बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (बीडीसीसी) परळीच्या संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला १२ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी बुधवारी आमदार धनंजय मुंडे व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित मुंडे यांच्यासह पंधरा संचालकांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
↧