श्रावण महिन्यातील दर शनिवारी श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भक्तांना रस्त्यावरील खड्ड्यातून अंधारात चालावे लागते. खुलताबाद नगरपालिकेने पथदिव्यांची व्यवस्था करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा भद्रा मारुतीच्या भक्तांसाठी अनोखे आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे मुकेश मालोदे, अजय चौधरी, शिवदास सोनवणे, अक्षय खरोटे, शेखर केनेकर आदींनी मुख्याधिकारी वैशाली डोंगरजाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
↧