Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘डीएमआयसी’चे सर्वेक्षण

$
0
0

Makrand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पातील औरंगाबादच्या विकासकामांना सुरवात झाली आहे. पायाभूत सुविधा पुरविण्याचे कंत्राट मिळालेल्या शापूर्जी पालंजी कंपनीने शेंद्रा परिसरात सर्वेक्षण सुरू केले आहे. या कंपनीचे कार्यालयही शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात डीएमआयसीच्या कामाला वेग येणार आहे. डीएमआयसीच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्राच्या या योजनेसाठी औरंगाबाद परिसरातील ३००० हेक्टर जमीन संपादित केली आहे. औद्योगिक कॉरिडॉर उभारताना स्मार्ट सिटीचीही संकल्पना साकारली जाणार आहे. संपादित जागेपैकी ८५० हेक्टर जागेवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ८५० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात पायाभूत सुविधा आणि दोन रेल्वे उड्डाणपूल असे वर्गीकरण होते. शापूर्जी पालंजी या कंपनीस पायाभूत सुविधांचे कंत्राट देण्यात आले.

जानेवारीपासून प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार डीएमआयसीच्या कामास सुरवात झाली आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शापूर्जी पालंजीने शेंद्रा परिसरात एक कार्यालयही सुरू केले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल मुंबईला सादर करून पुढील बांधकामाची सुरवात होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शेंद्रा परिसरात अद्ययावत सुविधा केंद्र, रस्ते, जलवाहिनी, वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. लाडगाव आणि

झाल्टा परिसरात दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारले जाणार आहेत. या परिसराला पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येत आहे. पैठणहून ही जलवाहिनी टाकण्यात येत असून, जून २०१६पर्यंत शेंद्रा परिसरात ही जलवाहिनी पोचणार आहे.

'डीएमआयसी' प्रकल्प दिल्ली ते मुंबईदरम्यान पाच राज्यांतून जाणार आहे. जमीन संपादनाची देशात सर्वात जलद प्रक्रिया महाराष्ट्रात आणि तेही औरंगाबादेत पार पडली. याठिकाणचे कामही सुरू झाले. केंद्राने गेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र निधीही दिला. देशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याच कालावधीत 'डीएमआयसी'च्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापुरात एनआयएची शोध मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

बडी मस्जिद भागातून 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया' या दहशदवादी संघटनेचा संशयित इम्रान मुअज्जम खान पठाण याला अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही, रविवारी वैजापूरमध्ये एटीएस व एनआयएची शोध मोहीम सुरूच होती. या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी शनिवारच्या कारवाईनंतरही शहरात तळ ठोकला आहे.

एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) व एटीएसच्या (दहशतवाद विरोधी पथक) अधिकाकऱ्यांनी रविवारी खान गल्ली, लाडगाव रोड आदी भागांतील काही नागरिकांची चौकशी केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे दिवसभर सगळीकडे या कारवाईची चर्चा होती. आणखी काही संशयितांना येथून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. इम्रानचे घर असलेल्या शाहबाजपुरा भागात शनिवारच्या कारवाईचे सावट जाणवत होते. या भागातील नागरिक चिडीचूप असल्याचे दिसले. वैजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील एवढी मोठी कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे. एटीएसच्या पथकाची शोध मोहीम ग्रामीण भागातही सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी या कारवाईबाबत मौन पाळले आहे.

इम्रानविरुद्ध कट : दरम्यान, इम्रान पठाणच्या कुटुंबीयांनी रविवारी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. इम्रान हा निरपराध असून, त्याला गोवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप इम्रानची आई व भावाने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या ‘पीए’ला दुष्काळी धनलाभ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आमदार संदीपान भुमरे यांचे स्वीय सहाय्यक नामदेव खराद व त्यांच्या पत्नीच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना त्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी निधीचे चक्क १ लाख २१ हजार रुपये जमा झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

नामदेव खराद व त्यांची पत्नी मनीषा यांच्या बँक खात्यांवर गेल्यावर्षी एप्रिल व मे महिन्यात चक्क १ लाख २१ हजार ९२० रुपये दुष्काळ निधी जमा झाला. तालुक्यातील आनंदपूर येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत या दोघांची नावे आहेत. आनंदपूर शिवारात नामदेव खराद व त्यांच्या पत्नीच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही.

संबधित गावाच्या तलाठ्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयात देण्यात येते. तहसील कार्यालयात शहानिशा केल्यावर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकांकडे पाठवली जाते. तहसील कार्यालयाकडून आलेल्या लाभार्थ्यांची नावे व बँक खात्यावरील नावांची शहानिशा केल्यानंतर निधी खात्यावर जमा केला जातो. ही प्रक्रिया किचकट व पारदर्शी असतानाही खराद व त्यांच्या पत्नीचे नाव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत कोणी टाकले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'नावात एखादी छोटी चूक जरी असली तरी दुष्काळी निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत खेट्या माराव्या लागतात. तालुक्यातील आठ हजार खऱ्या लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही. दुसरीकडे सत्ताधारी व त्यांचे बगलबच्चे दुष्काळी निधी हडप करत आहेत,' अशी टीका अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले की, मी पैठण येथे रुजू होण्याच्या आधीचे हे प्रकरण आहे. हे प्रकरण उजेडात येताच चौकशीचे आदेश दिले आहे. दोषींवर योग्य ती कार्यवाही करू.

माझ्या व पत्नीच्या खात्यावर हे पैसे कसे जमा झाले, याविषयी मला काहीच माहिती नाही. ही रक्कम मी उचललेली नाही. - नामदेव खराद, आमदारांचे स्वीयसहायक

माझ्या पीएकडे किती जमीन आहे किंवा नाही, याची मला माहिती नाही, मात्र दुष्काळी निधी वाटपात भ्रष्टाचार झाला असेल तर, दोषींवर कडक कारवाई व्हावी.- संदीपान भुमरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळवीटाचा तहानेने तडफडून मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती अधिकच भीषण होत चालली असून तहानेने व्याकूळ झालेल्या एका काळवीटाचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. रस्त्याच्या कडेला हे काळवीट मृतावस्थेत आढळून आलं असून या घटनेने वनविभाग हादरून गेला आहे.

अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव येथे रस्त्याच्या कडेला हे काळवीट मृतावस्थेत होतं, असं गावकऱ्यांनी सांगितलं. पूर्ण वाढ झालेलं हे काळवीट होतं. पाण्याच्या शोधात जंगल सोडून वस्तीच्या दिशेने निघालेलं हे काळवीट पाणी न मिळाल्याने तडफडून मृत झालं असावं, अशी शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली. काळवीटाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. या प्रकाराबाबत वनविभागाला कळविण्यात आलं असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, उन्हाळा सुरू होण्याआधीच महाराष्ट्र दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याने शेतकरी आणि त्यांच्या जनावरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी वन्य प्राण्यांचा वाली कोण?, असा प्रश्न बीडमधील घटनेने उभा ठाकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाणक्यपुरीच्या रस्त्याला पार्किंगचे ग्रहण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद:

शहानूर मियॉ दर्गा चौक ते विभागीय ‌क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला चार चाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्यामुळे सूतगिरणीकडे जाणारा रस्ता अडचणीचा ठरला आहे. या रस्त्यावर एकेरी वाहतूक केली जात असल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनत आहे.

सूतगिरणीचा रस्ता वर्दळीचा झालेला आहे. सध्या भूमिगत गटार योजनेसाठी एका बाजूचा रस्ता संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एकेरी वाहतूक होत असल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. यातच चाणक्यपुरी भागातील अनेक बंगल्यांसमोर चार चाकी वाहनांची पार्किंग रस्त्यावरच केली जात आहे. चाणक्यपुरीच्या बंगल्यापासून ते शहानूर मियॉ दर्गा चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला चार चाकी वाहने रांगेने पार्क केलेली दिसून येतात. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

एकेरी रस्त्यावर होणाऱ्या धोकादायक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित वाहतूक विभागही लक्ष देत नाही. त्यामुळे या भागात छोट्या-छोट्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.







ट्रॅव्हल्स गाड्यांमुळे वाढला धोका

संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावर वाहतूक जास्त असते. शिवाय शहराबाहेरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स बस शहानूरमियॉ दर्गा मार्गे श्रीहरी पॅव्हेलियनकडे जातात. या गाड्या पोदार स्कूलपासून वळण घेतात. या गाड्यांमुळेही या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.



चौपाटीवरही गर्दी

शहरातील चौपाटी म्हणून प्रसिद्ध झालेल्या या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात. शिवाय हातगाड्या रस्त्यावरच उभ्या राहतात. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिसर मोठा, मात्र वाहनांचा गोठा

$
0
0

सिडको एमआयडीसी ठाण्याला इतरांचाच भार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसीमध्ये सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे आहे. ऐैसपैस जागेत पोलिस ठाणे पसरलेले आहे. मात्र, ठाण्याच्या आवारात इतर पोलिस ठाण्याची देखील भंगार वाहने आणून टाकण्यात आल्याने ठाण्याला गोठ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येते.

चिकलठाणा औद्योगिक परिसर व आजूबाजूच्या नागरी वसाहती वाढल्याने सिडको पोलिस ठाण्याचे विभाजन करून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याची निर्मिती १९९६ साली करण्यात आली. या ठाण्याच्या हद्दीत चिकलठाणा, मसनतपूर, नारेगाव, ब्रिजवाडी, सिंधीबन या समिश्र वसाहतीसोबतच एन-१ सारखा उच्चभ्रू भाग येतो. साधारण एक ते सव्वा लाख लोकसंख्येचा परिसर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.

या पोलिसठाण्यासाठी एकशे दोन कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. मात्र, प्रत्यक्षात ७८ अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. यापैकी अनेकदा अनेकजण सुट्टीवर जात असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो.





वर्षभरातील गंभीर गुन्हे


खून १ १

खुनाचा प्रयत्न ४ ४

दरोडा ३ ३

जबरी चोरी १० ७

घरफोड्या १३ ३

वाहन चोरी ४१ ११

मोबाइल चोरी ४९ ६

बलात्कार ५ ५

विनयभंग १५ १५



महिला व पुरूष विश्रांती कक्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

या पोलिस ठाण्याच्या आवारात महिला विश्रांती कक्षासोबत पुरुष कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, येथील फर्निचरचे काम बाकी असल्याने हे कक्ष अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत.



प्रशस्त लॉकअप

या पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये महिला व पुरूष लॉकअपची व्यवस्था करण्यात आली आहे. जवाहरनगर, मुकुंदवाडी ठाण्यातील आरोपींना याच लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. अंधार कोठडी न ठेवता हा लॉकअप उजेड पुरेसा येईल अशा पद्धतीने प्रशस्त व मोकळ्या जाळीचा ठेवण्यात आला आहे.

वॉटल फिल्टरची गरज

ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी वॉटर कुलर बसवण्यात आले आहे. मात्र, वॉटर फिल्टर नसल्याने अशुद्ध पाणी पोलिसांना प्यावे लागत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वॉटर फिल्टर लवकर बसवावे अशी येथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

सीसीटीव्हींची संख्या जास्त

इतर पोलिस ठाण्यापेक्षा या ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. एकूण आठ कॅमेरे पोलिस ठाण्याच्या आवारात बसविण्यात आले आहेत. यामध्ये निरीक्षकाचे केबीन, ठाणे अंमलदार रुम, लॉकअप, कॅरीडॉर, प्रवेशद्वार, पाठीमागचा परिसर तसेच ठाण्यासमोरील रस्ता देखील कव्हर होतो. कॅमेऱ्याचा दर्जा देखील चांगला असल्याचे चित्रीकरण स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी केली खेळांमध्ये धमाल

$
0
0

गरवारेच्या प्रांगणात जमल्या महिला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमात महिलांनी खूप धमाल केली. वयाचे भान विसरून सर्वजणी खेळांमध्ये रमल्या होत्या. सेंटरने २२ व २३ जानेवारी असा दोन दिवसांचा कार्यक्रम घेत छान मनोरंजन केले.

पहिल्या दिवशी ग्लासचा मनोरा, रांगोळीचे जास्तीत जास्त ठिपके काढणे, एका मिनिटात जास्तीत जास्त सेल्फी, मॉडेलचे फोटो काढणे, हार पासिंग, ओंजळसारखे खेळ घेण्यात आले. स्पर्धेत कोण जिंकतं यापेक्षा बस मला खेळायचे आहे हेच सर्वांचे ध्येय होते. दुसऱ्या दिवशीच्या खेळांमध्ये इको फ्रेंडली उपक्रम घेण्यात आले. टाकाऊ सामान, वस्तूंपासून भेटकार्डे सारख्या खेळांमधून महिलांनी आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत समुद्र किनारा, गणपती, पान फुले चितारली होती. याच दिवशी सुगम गायनाचा कार्यक्रमातही २० महिलांनी भावगीत, भक्तीगीत सादर करून गायनाची हौस भागवून घेतली. बक्षिस वितरणास प्रमुख अतिथी म्हणून सिडकोच्या नगरसेविका सुरेखा खरात, गौतम खरात, महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका सुनीता पाठक, संचालक सुनील सुतवणे, महिला विभाग प्रमुख सुलभा जोशी, शिल्पा अस्वलीकर आदींची उपस्थिती होती. गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे महिलांना स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देत, कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करा असा संदेश दिला. या अनुषंगानेच वाण म्हणून डस्टबीन देण्यात आले.

विजेत्यांची नावे

ज्योती पाटील, छाया सोमवंशी, संध्या देशपांडे, देवांगी तुरे पाटील, विद्या रानडे, सविता रौतल्ले, वैशाली मालोदे, सीमा चव्हाण, सीमा पाटील आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी जपले सामाजिक भान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खंडेलवाल दिगंबर जैन महिला मंडळाने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला. राजाबजार जैन मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मनिषा ललीत पाटणी, रोहिणी प्रमोद पाटणी, राणी विपीन कासलीवाल यांच्या उपस्थितीत कापडी पिशव्यांचे वाण देण्यात आले.

राजाबजार, कुवारफल्ली, मोहनलालनगर, चौराहा, पानदरीबा, जाधवमंडी आदी परिसरातून २५० महिला उपस्थित होत्या. मंगलाचरणाने कार्यकमाची सुरुवात झाली. महिला लाल, केशरी व पिवळ्या साड्या परिधान करून आल्या होत्या. सांस्कृतिक कार्यकमांमध्ये उखाणे, धार्मिक प्रतियोगिता, एक मिनिट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मंगला पाटणी, वैशाली कासलीवाल, संगीता गंगवाल, शोभा ठोले विजेत्या ठरल्या. यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्ष शारदा लोहाडे, नीता ठोले, मनिषा पाटणी, रोहिणी पाटणी, राणी कासलीवाल, सुनीता कासलीवाल, साधना सेठी, चंदा कासलीवाल, कांता पहाडे, संगीता कासलीवाल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नीता ठोले यांनी तर शारदा लोहाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सारे जहाँ से अच्छा...’ चे सूर निनादले

$
0
0

हजारो विद्यार्थ्यांनी गायले गीत, एमजीएमच्या क्रीडा संकुलात विक्रमी कार्यक्रम



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हजारो विद्यार्थी एमजीएम क्रीडा संकुलात शिस्तीत उभे... या सर्वांनी एकाचवेळी एका सुरात ते गीत सुरू केले आणि उपस्थितांच्या अंगावर शहारे आले... ते गीत होतं 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा...' या गीताने एमजीएम परिसराचा माहोल राष्ट्रप्रेमाने भारून गेला. राष्ट्रीयत्वाचे, एकतेचे दर्शन या निमित्ताने हजारो विद्यार्थ्यांनी घडविले.

सकाळी आठ वाजेपासूनच विविध महाविद्यालय आणि शाळांचे विद्यार्थी एमजीएम क्रीडा संकुलात येण्यास सुरुवात झाली होती. या विद्यार्थ्यांनी शहरवासियांच्या साक्षीने 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' गीत उद्याच्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर गाऊन लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ३१,५०० विद्यार्थी, नागरिकांनी हे गीत गायले तेव्हा एक वेगळेच भारावलेपण वातावरणात निर्माण झाले होते.

सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेले विद्यार्थ्यांचे येणे दहा वाजेपर्यंत सुरू होते. शहरातील विविध भागातील उर्दू, मराठी, इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी 'सारे जहाँ से अच्छा' गाण्यासाठी जमले होते. अत्यंत शिस्तीत राष्ट्रभक्तीपर गीत गाणाऱ्या या विद्यार्थ्यांचे दृष्य उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी डोळ्यांत सामावून घेतले. एक वेगळेच समाधान त्यावेळी सर्वांना मिळाले.

प्रजासत्ताक दिनापूर्वी एक दिवस आधी सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमासाठी हजारो विद्यार्थ्यांसोबतच विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य मगदूम फारूखी, सुधाकर बनाटे, महापालिका स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, शोएब खुसरो, अस्लम ‌शरिफ, शेख नईम, मोहसीन अहेमद, अजमल खान, चंद्रकांत भराट, नाहेदा खातून यांच्यासह मुख्य संयोजक एस.पी. जवळकर आणि मिर्झा सलीम बेग आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रमोद सरकटे, राजेश सरकटे यांनी देशभक्ती पर गीत गायन केले. सकाळी ११ वाजण्याआधी या सर्व विद्यार्थ्यांचा गाणे म्हणण्याचा सराव घेण्यात आला. सुमारे तीन मिनीटे ३० हजारावर विद्यार्थी 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा...' हे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले गीत गात होते. कार्यक्रम सुविहितपणे पार पडण्यासाठी डीएड, बीएडचे दोनशेहून अधिक विद्यार्थी मेहनत घेत होते. लायन्स क्लब सिडकोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हे गीत गायनात ३१,५०० जणांनी सहभाग नोंदवित लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला. आता या कार्यक्रमाच्या सर्व नोंदी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविल्या जातील, अशी माहिती एस. पी. जवळकर यांनी दिली.





संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेषभूषा

एमजीएम क्रीडा संकुलाच्या गेट क्रमांक दोनमधून प्रवेश करताना एका बाजूला एका छोट्या व्यासपीठावर अल इदारा शाळेच्या चिमुकल्यांनी देशातील विविध भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेशभूषा केली होती. त्यामुळे हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ज्ञानप्रकाश विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाद्वारे उपस्थितांना सामाजिक एकतेचे संदेश दिला.



स्वच्छतेचा संदेश

या कार्यक्रमास जमलेल्या मुलांना प्लास्टिक पाऊचमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अल हुदा ग्रुप ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संकुलात विविध ठिकाणी पडलेले प्लास्टिक पाऊच उचलून एका ठिकाणी गोळा करीत मैदान स्वच्छ केले. आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजार शेततळ्यांची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यभरात ५० हजार शेततळे देण्याचे नियोजन असून यातील निम्मे शेततळे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला मिळवण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
शेततळे देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असले तरी याबाबत अद्याप निकष ठरवण्यात आले नाही. विभागातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.
राज्यात पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे अशी घोषणा हिवाळी अधिवेशनात केली होती. मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ आहे, त्यासाठी या भागात सर्वाधिक शेततळे देण्यात यावे, अशी तयारी विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे. प्रत्येक शेततळ्यासाठी जवळपास १ लाख रुपयांचा खर्च आहे.
शेततळ्यांची योजना जलसंधारण विभागामार्फत राबवण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्यात जून २०१६ पर्यंत ५० हजार शेततळे तयार करण्याचे नियोजन असून या करिता विभागनिहाय नियाजन करण्यात येत आहे. यातील निम्मे म्हणजे २५ हजार शेततळे मराठवाड्याला मिळावे, अशी तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी ४ फेब्रुवारी रोजी आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याची योजना काही नवीन नाही. मात्र शेततळे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनाच प्रथम खर्च करावा लागणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान शेततळे देण्यासाठी निकष ठरवण्याचे काम सुरू असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती असलेल्या मराठवाड्यात २०१२ मध्येही शेततळे देण्याची घोषणा करण्यात आली होती. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ४५० शेतकऱ्यांनी स्वतः पैसे खर्च करून शेततळे केले. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अनेक शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात खेट्या मारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बासमतीसह सर्व तांदूळ स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त असताना एक गुड न्यूज आहे. यंदा औरंगाबाद बाजारपेठेत तांदूळ प्रतिक्विंटल सुमारे ५०० ते एक हजार रुपयांने स्वस्त झाले आहेत. बासमतीसह सहा-सात तांदळाचे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. तांदळाची वार्षिक खरेदी करण्यासाठी जानेवारी व फेब्रुवारी महिने योग्य मानले जातात.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तांदळाचे दर उतरले आहेत. वार्षिक खरेदीच्या निमित्ताने औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा १५ ते २० तांदूळ व्यापाऱ्यांनी तांदूळ महोत्सव आयोजित केला आहे. तांदूळ व्यापारी जगदीश भंडारी म्हणाले, होलसेलमध्ये यंदा बासमती ८ हजार ते ९ हजार रुपये क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षी हा दर १० हजार ते ११ हजार रुपये होता. बासमतीचे तुकडा, वनफोर, थ्रीफोर आणि मोगरा, असे तीन प्रकार उपलब्ध असून या सर्व प्रकारांना चांगली मागणी आहे.
कोकण व देशातील इतर राज्यात तांदळाचे उत्पादन वाढले आहे. याशिवाय तांदळाच्या निर्यातीवर आलेल्या मर्यादांमुळे दर कमी झाले आहेत. यंदा औरंगाबादमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दुपटीने तांदूळ मागवला आहे. दर कमी झाल्याने जादा खरेदी करून व्यापारी ग्राहकांना होलसेल दरात तांदूळ उपलब्ध करून देत आहेत.

तांदळाचे दर कमी होण्याच तीन वर्षातील पहिली वेळ आहे. याशिवाय डाळींचे दरही उतरले असून विशेषतः मूग व उडीद स्वस्त झाले आहेत. ग्राहकांनी तांदूळ व या दोन डाळी खरेदी करण्यास हरकत नाही.
जगदीश भंडारी, तांदूळ व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर हायअलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पठाणकोट विमानतळावर झालेला हल्यानंतर देशभरातील विमानतळावर हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल विमानतळावर येणारी वाहने व प्रवाशांची तपासणी करत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वैजापूर येथून तीन दिवसांपूर्वी आयसिसचा संशयित हस्तक इम्राण मुअज्जम खान पठाण याला एनआयएने अटक केली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर सीआयएसएफने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाणारे प्रवासी, त्यांचा निरोप देण्यासाठी आलेले व त्यांच्या वाहनांची प्रवेशद्वारावरच तपासणी करण्यात आली. वाहन व प्रवाशांच्या समानाची तपासणी करूनच विमानतळ परिसरात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, पुढील काही दिवस ही सुरक्षा व्यवस्था कायम राहणार असल्याची माहिती सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सर्व जनतेला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करता यावे यासाठी प्रभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी पाणीटंचाई निवारण कक्ष स्थापन करून त्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पालकमंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, 'निसर्गाच्या अवकृपेने पाणी प्रश्न भीषण झाला आहे. कोठेही पाण्याचा साठा शिल्लक नाही. महिनाभरानंतर अवस्था आणखी बिकट होणार असून त्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. लातूर शहराला उजनी धरणातून पाणी द्यावे ही मागणी गेल्या बारा वर्षांपासून ऐकत आहोत. हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू.'
लातूरचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी रेल्वेने पाणी आणण्याचा पर्याय आहे. पंरतु, त्यासाठी मोठा खर्च लागतो. धनेगाव, तेरणा, साई, रेणा येथे उपलब्ध असणारा साठा पाहून नियोजन करण्यात आले आहे. मांजरा प्रकल्पातील साठा महिनाभरात संपून जाईल. त्यानंतर तेथे चर खोदण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. लातूर शहराला दररोज २५ एमएलडी पाणी आवश्यक असून त्यापैकी १८ एमएलडी उपलब्ध होत आहे. उजनीचा पर्याय कायमस्वरुपी योजना म्हणून डोळ्यासमोर असल्याचे त्या म्हणाल्या.
लातूर शहरात व जिल्ह्यात सध्या १५० टँकर सुरू आहेत. आगामी काळात टँकरची संख्या व फेऱ्या वाढणार आहेत. शहरात टँकरने पाणी देणे प्रस्तावित असून यावेळी जनतेसह लोकप्रतिनिधींनीही शासनाला सहकार्य करावे. टँकरने पाणी देण्याचा प्रभागनिहाय आराखडा तयार आहे. कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात उतरविणे आवश्यक आहे. आगामी काळात दर आठवड्याला पाणी टंचाईचा आढावा घेतला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.
नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. न झालेला खर्च इतर विभागांकडे वळविण्यात येणार आहे. रोहयो, चारा व पाणी या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील, आमदार सुधाकर भालेराव, पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती.
लातूर तालुक्यातील गंगापूर येथील नाले सरळीकरण कामाचे भूमीपूजन लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, रमेश कराड, बाबू खंदाडे शैलेश लाहोटी, गणेश हाके उपस्थित होते

चारा डेपो सुरू करणार
लातूर भागात चारा छावणीला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गावात चारा डेपो तयार करावेत असे मी मंत्री मंडळाच्या उपसमितीत मांडले असल्याची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाईत आढळला तरुणाचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवळाई परिसरात सोमवारी एका ३० वर्षाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा मध्यरात्री कोणी तरी खून केला असावा, असा संशय आहे. अधिक तपास चिकलठाणा पोलिस करत आहेत.
देवळाई परिसरातील साईबाबा टेकडीजवळील वनक्षेत्रात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटानास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी तरुणाचा मृत्यू हा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत तरुणाच्या उजव्या हातावर 'माँ' हा शब्द गोंदलेला आहे. तसेच त्याच्या गळ्यात एक बिल्ला सापडला असून त्यावर ब्लड ग्रुप, वाढदिवसाची तारीख लिहिलेली आहे. त्याच्या अंगात निळ्या रंगाची जिन्स, खिशात हेडफोन सापडला. शिवाय हिवाळे पाटील शिवजंयती मंडळ असा लोगो असलेला टी शर्ट परिधान केलेला आहे. या तरुणबाबत माहिती असल्यास संपर्क साधवा, असे आवाहन चिकलठाणा पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या आयशरला अपघात, एकचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या आयशरला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक वारकरी जागीच मरण पावला. तर अपघातात २५ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास अंबड तालुक्यातील शेवगा पाटीजवळ घडला. या अपघातात २५ भाविक जखमी झाले असून त्यापैकी सात जणांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील काही गावकरी आठ दिवसांपूर्वी पंढरपूर येथे सप्ताहासाठी गेले होते. दरम्यान, पंढरपूरहून बीड मार्गे गावी परत जात असताना शेवगा (ता. अंबड) शिवरात त्यांच्या आयशर ( क्रमांक एम. एच. २७ एक्स २०३) एक्सेलचा पाटा तुटल्याने गाडी रस्त्यातच बंद पडली. याचवेळी समोरून येणारा कंटेनर ( क्रमांक टी. एन. ३० ए. सी. ३४०८) हा त्या आयशरवर जाऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, भाविकांच्या आयशरचे दोन तुकडे झाले.
या घटनेत अजबराव श्रीराम फुसे (वय ३५) हा जागीच मरण पावला. तर एकूण २५ जण जखमी झाले. सर्व जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार देऊन जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये प्रमिला दूधे, गौरकर्णी भिकरे, इलबाई पाठक, माया आसोले, भरत आसोले, गौकर्णी पाठक, गजानन खुसे, यशोदा जाईले, गंगुबाई मातुरकर, विजय महासने, रत्नाबाई बोरकर, पार्वता थोटे, आसिफ शाह, युसूफ शाह, कमला तायडे, पवन, गंगू तायडे, गणेश क्षीरसागर, उज्वला लातुरकर, सुरेश क्षीरसागर, दुर्गा अवचार, सुलोचना राजपूत, शीला भुसे, रामदास सुर्याशोले, श्रीकांत गवंदे आणि वंदना जाइले यांचा समावेश आहे.
१९ जणांवर जालन्यात उपचार सुरू असून सात जणांना औरंगबदला हलविन्यात आल आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रावसाहेब दानवे यांचा शिवसेना टोला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षच राज्यातील पहिल्या क्रमांकावरील पक्ष आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. 'पक्ष वाढविण्याचा आम्हाला अधिकार असून आम्ही काय करावे, ते कुणीही शिकविण्याचा प्रयत्न करू नये,' असा टोलाही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला.
प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार दानवे यांचे शहरात जोरदार स्वागत करून वाहन फेरी काढण्यात आली. या निमित्ताने संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार दानवे बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, माजी मंत्री नामदेव गाडेकर, श्रीकांत जोशी, डॉ. भागवत कराड, भगवान घडमोडे, माधुरी अदवंत आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत गेल्या वर्षभरात अनेक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे काहीच्या पोटात दुखते, असे ते म्हणाले. मुंबईतील गल्ल्या माहिती नाही, अशी टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. संघटन कौशल्य असल्याने तनवाणी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा पक्षाने सोपवल्याचा खुलासा त्यांनी केला. तनवाणी यांनी सातारा, देवळाई वॉर्डाची निवडणूक स्वबळावर लढविण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली.
प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रभाकर विधाते, रणधीरसिंग होलिये, गुलमंडी शाखेचे उपप्रमुख दत्ता इंगळे, विद्याताई पगारे यांच्यासह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
दर्शनविहार वसाहतीमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सातारा पोलिस ठाण्यास भेट देऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनी गुन्हे लवकर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. दरम्यान, या घटनेचा गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे.
दर्शनविहारमध्ये २३ जानेवारीच्या रात्री बळवंत देशपांडे यांच्या घरी घरफोडी झाली. या घरफोडीत ७ लाख २२ हजार व मोहन शेळके यांच्या घरातून १० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. एका ठिकाणी फक्त कडीकोयंडा तोडण्यात आला. या तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे. या घरफोडीचा गुन्हे शाखेचे पथकही तपास करीत आहे. दरम्यान, मोठी घरफोडी झाल्याची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी सातारा पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सकारात्मक पत्रकारितेची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सध्या प्रत्येक क्षेत्रात तणाव आहे. कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन तणावाचा परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांनी केले. प्रमोद महाजन पत्रकार भवनात रविवारी (२४ जानेवारी) झालेल्या अभ्यासवर्गाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
नवोदित पत्रकारांचा व्यासंग वाढवण्यासाठी तरुण पत्रकारांनी 'अभ्यास वर्ग' उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षभर दर रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभ्यासवर्गात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, अरविंद वैद्य व सुभाषचंद्र वाघोलीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फटाले म्हणाले, 'प्रत्येक पिढी पत्रकारितेत नवीन बदल घडवत असते. युवकांनी पत्रकारांसमोरील आव्हाने स्वीकारली पाहिजे. स्पर्धेच्या काळात लाभाची अपेक्षा न बाळगता कार्यरत रहा. सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. या कामासाठी दृष्टिकोन सकारात्मक ठेवा'. अरविंद वैद्य यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियावर भाष्य केले. 'आज माध्यमे व्यावसायिक झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्या पाहून मुद्रित माध्यमे पाठलाग करतात, इलेक्ट्रॉनिक मीडियात बातम्या दाबण्याचे प्रकार घडतात. वाईट पद्धतीने हा मीडिया काम करीत आहे. त्यामुळे उदात्त काम करण्याची पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे,'असे वैद्य म्हणाले.
'वार्ताहराकडे बातमीसाठी आवश्यक गुणांबरोबरच भाषा या अतिरिक्त गुणाची गरज असते. पत्रकारांनी विनम्र राहून कौशल्य आत्मसात करावे. नम्रता म्हणजे शरणागती नसून जाणून घेण्याची क्षमता असते. पुढील काळात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि शेती या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे' असे माध्यम सल्लागार सुभाषचंद्र वाघोलीकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिष्ठा भोसले आणि सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतभाई हौजवाला यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : शहरात अनेकविध संस्था-संघटनांची मुहूर्तमेढ रोवणार वसंतभाई घनश्यामदास हौजवाला (८०) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (२५ जानेवारी) शांतीनिकेतन कॉलनीतील निवासस्थानी निधन झाले. हौजवाला 'ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'चे माजी उपाध्यक्ष, 'महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'चे माजी अध्यक्ष, 'मराठवाडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'चे माजी अध्यक्ष, 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ट्रेड'चे माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टचे माजी मानद सचिव, 'लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चार्टड'चे सदस्य, तर क्रांतिचौकातील 'वेलवर्थ'चे ते संचालक होते. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे महासचिव राजन हौजवाला व 'वेलवर्थ क्रिएटिव्ह मीडिया'चे संचालक अरविंद हौजवाला यांचे ते चुलते होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीइओंच्या तक्रारीवरून नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

$
0
0

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा पालिचा यांनी नगरसेवक शेख हनिफ यांच्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनिफ यांनी सोमवारच्या मासिक बैठकीत छावणी परिषदेच्या शाळेत झेंडावंदन करण्यावरून अरेरावी करून कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. छावणी परिषदेची सोमवारी दुपारी तीन वाजता बैठक संपल्यानंतर नगरसेवक शेख हनिफ उर्फ बब्बू शेख इब्राहीम या वॉर्ड क्रमांक पाचच्या नगरसेवकाने एक पत्र दिले. यामध्ये प्रजासत्ताक दिनी छावणीच्या इंग्रजी शाळेचे झेंडावंदन आपण करणार असल्याचे त्यांनी लेखी कळवले होते. त्यावर सीईओ पालीचा यांनी त्यांना चुकीचा आग्रह करू नका, पारंपारिक प्रथेप्रमाणे झेंडावंदन पदाधिकारी करणार असल्याचे समजावून सांगितले. यावेळी नगरसेवक हनिफ यांनी आम्ही लोकनियुक्त नगरसेवक आहोत, असे सांगून अरेरावीची भाषा वापरली. यावेळी बैठकीच्या ठिकाणी अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग विज, कर्नल पांडे, नगरसेवक गारोल, प्रशांत तारगे, रफद बेग, प्रतिभा काकस, कार्यालयीन कर्मचारी सुमित पगारे, कर्नल कुणाल पाटील, उमेश वाघमारे, निलेश तानापुरे, रिहाना बेगम, वैशाली केणेकर, संतोष बन्सिले, मोहमद बशीर मोहमद जमाल व सीताराम गायकवाड आदी हजर होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images