Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिला शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मल्टिस्टेट सोसायटीच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका महिला शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील खानापूर (ता. परांडा) येथे घडली. मंगल विष्णू गटकूळ (वय ५२) असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. मंगल यांच्या मुलाने शेतीसाठी एका मल्टिस्टेट सोसायटीकडून कर्ज घेतले होते. मात्र, दुष्काळ आणि नापिकीमुळे त्यांना कर्ज फेडण्यात आले नव्हते. सोसायटीच्या कर्जवसुली पथकाकडून अरेरावीची भाषा करण्यात येत होती. घर आणि शेतीचा लिलाव होण्याची शक्यताही या पथकाकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे धास्तावलेल्या मंगल यांनी ११ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी मंगल यांचे पार्थिव परांडा तहसील कार्यालयाच्या आवारात आणले. मात्र, तहसीलदारांनी संबंधित सोसायटीवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वारांनी पळवली पावणेतीन लाखांची बॅग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

कामगारांचा पगार करण्यासाठी बँकेतून पैसे काढून घेऊन जाणाऱ्या एका ठेकदाराची दोन लाख ८० हजार रुपये असलेली बॅग वाळूज एमआयडीसीतील महाराणा प्रताप चौकातून दुचाकीस्वारांनी हिसकवून नेली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज एमआयडीसीतील मोरे चौकातील एसबीआय बँकेतून मक्सूद उस्मान शहा या मजूर ठेकेदराने मंगळवारी (१४ जुलै) दोन लाख ८० हजार रुपये काढले. ते एमआयडीसीतील कामगारांचे पगार करण्यासाठी जात होते. मोरे चौकातून रांजगावाकडे जाताना त्यांच्यामागून एका दुचाकीवरून दोन अज्ञात तरूण वेगात आले. शहा यांना काही समजण्याच्या आत त्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. ही घटना दुपारी अडीच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात घडली. बॅग हिसकावल्यानंतर आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार पसार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळापासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. पोलिस ठाण्याजवळून दिवसाढवळ्या पैशाची बॅग हिककावून पळ काढण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणला गोदातीरी सिंहस्थ ध्वजारोहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नाथ समाधी मंदिरामागील मोक्षघाटावर मंगळवारी (१४ जुलै) ध्वजारोहण करून पैठण येथे सिहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ करण्यात आला. या घाटावर २९ ऑगस्ट रोजी पहिले, १३ सप्टेंबर दुसरे व २५ सप्टेंबर रोजी तिसरे शाही स्नान होणार आहे, अशी माहिती पुरोहित सुयश शिवपुरी यांनी दिली.

गुरू राशीचा सिंह राशीत प्रवेश होणाऱ्या पर्वाला सिहस्थ असे म्हणतात. सिहस्थ पर्वणीत गोदावरीच्या उत्तर-दक्षिण तीराला अतिशय महत्व आहे. गोदावरी नदी पैठण येथून उत्तर-दक्षिण अशी प्रवाहित झाल्यामुळे पैठणला वेगळे महत्व प्राप्त होते. बाजीराव महाराज जवळेकर, रामकृष्ण सानप, रामनारायण अयोध्याकर, प्रफुल्लबुवा तळेगावकर, बद्रीनाथ नवल, नानक वेदी, बळीराम औटे, बबन चौरे व दिनेश पारीख यांच्या हस्ते ध्वज व स्तंभ पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष दत्ता गोर्डे व पंचायत समितीचे माजी सभापती विलास भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गीता मंदिर व गीता भवनाच्या विद्यार्थ्यांनी भजन, अभंग व भावगीते सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी ओढली नाथवंशजांची बैलगाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथांच्या पालखीसोबत आलेल्या नाथवंशजाना बसवेली बैलगाडी तीन किलोमीटर ओढून डोंगरापलिकडे पोहचवण्याची परंपरा पाटोदा तालुक्यातील हटकरवाडी येथील तरुणांनी यावर्षीही पाळली. गावाच्या तरुणांनी मंगळवारी (१५ जुलै) नाथवंशजाची गाडी ओढून डोंगरमाथ्यावर पोहचवली.

संत एकनाथांच्या पालखीने आठ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी सात मुक्कामानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हटकरवाडी येथे सकाळी दहा वाजता पोहोचली. नाथांच्या दिंडीचा पुढचा मुक्काम पाटोदा येथे असतो, हटकरवाडीहून गारमाथा डोंगर चढून पाटोद्याकडे प्रस्थान करावे लागते. हा मार्ग दगड धोंड्यांचा व अत्यंत

खडतर आहे. पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांचा पाहूणचार केल्यानंतर गावकऱ्यांनी नाथववंशजाना सजवलेल्या बैलगाडीत बसवले. गावातील तरुणांनी तीन किलोमीटर बैलगाडी ओढत नाथवंशजाना डोंगरमाथ्यावर पोहचवले. ही परंपरा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.

पन्नास हजार वारकऱ्यांचा सहभाग

नाथांची दिंडी सात दिवसानंतर पाटोदा येथे पोहचल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस हजार वारकरी दिंडीत सामील होतात. यावर्षी मात्र वारकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पाटोदा येथे पोहोचण्याआधीच दिंडीत जवळपास पन्नास हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी यांनी दिली. आतापर्यंत दिंडीत ५५ विविध दिंड्या सामील झाल्या आहेत, काही दिवसांत वारकऱ्यांची संख्या लाखाच्या घरात जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशीम शेतीला पावसाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील तीन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाचा फटका रेशीम उत्पादनालाही बसला आहे. जिल्ह्यात ५४५ एकर रेशीम शेती असून यावर्षी ४०० एकर नवीन लागवड होणार आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्यामुळे तुतीची लागवड ठप्प आहे. तसेच रेशीम उत्पादनावरही परिणाम झाला आहे.

कमी कालावधीत फायदेशीर ठरणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकरी वळले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात ५४५ एकर क्षेत्रावर रेशीम उत्पादनासाठी तुतीची लागवड झाली आहे. तर यावर्षी ४०० एकरवर लागवड अपेक्षित आहे. याबाबत रेशीम कार्यालयाला प्रस्ताव आले आहेत. जून महिन्यात तुतीची लागवड झाल्यानंतर दोन महिन्यांत रेशीम उत्पादन सुरू होते. तुतीच्या लागवडीसाठी भरपूर पाऊस आवश्यक आहे. जून महिन्यात सतत पंधरा दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर तुतीची लागवड वाढली होती. या पंधरा दिवसात सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यात जवळपास शंभर एकरवर लागवड झाली. पाऊस थांबल्यानंतर शेतकरी विहिरीचे पाणी देऊन तुतीचे संगोपन करीत आहेत, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी सातदिवे यांनी दिली. तर इतर तीनशे एकर क्षेत्रावरील लागवड ठप्प झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ८० टन रेशीम उत्पादन झाले. प्रतिकिलो तीनशे ते साडेतीनशे रुपये भाव असल्यामुळे शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत. डोंगरगाव (ता. फुलंब्री) आणि केकत जळगाव (ता. पैठण) या गावात रेशीमचे लक्षणीय क्षेत्र वाढले आहे. 'महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही तुती लागवड सुरू आहे. दरम्यान, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे रेशीम उत्पादनावर परिणाम झाला आहे. कूपनलिका आणि विहिरीचा पाणी साठा कमी झाल्याने तुतीच्या झाडांना पुरेसे पाणी देणे शक्य नाही. परिणामी, रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक वापर बंदीबाबत याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लास्टिकचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी औरंगाबादच्या दिगंबर जैन सेवा समितीच्या वतीने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका केली आहे. खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या.पी.आर. बोरा यांनी राज्यशासनासह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

महाराष्ट्र प्लास्टिक वेस्ट मॅन्युफॅक्चरिंग अॅण्ड हॅंडलिंग अॅक्ट २०११ नुसार ५० मायक्रॉमपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांवर बंदी आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नाही. पॉलिथिनचा वापर, त्यांची साठवणूक व विल्हेवाट लावणे यासंबंधी कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. विविध अन्नदार्थ पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. यामुळे मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

समितीने राज्यशासनाचे विविध विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींकडे निवेदन दिले. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष व्ही. ए. मनोरकर, विजयकुमार महिंद्रकर, किशोर घोडके, रत्नशेखर साहुजी, रवींद्र बिनायके, जिनदास मोगले, विलास जोगी आदींनी विविध विभागांकडे पाठपुरावा केला. त्यांनी या प्रकरणी कारवाई न केल्यामुळे हायकोर्टात याचिका केली. दिगंबर जैन सेवा समितीच्या वतीने सिद्धेश्वर ठोंबरे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करार संपूनही शिवनेरी सुरू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करार संपूनही अपेक्षेपेक्षा जास्त धावलेल्या वातानुकूलित शिवनेरी गाड्यातून सध्या औरंगाबाद-पुणे मार्गावर प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. यातल्या एखाद्या गाडीला दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा एसटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रवासी हिताय धोरण समोर ठेवत एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे मार्गावर शिवनेरी वातानुकूलित बससेवा सुरू केली. त्यासाठी स्वतः नवीन गाड्यांची खरेदी करण्याऐवजी, खासगी कंत्राटदारांसोबत करार केला. सध्या या मार्गावर पाच शिवनेरी गाड्या धावत आहेत. यातील दोन गाड्यांचा करार २७ जून २०१५ रोजी संपला. अन्य दोन गाड्यांचा करार आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संपेल. करार संपलेल्या गाड्या प्रमाणापेक्षा जास्त धावल्या आहेत. त्या जागी तातडीने नवीन गाड्या देण्याची गरज आहे. त्या संबंधी अजून कसलिही हालचाल महामंडळाने केलेली नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळाने या गाड्या आपल्या ताफ्यातून हटवून, प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवण्याची गरज आहे.

नवीन एसी गाड्यांची गरज

औरंगाबाद-पुणे मार्गावर धावणाऱ्या इतर शिवनेरी वातानुकूलित गाड्या जुन्या झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये कुमट वास येतो. बैठक व्यवस्थाही खराब झाली आहे. यामुळे कंत्राटदाराच्या व्हॉल्वो गाड्यांच्या ठिकाणी नवीन एसी गाड्यांची गरज आहे. महामंडळाने नवीन एसी गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या या मार्गावर पाठवल्या जात नाहीत.

औरंगाबाद पुणे मार्गावरच्या दोन वातानुकूलित गाड्यांचा एसटी सोबतचा करार संपला आहे. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाला कल्पना दिली आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या लिपिकास ६७ हजाराचा गंडा

$
0
0

औरंगाबादः जिल्हा परिषदेच्या लिपिकास शुक्रवारी ऑनलाइन भामट्यांनी ६७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. भामट्यांनी त्यांना स्टेट बँक तसेच युएस बँकेतून बोलत असून एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगितले होते. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष मानवतकर (रा. उल्कानगरी) यांना एकाने स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची थाप मारली. काही वेळात दुसऱ्या फोनवर युएस बँकेतून बोलत असल्याची थाप मारत बँक खात्याची माहिती विचारली. ती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून चार टप्प्यात ६७ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. मात्र, याचा मेसेज मोबाइलवर न आल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, भामट्यांनी सोमवारी त्यांना पुन्हा फोन केल्याने शंका आल्याने मानवतकर यांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाम दुप्पटीचे आमिष देणाऱ्याचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दाम दुप्पट करुन देण्याचे आमीष दाखवून शेकडो नागरिकांना तब्बल पाच कोटी रुपयाला गंडविणाऱ्या विजय प्रभाकर खोडगे याचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायधीश एस. जी. शेटे यांनी फेटाळला.
पवन नगर (हडको) येथील विजय प्रभाकर खोडगे याने 'श्री स्वामी समर्थ इनव्हेसमेंट'मध्ये पैसे गुतंवणूक करणाऱ्यांना दुप्पट रक्कम देण्याचे आमीष दाखविले. या आमीषाला त्याचे नातेवाईक-मित्र बळी पडले आणि अनेकांनी त्यात पैशांची गुंतवणूक केली.

खोडगेने शहरातील विविध बँकेत आपल्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावे बचत खाते उघडून गुंतवणूकदारांना त्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडले. त्याने २००८ ते २०१२ या काळात गुंतवणूकदारांची ५ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पुण्यातील मधुकर बद्रीनाथ सिनेकर यांनी सिडको पोसिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून खोडगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ४ ऑक्टोबर २०१२ रोजी सिडको पोलिसांनी अटक केली. अटक केल्यापासून खोडगे न्यायालयीन कोठडीत असून त्याने नियमीत जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायधीश शेटे यांच्या समोर सुनावणी झाली असता अॅड. राजू पहाडीया यांनी, हा गुन्हा गंभीर असून त्याला जामीन मिळाला तर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. म्हणून त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. न्यायालयाने विनंती ग्राह्य धरुन खोडगेचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखाण्याचा दलाल जाळ्यात

$
0
0

औरंगाबादः हायटेक ऑनलाइन कुंटणखाना चालवणाऱ्या रॅकेटमधील दिल्लीच्या पसार दलालाला सातारा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. २६ जून रोजी पैठणरोडवरील माँ बाप का दर्गा जवळील रो हाऊसवर छापा मारून दोन तरूणीसह दोन ग्राहकांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांच्या पथकाला पैठणरोडवर रोहाऊस मध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून छापा टाकण्यात आला होता. दरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तुषार राजपूत हा पसार झाला होता. गेल्या सोमवारी तुषार राजपूतला सातारा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याचा साथीदार सुनील राजाराम राठोड उर्फ विपूल शिसोदीया याचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पसार असलेल्या सुनील उर्फ विपूलला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टापुढे हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठात अॅडमिशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमांची यादी जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षात विद्यापीठाने जाहीर केलेल्या अभ्यसासक्रमांमध्ये उपलब्ध नसलेल्या अनेक विषयांचा भरणा आहे. यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. विषयांबाबत विद्यार्थी विचारणा करतात. काह‌ींनी ऑनलाइन अर्जही सादर केले. प्रत्यक्षात मात्र विषय नसल्याचे समोर आले आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा गोंधळ थांबतो न थांबतो, तोच सुरू नसलेल्या अभ्यसाक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्याची करामत विद्यापीठाने केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाने माहितीपुस्तिका, जाहीरात देत विविध १३० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे जाहीर केले. यात एम.ए., एम.फिल., पदवी अभ्यासक्रम, ललित कला, एमएस्सी, इंजिनीअरिंग, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध अभ्यासक्रमांसह पदविका, पदव्युत्तर पदविका, डिप्लोमा, प्रमाणणपत्र, अॅडव्हान्स डिप्लोमा यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक अभ्यासक्रम केवळ कागदावरच शिल्लक राहिले आहेत. काही विषयांचे विभाग नसतानाही अभ्यासक्रमांचा माहिती पुस्तिकेत उल्लेख करण्यात आला आहे. प्रवेशाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असल्याने अनेकांनी या अभ्यासक्रमांना प्रवेशही नोंदविला आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रमच सुरू नसल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. विद्यापीठाचा गलथानपणाही यामुळे समोर आला असून, आपल्या विभागांमध्ये कोणते अभ्यासक्रम राबविले जातात, याचीही माहिती प्रशासनाला नसल्याचे यातून समोर आले आहे.

४० अभ्यासक्रम कागदावरच

विद्यापीठाने माहिती पुस्तिकेत जाहीर केलेल्या अभ्यासक्रमांपैकी सुमारे ४० अभ्यासक्रम कागदापुरतेच उरलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; एमए/एमएस्सी होम सायन्स, एमएस्सी बायो इन्फर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीसह एम.ए. इन लाइफ लाँग लर्न अँड एक्टेंशन, व्यावहारिक मराठी, अनुवाद पदविका, माध्यम लेखन पदविका, पी.जी डिप्लोमा इन हेल्थ सर्व्हिस मॅनेजमेंट, पी.जी. डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्टेशन अँड मॅनेजमेंट, डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट अादी अभ्यासक्रम केवळ कागदावरच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकांच्या सुशोभिकरणासाठी रणगाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर सुशोभिकरणासाठी महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत छावणी परिषदेने चार चौकांसाठी रणगाडे देण्याची तयारी दर्शविली आहे. उद्योजकांनी दहा चौकांच्या सुशोभिकरण करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी तयारी दर्शविली. त्यापाठोपाठ आता छावणी परिषदही या कामात मदत करणार आहे.

महापालिकेची निवडणुकीनंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड व आयुक्त प्रकाश महाजन यांनी चौक सुशोभीकरणाचा मुद्दा हाती घेतला. उद्योजक, व्यावसायिकांच्या माध्यमातून चौकांचे सुशोभिकरण करण्याची योजना आखली. त्यानुसार आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत दहा चौकांच्या सुशोभिकरणासाठी उद्योजकांनी पालिकेकडे प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावांवर पालिकेचे प्रशासन काम करीत आहे. हे काम सुरू असतानाच आयुक्त महाजन यांनी छावणीचे ब्रिगेडियर मनोज कुमार यांच्याशी शहर व चौक सुशोभीकरणाबद्दल चर्चा केली. छावणीतर्फे काही मदत करावी, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सुशोभिकरणासाठी चार रणगाडे देण्याची तयारी छावणी परिषदेने दाखवली. चारपैकी दोन रणगाडे छावणी परिषदेच्या हद्दीत बसविले जाणार आहेत. दोन रणगाडे महापालिकेला दिले जातील. यासंदर्भातील पत्र छावणी परिषदेचे प्रशासकीय कमांडर कर्नल ए. पी. सिंग यांनी आयुक्तांना दिले आहे. दोन रणगाडे कोणत्या चौकात ठेवायचे ते निश्चित करावे, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात सुशोभिकरणाच्या कामानेही वेग घेतल्यामुळे येत्या काळात शहराचे रूप पालटलेले दिसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देशाच्या शस्त्रसामर्थ्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी आणि देशाभिमान जागृत करण्यासाठी चौकांमध्ये तोफा, रणगाडे मांडले जातात. लष्कराने छावणीतील चौकांमध्ये बोफोर्स तोफ मांडल्या आहेत.

जागानिश्चिती लवकरच

लष्कराकडून देण्यात येणारे दोन रणगाडे कोणत्या चौकात मांडावेत, याचा निर्णय महापालिका लवकरच घेणार आहे. रणगाड्यांचा आकार विचारात घेऊन त्यासाठी मोठे चौक निवडले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्रचोरांना मोक्का

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इम्रान मेहंदी गँगचा सदस्य असलेला इम्रान उर्फ सुलतान या टोळीचा सूत्रधार आहे. या टोळीने चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून पावणेदोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

२५ जून रोजी ज्योतीनगर भागातून पांढऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी एका म‌हिलेचे मंगळसूत्र पळविले होते. या दुचाकीचा शोध घेऊन गुन्हेशाखेने मंगळसूत्र चोरणाऱ्या चार कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीमध्ये शेख इम्रान उर्फ सुलतान (वय ३५ रा. वाशी, नवी मुंबई, सध्या रा. कटकटगेट), शेख शहेजाद शेख शमीम (वय ३१ रा. सादातनगर), शेख जावेद शेख मकसूद उर्फ टिपू (वय २१ रा. गारखेडा) व शेख इरफान शेख लाल (वय २० रा. बडी मशीदजवळ, गारखेडा) यांचा समावेश आहे. या आरोपींना ओळखपरेडमध्ये ज्या महिलंचे मंगळसूत्र चोरीला गेले त्यांनी ओळखले आहे. जवाहरनगर हद्दीत दोन व छावणी हद्दीत एका गुन्ह्याची कबुली या आरोपींनी‌ दिली असून १ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासामध्ये कुख्यात गँगस्टर इम्रान मेहंदी गँगचा सदस्य असलेला इमरान उर्फ सुलतान या टोळीचा सूत्रधार आहे. गेल्या दहा वर्षांपासून या टोळीवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बाबीची दखल घेत या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, एसीपी बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, द्वारकादास भांगे, अमर चौधरी, विरेश बने, दत्तात्रय गढेकर, हरीश्चंद्र मुंडे, शिवाजी कचरे, परवेज पठाण, ए.एस. खिल्लारे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टकार्डचा काळ सरला!

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद



ई मेल, व्हॉटस् अॅप, फेसबुकच्या जमान्यात पोस्टकार्डचे संदेशवहनातील महत्त्व संपल्यात जमा आहे. वर्षभरापासून त्यांचा वापर फक्त रजिस्टर ए-डी (अॅकनॉलेजमेंट) पुरताच होत आहे. १४ लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबादमध्ये पोस्टाच्या मुख्य कार्यालयासह १० उपविभागीय कार्यालय आहेत. या सर्व ठिकाणी जून २०१५ मध्ये फक्त ५ हजार रुपयांची (११ हजार ३६० पोस्टकार्ड) कार्ड विकली गेली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी ८ हजार रुपयांची पोस्टकार्ड शहरात विकली होती. रजिस्टर एडीचे फॉर्मही बहुतांश पोस्ट कार्यालयात उपलब्ध न झाल्याने, त्या ऐवजी चक्क पोस्टकार्डचा वापर होत आहे.

अंतरदेशी पत्र, पाकीटांनाही शासकीय कामखेरीज कोणी पुसत नाही. गेल्या महिन्यांत फक्त ७ हजारांचे पोस्ट कार्ड विकले आहे. ही विक्रीदेखील गेल्या सहा महिन्यांत तिपटीने घटली आहे. सध्या एका ५० पैशाचे पोस्टकार्ड छापण्यासाठी ७ रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे हा तोटा कोट्यवधींच्या घरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ रस्ता होणार चकाचक

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

राष्ट्रीय महामार्ग २११वरील महत्त्वाचा टप्पा असलेला औरंगाबाद ते वेरूळ रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. आता ही अडचण दूर झाली असून, केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे काम महिनाभरात सुरू होणार असून, दीड वर्षात पूर्ण होईल.

राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती अनेक वर्षांपासून रखडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) स्थापनेनंतर देशातील काही महामार्ग सहापदरी, आठपदरी करण्याचा निर्णय झाला. त्यात या महामार्गाचा समावेश करण्यात आला. त्याअंतर्गत धुळे-सोलापूर हा रस्ता सहापदरी केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. सर्व काही नियोजनाप्रमाणे झाल्यास हा रस्ता तीन वर्षांत तयार होऊ शकतो, असा प्रशासनाचा कयास होता, मात्र अनेक ठिकाणी अडचणी आल्याने हे काम लांबणार आहे. या कामामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचा मुद्दा मागे पडला होता. विशेषतः औरंगाबाद ते वेरूळ या रस्त्याची दुर्दशा झाली होती. रस्ता दुरुस्तीची मागणी कित्येक वर्षांपासून होती, मात्र केंद्राकडून निधी मिळत नव्हता. २१ मे रोजी केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २९ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी ४९ कोटी रुपये मंजूर केल्याचे कळविण्यात आले. हा रस्ता कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून होणार नाही. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आली आहे. इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) पद्धतीने हे काम होणार आहे. एजन्सीकडून करण्यात येणाऱ्या कामाच्या देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून अभियंत्याची नियुक्ती केली जाईल. संबंधित अभियंते, एजन्सी, राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग अशा तिहेरी चाळणीतून रस्त्याचे परीक्षण केले जाणार आहे. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुण्याच्या मनिषा कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले. १८ महिन्यांच्या मुदतीत काम पूर्ण करावे लागणार आहे. संबंधित एजन्सीकडून महिनाभरात काम सुरू होण्याची शक्यता आहे.

छावणी चौक ते वेरूळ या रस्त्याच्या कामासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. ही प्रक्रिया केंद्रीय पातळीवर राबविली जाते. स्थानिक यंत्रणेकडे देखरेखीचे काम आहे. लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.

- व्ही. जी. बोडखे, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहो आश्चर्यम्, चक्क रेल्वे हरवली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-८ मधील महापालिकेच्या बॉटनिकल गार्डनमधून तीन बोगींची रेल्वे हरवली आहे. वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करून या रेल्वेचे उदघाटन करण्याचा 'शो' झाला. मात्र, गार्डनमध्ये रेल्वे रुळांचे काम सुरू असल्याने ही गायब झालेली रेल्वे पुन्हा धावू लागेल अशी अपेक्षा आहे. या योजनेवर जवळपास ५५ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.

गणेशनगर वॉर्डाचे तत्कालीन नगरसेविका प्राजक्ता भाले यांनी बॉटनिकल गार्डनमध्ये लहान मुलांसाठी रेल्वे प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून काही निधी मिळाला. मात्र, त्या निधीतून रेल्वेचा सांगाडाच पालिकेला मिळाला. रेल्वे इंजिन, रुळ आणि अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी महापालिकेवरच आली. पायाभूत सुविधांमध्ये प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकी, उ्डडाणपूल, सेक्युरिटी फेंसिंग, सुरक्षा रक्षकांसाठी केबिन यांचा समावेश आहे. सुरक्षारक्षकांठी केबिन तयार असली तरी या केबिनला सुरक्षारक्षकाची प्रतीक्षा आहे. सध्या वॉचमनविना हे उद्यान आहे. त्यामुळे या उद्यानांचा वापर अन्य गैरकामांसाठी होत असल्याचे चित्र नागरिकांना बघावयास मिळत आहे. या गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करताना दिसतात. सध्या बॉटनिकल गार्डनमध्ये रेल्वे रुळ टाकण्याचे काम सुरू आहे.

रेल्वेचे लोकार्पण सोहळा झाल्यानंतर काही महिने रेल्वेच्या तीन बोग्या गार्डन परिसरातच ठेवण्यात आल्या होत्या. फायबरचा वापर करुन बोग्या बनवण्यात आलेल्या होत्या. कडक उन्हामुळे बोग्या खराब होऊ लागल्या. त्यानंतर या बोग्या गार्डनमधून अन्यत्र हलवण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे हरवल्याची चर्चा होऊ लागली आहे. जवळपास ५५ लाख रुपयांचा हा प्रकल्प सुरू होण्यास अद्याप काही महिन्यांचा अवधी निश्चितच लागणार आहे. सिद्धार्थ उद्यानाप्रमाणे सिडकोतही उद्यानात रेल्वे सुरू झाली, तर ही बालगोपाळांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमधील आधार केंद्रावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

आधारकार्डची नोंदणी व प्रिंट काढून देण्याच्या नावाखाली लाभार्थींकडून पैसे उकळण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. या प्रकारास पायबंद घालण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे आधार कार्डच्या नावाखाली लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उस्मानाबाद येथील महा-ई-सेवा केंद्रावर व एका कम्प्युटर सेंटरवर कारवाई करीत जिल्हा प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणला. ह‌े प्रकरण आपसात मिटविण्याच्या दृष्टीने देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. कारवाई करू नये यासाठी जिल्हा पुढाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव वाढला आहे.

उस्मानाबाद शहरातील प्रामुख्याने चर्चेत असलेल्या अवैधरित्या आधारकार्ड नोंदणीचा उद्योग करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने अचानक छापे मारले. त्याशिवाय त्यांचे लाखो रुपयांचे साहित्यही जप्त केले. आधारकार्ड देण्याचा अवैध उद्योग शासनमान्य महा-ई-सेवा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने अचानक छापे मारुन त्यांच्याकडील लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले.

आधारकार्ड देण्याचा अवैध उद्योग शासन मान्य महा-ई-सेवा केंद्राबरोबरच अन्य काही खासगी कम्युनिकेशन सेंटरमधून राजरोसपणे चालू असून येथे लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्यात येत होते. यामुळे बुधवारी उस्मानाबाद शहरातून अवैध उद्योग करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मोहीम तहसीलदार, उस्मानाबाद यांनी हाती घेतली. या कारवाईत प्रदीप खंदारे यांचे महा-ई-सेवा केंद्र आणि नेताजी कोळगे यांच्या साई कम्प्युटर केंद्रावर कारवाई करण्यात आली. मंडल अधिकारी चवरे व तलाठी खोत यांनी केलेल्या या कारवाईत त्यांना आधार कार्ड नोंदणीचा उद्योग आढळून आला. यासाठी ते रोख रक्कम घेत असल्याचेही लाभार्थ्यांनी सांगितले. आधारच्या नाव नोंदणीसाठी ८० ते १०० रुपये व त्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रिंटसाठी ६० ते १०० रुपयापर्यंत ही मंडळी पैसे घेत असल्याचे या वेळी तेथे उपस्थित लाभार्थ्यांनी सांगितले. पैसे देवूनही तेथे सौजन्यपूर्ण वागणूक मिळत नाही अशी लाभार्थींची तक्रार होती. त्यामुळे मंडल अधिकारी चवरे व तलाठी खोत यांनी या दोन्ही ठिकाणचे पंचनामे करून तेथील आधारकार्डच्या अनुषंगाने असणारी कॅमेरा, लॅपटॉप, प्रिंटर आदी साहित्य जप्त केले.

या कारवाईतील प्रदीप खंदारेसह अन्य सहा जणांना तहसीलदार उस्मानाबाद यांनी १० मार्च २०१५ रोजी पत्र पाठवून आधार कार्ड नोंदणीबाबतच्या कारभाराबाबत सतर्क केले होते. मात्र, ही मंडळी आधार कार्डचे काम म्हणजे पैसे उकळण्याची मशीन आहे अशा तोऱ्यात होती. यातूनच जनतेची ओरड सुरू झाली. त्यानंतर प्रशासनाला जनतेच्या तक्रारीची दखल घेत कारवाई करणे भाग पडले. गैरमार्गाने अवैध धंद्याच्या माध्यमातून पैसे उकळणाऱ्या ठकसेना विरोधात कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा, ही कारवाई म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासाठीचा फार्स ठरले.

जिल्ह्यातील आधारकार्डचे ८३ टक्के काम पूर्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात आधार कार्डसाठीच्या नोंदणी केवळ शासकीय यंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिलेल्या मशीनवरून करण्याची ताकीद यापूर्वीही देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात ४१ मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधार नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. अद्याप शाळेतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आधार कार्डची नोंदणी राहिली आहे. यासाठी आणखीन ५० मशीन्स मागविल्या आहेत. आता ही नोंदणी मोहीम शाळानिहाय हाती घेतलेली आहे. यासाठीचे योग्य नियोजनही केलेले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.

जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रातून तसेच काही खासगी कम्युनिकेशन सेंटरमधून अवैधरित्या आधारकार्ड नोंदणीचा धंदा राजरोसपणे चालू असल्याची माहीती मिळाली होती. त्यामुळे कारवाई करण्यात आली. आधारकार्ड नोंदणीसाठी कोणी पैसे घेत असल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी. त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल.

- श्रीरंग तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

कामाचा अतिरिक्त ताण सहन न झाल्याने जालना पालिकेचे स्वच्छता कर्मचारी वसंत पंडीत साठे (वय ५०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी पालिकेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी बुधवारी बंद पाळला.

जुना जालना भागातील बाजार चौकी परिसरात सोमवार पहाटे सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वसंत साठे यांनी काम केले. त्यानंतर रात्री उशीरा अकरा वाजता पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी साठे यांना पुन्हा एकदा कामावर नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते बाजार चौकी परिसरात गटार उपसण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान मंगळवारी पहाटे साठे यांचा मृतदेह पालिकेच्या किल्ल्याभागातील साठे यांच्या निवासस्थानासमोर आढळून आला. साठे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला आहे. त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. साठे यांच्या मृत्यूस जवाबदार असणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पालिकेच्या कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालिकेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी या संदर्भात संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. न्यायालयीन कामकाजानिमित्त बाहेर आलो आहोत असे त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणांच्या कळपामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील शेतकरी हरणाच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. पावसाच्या लहरीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी बेभरवशी पावसावर पेरण्या आटोपल्या. सध्या शेतात कोवळी पिके उभी आहेत, ती फस्त करण्याचा हरणांच्या कळप फिरत आहेत. हरणांनी पिके फस्त करण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हरणांना कडधान्य पीक आवडते, त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन, चवळी, कापूस आदी पिकांचे शेंडे हरण फस्त करीत आहेत. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. हरणांचे कळप पकडून त्यांना इतरत्र नेऊन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. खुलताबाद तालुक्यात ढगाळ वातावरण असून जास्तीच्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच हरणांच्या कळपाचा उपद्रव वाढल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस- ट्रकची धडक; एक ठार, आठ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर-पुणे एसटी बसला नागपूर मुंबई महामार्गावरील गंगापूर चौफुलीवर बुधवारी (१५ जुलै) सकाळी साडेसहा वाजता अपघात झाला. बस व ट्रकच्या धडकेत बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाला, तर बसचालकासह आठ जण गंभीर जखमी झाले. मयत मजहर ताहेर अली शहा (वय २२, रा. वैजापूर), असे मयत प्रवाशाचे नाव आहे.

वैजापूर-पुणे बस (एम.एच.२०, बी एल ३००३) गंगापूर चौफुलीवर पोहचताच वैजापूरकडे येणाऱ्या ट्रकने (एम.एच.१२, एच डी ३३५) धडक दिली. मजहर ताहेर हे चालकाच्या सीटजवळ बसला होता. धडक बसताच तो काचेतून बाहेर फेकला जाऊन मरण पावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसचालक विजय राऊत (वय ३२), प्रवीण मराठे (वय ३६), कांताबाई वाघ (वय ४५), रुपाली शेलार (वय ३०), कमलेश अधिकार (वय २९), गायत्री अधिकार (वय २०), पवन चांडक (वय १८) व अन्नपूर्णा साठे (वय ६०) हे प्रवासी जखमी झाले आहेत. बसचालक राऊत, कमलेश अधिकार व कांताबाई वाघ यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. फौजदार राहुल मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार जाधव यांच्या फिर्यादीवरून बस व ट्रकचालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images