गेल्या उन्हाळ्यात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न तापल्याचा इतिहास ताजा असताना पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा पाण्याची पळवापळवी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. दारणा प्रकल्पाच्या पाणलोटात मोठा पाऊस झाल्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या, उजव्या कालव्यांतून पाणी नगर जिल्ह्यात वळविण्यात येऊ लागले आहे.
↧