सिल्लोड तालुक्यात मका पिकाचे सर्वाधिक उत्पादन होत असते. यंदा शेतकऱ्यांनी बियाणे पेरले होते. मात्र, काही ठिकाणी पिकाला कणसे लागली नाहीत. तसेच कणसात दाणे भरले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश मानकर पाटील यांनी केली आहे.
↧