Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवजयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान आणि मिरवणूक असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आहेत,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी दिली. यानिमित्त शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. वैजापूर येथील जिल्हा परिषद मैदानावर १४ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता खो-खो स्पर्धा होईल. तर १५ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता औरंगपुरा येथे शिवजयंती कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. कुंभेफळला १६ फेब्रुवारीला महारूद्र हायस्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा घेण्यात येईल.
वेरुळ येथे मालोजीराजे भोसले गढीची १७ फेब्रुवारीला स्वच्छता केली जाणार आहे. यावेळी मनोज पाटील व मिलिंद पाटील उपस्थित राहतील. पळशी येथील धारेश्वर हायस्कूलमध्ये १८ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. शुक्रवार, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता क्रांतिचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ध्वजारोहन करण्यात येणार आहे. सायंकाळी संस्थान गणपती राजाबाजार येथून मिरवणूक काढण्यात येईल. चिकटगाव (ता. वैजापूर) येथे प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. या पत्रकार परिषदेला पृथ्वीराज पवार, अभिजित देशमुख, अजय पाटील चिकटगावकर, विश्वास औताडे, अनिल मानकापे, डॉ. पवन डोंगरे, मनोज पाटील, पंजाबराव तौर, विशाल दाभाडे उपस्थित होते.
वादाचे भांडवल करू नये
'शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार हा वाद मिटवण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांनी वादाचे भांडवल करू नये. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सहा इतिहास संशोधकांची समिती नेमून तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. शिवजयंतीला शासकीय सुटीसुद्धा असते. त्यामुळे वाद निर्माण न करता एकाच दिवशी शिवजयंती साजरी करावी,' असे आवाहन पृथ्वीराज पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळाचा सामना आपत्तीव्यवस्थापनानुसार करावा

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. बिंदुसरा, मांजरा, तेरणा या नद्या आटल्या आहेत. भूगर्भातील पाण्याच्या पातळी तीन ते पाच मीटर इतकी खोल गेली आहे. हे सरकारी आकडे आहेत. त्यामुळे दुष्काळामुळे स्थलांतर होत आहे. त्याचा वेग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे राज्य सरकारने आता दुष्काळ ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती समजून त्याचे निवारण हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे किंवा त्या पद्धतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मराठवाड्याच्या पाणी टंचाईला कोण किती जबाबदार? कोणी काय केले? या स्वरुपाची राजकीय चर्चा आज करण्यात फार काही अर्थ नाही. जनतेला दोन घोट पाणी आणि जनावारांना चारा कसा देता येईल याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
लातूर जिल्ह्याची पाण्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करीत आहे. ते काम करीतच नाहीत असे नाही, परंतु त्याचे नियोजन आणि निर्णय वेळेवर न झाल्यामुळे या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. आता त्याला तोंड देण्यासाठी तरी त्वरेने पावले उचलली पाहिजेत. तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यातल्यात्यात वसतीगृहावर राहणाऱ्या, खोल्या करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या तर स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला पाणीपुरवठा करणे ही समाजकल्याण विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी शासकीय दराने या वसतीगृहाला पाणीपुरवठा करावा ज्याची कोणाची परवानगी घ्यायची, ज्या कोणाकडून निधी मंजूर करून घ्यायचा आहे, तो घेतला पाहिजे. परंतु, हे काहीच अजून सुरू झालेले नाही.
लातूरच्या पाण्यासाठी तर आता दिल्लीत घालमेल सुरू झाली आहे. महापौर अख्तर शेख यांनी शिवराज पाटील-चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील यांच्या सोबतीने काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी यांची ही भेट घेतली. नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडु, सचिव मधुसुदन यांच्याही भेटी घेतल्या आहेत.
वास्तविक पाहता जुलै महिन्यात जेव्हा कृत्रीम पावसाचा प्रयोग अशस्वी झाला त्याच वेळी खरे म्हणजे या परिसरात आत विमानाची नाही तर टँकरची गरज भासणार आहे हे मुरब्बी राजकारण्यानी आणि कसलेल्या महसूल अधिकाऱ्यांने ओळखून कामाला लागणे आवश्यक होते. ते सुद्धा बहुधा अवकाळी पाऊस तारुण नेईल या (अंध) विश्वासावर बसले असावेत. आता काय करायचे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सरकारने आणि किमान या तीन जिल्ह्यात तरी किमान प्रत्येक जिल्ह्याला दुष्काळ निवारण कामासाठी स्वंतत्र अधिकारी प्रत्येक तालुका पातळीपर्यंत नियुक्त करावेत. सध्या कोठेही भुसंपादनाचे काम सुरू असावे असे वाटत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी भूसंपादन यांच्याकडे हे काम द्यावे, मदत आणि पूनर्वसन खात्याने ही यात सक्रिय झाले पाहिजे. त्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि पोलिस सुद्धा यांची एक समन्वय समिती असली पाहिजे. पोलिसांचे काम सुद्धा पुढील काळात वाढणार आहे. त्याच सोबत दुषीत पाण्यामुळे होणारे आजार अटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभाग ही सक्षम असावा. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे सूत्र कामी येईल.
एका बाजुला आपत्तीचा सामना आणि दुसऱ्या बाजुला आपत्तीचे संधीत रुपांतर करण्याच काम लोकसहभागातून होऊ शकते त्यासाठी चार महिने थोडे राजकीय हेवेदावे बाजुला ठेऊन जर सर्वांनी काम केले, तर पुन्हा ही आपत्ती येणार नाही याचे नियोजन ही करता येऊ शकते.

विशेष कार्य अधिकारी नेमावेत
१९७२ च्या दुष्काळात खायला अन्न नव्हते. यावेळी पाप्यला पाणी नाही हा फरक प्रत्येकांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे जलसंधारणाची नागरी आणि ग्रामीण भागात कामे यशस्वीपणे पार पाडता येऊ शकतात. या साठी पालकमंत्र्यांनीही त्यांच्या कार्यालयात स्वतंत्र विशेष कार्य अधिकारी याच कामासाठी नियुक्त करणे गरजेचे आहे.

महापूर, भूकंप ,चक्रीवादळा या बाबीचा सामना करताना प्रथम सुटका, मदत, पुनर्वसन असे काम केले जाते. हे करताना सर्वबाबी बाजूला ठेऊन एकच काम हाती घेतले जाते. त्यामुळे ते वेळेत यशस्वी होते. मुंबईत बसून पशुची चिंता करता येणार नाही. त्यासाठी गावातला तलाठीच सांगू शकतो तसे करावे लागेल. त्यामुळेच पशुधन जगणार आहे. पाण्यासोबतच चाऱ्याची समस्या ही मोठी आहे. स्थालांतर रोखण्याच आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
अतुल देउळगावकर, पर्यावरण तज्ज्ञ, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी जनजागरण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रत्येकाला घरकुल द्या, जात प्रमाणपत्रासाठी १९६७चा रहिवासी पुरावा रद्द करा अशा मागण्या करत भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी भटक्या विमुक्त बहुजन संघातर्फे शनिवारी जनजागरण यात्रा काढण्यात आली. आसाराम गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
क्रांतिचौकातून ही यात्रा पैठणगेट, निराला बाजारमार्गे सिमंत मंगलकार्यालयात पोहचली. यावेळी भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रत्येकाला आधार, मतदान, रोशन कार्ड देण्यात यावे, वसंतराव नाईक महामंडळाचे बजेट वाढवावे, भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्र्यांची नेमणूक करावी, भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांचे वर्ग चालवावेत, स्थायी स्वरुपाचे आयोग स्थापन करावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सिमंत कार्यालयात समाजातील विद्यार्थी, कलाकार, खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. शिरीषकुमार जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रेमनाथ शिंदे, शेख सजा उल्ला अकबर, लक्ष्मण घनसरवाड, संतोष यादव, भानुदास जाधव, भास्कर शिंदे, अॅड. विश्वनाथ शिंदे, सतीश गोरे, शिवनारायण जाधव, शिवाजी गायकवाड, अमोल जाधव, विकी जाधव यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय नृत्याचा देखणा महोत्सव

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरतनाट्यम, मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने संस्कृती नृत्य महोत्सव लक्षवेधी ठरला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी हा महोत्सव रंगला. नवोदित स्पर्धकांचे नृत्य सादरीकरणही रसिकांना विशेष भावले.
'देवमुद्रा' नृत्य संस्थेच्या संस्कृती महोत्सवात मान्यवर कलाकारांनी नृत्य सादर केले. ओजस्विता चतुर्वेदी यांचे भरतनाट्यम, अनुश्री नायर (कोचीन) यांचे मोहिनीअट्टम, डॉ. शशिकला रवी (पुणे) यांचे भरतनाट्यम आणि डॉ. रंजनी गणेशन रमेश व दक्षा स्वामीनाथन रमेश (मुंबई) यांचे भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्य या महोत्सवाचे वेगळेपण ठरले. शास्त्रीय नृत्याचे बारकावे व अप्रतिम भावमुद्रा यांचा मिलाफ असलेले नृत्य रसिकांना भावले. दरम्यान, महोत्सवानिमित्त दुपारच्या सत्रात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. तब्बल ८० स्पर्धकांनी नृत्य सादर केले. या स्पर्धेचे परीक्षण नृत्य अभ्यासक राज्यलक्ष्मी सेठ, डॉ. जयंत शेवतेकर व अजय शेंडगे यांनी केले. तसेच सकाळच्या सत्रात राज्यलक्ष्मी सेठ यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या महोत्सवाचे संयोजन 'देवमुद्रा'च्या संचालिका व्ही. सौम्याश्री यांनी केले आहे. महोत्सवाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज समारोप
संस्कृती नृत्य महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. यावेळी लोकेश्वरी दासगुप्ता यांचे कथक, डॉ. स्मृती वाघेला यांचे भरतनाट्यम, व्ही. सौम्याश्री व 'देवमुद्रा'च्या विद्यार्थिनींचे कुचिपुडी आणि अजय शेंडगे यांचे कथक नृत्य सादरीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’च्या नगरसेवकांची आयुक्तांकडून कानउघाडणी

$
0
0

'एमआयएम'च्या नगरसेवकांची
आयुक्तांकडून कानउघाडणी



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला त्रास देऊ नका. तुम्ही त्रास देणार असाल, तर मला माझ्या पद्धतीने काम करावे लागेल,' अशा शब्दांत महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 'एमआयएम'च्या नगरसेवकांची कानउघाडणी केली.
'एमआयएम'च्या काही नगरसेवकांनी मंगळवारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले व कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनाचे पडसाद 'एमआयएम'मध्येही उमटले. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते जहाँगीर खान यांना विश्वासात न घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी या नगरसेवक व गटनेत्याची खरडपट्टी काढली होती. पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी 'एमआयएम'च्या नगरसेवकांना सिडको कार्यालयात चर्चेसाठी बोलावले. या वेळी जहाँगीर खान यांच्यासह गटनेते नासेर सिद्दिकी व अन्य नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाबद्दल केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली. 'कंपनीला त्यांचे काम करू द्या, त्रास देऊ नका. आंदोलनामुळे कामात विस्कळितपणा येतो. सामंजस्याने प्रश्न सुटतात. तुमच्या काही तक्रारी असतील, त्या तुम्हा आमच्याकडे मांडा. कंपनीपर्यंत जाऊ नका. तुमच्या तक्रारी आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू,' असे केंद्रेकर यांनी या वेळी सांगितले. 'तुम्ही जर आंदोलनच करणार असाल, तर मलाही माझ्या पद्धतीने काम करावे लागेल. तुमच्यातील भांडणामुळे कंपनीचा फायदा होत आहे, हे लक्षात घ्या,' असे केंद्रेकर या नगरसेवकांना सांगितले.
बैठकीनंतर बोलताना विरोधी पक्षनेते जहाँगीर खान म्हणाले, 'पाणीपुरवठ्याबद्दल काही तक्रारी असतील, तर आता आम्ही त्या आयुक्तांकडे मांडणार आहोत. कंपनीचा आणि आमचा तसा काही संबंध नाही. आमच्या तक्रारींचे निराकरण आयुक्तांनी कंपनीच्या माध्यमातून करून द्यावे, असे आजच्या बैठकीत ठरले. समन्वयाने काम करण्याचा निर्णय देखील झाला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एससी प्रवर्गात समावेश हवा!

$
0
0

Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक शहरात परीट (धोबी) समाजाचे अस्तित्व दिसून येते. अगदी गावा-गावांतील प्रत्येक भागात हा समाज राहतो. औरंगाबाद शहरात परीट समाजाची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे. कपड्यांना इस्त्री करणे हा या समाजाचा प्रमुख व्यवसाय. काळाच्या बदलानुसार हा समाजही बदलत असला तरी व्यवसायात आधुनिक साधनांचा वाढता वापर हे परीट समाजासमोर एक आव्हान बनलेले आहे.
१९६० पूर्वी परीट (धोबी) समाजाची नोंद एससी प्रवर्गात होती. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात १९८०पर्यंत अनुसूचित जाती-जमातीत परीट समाजाचा समावेश होता. देशातील १४ राज्यांत तसेच तीन केंद्रशासीत प्रदेशात हा समाज एससी प्रवर्गात मोडला जातो. महाराष्ट्रात मात्र, ओबीसी प्रवर्गात परीट समाजाचा समावेश आहे. १९९८पासून परीट समाजातील संघटना एस्सी प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. मात्र, देशभरात विखुरलेल्या या समाजाच्या आवाजाची नोंद अद्यापही घेण्यात आलेली नाही. राजाश्रयाअभावी हा समाज प्रगतीच्या दिशेपासून वंचित राहिलेला दिसून येतो. विविध शासकीय योजनांचा लाभ या समाजाला होताना दिसत नाही. त्यामुळेच परीट समाजाचा समावेश ओबीसीऐवजी एससी प्रवर्गात करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
पारंपरिक इस्त्री करण्याच्या व्यवसायापेक्षा खासगी वा सरकारी नोकरी मिळवण्याकडे परीट समाजातील युवक-युवतींचा कल वाढलेला आहे. शिक्षणाच्या अभावामुळे पूर्वी इस्त्रीचा व्यवसाय करण्याशिवाय या समाजासमोर दुसरा समर्थ पर्याय नव्हता, परंतु आता परीट समाजातील ज्येष्ठांना शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे आपल्या युवा पिढीला ते शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊ लागले आहेत. पूर्वी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले म्हणजे खूप झाले अशी स्थिती होती. आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यावर युवा पिढीचा अधिक भर आहे. तसेच स्पर्धात्मक परीक्षा देऊन उच्च पदाकडेही युवा पिढींने लक्ष केंद्रीत केले आहे. सद्यस्थितीत विविध नोकरीत परीट समाजातील व्यक्ती उच्चपद भूषवताना दिसत आहे. मेडिकल, इंजिनीअर क्षेत्रातही युवा पिढीने आपले पाय भक्कमपणे रोवण्यास प्रारंभ केला आहे. परीट (धोबी) समाजात अनेक उपजाती आहेत. त्यात प्रामुख्याने परीट, धोबी, वठ्ठी या नावानेही हा समाज ओळखला जातो. संत गाडगेबाबा हे या समाजाचे आराध्य दैवत. राज्य परीट सेवा मंडळाच्या औरंगाबाद शाखेतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. संत गाडगेबाबा यांचे शहरात स्मारक उभारण्यासाठी संघटनेचा लढा चालूच आहे. जागेअभावी हे स्मारक उभे राहू शकलेले नाही. समाजासाठी एखादे सांस्कृतिक सभागृह उभारण्याची गरज असली तरी त्यासाठी जागा मिळत नसल्याची खंत औरंगाबाद परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष साईनाथ हजारे व संत गाडगेबाबा एकजुट लाँड्रीधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा ढोबळे यांनी व्यक्त केली.
परीट समाजाचा इस्त्री व्यवसायात महिलांचाही हिरारीने सहभाग असतो. इस्त्री व्यवसायासाठी वीज तसेच कोळसा अशा दोन पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. कोळसा महागडा झाल्याने या व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. वीजेवर हा व्यवसाय तुलनेने परवडत नाही. सकाळी सहा ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत इस्त्रीचे काम करावे लागते. दहा वर्षांपूर्वी पाच रुपयात एक ड्रेस इस्त्री करुन दिला जात होता. आता दहा रुपयात एक ड्रेस होतो. अन्य दैनंदिन गोष्टी महागल्या असल्या तरी इस्त्रीचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे दरमहा होणाऱ्या कमाईतून बचत होताना दिसत नाही. मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढता असला तरी अधिक काम करून मुलांना शिकवण्याची पराकाष्ठा करताना ज्येष्ठ दिसत आहेत. शिक्षणाचे प्रमाण वाढते असल्याने युवा पिढीच्या अपेक्षाही निश्चित वाढल्या आहेत. लग्नासाठी नोकरी अथवा खासगी नोकरी करणाऱ्यांना अधिक प्राधान्यक्रम दिला जातो. चांगला व्यवसाय करणाऱ्यांनाही पसंती दिली जाते.
लाँड्री व्यवसायात आधुनिकता वाढली आहे. परीट समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय असला तरी अन्य समाजातील मंडळीही या क्षेत्रात उतरली आहेत. आधुनिक साधनांचा उपयोग करून या मंडळींनी ड्रायक्लिनर्सची दालने थाटली आहेत. अन्य समाजातील घुसखोरी हेही एक आव्हान परीट समाजातील व्यावसायिकांसमोर उभे ठाकलेले आहे. या व्यवसायातील दरमहा कमाईतून फारसी बचत होत नसल्याने युवा पिढीने किराणा, जनरल स्टोअर्स, कापड क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. पूर्वीच्या तुलनेत साड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. चांगली सेवा पुरवण्याऱ्या दुकान चालकांकडे गिऱ्हाईक कायमस्वरुपी जोडलेला राहतो आणि हेच त्यांचे बलस्थान आहे. महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी कैलास निकम यांची तर जिल्हा सचिव म्हणून साईनाथ हजारे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष म्हणून विजय देसाई तर सचिव म्हणून रामनाथ बोरुडे हे काम पाहात आहेत. कचरू पांचागळे हे राष्ट्रीय सचिव तर राजेंद्र सोनवणे हे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष आहेत. गणेश जगताप हे मराठवाडा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
संत गाडगेबाबा एकजूट लाँड्रीधारक संघटनाः जिल्हाध्यक्ष कृष्णा ढोबळे, कार्याध्यक्ष उमेश दळवी, जिल्हा सचिव संतोष राऊत, कोषाध्यक्ष रामेश्वर राऊत, उपाध्यक्ष गणेश ससाने, बापू भागवत, अनिल घोडके, गुलाब लिंगायत, सहसचिव चंद्रकांत लिंगायत, सहकोषाध्यक्ष सुधाकर व्यवहारे, संघटक विष्णू सोनवणे, सहसंघटक सचिन शिंदे. शहराध्यक्ष (मध्य) किसन मोरे, शहराध्यक्ष (पश्चिम) मानसिंग होलिये, शहराध्यक्ष (पूर्व) संतोष राऊत, शहर कार्याध्यक्ष राजेश मोघे, शहर सचिव रामेश्वर हजारे, उपाध्यक्ष नारायण घोडके, रामनाथ बर्वे, ज्ञानेश्वर हजारे, जालिंदर भागवत, मुक्तीराम पैठणकर, कोषाध्यक्ष विजय धोंगडे, सहकोषाध्यक्ष सचिन जाधव, सहसंघटक कांता वाघ, सहसचिव दीपक सोनवणे, संघटक बाळासाहेब भागवत, विभाग प्रमुख दीपक धोंगडे.
-
परीट समाजातील व्यावसायिकांना मनपाने शहरात गाळे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अनेकदा मागणी करूनही गाळे मिळत नाहीत. संत गाडगेबाबा स्मारकासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. समाजासमोर असलेल्या आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याकरिता संघटनेचा लढा सुरूच आहे.
- साईनाथ हजारे, जिल्हा सचिव, औरंगाबाद परीट सेवा मंडळ
-
परीट समाजाला राजाश्रयाची गरज आहे. शासकीय योजनांचा कोणताही लाभ या समाजापर्यंत पोहचत नाही. हा समाज विखुरलेला असल्याने त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहचत नाही. युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत.
- कृष्णा ढोबळे, जिल्हाध्यक्ष, संत गाडगेबाबा एकजूट लाँड्रीधारक संघटना



















मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १२९२ शौचालयांचे बांधकाम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढावी, शौचालयांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात व्हावे, या उद्देशाने दहा ते २० फेब्रुवारी दरम्यान 'मिशन १०००' एक हजार शौचालये बांधकाम करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार दहा फेब्रुवारी जिल्ह्यात १२९२ शौचालयांच्या बांधकामाची सुरवात झाली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वार्षिक कृती आराखड्यासाठी १२७ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व संनियत्रण सुलभ होण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये २० पेक्षा जास्त शौचालयाच्या बांधकामाची सुरवा करण्यात आली. त्यात औरंगाबाद १२०, गंगापूर १३०, कन्नड १६५, खुलताबाद १६२, पैठण १२०, फुलंब्री २००, सिल्लोड १७५, सोयगाव १००, वैजापूर १२० अशा एकूण १२९२ शौचालयांचा समावेश आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत बांधकाम पूर्ण होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित पेटी घोटाळाप्रकरणी लवकरच गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत २०१०-११मध्ये शाळा अनुदानातून गणित पेटी खरेदी प्रकरणात पावणेदोन कोटीचा गैरव्यवहार झाला होता. त्याची चौकशी झाली असून, यासंदर्भात संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २९ जानेवारी रोजी क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना पत्र दिले आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासन अनुदानातून गणितपेटी खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यात पावणेदोन कोटींचा गैरव्यवहार झाला होता. गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. विभागीय आयुक्तांकडूनही चौकशी झाली होती. यात गैरप्रकार झाल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले. दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालेभाज्या, बटाटे, कांदे स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा, पीरबाजार, पुंडलिकनगर व जाधववाडी येथील मंडईत पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. मेथी, पालक ५ ते १० रुपयांना विकल्या जात आहेत तर, तेवढ्याच किंमतीत कोथिंबीरच्या दोन ते तीन जुड्या विकल्या जात आहेत. बटाटे व कांद्याचे दर पंधरवड्यात निम्म्याने उतरले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातून रोज सुमारे २० हजार ते ३५ हजार पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक होत आहे. खुलताबाद, वैजापूर आणि गंगापूर येथून पालेभाज्यांची आवक जास्त आहे, असे भाजीविक्रेते समीर खान यांनी सांगितले. मात्र, फळभाज्या अजूनही सुमारे ५० ते ६० रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत. दुधी भोपळा, सिमला मिरची, फुलकोबी, पत्ताकोबीच्या किरकोळ दरात फरक झालेला नाही. गृहिणींची चिंता पालेभाज्यांनी कमी केली असली तरी, काही फळभाज्यांचे दर कमी व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांपासून होत असलेल्या कांदे-बटाट्यांची आवक दुपटीने वाढली आहे. यावाढी मुळे कांदा आणि बटाट्याचे दर उतरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात बटाटे २० रुपये किलो तर, कांदे फक्त १५ रुपये किलो या दराने विकले जात आहेत.
लासलगाव, यावल, नाशिक आणि अहमदनगर येथून औरंगाबाद वैजापूर, जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा- बटाटा येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी कांदे ३० ते ४० रुपये किलो तर, बटाटे ३० ते ३५ रूपये किलो होते. ११ फेब्रुवारीपासून रोज किमान १५० क्विंटल कांदे येत असल्याने घाऊक बाजारात कांदा ५०० ते १००० रुपये क्विंटल या दराने विकला जात आहे. बटाट्यांची आवक पुणे, नाशिक आणि हैदराबाद येथून होत आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि जालना येथून नेहमी बटाट्यांची आवक होते. त्यात या मालाची भर पडल्या भाव गडगडले. परिणामी बटाटे २० रुपये किलोने विकले जात आहेत, असे औरंगपुरा येथील बटाटे-कांदे व्यापारी समीर खान यांनी सांगितले. ही परिस्थिती किमान १५ दिवस कायम राहील असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना कराराची १५ वर्षांपासून प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
छोट्या व्यावसायिकांसाठी एमआयडीसीने बजाजनगरात १३ गाळे उभारले आहेत. या गाळ्यापोटी सर्व रक्कम अदा केल्यानंतरही गाळेधारकांचा एमआयडीसोबत करार १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. करार न झाल्याने गाळेधारकांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न भंगले आहे.
एमआयडीसीने बजाजनगर ही कामगारांची वसाहत स्थापन केली आहे. येथील रहिवाशांना सुविधा देण्यासाठी बजाजनगरमध्येच छोट्या व्यवसायिकांसाठी १३ गाळे बांधले. या गाळ्यांचे वाटप सोडत पद्धतीने करण्यात आले. गाळ्यांची किंमत ५० हजार रुपये ठरवून ती तीन टप्प्यात वसूल ३१ डिसेंबर १९९९ पर्यंत जमा करून घेतली. त्यानंतर २ फेब्रुवारी २००१ रोजी गाळेवाटप केले. त्यावेळी गाळेवाटप झाल्याचे फक्त पत्र दिले असून करार केलेला नाही. सर्व रक्कम घेऊन करार न झाल्याने गाळेधारकांनी सतत पाठपुरावा केला. करारपत्र नसल्याने येथे अद्याप वीजपुरवठा झालेला नाही, शिवाय गाळेधारकांना व्यवसायासाठी कर्जही मिळत नाही. दरम्यान, करार करण्यासाठी दलालामार्फत २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप काही गाळेधारकांनी केला.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे यांनी गाळेधारकांची बाजू ऐकूण घेऊन गाळेधारकांना करारत करून द्यावा, असे पत्र ३ जुलै २०१२ रोजी प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, त्यावर एमआयडीसी प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

एमआयडीसीकडून गाळा घेण्यासाठी कर्ज काढले. पण त्यानंतर करार न झाल्याने व्यवसायासाठी कर्ज मिळाले नाही, येथे व्यवसाय सुरू करता आला नाही. हे अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे होत आहे.
-संजय नागे, गाळाधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड ग्रंथोत्सवाचे आज उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान 'नांदेड ग्रंथोत्सव २०१५'चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गुरु गोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाजवळ नांदेड येथे ग्रंथमहोत्सव होणार आहे.ग्रंथमहोत्सवाचे सोमवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी ग्रंथदिंडीही काढण्यात येणार आहे.
ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथेात्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशकाची दालने या ठिकाणी राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे विशेष दालन या प्रदर्शनात राहणार असून या दालनात शासकीय प्रकाशने व दुर्मीळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता महात्मा ज्योतीबा फुले पुतळा आयटीआय चौक येथून ग्रंथदिंडी सुरू होईल. या ग्रंथदिंडीस प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यीक तु. शं. कुलकर्णी, भू. द. वाडीकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी अकरा वाजता ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री. अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, मनपा आयुक्त सुशील खोडवेकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने हे उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यीक रविचन्द्र हडसनकर, डॉ. जगदीश कदम, श्रीकांत देशमुख, डॉ. वृषाली किन्हाळकर यांना विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता "प्रभावी वाचन माध्यमे" या विषयावर परिसंवाद जेष्ठ साहित्यीक डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, संपादक केशव घोणसे पाटील आकाशवाणी नांदेडचे कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख आणि वसंत मैय्या यांचा सहभाग राहणार आहे.
याच दिवशी सायंकाळी पाच वाजता 'काव्यमैफिलीचे आयोजन' करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यमैफिलीचे उद्घाटन जेष्ठ कवी देविदास फुलारी यांच्या हस्ते होणार आहे. मैफिलीत नांदेड जिल्हयासह विविध ठिकाणचे कवी सहभागी होणार आहेत. या ग्रंथमहोत्सवात ग्रंथप्रदर्शन व विक्री सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे. ग्रंथोत्सवास रसिक प्रेक्षकांनी भेट देवून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व ग्रंथ खरेदी करुन आपल्या ज्ञानात भर टाकावी, असे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांनो, कलागुण जोपासाः सुरुची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'शिक्षण काळाची गरज असली तरी नृत्य, अभिनय, गायन, वादन या कलागुणांची जोपासना करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलातील कलागुण व्यक्तिमत्त्व विकासाला अधिक उपयुक्त ठरतील' असे प्रतिपादन अभिनेत्री सुरुची अडारकर हिने केले. ललित कला महोत्सवात सुरुची बोलत होती.
मराठवाडा कला विकास महामंडळाच्या २७ व्या ललित कला महोत्सवाची अंतिम फेरी रविवारी संत एकनाथ रंगमंदिरात पार पडली. या कार्यक्रमाला 'का रे दुरावा' फेम सुरुची अडारकर, महापौर त्र्यंबक तुपे, माजी आमदार जयवंतराव ठाकरे, उद्योजक श्रीधर नवघरे, शुभांगी काळे अशोक तांबटकर, प्रल्हाद शिंदे-हस्तेकर, संगीता भापकर-शिंदे, रामचंद्र दर्प, राजू परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरुची म्हणाली, मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या प्रेमाची खरी पावती अशा महोत्सवातून मिळते. रसिकांच्या प्रेमामुळे यशस्वी काम करता आले. कलावंत घडवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांमुळेच मराठवाड्यातील कलाकार यशस्वी ठरतील. कोणताही कलाकार लहान-मोठा नसतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मनस्वी आनंद शोधा.' यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महापौर त्र्यंबक तुपे (राजकीय-क्रिडा क्षेत्र), विलासराव देशमुख (सामाजिक क्षेत्र) आणि श्रीधर नवघरे (उद्योग) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कै. वसंतराव काळे पुरस्कार वाळूजच्या भगवान महावीर स्कूलला देण्यात आला.
नानासाहेब शिंदे चषक यशवंत विद्यालय अहमदपूर यांनी पटकावला. या महोत्सवात मराठवाड्यातील २५० स्पर्धक कलाकारांनी सादरीकरण केले. अभिनेत्री सुरूची अडारकर व इतर मान्यवरांनी पारितोषिक वितरण केले. स्पर्धेचे परीक्षण विकास बनकर, संजय जाधव व नीशा स्वराज यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक सोळंके, राजेश निंबेकर, विवेक महाजन, मधुकर पाटील, संजय जाधव, हरजिकौर सौदी, मीरा मगर, स्वाती देशमुख, निलाक्षी राव, जयश्री घोत, विलास दहीभाते, पीयूष शिंदे, अजिंक्य शिंदे, पवन निर्वळ यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेते स्पर्धक
समूहनृत्य - शांतीनिकेतन हायस्कूल, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, शारदा मंदिर
जोडी नृत्य - अतुल बनसोडे, प्रिया गायकवाड, अंकिता मुळे
वैयक्तिक नृत्य - तन्वी खैरनार, अनुष्का देशपांडे, साकेत पवार, अंकिता मुळे, सायली पवार
गायन - आकांक्षा बिराजदार, सोनक जाधव, रागिणी शिंदे
चित्रकला - एलोरा हायस्कूल, यशवंत विद्यालय, हिंदी विद्यालय, शिवाजी विद्यालय, जि. प. प्रशाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांनी तोडले अर्भकाचे लचके

$
0
0

औरंगाबाद : एका दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह रविवारी सकाळी बाबा पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाखालील डबक्यात सापडला. कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृतदेहाचा मानेपासून वरचा भाग शिल्लक राहिला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उड्डाणपुलाखालील पाण्याच्या डबक्यात लहान मुलाच्या मृतदेहाचे अवशेष असल्याचे लक्षात आल्याने काही नागरिकांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे, सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, गुन्हेशाखेचे पीएसआय अनिल वाघ व पथकांने घटनास्थळी धाव घेतली. स्त्री जातीचे हे दोन महिन्याचे अर्भक होते. कुत्र्यांनी लचके तोडल्याने त्याच मान व शिराचा भाग शिल्लक होता. श्वान लुसीने जवळील झाडाझुडपापर्यंत माग काढला. याप्रकरणी तीला फेकून पसार झालेल्या मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळयाची नेते, कर्मचाऱ्यांना लॉटरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या शंभर टक्के अनुदानावरील शेततळ्याची लॉटरी भाजपचे अंबड तालुकाध्यक्ष अवधूत रामराव खडके यांना आणि त्यांच्या घरातील अन्य दोन नातेवाईकांना लागली आहे. यासोबतच कृषी विभागातील अन्य तीन कर्मचाऱ्यांनीदेखिल सरकारच्या या शंभर टक्के मोफत योजनेत हात धूऊन घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या सुशीला वाघ यांच्या विशेष शिफारशीवर राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या थेट कृपेमुळे या योजनचा फायदा अनेकांनी फायदा घेतला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शंभर टक्के अनुदानावर फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कमाल साडे सात लाख रुपयांचे शेततळे देण्याची योजना अंबड तालुक्यात प्रस्तापित पुढारी आणि कृषी विभागाच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच परस्परात वाटून घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
४४ बाय ४४ मीटर आणि १५ मीटर खोल असे शेततळे निर्माण करण्यासाठी कमाल साडे सात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. किमान दोन हेक्टर फळबाग असेल तरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पात्र समजला जातो. जालना जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि विशेष करून फळबागा टिकवण्यासाठी सरकारच्या या योजनेचा खरोखरच खूप मोठा आधार निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. मात्र, राजकीय कोलांट्या उड्या मारून प्रस्तापित झालेल्या धनदांडग्या पुढाऱ्यांनी आणि कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच पदरात सरकारचे हे दान अगदी बरोबर पाडून घेतले आहे.

खडके यांचे राष्ट्रवादी कनेक्शन
भाजपचे विद्यमान अंबड तालुकाध्यक्ष खडके हे गेली पाच वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते. माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांचे विश्वासू सहकारी होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम देखील ठोकला. सुशील वाघ या राष्ट्रवादीच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना दिलेल्या निवेदनात अंबड तालुका हा कायम दुष्काळी परिस्थितीत असल्याने अंबड तालुक्यातील अवधूत खडके, पार्वतीबाई साहेबराव वाघ ( रा. हस्तपोखरी), काशिनाथ पाराजी खांडेभराड (रा. चिकनगांव) , बाबासाहेब विठ्ठल खडके ( रा. अंतरवाला आवा) , उषाबाई रघुनाथ खांडेभराड (रा. चिकनगांव) आणि अनंत रावसाहेब हुसे ( रा. वाकुळणी ता. बदनापूर) या सर्वांची जिल्हा कृषी अधीक्षकांना शेततळे मिळऊन देण्यासाठी शिफारस करावी असे म्हटले आहे. याच निवेदनावर कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सहसंचालक कृषी औरंगाबाद यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या सर्व योजनेची व्यवस्थित जाहिरात आम्ही वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्यानंतर प्रथम अर्ज करण्यास येईल तो शेतकरी प्रथम यापध्दतीने निवड करण्यात आली. कृषी खात्यातील कर्मचारी अथवा त्याच्या नातेवाईकांनी या योजनेत अर्ज करू नये असा काहीच नियम नाही, आता ही शेततळी मंजूर करण्यात आली आहेत. ज्ञानेश्वर तारगे, तालुका कृषी अधिकारी, अंबड.

कृषी खात्यातील अधिकारी हे केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यांवर काम करतात. सर्वसामान्य शेतकरीवर्गापासून ते खूप दूर असतात. सरकारकडून शंभर टक्के अनुदानाच्या योजनेचा लाभ कसा आणि कुणाला पोहचवायचा हे सगळे योजनाबद्धरित्या ठरते माझ्याकडे दोन एकर डाळींब आणि एक एकर मोसंबी फळबाग आहे. पण मी शेततळ्यासाठी सत्ताधारी पुढाऱ्यांची चिठ्ठी आणू शकत नाही. कुणाला पैसे देऊ शकत नाही. माझी फळबाग जळणार हेच खरे वास्तव आहे.
नितीन राऊत, शेतकरी, अंबड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपीचे नव्याने सर्वेक्षण कराः काँग्रेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचा सुधारित विकास आराखडा महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. त्यात दाखविलेल्या आरक्षणामध्ये अनेक चुका आहेत. नागरी वसाहतींवर आरक्षण दाखविलेले आहे. यातून काही जणांनी एकत्र येऊन शहराचा विकास करण्याऐवजी स्वतःचा फायदा करून घेतला आहे. त्यामुळे आराखड्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करावे, अशी तक्रार काँग्रेसचे नगरविकास विभागाकडे करणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
अक्रम म्हणाले, की शहराच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा काही दिवसांपूर्वी सरकारतर्फे केला गेला. तो आराखडा सुद्धा पालिका सभागृहात सादर केला गेला. परंतु, त्यावेळी नागरिकांच्या घरावरच आरक्षण टाकल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पालिकेने आलेल्या आक्षेपांच्या आधारे सुधारित विकास आराखडा तयार केला आणि सरकारला सादर केला. त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी नाही, महापौरांच्या स्वाक्षरीने सादर झालेल्या आराखड्याची वैधता कशी गृहित धरणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दाते पाटील म्हणाले, की वेगेवगळ्या भागांचा विचार केला तर, उदाहरणादाखल गट क्रमांक ६६, ६७ इटखेडा येथे रस्ता मोठा करण्याऐवजी ६० मीटरच्या रस्त्यामधून ४२ मीटर कमी करून तो रस्ता अवघा १८ मीटरचा केला गेला. भावसिंगपुरा गट क्रमांक दहामधील २४ मीटरसाठीचा सुधारित रस्ता हा १५ मीटर करण्यात आला. त्यामुळे वाहतुकची मोठी समस्या निर्माण होणार आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून आराखडा तयार करणे अपेक्षित होते, पण पालिकेने गंभीर दुर्लक्ष केले. पाचही गटांचे नकाशे आणि पूर्वीचे नकाशे गांधीभवनात नागरिकांच्या माहितीसाठी ठेवले आहेत. नागरिकांनी गुरुवारपर्यंत आपापल्या भागाची माहिती घ्यावी, त्यांचे काही आक्षेप असल्यास आमच्याकडे लेखी नोंदवावेत. हे सर्व आक्षेप घेऊन आमचे शिष्टमंडळ शुक्रवारी मुंबईला जाणार आहे. याप्रसंगी खालेद पठाण, राजेश मुंढे, सरोज मसलगे उपस्थित होते.

सत्ताधारी, विरोधकांची छुपी युती
काँग्रेसचे नगरसेवक याबाबत काहीच कसे बोलत नाहीत, असे विचारले असता अॅड. अक्रम म्हणाले, की महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्रच आहेत. त्यांनी मिळून हा आराखडा मार्गी लावला. आमचे दहा नगरसेवक आहेत, त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न अपुरे पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा आज मोर्चा

$
0
0

औरंगाबाद ः राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (१५ फेब्रुवारी) विभागीय आयुक्त कार्यालयावर हुंकार मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यंदा गंभीर दुष्काळ आहे. दुर्दैवाने केंद्र व राज्य सरकारने अद्याप कुठल्याही दुष्काळी उपाययोजना केलेल्या नाहीत. दुष्काळाने खचून गेलेल्या सर्वसामान्य माणसांच्या वेदनांचा हुंकार केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोचावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून सोमवारी सकाळी अकरा वाजता केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आसूड ओढून मोर्चाला सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयात समारोप होईल,अशी माहिती माजी प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे नेतृत्व करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमुक्त भारतचा अर्थ राजकीय नसून वैचारिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
काँग्रेसमुक्त भारत या घोषणेचा अर्थ केवळ निवडणुकीमध्ये पक्षाचा राजकीय पराभव करणे हा नसून काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताचे स्वरुप कसे असावे याबाबत जोपासलेल्या वैचारिक भुमिकांना पर्याय उभे करणे हा होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि रुपवेध ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत 'काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काय?' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रा. पळशीकर यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील काँग्रेसच्या बदलत्या स्वरुपचा आढावा घेतला. १९५० आणि १९६० च्या दशकात भारतातील विविध समाजघटकांना पक्षाचे आकर्षण होते आणि काँग्रेसची या सर्वांना सामावून घ्यायची क्षमता देखील अबाधित होती असे ते पुढे म्हणाले. परंतु, १९७० च्या दशकापासून पक्षाची ही क्षमता संपत गेली तसेच तो अधिकाधिक व्यक्तिकेंद्री झाला आणि त्यामुळेच त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतरच्या नंतर अनेक वर्ष काँग्रेस हा देशाच्या राजकारणाच्याच केंद्रस्थानी नव्हता तर आपल्या देशाचे स्वरुप नेमके कसे असावे याबाबतची वैचारिक चौकट कोणती असावे हे देखील त्याने निश्चित केले हे प्रा. पळशीकर यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणले. एकीकडे साम्यवाद्यांनी तर दुसरीकडे हिंदुत्ववादी शक्ती यांनी या चौकटीला आव्हान देण्याचा आणि पर्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, साम्यवाद्यांनी हे प्रयत्न लवकरच सोडून दिले तर हिंदुत्ववादी राजकीय दृष्ट्या क्षीण असल्यामुळे ते अवघड गेले, असे ते म्हणाले. १९९० च्या दशकात भारतीय जनता पक्षाने वैचारिक पर्याय उभा करण्यापेक्षा राजकीय यश प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न या दिशेने आहेत असे दिसते असे मत डॉ. पळशीकर यांनी व्यक्त केले.
काही प्रमुख क्षेत्रांमध्ये गेल्या काही दशकात झालेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर असे प्रयत्न पहायला पाहिजेत. त्यातील पहिला म्हणजे राष्ट्र या संकल्पनेबाबतच्या आपल्या धारणा. आपल्या महासत्ता होण्याचा आकांक्षामागे दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची इच्छा दिसते तर आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींना राष्ट्रद्रोही संबोधण्याची प्रवृत्ती वाढत आहे हे बदल होत आहेत असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अभय दातार यांने केले तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा. श्यामल पत्की यांनी मानले.

बदल भाजपच्या राजकारणास पोषक
अर्थकारणाच्या क्षेत्रात आता गरिब आणि वंचितांच्या हक्कांपेक्षा आपल्याला विकास आणि आर्थिक वृद्धी ही महत्त्वाची वाटायला लागली असे निरिक्षण त्यांनी मांडले. धर्म ही सदाचार आणि नीतीमुल्य शिकविणारी गोष्ट राहिली नसून आता धार्मिक सणांना पैसा आणि संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याची संधी मानली जाते तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वैविध्याचा सन्मान होताना दिसत नाही अशी खंत त्यांन व्यक्त केली. बहुसंख्यांकांची संस्कृती, आचार-विचार हे सर्वांनी स्वीकारले पाहिजेत असा वाढता आग्रह होताना दिसतो आणि ही चिंतेची बाब आहे. हे सर्व बदल हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणास पोषक असून त्यामुळेच त्यांना प्रोत्साहन मिळत आहेत असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पक्ष आचारसंहितेला डावलून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणारे औरंगाबाद युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद पटेल यांना श्रेष्ठींनी कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यासंदर्भात लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महाराष्ट्र प्रभारी हिंमतसिंह यांच्याकडे तक्रार केली होती. यानिमित्ताने युवक काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे.
युवक काँग्रेसच्या आचारसंहितेनुसार जिल्ह्यात, लोकसभा मतदारसंघात कोणत्याही नियुक्त्या करायच्या झाल्यास संबंधित मतदारसंघातील अध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी हे यादी तयार करतात. ही यादी मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जाते. मगच अंतिम शिक्कामोर्तब होत असते. औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेस उपाध्यक्ष जावेद शब्बीर पटेल यांनी युवक काँग्रेस चिटणीसपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील यांच्याकडे संघटनेतील काही जणांनी विचारणा केली. अध्यक्षांना अधिकार असताना उपाध्यक्षांनी कोणत्या आधारे नियुक्त्या केल्या ?, अशी विचारणा केली. उस्मानाबादमध्ये काही दिवसांपूर्वी असा प्रकार घडला होता. प्रभारी हिंमतसिंह यांनी तेथील उपाध्यक्षांन निलंबित केले होते. या प्रकाराची मुठ्ठे यांनी प्रदेश प्रभारी हिंमतसिंह, प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावरून केंद्रीय चिटणीस हरेकृष्णा यांनी जावेद पटेल यांना कारणे दाखव नोटिस बजावली आहे. आता प्रदेश युवक काँग्रेस काय कारवाई करणार ?, असा प्रश्न आहे.

पटेल यांनी नियुक्ती केल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्यावरून कारणे दाखवा नोटिस बजावली होती. त्यावर पटेल यांचे उत्तरही आले आहे. ते तपासून योग्य ती कारवाई केली जाईल.
-विश्वजित कदम, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कारच योग्य

$
0
0


औरंगाबाद : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. मी कायम संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्राचे विभाजन कुठल्याही अर्थाने हिताचे नाही. त्यामुळे त्रिभाजन अजिबात योग्य नाही, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे माहिती सल्लागार पीआरव्ही प्रसाद यांनी महाराष्ट्राचे त्रिभाजन केल्यास आणखी चांगला विकास होईल, अशी भुमिका मांडली. या संदर्भाने चव्हाणांनी भूमिका मांडली ते म्हणाले,'कुठलाही निर्णय घ्यावयाचा असल्यास त्यामागे स्त्रोत काय आहेत, याचा विचार केला पाहिजे. राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. महसुली उत्पन्नात मुंबईचा वाटा सर्वात मोठा आहे, हे विसरून चालणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती जणांनी हौताम्य पत्करले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. भावनेच्या भरात किंवा राजकीय डावपेचातून राज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. हे चुकीचे आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यासह उर्वरित भाग मिळून असलेला महाराष्ट्र एकसंध आहे आणि तो एकसंध राहावा, अशीच आमची भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णपदक विजेती सारिका काळे स्वागतापासून दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
गुवहाती येथे नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मुलीच्या खो-खोच्या भारतीय संघाचे नेतृत्व करीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या उस्मानाबादच्या कुमारी सारिका काळे हिचे शनिवारी पहाटे उस्मानाबाद येथील रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. मात्र, तिच्या स्वागतासाठी खो-खो संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, स्टेडियम कमिटीचे पदाधिकारी, नगरपालिका व रोटरी क्लबचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनाचा प्रतिनिधी यापैकी कोणीही नव्हते.
सारिका काळे ही उस्मानाबादची सुकन्या व भोसले हायस्कूलची विद्यार्थिनी. तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील अपंग, आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अशा अत्यंत हलाखीच्या स्थितीत जीवन जगणारया सारिकाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबादकरांनी कंजुषीपणा दाखवावा याचे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटते. एरवी शहरी भागातून खेळाडुंचे करण्यात येत असलेले जंगी स्वागत, बक्षीसांचा भडीमार असा कुठलाही प्रकार आज दिसून आला नाही.
राज्य खो-खो संघटनेचे चंद्रजित जाधव हे सचिव असून ते राहणारे उस्मानाबादचेच आहेत. त्यांनाही सारिकाच्या स्वागताची कल्पना सुचली नाही, याचे उस्मानाबादकरांना आश्चर्य वाटते. केवळ ती गरीब कुटुंबातील म्हणूनच तिच्याकडे या सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवले.
सारिका शनिवारी पहाटे उस्मानाबादला येणार याची माहिती कुटुंबियांना होती. परंतु, शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर जाऊन तिचे कौतुक करण्याचे आर्थिक बळ या कुटुंबाकडे नव्हते. तिचा लहान भाऊ शिक्षण घेत पोटाची खळगी भरण्यासाठी पार्ट टाइम काम करतो. त्याची तिच्या स्वागताची मनस्वी इच्छा होती. परंतु, आर्थिक चणचणीमुळे तो उदास होता. शेवटी त्याने त्याच्या एका परिचित शिक्षकाकडे मोटारसायकलच्या मदतीची याचना केली. त्या शिक्षकालाही हा सर्व प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने सारिकाच्या भावाला धीर दिला व स्वागतासाठी येण्याचे कबूल केले. पुष्पगुच्छ व मिठाई घेवून हे दोघेजण रेल्वेस्टेशनवर गेले व त्यांनी तिचा कौटुंबिक सत्कार केला. त्यानंतर ती आपल्या राहत्या घरांकडे आल्यानंतर गल्लीतील काही बालगोपाळांनी तिचे स्वागत करीत कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images