राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रोटेगाव (ता. वैजापृर) येथे घरावर छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या दारूची किंमत तीस हजार रुपये आहे. याप्रकरणी शिवकुमार व्यंकटेश सुद्दाल याच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧