Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छेड काढणाऱ्या चौघांना अटक

$
0
0

कन्नड : कन्नड बसस्थानक परिसरात शालेय विद्यार्थिनी व महाविद्यालयीन युवतींची छेडछाड करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी पकडले. घुसूर तांडा येथील कृष्णा रमेश राठोड (वय२२), बहिरगाव येथील प्रीतम किशोर सोनवणे (वय १८) व चिकलठाण येथील दोन अल्पवयीन मुले मुलींची छेड काढत होते. मंदाकिनी धुळे, समाधान दुबिले, बबन भालेराव हे पोलिस मुलींचे छेड काढणाऱ्यांवर लक्ष ठेऊन होते. त्यांनी या मुलींची छेड काढताना चौघाना पकडले. त्यांना पुढील कारवाईसाठी या सर्वांना कन्नड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, कन्नड व देवगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात छेडछाड विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती माळी, दीपक बर्डे, मंदाकिनी माळी, समाधान दुबिले, बबन भालेराव यांचा समावेश आहे. ग्रामीण पोलिसांकडून महिलांसाठी ९७६३७७६६४४ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. संकटकाळी या सेवेचा उपयोग करण्यासाठी वाचनालये, महिलांचे बचत गट, माहिला संघटना, चळवळीतील कार्यकर्त्या यांच्यासाठी 'जागृती' या पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे. या पुस्तिकेत महिला हक्क अधिकार स्वंयसिद्धता कायदेविषयक माहिती आहे. या माध्यमातून मदत घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियंत्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांच्या हजेरीपत्रकांचे मूल्यांकन व कामांचा सेल्फ तयार न करणारे जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे प्रभारी उपअभियंता पी. वाय. दळवी व शाखा अभियंता डी. टी. कांबळे या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. बोगस कामे दाखवून गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

तालुक्यातील चोरवाघलगाव येथे पाझर तलावातून गाळ काढणे, खंडाळा, सावखेडगंगा, चिंचडगाव, वीरगाव, बाभूळगाव बुद्रुक या गावात वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींचे कामे करण्यात आली. या कामावर एकूण ४४ हजेरीपत्रक वापरण्यात आली होती. ती सर्व हजेरीपत्रके उपविभागात पाठविण्यात आलेली असतांना त्यांचे मूल्यांकन अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. शासनाने मजुरांना हजेरी देण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश बजावलेले आहे. त्यामुळे कालमर्यादेप्रमाणे या हजेरीपत्रकांच्या मूल्यांकनाबाबत अनेकवेळा कळवले, शाखा अभियंत्यांना पत्राव्दारे तसेच मासिक बैठकीत समक्ष सूचना देवूनही दुर्लक्ष करण्यात आले. या कामासाठी वेळ लागेल, सध्या मग्रारोहयोच्या कामावर अभियंत्यांचा बहिष्कार असल्याचे कारण दाखवून टाळाटाळ करण्यात आली. केली. त्यामुळे या अभियंत्यांना २६ ऑक्टोबर व ३० नोव्हेंबर २०१५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. पण त्यांनी खुलासाही दिला नाही.

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनेची अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या असून दुष्काळी परिस्थितीत कामांची मागणी लक्षात घेऊन या अधिकाऱ्यांनी कामांचा सेल्फ तयार केलेला नाही. कामांचा सेल्फ तयार करणे, त्याला तांत्रिक मान्यता देणे, व हजेरीपत्रकांचे मूल्यांकन करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. या दोघा अधिकाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणाबाबत पंचायत समिती प्रशासनाने १८ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. तो अहवाल पाठवूनही संबंधित अभियंत्यांनी प्रलंबित कामांच्या हजेरीपत्रकांचे मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुसलेल्या तरुणाची विहिरीत आत्महत्या

$
0
0

कन्नडः घरातून रुसून गेलेल्या तरुणाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवराई येथे घडली आहे. या तरुणाचे नाव अमोल लक्ष्मण नागरे (वय १९), असे आहे. तो १० ते १२ दिवसांपासून घरातून रुसून गेला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण तपास लागला नाही. दरम्यान शनिवारी (१२ डिसेंबर) शिवराई शिवारातील घुगे यांच्या विहिरीजवळ तेथील काम करणाऱ्या मजुरांना काहीतरी सडल्यासारखा वास आल्याने त्यांनी विहिरीत डोकावले. तेव्हा कुजलेल्या स्थितीत मानवी देह आढळून आला. सदर मृतदेह अमोलचाच असल्याने लक्षात आले. याप्रकरणी कन्नड पोलिसात बेपता असल्याची नोंद घेण्यात आली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने रविवारी सकाळी घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पो, जीपची धडक; चार जखमी

$
0
0

वैजापूर : नागपूर-मुंबई महामार्गावर वैजापूरपासून १५ किमी अंतरावर टेम्पो व बोलेरो जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील शिवराई शिवारात रविवारी (१३ डिसेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास झाला. जखमींमध्ये छोट्या मुलासह महिलेचा समावेश असून, मुलाची स्थिती गंभीर असल्याचे समजले आहे. सर्व जखमींना ताबडतोब उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. अपघातातील जखमींची नावे अशीः गौशिबा बेगम परवीन सिद्दिकी (४५), रोमाना सिद्दिकी (२८), बिलाल सिद्दिकी (३) सर्व (रा. औरंगाबाद). जीपचालकाचे नाव समजले नाही. बोलेरो जीपमधून (एम. एच.२०, सी एस ६७१८) एका कुटुंबातील चौघे जण शिर्डीकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोने (एम. एच.२०, बीटी ४४०३) जोराची धडक दिली. हवालदार नंदकुमार नरोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी तोडणार आज पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

उद्योग व औरंगाबाद शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. परंतु, धरणाच्या पाठीमागील भागातील पाणी चोरीकडे दुर्लक्ष करत केवळ शेतकऱ्यांना धरणातून पाणी उपसा करण्यास बंदी करण्यात आली आहे. याविरुद्ध तालुक्यातील शेतकरी सोमवारी ब्रह्मगव्हाण येथील पंप हाउसचा पाणीपुरवठा बंद करून आंदोलन करणार आहेत. पाणी उपसा करण्याची परवानगी मिळेपर्यंत शेतकरी स्वतःला पंप हाउसमध्ये कोंडून घेणार असल्याची माहिती अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.

जायकवाडीचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्याचे सांगून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातून पाइप लाइन केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. उद्योगाच्या पाणीपुरवठ्यात कपात केलेली नाही, औरंगाबादला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जागोजागी फुटली असल्याने त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी हजारो विद्युत मोटारीच्या साह्याने पाणी चोरी करत आहेत. त्यांच्यावर कोणतेही बंधन न आणता केवळ मराठवाडा व प्रामुख्याने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यास बंदी घालणे अन्याकारक असल्याचे अन्नदाता शेतकरी संघटनेने म्हटेल आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सतत सामना करावा लागत आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवून पिकांना दिले जात नाही. त्याचा फटका शेतीला बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतुकीची वाहने मोकाट

$
0
0

वाळू वाहतुकीची वाहने मोकाट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात वाळूपट्ट्यांचा लिलाव झालेला नसतांनाही शहर परिसरामध्ये वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू असून वाळूची शहरात सर्रासपणे विक्रीही सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर कायमचा चाप लावण्या ऐवजी महसूल प्रशासन केवळ दंड वसूलीत व्यस्त असून पोलिस प्रशासनही सुस्त आहे.
अवैध गौण खणिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली महसूल, पोलिस व आरटीओ अधिकारी समितीही कागदावर असून प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे वाळूची सर्रास वाहतूक व विक्री करण्यात येत आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात वाळूपट्ट्यांना मंजूरी मिळण्यासाठी अनेक अडचणी आहेत, ७ डिसेंबरपासून वाळूपट्ट्यांच्या लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात वाळुठेक्यांसाठी लिलाव झाला नाही. तरीही चोरट्यामार्गाने शहरात सर्रास वाळूची वाहतूक व साठेबाजी करण्यात येत आहे. शहरात ट्रक, ट्रॅक्टर, हायवे ट्रकच्या माध्यमातून पैठण रोड, बीड बायपास, गंगापूर, नगर या मार्गांवरून शहरात वाळू आणली जाते. ठिकठिकाणी ट्राफिक पोलिसांची तैनाती असतांना वाळू वाहतुकदार सहज शहरात वाळू घेऊन येतात व महापालिका हद्दीत बेकायदा वाळूचे साठे करण्यात येते.
वाळूबंदीच्या नावाखाली मनमानी करत जादा दराने वाळूची विक्री करून नागरिकांची पिळवणूक करण्यात येते. शनिवारी (१२ डिसेंबर) वाळूज येथे झालेल्या अपघातात वाळूच्या डंपरने दोघांना चिरडले. शहरातही दररोज लहान मोठे अपघात होतात. वाळूच्या या बेलगाम वाहतुकीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.


समिती कागदावरच
जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ डिसेंबर रोजी महसूल व ववन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, आरटीओ अधिकारी तसेच जिल्हा खणिकर्म अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक जिल्हास्तरीय समिती नेमण्याचे आदेश काढले आहेत. समितीने महिन्यातून किमान एकदा बैठक घ्यावी, किंवा आवश्यकतेनुसार बैठका घ्याव्यात. व संबंधित यंत्रणांना उपाययोजनांबाबत आदेश द्यावेत, केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिलेले आहेत. या बैठकीत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत आलेल्या तक्रारींसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र अद्याप तरी ही समिती कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा राजीनामे द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना - भाजपला सत्तेपासून दूर ठेवून आपण एकत्र आलो. एकमेकांचे उणे-दुणे काढण्याऐवजी एकत्र येऊन विकासकामे करा. जमत नसेल तर राजीनामे द्या, असे खडे बोल आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांना सुनावले.

जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या कार्यपद्धतीवर स्वकीय मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. दिलेल्या फायली मंजूर होत नाहीत, नवीन योजनांची घोषणा नाही, कामांची तरतूद नाही अशा तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. महाजन यांच्याविरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे पाहून शिवसेनेच्या काही सदस्यांनी फिल्डिंग लावली आहे. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची दर सहा महिन्यांनी बैठक घेतली जाईल, असे सुरवातीला जाहीर करण्यात आले होते, पण गेल्या साडेतीन वर्षांत साडेतीन बैठकाही झालेल्या नाहीत. आता सत्ताधाऱ्यांमधील विसंवाद वाढल्याने शनिवारी समन्वय बैठक घेण्यात आली.

काँग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केवळ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही जिल्हा परिषद सदस्यही बैठकीसाठी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा परिषदेच्या कामकाजावर चर्चा झाली. मनसेच्या काही सदस्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 'आपलीच कामे होत नसली तर इतर सदस्यांचे काय? निवडणुका सव्वा वर्षांवर आल्या आहेत. आता जर कामे अडली तर आपलीच अडचण होईल. केंद्र आणि राज्यात आपली सत्ता नाही. जिल्हा परिषदेची सत्ता पुढे किमान टिकवायची असेल तर कामे करावी लागतील,' असे मत बहुतांश सदस्यांनी व्यक्त केले. एकमेकांच्या विषय समित्यांचीही कामे अडली जात असल्याचा आरोप तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी केला. त्यावर आमदार सत्तार यांनी भूमिका मांडताना सर्व सदस्यांना चांगलेच सुनावले.

'सत्ता मिळाली म्हणून हवेत राहणे चांगले नाही. लोकांपर्यंत पोचून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आपण जर त्यांच्या गरजेनुसार कामे केली नाहीत तर, त्याचा उपयोग नाही. नुसती पदे घेऊन उपयोग नाही. लोकाभिमुख राहिले पाहिजे. एकत्र राहून काम करा नाही तर राजीनामे द्या,' अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांची हजेरी घेतली. समन्वय बैठकीत सर्वांचे समाधान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील कामकाज सुरळीत होईल, अशी चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या समन्वयात थोडी अडचण होती. आम्ही समन्वय बैठक घेऊन ती दूर केली. आता कारभार सुरळीत चालेल. जिल्हा परिषदेला अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्शील राहू.

- अब्दुल सत्तार, आमदार, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतही घडू शकते ‘कांदिवली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या आठवड्यामध्ये मुंबईतील कांदिवलीच्या 'स्लम एरिया'मध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन अनेक झोपड्यांना आग लागली आणि 'फायर ब्रिगेड'ची गाडी पोहोचू न शकल्याने ती झपाट्याने पसरली. या प्रकारामध्ये एका बालकासह दोनजणांना आपला प्राण गमवावा लागला. दोन हजारांवर झोपड्या बेचिराख झाल्या. हाच दुर्दैवी प्रकार औरंगाबादेत कधीही घडू शकतो, अशीच परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश 'स्लम एरिया'मध्ये असंख्य छोट्या गल्ल्या असून, तेथे 'फायर ब्रिगेड'ची गाडीच काय, दुचाकीदेखील जाणे कठीण असल्याचे 'मटा'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

कांदिवलीची दुर्घटना मागच्या आठवड्यात घडली. अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या घटना जवळजवळ प्रत्येक शहरात आणि प्रत्येक 'स्लम'मध्ये कधी ना कधी यापूर्वी घडल्या आहेत. अगदी अशात फार मोठी घटना घडली नसली तरी, कुठल्याही प्रकारच्या सुधारणांसाठी त्याची वाट कशासाठी पाहायची, हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. अशी एखादी मोठी घटना घडल्यानंतर विविध उपाययोजना करण्यापेक्षा, अशी घटना कधीही घडल्यास तत्परतेने अग्निशमन यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचून आग विझवली जाणे जास्त महत्त्वाचे आहे, मात्र मुळात अग्निशमन यंत्रणा अशा छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये पोहोचणार तरी कशी, हा खरा प्रश्न आहे. 'मटा'ने केलेल्या पाहणीनुसार, सादातनगर, हमालवाडा, बायजीपुरा, नॅशनल कॉलनी, बायजीपुरा, इंदिरानगर, कटकटगेट, अझीम कॉलनी, हिलाल कॉलनी, बेगमपुराचा काही भाग, सिल्कमिल कॉलनीचा काही भाग, अशा अनेक भागांमध्ये असंख्य छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत, जिथे फायर ब्रिगेडची गाडी जाणे केवळ अशक्य आहे. बहुतांश 'स्लम एरिया'त अनेक छोट्या-छोट्या घरांमध्ये जाण्यासाठी अरूंद गल्ल्या पार करून जावे लागते. तेथे केवळ दुचाकी कशी-बशी जाऊ शकते. त्यामुळे असा दुर्दैवी प्रसंग घडलाच तर, अग्निशमन यंत्रणा तेथे कशी पोहोचणार, हा प्रश्न आहे. कुठल्याही अग्निशमन बंबाच्या पाइपच्या लांबीला मर्यादा आहेत. त्यामुळे केवळ पाइपच्या भरोशावर कुठपर्यंत ही यंत्रणा पोहोचू शकते, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. हमालवाड्यामध्ये काही गल्ल्या अशा आहेत, की एकावेळी एकच व्यक्ती तेथून जाऊ शकते. दुसरी व्यक्ती समोर आली तर जाणाऱ्या व्यक्तीला थांबण्याशिवाय पर्याय नसतो, असेही 'मटा'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. तिच स्थिती कमी-अधिक फरकाने सादातनगर, सिल्कमिलचा काही भाग, बायजीपुरा, अझीम कॉलनी आदी भागांमध्ये आहे.

बंब येणे अशक्यच

या संदर्भात तेथील नागरिकांशी संवाद साधला असता, छोट्या गल्ल्यांमध्ये अग्निशमन बंब जाऊ शकत नाही; परंतु छोटा हत्ती बहुतांश छोट्या गल्ल्यांमध्ये नक्कीच जाऊ शकतो. विजेच्या कामासाठी किंवा पाण्याचा टँकर घेऊन छोटा हत्ती अशा गल्ल्यांमध्ये जातो आणि बऱ्यापैकी अडचण सोडवता येऊ शकते. त्यामुळे निदान छोटा हत्तीच्या आकाराचा बंब असल्यास काहीतरी तोडगा नक्कीच निघू शकेल, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सातारा पुन्हा दुर्लक्षितच

पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी झनझन यांच्यानुसार पाच नवीन केंद्र होणार आहे, मात्र या नवीन केंद्रांमध्ये पुन्हा एकदा सातारा भाग दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. आगीची किंवा घरात पाणी शिरल्याची किंवा पाण्यात बुडाल्याची घटना साताऱ्यात घडते, तेव्हा एकतर बन्सीलालनगरहून किंवा सिडकोहून बंब येतो, मात्र या भागाचा विस्तार पाहता या भागामध्ये स्वतंत्र केंद्र गरजेचे आहे, जेणेकरून त्याचा सातारावासीयांना तातडीने लाभ मिळू शकेल. त्यामुळे या भागाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

काय म्हणतात नागरिक?

अतिक्रमणे तोडल्याशिवाय बंब जाऊ शकणार नाही आणि ही तातडीची सेवा मिळण्याच्या दृष्टिने या प्रकारचा रस्ता असणे आवश्यक आहे, मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची खंत आहे. पालिकेने याचा तातडीने विचारा करावा.

- जावेद खान, हमालवाडा

आमच्या गल्लीमध्ये कुठलीच मोठी गाडी येऊ शकत नाही. मग ती बोरिंगची गाडी असो की अग्निशमन बंब. त्यासाठी अतिक्रमणे तोडावी लागतील. त्यानंतरच रुग्णवाहिका, अग्निशमन बंब यासारख्या तातडीच्या सेवा गल्ली-गल्लीपर्यंत पोहोचतील, अशी सोय करावी. त्याची सुरुवात माझ्या घरापासून केली तरी माझी काही हरकत नाही.

- बाबासाहेब भालेराव, हमालवाडा

छोटा हत्ती आमच्या गल्लीमध्ये येऊ शकतो, मात्र अग्निशमन बंब येऊ शकत नाही. त्यासाठी महापालिकेने छोटा हत्तीच्या आकाराचा बंब वापरात आणणे खूप आवश्यक आहे. त्याशिवाय छोट्या गल्ल्यांमधील आग विझवणे शक्य नाही.

- शेख दिलावर, हमालवाडा

आजपर्यंत आमच्या गल्लीमध्ये अग्निशमन बंब बोलावण्याची वेळ कधीच आली नाही, मात्र दुर्दैवाने आलीच तर काय, ती गंभीर बाब ठरू शकते. याचे कारण म्हणचे आमच्या गल्लीमधून बंब जाऊ शकत नाही; तसेच पाइप कुठपर्यंत लांब जाईल, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे स्थिती गंभीर आहे. एखादी मोठी दुर्घटना घडली तर रुंद रस्त्याची निकड प्रकर्षाने जाणवेल.

- दिलीप मोकळे, सादातनगर

शहरामध्ये तीन अग्निशमन केंद्र असून, अजून पाच नवीन केंद्र होणार आहेत. शहागंज, हर्सूल, मिटमिटा, पडेगाव व टीव्ही सेंटर येथे नवीन पाच अग्निशमन केंद्र होणार आहेत. त्याचवेळी पाच छोटी वाहनेदेखील यंत्रणेमध्ये येणार आहेत. ही छोटी वाहने कुठल्याही गल्लीतून जाऊ शकतील, अशीच असतील. एखाद्या वर्षांत पाच नवीन केंद्र व पाच नवीन वाहने कार्यरत होतील, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर कर्मचारी वाढीचा प्रस्तावही मागेच देण्यात आलेला आहे. मागच्या दहा वर्षांपासून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

- शिवाजी झनझन, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराची खिडकी बसविताना हायटेंशन तारेचा धक्का लागल्याने मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी भवानीनगर, जुना मोंढा भागात घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख तौफिक शेख शौकत (वय २२ रा. गरमपाणी) हा तरुण घराच्या खिडक्या बसविण्याचे व दुरुस्तीचे काम करत होता. भवानीनगर येथील हुसैन शहा यांच्या घराच्या खिडकी बसविण्याचे काम तौफिकने घेतले होते. शनिवारी त्याने खालच्या मजल्यावरील खिडकी बसविल्यानंतर वरच्या मजल्यावरील खिडक्या बसविण्याचे काम करीत होता.

यावेळी बाहेरच्या बाजूला असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला तौफिकचा झाला. यावेळी जोरदार झटका बसल्याने तौफिक खाली कोसळला. त्याला नागरिकांनी त्वरित घाटी हॉस्पिटलमध्ये हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाच्या वादातून शाळेला कुलूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळेला विक्री केलेल्या जागेचे पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे शाळेला कुलूप ठोकून प्रशासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी छावणी परिसरात घडला. याप्रकरणी दहा आरोपींविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खान साजीद पाशा (वय ४० रा. खडकेश्वर) हे आझाद शहा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आहेत. खान यांनी महमद चांद कुरेशी यांच्याकडून शाळेसाठी काही खोल्या विकत घेतल्या होत्या. ६ लाख ७५ हजारांमध्ये हा व्यवहार ठरला होता. यापैकी पाच लाखांची रक्कम खान यांनी कुरेशी यांना दिली होती. उर्वरित पावणेदोन लाखांची रक्कम तीन महिन्यानंतर दिल्यावर रजिस्ट्री करून देण्याचे ठरले होते. दरम्यान, या खोल्यांवर पूर्वीचे ४५ हजारांचे बिल बाकी होते. ही बाब खान यांनी कुरेशी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावेळी ही रक्कम खान यांनीच भरण्याचे कुरेशी यांनी सांगितले होते. त्यावरून वाद झाला. या वादातून त्यांची रजिस्ट्रीची मुदत उलटून गेली. शनिवारी दुपारी खान यांच्या शाळेवर महमद चांद कुरेशी, अन्वर, मुन्वर, नियाज (सर्व रा. सिल्लेखाना) व हरीष उप्पलवाड व इतर पाच तरुण आले. त्यांनी गोंधळ घालत शाळेच्या खोल्यांवर कुलूप लावले. तसेच खान यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी खान यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४५ हजारांची बॅग लंपास

औषध खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये गेलेल्या व्यक्तीची ४५ हजारांची बॅग अवघ्या काही क्षणांत चोरट्यांनी लंपास केली. काल्डा कॉर्नर परिसरात शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता हा प्रकार घडला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानपुरा येथील अजित जिवनाथ झा (मूळ रा. भोईसर ता. जि. पालघर) हे एका कंपनीत नोकरीला आहे. शुक्रवारी सायंकाळी ते दुचाकीवर काल्डा कॉर्नर भागातून जात होते. औषध घेण्यासाठी त्यांनी एका मेडिकलपुढे दुचाकी उभी केली. त्यांच्याजवळ असलेली बॅग त्यांनी दुचाकीलाच अडकवत ते दुकानात गेले. काही मिनीटांत ते परत आले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली बॅग लंपास केली. या बॅगमध्ये लॅपटॉप, दहा हजार रुपये किमतीचे डोंगल, जीपीएस, मॅग्नेटिक कंपास आदी ४५ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय पोमनाळकर तपास करीत आहेत.

तरुणाला मारहाण

फोनवर मला का बोलता, असे म्हणत अजहर शेख अफजल शेख (वय १९ रा. अंबिकानगर) याला नदीम नबी शेख (रा. मुकुंदवाडी) याने मारहाण केली. बुधवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुकाने फोडून ऐवज लंपास

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध तीन घटनांत दुकान फोडून चोरट्यांनी ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. गुलमंडी, पानदरिबा व एन १२ भागात हे प्रकार घडले. या प्रकरणी सिटीचौक व सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रशीदपुरा येथील मुजावर उस्मान अब्दुल शकुर या तरुणाचे गुलमंडीवर हमसफर नावाने बॅग विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री मुजावर दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी सकाळी सकाळी सात वाजता दुकान उघडण्यासाठी नेहमीप्रमाणे मुजावर आले होते. त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. चोरट्यांनी शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. आतमधील लेडीज पर्स, ट्रॉली बॅग, एअर बॅग असा २२ हजार ७९५ रुपयांचा माल चोरून नेला. चोरीची दुसरी घटना पानदरिबा येथे २६ नोव्हेंबर रोजी घडली होती. नितीन सिताराम पातूरकर यांचे घराखाली दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे लोखंडी गेट बनावट चावीने उघडून आतमधील रोख तीन हजार व महत्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली. या प्रकरणी नितीन पातूरकर यांनी विजया पातूरकर यांच्यावर तक्रारित संशय व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची तिसरी घटना बुधवारी रात्री हडको एन १२ येथील स्वामी विवेकानंदनगरात घडली. रणसिंग हरदयाल कुशवाहा या भेळपुरी विक्रेत्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. आतमधील १७ हजार रुपये रोख, कॅमेरा, आईसक्रिम आदी ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार बिट्ट्या जाळ्यात

$
0
0

औरंगाबाद : गांधीनगर येथील कुख्यात गुन्हेगार बिट्ट्याला दुचाकी चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला. दलालवाडी येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रामराव कसारे (वय ३५ रा. दलालवाडी) याने त्याची दुचाकी शुक्रवारी रात्री घरासमोर उभी केली होती. गांधीनगर येथील गुन्हेगार विजेंद्र प्रकाश धिल्लोड उर्फ बिट्ट्या (वय २४) याने हँडल लॉक तोडून बनावट चावीने दुचाकी सुरू करीत नेण्याचा प्रयत्न केला. कसारे यांच्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी बिट्ट्याला जागेवर पकडून चोप दिला. तसेच क्रांतिचौक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बिट्ट्याला अटक केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नासाठी तरुणीला पडेगावात मारहाण

$
0
0

पाच लाखांची मागणी; अकरा जणांविरोधात गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमच्या मुलाशी लग्न करायचे असेल तर पाच लाख रूपये दे म्हणत, एका तरुणीला मारहाण करणाऱ्या अकरा जणांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणीला याच भागात राहणाऱ्या शेख मुजीब याने शुक्रवारी (११ डिसेंबर) आपल्या घराजवळ बोलवून घेतले व नंतर तो पसार झाला. काही वेळातच मुजीब याच्या कुटुंबातील शेख रूकसाना, शेख फौजिया, नाजिया सिद्दीकी, शेख मोईन, शेख मोहसीन, शेख लतीफ, शेख सलीम व त्याचे तीन मित्र (सर्व रा. प्रिया कॉलनी) यांनी फिर्यादीला शेख मजीब बरोबर लग्न करायचे असल्यास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार देताच आरोपींनी लाठ्याकाठ्यानी मारहाण केली, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास छावणी पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचे लग्नासाठी अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत पळून नेल्याची घटना शनिवारी नारेगाव परिसरात घडली. तर एकतर्फी प्रेमातून दोन अल्पवयीन मुलींचा रोडरोमियोंनी विनयभंग केल्याचा प्रकार नागेश्वरवाडी व सिडको भागात घडला. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नारेगाव येथील १७ वर्षांच्या तरुणीला शनिवारी दुपारी एक वाजता पळवून नेण्यात आले. हा प्रकार कळाल्यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. आईच्या तक्रारीवरून आरोपी सचिन थोरात, दत्तू अनिता, पूनम, सोनी व सोनीचा नवरा यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहासाठी मुलीचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नागेश्वरवाडी येथील १७ वर्षांच्या मुलीचा एकतर्फी प्रेमातून साई मेहेर याने पाठलाग करीत विनयभंग केला. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता झाशी रानी चौकात हा प्रकार घडला. या मुलीच्या तक्रारीवरून आरोपी साई मेहेर (रा. नागेश्वरवाडी) याच्याविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीसोबत विनयभंगाचा दुसरा प्रकार एन-६ परिसरातील मथुरानगर येथे शनिवारी घडला. येथील १७ वर्षांच्या मुलीचा अनिरुद्ध प्रभाकर मिसाळ (वय २४ रा. बजाजनगर) याने पाठलाग केला. एकतर्फी प्रेमातून लग्नाची मागणी करीत त्याने तिला धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी अनिरुद्धविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन सातबारा जिल्ह्यात रखडला

$
0
0

औरंगाबादः गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सातबारा ऑनलाइनचे काम रखडले आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत सातबारा ऑनलाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. सातबारा ऑनलाइन करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. सध्या एनआयसीमार्फत सातबाराच संगणकीकरण सुरू असले तरी त्यांच्याकडे डाटाच उपलब्ध नसल्यामुळे काम बंद झाले आहे.

२०१३ मधील जुन्या रेकॉर्डनुसार सातबारा मिळवत असून नवीन नोंदीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या तीन तालुक्यांमध्ये सातबारे ऑनलाइन मिळत असले तरी औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांचे काम रखडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एका आदेशामुळे दरमहा १९ लाखांची बचत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊ नका; काम करू नका, असे आदेश महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अस्थापना विभागामार्फत २० दिवसांपूर्वी काढले. त्यामुळे या २० दिवसांत महापालिकेच्या किमान १९ लाख रुपयांची बचत झाल्याचे सांगितले जाते. सुट्टीच्या दिवशी काम केल्याचे दाखवून अधिकारी, कर्मचारी 'ओव्हर टाइम' उचलत होते.

केंद्रेकर यांनी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर पालिकेच्या कार्यसंस्कृतीत एकदम बदल झाला आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी विविध विभागात काम करण्याच्या उद्देशाने येत असत; त्यानंतर एक-दोन तास काम करून निघून जात. पण यामुळे त्यांची संपूर्ण एक दिवसाची उपस्थिती लागत होती. त्यामुळे संपूर्ण दिवस काम केल्याचा पगार त्यांना दिला जातो. सुटीच्या दिवशी काम केल्यामुळे त्याची नोंद जास्तीचे काम अशी केली जाते. जास्तीचे काम केल्यावर त्याचा मोबदलाही जास्तीचाच मिळतो. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण पडत होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रेकर यांनी सुटीच्या दिवशी कार्यालयात येऊन काम करू नका, असे आदेश अस्थापना विभागामार्फत काढले. यामुळे दुसरा व चौथा शनिवार व सुटीच्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्यालयात येणे बंद झाले आहे. यामुळे लेखा विभागावर जास्तीचा पगार देण्याची गरज राहणार नाही. यामुळे दरमहा किमान १९ लाख रुपयांची बचत होईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखा विभागाची ऑनलाइनकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आदेश दिल्यानंतरही लेखा विभागाने संपूर्ण कारभार अद्याप ऑनलाइन केलेला नाही. त्यामुळे केंद्रेकरांच्या आदेशाला लेखा विभागातील अधिकारी केराची टोपली दाखवतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रेकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी लेखा विभागाला भेट दिली व तेथील कामकाजाची पाहणी केली. लेखा विभागात होत असलेल्या कंत्राटदारांच्या गर्दीबद्दल त्यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. दुपारी तीनपर्यंत कोणत्याही कंत्राटदारांना लेखा विभागात येऊ देऊ नका, असे आदेश त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर त्यांनी 'किऑस मशीन'ची पाहणी केली. महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटदरांची यादी किऑस मशीनवर टाकावा, बिलासाठीची फाइल स्वीकारल्यापासून संबंधित कंत्राटदाराचे बिल निघेपर्यंतचे सर्व व्यवहार या यंत्रणेच्या माध्यमातून ऑनलाइन झाले पाहिजेत. प्रत्येक कंत्राटदाराला त्याने दाखल केलेली फाइल कोणत्या टप्प्यावर आहे हे किऑस मशीनच्या माध्यमातून कळाले पाहिजे, असे आदेश केंद्रेकर यांनी दिले होते.

आयुक्तांनी आदेश देऊनही लेखा विभागाने किऑस मशीनचा सक्षमपणे वापर सुरू केला नाही. या मशीनवर कंत्राटदारांची यादी टाकण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जात आहे. किऑस मशीनवर कंत्राटदारांची यादी टाकली तर त्यांच्याशी आपला 'संपर्क' होणार नाही, बिले परस्पर निघतील, असे लेखा विभागातील अधिकाऱ्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे अद्याप या विभागाचे काम ऑनलाइन झालेले नाही.

महापालिकेतील कंत्राटदार

'ए-वन' गटातील कंत्राटदार (२५ हजारांपर्यंतची कामे) ः ७००

रेटलिस्टची कामे करणाचे कंत्राटदार (तीन हजार रुपयांपर्यंतची फुटकळ कामे) ः ११०० ते १२००

'बी - वन' गटातील करणारे कंत्राटदार (मोठ्या रक्कमेची कामे) ः सुमारे २००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकर भरती उपसमितीत मराठवाड्यावर अन्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारच्या नोकरभरतीमध्ये प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मराठवाड्यावर अन्याय करण्यात आला आहे. समितीमध्ये मराठवाड्याच्या एकाही मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

राज्यातील सरकारी, निमसरकारी, महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याबरोबर प्रकल्पग्रसांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करण्यासंबंधी आढावा घेणए व त्याअनुषंगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात शासननिर्णय जाहीर केला. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीबाबतचे सुधारित प्रस्ताव नऊ जून रोजी मंत्रिमंडळासमोर सादर झाला होता. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, महामंडळे येथील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सध्याचे अनुकंपा धोरण सुधारणे व प्रकल्पग्रस्तांना किंवा त्यांच्या वारसांना सरकारी सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीत मराठवाड्यातील एकाही मंत्र्याला स्थान दिले गेलेले नाही.

मराठवाड्यावर कायम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अन्याय झाला आहे. सध्या गंभीर दुष्काळ आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत नोकरभरती धोरणाच्या बाबतीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपसमितीत मराठवाड्याला या सरकारने डावलले आहे. त्यामुळे विभागाची आणखी अडचण होणार आहे.

- डॉ. जितेंद्र देहाडे, प्रदेश प्रतिनिधी, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर अंतूर किल्ल्यावर सुरक्षारक्षक नेमणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्ययुगीन काळातील तोफेची चोरी झाल्यानंतर अखेर राज्य पुरातत्त्व विभागाने अंतूर किल्ल्यावर खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यातील तोफ पाच वर्षांपासून बेपत्ता असल्याची सांगून या प्रकरणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र काही दिवसांपूर्वीच तोफ पाहिल्याचा दावा अनेक दुर्गप्रेमींनी केला आहे.

कन्नड तालुक्यातील किल्ले अंतूर येथील मध्ययुगीन तोफ चोरीला गेल्याच्या घटनेनंतर जाग आलेल्या राज्य पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावर खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी तातडीने कार्यवाही झाली असून, लवकरच सुरक्षारक्षक किल्ल्यावर हजर होणार आहे. वन विभागाने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता तयार केला आहे. या कामानंतर किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे; तसेच परिसरातील ग्रामस्थ किल्ल्यावर नियमित येत असत. किल्ल्यातील मोठी तोफ काही दिवसांपूर्वी चोरीला गेली. या प्रकारात जास्त लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. चोरीचा प्रकार कळल्यानंतरही राज्य पुरातत्त्व विभागाने तातडीने कारवाई केली नाही. किल्ल्यात तोफ नव्हती, असा दावा करण्यात आला होता; मात्र दुर्गप्रेमींनी तोफेची अनेक छायाचित्रे पाठवून तोफ असल्याचे सिद्ध केले. या प्रकारानंतर पिशोर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान, चोरीच्या प्रकरणाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या किल्ल्यातील तोफ पाच वर्षांपासून नसल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र किल्ल्यातील तीन तोफांपैकी शेवटची तोफ दोन महिन्यांपूर्वी पाहिल्याचे दुर्गप्रेमी व ग्रामस्थांनी सांगितले.

नवीन नोंद घ्या

जिल्ह्यातील आठ किल्ल्यांवर दरवाजे, तोफा, दगडी मूर्ती, बुरुजांवरील लोखंडी साहित्य अशा अनेक प्राचीन वस्तू आहेत. या वस्तू जतन करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने वस्तूंची नव्याने नोंद करावी. अन्यथा, किल्ल्यावर वस्तू नव्हतीच असा दावा करू नका, असे दुर्गप्रेमींनी म्हटले आहे.

किल्ल्यावरील पुरातन वस्तूंची नोंद राज्य पुरातत्त्व विभागाकडे नसणे धक्कादायक आहे. किमान नव्याने नोंदी घेतल्या गेल्या पाहिजे. तटबंदीवर झाडे वाढल्याने कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तोफ चोरीच्या घटनांचा पुरातत्त्व विभागाने गांभीर्याने विचार करावा.

- प्रमोद डवले, अध्यक्ष, िवदुर्गसंवर्धन समिती

मराठी माणसाची प्रेरणास्थाने असलेल्या गडकिल्ल्यांची पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे झालेली दुर्दशा प्रत्येक किल्ल्यावर दिसते. आता तोफा गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या तोफांचा लवकर शोध लावावा.

- वैभव गायकवाड, फोर्ट रिस्टोरर्स ग्रुप

किल्ल्यावरील तोफेची छायाचित्रे अनेक गडप्रेमींकडे आहेत. त्यामुळे किल्ल्यावर तोफ नसल्याचे पुरातत्त्व खात्याचे वक्तव्य जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. देवगिरी किल्ल्यात चोरी झालेल्या वस्तूंचा अजूनही तपास लागलेला नसताना पुन्हा चोरीचा प्रकार घडणे दुर्दैवी आहे.

- दीपक शिंदे, अध्यक्ष, फोर्ट रिस्टोरर्स ग्रुप

औरंगाबाद जिल्ह्यात देवगिरीनंतर किल्ले अंतूर हाच सर्वात मोठा आणि समृद्ध किल्ला आहे. काही दिवसांपूर्वी शासनाची किल्ले देवगिरीबाबतची दिरंगाई दिसली. या घटनेनंतर राज्य पुरातत्त्व विभागाने किल्ल्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

- आशिष पाटील, दुर्गप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे आमदारांचा दत्तक गावांना विरोध

$
0
0

Pravin.Lonkar@timesgroup.com

नागपूरः केंद्र सरकारच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. २० मे २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आमदारांनी गावांची निवड करून १५ ऑगस्टपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. आमदारांनी गावेच निवडली नसल्याने दीड महिन्याने ही मुदत वाढवून देण्यात आली. मात्र, या मुदतीतही गावे सादर करण्याची तत्परता निम्म्यापेक्षा अधिक आमदारांनी दाखविलीच नसल्याचे वास्तव आता पुढे आले आहे. मुख्यमंत्र्यांचा 'आदर्श पाठ' आमदारांसह मंत्र्यांच्याही पचनी पडला नसल्याचेच यावरून दिसून येते.

विकास हा केवळ शहरांपर्यंत राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ ऑक्टोबर २०१४ रोजी सांसद आदर्श ग्राम योजना सुरू केली. महाराष्ट्रातही भाजपचीच सत्ता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या आदर्श पावलांवर पाऊल ठेवत राज्यातही याच धर्तीवर योजना राबविण्याची घोषणा केली. गाव निवडीसाठी आमदारांना ग्रामविकास विभागाकडून वारंवार स्मरणपत्रही पाठविण्यात आले. मात्र १५ ऑगस्टपर्यंत काही बोटावर मोजण्याइतक्या आमदारांनीच गावांची निवड केली. आमदारांना गाव निवडता यावे यासाठी ही मुदत वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली. मुदत वाढवूनही विधानसभेतील २८८ आमदारांपैकी केवळ १३१ आमदारांनी आणि विधानपरिषदेतील ७८ आमदारांपैकी केवळ २० आमदारांनीच मुदतीत गावे निवडली आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या 'आदर्शा'ला खो

योजनेच्या निकषानुसार प्रत्येक आमदाराला जुलै २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण मिळून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानपरिषदेत ५ आमदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सात आमदारांनीच मुदतीत गावांची निवड करून कामाला सुरुवात केली. मुदत संपल्यानंतर काही आमदार आता गावांची निवड करू लागले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच टप्प्यात तीन गावांची निवड केली आहे. सुनील केदार, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश गजभिये यांनी मात्र अद्यापही गावांची निवड केली नाही.

मंत्रीही उदासीन

आमदार आदर्श ग्राम योजनेत ग्राम विकास विभागाकडे मुदतीत गावांची नावे सादर करण्यात अनेक मंत्रीही फेल ठरले असल्याचे पुढे आले आहे. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे यासारख्या प्रमुख मंत्र्यांनीही मुदतीत गावांची निवड केली नाही. आमदार ग्राम योजनेसाठी राज्य सरकारने विविध उपक्रम आखले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे, आदर्श गावासाठी आमदारांना जोड निधी देणे असे निर्णय राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आले आहे. मात्र आमदारांच्या उदासीन धोरणामुळे कागदावर साकारलेले आदर्श गाव प्रत्यक्षात केव्हा उतरणार असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images