Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नोटबंदी समर्थनार्थ दहा हजार स्वाक्षऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारपासून हाती घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत दहा हजारांवर नागरिकांनी समर्थन केल्याचे संयोजकांनी सांगितले. शहरातून लाखभर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येणार आहे.
‘नोटबंदीवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळेच याबाबत लोकांत जनजागृती व्हावी म्हणून ही सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे,’ अशी माहिती अभियानाचे निमंत्रक अनंत मोताळे यांनी दिली. गुलमंडी, कॅनॉट गार्डन, रविवार बाजार, सिंधी कॉलनी आदी ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून, सोमवारी दर्गारोड येथील आठवडी बाजारात उपक्रम राबविण्यात आला. याला मोठा प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांत दहा हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून नोटबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनंत मोताळे, प्रा. प्रशांत अवसरमल, ज्योती अवसरमल, रितू अग्रवाल, राहुल अग्रवाल, अॅड. श्रीचंद जग्यासी, जे. पी. सिंग खांबा, रमेश तिवारी, जगदीश देव, शुभम गुंजाळ, स्वाती कुलकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राच्या निषेधार्थ काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मोदीजी का कहना साफ - विजय माल्या का कर्जा माफ, या सरकारचे करायचे काय - खाली डोके वर पाय, कहा गए भाई कहा गए - अच्छे दिन कहा गए’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या नोटबंदीचा निषेध करत आक्रोश मोर्चा काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली असून, सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांच्या आर्थिक अडचणी सरकारने दूर कराव्यात, अशी मागणी करत काँग्रेसने सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. शहागंज येथील गांधीभवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष नामदेव पवार,माजी आमदार डॉ. कल्याण काळे, महिला आघाडी शहराध्यक्ष सरोज मसलगे, आतिश पितळे, बाबा तायडे, पृथ्वीराज पवार, इब्राहिम पठाण, रेखा जैस्वाल, जगन्नाथ काळे, परमजीत कौर, भाऊसाहेब जगताप, अॅड. सय्यद अक्रम, रवींद्र काळे, लियाकत पठाण, खालेद पठाण, काकासाहेब कोळगे, जहिरशेठ करमाडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

पोलिस बंदोबस्तात ढिसाळपणा
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. वैधानिक विकास मंडळाबाजूच्या गेटवर मोर्चा पोलिसांनी अडविला. काही काळ घोषणाबाजी झाली, पण त्यानंतर पाच जणांना सोडण्याऐवजी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गेट उघडे केले. त्यामुळे मोर्चा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचला. आता ही गर्दी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत जाते की काय, अशी भीती निर्माण झाली, पण तेथे उपस्थित पोलिसांनी सर्वांना अडविले. काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना परत फिरण्यास सांगितले आणि गर्दी चार गटांत विभागली. तोपर्यंत कंट्रोल रूमला माहिती कळविली होती. काही वेळात मोठा ताफा दाखल झाला. सहायक पोलिस आयुक्त बुवा दाखल झाले. कपाउंड वॉलच्या आवारात असलेले काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांनी हटविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूमंत्र : शंभर गुणांना शंभराची नोट

$
0
0

Ashich.Choudhari@timesgroup.com
Tweet :@ahsishcMt
जगाची भाषा म्हणून इंग्रजी सर्व परि‌चित आहे, तर गणित सर्वात महत्त्वाचा विषय. गणितासाठी ‘आकलन’ महत्त्वाचे असते. इंग्रजी सहजसोपी ठरते. स्पर्धेच्या शालेय जीवनातच पाल्याचे गणित, इंग्रजी विषय पक्का व्हावा याकडे पालकांचा कल असतो. स्पर्धेच्या युगाची मागणी ओळखत भट्टड मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता जाणून घेत गणित विषयासाठी द्विसूत्री, तर इंग्रजीसाठी चतुःसूत्री तयार केली आहे. एम.ए., एम.एडचे शिक्षण पूर्ण झालेल्या भट्टड १९९४पासून अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. शालेय शिक्षण घेत असतानाच शिक्षक होण्याचे ध्येय ठेवणाऱ्या भट्टड यांनी या क्षेत्रात आल्यानंतर त्याच ध्येयाने मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या वर्गासाठी त्या इंग्रजी व गणित विषय शिकवितात. विषय शिकविण्यासाठी त्यांनी स्वतःची पद्धती विकसित केली आहे. ती गुणवत्तेला अतिशय पूरक ठरली आहे. प्रारंभी त्यांनी वर्गातील मुलींचे ग्रुप तयार केले. प्रत्येक ग्रुपला ग्रुप मॉनिटर आणि एक मॉनिटर आहे.
विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या गुणांची पारख करत, प्रत्येक विषय मुळापासून कसा समजेल याची पूर्ण तयारी याकडे भट्टड मॅडम यांचे लक्ष असते. मूलभूत गणित, अंकगणितातील उदाहरणांचा सराव या सगळ्याची त्यांनी एका सूत्रात गुंफण केली आहे. दैनंदिन व्यवहारातील उदाहरणांच्या सहाय्याने गणित समजावून सांगणे यावर भर असतो. जोपर्यंत विद्यार्थ्याला विषयाचे पूर्णपणे आकलन होत नाही, त्याची खात्री पटत नाही तोपर्यंत पुढे जायचे नाही, हा भट्टड मॅडम यांचा दंडक.
गणित विषय एक ते नऊ अंक अन् बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्याशीच जोडला गेला आहे. त्यामुळे हा विषय अवघड नसल्याचे त्या सांगतात. गणित विषयासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला रोज गणितातील काही शब्द पाठांतरासाठी दिलेले असतात. त्यासह दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘अंकगणितातील उदाहरण’. उदाहरण शिकविताना त्याची मेथड, प्रश्न आणि त्याचा अर्थ हे सांगून उदाहरण समजवून सांगितले जाते. त्यानंतर सराव महत्त्वाचा ठरतो. इंग्रजी विषयाचेही असेच आहे. इंग्रजीसाठी त्यांची चतुःसूत्री ही उपयुक्त ठरली आहे. चतुःसूत्रीतील पहिले सूत्र म्हणजे, प्रत्येक विद्यार्थिनीला रोज इंग्रजीचे दहा शब्द दिले जातात. एक शब्द पाचवेळा लिहिणे व पाठांतर करणे आवश्यक असते. दुसऱ्या दिवशी वर्गात हे शब्द सांगावे लागतात. ही प्रक्रिया नियमित होते. यामुळे विद्यार्थिनींना शब्दांची ओळख, त्यांचे अ‌र्थ हे मुखपाठ आहेत. पालकांसमोर नियमित वाचन, हे सूत्रही प्रभावी ठरले आहे. त्यात घरी गेल्यानंतर पालकांसमोर विद्यार्थिनींनी दिलेला पाठाचे वाचन करायचे असते. वाचनानंतर पालकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक असते. त्याचे पालन केले गेले आहे, की नाही हे पाहण्याची जबाबदार ग्रुप मॉनिटरची असते. त्यानंतर तिसरे, सूत्र गाइड वापरण्यावर असलेली बंदी. वर्गात धड्यावर मार्गदर्शन, व्यवस्थित अभ्यास करून घेतला जातो. त्यात पुन्हा सराव असतो. धड्यातूनच उत्तर कसे शोधायचे, कसे लिहायचे याचे मार्गदर्शन केले जाते. चौथे सूत्र, सामान्यज्ञान वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आखण्यात आले. शाळेत येताना घरी येत असलेल्या वृत्तपत्रात कोणती बातमी वाचली ‌किंवा वृत्तवाहिनीवर कोणती बातमी ऐकली, हे सांगावे लागते. त्यावर चर्चा होते. त्यामुळे सामान्यज्ञानही वाढण्यास मदत होते. मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या की विद्यार्थ्यांना अडचणी येत नाहीत, असे त्या सांगतात.
शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या, करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या विद्यार्थिनी आज जेव्हा भेटतात, तेव्हाचा आनंद वेगळाच असतो, असे त्या अभिमानाने सांगतात. चुकले तेथे शिक्षा अन् चांगले गुण मिळविले की कौतुकाची थाप, त्यामुळे त्या विद्यार्थिनींच्या आवडीच्या शिक्षिका ठरतात. गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळविले की विद्यार्थिनीला शंभराची बक्षिसी ठरलेली. शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक मयुरा पटेल; तसेच सहकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे भट्टड मॅडम आवर्जून सांगतात.

इंग्रजीचे अचूक वाचन
इंग्रजी वाचताना काय काळजी घ्यावी, शब्दांचे उच्चार कसे करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अचूक वाचन कसे होईल, यासाठी जादा तासिका घेतल्या जातात. त्यामाध्यमातून अचूकपणे वाचन कसे करावेस, हे शिकविले जाते.

गाइडचा वापरावर बंधन
घोकंपट्टी किंवा फक्त गाइडचा वापर करून केलेला अभ्यास शिक्षणपद्धतीत अधिक पहायला मिळतो. भट्टड मॅडमच्या वर्गात मात्र गाइडच्या वापरावर बॅन आहे. पुस्तकातील धड्यावर व्यवस्थित अभ्यास करून घेऊन सरावातील सातत्य, यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे गाइडचा वापर करण्यास विद्यार्थिनीही तयार नसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’मध्ये ११ सुधारणांचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होऊन त्यानुसार काम केले जात असताना तब्बल ११ सुधारणांचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. यासाठी २९ कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा विषयही याच अजेंड्यात आहे.
केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी (आर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडिअम टाउन्स) या योजनेतून औरंगाबाद शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर झाली. ३६५ कोटी रुपयांच्या या योजनेचा डीपीआर तयार करून त्याला शासनाची मंजुरी मिळवण्यासाठी व त्यानंतर शासनाकडून निधी मिळविण्यासाठी महापालिकेने फोट्रेस या कंपनीची ‘पीएमसी’ म्हणून नियुक्ती केली. या कंपनीला एकूण खर्चाच्या २.२ टक्के रक्कम देण्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानुसार; या कंपनीने डीपीआर तयार केला. या डीपीआरनुसार जून २०१७पर्यंत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, परंतु बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत डीपीआरमध्ये ११ सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. डीपीआरमध्ये ११ सुधारणा करून त्यानुसार काम करून घेण्यासाठी २९ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. भूमिगत गटार योजनेच्या विविध कामांमधून शिल्लक राहीलेल्या निधीतून हा खर्च करणे शक्य आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

एसटीपी सहाऐवजी चार
सिवरेज ट्रिटमेंट प्लांटची (एसटीपी) संख्या सहावरून चार करण्याचा प्रस्ताव आहे, तर जीआरपी पाइप ऐवजी एमएस पाइप वापरण्याची परवानगी देखील मागण्यात आली आहे. रेल्वे रुळाच्या खालून मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाइन टाकायची आहे. त्यासाठी ४ कोटी १४ लाख रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. ही रक्कम भरल्यावर रेल्वे विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर रेल्वे रुळाच्या खालून काम करता येईल, असे सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मटा भूमिका ः रस्त्यांचे काय?
भूमिगतसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण संबंधित कंपनीकडूनच करवून घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर काही रस्त्यांचे काम सुरू झाले, परंतु या योजनेसाठी जेसीबीने आवश्यक तेवढे नव्हे, तर संपूर्ण रस्ते जेसीबीद्वारे पोखरून ठेवले होते. सध्या जे डांबरीकरण केले जात आहे, ते खोदलेल्या भागाचे असून, पोखरलेले रस्ते तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते पूर्ववत होणार नाहीत. रस्त्याच्या उर्वरित भागाच्या डांबरीकरणाची जबाबदारी पालिकेच्या माथी मारली जात आहे. वाढीव निधी देण्यापूर्वी या कामासाठी जेवढ्या रस्त्यावर जेसीबी फिरविण्यात आले, तेवढ्या रस्त्याचे काम पालिकेने कंपनीकडून करवून घेतले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थींच्या यादीवरून झेडपीमध्ये वादावादी

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत निवडलेले लाभार्थी बदलण्यावरून सोमवारी प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी आणि सभापती शीला चव्हाण यांच्या पतीमध्ये जोरदार वादावादी झाली. सकाळी अकरा वाजता हा प्रकार मडावी यांच्या दालनात घडला. कर्मचाऱ्यांनी तातडीने सीईओ मधुकर अर्दड यांच्याकडे धाव घेऊन हा प्रकार कानावर घातला, मात्र नियम डावलून काही करू नका, असे आदेश अर्दड यांनी दिल्याने प्रकरण शांत झाले.
समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेतून ऑइल इंजिन वाटप करण्याची योजना आहे. गंगापूर तालुक्यातील १५१ लाभार्थी यासाठी निवडले होते. एका इंजिनची किंमत १९ हजार ८४५ एवढी आहे. यादी समाजकल्याण समितीसमोर निश्चित झाली. ही योजना २०१५-१६ची होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या यादीतील काही नावे बदलावीत, अशी मागणी करत सभापती शीला चव्हाण, त्यांचे पती विजय चव्हाण आणि अन्य तीन जण सोमवारी सकाळी मडावी यांच्या दालनात झाले. मडावी यांनी यादीतील नावे बदलण्यास नकार दिला. त्यावरून चव्हाण आणि मडावी यांच्यात वादावादी झाली. तेथील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सीईओ अर्दड यांना सांगितला. सभापती शीला चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आम्ही सरकारी नोकर आहोत. यंत्रणेचे गुलाम नाहीत. याद्या पूर्वीच मंजूर झालेल्या असताना त्यात बदल कसा काय करणार? नियमानुसारच काम केले जाईल, असे समजाकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.

समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या दालनात वादावादी झाल्याचा प्रकार कर्मचाऱ्यांनी सांगितला. नियम डावलून कुठलाही निर्णय घेऊ नये, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.’’
- मधुकरराजे अर्दड, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या दहा महिन्यांत अॅट्रॉसिटीचे ७१ गुन्हे

$
0
0

औरंगाबाद : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व १९९५अनुसार गेल्या दहा महिन्यांत ७१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी कटके यांच्या दालनात झाली. ज्या गावात अॅट्रॉसिटीअंतर्गत खून, बलात्कार झाला अशा गावात महसूल, पोलिस, समाज कल्याण, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सामंजस्य बैठका घेऊन तेथील जनजीवन सुरळीत चालू राहील, अशा उपाय योजना कराव्यात. फिर्यादींचे समुपदेशन करून कायद्याबाबत जागृती निर्माण करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी कटके यांनी संबंधितांना सूचना दिल्यात.
अॅट्रॉसिटीअंतर्गत एक जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०१६ या कालावधीत ७१ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये तीन खून, १४ बलात्कार, २० विनयभंग यांचा समावेश आहे. १५ प्रकरणे पोलिस तपासावर असून, पोलिसांनी याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. समितीचे सदस्य सचिव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जे. एस. एम. शेख यांनी गुन्ह्यांचा सद्यस्थितीतील आढावा सदस्यांसमोर मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस मतदार कार्ड; उमेदवार रडारवर

$
0
0

औरंगाबाद : बनावट मतदार कार्ड प्रकरणात शहर पोलिसांच्या रडारवर जालना नगर परिषद निवडणूकीतील स्थानिक उमेदवार आहेत. या उमेदवाराची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, तयार करण्यात आलेल्या बनावट मतदार कार्डांमध्ये महिलांच्या ओळखपत्राची संख्या जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हेशाखेच्या पथकाने रहेमानिया कॉलनी भागात बनावट मतदार कार्ड तयार करणाऱ्या टोळीवर शनिवारी छापा टाकला होता. जालना नगर परिषद निवडणूक रविवारी होणार होती. या निवडणूकीसाठी ही मतदान कार्ड तयार करण्यात येणार होती. वसीम बॅटरी नावाच्या संशयित आरोपीचा नातेवाईक असलेला उमेदवार जालना येथील वॉर्ड क्रमांक १९ मध्ये निवडणूक लढवत होता. त्यासाठी बनावट मतदार कार्ड तयार करण्यासाठी मतदार याद्या व डेटा देत त्यांने औरंगाबादेत कंत्राट दिले होते. वसीम बॅटरी याने सिकंदर सय्यद अब्दुल मन्नान याला हे काम सोपवले होते. सिकंदर या मतदार याद्या ‌मोहम्मद रईस अब्दुल रहेमान याच्याकडे सोपवला होता. मात्र, पोलिसांना याची टीप मिळाल्याने मतदार कार्ड तयार करण्यापूर्वी टोळी पोलिसांच्या ताब्यात आली. दरम्यान जिन्सी पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलिस जालना येथील संशयित उमेदवाराची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जे मतदार कार्ड तयार करण्यासाठी याद्या व डेटा पाठवण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम महिलांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराई एमआयडीसीची जमीन २२ वर्षे पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सराई येथे लघु औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अपयश आले आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून पडून असलेली जमीन परत करावी, अशी मागणी सराई ग्रामपंचायतीने केली आहे.
तालुका पातळीवर औद्योगिक विकास व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सराई येथे ९.९५ हेक्टर २२ वर्षांपूर्वी घेतली आहे. पण, या २२ वर्षांत या जमिनीचा वापर झालेला नाही किंवा उद्योग सुद्धा आले नाहीत. ताब्यात जमीन असताना तिचा वापर न करण्याबद्दल लोकलेखा समितीने एमआयडीसीकडे विचारणा केली. त्यावेळी प्रादेशिक अधिकाऱ्याने अडचणींचा पाढा वाचला. येथे शाश्वत पाणीपुरवठा नसल्याने बोअर खोदून पाणी उपलब्ध होईल का, यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाहणी करण्यात आली. पण, पाणी उपलब्ध होणार नाही, असा अहवाल आल्यामुळे जमिनीचा वापर झालेला नाही. सवलतीच्या दरात पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःस्सारण विभागाकडे विचारणा करण्यात आली होती. या विभागाने प्रति घनमीटर २० रुपये पाण्याचा दर निश्चित केला होता. एमआयडीसी क वर्ग नगरपालिका क्षेत्रात येत असल्याने पाण्याचा दर रुपये ४ रुपये प्रति घनमीटर असतो. त्यामुळे उद्योजकांना परवडणारा नव्हता. शिवाय प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र खुलताबाद पर्यटनक्षेत्राजवळ असल्याचे या अधिकाऱ्याने हेरिटेजच्या जवळ असल्याचेही प्रादेशिक अधिकाऱ्यांनी लोकलेखा समितीला सांगितले आहे.

लोकलेखा समितीचे ताशेरे
उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन घेतली पण, त्यानुसार लघुउद्योग स्थापन झाले नाहीत. शिवाय शेतजमीन पडिक राहिली. यामुळे शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे, असे लोकलेखा समितीच्या २०१५–१६ च्या अहवालात नमूद केले आहे.

जमीन घेताना पाण्याची उपलब्धता, हेरिटेज या बाबींचा विचार केला नाही का ? या जमिनीचा विकास न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. ही जमीन त्यांना परत करावी.
-रामचंद्र नागे, सरपंच, सराई

घटनाक्रम

१९ डिसेंबर १९९० रोजी खुलताबादच्या तहसीलदारांना लघु उद्योग क्षेत्र उभारण्यासाठी सराई येथील जमिनीची मागणी करण्यात आली.

२६ नोव्हेंबर १९९२ रोजी सराईचे सरपंच रामदास बाजीराव वाकळे यांनी गट नंबर ८६ मधून काही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी देण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करून घेतला.

१९ एप्रिल १९९४ रोजी अंकुश दिंगबर शिरसे यांनी जमीन हस्तांतर ताबा लिहून दिला आहे. त्यानंतर उद्योग उर्जा व कामगार मंत्रालयातर्फे २० सप्टेंबर १९९४ रोजी सराई औद्योगिक वसाहत जाहीर करण्यात आली.

मटा भूमिका

शेतकऱ्यांना वेगळा न्याय का?
राज्यात नवीन विकास प्रकल्प राबविताना जमीन खरेदी करणाऱ्यांनी एक ते तीन वर्षांत प्रकल्प उभारावा अशी अट शासनाने घातली आहे. प्रकल्प उभारला गेला नाही, तर जमीन किंवा भूखंड परत घेण्याची तरतूद शासनाने ठेवली आहे. मात्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी नाममात्र दरात खरेदी करून कित्येक वर्षे शासनाने त्यांवर प्रकल्प उभारलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन परत करण्याची मागणी रास्त आहे. ज्या अटी व शर्तींवर शासनाने जमिनीची वा भूखंडांची विक्री सुरू केली आहे, त्याच अटींप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी परत करावयास हव्यात. खुलताबादेतील जमीन दोन दशकांपूर्वी ताब्यात घेतली होती, परंतु तेथे एमआयडीसी उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न शासनाने केलेले नाहीत. त्यामुळे ती जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करावयास हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्नड जाण्यासाठी रस्ता द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तडे गेल्यानंतर टापरगावचा पुलावरून वाहतूक बंद केल्यामुळे कन्नडकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात यावा, अशी मागमी एसटी महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कन्नड तालुक्यातील टापरगावजवळ शिवना नदीवर असलेल्या पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे या पुरावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्र‌ाधिकरण करणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादहून कन्नड आणि चाळीसगावकडे जाणाऱ्या बससाठी पर्यायी मार्ग नाही. एसटी महामंडळाला औरंगाबाद ते टापरगाव आणि टापरगाव ते कन्नड या दोन बस सुरू कराव्या लागल्या आहेत. याशिवाय धुळ्याकडे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नांदगावमार्ग देण्यात आला आहे. त्यामुळे एसटीला ३२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाला कन्नड आणि चाळीसगाव येथील प्रवासी या बसमध्ये घेता येत नाहीत.
टापरगावचा पूल पाडण्यापूर्वी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांच्याकडे चार पर्यायी रस्त्यांचा प्रस्ताव दिला होता. या चार प्रस्तावित रस्त्यामधून एक किंवा दोन रस्ते संबंधित विभागाने तयार करून दिल्यास कन्नड आणि चाळीसगाव जाण्यासाठी अडचणी राहणार नाहीत, असे प्रस्तावात म्हटले होते. या प्रस्तावावर संबंधित विभागाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने, पुलाच्या अडचणीमूळे प्रवाशांना ३४ किलोमिटरचा अतिरिक्त फेरा सहन करावा लागत आहे. कन्नड आणि चाळीसगाव येथील प्रवाशांनाही एसटीतून प्रवास अवघड झाले आहे. यामुळे या रस्त्यावर काळी-पिवळी गाड्यांची संख्या वाढली आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर उत्पन्नही परिणाम झाला आहे.


असा होता पर्यायी मार्गांचा प्रस्ताव

औरंगाबाद - गल्लेबोरगाव - टाकळी - चंपानेर - पाणपोई - कन्नड ः ६ किलोमीटर
औरंगाबाद - गल्लेबोरगाव - तिसगाव -घुसूरतांडा - चिकलठाणा- कन्नड ः ८ किलोमीटर
औरंगाबाद - गारज - मनूर- चपानेर - पाणपोई - कन्नड ः १७ किलोमीटर
औरंगाबाद - शिऊर बंगला - चपानेर - पाणपोई - कन्नड ः २७ कि‌लोमीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनाची गोडी लागली; पुस्तकाची पेटी आली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे भराडी येथील श्री. सरस्वती भुवन प्रशालेस हिंदी भाषेतील २१ हजार रुपयांचे ग्रंथ देण्यात आले आहेत. या शाळेला सलग दुसऱ्या वर्षी मंत्रालयाकडून ग्रंथ मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तकपेटी, माझे वाचन, माझे आवडते पुस्तक, वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट, पॉकेटमनीतून ग्रंथ व दिवाळी अंक खरेदी, उत्कृष्ट वाचक विद्यार्थी, ग्रंथप्रदर्शन, रोज वर्तमानपत्र विकत घेऊन वाचन, समीक्षण आदी उपक्रम राबवण्या आले. मानव संसाधन मंत्रालयाकडे मुख्याध्यापक सुभाष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रशांत अपसिंगेकर, प्रा. प्रमोद सुरडकर यांनी प्रस्ताव पाठवून पाठपुरवठा केला. गेल्यावर्षी २५ हजार व यावर्षी २१ हजार रुपयांचे ग्रंथ मिळाले.

या विषयांवरील पुस्तके
मंत्रालयाने १७२ पुस्तके पाठवली असून त्यात संस्कार कथा, निती कथा, बाल कथा, आरोग्य, पर्यावरण, आयुर्वेद, क्रीडा, संगणक, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान कथा, कृषी, भारतीय सण, भारतीय व्यक्ती, भौगोलिक, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, नोबेलप्राप्त भारतीय व्यक्ती आदी विषयांवर पुस्तके पाठवली आहेत.

व्यक्तिच्या जडणघडणीतील वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन भराडी येथील शाळेने विविध उपक्रम राबवले. हे उपक्रम कौतुकास्पद असून अन्य शाखांमध्येही अंमलबजावणी करण्यात येईल.
-ज्ञानप्रकाश मोदाणी, सहचिटणीस श्री स. भु. शिक्षणसंस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा राउंड टेबल’ : केंद्र, राज्य सरकारांकडून निधी आणावा

$
0
0

महापौर हा घटक कोणत्याही एका क्षेत्रातला तज्ज्ञ घटक नसतो. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापौरांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करून, त्यांच्या सल्ल्याने काम करावे, असा सूर ‘मटा राउंड टेबल’मध्ये उमटला. नवे महापौर भारतीय जनता पक्षाचे असतील. राज्य आणि केंद्रात भाजपचीच सत्ता असल्यामुळे या महापौरांनी शहर विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्र्यंबक तुपे बुधवारी (३० नोव्हेंबर) महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर पुढील दहा दिवसांत नवीन महापौराची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन महापौर, शहराचा विकास आणि नागरिकांच्या अपेक्षा यांवर ‘मटा राउंड टेबल’मध्ये साधकबाधक चर्चा झाली. या चर्चेत माजी महापौर रशीद मामू, माजी उपमहापौर संजय जोशी, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष सुनील पाटील, राजेंद्रसिंग जबिंदा, स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. खैरनार, पर्यावरण तज्ज्ञ विवेक ढाकणे, महिला प्रतिनिधी वैशाली टाकळकर, विद्यार्थी प्रतिनिधी सुशील बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर सहभागी झाले होते.

रशासनाला सोबत घेऊन काम करावे
महापौराने आयुक्त आणि महापालिकेचा स्टाफ यांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. प्रशासनाला सोबत घेतल्याशिवाय शहर विकासाची कामे होणार नाहीत. कारण महापौर हे पद मानाचे आहे. या पदावर बसणाऱ्याला प्रशासकीय अधिकार काहीच नसतात. आयुक्तांना हे अधिकार असतात. त्यामुळे महापौर व आयुक्त यांनी सामजस्याने व समन्वयाने काम काम करणे गरजेचे आहे. नवीन महापौरांनी याकडे लक्ष द्यावे. महापौरांनी प्रशासकीय कामांचा अभ्यास केला पाहिजे. स्थानिक राजकारणात वेळ न घालवता व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी काम करावे. नवीन महापौरांचे पहिले सहा महिने सत्कारातच जातात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यामुळे नवीन महापौरांनी संपूर्ण शहराच्यावतीने एकच सत्कार स्वीकारावा व जास्तीत जास्त वेळ शहरासाठी द्यावा. महापालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्याचे महत्त्वाचे कामही महापौरांचेच असते. केवळ ठराव मंजूर करून भागणार नाही. मंजूर केलेले ठराव प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी गरजेचा आहे. त्यासाठी उत्पन्न व खर्च याची सांगड घालण्याबरोबरच शासनाकडून निधी मिळवण्याकडेही नवीन महापौरांना लक्ष द्यावे लागेल. कारण केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन महापौरांनी दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा केला, तर पुरेसा निधी मिळेल. त्यातून शहर विकासाची कामे होऊ शकतील. शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा येथे औद्योगिक वसाहती आहेत. तेथील कामगार औरंगाबाद शहरातच राहतात. शहरावर त्यांचा ताण पडतो. हा ताण हलका करण्यासाठी महापालिका त्या कंपन्यांकडून कर वसूल करू शकते. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. या दृष्टीने नवीन महापौरांनी विचार करावा.
- रशीद मामू, माजी महापौर

पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे
औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे या शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे महापौरांना लक्ष द्यावे लागेल. शहरातील पायाभूत सुविधा फारच कमकुवत आहेत. समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पांतर्गत काम करताना पैठणपासून शहरापर्यंत पाणी आणण्याचे काम प्राधान्याने केले पाहिजे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच चौकांच्या सुशोभीकरणाचा व विकासाचाही विचार झाला पाहिजे. अनेक चौकांमध्ये खड्डे आहेत. त्यामुळे चौक धोकादायक बनले आहेत. महापौरांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन टीम वर्कने काम केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. मालमत्ता कराची जास्त वसुली होते, त्या वॉर्डात जास्त सुविधा देण्याची योजना महापौरांनी जाहीर करावी. त्यातून चांगला संदेश नागरिकांपर्यंत जाईल व नागरिक कर भरण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.
- सुनील पाटील, अध्यक्ष, क्रेडाई

शैक्षणिक विकासासाठी मदत करावी
महापौरांनी शहरातील शैक्षणिक विकासासाठी मदत केली पाहिजे. सध्या शैक्षणिक संस्थांच्या मालमत्ता कराचा विषय महत्त्वाचा आहे. अनुदानित संस्थांना सरकारच मदत करते. त्यामुळे अशा संस्थांना व्यावसायिक दराने मालमत्ता कराची आकारणी करणे योग्य नाही. अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्था असा भेद करून कर आकारणी करण्याकडे महापौरांनी लक्ष दिले पाहिजे. औरंगाबाद शहराचे महत्त्व पर्यटनाच्या दृष्टीने खूप आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रात महापालिकेने पर्यटनासंबंधीचे विषय शिकवण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली पाहिजे. त्यासाठी महापालिकांच्या शाळांचा दर्जा सुधारण्याकडे महापौरांनी लक्ष द्यावे. नोटबंदीच्या निर्णयामुळे साक्षरता आणि ई-लर्निंग याला येत्या काळात महत्त्व येणार आहे. या दोन्ही क्षेत्रात महापालिकेला काम करावे लागेल. या कामासाठी शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. महापौरांकडून याच कामांची अपेक्षा आहे.
- जे. एस. खैरनार, प्राचार्य, स. भु. महाविद्यालय

सुंदर, निरोगी शहराकडे लक्ष द्यावे
आपले शहर स्वच्छ, सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि यासाठी तशा साक्षरतेची गरज आहे. ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. ही साक्षरता निर्माण करण्याचे काम महापौरांना करावे लागणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करावे लागेल. प्रामुख्याने वृक्षारोपणाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. माझे शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी असावे यासाठी महापौरांकडून जशा अपेक्षा आहेत, तशाच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडूनही आहेत. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारची साक्षरता आणण्याचा जे कुणी प्रयत्न करतात त्यांना दाबण्याचेच काम नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून होते. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे आव्हानही महापौरांसमोर आहे. हे शहर माझे आहे अशा भावनेतून काम करून शासनाच्या विविध योजना नवीन महापौरांनी आणल्या, तर येत्या काळात नागरिकांना कामांची प्रचिती येईल.
- बुद्धप्रिय कबीर, सामाजिक कार्यकर्ते

तज्ज्ञांची समिती स्थापन करावी
नगरसेवक हे लोकनेते असतात. ते एखाद्या विषयाचे तज्ज्ञ नसतात. महापौरदेखील त्यांच्यातीलच एक घटक आहेत. त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. निर्णय घेताना या समितीशी सल्लामसलत करावी. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा उपयोग महापौरांनी करावा, त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत महापौरांना पोचता येईल. सोशल मीडिया यासाठी उपयोगी पडू शकेल. सोशत मीड‌ियामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे आपल्या शहराचा तर काहीच प्रश्न उरणार नाही. नागरिकांना या मीड‌ियाच्या माध्यामातून आपल्या भावना महापौरांपर्यत पोहचवता येतील. फक्त महापौरांनी त्याची वेळोवेळी दखल घेतली पाहिजे.
- वैशाली टाकळकर, महिला प्रतिनिधी

महापौरांवर बाहेरचा दबाव नको
सर्व पक्षांच्या नेत्यांना सोबत घेतले, तर नवीन महापौरांना शहर विकासासाठी काम करताना फार अडचणी येणार नाहीत. सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाचे काम करणे सहज शक्य होईल. नगरसेवकांनाही विश्वासात घेऊनच महापौरांना काम करावे लागणार आहे. स्मार्ट सिटीचा मुद्दा फार वेगळा आहे. जुन्या शहराला याचा फार फायदा होणार नाही. उलट जुन्या शहरावर त्याचा ताण पडेल. हा ताण हलका करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. यासाठी महापौरांनी आयुक्तांना सोबत ठेवले पाहिजे. त्यामुळे निर्धारित वेळेत अपेक्षित कामे करता येणे शक्य होईल. नवीन महापौरांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यावर आयुक्त व सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी व शहर विकासासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करावा. सत्कार समारंभात त्यांनी वेळ घालवू नये. अकरा महिन्यांत फार काही काम होईल, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, पण या काळात शहरासाठी महापौरांना राज्य व केंद्र सरकारकडून मोठा निधी आणता येईल, या निधीतून भविष्यात कामे होतील. त्यामुळे व्यापक दृष्टिकोन ठेवून महापौरांनी काम करावे. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, ही घडी नीट बसवण्याचे काम महापौरांना करावे लागणार आहे. सध्या पगारावर जास्त खर्च केला जातो. विकास कामांशी खर्चाची सांगड घातली पाहिजे. महापौर शहरासाठी आत्मीयतेने काम करतात; तसेच काम आयुक्तांनी देखील केले पाहिजे. आयुक्तांच्या मनात शहराबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे. असे झाले तर महापौर-आयुक्तांच्या समन्वयातून विकासाची कामे योग्य प्रकारे होतील. महापौरांना स्वतःहून काम करू दिले पाहिजे. त्यांच्यावर कुणाचाही रिमोट कंट्रोल असू नये.
- संजय जोशी, माजी उपमहापौर

पक्षीय भेद पाळू नयेत
महापौरांनी पक्षीय भेद पाळू नयेत. विशिष्ट पक्षाचे लेबल लावून न घेता सर्वपक्षीयांचा महापौर म्हणून त्यांनी काम केले पाहिजे. नवीन होणारे महापौर भाजपचे असणार आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचा उपयोग आपल्या शहरासाठी करून घेतला पाहिजे. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारांकडून शहरासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर अकरा महिन्यांत इतिहास घडेल व मोठा निधी शहरासाठी प्राप्त होईल. हे सर्व करण्यासाठी महापौरांनी आपल्या पक्षातील, संघटनेतील ज्येष्ठांना मान दिला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. विनापरवाना बांधकाम झालेली गुंठेवारी भागातील घरे नियमित करण्याकडे महापालिकेचा कल आहे, पण ज्या बांधकाम व्यावसायिकांनी परवानगी घेऊन बांधकाम केले आहे, त्यांना मात्र कोंडीत पकडण्याचे काम केले जात आहे. अशा व्यावसायिकांना कोंडीत न पकडता त्यांच्यासाठी ‘अॅमिनिटी स्किम’ जाहीर करावी. त्यातून महापालिकेला दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. बिल्डर्सनी शहरातील रस्ते, दुभाजक, चौकांचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे दत्तक मागितले आहेत, पण महापालिकेने ते दिलेले नाहीत. महापालिकेचे असे धोरण का, हेच कळत नाही. महापालिकेने रस्ते, दुभाजक, चौक सुशोभीकरणासाठी बांधकाम व्यावसायिकांना दिले पाहिजेत. शहर विकासासाठी महापालिकेला मदत करण्यासाठी नागरिक तयार आहेत, पण महापालिकेने त्यांची मदत घेतली पाहिजे. त्यादृष्टीने महापालिकेच्या यंत्रणेची मानसिकता बदलण्याचे काम नवीन महापौरांना करावे लागणार आहे.
- राजेंद्रसिंग जबिंदा, बांधकाम व्यावसायिक

पर्यावरणाकडे लक्ष द्यावे
महापौरांकडून सामान्य नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात. त्यामुळे महापौरांनी निःपक्ष काम केले पाहिजे. त्यांच्यावर कुणाचाही रिमोट कंट्रोल नसावा. विविध क्षेत्रात काम करताना महापौरांनी तज्ज्ञांच्या समितीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यातून योग्य प्रकारे कामे होतील. शहरात पर्यावरणाची मोठी समस्या आहे. स्मार्ट सिटीचे तत्व ‘झिरो पोल्युशन’ असले पाहिजे. यासाठी नागरिकांनी देखील जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. महापौर सुशिक्षित असावा. त्यांना शहरातील प्रश्नांची किमान जाण असावी, ते ओपन माइंडेड असावेत. शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी महापौरांनी सर्व विषय बाजूला ठेवून प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. या क्षेत्रात अकरा महिन्यांत खूप काम करता येण्यासारखे आहे. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. महापौर व प्रशासनाने मिळून काम केले, तर त्यातून पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल, पर्यावरण समृद्ध होईल.
- विवेक ढाकणे, पर्यावरण तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : जिद्द-मेहनतीतून उद्योगभरारी

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
‘दोन वर्षे नोकरी केली. वेगळे अनुभव आले. मनासारखं वागता आले नाही. बंधनातून आपले ‌अस्त‌ित्वही सिद्ध करता आले नाही. मग मी काय करू. दिली नोकरी सोडून. आता मला वेगळं काही तरी करायचं आहे, यासाठी गावाकडे आलोय,’ असे स्पष्ट मत आई-वडिलांसमोर मांडणारे किरण जगताप यांना एका ध्येयाने झपाटले होते. उद्योगच उभारायचा आणि बेरोजगारांना रोजगार द्यायचा या उद्देशाने झपाटलेले जगताप यांनी आईवडिलांना आधी विचाराने आणि नंतर कृतीतून विश्वास दिला. तब्बल दोन-तीन वर्षांत दोन कंपन्यांची स्थापना केली. त्यासाठी त्यांना डोंगराएवढे कष्ट उपसावेच लागले आणि संघर्ष करावाच लागला. आज जगतापांच्या दोन कंपन्या असून, उलाढाल ८ कोटींवर आहे.
किरण प्रभाकर जगताप वैजापूर तालुक्यातील भौर गावचे रहिवासी. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण गावी झाले. यानंतर ते संजीवनी कोपरगाव (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे शिक्षणासाठी गेले. त्यांनी आठवीपासून ते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण संजीवनी एज्युकेशन सोसायटीत घेतले. ‌वडिल प्रभाकर जगताप आणि गयाबाई अतिशय साधे आणि सरळ आयुष्य जगणारे. घरी थोडीफार शेती. आईवडिलांचे संस्कार आणि अनुभवाच्या जोरावर किरण डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंग केले. दोन वर्षे गंगापूर शुगर फॅक्टरीत नोकरी केली. फॅक्टरी बंद पडल्याने नोकरी सोडावी लागली. त्यानंतर पुण्यात ६ महिने देवगिरी वॉर्नर येथे नोकरी केली. १९९९ ते २००१पर्यंत नोकरीतील अनुभव फारसे चांगले नव्हते. नोकरीत अवघड आहे फ्युचर होणार नाही, हे तेथे त्यांनी हेरले. घरी आले, आई-वडिलांना सांगितले की, नोकरी करणार नाही. त्यांनी आधी कडाडून विरोध केला. रडारड झाली, नंतर वेळ दिला, नोकरी सोडली. नंतर घरही सोडायची वेळ आली. घर सोडले. मित्राकडून २ हजार रुपये उधार घेतले औरंगाबादला आले. यानंतर किरण जगताप यांनी औरंगाबादला येऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
साई इंजिनीअरिंग नावाने चिकलठाणा येथे शॉप सुरू केले. ते सुरू करताना पार्टनर शोधावा लागला. आर्थिक़ पाठबळ मिळाले. तुकाराम मोरे या मित्राला पार्टनर केले. व्यवसाय सुरू केला. हे करताना चिकलठाण्यात जमीन घेणे, मशीनरी उभारणे, कामगारांची जुळवाजुळव करणे, भांडवल उभारणे, नुकसानीची तयारी ठेवणे आणि उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या वेगवेगळ्या परवानग्या यांचा अभ्यास सुरू केला. सातत्याने १८-२० तास कामांत झोकून दिले. शॉप सुरू केले. छोटेसे युनिट सुरू करून आपण आव्हान पेलले आहेच, तर एखादा कारखानाही सुरू करावा, ही मनातील इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. प्लॉस्टिक ग्रॅन्युएल्ससाठी लागणाऱ्या मशीनरीची निर्मिती करणे सुरू झाले. हळुहळु जम बसू लागला. स्टेट बँट ऑफ हैदाराबादने त्याकाळी मदत केली. यापूर्वी मात्र वर्षभरात त्यांनी स्वत: कामगारासारखे काम केले. कामगार, पर्चेस मॅनेजर, अकाउंट, निर्मिती (प्रोडक्शन), पॅकिंग, सेलिंग, मार्केटिंग असे विविध विभागातील कामे केली. सुरुवातीला आर्थिक अडचणी असल्या तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, हे ओळखले. भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू शकेल, मोक्याची जागा आहे का, तयार केलेल्या उत्पादनाला बाजारात किती प्रतिसाद मिळेल का, कच्च्या मालाचा पुरवठा योग्यरित्या होईल का याचा विचार केला. तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात केले. अनुभवसिद्ध होत २००२नंतर अधिक सतर्कता आली. शॉपचे रुपांतर ‘डायमंड इंडस्ट्रीज’मध्ये केले. ऑटो कंपोनंट व टू-व्हीलर, थ्री-व्हीलरला लागणारी विविध उत्पादने सुरू केली.
चिकलठाण्यात पार्टनरशिप होती, ती थांबविली. आता दुकान आणि एक फॅक्टरी अशी उलाढाल सुरू झाली. एमआयडीसी सेक्टर डब्ल्यू ७४ चिकलठाणा येथे नंतर मग दुसरीही फॅक्टरी सुरू केली. कास्ट-४ अॅल्युमिनिइम लिमिटेड ही फॅक्टरी सुरू केली.
यासंदर्भात जगताप सांगतात,‘उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घेतले. नोकरी करायचीच नाही. नोकरीत बंधने येतात आणि स्वप्ने अपुरी राहतात. पुन्हा नोकरी करत अस्थैर्याकडे वळायचेच नाही. चाकोरीबद्ध आयुष्य जगायचेच नाही व आता नोकरी करणारे हात होण्यापेक्षा नोकरी देणारे हात व्हायचे. या निर्णयावर मी कायम राहिलो.’
एकदा या क्षेत्रात यायचे निश्चित झाले की, सर्वप्रथम नकारात्मक भूमिकेला लाथ मारावी. आपले ध्येय निश्चित करावे. ते गाठण्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योजकतेत यशस्वी होता येते. सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास असावा. मेहनतीची तयारी ठेवावी. कितीही संकटे आली तरी हार मानू नये. केवळ कामगारांशीच नव्हे, तर कच्च्या मालाचे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्याशीही सलोख्याचे संबंध ठेवावेत. हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे किरण सांगतात. आजपर्यंतच्या संघर्षात पत्नी ऋतुजाने भरीव मदत केली. घरसंसाराचा गाडा हाकला आणि त्यामुळेच आपण फॅक्टरीत लक्ष देऊ शकलो, असे किरण जगताप आवर्जून नोंदवतात. डाय कास्टिंग, बुलेटचे लिव्हर, ब्रेक लिव्हर, यासह ऑटो कंपोनंट पाहून त्यांचे प्रोडक्ट आज व्हेरॉक, मधुरा डायकास्टिंग, स्वगत इंजिनीअरिंग अादी मोठे युनिट घेत आहेत. त्यांनी स्वत: मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही स्वत:च्या प्रोडक्टचा दबदबा निर्माण केला आहे. सातारा कोल्हापूर सांगली या भागातही त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्यांची व्हेंडरशीप आहे. स्वतः नियोजन, डिझाइन, ऑर्डर मिळवण्याच्या कामासह अकाउंट व फायनान्सचे काम करतात. त्यांनी स्वबळावर हे यश मिळवले. प्रत्येक टप्प्यावर ते शिकत गेले. काम हीच त्यांची आवड व छंद आहे. हेच त्यांच्या यशाचे गमक.

हार्ले डेव्हिडसन व इतरांना उत्पादन पुरवठा
हार्ले डेव्हिडसनसारख्या नामांकित कंपनीच्या वाहनांना ते सुटे भाग पुरवितात. सीटी १००सह इतर ऑटोमोबाइलचे पार्टही ते करत आहेत. एलईडी पार्ट, डायकास्टिंग करत ते आज दबदबा निर्माण करू शकलो आहेत. यामुळेच त्यांनी आता उद्योग विस्तारासाठी त्यांनी डीएमआयसीत अर्ज केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंब‌ित असूनही पानझडेंचे शपथपत्र

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील रस्त्यांच्या कामासाठी अधिकार नसतानाही मर्जीतील ठेकेदाराला काम दिले. या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी निलंबित असतानाही शपथपत्र दाखल केले. ही बाब लक्षात येताच खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या आयुक्तांनी व्यक्तीश: शपथपत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करावी. पानझडे यांच्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. कालिदास वडणे यांनी दिले.
शहरातील रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून व्हाइट टॉपिंगची कामे होणार होती. रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. जिल्हाधिकारी समितीचे सचिव व पालिका आयुक्त सदस्य आहेत. या निधीतून पहिल्या टप्प्यात कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, सेव्हन हिल्स ते सुतगिरणी चौक, कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर आणि गजानन महाराज चौक ते जयभवानी चौक या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. या कामासाठी निविदा काढण्यासाठी पालिका शहर अभियंत्यांनी दरपत्रक मागवले. कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या, पण त्यातील दोन निविदा तांत्रिक कारण दाखवून नाकारण्यात आल्या आणि जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निविदा मंजूर केली. विशेष म्हणजे यासाठी लागणारा १ कोटी ६७ लाख रुपयांचा अधिभार हा पालिकेच्या निधीतून देण्याचा ठराव घेण्यात आला. या चुकीच्या निविदा पद्धतीला नगरसेवक विकास येडके यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे.

भूमिका स्पष्ट करा
या याचिकेच्या अनुषंगाने समितीने दिलेल्या आदेशावरून महापालिका आयुक्तांनी चौकशी करून ९ सप्टेंबर रोजी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले आहे. असे असतानाही पानझडे यांनी २९ नोव्हेंबर रोजी या याचिकेत शपथपत्र दाखल केले. याचिका सुनावणीस निघाली त्यावेळी एडके यांचे बी. एल. सगर किल्लारीकर यांनी पानझडे यांच्या शपथपत्राला आक्षेप घेतला. त्यांनी महापालिकेची अथवा कोर्टाची परवानगी न घेताच शपथपत्र दाखल केल्याचे निदर्शनास आणून दिले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खंडपीठाने तिव्र नापसंती व्यक्त केली. पानझडे निलंबित असताना शहर अभियंता म्हणून दाखल केलेल्या व पालिकेच्या या शपथपत्रातील विसंगती विषयी भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुपे, राठोड यांचा आज राजीनामा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झालेल्या करारानुसार त्र्यंबक तुपे महापौरपदाचा, तर प्रमोद राठोड उपमहापौरपदाचा बुधवारी राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर दहा दिवसात नवीन महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे.
युतीत झालेल्या करारानुसार अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकाळापैकी पहिले दीड वर्ष महापौरपद शिवसेनेला देण्याचे ठरले होते. शिवसेनेने त्र्यंबक तुपे यांना महापौर म्हणून काम करण्याची संधी दिली, तर भाजपने प्रमोद राठोड यांना उपमहापौर केले. या दोघांचाही दीड वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हे दोघेही बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत आपापल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
सर्वसाधारण सभेत प्रशासकीय प्रस्तावांबरोबरच नगरसेवकांचेही काही प्रस्ताव आहेत. प्रस्तावांची विषयपत्रिका संपल्यावर तुपे व राठोड आपापल्या पदाचा राजीनामा देतील. सभागृहातील ज्येष्ठ सदस्याला महापौरांच्या खुर्चीत बसवून त्यांच्याकडे हे दोघेजण राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर हे राजीनामे आयुक्तांनी सीदर करून नवीन महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागेल असे मानले जात आहे.

सफारी पार्कला जागा अन् डीपी प्रकरण
तुपे आणि राठोड यांच्या कार्यकाळात महापालिकेला सफारी पार्कसाठी शासनाकडून शंभर एकर जागा मिळाली. हर्सूल तलावाच्या परिसरात जांभुळबन विकसीत करण्याचा कार्यक्रम झाला. एमजीएमच्या परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन विकसीत करण्याचे काम सुरू झाले. १५० कोटी रुपये खर्च करून ४४ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यासाठी पीएमसीच्या माध्यमातून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले, समांतर जलवाहिनीचा ‘पीपीपी’ तत्वावरचा करार देखील त्यांच्याच कार्यकाळात रद्द झाला, सुधारित शहर विकास आराखड्याचे प्रकरणही याच कार्यकाळात घडले, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएनपीटीच्या ड्राय पोर्टचे काम रखडलेलेच

$
0
0

Makrand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT

औरंगाबाद ः उद्योग क्षेत्रातील आयात-निर्यातीला चालना मिळावी, यासाठी मोठा गाजावाजा करून जालन्याजवळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) ड्रायपोर्टचे भूमिपूजन गेल्या २५ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. वर्षभरात या जागेवर एक इंचही काम झालेले नाही. हा प्रकल्प जालन्याऐवजी सद्यस्थितीत माळीवाडा येथे असलेल्या कंटेनर डेपोजवळच ठेवावा, अशी मागणी त्यावेळी उद्योजकांनी केली होती, पण राजकीय स्वार्थापोटी हलविलेल्या प्रकल्पाला पुढे गती न मिळाल्याने नेमका हा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
औरंगाबाद व जालना परिसरातील उद्योगांना आयात निर्यातीला मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या मदतीने जालना परिसरात ड्राय पोर्टची घोषणा केली. विशेष म्हणजे ड्रायपोर्ट औरंगाबादेत असावे की जालन्यात याबाबत वाद होता. औरंगाबाद व परिसरातील उद्योगांना जेएनपीटीवर माल पाठविण्यासाठी माळीवाडा परिसरात कंटेनर डेपो उभा करण्यात आला आहे. याच ठिकाणी जागा संपादित करून ड्रायपोर्ट करावे, अशी मागणी बड्या उद्योगांनी केली होती. कारण औरंगाबादहून उलटे जालन्यापर्यंत माल पाठवून ड्रायपोर्ट कशासाठी पाठवायचा, त्याचा अतिरिक्त खर्च कशासाठी सोसायचा, असा सवाल उपस्थित केला होता, पण राजकीय स्वार्थापोटी ड्रायपोर्ट जालन्याला उभारण्याचे निश्चित झाले. वर्षभरात जागा संपादित केली गेली. २५ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे भूमिपूजन झाले. ड्रायपोर्टचे काम लवकरात लवकर सुरू करून उद्योगांना चालना देण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. वर्ष उलटून गेले तरी या ठिकाणी इंचभरही काम झाले नाही. नाही म्हणायला संपादित केलेल्या ४०० एकर जमिनीभोवती संरक्षण भिंत बांधण्याची निविदा काढण्यात आली आहे. एकाच टप्प्यात सर्व भिंत बांधण्यात येणार असून, त्यासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कंपन्या औरंगाबाद व जालन्यातील आहेत. या व्यतिरिक्त अंतर्गत विकास तसेच दळणवळणासाठी रेल्वे उड्डाणपूल उभारावयाचा आहे. त्याच्या निविदा काढण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. भूमिपूजनानंतर काम सुरू होणे अपेक्षित होते, पण राज्य व केंद्रीय पातळीवरून अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत.

आज सादरीकरण
जेएनपीटी ड्रायपोर्टच्या वतीने बुधवारी औरंगाबाद व जालन्यातील उद्योजकांसोबत संवाद साधला जाणार आहे. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सायंकाळी सहा वाजता जेएनपीटी ड्रायपोर्टचे अध्यक्ष प्रकल्पाची माहिती देणार आहेत.

दृष्ट‌िक्षेपात ड्राय पोर्ट
- २५ डिसेंबर १५ रोजी भूमिपूजन
- ४०० एकर ड्रायपोर्टसाठी जागा
- ८० कोटी भूसंपादनासाठी अपेक्षित रक्कम
- १५० एकर जागा प्लॉट पाडून उद्योगांना विकणार
- कस्टम आणि नॉन कस्टम झोनसाठी स्वतंत्र जागा
- कॉमन सुविधा केंद्र उभारणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाभार्थींच्या याद्या ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लाभार्थ्यांची यादी बदलण्यावरून लोकप्रतिनिधींचा वाढता दबाव झुगारत समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी गेल्या वर्षी निवडलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ऑनलाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारपर्यंत सर्व याद्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहेत. शिवाय सोमवारी त्यांच्या दालनात घडलेल्या प्रकाराची माहिती समाजकल्याण आयुक्तांनाही दिली जाणार आहे.
समाजकल्याण अधिकारी मडावी यांच्या दालनात सोमवारी सकाळी समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, त्यांचे पती विजय चव्हाण, स्वीय सहायक कुकलारे आणि एक जण आले होते. गंगापूर तालुक्यातील २०१५-१६साठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून ऑइल इंजिन पुरविण्यासाठीची जी यादी केली होती. त्यात लाभार्थ्यांची नावे बदलावी, अशी मागणी चव्हाण यांनी मडावींकडे केली. त्यास नकार देताच दोघांमध्ये वादावादी झाली. हे प्रकरण सीईओ मधुकर अर्दड यांच्यापर्यंत गेले. नियमानुसारच कामे करावीत, असे अर्दड यांनी सांगितले आणि वाद शमला, पण या प्रकारानंतर मडावी यांनी धडक पावले उचलत गेल्या वर्षी विविध योजनांसाठी निवडलेल्या लाभार्थींच्या याद्या ऑनलाइन टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘समाजकल्याण खात्यामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यात विद्युत मोटर, ऑइल इंजिन, कडबा कटर, संगणक, मिरची कांडप, वॉटर फिल्टर, पीठ गिरणी, महिलांसाठी झेरॉक्स, स्प्रिंकलर, पिको फॉल मशीन, सायकल आदींचा समावेश आहे. गेल्या वर्षी या योजना राबविण्यासाठी लाभार्थी निवडले गेले. बहुतांश योजनांसाठी ३० लाखांची निधी दिला गेला, पण काही योजनांच्या याद्या निवडण्यात तांत्रिक अडचणी आल्या. निविदा प्रक्रियेत काही अडचणी आल्या होत्या. त्या दूर केल्या असून याद्या समाजकल्याण विषय समितीने मंजूर केल्या आहेत. या याद्यांमध्ये कुठलाही बदल करता येत नाही. ही माहिती सर्वांपर्यंत पोचावी यासाठी सर्व याद्या वेबसाइटवर टाकण्यात येतील.
२०१६-१७ या वर्षासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २० कोटींचे बजेट आहे. त्यातून गावे निवडताना निकष पाळणे जाणे आवश्यक आहे. त्यातून समाजमंदिर, रस्ते करणे अपेक्षित आहे. अनेकवेळा एकाच गावाचे प्रस्ताव सादर केले जातात. यंदा मात्र आम्ही त्यात बदल केला. तालुक्यात मागासवर्गीय रहिवाशांची संख्या तपासून त्या प्रमाणात निधी वितरित केला गेला. दलित वस्ती सुधार योजनेसाठी २४० गावांचे प्रस्ताव आले होते. त्यातून १७० गावे निवडली गेली. त्यांना १३ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्रुटी राहिलेली ७० गावे आणि प्रशासनाकडे आलेली १४३ गावांची यादी समितीसमोर सादर केली जाईल. त्यांना उर्वरित निधी दिला जाईल, असे मडावी यांनी सांगितले.

आयुक्तांकडे तक्रार
मडावी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या प्रकाराची माहिती समाजकल्याण आयुक्तांना दिली जाईल, असे मडावी यांनी पत्रकारांना सांगितले. सीईओ मधुकर अर्दड यांच्याकडे पत्र देऊन प्रशासकीय कामात लोकप्रतिनिधी वगळता कुणाची ढवळाढवळ होऊ नये, नियमानुसारच काम केले जाईल. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीही यासंदर्भात समज द्यावी, अशी मागणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीजवरील जागा ताब्यात घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दीर्घ मुदतीच्या लीजवर देण्यात आलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सात अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या अधिकाऱ्यांनी जागा ताब्यात घेऊन त्याच जागा पुन्हा लिजवर देण्यासाठी ई-टेंडरिंगद्वारे निविदा काढाव्यात, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी लीजच्या जागांचा प्रस्ताव ठेवला होता. ९९, ९० व ३० वर्षांसाठी लिजवर दिलेल्या जागांचे करार रद्द करण्याचा हा प्रस्ताव होता. ‘शिवाई सेवा ट्रस्ट’ व ‘मराठा सेवा संघ’ या दोन संस्थांना वगळून तो प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्यानंतर दहा दिवसांतत आयुक्तांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी आयुक्तांनी एक आदेश काढला. लीजवर दिलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे आयुक्तांनी या आदेशाद्वारे जाहीर केले आहे. समितीचे अध्यक्ष मुख्य लेखा परीक्षक असतील. त्याशिवाय कार्यकारी अभियंता तथा मालमत्ता विभाग प्रमुख, विधी सल्लागार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, मुख्य अग्निशमन अधिकारी, मालमत्ता अधिकारी यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

आठवड्यात बैठक
समितीने लीजच्या जागा ताब्यात घ्याव्यात, ई-टेंडरिंगद्वारे या जागेच्या पुन्हा निविदा काढाव्यात, महापालिकेच्या सर्व इमारती, हॉल भाडेतत्वावर द्यावेत, भाडे निश्चिती करावी, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करावा, असे आदेशही आयुक्तांनी या समितीला दिले आहेत. समितीने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घ्यावी. बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा अहवाल सादर करावा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑरिकमधील प्लॉटसाठी ८७१ जणांची नोंदणी

$
0
0

औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये (ऑरिक) पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीमध्ये ४३ एकरांतील ४९ भूखंडांची विक्री करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. ऑनलाइन पद्धतीने या भूखंडांची विक्री होणार असून, दुसऱ्या दिवशीपर्यंत ८७१ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भूखंडांचा निश्चित केलेला दर पाहता औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी लिमिटेडला (एआयटीएल) ५५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
दहा हजार एकर जमीन यासाठी संपादित केली गेली आहे. शापूर्जी पालंजी या कंपनीतर्फे पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरिक हॉलच्या भूमिपूजनप्रसंगी २८ नोव्हेंबरपासून भूखंड वाटप प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारपासून प्रक्रियेस सुरवात झाली. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. ती मिळविण्यासाठी इच्छुकांना वेबसाईटवर जाऊन ई-मेल आयडी द्यावा लागणार आहे. दोन दिवसांत ८७१ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. ३२०० रुपये चौरसमीटर असा दर भूखंडविक्रीसाठी निश्चित केला असून ४३ एकरावरील ४९ प्लॉटच्या विक्रीतून ५५ कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामीण जाणिवेचा अस्सल लेखक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बहुविध स्वरूपाचे लेखन करून साहित्यिक प्रा. आनंद यादव यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. केवळ लेखन करून ते थांबले नाही, तर ग्रामीण साहित्याची चळवळीद्वारे संमेलने घेतली. यादव यांचे अजोड योगदान नेहमी स्मरणात राहील,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेत मंगळवारी झालेल्या शोकसभेत ते बोलत होते.
‘झोंबी’, ‘नटरंग’, ‘गोतावळा’, ‘नांगरणी’ अशा दर्जेदार साहित्यकृतींचे लेखक आनंद यादव यांचे रविवारी निधन झाले. या उमद्या लेखकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मसापने शोकसभा घेतली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व कार्यवाह डॉ. दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘यादव यांच्या साहित्यात कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन असे बहुविध लेखन आहे. इतर ग्रामीण लेखकांप्रमाणे त्यांनी विनोदी लेखन न करता लेखनात वेगळेपण जपले. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते, मात्र ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीवर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला. हा वाद सामंजस्याने मिटणे आवश्यक होते. प्रत्यक्षात यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. ही कटू आठवण ठरली’ असे बोराडे म्हणाले.
‘प्रा. आनंद यादव यांनी ग्रामीण तरुणांना लिहिते केले. ग्रामीण साहित्याची चळवळ राबवली. या चळवळीत रा. रं. बोराडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, भास्कर चंदनशिव जोडले गेले. १९७६ मध्ये माझ्या पहिल्या कथासंग्रहाचे यादव यांनी प्रकाशन केले होते. ‘स्पर्शकमळे’सारख्या पुस्तकाद्वारे त्यांनी वेगळ्या लेखनाचा आदर्श घातला,’ अशी आठवण डॉ. दादा गोरे यांनी सांगितली. शोकप्रस्तावाचे ठाले-पाटील यांनी वाचन केल्यानंतर यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रा. बाळासाहेब बोरसे, प्रा. विष्णू सुरासे, सुनील उबाळे, प्रा. जिजा शिंदे, प्रा. जयराम खेडेकर, संदीप भदाणे आदी उपस्थित होते.

महामंडळ पाठीशी होते...
‘महाबळेश्वर येथील ८३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा यादव यांनी राजीनामा दिला होता. ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीमुळे वारकरी आक्रमक असूनही साहित्य महामंडळ यादव यांच्या पाठिशी होते. मात्र, कराड येथून कुणीतरी यादव यांना धमकीचा फोन केल्यानंतर त्यांची मुलगी घाबरली. डॉ. वि. भा. देशपांडे आणि आम्ही विनवणी करूनही यादव राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. गैरसमज व दुराग्रहातून संमेलनाचा कटू इतिहास निर्माण झाला,’ असे ठाले-पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांनी घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
त्र्यंबक तुपे बुधवारी महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांना दीड वर्ष साध देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी मंगळवारी महापौर बंगल्यात आयोजित कार्यक्रमात निरोप घेतला. कर्मचाऱ्यांबरोबर सप्निक भोजन केले, साडी-चोळी व भेट वस्तूंचा आहेर देखील केला. यावेळी कर्मचारी गहिवरले. ‘आजपर्यंत असा निरोप कोणत्याही महापौरांनी घेतला नाही,’ असे काहीजण खासगीत बोलत होते.
१९ नोव्हेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यासभेच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी त्र्यंबक तुपे यांनी महापौर बंगल्यात दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन केले होते. या स्नेहमिलनाला त्यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित केले होते. त्यात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अनाथाश्रमातील मुले, एड्सग्रस्त मुलांना देखील समावून घेण्यात आले होते. महापौर पती-पत्नीने या सर्वांसोबत त्यावेळी भोजनाचा आनंद लुटला. मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना भेट वस्तू दिल्या. त्यानंतर मंगळवारी त्यांनी कर्मचाऱ्यांना महापौर बंगल्यात भोजनासाठी बोलावले. महापौर बंगल्यात काम करणाऱ्या महिला-पुरूष कर्मचारी, महापौर कार्यालयात काम करणारे कर्मचारी, सचिव विभागात काम करणारे कर्मचारी यांचा त्यात समावेश होता. या सर्वांनी तुपे यांना दीड वर्ष साथ दिली. या कर्मचाऱ्यांच्या बरोबरच तुपे यांनी महापालिकेतील सर्व गटनेत्यांना देखील स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधीपक्षनेते अय्युब जहागीरदार देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले मात्र सहभागी झाले नाहीत, महापालिकेतील कार्यालयात ते बसून होते.

कर्मचारी गहिवरले
तुपे यांच्या पत्नी सविता तुपे यांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत भोजन केले. भोजनासाठी गाजराच्या हालव्याचा मेनू होता. भोजनानंतर साडी-चोळी देऊन त्यांनी या कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला व आभार मानले. तुपे यांनी अन्य कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्याचे ऋण व्यक्त केले. अशा प्रकारच्या निरोप समारंभामुळे सर्वच कर्मचारी गहिवरून गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images