Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आमदारांनी घेतला विद्यार्थ्यांचा वर्ग

$
0
0
तालुक्यातील दुर्गम भागातील शंकरपूरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आमदार प्रशांत बंब यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

युवकांचे शोले स्टाइल आंदोलन

$
0
0
बीड जिल्ह्यातील रायमोह येथे सरकारी कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहत नसल्याच्या निषेधार्थ काही युवकांनी गावातील झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास दाखल

$
0
0
खुलताबाद बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांच्या विरोधात १३ सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्यावर निर्णयासाठी येत्या चार किंवा पाच ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे.

पवार हे शेतक-यांचे नेते नसून ‘IPL’चेच

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. पण हे जाणते राजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावदेण्यापेक्षा आयपीएल टीमला भाव मिळवून देण्यात मग्न असतात.

‘नांदेडच्या दृष्टीने निर्णय योग्यच’

$
0
0
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतलेला निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

हायकोर्टाच्या निर्णयाने लातुरात आनंदोत्सव

$
0
0
महसूल आयुक्तलयाची नांदेडला झालेली राज्य सरकारची घोषणा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द करून महसूल कायद्या प्रमाणे प्रक्रिया करण्याचा निर्णय दिल्यामुळे लातुरात आनंद व्यक्त केला जात आहे.

‘NSS’ शिबिरांचा पारंपारिक चेहरा बदलणार

$
0
0
राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमध्ये आलेला तोचतोपणा आता पूर्णपणे बदलणार आहे. योजनेत सहभागी विद्यार्थी स्वयंसेवकांना आता त्यांच्या विषयाशी संबंधित प्रकल्प देऊन, त्यावर काम करून घेतले जाणार आहे.

जायकवाडीत पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

$
0
0
जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा करण्यापूर्वी जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करावी, अशी मागणी समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

अपु-या यंत्रणेतही १० हजार पेशंटना लाभ

$
0
0
मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात उद्घाटनानंतर सरकारने अत्यंत तोकडी व्यवस्था उपलब्ध करून दिली. तशातच स्थानिक प्रशासनाने वर्षभरात १० हजार पेशंट तपासले. ६५० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या.

PPP, वॉटर बायलॉजला मान्यता द्या

$
0
0
औरंगाबाद शहराचा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर करण्यासाठी तात्काळ मंजुरी द्या व पालिकेच्या वॉटर बायलॉजलाही मंजुरी द्या, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

‘देवळाई’च्या मागणीमुळे सातारा पालिका लांबली

$
0
0
प्रस्तावित सातारा नगरपालिकेत देवळाई गावाचाही समावेश करण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे सातारा नगर पालिकेच्या स्थापनेची अधिसूचना लांबलेली आहे. आता देवळाईच्या मागणीची फाइल पुढे सरकली आहे.

सरकारी कर्मचा-यांची उद्या राज्यव्यापी निदर्शने

$
0
0
महागाई भत्त्याची थकबाकी, खासगी कर, कंत्राटीकरणाला विरोध यांसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे बुधवारी (२५ सप्टेंबर) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

चॉईस नंबरमधून १३ लाखांची कमाई

$
0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या सुरू असलेली मोटारसायकलची 'सिव्ही' सिरीज संपली असून नवीन सिडब्ल्यू सिरीज बुधवारपासुन सुरू करण्यात येणार आहे.

सिडकोत १७ दुकाने सील

$
0
0
आठ वर्षांपासूनचा मालमत्ताकर थकल्यामुळे पालिकेच्या पथकाने मंगळवारी सिडको एन-६ येथील आझाद चौकात असलेल्या प्रेमसागर कॉम्प्लेक्समधील १७ दुकाने सील केली.

थरारक पाठलाग ५ किलोमीटरचा

$
0
0
या धाडसी दरोड्याच्या घटनेत पोलिसांनी पाच किलोमीटर दरोडेखोरांचा थरारक पाठलाग केला. नाक्यावर सुसाट वेगाने आरोपींची गाडी निघालेली असतानाच तोच सिल्लेगाव पोलिसांची एक गाडी पेट्रोलिंग निमित्त त्याठिकाणी आली.

मतदार नोंदणीसाठी सेना सरसावली

$
0
0
शिवसेनेने शहरातून सुमारे एक लाख मतदार नोंदवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. मतदार यादी निरीक्षण कार्यक्रमात वगळलेले मतदार नोंदवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

नगरसेवक अस्वस्थ

$
0
0
महापालिकेच्या बजेटला हायकोर्टाने ‘जैसे थे’चा आदेश दिल्यामुळे दोनशे कोटी रुपयांची विकास कामे संकटात सापडली आहेत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

‘देवगिरी’वर दरोड्याचा प्रयत्न

$
0
0
आरपीएफच्या (लोहमार्ग पोलिस) जवानांनी सतर्कता दाखवत दरोडेखोरांशी सामना केल्याने मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवरील दरोड्याचा प्रयत्न फसला.

आधार कार्डाची प्रिंट महागली

$
0
0
वेबसाइटवरून आधार कार्डाची प्रत मिळविणे आता महागले आहे. ब्लॅक अँड व्हाइट कार्डासाठी पाच रुपये व रंगीत कार्डासाठी पंधरा रुपये द्यावे लागतील. देशभरातील नागरिकांना आधार ओळखपत्र देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

टोलनाक्यावर सशस्त्र दरोडा

$
0
0
चेह-यावर मास्क लावलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत काही क्षणातच औरंगाबाद - नगर रोडवरील टोलनाका लुटला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>