Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना आधार

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT

औरंगाबाद : रस्ते, वीज, पाणी व घनकचरा अशा विषयांत गढून गेलेल्या महापालिकेने समाजिक जबाबदारी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी होस्टेलची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या आठ फ्लॅटमध्ये ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सरकारी मदतीबरोबर अनेक सामाजिक संघटनांनीही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असतो. वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे मुलींचे शिक्षण आहे तेथेच थांबते. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन एक अभिनव उपक्रम राबवण्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ठरविले आहे.

शहराच्या बीड बायपास रस्त्यालगत महापालिकेच्या मालकीचे आठ फ्लॅट आहेत. सध्या ते फ्लॅट वापरात नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी हे फ्लॅट वापरण्याचे बकोरिया यांनी ठरविले आहे. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनाच या होस्टेलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना राहण्याचे शुल्क आाकरले जाणार नाही. जेवणाचा खर्च मात्र त्यामुलींना स्वतः करावा लागणार आहे. पालिकेच्या अशा होस्टेलमध्ये मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मुलींकडून अर्ज मागविले जाणार आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी करून ५० ते ६० मुलींना होस्टेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षापासून होस्टेल सुरू केले जाणार आहे.

सुरक्षेची घेणार काळजी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी महापालिकेच्या फ्लॅटमध्ये होस्टेल सुरू केल्यानंतर तेथील सुरक्षेची काळजीही घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीचे फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटला संरक्षक भिंती आहेत. त्याचबरोबर तेथे पाण्याचीही व्यवस्था आहे. महापालिकेकडून होस्टेलवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी स्वतः स्वयंपाक करू शकतात. त्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींना होस्टेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना आधार देण्याचा उपक्रम राबविणारी औरंगाबाद महापालिका राज्यात पहिलीच असावी.

सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींचे त्याला सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. आत्महत्य केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींना कुणाचाच आधार नसतो. त्यांचे शिक्षणाही बंद होते. त्यामुळे त्यांना आधार देण्याचा व त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाला जास्त प्रतिसाद मिळाला, तर महापालिकेच्या रिकाम्या असलेल्या अन्य काही वास्तू होस्टेलसाठी वापरण्याचा विचार केला जाऊ शकतो. - ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूमाफियांवर घाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूलिलावाकडे संगनमताने पाठ फिरवून तस्करीद्वारे चोरटी वाहतूक करत स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या पांढपेशी माफियांच्या वर्मावर बुधवारी महसूल प्रशासनाने नेमका घाव केला. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रकसह मुरूम, दगडाची चोरीछुपे विक्री करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.
सकाळी पाच ते आठच्या सुमारास चिकलठाणा तसेच करमाड परिसरामधून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सतीश सोनी यांच्यासह मंडळ अधिकारी अनिल शिंदे, कैलास थोरात, प्रभाकर मुंढे, रेवनाथ ताठे, तलाठी संतोष लोळगे, सुभाष वाघ यांच्या पथकाने धाव घेतली. अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे वाळूचे सात ट्रक, आडगाव परिसरामध्ये मुरुमाची वाहतूक करणारा एक हायवा, तर दगड वाहून नेणारा एक ट्रक अशी एकूण नऊ वाहने पकडण्यात आली. यातील वाळूच्या पाचही गाड्या करमाड पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्या असून चार वाहने तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वीच अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या अचानक पाहणी दौऱ्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. जप्त केलेल्या वाहनांमधील वाळूची बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम दंड स्वरुपात भरावी लागणार आहे.

दंडाचा फंडा
गेल्या वर्षी वाळूसाठ्यांना मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणावर महसूलला फटका बसला. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा तसेच विक्रीचे प्रमाण वाढले होते. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी अवैध गौणखणिज तसेच वाळू वाहनांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देत दंडाच्या स्वरुपात मोठी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली होती. यंदाही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवली असून बेकायदा उपसा व विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने गेल्यावर्षीप्रमाणे महसूलासाठी दंडाचा फंडा अवलंबला आहे.

वाळूचोरीप्रकरणात कारवाई करण्यात आलेली पाच वाहने करमाड पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहेत, तर चार वाहने तहसील कार्यालय औरंगाबाद येथे घेऊन आली आहेत. या प्रकरणात गुरुवारी पंचनामा करण्यात येणार आहे. - सतीश सोनी, तहसीलदार औरंगाबाद

पकडलेली वाहने
- एम. एच. २० डीई ९८८२
- एम. एच. २१ वाय ७३५३
- एम. एच. २० डीई ९८०१
- एम. एच. २० बी. टी १३१३
- एम. एच. २० बीटी ३२३५
- एम. एच. २० सीटी ९०८२
- एम. एच. २० सीटी ९७१७
- एम. एच. २० एबी ९२५०
- एम. एच. २० सीएच ९३१०

या वाहनांवर कारवाई
- ७ वाळू ट्रक
- १ मुरूम हायवा
- १ दगड ट्रक
- ९ वाहनांवर कारवाई
- २० ट्रक आजपर्यंत पकडल्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नसंच खरेदी संशयाच्या फेऱ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनाचे एकेक कारनामे, घोटाळे उघडकीस येत असताना आता दहावी विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या प्रश्नसंच पुस्तिकांचे प्रकरण संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. या व्यवहाराच्या चौकशीची शिफारस लेखा परीक्षण अहवालात करण्यात आली आहे.
महापालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुस्तिकांच्या खरेदीसाठी २०१३ मध्ये १ लाख ७९ हजार ६१० रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये प्रश्नसंचांची खरेदी केली. ही खरेदी शिक्षण विभागाने विनानिविदा केल्याचा ठपका लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. निविदेशिवाय खरेदी कशी केली, याचा खुलासा शिक्षण विभागाकडून मागवला, पण लेखा परीक्षण अहवाल अंतिम होईपर्यंत त्याचा खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे या संदर्भात संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कार्यवाही करावी व त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
प्रश्नसंच पुस्तिका खरेदीसाठी जाहीर प्रकटन, सूचना कोणकोणत्या वर्तमानपत्रात देण्यात आली त्याची कात्रणे लेखा परीक्षणासाठी शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. ज्या पुरवठादाराकडून प्रश्नसंचांची खरेदी केली, त्या पुरवठादाराला प्रश्नसंच पुरवठा करण्यासाठी दिलेल्या आदेशाची झेरॉक्सप्रत देखील लेखा परीक्षणासाठी प्राप्त झाली नाही. त्यामुळे लेखा परीक्षण अहवालात प्रश्नसंचांच्या वितरणाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे.

नोंदवही दाखवली नाही
लेखा परीक्षणासाठी जी कागदपत्रे प्राप्त झाली, त्यावर एलबिटी (स्थानिक संस्था कर) चा नोंदणी क्रमांक नाही. त्यामुळे पुरवठादाराच्या बिलातून एलबीटीची रक्कम कपात झाली की नाही, याचे स्पष्टीकरण होत नाही. वास्तविक पाहता पुरवठादाराने एलबिटी भरणे गरजेचे होते. पुरवठादाराकडून पालिकेला प्रश्नसंचांचा पुरवठा झाल्याचे रजिस्टर मधील नोंदींवरून स्पष्ट होते, पण १२ शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वितरित केल्याचे स्टॉक रजिस्टर मात्र शिक्षण विभागाकडून लेखा परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दोन प्रकरणांत घोळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या पेस्ट कंट्रोल प्रकरणात आणखी दोन फायलीचा घोटाळा उघड होण्याच्या मार्गावर आहे. या फाइलींची शोध मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या प्रकरणात कारवाईच्या भीतीने आरोग्य व लेखा विभागातील काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बनावट स्वाक्षरींच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ९७ हजार रुपयांचे बिल उचलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला. या प्रकरणात अजिंठा पेस्ट कंट्रोल या एजन्सीच्या संचालकाविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारानंतर बनावट स्वाक्षऱ्याकरून पेस्ट कंट्रोलचे बिल काढण्याची फाइल तयार करण्यात आल्याचे दुसरे प्रकरण देखील उघडकीस आले. त्यामुळे पालिका आयुक्तांनी आरोग्य विभाग, लेखा विभाग आणि घनकचरा विभागातील कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या विभागातून गेल्या तीन वर्षांत कोणकोणत्या प्रकारची बिले मंजूर करण्यात आली व बिले काढण्यात आली याची चौकशी आता केली जाणार आहे.
दरम्यान बनावट स्वाक्षरी करून बिल उचलण्यात आल्याच्या दोन फायलींची चर्चा पालिकेत सुरू आहे. त्यातील एक फाइल २६ लाख रुपयांची आहे, तर दुसरी फाइल सव्वासहा लाख रुपयांची आहे. या फाइल नेमक्या कोणत्या संस्थेच्या आहेत याचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ लाखांचे पेमेंट करण्यात आले आहे, त्याची माहिती मिळताच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी देखील करण्यात येत आहे. काम न करता संस्थेला पेमेंट देण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. दुसरी सव्वासहा लाखांची फाइल मात्र गायब करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सव्वासहा लाख रुपयांचे बिल देखील उचलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा प्रकार आयुक्तांसमोर जाऊ नये, यासाठी संपूर्ण फाइल गायब करण्यात आल्याची चर्चा आहे. पेस्ट कंट्रोल प्रकरणात बनावट स्वाक्षरींच्या माध्यमातून बिल उचलण्यात आल्याची प्रकरणे उघड होत असल्यामुळे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लेखा विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभागातील काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लिपिकांना कारणे दाखवा
पेस्ट कंट्रोल प्रकरणात चौकशी समिती नियुक्त केल्याचे आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या समितीचा अहवाल आल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंड्यात ज्वारीचे कोठार बहरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेल्या परंडा तालुक्यात यंदा पांढऱ्या शुभ्र रब्बी ज्वारीचे पीक चांगलेच बहरले आहे. सततच्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर यंदा बहरलेल्या ज्वारी पिकामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. यंदा सप्टेंबर अखेर झालेल्या दमदार पावसामुळे परंडा तालुक्यातील लहान मोठी धरणे शिवाय नदी नाले, जलयुक्त शिवारातून पाणी साचलेले असल्याने रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात आहेत.

यंदा पाण्याच्या उपलब्धतेमुळे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीचे परंपरागत असलेल्या ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. शिवाय उस लागवडीतही लक्षणीय वाढ झाली. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल असल्याने सध्या रब्बी ज्वारीची वाढ ही जोमात आहे. सध्या ज्वारी निसवून कणसे बाहेर पडू लागली आहेत. संपूर्ण परंडा तालुक्याबरोबरच भूम तालुक्यातील काही गावातूनही ज्वारीचे पीक जोमात असल्याचे चित्र आहे.
पांढरी शुभ्र पाणीदार व चवदार ज्वारी म्हणून परंडा तालुक्याची ओळख निजाम काळापासून आहे. आजही शासन व प्रशासन दरबारी रब्बीचा तालुका अशीच परंड्याची ओळख आहे. पोटऱ्यात असलेल्या ज्वाऱ्या निसवून कणसे बाहेर पडू लागल्याने आता ज्वारीचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला असून, शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडल्यामुळे शिवाय शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा, करडी ही पिके हिरवीगार व जोमदार असून हरभरा फुलोऱ्यात तर ज्वारी हुरड्यात आली आहे. गव्हावरही कोवळ्या ओंब्या दिसू लागल्या आहेत. जिल्ह्यात यंदा रब्बीची सर्वत्र पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. अशास्थितीत विविध पक्षी या पिकांवरील कणसाकडे आकर्षित होत असून कणसातील कवळे दाणे टिपून आपली भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या चार वर्षानंतर यंदा कोवळे दाणे टिपायला मिळत असल्याने शिवारांमधून पक्ष्यांचा वावर वाढलेला असताना बहुतेकांकडून बुजगावण्यांसह विविध क्लुप्त्या वापरून शेतीसाठी राखणे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्र रुतले; मंदीचा फेरा !

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे परिणाम औद्योगिकनगरी औरंगाबादमध्ये पाहावयास मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत मोठ्या उद्योगांमधील उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट झाल्याने तब्बल ४० हजार कामगारांवर बेरोजगारची कुऱ्हाड कोसळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील ५० दिवसांत आर्थिक घडी पुन्हा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या बंदीनंतर अनेक क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला. वास्तविक केंद्राने नोटबंदी जाहीर झाल्यानंतर नवीन चलनाचे वितरण योग्य पद्धतीने होणे अपेक्षित होते, पण तसे न झाल्याने दैनंदिन व्यवहारावर विपरित परिणाम झाला. अडीच महिन्यात चलन योग्य प्रमाणात न फिरल्याने उद्योग क्षेत्रावरही विपरित परिणाम झाला आहे. औरंगाबादेत दुचाकी निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती करणारे अँकर प्रोजेक्ट आहेत. त्यांना सुटे माल सप्लाय करणारे ४०० हून अधिक अॅन्सीलरी युनिट आहेत. या युनिटला अन्य साधनसामग्री पुरविणारे युनिट ३००० च्या घरात आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या तीन लाखांच्या घरात आहे. गेल्या चार वर्षांपासून अनेक मोठ्या, मध्यम उद्योगांनी स्थायी कामगार ही संकल्पना कमी प्रमाणात राबवित कंत्राटी पद्धतीने कामगार भरतीचे धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारले. त्यामुळे वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमध्ये जवळपास दोन लाख कंत्राटी, हंगामी, अॅप्रेंटिस कामगार आहेत. हे कामगारही कुशल असले तरी ते स्थायी नसल्याने त्यांना मिळणारे लाभ कमी प्रमाणात आहेत. नोटबंदीनंतर उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाहने, वस्तूंच्या खरेदीसाठी ५० टक्क्यांची घट झाली. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. मागणीच नसल्याने कंपन्यांनीही उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांची घट केली आहे. त्याचा परिणाम कामगार कपातीवर झाला आहे. साहजिकच उत्पादनात घट झाल्याने त्याचा पहिला फटका कंत्राटी, हंगामी कामगारांना बसला आहे. कामगार संघटनांनी केलेला सर्वे आणि उद्योजकांच्या अभ्यासानुसार औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ३० ते ५० हजार कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. दोन लाख कामगारांपैकी २५ टक्के कामगारांना सरासरी पाच ते सहा दिवसच काम मिळत आहे. त्यामुळे अनेक घटकांवर परिणाम झाला आहे. कामगारांचे आर्थिकचक्र बिघडल्याचा परिणाम शहरातील अन्य व्यवसायांवरही पाहावयास मिळत आहे.

नोटबंदीने कामगारवर्गात चिंतेचे वातावरण आहे. उत्पादनांची मागणी घटल्याने कंपन्यांनी उत्पादनातही ४० ते ५० टक्क्यांची घट झाली. त्याचा परिणाम कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर झाला. कामगारांची रोजगार कपात झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. - उद्धव भवलकर, कामगार नेते

नोटबंदीचा परिणाम विविध घटकांवर झाला आहे. उद्योगांच्या उत्पादनात झालेली घट ही साहजिकच कामगारांच्या रोजगारावर विपरित परिणाम करणारी आहे. त्यामुळे कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. - अर्जुन गायके, ज्येष्ठ उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज हाउसचे काम रेंगाळल्यास कंत्राट रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हज हाउसचे काम सहा महिन्यांनी मागे पडले आहे. या कामाचा वेग वाढविला नाही, तर हे कंत्राट रद्द करू,’ असा इशारा सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी हज हाऊसच्या कंत्राटदाराला दिला.
हज हाउस बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे आमदार इम्तियाज जलील आणि सिडको प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी हज हाउसच्या निर्धारित इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या कामाच्या पाहणीसाठी नियुक्त केलेल्या अभियंत्यांशीही त्यांनी चर्चा केली. या कामासाठी ७० मजुरांची गरज असताना फक्त १० मजूर लावून काम केले जात आहे. त्यामुळे कामाला उशीर होत असल्याचे अभियंत्याने सांगितले.
केंद्रेकर यांनी एलोरा कन्ट्रक्शनचे अन्वर खान यांना याबाबत विचारणा केली. आतापर्यंत ७० लाखांचे काम झाले आहे. मात्र, सिडकोने फक्त ११ लाख रुपये दिल्याची माहिती अन्वर खान यांनी दिली. कंत्राटदाराने कामाचा वेग वाढवावा. ‘या अडचणीबाबत सिडको प्रशासकीय कार्यालयात गुरुवारी बैठक घेऊ. हज हाऊसचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करा. ते शक्य नसेल, तर कंत्राट रद्द करण्यास मागेपुढे पाहणार नाही. निधीची अडचण नाही. काम वेगात करून घेण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालू,’ असे केंद्रेकर यांनी आमदार जलील यांना सांगितले.

अभियंत्याला धरले धारेवर
हज हाऊसच्या कामासाठी तीन अभियंते नेमण्यात आले आहेत. त्यांनी या कामाची पाहणी करून अहवाल सादर करायचा असतो. ‘हज हाऊसचे काम वेगात होत नाही. याबाबत तुम्ही काय करत होता. काम वेगात होत नसल्याबद्दल अहवाल का देण्यात आला नाही,’ असे प्रश्न विचारून केंद्रेकरांनी अभियंत्याला धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकृष्ण बाबांच्या सुनेने मागितले शिवसेनेचे तिकीट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या सूनबाई वैशाली पाटील यांनी शिवसेनेकडून तिकीट मागून वैजापूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बाजार समिती निवडणुकीत बाबा गट शिवसेनेसोबत होता. त्या पार्श्वभूमीवर भविष्यात तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची चिन्हे आहेत.
वैजापूर तालुक्यातील लासूरगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. हा गट सध्या शिवसेनेकडे आहे. गेल्या वेळी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलेल्या लासूरगावमधून मनाजी मिसाळ निवडून आले होते. यावेळी गटाचे आरक्षण बदलल्याने इच्छुकांची शिवसेनेकडे गर्दी वाढली आहे. वैजापूर बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार आर. एम. वाणी आणि माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. तेव्हापासूनच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. आता झेडपीसाठी बाबांच्या सुनेसाठी उमेदवारी मागितल्याने काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या सुनेस हवी काँग्रेसकडून उमेदवारी
माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांची दुसरी सून प्रतिभा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आपेगाव गटातून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. एका सुनेने सेनेतून, तर दुसऱ्या सुनेने काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

सुनेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली आहे. तालुक्यात पक्षाला ताकद देणारा नेता राहिला नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आधार नाही. श्रेष्ठींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - रामकृष्णबाबा पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते

आमच्याकडे वैशाली पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. सध्या उमेदवार चाचपणी सुरू आहे. आता पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नक्कीच पुढील ती कार्यवाही होईल. - अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुले हवीत, पण पत्नी नको!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न होऊन सात वर्षे झाली. दोन अपत्येही झाली, मात्र नंतर पत्नीशी पटेनासे झाले. आईकडे राहण्यास गेलेली पत्नी बँक मॅनेजर असलेल्या पतीला दीड वर्षाच्या मुलासह भेटायला आली. पतीने पत्नीकडून मुलाला ताब्यात घेतले आणि घर गाठले. पत्नीने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. मग पोलिसांनी पतीसह नातेवाईकांचे समुपदेशन केले आणि पतीच्या ताब्यात असलेली दोन्ही मुले शेवटी आईच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांना अडीच ते तीन तास कसरत करावी लागली.

मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारांची पोलिसांत चर्चा आहे. जिन्सी भागातील एक तरुण निराला बाजारातील एका खासगी बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. या मॅनेजरला पाच वर्षे व दीड वर्षे वयाची दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत. पत्नीला नांदवायची पतीची इच्छा नाही. या महिलेचे माहेर गारखेडा पुंडलिकनगर भागात अाहे. वादामुळे तिने पतीचे घर सोडले. ती आईसोबत राहते. दोन दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या मुलाला या महिलेने पतीच्या घरी सोडले होते. दीड वर्षाचा मुलगा तिच्यासोबत राहत होता. मंगळवारी ती पतीला भेटण्यासाठी थेट बँकेत गेली. तेथे त्यांच्यात वाद झाला. पतीने तिच्या ताब्यातील दीड वर्षाचा मुलगा स्वतःकडे घेऊन थेट घर गाठले. या प्रकाराने बँकेतील कर्मचारीही अवाक् झाले.

पतीने मुलाला नेल्यामुळे पत्नी संतापली. तिने जवळच असलेले क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना तिने हा सारा प्रकार सांगितला. घरगुती भांडण असल्याने काय करावे, असा प्रश्न क्रांतिचौक पोलिसांना पडला. दरम्यान, ही महिला पोलिस ठाण्यात आल्याची माहिती पतीच्या काही नातेवाईकांना समजली. ते लगेचच पोलिस ठाण्यात आले.

दोन तासांचे प्रयत्न
पोलिसांनी या नातेवाईकांना सांगून पतीला मुलासह बोलावून घेतले. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले. शेवटी पतीने दोन्ही मुले पत्नीच्या स्वाधीन केली. पोलिस निरीक्षक किरण पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, जमादार जैस्वाल यांच्या प्रयत्नांना दोन तासानंतर यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घेऊ नका टेन्शन, करा वेळेचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रश्नपत्रिकेच्या ‘पॅटर्न’पासून अचूक उत्तरे कशी लिहावी, विज्ञान, गणितातील आकृत्या रेखाटताना कोणती काळजी घ्यावी, प्रश्नांची विभागणी, व्याकरण, वाक्यरचना कशी असावी, प्रश्नांचे गुणानुसार वेटेज..., दहावीच्या विद्यार्थ्यांना पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे बुधवारी मिळाली. औचित्य होते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘दहावी परीक्षेचे घेऊ नका टेन्शन’ उपक्रमाचे. गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले. परीक्षेला अद्याप ४८ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी विषय, गुणनिहाय विचार करत ‘मिन‌िट टू मिनिट’ नियोजन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. मुकुल मंदिरच्या सभागृहात झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात व्यासपीठावर तज्ज्ञ मार्गदर्शक सुनील उपाध्ये (गणित), वंदना रसाळ-मिरखेलकर(इंग्रजी), विनायक पवार(विज्ञान) यांच्यासह मुकुल मंदिरचे मुख्याध्यापक जयंत चौधरी, सुरेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रश्न सोडविण्याचे वेळापत्रक करा
परीक्षेला सामोरे जाताना काही गोष्टींचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे आपला अभ्यास किती झाला आहे. शाळेतही अभ्यासक्रमाचा सराव होतो. असे असले तरी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परीक्षेला अद्याप ४८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशावेळी नियोजन महत्त्वाचे ठरते. २ तासांमध्ये आपल्याला ४० गुण मिळवायचे असतात. बीजगणित असो, की भूमितीचा पेपर, प्रत्येक पेपरसाठी मिनिट टू मिनिटाचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार अभ्यास करा. पहिला, दुसरा आणि तिसरा अशा प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ लागेल, त्याचे सरावाच्या माध्यमातून नियोजन करा. पहिले तीन प्रश्न तुलनेने सोपे असतात. कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडविले, तर पुढच्या प्रश्नांना वेळ देता येतो. पेपरमधून तुमचे व्यक्तिमत्व दिसते. त्यामुळे आत्मविश्वासाने पेपर सोडवा. घाईत पेपर सोडविताना खाडाखोड होते, हे टाळता आले पाहिजे. दोन उताऱ्यात फारसे अंतर ठेऊ नका. आकृती काढताना पेन्सिलचे टोक व्यवस्थित असावे. आकृती चौकटीत काढण्यावर भर असावा. जास्त पुरवण्या घेतल्या म्हणजे अधिक गुण असे नसते. उत्तरातील अचूकपणा महत्त्वाचा असतो. ताणतणाव न घेता शांत, प्रश्न वाचल्यानंतर थोडासा विचार करत अचूक उत्तर लिहिण्यावर भर द्या.
- सुनील उपाध्ये, गणित विषयतज्ज्ञ.

गाइडपेक्षा पाठ्यपुस्तकालाच महत्त्व
विज्ञान या विषयाबाबत भीती असण्याचे कारण नाही. पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विषय आहे. असे असले तरी, काही बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही वर्षभर अभ्यास करता. परीक्षांच्या काळात अनेकजण गडबडतात. विज्ञानात विषयात चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही ‘एमसीक्यू’ प्रश्न अनेकदा अडचणीचे ठरतात. जे बहुपर्यायी प्रश्न, प्रयोगावर आधारित विचारले जातात. प्रत्येक विभागात त्यासाठी ५ गुण असतात. प्रश्नपत्रिकेचा विचार केला, तर पहिल्या ४० गुणांच्या पेपरमध्ये १२ गुण रसायनशास्त्र, २४ भौतिकशास्त्र तर ४ गुणांसाठी पर्यावरणावर आधारित प्रश्न असतो. दुसऱ्या पेपरमध्ये १२ रसायनशास्त्र, २४ गुण जीवशास्त्रावर तर ४ पर्यावरणावर आधारित प्रश्न असतात. हे वेटेज लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करणे महत्वाचे आहे. त्यासह विज्ञान विषयात आकृती महत्त्वाचा भाग आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. नावे देताना काळजीपूर्वक द्या. उत्तराची मांडणी चांगल्या पद्धतीने करण्यावर भर असावा. उत्तर छोटे गुण अधिक असा हा विषय आहे. त्यासाठी अचूक उत्तर लिहिण्यावर भर द्या. गाइडपेक्षा पाठ्यपुस्तकातील उत्तरांनाच महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकेच वाचावीत. त्यानुसारच उत्तरे लिहावित.
- विनायक पवार, विज्ञान विषयतज्ज्ञ.

इंग्रजीचा पेपर सोपा
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. सर्व ज्ञानशाखेची माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. या विषयाचा एकूणच विचार करताना, विषयाची जीवनातील गरज, विषय आत्मसात करताना भीती वाटते का, अभ्यासक्रम आणि पेपर या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यक्तिमत्व विकासासह तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ही भाषा महत्त्वाची. अभ्यासक्रमात चुकून या भाषेकडे दुर्लक्ष झाले, असे वाटते असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कारण परीक्षेसाठी साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अभ्यासक्रमात इंग्रजी भाषेतील व्याकरण, शब्दसंपत्ती महत्त्वाची. इंग्रजीच्या सरावासाठी जास्तीत जास्त प्रश्नापत्रिका सोडवा. इंग्रजी विषयाची आठ युनिटमध्ये विभागणी झालेली आहे. आता इंग्रजीचा पेपर सोपा झालेला आहे. पेपर सोडविण्याची योग्य पद्धती स्वीकारली, तर पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. प्रश्नपत्रिकेतील गुणांचा विचार केला, तर सर्वाधिक ३७ गुण हे रिडिंग स्किलला आहेत. शब्दसंचाला १०, ग्रामर १२, रायटिंग स्लिक १६ आणि ट्रान्सलेशनचे ५ अशी विभागणी आहे. उतारे नीट वाचा, विचार करा आणि त्यानंतर उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पानावर लिहा.
- वंदना रसाळ-मिरखेलकर, इंग्रजी विषयतज्ज्ञ

उत्तरपत्रिका सोडविताना हे करा
- प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो याची नोंद घ्या.
- प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करा.
- खाडाखोड करणे टाळा.
- आकृती काढताना पेन्सिलचे टोक व्यवस्थित करा. चौकट करूनच आकृती मधोमध काढा.
- इंग्रजीच्या पेपरमधील उतारा सोडविताना बारकाईने वाचा, विचार केल्यानंतरच उत्तर लिहा.

‘मटा’चा उपक्रम विद्यार्थ्यांच्या फायद्याचा
सरावावर भर देण्याचीही गरज असते. आणखी वेळ विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याचे नियोजन करा. ताणतणाव विरहित परीक्षेला सामोरे जा. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होण्यास, त्याला उजाळा मिळण्यास मदत मिळाला.
- जयंत चौधरी

विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पालकांसह नातेवाईकांकडून सततची होणारी विचारपूस यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारचा तणाव असतो. अशा तणावात, गुणांचे टेन्शन न घेता, पेपर कसा चांगला सोडविता येईल याकडे विद्यार्थ्याने लक्ष द्यावा. आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवा.
- डी. जी. शेळके, समुपदेशक शिक्षक

दहावीच्या परीक्षेपूर्वी अतिशय योग्य वेळी ‘मटा’ने हा कार्यक्रम घेतला. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, मेहनत घेतात, मात्र पेपर सोडवण्याच्या अचूक पद्धत माहिती नसेल, तर गुणांवर परिणाम होतो. तिन्ही विषयांतील मार्गदर्शकांनी मुलांना नेमक्या पद्धती सांगून त्यांच्या सरावाला दिशा दिली आहे.
- पंडित शिंदे, शिक्षक

दहावी, बारावीच्या परीक्षा करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या. त्याची तयारी वर्षभरापासून सुरू होते. परीक्षा जशी जवळ येते, तसे विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे वाढते. विद्यार्थ्यांनी ताणतणाव विरहित परीक्षा द्यावी, या हेतूने असे उपक्रम अतिशय उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेला घाबरून जाण्याची काही गरज नाही. वेळेच नीट नियोजन केल्यास तुम्ही परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकता.
- सुरेश परदेशी, मुख्याध्यापक, मुकुल मंदिर

परीक्षेला जाताना आधी मनातील भीती काढून टाकायला हवी. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांची ही भीती दूर होण्यास मदत होते. पेपर लिहिताना छोट्या-छोट्या चुका टाळता आल्या पाहिजेत. उत्तरपत्रिकेवर खाडाखोड होता कामा नये, उतारा वाचल्यानंतरच सोडविला गेला पाहिजे. यासंदर्भातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते.
- संतोष राठोड, बळीराम पाटील हायस्कूल.

परीक्षा आली की तणाव आलाच. शाळांमध्ये सराव परीक्षातून परीक्षेचा सराव होतोच. त्यासह अशा उपक्रमांचा फायदा होतो. अभ्यासात उपयुक्त ठरतील अशा नवीन काही गोष्टी समजल्या. माझा प्रयत्न चांगले गुण मिळविण्याचा असेल. त्यासाठी मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.- विशाल पंडित, विद्यार्थी.

विज्ञान माझा आवडता विषय आहे. या विषयात चांगले गुण मिळावेत, असे मला वाटते. त्यामुळे या विषयावरचे मार्गदर्शन मला फायद्याचे ठरले.- अर्जुन सोनवणे

मला गणित विषयावरचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे वाटले. गणित विषयाकडे मी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून पाहणार आहे.

- भाग्यश्री बोरसे

इंग्रजी विषयाशी संबंधित मला माहिती हवी होती. ती या उपक्रमातून मिळाली. इंग्रजी विषयाची गरज व आवश्यकता रसाळ मॅडम यांनी लक्षात आणून दिली. अडचणी दूर होण्यास मदत होईल.- ओमसाई रांजवन

विज्ञानातील ‘एमसीक्यू’ प्रश्नांचे महत्त्व, ते सोडविताना काय काळजी घ्यायला हवी, हे मला समजले. अभ्यास करताना, पेपर सोडविताना कोणती दक्षता घ्यायला हवी याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.

- प्रणव क्षीरसागर

दहावीमध्ये इंग्रजी विषयाबाबत भीती असते. या उपक्रमातून ती भीती दूर होण्यास मदत झाली आहे. आजचे मार्गदर्शन परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

- कीर्ती भोसले

विज्ञान विषयावर पवारसरांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे. या विषयाचा पेपर सोडविताना छोट्या-छोट्या त्रुटी दूर करण्यास त्याची निश्चित मदत होईल.- रेवती टाकळकर

गणित विषयाच्या उपाध्येसरांचे मार्गदर्शन मला आवडले. उत्तरपत्रिका सोडविताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, हे त्यांच्याकडून‌ शिकता आले. प्रश्नपत्रिका सोडविताना त्यांनी दिलेल्या सूचनांची मदत होईल.

- रेणुका गोमरे

४८ दिवसांमध्ये सर्वाधिक भीती वाटणाऱ्या तिन्ही विषयांची तयारी कशी करावी, हे तज्ज्ञांनी उत्तमरित्या सांगितले. सराव, वेळेचे महत्त्व, पेपर सोडविण्याचे तंत्र आम्ही नक्कीच लक्षात ठेऊ.
- रुचा खोंडे

पेपर कसा सोडवावा याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मला सर्वाधिक आवडले. लिखाणात तर आमच्याकडून नेहमीच चुका ‌होतात. खूप लहान लहान बाबी असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत.
- निकिता मोरे

अभ्यास करून नेमके उत्तर लिहिणे किती महत्त्वाचे आहे हे सरांनी छान सांगितले. विशेषतः गणिताच्या पेपरची टाइम टेक्निक महत्त्वाची होती.
- आनंद मकळे

शाळेमध्ये वर्षभर आम्हाला शिक्षक मार्गदर्शन करतात, पण सगळच लक्षात राहते असे होत नाही. रिव्हिजनच्या या काळात आम्ही काही सूचना पुन्हा ऐकल्या, पण बरीच माहिती नव्याने मिळाली.
- अंजना राठोड

इंग्रजीचा पेपर सोडवताना दिलेला तपशील महत्त्वाचा वाटला. पर्यायांतील काय निवडावे, काय टाळावे व कोणते पर्याय जास्त गुण मिळवून देऊ शकतात हे सुद्घा त्यांनी सांगितले. यामुळे इंग्रजीची भीती नक्कीच कमी होईल.
- काजोल चौधरी

इंग्रजी‌ विषयामध्ये रायटिंग स्कीलचे महत्त्व रसाळ मॅडम यांनी खूप छान सांगितले. अभ्यास तर आम्ही केलाच, पण सराव व मार्गदर्शकांच्या पद्धतींचा अवलंब केला, तर अजून गुण मिळतील, असे वाटते.
- ऋतुजा पवार

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सरावाचा काळ असल्याने मुलांना या मार्गदर्शनाने मोठी मदत होणार आहे. पेपर सोडवताना नेहमीच्या होणाऱ्या चुका नक्कीच टाळता येतील.
- सुजाता अंभारे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार शिक्षकांची ‘शिक्षणाची वारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय क्रीडा संकुलात सोमवारपासून सुरू असलेल्या ‘शिक्षणाची वारी’ चा बुधवारी उत्साहात समारोप झाला. तीन दिवसांत ४ हजार २०० शिक्षकांनी ‘शिक्षणाची वारी’ला भेट देऊन नवनव्या प्रयोगांची माहिती घेतली.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी शिकविण्याचा पद्धतीत नवीन प्रयोग राबवून शाळांचा कायापालट केला आहे. या प्रयोगांचे एकत्रित प्रदर्शन वारीच्या निमित्ताने सर्वांसमोर आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसह नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे अशा विविध जिल्ह्यांतून शिक्षकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी बुधवारी १ हजार ६०० शिक्षकांनी हजेरी लावत विविध प्रयोगांची माहिती घेतली. पहिल्या दोन दिवसात अडीच हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी भेटी दिली.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या वारीचा समारोप प्रधान सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत पार पडला. उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके, संचालक सुभाष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांशी नंदकुमार यांनी संवाद साधला.

चांगले शिक्षकच हवेत ः नंदकुमार
प्रत्येक शाळा प्रगत झाली, तर विद्यार्थी प्रगत होईल. त्यासाठी ज्ञानरचनावादाची अंमलबजावणी प्रत्येक शाळांमध्ये व्हायला हवी. त्यासाठी अतीउत्कृष्ट शिक्षकच हवेत, दुसरे नकोत असे प्रतिपादन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षकांशी संवाद साधताना केले. प्रगत झालेल्या शाळांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज व्हावे, असेही ते म्हणाले. तासभराच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारधारी गुंडाचा तरुणावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
त्रिमूर्ती चौक परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या शहराध्यक्षाने बुधवारी भर दुपारी पाठलाग करून एका तरुणावर तलवारीने वार केला. हा प्राणघातक हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेख हाफ‌िज असे आरोपीचे नाव आहे. संदीप दत्तात्रय डहाळे (वय २७, रा. विष्णूनगर) हा विमा कंपनीत काम करणारा तरुण बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वड‌िलांसोबत मोपेडवर जात होता. यावेळी दुचाकी बाजूला घेण्यावरून त्यांचा हाफ‌िजच्या नातेवाईकासोबत वाद झाला. यावेळी डहाळे व त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डहाळे व दुसरा गट पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. तेथे त्यांच्यात समेट झाला. यानंतर संदीप उत्तमनगर येथील चौकात उभा होता. यावेळी शेख हाफिज हा ३० ते ४० जणांसह तेथे आला. संदीपला पाहताच त्याने तलवार काढून त्याच्या दिशेने धाव घेतली. संदीपने तेथून पलायन केले. पळणाऱ्या संदीपच्या पाठीवर त्याने तलवारीने वार केला. जखमी अवस्थेत संदीपने तेथील अ‌जिंक्य ज्वेलर्समध्ये धाव घेतली.

नेमकी काय घटना घडली आहे, याबाबत मला माहिती नाही. पक्षाचा कार्यकर्ता असेल, तर सर्व माहिती घेतली जाईल. दोषी आढळल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळे, पत्कींची कोटींची उड्डाणे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करून उतरलेरले दोन्ही प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी सुमारे ३ कोटी ५३ लाख, तर भाजप पुरस्कृत उमेदवार सतीश पत्की यांनी सुमारे ३ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचा तपशील उमेदवारी अर्ज भरून देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे.
विक्रम काळे यांच्या नावावर ६५ हजार रुपये रोख, २ लाख २८ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू, बँक खात्यातील ठेवी तसेच पत्नी शुभांगी यांच्या नावे दीड लाख रुपये रोकड आहे. टोयाटो इनोव्हा कार, ९ लाख ९७ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू तसेच मुलांच्या नावे अशी मिळून १ कोटी ९ लाख २३ हजार ४९१ रुपये असा जंगम मालमत्तेचा तपशील आहे. लातूर येथील घर, वर्सोवा मुंबई येथे स्वतच्या नावे घर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे पळसप येथे जमीन, लातूर जिल्ह्यातील मौजे गोंद्री येथे पत्नीच्या नावे जमीन, प्लॉट, खाडगाव जिल्हा लातूर बार्शी रोड लगत प्लॉट, निवासी घर आदी २ कोटी ४३ लाख ९८ हजार ७५० रुपये मालमत्तेचा तपशील आहे. काळे यांच्या नावावर दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह बँकेचे १७ लाख रुपयांचे गृहकर्ज असल्याचाही ‌तपशील आहे.
प्रा. सतीश पत्की यांच्या नावावर ४ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच पत्नी स्मिता यांच्या नावावर १ लाख ८८ हजार, मुलीच्या नावावर ४९ हजार रोकड आहे. सतीश पत्की त्यांच्या पत्नी तसेच मुलीच्या नावावर बँकेत मुदत ठेवी, सोने – चांदी यासह इतर असे सुमारे १ कोटी ९८ लाख रुपये जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. तर पत्नीच्या नावे बीड येथे २८ लाख रुपये किमतीची शेतजमीन, बीड व औरंगाबाद येथे घर यासह इतर अशी १ कोटी १८ लाख रुपयांची स्थावर मालमत्तेचा तपशील दिला असून पत्की यांनी ४ लाख १२ हजार रुपयांचे गृहकर्ज असल्याचा तपशील दिला आहे.
उमेदवारांच्या नावे गाडी नाही : शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या विक्रम काळेंच्या नावावर एकही गाडी नाही. केवळ पत्नीच्या नावे एक इनोव्हा कार आहे. पत्की यांनी दिलेल्या तपशीलानुसार त्यांच्या कुटुंबातील कुणाकडेही गाडी नाही हे ‌विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेफ सिटी’ला हरताळ; सरकारने १७ कोटी रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादकरांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेला ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ महापालिकेच्या ढिसाळपणामुळे धोक्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या दोन कोटींच्या खर्चाचे विवरण, उपयोगिता प्रमाणपत्र शासनाने पोलिस प्रशासनाला मागितले आहे. हा निधी पालिकेकडे सोपविला होता. पालिकेने कंत्राटदाराला अद्याप पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचे विवरण पाठवले नसल्याने पुढील १७ कोटी रुपये शासनाकडेच अडकले आहेत.

तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या कार्यकाळात ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ची संकल्पना समोर आली होती. पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांनी हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात सर्व शहरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र कंट्रोल रूम उभारली. प्रकल्पासाठी पालिकेमार्फत निविदा मागविली होती. प्रकल्पाचा खर्च आणि देखभालीची जबाबदारी महापालिकेकडे सोपविली आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने कॅमेऱ्यांसाठी दोन टप्प्यांत १९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी प्रोजेक्टसाठी दिले. हा निधी महापालिकेकडे वळवण्यात आला. दोन वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.

दोन वर्षे उलटल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधीबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी शासनाने पोलिस प्रशासनाकडे उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचे विवरण मागितले. पोलिस प्रशासनाने महापालिकेला याबाबत कळवले, मात्र पालिकेने कॅमेरे उभारणाऱ्या हनीवेल कंपनीला अद्यापपर्यंत कंत्राटाचे काहीच पेमेंट दिले नसल्याची माहिती समोर आली. खर्चाचे विवरणच आले नसल्याने उपयोगिता प्रमाणपत्र देखील मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून येणारा १७ कोटी रुपयांचा निधी मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असा होता प्रोजेक्ट
............पहिला टप्पा....दुसरा टप्पा
निधी........२ कोटी.........१७ कोटी
ठिकाणे.....३०................१२५
कॅमेरे.......५०.................२३७
निगराणी..२६ कि.मी.......१०० कि.मी.

५० पैकी १२ कॅमेरे बंद
- महावीर चौक ः २
- आंबेडकर चौक ः १
- अण्णाभाऊ साठे चौक ः १
- क्रांतिचौक ः ३
- रेल्वे स्टेशन चौक ः ३
- शहागंज ः १
- वोक्खार्ड चौक ः १

सेफ सिटी’साठीच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढल्या. कामाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या प्रकल्पाची कागदपत्रे १५ दिवसांपूर्वीच समितीकडे सोपविली आहेत. समितीच्या अहवालानंतर सरकारकडे आवश्यक प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका

पहिल्या टप्प्यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र शासनाने मागितले आहे. त्यांनतर पुढील टप्प्यातील निधी देण्यात येणार आहे. टेंडर मागवून कॅमेरे उभारण्याची जबाबदारी पालिकेकडे होती. यासंदर्भात पालिकेला पत्र देण्यात आले आहे. पालिकेने अद्याप विवरण दिलेले नाही.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उमरगा येथे सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली असून या चोरीत बंदुकीच्या २० गोळ्या व रोख १२ हजार रुपयांची रक्कम चोरीस गेली.
उमरगा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भिकुलाल वडजे यांच्या घरी पहाटे चोरी झाली. यामध्ये १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून श्वान पथकाच्या मदतीने पोलिस या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी अद्याप अपयश आले आहे. उमरगा शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारीच्या घरी चोरी
झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून एक प्रकारचे आव्हानच दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुंडा देण्यावरून तरुणीचा बळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात हुंडा देण्यावरून एका तरुणीचा मृत्यू झाला. लग्नासाठी सुरुवातीला दीड लाख रुपये हुंडा मागितला होता. पण त्यानंतर पाच लाखांची मागणी केल्याने व एवढी रक्कम देण्यास मुलीकडील मंडळींनी नकार दिला. त्यामुळे तरुणीने शुक्रवारी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले होते. उपचार सुरू असताना तिचा शनिवारी मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मनीषा चव्हाण आणि विलास राठोड यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्या दोघांच्या कुटुंबियांनी लग्न करण्याची तयारी केली होती. मनीषाच्या सासरच्या मंडळीनी दीड लाख हुंडा मागितला होता. चव्हाण कुटुंबीय ते देण्यास तयार झाले. मात्र, काही दिवसांनी त्यांनी पाच लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केली. मनीषाच्या कुटुंबियांनी एवढी रक्कम देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला. यातून मनीषा चव्हाण हिने शुक्रवारी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा शनिवारी मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत ७ ते ९ एप्रिल दरम्यान नाट्यसंमेलन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्यावतीने ९७ व्या मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची संधी उस्मानाबादला मिळाली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान नाट्य संमेलन होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी शनिवारी मुंबईत केली. त्यानंतर उस्मानाबादमध्ये जल्लोष करण्यात आला.
दोनच दिवसापूर्वी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर यांनी परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी उस्मानाबादला भेट देवून संमेलनाच्या नियोजित स्थळांची जागेची पाहणी केली. निवासव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यासोबतच नियोजनाची रुपरेषा जाणून घेतली होती. त्याच वेळी घोषणा होण्याची औपचारिकता उरली होती.
नाट्य परिषदेच्या यजमानपदाच्या या घोषणेचे उस्मानाबाद येथील नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख विशाल शिंगाडे, रवींद्र केसकर, राजेंद्र अत्रे, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, अशिष मोदाणी, प्रशांत कुदाळ, प्रा. भालचंद्र हुच्चे, प्रा. गजानन गवळी, संतोष जाधव, राजाभाऊ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंगाडे, अक्षय ढोबळे आदीने स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीतल्या मुलाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराशेजारी राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १४ वर्षीय मुलानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास क्रांतिचौक पोलिस ठाणे हद्दीतील कॉलनीत घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडिता दहावी वर्गात शिकते, तर मुलगा इयत्ता नववीत शिकतो. दोघांचीही घरे शेजारीशेजारी आहेत. सकाळी पीडिताचे पालक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असल्याने घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी फ्लॅटची चावी शेजारी राहणाऱ्या ‘त्या’ विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या घरी दिली. दुपारी बाराच्या सुमारास घरी आलेल्या पीडिताने ‘त्या’ मुलाकडून चावी घेत घरी गेली. थोड्या वेळाने ‘गणित विषय समजवून सांग,’ असे म्हणत तो मुलगा पीडितेकडे आला. नेहमीच्या ओळखीचा मुलगा असल्याने पीडितेने त्याला मदत व्हावी, या उद्देशाने गणित समजून सांगण्यास सुरुवात केली. मात्र, घरात कोणीही नसल्याची संधी साधत त्याने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. भेदरलेल्या पीडितेने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेला घेऊन तिच्या पालकांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिला सुरक्षा समितीसमोर सहायक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी तिचा जवाब नोंदवला. अधिक तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी मिसाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ उर्दू भाषेत घ्यावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) उर्दू भाषेतूनही घेतली जावी या मागणीसाठी विद्यार्थी, पालकांसह विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. जनजागरण समितीने याबाबत शनिवारी बैठक घेतली.
वैद्यकीय प्रवेशासंदर्भात देशपातळीवर ‘नीट’ घेतली जाते. यंदा मेमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यात उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. हा विचार लक्षात घेता, इतर भाषेप्रमाणे उर्दू भाषेतूनही परीक्षा घेतली जावी, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी मागणी होत आहे. औरंगाबादमध्ये विविध सामाजिक संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेत मागणी रेटली आहे. त्यात आज जनजागरण समितीतर्फे मराठवाड्यातील ज्युनिअर कॉलेज, संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांची बैठक घेण्यात आली. रोशनगेट परिसरातील समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एकमुखी मागणी करण्यात आली. यात मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटी, सर सय्यद कॉलेज, डॉ. झाकीर हुसेन कॉलेज, अलसबा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आदी कॉलेज, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उपस्थित होते. बैठकीला मोहसीन अहेमद, इनायत अली, मिर्झा सलीम बेग, अशफाक अहेमद, डॉ. अझरुद्दीन, डॉ. मसूद, मोहमंद अली यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर भाषेसह ऊर्दू भाषेमध्ये सुद्धा परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी आहे. उर्दू भाषेतील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी येत्या परीक्षेपासून हा बदल तत्काळ करावा. - मोहसीन अहमद, जनजागरण समिती

उर्दू विषयाच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राज्यातही अकरा हजारपेक्षा अधिक उर्दूचे विद्यार्थी नीटला बसतात. त्या विद्यार्थ्यांचा विचार करत ऊर्दूमधून परीक्षा घ्यावी अशी मागणी आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.- मोहंमद अली, जनसंपर्क सचिव, दक्षिण महाराष्ट्र स्टुडंट इस्लामिक ऑगनायझेशन ऑफ इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक नाटक एक आंदोलन असतेः थिय्याम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तीन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकात किंवा सद्यस्थितीत लिहिलेल्या नाटकात खराब व्यवस्थेवर घाव घातलेला असतो. भारतीय रंगभूमी व ग्रीक रंगभूमीवरसुद्धा हा समान धागा दिसतो. व्यवस्थेवर थेट भाष्य करीत असल्यामुळे प्रत्येक नाटक निषेधात्मक आंदोलन असते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी पद्मश्री रतन थिय्याम यांनी केले. ते महागामी संस्थेच्या वतीने आयोजित शारंगदेव महोत्सवात शनिवारी सकाळी ‘शारंगदेव प्रसंग’मध्ये बोलत होते.
कार्यक्रमात थिय्याम यांनी ‘रंगभूमीचे पारंपरिक तत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचीन भारतीय रंगभूमीचा अभ्यास करून आधुनिक रंगभूमीवर वेगळे प्रयोग करणारे रंगकर्मी अशी थिय्याम यांची देशभर ओळख आहे. ‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मश्री’ अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. रंगभूमीचे वेगळेपण सांगतानाच त्यांनी मर्यादांवर परखड भाष्य केले.
‘संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, नृत्य, वेशभूषा अशा अनेक घटकांची नाटक सांघिक कला आहे. भावनांचे मिश्रण असलेल्या नाटकात हजारो भावमुद्रा असतात. धार्मिक, राजकीय, आर्थिक घटक जोडल्यामुळे नाटक एक धाडसी कलासुद्धा आहे, पण त्यापेक्षा ते एक निषेधात्मक आंदोलन आहे. एखाद्या कलाकाराला प्रशिक्षण देऊन घडवणे कठीण आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे पारंपरिक भारतीय रंगभूमी संपुष्टात आली. मागील ७० वर्षांत भारतीय कला आणि संस्कृतीचा विकास आपण पाहू शकलो नाही. सांस्कृतिक सुबत्तासुद्धा संपली. कुशल व गुणी कलाकार असलेल्या भूमीत हा प्रकार दुर्दैवी आहे. गिरीश कार्नाड, इब्राहीम अल्काझी, हबीब तन्वीर, धर्मवीर भारती, मोहन राकेश असे चांगले नाटककार-कलाकार आले, पण त्यांचे काम पुढे गेले नाही. पाठबळ आणि व्यावसायिकतेच्या अभावामुळे काम थांबले. एका मिनिटाच्या कामासाठी कलाकार पैसे मागू लागले. जगण्यासाठी पैसे आवश्यक असल्यामुळे त्याने का मागू नये ? या गोंधळात रंगभूमीचे नुकसान झाले’ असे थिय्याम म्हणाले. यावेळी ‘महागामी’च्या संचालिका पार्वती दत्ता, ‘एमजीएम’चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images