घाटी हॉस्पिटलमधील मेडिसीन व सर्जरी विभागासाठी सेंट्रल ऑक्सिजनचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळखात पडून होता. यासाठी आवश्यक असणारे लायसन्स घाटी हॉस्पिटलला अखेर मिळाले आहे. त्यामुळे दोन महिन्यांत सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
↧