले अनधिकृत बांधकाम पुन्हा बांधणाऱ्या साताऱ्यातील इमारतीवर नगरपालिका प्रशासनाने आज पुन्हा हातोडा मारत त्या जमिनदोस्त केल्या. नगरपालिकेच्या पथकाने गट क्र. ८९ मधील इमारतींचा अनधिकृत मजला १५ डिसेंबर २०१४ रोजी पाडला होता, परंतु तिथेच पुन्हा बांधकाम करीत प्रशासनाच्या कारवाईलाच एकप्रकारे आव्हान दिले गेले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांच्याविरुद्ध अवमान याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत.

पोलिस जमादाराचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे कार्यरत एका पोलिस जमादाराचा शुक्रवारी सकाळी एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, सासुरवाडीतील मंडळींनी खून केल्याचा आरोप मृत जमादाराच्या भावाने केला असून, पत्नी व मुलीने अपघात असल्याचे म्हटले आहे.

दोन अट्टल घरफोड्यांना अटक

$
0
0
बंद घरांवर पाळत ठेऊन घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वासात तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दोघांना शनिवारपर्यंत (३ जानेवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बँक कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वेध

$
0
0
देशभरातील सुमारे पावणे दोन लाख बॅँक कर्मचाऱ्यांना सध्या निवृत्तीच्या वेध लागलेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि विलीनीकरणाची घेतलेली धास्तीतून त्यांना व्हीआरएस स्कीम लागू नसल्याने निवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

१ रुपयांच्या नोटेची पुन्हा छपाई सुरू

$
0
0
चलनातून गायब झालेल्या एक रुपयांच्या नोटा अवघ्या दोन महिन्यांत शहरातील बाजारपेठेत दिसतील. १ जानेवारीपासून या नोटांची छपाई केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली.

छायाचित्रकारांना म्हणाले, गेट आऊट!

$
0
0
‘गेट आऊट’चे शब्द, तोंडातून अर्वाच्च आणि शिवराळ भाषा वापरत शुक्रवारी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना दमदाटी केली. त्यामुळे छायाचित्रकार व पत्रकारांनी विभागीय आयुक्तांकडे महाजन यांच्याविरोधात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली.

पिन टू पियानो

$
0
0
‘पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात नाव कमाविणे, हे काही सोपे नसते. तुम्ही प्रत्येक फ्रंटवर लढत असता. स्पर्धेत अस्तित्व टिकविण्यासाठी दर्जेदार काम व सातत्य जपल्यामुळे व्यावहारिक ओळख, स्थैर्य मिळते. दुसऱ्या बाजुला स्त्री म्हणून आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वतःची ओळख मिळविण्यासाठी धडपडही सुरू असते. हेच झगडणे मला आवडते. माझ्या कामावर माझे प्रचंड प्रेम आहे.

हंडाभर पाण्यासाठी रोजच धावाधाव

$
0
0
कामगार, कष्टकरी ते उच्चभ्रू लोकांचा यादवनगर वॉर्ड पाण्याच्या समस्येतून वर्षानुवर्षे अडकलेला आहे. मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे काम सात वर्षांपासून निधीच्या प्रतीक्षेत रखडले आहे. अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, दोन बाजुंनी असलेल्या कायम वर्दळीच्या रस्त्यांमुळे कायम वाहतुकीची कोंडी, अवैध पार्किंगमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना कधी दिलासा मिळणार, असा प्रश्न आहे.

आमदार निधीच्या कामांचा बोजवारा!

$
0
0
मराठवाड्यात विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाही. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे लोकप्रतिनिधींच्या हक्काचा पैसाही वेळेवर खर्च केला जात नसल्याचे समोर आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images