Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वृक्ष संवर्धनासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि विशेष अर्थसह्याद्वारे पेन्शन मिळवा योजना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार उस्मानाबाद जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायी व हितकारी शिवाय पर्यावरणाचे रक्षण करणारी अशी ही योजना पुढे आणि असून, या योजनेस संपूर्ण सहकार्य देत ही योजना २६ जानेवारीपासून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटीलसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केला आहे. राज्यात प्रथमतःच अशा पद्दधतीची योजना राबविण्यात येत आहे.
वृक्षांची लागवड करून तीन वर्षे चांगल्या पद्धतीने वृक्ष जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात अर्थसहाय्य करणारी ही योजना आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचे रक्षण करत प्रर्दूषणाचा धोका टळण्यास मदत होईल. शिवाय कालांतराने जिल्ह्यातील पर्जन्यमान वाढण्यास ही मदत होणार आहे.
नापिकी व सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेत जमिनी ओसाड पडू लागल्या. परिणामी शेतकरी व जमीन यांचे नाते तुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातूनच आत्महत्यासारख्या दुर्दैवी घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमिनीबरोबरची नाळ आबाधित राहावी शिवाय शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण निर्माण व्हावे, त्यांना अर्थसहाय्य रूपात मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेली वृक्ष लावा... वृक्ष जगवा... पेन्शन मिळवा ही योजना पुढे आली. ही योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी रोहयो व वनीकरण विभाग यांची मदत घेतली जाणार आहे.
या नुसार, शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर वृक्ष लागवड करून या वृक्षांचे तीन वर्षांपर्यंत स्वखर्चाने संगोपन करावयाचे आहे. तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात अर्थसहाय म्हणून देण्यात येईल. अर्थसहाय्याची ही मुदत लागवडीपासून ३० वर्षांपर्यंत असेल. वृक्ष लागवड करताना महावृक्ष होणारी शिवाय उत्पन्न देणारी फलोत्पादनाची (चिंच, आंबा आदी) झाडे लावण्यावरच भर देण्यात येणार आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शेतकऱ्यांना फलोत्पादनाचा आधार मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपंग, निराधार अनुदानाविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केवळ शासकीय अनुदान हाच एक आधार असलेल्या जिल्ह्यातील निराधार, अपंग, वृद्ध गेल्या दोन महिन्यांपासून हक्काच्या अनुदानापासून वंचित आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने विविध योजनांचे अनुदान जिल्हा कार्यालयांना पाठवले असतानाही ते लाभार्थींपर्यंत पोचलेले नाही,
संजय गाधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो, मात्र बहुतांश लाभार्थ्यांना ऑक्टोबरनंतर पैसेच मिळाले नसल्याची सरकारी आकडेवारी सांगते.
औरंगाबाद जिल्ह्यात श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वाधिक ४४ हजार १०९ लाभार्थी असून, सर्वात कमी ३८ लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी आहेत. विभागीय आयुक्तालयातील नोंदीनुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना या योजनांसाठी अनुदान देण्यात आले आहे, मात्र जिल्ह्यांकडून या अनुदानाचे वाटपच करण्यात आले नाही.

विविध अनुदान योजनेसंदर्भात वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळावे यासाठी प्रत्येक महिन्याची एकच तारीख ठरवण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अडचणी येणार नाही.
- पी. एल. सोरमारे, अपर जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडेपठारचा खंडोबा पालखी उत्सव उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सालाबादाप्रमाणे पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी सातारा गावापासून ८ किलोमीटर अंतरावरील कडेपठार येथील खंडोबा महाराजांचा पालखी उत्सव उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी कडेपाठार येथे खंडोबाचे दर्शन घेतले.
सातारा गावातील खंडोबा मंदिरापासून सकाळी ८ वाजता पालखी निघून वाजत गाजत कडेपाठार येथे पोहोचली. महारूद्राभिषेक, महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वाघ्या-मुरळीच्या ८ पथकांनी हजेरी लावली. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रस्ताही तयार करण्यात आला होता. यावेळी शिवेसना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नगरसेवक सिद्धांत शिरसाट, राजू काका नरवडे, राजेद्र राठोड, रमेश बाहुले आदींची उपस्थ‌िती होती. पालखी उत्सवासाठी मंदिराचे विश्वस्त गोविंद चोपडे, साहेबराव पळसकर, मोहन पवार, पुजारी विशाल धुमाळ, सोमीनाथ शिराणे आदींनी परिश्रम घेतले.
कडेपाठार येथील खंडोबाचे हे मंदिर पुरातन असून, येथे खंडोबाची मूर्ती आहे. हे मंदिर अंदाजे ६०० वर्षापूर्वीचे असल्याचे गावकरी सांगतात. त्यानंतर सातारा गावातील मंदिराची उभारणी झालेली आहे. या मंदिराची पडझड झाली असून, मागचा भाग पूर्णत: ढासळला आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या खोल्या व सभागृहही पूर्णपणे पडले आहे. तसेच दर्शनी भागाचीही पडझड आली आहे. या मंदिराची पुरातत्व खात्यात नोंद नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी फोडली साताऱ्यात तीन घरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
दर्शनविहार भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, कुटुंब गावी गेल्याची संधी साधून एकाच रात्री तीन ठिकाणी घर फोडल्याची घटना घडली. त्यातील दोन ठिकाणी त्यांनी हात साफ केला तर, एका ठिकाणी कडीकोयंडा तोडला. परंतु, दरवाजा न उघडता आल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.
मोहन शेळके (वय ३०, रा. स्वामी समर्थ अपार्टमेट, दर्शनविहार, देशमुख हॉस्पिटलजवळ) हे २३ जानेवारी रोजी फ्लॅटला कुलूप लाऊन कुटुंबासह उस्मानाबाद येथे गावी गेले होते. त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटल्याचे शेजाऱ्यांनी फोनवर सांगितले. त्यांनी घरी येऊन पाहिले असता १० हजार रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले चोरीस गेल्याचे निदर्शनास आले, तसेच रोहाउस नंबर २८ येथे राहणारे बळवंत देशपांडे हे पुणे येथे गेलेले असताना त्यांचे घर चोरट्यांनी घर फोडले. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. सुमित्रा पॅराडाईज या घरात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात घुमला स्वच्छतेचा गजर

$
0
0

म. टा. प्र्रतिनिधी, नांदेड
स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी महास्वच्छता अभियानातून स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी. सर्वांनीच सार्वजनिक तसेच वैयक्तीक स्वच्छतेच्या घटकाकडे सजगतेने पहावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील स्वच्छतेसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येच्या निमित्ताने महास्वच्छता अभियान राबवण्यास रविवारी सुरुवात झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी काकाणी बोलत होते. नांदेड शहरातील भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर याठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, स्थायी समिती सभापती अनुजा तेहरा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता कंठेवाड, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, मनपाच्या महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर, सहायक आयुक्त प्रकाश येवले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी व्ही. एल. कोळी, नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एल. रामोड, नगरपरिषद प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, किशोर स्वामी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यानिमित्ताने स्वच्छता जनजागरण फेरीही काढली.
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येच्या निमित्ताने जिल्ह्यात स्वच्छताविषयक जनजागृती व्हावी यासाठी ग्रामीण आणि नागरी भागात एकाच दिवशी, एका वेळी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका तसेच जिल्ह्यातील बारा नगरपालिका, चार नगरपंचायतीसह, तालुका पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय यांच्या सहभागाने हे महास्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरात सुमारे ५० हजाराहून अधिक जणांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.
नांदेड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहिमेस सुरवात केली. नांदेड शहरातील शौचालय उभारणीच्या कामांचा कार्यारंभ आदेशही महापौर स्वामी तसेच जिल्हाधिकारी काकाणी, आयुक्त खोडवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले, 'महास्वच्छता अभियानाचा
उद्देशच स्वच्छतेविषयी नागरिकांना सजग करणे हा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना एकत्रितपणे एकाच दिवशी, एकाच वेळी स्वच्छता मोहिम आणि जनजागरणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता ही सर्वांचीच बांधिलकी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ राहावीत. तेथे कचरा होऊ नये, टाकला जाऊ नयेत. स्वच्छता सामूहीक आणि वैयक्तीक जबाबदारी आहे, हा संदेश सर्वचस्तरात पोहचला पाहिजे. जिल्ह्यात शौचालय उभारणीची चळवळ सुरू झाली आहे. त्यामध्ये शौचालयांची उभारणी तसेच त्यांचा वापरही व्हावा हा संदेश देणे आवश्यक आहे. त्यासाठी महास्वच्छता अभियानाची, अशा उपक्रमांची आणि त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्याचीही गरज आहे.'

पुतळा परिसर ते रेल्वेस्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसराबरोबरच बसगाड्यांच्या फलाटांवरही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये महापौर स्वामी यांच्यासह, जिल्हाधिकारी काकाणी, आयुक्त खोडवेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसर झाडून स्वच्छ केला. हा कचराही महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेकडून लगोलग उचलण्यात आला.

बसस्थानक स्वच्छतेबाबत सूचना
जिल्हाधिकारी काकाणी यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील स्वच्छतेबाबत माहिती घेतली. याठिकाणीची स्वच्छतागृहे, शौचालय याठिकाणीही त्यांनी पाहणी केली. एसटीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्थानक स्वच्छतेबाबत सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंदराने दिवा पाडला; पती, पत्नी भाजले

$
0
0

वाळूज ः रांजणगाव शेणपुंजी येेथे एका घराला आग लागून पती, पत्नी गंभीर भाजले. उंदराने पेटता दिवा पाडल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. भाजलेल्या पती, पत्नीला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रांजणगाव शेणापुंजी येथील एकतानगरमध्ये महेश चौधरी (वय ३०) व त्यांची पत्नी अस्मिता (वय २६) यांच्यासह राहतात. मूळ भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चौधरी दाम्पत्याला सात व साडेवर्ष वय असलेली दोन मुले आहेत. ती शिक्षणासाठी नातेवाईकांकडे गावाकडे राहतात. महेश हे अंकिता अल्टिमा प्लास्टिक मोल्डिंग कंपनीमध्ये व अस्मिता मयुरी इंडस्ट्रिजमध्ये कामगार आहे. ते सहा महिन्यांपूर्वी येथे आले आहेत. झोपताना त्यांनी रॉकेलचा दिवा लावला होता. हा दिवा उंदराने २२ जानेवारी रोजी अकरा वाजता पाडल्याने अचानक आग लागली. त्यांचे शेजारी अरविंद उरकुडे यांनी दोघांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अस्मिता १०० टक्के व महेश ३५ टक्के भाजल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्तांच्या भरतीला बहुजन कास्ट्राइबचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारच्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयास बहुजन कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. या निर्णयावर आक्षेप घेऊन त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी. आर. थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की आपल्या सरकारने नोकर भरतीवर बंदी आणून सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा शासननिर्णय संमत केला आहे. त्याचा महासंघ विरोध करत आहे. कारण हा निर्णय आरक्षणाला बाधा आणणारा असून सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या जीवनाशी खेळणारा निर्णय आहे. या निर्णयामुळे आरक्षणाचा गळा घोटण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. राज्यात आज मागासवर्गीयांची सरळसेवा तसेच पदोन्नतीची लाखो पदे रिक्त आहेत. २९ जानेवारी २००४ पासून आरक्षण कायदा लागू झालेला आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जात, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी राज्य सरकारने नियम करून ते पारित केले आहेत. आठ जानेवारी रोजी काढलेला शासन निर्णय संपूर्णतः मागासवर्गीय व राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या विरोधात आहे. राज्यात लाखोंच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाच नाचूनी अति मी दमले

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना
नाच नाचूनी अति मी दमले...अशीच काहीशी अवस्था झालेल्या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आता आपापल्या पक्षाच्या कार्यालयात चकरा मारण्याऐवजी नेत्यांना घेरायला सुरूवात केली आहे. सगळे अधिकार द्या एका फटक्यात सगळ्या समित्या करून टाकतो, असे म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार शिवाजीराव चोथेंनी पालकमंत्री बबनराव लोणीकरांसमोर नुकतेच ठाण मांडले. तर आतापर्यंत प्रत्येक आमदार आणि पक्षाच्या तालुकाप्रमुखाला सहा वेळा समितीच्या नावांची शिफारस मागितली आहे. पण तुम्हीच कुणी नावे देत नाहीत, असे म्हणत पालकमंत्र्यांनी कमिट्यांच्या नियुक्तीचा चेंडू परतवून लावला.
केंद्रात दोन वर्षे होत आली आणि राज्यात एक वर्ष पूर्ण झाले. सत्ता आली सगळे काही स्थिरस्थावर झाले. तालुका आणि जिल्हास्तरिय विविध कमिट्यांच्या नियुक्तयांची वाट बघत अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात पिंगा घालून आता थकलेल्या अवस्थेत पोहचले आहेत. अनेकांना महामंडळाचे वेध लागलेले आहेत, पण नियुक्त्यांचा मुहूर्त काही निघत नाही. त्यामुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पक्षाच्या संघटनात्मक समित्या स्थापन करण्यात आल्यानंतर तालुक्याच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्यांचा राजकीय फड रंगला. घनसावंगी, अंबड आणि बदनापूरात या तिन्ही ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत गटाला फाळका मारून नवोदितांनी महत्त्वाचे तालुका अध्यक्षपद मिळवले. घनसावंगीमध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये आलेल्या देवनाथ जाधव यांना संधी मिळाली तर अंबडमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री राजेश टोपे यांचे एकेकाळचे विश्वासू अवधूत नाना खडके यांची लॉटरी लागली आहे. बदनापूरात देखिल असाच एक अनुभव कार्यकर्ते घेत आहेत शिवसंग्राम पक्षाचे नेते वसंतराव जगताप भाजपचे तालुकाध्यक्ष झाले आहेत.
सरकारी कमिट्यांच्या नियुक्त्यांवर पद पाहिजे की पक्षाचे पदाधिकारी व्हायचे आहे ? असा काही सवाल टाकून नेत्यांनी पक्ष संघटना निवडणुकांमध्ये वेळ मारून नेली. मात्र, या निवडणुका होऊन महिना लोटला तरी सरकारी कमिट्यांच्या नियुक्त्यांची काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे आता वातावरणात मोठी चलबिचल सुरू झाली आहे.
जालन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान सेनानेंत्यांनी दिलेल्या आश्वासनाची ते सध्याच्या घडीला केवळ वाट बघत बसलेले आहेत. तर याच निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्यावतीने घनसावंगीच्या टोपेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची आघाडी लढवणारे माजी आमदार विलासराव खरात आणि जालन्यात काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पराभवाचे खरे सुत्रधार झालेल्या माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या हातात वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते दिलीपराव तौर, विलासराव नाईक, देविदास देशमुख, बद्री पठाडे, शिवाजीराव थोटे, सुनिलबापू अर्दड जालन्याचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारलेले जेष्ठ उद्योजक किशोरसेठ अग्रवाल, जिल्हा उद्योग संघटनेचे अर्जुन गेही, ज्येष्ठ स्टील उद्योजक घनश्यामसेठ गोयल, परतूरचे भाऊसाहेब कदम, राजेश भन्साळी, ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे, अंबडचे दीपक ठाकुर, साहेबराव खरात, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या कमल तुल्ले, वंदना कुलकर्णी, अरुणा शिवराज जाधव हे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते विविध कमिट्यांच्या नियुक्तयांच्या यादीतील चर्चेतील चेहरे आहेत.
शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भाऊसाहेब पाउलबुद्धे, शहर प्रमुख बाला परदेशी, दिनेश फलके, विष्णू पाचफुले, मनोज पांगारकर, महेश दुसाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि औत्सुक्याने कमिट्यांवरील नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

थरमाकॉलचा लाडू
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे बहुतांश पत्रकार परिषदेत कमिट्या आणि महामंडळाच्या नियुक्त्या कधी होणार या प्रश्नावर अतिशय सकारात्मक उत्तर देतात. लवकरच निर्णय होईल आणि मग नावे जाहीर करण्यात येतील असे त्यांचे साचेबद्ध वक्तव्य असते. मात्र, कार्यकर्ते आता या नियुक्त्या म्हणजे थरमाकॉलचा वजनाने एकदम हलकाफुलका मात्र, आकाराने अगडबंब लाडू आहे असे बोलतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संस्कार होतात तेथे देशाचे भविष्य घडते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सैनिकी शाळेतून देशाचे संरक्षण करण्याचा संस्कार मिळतो. ज्या ठिकाणी संस्कार होतात तेथे देशाचे भवितव्य घडत असते,' असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांनी केले.
येथील शिवाजी डिफेन्स सैनिकी करियर अॅकॅडमीचे स्नेहसंमेलन त्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक त्र्यंबक राहणे, निवृत्त कर्नल आर. एस. ठाकूर, अध्यक्ष सोमीनाथ राहणे यांची उपस्थिती होती. 'भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करतात. त्यांच्या या धाडसाला नमन करून सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे. विद्यार्थी दशेत अभ्यासासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे,' असे मत अशोक शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव सचिन राहणे, गंगापूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शेषराव लहाने, संचालक उत्तम कांबळे, डॉ. ए. बी. वाकळे, प्राचार्य रामेश्वर राहाणे, निवृत्त मेजर एस. आर. काळोखे, निवृत्त सूभेदार मेजर शेजवळ, निवृत्त मेजर बी. बी. दळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. बाळासाहेब वाल्हेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा अनुदानाची रक्कम वितरीत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची व रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वितरित करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासमवेत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले, 'रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ६३ कोटी रुपये एवढी रक्कमही प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक रक्कम जालना जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. तसेच गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने १२३ कोटी रुपयांच्या पहिला हप्त्यांची रक्कमही जिल्हा प्रशासनास दिली आहे. या दोन्ही रक्कमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात वाळू उत्खनन व अवैधरित्या वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. या संदर्भात पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम असमाधानकारक असल्याबाबत नाराजी व्यक्त करत या अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीवर आळा घालण्याची प्रामुख्याने जबाबदारी ही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन या कार्यालयाची आहे. कलम ३७९ प्रमाणे या दोन्ही विभागांनी अत्यंत नगण्य कारवाया केल्याचे नमूद करून या पुढे जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व अवैध वाळू वाहतुकीवर संबंधित विभागांनी आळा घालण्याची गरज असून या कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुक व उत्खनन या संदर्भात पुढाकार घेऊन गेल्या वर्षात संपूर्ण जिल्ह्यातून एक कोटी ३८ लाख ३८ हजार एवढी दंडाची रक्कम वसूल केली आहे. तसेच गतवर्षात गारपीट, पीकविमा, दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थितीमध्ये मागेल त्याला काम मिळण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना प्रत्येकी २५ लाख रुपयापर्यंतचे काम मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. मजुरांनी कामांची मागणी केल्यास १५ दिवसांच्या आत त्यांना काम उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे सांगून जिल्ह्यातील एकही मजूर कामाची मागणी करुनही कामापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यांत्रिकी विभागाकडे असलेल्या विविध मशिनीद्वारे विविध कामे करण्यात येतात. या मशिनीद्वारे प्रत्येक तालुक्यात समानरित्या काम व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी यांची समिती तयार करण्यात आली आहे. समानतेने काम करून घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची असून या मशिन्स अखंडितपणे चालु रहाव्यात यासाठी दोन ऑपरेटरची नियुक्ती करण्याच्या सुचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, परतूरचे लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे, इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विविध कामांचा आढावा
टंचाई निवारण, कृषी विभागाच्या योजना, सिंचन विहिरी, विहिर पुनर्भरण, फळबाग लागवड, समतल चर, गांडूळशेती, नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सिमेंट बंधारे, कंपार्टमेंट बंडींग, शोषखड्डे, स्वच्छता अभियान आदी विषयावरही उपस्थित अधिकाऱ्यांकडून विस्तृतपणे माहिती घेऊन यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी योग्य त्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा ठेवावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ व अन्य तत्सम विद्यापीठांचा अल्पसंख्याक दर्जा अबाधित ठेवावा, अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष खालेद पठाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, राजेंद्र दाते पाटील, डॉ. जितेंद्र देहाडे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, लियाकत पठाण, आमेर अब्दुल सलीम, क्षितीज रोडे, गौतम गंगावणे आदी उपस्थित होते.
१८८२ मध्ये सर सय्यद अहमद यांनी अन्य समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती होऊन त्यांना न्याय मिळावा या भूमिकेतून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली होती. या विद्यापीठाचा गौरवपूर्ण इतिहास पाहता इंपिरियल गर्व्हंनमेंट ने १९२० मध्या विशिष्ट दर्जा अंतर्गत मायनॉरिटी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. या संस्थेत ज्ञानदानाचे भरीव काम झाले आहे. भारतीय राज्य घटना ३९ मध्ये सुद्धा अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था काढून चालविणे व त्यात शिक्षण घेण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत. असे असताना सध्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि अन्य अल्पसंख्याक विद्यापीठांचा दर्जा काढून घेणार असल्याचे वक्तव्य केले. यामुळे अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावणार आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून विविध शैक्षणिक संस्थांचे स्वायत्त अधिकार व दर्जा अबाधीत ठेवावा, अशी विनंती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त दहा दिवसांत १९३ टँकरची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळा येईपर्यंत जगायचे कसे, असा प्रश्न मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला पडला आहे. जानेवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. सध्या विभागातील ८१८ गावे आणि ३२५ वाड्यांची तहान १११८ टँकरद्वारे भागवण्यात असून दिवसेंदिवसत टँकरची मागणी वाढत आहे. मराठवाड्यात गेल्या दहा दिवसांत १९३ टँकर वाढवावे लागले आहेत.
मराठवाड्यात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या विभागामध्ये यावर्षी परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. सध्या औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक बोअर, विहिरींना पाणी आले होते. आता जलसाठ्यांची पातळी घसरत असून, काही तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे.

जलसाठ्याची ९ टक्क्यांवर घसरण
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवत लागल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. येत्या चार महिन्यांत मराठवाड्याला पुन्हा पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. सध्या विभागातील ८४३ प्रकल्पांमध्ये फक्त ९ टक्के (७०७.१२ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण, काळीपिवळीचा तहसीलला विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तहसील कार्यालयाच्या परिसरात १०० मीटर झोन बंदी असतांना काळीपिवळी बिनदिक्कत थांबत आहेत. शिवाय विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने, टपाऱ्या थाटण्यात आल्या आहे. सध्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा कार्यालयास वेढा पडला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय असून त्याला लागून बस स्थानक आहे. त्यामुळे शहरात जाण्यासाठी व बस वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने व बस धावतात. या रस्त्यावरच तहसील कार्यालयासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व काळीपिवळी थांबत आहेत. विविध वस्तू विक्रेते, हातगाडीधारक तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. ही वाहने व अतिक्रमणामुळे तहसील कार्यालयासमोर दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. तहसील कार्यालयावर येणारे मोर्चे, आंदोलन, धरणे याकरिता कार्यकर्तायंना मांडव मारण्यासाठीही जागा मिळत नसल्याची अवस्था आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. मोटारसायकल व चारचाकी वाहनांना वाट काढून कार्यालयात प्रवेश करावा लागतो. अवैध प्रवासी वाहने, अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

तहसील कार्यालयाचा परिसरात वाहतूक नियमानुसार पोलिसांनी कारवाई करावी. वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहने, दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे तहसील कार्यालयात मोटार आणताना त्रास होतो.
- संतोष गोरड, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगाम मदतीचे धनादेश बँकेत जमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
खरीप हंगाम २०१५ मधील सुमारे दोन हजार बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० लाख ६६,२६० रुपयांचे धनादेश जमा करण्यात आले आहेत. हे धनादेश सोमवारी (२५ जानेवारी) वटल्यानंतर रक्कम खात्यात जमा होणार आहे.
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फळबाग व कापूस वगळून जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ६ हजार ८०० रुपये खरीप अनुदान मिळणार आहे. अद्यावत याद्या प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्याचे धनादेश संबधित दिलेल्या बँक खात्यात जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संबंधितांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयात जमा करव्यात, असे आवाहन तहसीलदार महेश सुधळकर यांनी केले आहे.
कन्नड तालुक्यातील कापूस फळबाग पिक वगळता १ हजार १८४.६५ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. या क्षेत्रावरील २ हजार १३ शेतकरी अनुदानास पात्र आहेत. कन्नड, मक्रणपूर, मालपूर, मोहर्डा, घाटशेंद्रा, दूधमाळ, माळेगाव धनगर या गावांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एसबीआय, एसबीएच, बँक ऑफ बडोदा आदी बँकांमध्ये अनुदान जमा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्यांची रिक्तपदे भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तलाठ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अतिरिक्त कामाचा बोजा पडतो. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तलाठ्यांची रिक्तपदे त्वरित भरणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी तलाठी संघाच्या अधिवेशनात सांगितले. ऑनलाइन सातबारा, ई-फेरफार, शेतकऱ्यांना अनुदान वाटप या कामांमध्ये तलाठ्यांनी गतिमान कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्हा तलाठी संघटनेचे १४ वे एकदिवसीय अधिवेशन येथे नुकतेच पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस सतीश तुपे होते. महसूल उपायुक्त किसनराव लवांडे, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, उपायुक्त जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी जिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, केशव नेटके, मंजुषा मुथा, तहसीलदार बालाजी शेवाळे, जिल्हा अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तलाठी संघटनेच्या १२ मागण्या मान्य करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले. औरंगाबाद येथे एक कोटी रुपये खर्च करून अद्ययावत तलाठी भवन बांधण्याचा ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आला. सतीश तुपे यांनी तलाठी संघटनेच्या मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने गौण खनिज अवैध वाहतुकीवर कारवाई करतांना पोलिस संरक्षण द्यावे, तलाठ्यांकडे एकाचवेळी अनेक कामे करून घेऊ नयेत, वेळेवर पगार करावा, महिलांच्या रजा मंजूर कराव्यात, रजेचे वेतन लवकर द्यावे, निवडणूक कामातील खर्च मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोटे दस्त बनवले; तलाठ्यावर गुन्हा

$
0
0

औरंगाबाद ः गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील जमिनीचे खोटे दस्त बनवल्याच्या प्रकरणी तलाठी व्ही. आर. गिरबोने व कल्पेश रवींद्र समदरिया यांच्याविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने सिल्लेगाव पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरपूर शिवारातील पुंडलिक त्रिंबक आमराव यांची गट नंबर ६३ मध्ये १४ एकर १४ गुंठे जमीन आहे. कुळ कायद्याने त्यांच्याकडे जमिनीचा कायदेशीर ताबा असताना व उपविभागीय अधिकारी यांचा मनाई हुकूम असताना मागील तारखेचा बनावट पीकपेरा टाकून जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केल्याचा तलाठी गिरबोने याच्यावर आरोप आहे. यासाठी कल्पेश समदरिया यांच्याकडून लाच घेऊन गैरव्यवहार केल्याचे तक्रारदाराने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला दाखल केला होता. याप्रकरणी कोर्टाने कागदपत्रांची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी वादीतर्फे अॅड. एस. के. आंबेकर यांनी बाजू मांडली. गुन्हा दाखल करून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आश्रुबा घाटे हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यापार समजून शेती करावी’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
गेल्या १५ वर्षांत ४ वर्षेच समाधानकारक पाऊस पडला आहे. तब्बल ११ वर्षे दुष्काळी परिस्थितीचा दुर्दैवी फेरा सुरू आहे. या परिस्थितीत शेतीचे शास्त्र समजून घेऊन शेती केली तरच कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येईल. व्यापारी पद्धतीने शेती करतांना काटेकोरपणे उत्पादन खर्च कमी करावा लागेल. शेतकऱ्यांनी व्यापार समजून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले.
तालुक्यातील सुलतानपूर येथे आयोजित चर्चासत्रात शेतकरी कंपन्यांच्या संचालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब यांची उपस्थिती होती. आमदार बंब यांनी पुढाकार घेऊन शेतकरी कंपन्या स्थापन केल्या आहेत. 'शेतकऱ्याने सूक्ष्म नियोजन करून शेती केल्यास यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही,' असे पडवळ म्हणाले.
प्रवर्तकांनी दर महिन्याला नियमित बैठक घ्यावी. कंपनीने केलेल्या पत्रव्यवहाराचा आढावा घ्यावा. एका वनाचे पिक घ्यावे. कंपन्यांचे रेकॉर्ड तयार करावे, अशी सूचना आमदार बंब यांनी केल्या. या चर्चासत्रात उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे, स्वरूप शेतकरी कंपनीचे दीपक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक मिलिंद कोलंबीकर यांनी केले. यावेळी सी. ए. रवींद्र लड्डा, मंडळ कृषी अधिकारी अशोक अहिरे, आत्माचे तालुका समन्वयक प्रदीप पाठक, पल्लवी गायकवाड, पंचायत समिती उपसभापती दिनेश अंभोरे, कल्याण नलावडे, प्रकाश वाकळे, आशिष कुलकर्णी, ज्ञानेश्वर बारगळ, रज्जाक पठाण, कृष्णकांत पांडव, सचिन क्षीरसागर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उच्चशिक्षित होऊन प्रेरणा निर्माण करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
'बहुजन समाजातील युवकांनी उच्चशिक्षित होवून प्रशासनात महत्त्वाची पदे मिळवून समाजबांधवांसाठी प्रेरणा निर्माण करावी,' असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
खेडेकर यांच्या 'रेखांकन' या आत्मचरित्रपर पुस्तकावर परिसंवाद व 'आयुष्य कसे जगावे' यावर विषयावर प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम खेडेकर व रेखा खेडेकर यांची मुलाखात प्रा. शिवानंद भानुसे यांनी घेतली. या मुलाखतीत युवकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून शिखर प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. संघर्ष सुरू असतांना महापुरूषांची प्रेरणा घेऊन स्वयं प्रकाशित व्हावे, पत्नीचा आदर व सन्मान करावा, काळानुसार मुलांचे मत एेकून घ्यावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मत खेडेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सचिन घायाळ, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक सोमेश्वर आहेर, जिल्हाध्यक्ष राहुल बनसोड, दत्तात्रय चन्ने, हरिभाऊ शेळके, दादासाहेब पठाडे, गणेश पवार, एकनाथ देशमुख, अंकुश काळे, महेश पवार, पवन खरात, प्रभाकर बोचरे, प्रल्हाद बहिर, शंकरभाऊ सपकाळ, शहादेव लोहारे, भाऊसाहेब पिसे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा मुक्काम आठवडाभर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आठवड्याभरापासून सुरू असलेल्या थंडीची तीवृता रविवारी काहीशी कमी होती. दोन दिवसांपूर्वी ९ अंश सेल्सिअसवर असलेल्या किमान तापमानात रविवारी किंचित वाढ होऊन पारा १२.४ अंशापर्यंत पोचल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, पोर्णिमेमुळे येणारे दोन दिवस तापमान स्थिर राहणार असले तरी, येणाऱ्या आठवड्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा थंडीची उशिराने चाहूल लागली आहे. दिवसा ऊन आणि सायंकाळनंतर थंडीची सुरुवात होते. रविवारी शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सियस होते. यंदा कमी झालेल्या पावसामुळे थंडीबाबत साशंकता होती. शनिवार व रविवारी काहीसे ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा कडाका काहीसा कमी होता. दिवाळीनंतर हळुहळु थंडीची चाहूल लागली आहे. काही दिवसांपूर्वी वाढलेल्या तापमानात २० जानेवारीपासून घट होण्यास सुरुवात आहे. वातावरणातील या बदलामुळे रात्री व पहाटे नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी कानटोपी, स्वेटर, मफलर बाहेर काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण येणाऱ्या आठवड्यातही कायम राहणार आहे. पोर्णिमेमुळे शनिवारपासून तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी येणारा आठवडा व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहणार आहे. यंदा थंडीचा हा कडाका मार्चपर्यंत लांबू शकतो.
- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेला तोटा झाल्यास तुरुंगात पाठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील लोहमार्ग अनेक वर्षांपासून रडखडलेले आहेत. अनेक वेळा प्रस्तावित लोहमार्ग तोट्यात असल्याचे कारण दाखवून या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या मागण्यासाठी जोर लावा. तोट्याचे कारण ऐकू नका. प्रस्तावित रेल्वे मार्ग तोट्यात राहिल्यास मला तुरूंगात टाकून तोटा भरून घ्या, असे शपथपत्र मराठवाडा रेल्वे विकास समितीने मुख्यमंत्र्यांना सादर केले.
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी शंभर रुपयाचा बाँडवर शपथपत्र सादर केले आहे. औरंगाबाद मार्गावरील रेल्वे वाढविण्याची मागणी केली आहे. रोटेगाव-कोपरगाव ३५ ‌किलोमीटर लोहमार्ग करावा, दौलताबाद, कन्नड, चाळीसगाव रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत, जालना-खामगाव १६५ किलोमीटर लोहमार्ग तयार करा, नांदेड ‌ते बिदर मार्ग तयार करा, मुदखेड ते परभणी मार्ग दुहेरी करा, पूर्णा येथे रेल्वे कोच निर्मिती प्रकल्प उभारावा,, नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडावा आदी मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. यामुळे शंभर रुपयाच्या बाँडवर मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी मागण्या ठेवल्या आहेत.
या शपथपत्रात ओमप्रकाश वर्मा यांनी, लोहमार्गाचे सर्वेक्षण करतानाच मार्ग तोट्यात असल्याचा अहवाल सादर करतात असतात. हा अहवाल बिनबुडाचा असतो. मागणीपत्रात देण्यात आलेल्या लोहमार्ग तयार झाल्यास रेल्वे तोट्यात राहणार नाहीत. हा लोहमार्ग तोट्यात राहिल्यास रेल्वेेचा ताेटा भ्ारून काढण्यासाठी शासनाने शिक्षा म्हण्ाून तुरुंगात पाठवावे. तुरुंगात ‌‌‌शिक्ष्ाा भ्ााेगून रेल्वेेचे नुकसान भ्ारण्यासाठी तयार अाहे, असे म्हटले आहे. मराठवाड्यातील रेल्वेविषय प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे विभागाने यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष द्यावे, या मागणासाठी ओमप्रकाश वर्मा यांनी यापूर्वी स्वतःच्या रक्ताने रेल्वे मंत्र्यांना मागण्यांचे पत्र लिहिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images