Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘युनिक’ पेट्रोलच्या मापात पाप

$
0
0


ओंकार काशीद, औरंगाबाद
उस्मानपुऱ्यातल्या युनिक पंपावरून काटा लॉक म्हणत गाडीत कमी पेट्रोल भरून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. पुरवठा अधिकारी, पेट्रोलपंप असोसिएशनकडे तक्रार करूनही त्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला तब्बल १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत चाट बसत आहे.
उस्मानपुरा येथील युनिक पेट्रोलपंपावर वारंवार मीटर रिडिंगमध्ये घोळ केले जातात. शंभर रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकले, तर प्रत्यक्षात ते कमी भरले जाते. पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये तशी सेटिंग करून ठेवण्यात आली असून, आपण जेवढ्या रुपयांचे पेट्रोल टाकतो तेवढेच आकडे दिसतात. मात्र, प्रत्यक्षात कमी पेट्रोल भरले जाते. हा प्रकार अनेक पेट्रोल पंपावर सुरू आहे. पेट्रोलमध्ये होत असलेली लूट ग्राहकाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहक तक्रार करीत नाही. एखादा ग्राहक पेट्रोल पंपावर लूट होत असल्याची ओरड केल्यास पंपावरील कर्मचारी त्याच्याशी हुज्जत घालत आहेत. याप्रकरणी अनेकांनी तक्रार रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र, संबंधितांवर काहीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पुरवठा विभागाने याची तत्काळ दखल घेत ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी ग्राहक करत आहेत.

मच्याकडून अशी बाब कधीच होत नाही. चुकून पेट्रोल काटा लॉक झाला होता. यापुढे आता अशी चूक होणार नाही.- वसिम शेख, व्यवस्थापक, युनिक पेट्रोलपंप

हा प्रकार गंभीर आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती वजने व मापे विभागाच्या अधिकारी वर्गाला देऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.- डॉ. भारत कदम, पुरवठा अधिकारी

संबंधित पेट्रोलपंपाची चौकशी करू. नेमका काय प्रकार झाला, काटा लॉक कसा होत आहे, हे पाहतो आणि संबंधित पेट्रोलपंप चालकास व मॅनेजरशी बोलून हा प्रकार यापुढे होणार नाही याची दक्षता घ्यायला लावू. - अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलपंप चालक असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंडियन ऑइलचा ड्रॉ रद्द झाल्याने संताप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील इंडियन ऑइल कंपनीचा शुक्रवारी संत एकनाथ रंग मंदिरात आयोजित केलेला लकी ड्रॉ ऐनवेळी रद्द केल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
इंडियन ऑइलच्या पंपावर दोनशे रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांसाठी या लकी ड्रॉचे आयोजन केले होते. ग्राहकांना दिलेल्या पावत्यावर दोन वेगवेगळ्या तारखा कंपनीने दिल्या होत्या. त्यामुळे आज सोडत आहे या आशेने अनेक ग्राहक जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून आले. मात्र, कार्यक्रम स्थळी कंपनीचा कोणीही कर्मचारी नव्हता. ग्राहकांनी पेट्रोल पंप चालकांना याची माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. काही जणांनी इंडियन ऑइलच्या विक्री अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा रात्री उशिरा संत एकनाथ रंगमंदीरात कंपनीचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी लकी ड्रॉ १० मार्चला आयोजित केल्याचे सांगितले. त्यामुळे ग्राहकांना त्रागा व्यक्त करत निघून जावे लागले.

२६ ऑक्टोबर ते २६ जानेवारी या काळात इंडियन ऑइल कंपनीकडून दरवर्षी लकी ड्रॉचे आयोजन केले जाते. नोटबंदीमुळे ही योजना राबविताना अडचणी आल्या. हा सोहळा सोहळा १० मार्च रोजी होईल, याची घोषणा आधीच केली होती. मात्र, पेट्रोल पंपावर बोर्ड लावून ही माहिती दिली नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. - अपेक्षा सिंग, विक्री अधिकारी, इंडियन ऑइल कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ आईची अखेर घरवापसी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुले आणि सुनांसोबतच्या वादामुळे घर सोडून जीव द्यायला निघालेल्या मातेला शुक्रवारी मुलांनी मनधरणी करून घरी नेले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. देवानगरीत झालेल्या सोहळ्यात त्या आईला पुन्हा हक्काचे घर आणि जीवाची माणसेही मिळाली.
शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी घरगुती वादाला कंटाळून ‘त्या’ आई घर सोडून जीव द्यायला निघाल्या. त्यांना देवानगरीतल्या नागरिकांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. प्रत्येक घरात भांडणे होतात. आई अनेकदा रुसते. मात्र, तिने कधीही घर सोडून जावू नये, असे मुलांना वाटते. त्यामुळे त्या आईची दोन्ही मुले, एक मुलगी आज त्यांना न्यायला आली. देवानगरीत पोलिसांच्या उपस्थितीत आणि मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या पुढाकाराने हा सोहळा झाला. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त माणिक भाकरे, पोलिस निरीक्षक सतीश टाक, भारत काकडे यांची उपस्थिती होती. मागील सात दिवसांपासून त्या आईला सांभाळणाऱ्या स्नेहल गोर्डे-पाटील, असोसिएशनच्या सदस्य नेत्रा जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मेट्रो औरंगाबाद असोसिऐशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले, ‘ओंकार सोशल ग्रुप आणि 'मां' म्हणजे मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या वतीने ३००च्या वर लोकांचे प्राण वाचविले. या प्रकरणातही ज्येष्ठ महिलेची समजूत घालून त्यांच्या परिवाराच्या सपूर्द करण्याचा हा सोहळा आम्हाला आनंददायी आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात आपल्या आईला घरी नेण्यासाठी या महिलेच्या मुलांसह मुलगी तसेच जावयांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम संपला तेव्हा ‘त्या’ आईसह उपस्थितांचेही डोळे पाणावले.

बॉण्डवर हमी
ज्येष्ठ महिलेवर पुन्हा आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी मुलांना आणि सुनेला बोलावून घेऊन पोलिसांनी ताकीद दिली. बॉण्ड करून आईला कोणताही त्रास देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र मुलांकडून लिहून घेतले.

कोणाला असे वाटते
‘जे झाले ते झाले. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. मात्र, या घटनेमुळे आमची खूप बदनामी झाली आहे. कोणालाही असे घडावे असे वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस निर्गम उतारा; शिक्षिका निलंबित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोगस निर्गम उतारा दिल्याप्रकरणी महापालिका शाळेतील शिक्षिका मसिहा बेगम यांना निलंबित करण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.
चेलिपुरा येथे असलेल्या महापालिकेच्या शाळेत मसीहा बेगम कार्यरत होत्या. त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकपदाचा प्रभारी कार्यभार काही काळ होता. २०१२ यावर्षी त्यांनी काही जणांना शाळेतून निर्गम उतारा उपलब्ध करून दिला. त्यांनी दिलेल्या निर्गम उताऱ्यापैकी काही जणांचे उतारे बोगस असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली तेव्हा मसिहा बेगम दोषी असल्याचे आढळून आल्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊंड टेबल : औरंगाबाद हे ‘स्पोर्ट्स सिटी’ व्हावे

$
0
0

क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यासाठी क्रिकेटप्रेमी सनदी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा, संघटना आणि शहरातील क्रीडाप्रेमी त्यांना साथ देतील, असा सूर 'मटा राऊंड टेबल'मधून गुरुवारी उमटला. ‘मटा कॅम्पेन’चा भाग असलेल्या या उपक्रमात शहरातील क्रिकेटशी संबंधित सर्व प्रमुख घटकांची उपस्थिती होती. शासनाने जागा दिली तरी निधी उभारण्यात अडचणी येतील, स्थानिक संघटना असमर्थ असल्यामुळे सर्वकाही करण्यास शासकीय यंत्रणांनीच पुढाकार घ्यावा, अशा सूचना मान्यवरांनी मांडल्या, तर काहींनी आजतागायत स्टेडियम उभारले जाऊ शकले नाही, याबद्दल संतापही व्यक्त केला. स्टेडियम उभारणीसाठी राजाश्रय आवश्यक आहे, तोदेखील संबंधितांनी मिळवावा, असे मत ‘मटा राऊंड टेबल’मधील चर्चेतून व्यक्त झाले. तथापि, पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी समन्वय समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आणि लवकरच त्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन करण्याचा शब्द दिला. ‘राऊंड टेबल’मध्ये आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी राम भोगले, सचिन मुळे, शिरीष बोराळकर, जे. यू. मिटकर, साई क्रीडा केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर आणि क्रिकेट संघटक अनिल इरावणे सहभागी झाले. यावेळी झालेल्या चर्चेचा हा आढावा...

सिडकोची जागा मिळणे शक्य
ऐतिहासिक स्थळांचा संपन्न वारसा लाभल्याने औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी आहे. औरंगाबादला आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रासारखे एक मोठे सेंटर आपल्याकडे आहे. हळुहळू सुविधा होतील. खेळाडूंना योग्य संधी मिळायलाच हवी. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि दीर्घकालीन योजना आखण्याची गरज आहे. महापालिकाच्या माध्यमातून गरवारे क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे; तसेच शहरातील विविध मैदानांचा खेळांसाठी वापर करता येऊ शकेल, त्या दृष्टीनेही अॅक्शन प्लॅन आखण्यात आलेला आहे. आमखास मैदानाला ‘फुटबॉल हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सिडकोतील राजीव गांधी मैदानावर हॉकी मैदान तयार करण्यात येणार आहे. शहरात पालिकेच्या ७० शाळा आहेत. त्यापैकी ५१ शाळांना मैदान आहे, तर १९ शाळांना ही सुविधा नाही. या शाळांजवळील पालिकेच्या मोकळ्या जागांचा खेळासाठी वापर करण्याचा विचार आम्ही करीत आहोत; तसेच पालिका शाळांतील खेळाडूंना बॅटरी टेस्टच्या माध्यमातून साई, बालेवाडीतही पाठवण्याची योजना आहे. शहरात खेळांच्या दृष्टीने आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे गरजेचे बनले आहे. दीर्घकालीन योजनेत स्टेडियम उभारणे आवश्यक आहेच. शहरात ९५८ खुल्या जागा असल्या तरी त्याठिकाणी मोठे स्टेडियम होणे अशक्य आहे. शहराबाहेरच मोठी जागा मिळू शकेल. शहरात बेसिक सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतील. खेळाडूंना सुविधाच मिळणार नसतील तर पदकविजेते घडू शकणार नाहीत. पदकविजेत्यांना कोट्यवधींची बक्षीस मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु खेळाडू घडताना त्याला भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी निधीची गरज आहे.
गुणवान खेळाडूला प्रारंभापासूनच निधी मिळायला हवा. चीनमध्ये एका खेळाडूमागे कोच, फिजिओ असे चार-पाच लोक असतात. त्यामुळे तेथे क्रांतिकारक कामगिरी होते. तसाच प्रयत्न आपल्याकडेही होणे आवश्यक आहे. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. गरवारे क्रीडा संकुलावर रणजी दर्जाचे सामने होऊ शकतील. युवराज, रैनासारख्या खेळाडूंचा खेळ पाहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. नव्या स्टेडियमसाठी सिडकोकडून ३०-४० एकर जागा मिळू शकेल. स्टेडियमसाठी आपण पुढाकार घ्यायला तयार आहोत. त्याचमुळे समिती स्थापन करण्यासाठी समन्वयकाची भूमिका आपण स्वीकारली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या विषयाला योग्य दिशा मिळेल.
- ओम प्रकाश बकोरिया, महापालिका आयुक्त.

‘स्पेशल टीम’ आवश्यक
औरंगाबादेत पूर्वी मिलिंद कॉलेजचे मैदान, गव्हर्नमेंट कॉलेज, आमखास, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यापीठ अशी मैदाने क्रिकेटसाठी प्रसिद्ध होती. ही प्रचलित मैदाने आता मागे पडली आहेत. सद्यस्थितीत एडीसीए मैदान, एमजीएम क्रीडा संकुल आणि गरवारे क्रीडा संकुल अशी तीन मैदानेच क्रिकेटसाठी आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाच्या निकषांमध्ये ही मैदाने बसत नाहीत हे खरे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक सुविधा असलेले भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम उभारणे आवश्यकच आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेची स्वतःच्या मालिकीची जागा असली तरी तेथे स्टेडियम उभारणे शक्य नाही. नवीन स्टेडियमसाठी किमान ३०-४० एकर जागा लागणार आहे. तसेच कोट्यवधींचा निधीही लागेल. या भव्य प्रोजेक्टसाठी एडीसीएकडे आर्थिक बळ नाही. बीसीसीआय, एमसीएकडून किती मदत होईल हे आताच सांगता येत नाही. महापालिकेने पुढाकार घेतला तर एडीसीए त्यांच्या पाठीशी राहिल. मनपाच्या माध्यमातून स्टेडियम उभारणे शक्य होऊ शकेल. ओम प्रकाश बकोरिया, सुनील केंद्रेकर या क्रिकेटप्रेमी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर हे शक्य होऊ शकेल.
स्टेडियमसाठी अनेक आव्हाने आहेत. सर्वप्रथम जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. निधी देणाऱ्यांनाही यात महत्त्वाचे स्थान द्यावे लागणार आहे. हा प्रोजेक्ट उभारण्यासाठी स्पेशल टीम तयार करावी लागेल. हे काम संघटनेचे नाही. स्पेशल टीमच हे करू शकेल. प्रशासनातील अधिकारीच यात ‘लीड रोल’ करू शकतील. त्यांना एडीसीएचा ‘बॅकअप’ राहीलच. लोकाभिमुख झाल्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही हे तेवढेच खरे आहे. झालर क्षेत्रात जागा मिळू शकते. त्यात क्रिकेट स्टेडियम जागेचा समावेश केला तर २५ ते ४० एकर जागा राखीव ठेवणे शक्य आहे. त्याविषयी तातडीने प्रयत्न करावे लागतील. सद्यस्थितीत जिल्हा क्रिकेट संघटनेचे एडीसीएला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत, त्यामुळे स्वतंत्र स्टेडियम समितीची स्थापना केली जावी. या कामात जे मदत करतील, त्यांना पदे देण्याचाही विचार केला पाहिजे.
- राम भोगले, अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटना.

‘पीपीपी’तून स्टेडियम शक्य
क्रिकेट स्टेडियम उभारणे ही अवघड गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी जागा व निधी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्टेडियम उभारल्यानंतर त्याचा देखभाल खर्च भागवणे हा जिकिरीचा विषय असतो. गुणवान खेळाडू आहेत तर दर्जेदार प्रशिक्षक नाहीत, प्रशिक्षक आहेत तर खेळाडू नाहीत, प्रशिक्षक व खेळाडू आहेत तर सुविधा नाहीत, अशी परिस्थिती आहे. खेळाडू घडवण्यासाठी आधुनिक सुविधा हव्यातच. क्रिकेट स्टेडियम ही औरंगाबादकरांची गरज आहे. ‘पीपीपी’च्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. त्यासाठी सभासदांची संख्या वाढवावी लागेल. मुंबईतील सीसीआय (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) क्लबच्या धर्तीवर औरंगाबादेत क्लब हाऊसची निर्मिती झाल्यास सहज निधी उपलब्ध होईल. स्टेडियम उभारणीत अनेक खेळांच्या सुविधा निर्माण होतील. साहजिकच इतर खेळांनाही त्याचा फायदा मिळेल. लोढा समितीच्या शिफारशींमुळे आता क्रिकेट क्षेत्रात व्यापक बदल होणारच आहेत. त्यात खेळाडू हाच मुख्य घटक राहाणार आहे. स्टेडियम उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर अनेक जण पुढे येतील. रणजी, दुलिप सारखे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे सामने झाले तरी मराठवाड्यातील क्रिकेटला मोठी चालना मिळेल.
खेळाडू घडवण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते. यात तडजोड करून चालत नाही. योग्य नियोजन असेल तर खेळाडू निश्चित घडतो. आज अनेक क्रीडा संघटनांमध्ये वादविवाद सुरू आहेत. त्यांचा फटका खेळाडूंना बसत आहे. खेळाडूंच्या दुर्दैवाचा फेरा कधी ना कधी संपवण्याचा विचार व्हायलाच हवा. खेळाडू घडत गेले तरच संघटनेचा नावलौकिक वाढतो. खेळाडू हा फोकस राहिला नाही तर संघटना रसातळाला जाते. याची अनेक उदाहरणे आहेत. नव्या गोष्टीसाठी धाडस हे करायलाच हवे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. खेळाच्या आधुनिक सुविधा असलेले शहर म्हणून औरंगाबादला ‘मॉडेल सिटी’ बनवण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यात अडचणी येतील, पण त्यावर मात करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.
- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र.

सरकारकडे पाठपुरावा करू
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतल्याने 'गरवारे'चा कायापालट होत आहे. स्थानिक क्रिकेटसाठी हे मैदान योग्य आहे, परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मोठे मैदान आवश्यक आहे. त्यासाठी नवीन जागा घेणेच क्रमप्राप्त आहे. पुण्यात महापालिकेचे नेहरू स्टेडियम आहे. तेथे वाद निर्माण झाल्यानंतर वेगळे स्टेडियम उभे राहिले. हा वाद टाळण्याकरिताच स्वतंत्र स्टेडियम असणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी, डीएमआयसी असे मोठे औद्योगिक प्रोजेक्ट होत आहेत. या ठिकाणी क्रीडांगणासाठी राखीव जागा आहे. गव्हुंजेतील स्टेडियममुळे त्या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. रिअल इस्टेटच्या किमतीही वाढल्या आहेत. तसाच फायदा औरंगाबादेतही होऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित मंडळी स्टेडियम उभारणीस मोलाची मदत निश्चित करू शकतील.
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्टेडियमचे निकष आता खूप बदलले आहेत. राज्य सरकारच्या मदतीने जागा घेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांपर्यंत जागेचा प्रस्ताव घेऊन जाण्याची आपली तयारी आहे. जागा मिळाल्यानंतर बीसीसीआयकडून निधी उपलब्ध होऊ शकेल. कॉर्पोरेट बॉक्स निर्मितीतूनही मोठा निधी मिळेल. आयुक्त बकोरिया व प्रशासक केंद्रेकर यांनी या प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला तर स्टेडियम उभारणीला एक योग्य दिशा मिळेल. औरंगाबाद शहराची ओळख आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून व्हायलाच हवी. साई क्रीडा केंद्रात इतर खेळांच्या आधुनिक सुविधा होत आहेतच. क्रिकेट स्टेडियमची भर पडली तर जागतिक पातळीवर औरंगाबादचा लौकिक वाढेल. त्यातून उद्योग क्षेत्रालाही चालना मिळू शकेल. मराठवाड्यातील क्रिकेटलाही चालना मिळेल. खेळाडूंमध्ये भरपूर टॅलेंट आहे. त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी स्टेडियम उभारणी हे पहिले पाऊल ठरेल. त्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. झालर क्षेत्रात आरक्षण टाकले तर क्रिकेट स्टेडियम शक्य आहे.
- शिरीष बोराळकर, सहसचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.

महापालिका, सिडकोची भूमिका महत्त्वाची
सर्व वादविवाद बाजूला ठेवून क्रिकेट स्टेडियमसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सभासदांच्या माध्यमातून ५० टक्के निधी उपलब्ध झाला तर बीसीसीआयकडून ५० टक्के निधी मिळू शकतो. अंदाजे दोनशे-तीनशे कोटींची गरज स्टेडियमसाठी लागणार आहे. बीसीसीआय ही स्वायत्त संस्था असल्याने शासनाकडून निधी मिळू शकणार नाही. इक्बाल सि​द्दिकीनंतर महाराष्ट्रातून एकही कसोटीपटू झालेला नाही. केदार जाधवला अलिकडेच वन-डे संघात स्थान मिळाले आहे. स्टेडियममध्ये मोठी भूमिका बजावण्यात मनपाला मर्यादा आहे. सिडकोकडून मोठी मदत निश्चित होऊ शकते. त्यादृष्टीने सुनील केंद्रेकर यांची महत्त्वाची भूमिका ठरू शकेल. प्रत्यक्ष क्रिकेट मैदानासाठी नऊ एकरची जागा लागते. पूर्वी स्टेडियम उभारण्याची चर्चाही झाली होती.
क्रिकेटबरोबरच अन्य खेळांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. क्रिकेटचे प्रशिक्षण तर एडीसीए मैदानावर नियमित सुरूच आहे. १४ व १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये औरंगाबादचा संघ पहिल्या पाच संघांमध्ये स्थान मिळवून आहे. आपल्याकडील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, क्रिकेटबद्दल पॅशन आहे. निधी गोळा करण्यात खूपच अडचणी येतात. लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट क्षेत्रात खूप बदल होत आहेत. एडीसीए मैदानावर क्लब हाऊस करून निधीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकता येईल.
- सचिन मुळे, सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.

एडीसीएवर क्लब हाऊस
क्रिकेट स्टेडियम उभारणी आवश्यक असली तरी यात बराच वेळ लागू शकतो. सद्यस्थितीत एडीसीए मैदानावर तातडीने क्लब हाऊस निर्माण होऊ शकते. प्रशिक्षणाच्या आधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील. खेळाडू, प्रशिक्षकांसाठी थ्री-स्टार दर्जाच्या सुविधाही निर्माण करता येतील. त्यामुळे शहराबाहेरूनही प्रशिक्षक बोलावणे शक्य होईल. सिडकोच्या माध्यमातून कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरात जागा मिळू शकते. स्टेडियमसाठी सिडकोने २५ कोटींची तरतूदही केल्याची माहिती आहे. सुनील केंद्रेकर यांची मोलाची मदत मिळू शकेल. प्रशासनाच्या मदतीने हे काम करताना राजाश्रयही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. पीपीपीच्या माध्यमातूनही स्टेडियमची उभारणी होऊ शकते. स्टेडियमसाठी निधी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बीसीसीआय व एमसीएच्या माध्यमातून पन्नास टक्के निधी एडीसीएला मिळू शकतो. कार्पोरेट क्षेत्राच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही. त्यासाठी वाद बाजूला सारून सर्वांनीच पुढे आले पाहिजे.
- जे. यू. मिटकर, माजी सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.

अभी नहीं तो कभी नहीं...
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची हीच योग्य वेळ आहे. अब नहीं तो कभी नहीं. ओम प्रकाश बकोरिया, सुनील केंद्रेकर यांच्या क्रिकेटप्रेमामुळे हे सहज शक्य होऊ शकते. साई क्रीडा केंद्रात अन्य खेळांच्या आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने खेळाडूला माझ्यासाठी यात काय आहे असा प्रश्न पडतो. शासनाकडून स्टेडियमसाठी जागा निश्चित मिळू शकते. त्यासाठी सर्वांना एकत्रित पाठपुरावा करावा लागणार आहे. खरे तर ९०च्या दशकातच शहरात स्टेडियम व्हायला हवे होते. कसोटी, वन-डे हे सामने इतक्या लवकर होणार नाहीत. परंतु, अन्य मोठे सामने होण्याचा मार्ग तरी मोकळा होईल. त्याचाही फायदा आपल्या क्रिकेटपटूंना होईल. एकेकाळी शरद पवार, विलासराव देशमुख हे क्रिकेटचे बॉस होते. त्यांच्या काळात आपण ही संधी गमावली आहे. आता तरी टीमवर्क दाखवून क्रिकेटपटूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढे आले पाहिजे.
औरंगाबाद ही पर्यटननगरी आहे. स्टेडियम झाल्यास पर्यटनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा निश्चित होणार आहे. अनेक कंपन्या पुढे येतील. शहरात वेळ घालवण्याकरिता चांगल्या जागाच नसल्याने आपल्याकडील उद्योजक, त्यांचे अधिकारी अन्य शहरात जातात. तिथे विकेंड साजरा करतात. स्टेडियम उभारणीसाठी निधी देणारी मंडळी आपल्याकडे आहेत. खेळाडूंच्या टॅलेंटला सुविधांची जोड दिली, तर क्रीडा विश्वाचा चेहरा-मोहराच बदलून जाईल.
- अनिल इरावणे, क्रिकेट संघटक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्राध्यापिकेस दोन लाखांचा गंडा

$
0
0


औरंगाबाद ः सायबर भामट्याने सिडकोतल्या कॉलेजमधील प्राध्यापिका लीना लोखंडे यांना दोन लाख दहा हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना बुधवारी, ८ फेब्रुवारी रोजी घडली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास लोखंडे यांच्या मोबाइलवर हा नंबर डिअॅक्टिवेट करायचा आहे, असा संदेश आला. काही वेळात मोबाइल डिअॅक्टिवेट झाला. त्यांनी संबंधित मोबाइल कंपनीच्या कॅनॉट परिसरातील कस्टमर केअर सेंटरकडे जात मोबाइल नंबर कसा बंद झाला याची चौकशी केली. तेव्हा नंबर हा लातूर येथून अॅक्टिवेट केल्याचे समोर आले. लोखंडे यांच्या अॅक्सिस बॅँकेतील खात्यातून २ लाख १० हजार रुपये काढल्याचे त्यांना ९ फेब्रुवारी रोजी समजले. या प्रकरणी सिडको पोलिसात तक्रार दिली आहे.

अशी झाली फसवणूक
- सीमकार्ड लातूरमध्ये अॅक्टिवेट
- मोबाइल क्रमांकावर पासवर्ड घेतला
- खात्यातून एनईएफटीद्वारे पैसे काढले
- अंबाजोगाईतल्या शाखेत वर्ग केले
- पैसे पुन्हा अॅक्सिसच्या अन्य खात्यात वळते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कसाठी १०० एकर

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
Tweet : @unmeshdMT

औरंगाबाद : सफारी पार्कसाठी पडेगाव शिवारातील १०० एकर सरकारी जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. जागा विनामोबदला दिल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला नुकतेच दिले. सफारी पार्क उभारण्याचा अनुभव असलेल्या देशपातळीवरील संस्थांकडून महापालिकेने प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहेत. या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयेदेखील मिळणार आहेत.

सध्या पालिकेचे प्राणिसंग्रहालय सिद्धार्थ उद्यानात आहे. सेंट्रल झू अथाॅरिटीच्या निकषानुसार या प्राणिसंग्रहालयाची जागा अपुरी आहे. किमान २५ एकर जागेत प्राणिसंग्रहालय असले पाहिजे, असे झू अथाॅरिटीचे म्हणणे आहे. पालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे क्षेत्र १५ ते १८ एकरांचेच आहे. त्यामुळे ते बंद करण्याची नोटीस झू अथाॅरिटीने पाच वर्षांपूर्वी दिली होती, परंतु हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे, शिवाय औरंगाबादेत देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ते देखील प्राणिसंग्रहालयाला भेट देतात, असे सांगून प्राणिसंग्रहालय बंद न करण्याची विनंती पालिकेने झू अथाॅरिटीला केली होती. खासदार चंद्रकांत खैरे यांनी झू अथाॅरिटीकडे पाठपुरावा केला आणि प्राणिसंग्रहालयावरचे गंडांतर टळले. त्यानंतर १०० एकर क्षेत्रात सफारी पार्क तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पडेगाव शिवारात सुमारे ५०० एकर सरकारी जागा आहे. त्यापैकी १०० एकर जागा देण्याचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा प्रशासनाला दिला.

प्रस्तावाची फाइल जळाली
सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देऊ, पण त्यासाठी तीन कोटी रुपयांचे शुल्क जमा करा, असे पत्र जिल्हा प्रशासनाने पालिकेला चार वर्षांपूर्वी दिले होते. त्यामुळे पालिकेने जागा मिळण्याची आशा सोडून दिली आणि शासनाच्या महसूल खात्याकडे पत्रव्यवहार करून, संबंधित जागा विनामूल्य द्या, अशी मागणी केली. तसा प्रस्तावही पाठवण्यात आला. मंत्रालयाला लागलेल्या आगीत पालिकेचा सफारी पार्कचा प्रस्ताव देखील जळाला होता. पालिकेने नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवला, पण विनामोबदला जागा देण्याबद्दल काहीच निर्णय होत नव्हता.

पालकमंत्र्यांचा पुढाकार
सफारी पार्कसाठी पडेगाव शिवारातील १०० एकर जागा विनामोबदला उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला. माजी महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी आवश्यक ती माहिती पालकमंत्र्यांना दिली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत बकोरिया यांनी पालकमंत्र्यांसमोर सफारी पार्कसंदर्भात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकाला पत्र पाठवून सफारी पार्कसाठी जागा ताब्यात देत असल्याचे स्पष्ट केले. ज्या उद्देशासाठी जागा दिली आहे त्याच उद्देशासाठी जागेचा वापर करा आणि अतिक्रमण होऊ देऊ नका, अशा दोन अटी जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्या आहेत.

सुरक्षा रक्षक देण्याची मागणी
सफारी पार्कच्या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी शासनाकडून दहा कोटी रुपये मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. ऑक्टोबर महिन्यात औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी दहा कोटी रुपयांची घोषणा केली. नवीन आर्थिक वर्षात ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून पहारा देण्यासाठी किमान चार सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्या, अशी विनंती उद्यान विभागाने सुरक्षा विभागाकडे केली आहे.

प्रस्ताव मागवले
सफारी पार्क उभारण्याचा अनुभव असलेल्या देशपातळीवरील संस्थांकडून महापालिकेने प्रस्ताव मागवले आहेत. सफारी पार्कची रचना विशिष्ट प्रकारची असते. सिद्धार्थ उद्यानात असलेले प्राणिसंग्रहालय सफारी पार्कच्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. संग्रहालयात असलेल्या प्राण्यांशिवाय आणखी काही प्राणी सफारी पार्कसाठी आणण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय ‘टायगर’ किंवा ‘लॉयन सफारी’देखील विकसित केली जाणार आहे. सफारी पार्कसाठी विनामोबदला जागा मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यावर महापालिकेने तेथे सपाटीकरणाचे काम सुरू केले. पावसाळा सुरू होताच तेथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टायगर की लायन सफारी?
सफारी पार्कची संकल्पना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. सफारी पार्क साकारण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम पुढाकार घेत आहेत. टायगर सफारी व लायन सफारी असे दोन प्रकारचे पार्क असतात. संकल्पना शिवसेनेची असल्यामुळे व औरंगाबादेत शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे सफारी पार्कच्या जागेत ‘टायगर सफारी पार्क’च विकसित केले जाईल, असे मानले जात आहे. वाघ आणि सिंहावरून शिवसेना, भाजपमध्ये मध्यंतरीच्या काळात वाद रंगला होता. भाजपचा उल्लेख सिंह म्हणून केला जातो. या पार्श्वभूमीवर पडेगावात टायगर सफारीच होईल असे मानले जात आहे.

अम्युझमेंट पार्कचाही प्रस्ताव
पडेगाव शिवारात शासनाच्या मालकीची सुमारे ५०० एकर जागा आहे. यापैकी १०० एकर जागा सफारी पार्कसाठी मिळाली आहे. आणखी १०० एकर जागा अम्युझमेंट पार्कसाठी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पालकमंत्री कदम यांनी यासाठीही पुढाकार घेतला आहे. सफारी पार्कला जोडूनच अम्युझमेंट पार्क उभारले, तर पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरेल, असे मानले जात आहे. त्यासाठी प्राथमिक प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे.

पडेगाव शिवारातील १०० एकर जागा सफारी पार्कसाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर भगवान घडमोडे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील काम केले जाईल.
- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनी अपडेट व्हावे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समाज साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. रुग्णावर उपचार करताना त्याच्या सूक्ष्म नोंदी ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील. बदलत्या परिस्थितीनुसार डॉक्टरांनी अपडेट व्हावे,’ अशी अपेक्षा इरकॉन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र (एफएमटी) विभागातर्फे आयोजित दहाव्या इरकॉन परिषदेचे उद्घाटन शनिवारी घाटीच्या महात्मा गांधी सभागृहात पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते झाले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, एफएमटी विभागप्रमुख डॉ. के. यू. झिने, डॉ. मिर्झा शिराज बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रेड्डी यांनी उपक्रमास शुभेच्छा देऊन डॉक्टर आणि पोलिस यांच्या कार्याचे महत्व स्पष्ट केले. श्रीकांत परोपकारी म्हणाले, की डॉक्टर आणि पोलिस यांना वेळेचे बंधन नसते. पोलिस संरक्षण, नियम व कायद्याचे पालन करतात तर डॉक्टर रुग्णाचा जीव वाजविण्याची भूमिका बजावतात. डॉ. बेग, डॉ. सरोजिनी जाधव यांनीही मार्गदर्शन केले. बदलत्या परिस्थितीनुसार डॉक्टरांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे. डॉक्टरांनी कायद्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी रुग्णसेवेच्या नोंदी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अडचणी उद्भवू नयेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात एस. सी. मोहिते, आनंद माहूरकर, संजय गायकवाड यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेसाठी घाटी तसेच शहर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी डॉक्टर आदी ६०० हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. परिषदेचा समारोप रविवारी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेना घरात राहून डोळे वटारते

$
0
0


वैजापूर : ‘शिवसेना आमच्याच घरात राहून आमच्यावर डोळे वटारत आहे. त्यामुळे सेना व भाजपची अवस्था एकमेकांकडे डोळे वटारून पाहणाऱ्या भावांसारखी झाली आहे. यातील कोण चांगला हे निवडणुकीत मतदारच ठरवेल,’ असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथे टोलेबाजी केली.
सवंदगाव गटातील भाजपचे उमेदवार अलका भास्कर पाटील - आहेर, सवंदगाव गणातील उमेदवार मच्छिंद्र रिठे व जरुळ गणातील उमेदवार सुरेश राऊत यांच्या प्रचारासाठी दानवे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष नारायण तुपे, मोहनरावजी आहेर, भास्कर आहेर, नारायण कवडे, प्रकाश गायके, बाबूराव गायके, किशोर धाडबळे, गोरख घायवट, जनार्धन कदम, पंकज मतसागर, नवनाथ रिठे, गोविंद राहणे, जगन गायकवाड, बाबू कदम, नवनाथ सुंदर बापू, साहेबराव मतसागर, अनिल आव्हाळे, सोपान तुरकणे, भानुदास बावचे आदी उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘सोनिया गांधी व राहुल गांधींना गाजर व मुळ्यातला फरक कळत नाही. त्यांनी कधी शेती केली होती का ? भाजप सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आज शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने रेशनवर गहू मिळत आहे,’ असे दानवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याच्या ताटात जेवणारे गरिबाला काय न्याय देणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली. तरीही अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण हेच प्रश्न कायम आहेत. ५०-५० वर्षे ज्यांच्या हाती सत्ता होती. त्यांनी ग्रामीण भागाचा काम विकास केला, हेच यातून समोर येत आहे. सोन्याच्या ताटात जेवणारे गरिबाला काय न्याय देणार, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचारार्थ उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मिलिंद पाटील, नितीन काळे, निलंग्याच्या रुपाताई निलंगेकर आदींची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, ‘भाजप सत्तेवर आली तेव्हा राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकारने अनेक विकास कामे केली. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून हजारो गावे दुष्काळमुक्त व टँकरमुक्त केली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी विविध योजना राबवित, कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला. कृषी पंप वीज कनेक्शनचा एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही या दिशेने काम हाती घेतले आहे. कृषी पंरपाना अखंडित वीज मिळावी यासाठी सौर उर्जेवर आधारीत कृषी फिडर हा प्रायोगिक प्रकल्पर हाती घेतला आहे.’
महात्मा फुले जन आरोग्य योचनेद्वारे २८ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी ६३ कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिला.
रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे तरुणांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात उस्मानाबादची दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख होती. तत्कालीन लोकप्रतिनिधीच यास जबाबदार होते. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामुळे उस्मानाबादचे रुपडे पालटु लागले आहे. उस्मानबाद जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. कृष्णा खोऱ्यातील उस्मानाबादच्या हक्काचे आठ टीएमसी पाणीसुद्धा उस्मानाबाद जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहे. यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची शासनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतात उत्पादकता वाढावी यासाठी वेगवेगळे प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यात होत आहेत. ही गौरवास्पद बाब आहे. २०१९ अखेर उस्मानबाद जिल्ह्यात एकही कुटुंब बेघर राहणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात स्मार्ट शहराबरोबरच स्मार्ट गाव (खेडे) यावरही काम केले जाणार आहे. मात्र, यासाठी एक हाती सत्ता असणे गरजेचे आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आहे. राज्यातही भाजपाची सत्ता आहे. आपल्या गावाचे काम योग्य रितीने करून घ्यावयाचे असेल तर यासाठी जिल्हा परिषदमध्येही भाजपाची सत्ता असणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणा उस्मानाबाद जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
या वेळी आमदार सुजितिसंह ठाकुर म्हणाले, ‘मागच्या सरकारने केवळ शेतकऱ्यांना मारण्याचे काम केले. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील सर्वांगिण विकासासाठी भाजप उमेदवरांच्या पाठिशी जनतेने उभे राहावे.’
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील आदींचाही समायोजित भाषणे झाली. दुपारच्या तळपत्या उन्हातही या जाहीर सभेसाठी भाजपप्रेमी मंडळींनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पिण्याच्या पाण्याचा चोख बंदोबस्त संयोजकांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजपची नौटंकी सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न असून या प्रश्नापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व दोघांशिवाय तिसरा पर्याय मतदारांना दिसू नये म्हणून शिवसेना व भारतीय जनता पक्ष नौटंकी करून मतदारांना मूर्ख बनवीत आहेत,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पैठण येथील प्रचार सभेत केला.
तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दावरवाडी येथे अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, नसिम खान, रामकृष्ण बाबा पाटील, अनिल पटेल, नामदेव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असताना ते म्हणतात की शिवसेना हा खंडणीखोराचा पक्ष आहे. तर, तुम्ही काय कामाचे गृहमंत्री,’ असा सवाल यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला. ‘निवडणूक आल्या की शिवसेनेचे मंत्री खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरण्याचे नाटक करतात. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावे,’ असे आव्हान त्यांनी शिवसेनेला दिले. प्रचार सभेत बोलताना माजी मंत्री नितिन राऊत यांनी ‘नरेंद्र मोदी हा माणूस कधी काय बंद करीन याचा नेम नाही,’ अशी टीका केली. सभेला, दावरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेविकासात ‘दिल्ली’चा खोडा

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोड व बीड बायपास रस्त्याच्या विस्तारीकरण आणि मजबुतीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडूनच खोडा घातला गेला आहे. या रस्त्यांचे विस्तारीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी ७८९ कोटी रुपयांच्या निविदेचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) सादर केला आहे. दीड महिना उलटून गेला, तरी कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याला मंजुरी मिळून पुढील प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औरंगाबाद शहराची ‘लाइफलाइन’ असलेल्या जालना रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत कित्येक वेळा चर्चा केली गेली, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मात्र काहीच हालचाल होत नव्हती. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी जालना रस्ता आणि बीड बायपासच्या विस्तारीकरण, क्राँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाईल, असे जाहीर केले होते. मराठवाड्यातील रस्त्यांसाठी १७ हजार कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.
नगर नाका ते केंब्रिज शाळा असा १३ किलोमीटरचा रस्ता सहा पदरी करण्याबाबत प्राधिकरणाने मोजणी केली. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना रुंदीकरणाआड येणाऱ्या सर्व प्रतिष्ठांनाना सूचित करून बहुतांश ठिकाणी जागा मोकळी करून घेतली. याशिवाय महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा ११ किलोमीटरचा बीड बायपास रस्ता संपूर्ण क्राँकिटचा करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. या भागात होणारा विस्तार लक्षात घेऊन पाच उड्डाणपुलांचा प्रस्तावही त्यात सादर करण्यात आला. या रस्त्यांबाबत मुंबई व दिल्लीत अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. केंद्राकडून आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाणार असल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल झाल्यानंतर निविदा काढण्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीत महिनाभरापूर्वी सादर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही रस्त्यांची एकत्रित ७८९ कोटी रुपयांची ही निविदा सादर केली आहे. दिल्लीतील ऑफिसमधून त्यास मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील वाट सुकर होणार आहे.

तर दिवाळीचा मुहूर्त?
दोन्ही रस्त्यांची फाइल मंजूर झाल्यानंतर निविदा अंतिम होण्याच्या प्रक्रियेला किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. पावसाळ्यामुळे जूनपासून पुढचे चार महिने रस्त्याची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा मुहूर्त दिवाळीच्या वेळीच निघेल, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएनआय’ ब्लॅकलिस्टमध्ये

$
0
0



औरंगाबाद : सिमेंट रस्त्याचे काम निष्कृष्ट केले म्हणून महापालिकेने जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी रात्री कारवाई केली.
या संदर्भातील वृत्त ‘मटा’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे’च्या (सीओईपी) माध्यमातून शहरातील रस्त्यांच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यात १५ रस्त्यांची यादी या कॉलेजकडे पाठवली होती. कॉलेजच्या पथकाने स्टेट बँक कॉलनी ते दशमेशनगर या ज्योतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तपासणी करून त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला. रस्त्याचे सिमेंटीकरण करताना एम ४० ग्रेडचे सिमेंट वापरणे गरजेचे असताना, कमी ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे. कॉलेजच्या अहवालाच्या आधारे आयुक्तांनी विशेष पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यावर शनिवारी रात्री त्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला महापालिकेच्या रस्ते बांधकाम बांधणीच्या कामातून ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लेखी आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा आदेश कंपनीला तत्काळ बजावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढणारा विकृत समर्थनगरात जेरबंद

$
0
0



औरंगाबाद : समर्थनगर परिसरामध्ये सकाळी महिलांची छेड काढणाऱ्या विकृताला पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. गुन्हे शाखा व क्रांती चौक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या विकृताच्या छेडछाडीमुळे काही दिवसांपासून समर्थनगर परिसरात भीतीचे वातवरण होते.
शेख अमिनोद्दीन शेख मुरूद्दीन (वय ४०, रा. जयसिंगपुरा, बायजीपुरा) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार गेल्या महिन्यापासून सुरू होता. त्यामुळे, समर्थनगर परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी किंवा सकाळी लवकर मुलांना शाळेत सोडण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांची छेड काढणाऱ्या महिलांमध्ये दहशत निर्माण झाली होती. महिलांनी दोन ते तीन वेळेस क्रांती चौक पोलिस स्थानकात पोलिस आयुक्तालयामध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली होती, तसेच, महिलांकडून आरोपीचे वर्णन घेतले होते. त्यानुसार,या भागामध्ये शुक्रवारी रात्रीपासूनच सापळा लावण्यात आला होता. शेख अमिनोद्दीन पहाटे या भागामध्ये आला असता, पोलिसांनी त्याला घेरत ताब्यात घेतले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन करा; बाजी तुमचीच!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नसतो. फक्त ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जा. छोट्या चुका टाळा. नेमकेपणाने उत्तर लिहिण्यावर भर द्या. परीक्षेचे नियोजन करा. तुम्हीच बाजी माराल,’ असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी महाराराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित ‘दहावी परीक्षेचे घेऊ नका टेन्शन’ या उपक्रमात शनिवारी विद्यार्थ्यांना केले.
रामनगर परिसरातील वसंतदादा पाटील हायस्कूलमध्ये झालेल्या मार्गदर्शन सत्रात संजय बाजी पाटील (गणित), विनायक पवार (विज्ञान), योगेश जाधव (इंग्रजी), गजानन सूर्यवंशी (विज्ञान) वसंतदादा पाटील हायस्कूलचे प्राचार्य बी. जी. खोडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘परीक्षा जवळ आली की विद्यार्थी, पालकांमध्ये एक प्रकारची भीती असते. या भीतीला दूर करण्याचे काम या उपक्रमातून झाले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा हा उपक्रम विद्यार्थ्यांना बळ देणारा आहे,’ असे वसंतदादा हायस्कूलचे प्राचार्य बी. जी. खोडवे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. मार्गदर्शन सत्राला परिसरातील बालाजी हायस्कूल, ज्ञानदीप हायस्कूल, संस्कार प्रबोधिनी हायस्कूल, श्रीराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. डोईफोडे यांनी केले. प्रारंभी हायस्कूलच्या विद्यार्थिनी गायत्री देशमुख, साक्षी आमकर, निकिता रगडे यांनी ‘सूर हे स्वागताचे, गाऊ चला एक वार’ हे स्वागत गीत सादर करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
-
तज्ज्ञांचे बोल
-
दहावीचा टप्पा करिअरसाठी टर्निंग पॉईंट आहे. त्यात गणित हा विषय महत्त्वाचा. परीक्षेत काहीवेळी छोट्या चुका होतात. ज्यामुळे गुण कापले जातात. गणित विषयाबाबत उगाच बाऊ केला जातो. हा विषय अतिशय सोपा असून गणितात सहा प्रकरणांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. यात जोड्या, ऑबजेक्टिव प्रश्न नाहीत. भविष्यात तुम्हाला इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी या विषयाचा परिपूर्ण अभ्यासच कामी येतो. सर्वात आधी विद्यार्थ्यांनी या विषयाची क्वश्चन बँक तयार करावी. त्याचा सराव करावा. समीकरण, संभाव्यता, सूत्र महत्त्वाचे असतात. गणित सोडविताना उदाहरणे नको, तर मेथड पाठ करा. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर ती काळजीपूर्व वाचा. प्रत्येक घटक वाचल्यानंतर सोडवायला सुरुवात करा. प्रश्न क्रमाने लिहा, खाडाखोड टाळा. आकृती काढताना तिच्या योग्यतेकडे लक्ष द्या. जे कराल ते शंभर टक्के करा. - संजय बाजी पाटील, गणित विषयतज्ज्ञ
-
२०१४सालापासून इंग्रजी विषय कौशल्याशी जोडण्यात आला आहे. या विषयाचा अभ्यास करताना तुमच्यामध्ये असलेले कौशल्य उत्तरपत्रिकेतून तपासले जाते. लेखन कौशल्य, शब्दसंग्रह, उत्तरांची मांडणी हे तपासले जाते. दैनंदिन जीवनाशी इंग्रजी विषयाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वाचन, शब्दसाठा आणि व्याकरण या तिन्ही बाबी प्रश्नपत्रिका सोडविताना उपयुक्त ठरतात. उतारा सोडविताना तो पूर्णपणे वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घ्या. त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पत्रलेखन करताना तीन भागात विश्लेषण करता आले पाहिजे. त्याची थीम काय आहे हे मांडता आले पाहिजे. भाषांतर करताना शब्दशः लिहिण्यापेक्षा नेमके तेच, आशयपूर्ण लिहण्याचा प्रयत्न करा. बोली भाषेपेक्षा लिपी भाषा महत्त्वाची असते. पेपर तपासणीसाला आपल्या उत्तरात नेमकेपणा, आशयपूर्ण उत्तरे दिसली, तर गुण कमी होणार नाहीत. - वाय. बी. जाधव इंग्रजी विषयतज्ज्ञ
-
दहावीला गेलो की सुरुवातीपासून अभ्यासावर आपले लक्ष असते. अध्ययनासोबत चिंतन, मनन करा. त्याची जोड द्या. संकल्पना समजून घ्या. ज्यांनी परीक्षेची तयारी फारशी काळजीपूर्वक केली नाही, त्यानांही अद्याप संधी आहे. २४ दिवस शिल्लक आहेत. ताणतणाव न घेता परीक्षेचा अभ्यास करा. जो अभ्यास केला तो शांततेने आठवा. त्यावर विचार करा. त्यामुळे तो अभ्यास कायम स्मरणात राहतो. परीक्षेत येत नाही म्हणून प्रश्न सोडून देऊ नका. तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या भाषेत उत्तर लिहा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा उत्तर लिहा. - गजानन सूर्यवंशी, विज्ञान विषयतज्ज्ञ
-
विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी तुम्हाला संधी असते. गाइडपेक्षा पाठ्यपुस्तक वाचण्यावर भर द्या. त्यातील अभ्यासच महत्त्वाचा आहे. पेपर तपासणाऱ्यांना पुस्तकातील भाषा अपेक्षित असते. फरक स्पष्ट करा, अशा प्रश्नांमध्ये निबंधवजा उत्तरे लिहण्याचे टाळत मुद्देसूद उत्तर लिहा. विज्ञानात शास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या उत्तर अपेक्षित असते. विभाग ‘अ’ व ‘ब’ असे दोन विभाग विज्ञानात आहेत. प्रश्न वाचल्यानंतर त्याचे उत्तर लिहिण्यास सुरुवात करा. आपली प्रयोगवही म्हणजे ३० गुणांची असते. त्यामुळे प्रयोगाच्या अभ्यासावर लक्ष द्या. - विनायक पवार, विज्ञान विषयतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अग्निपथः मेरी आवाज मेरी पहचान !

$
0
0


Tushar.Bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
आवाजावरील हुकूमत व लक्षवेधी अभिनय ही सद्दाम शेख या तरुण कलावंताची ओळख. शेकडो बक्षिसांचा मानकरी ठरलेला मिमिक्री आर्टिस्ट सद्दाम प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभिनेता म्हणून स्थिर होत आहे. एकांकिका, नाटक, चित्रपट माध्यमात वावरताना भारदस्त आवाज त्याची ओळख ठरली आहे.
हुबेहूब आवाजाचा अस्सल आविष्कार घडवण्याची त्याची हातोटी हजारो रसिकांना चकीत करते. स्टेजवर तो उभा राहिला की लोकप्रिय कलाकार, यंत्र, वाद्ये, वाहन, कार्टून पात्र अशा शेकडो आवाजांची मालिका सुरू होते. कान बंद केले तर खरीखुरी व्यक्ती बोलल्याची आणि वाहन सुरू असल्याची खात्री व्हावी असा बेमालूम सफाईदारपणा.
मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता असलेल्या सद्दाम शेख या गुणी तरुणाची ही खासियत राज्यभर परिचित आहे. महाविद्यालयाचे गॅदरिंग, युवक महोत्सव, इंद्रधनुष्य महोत्सव, राष्ट्रीय युवक महोत्सव अशा स्पर्धा व महोत्सवात सद्दाम शेकडो पारितोषिकांचा मानकरी ठरला. स्पष्ट शब्दोच्चार, रियाज व अथक मेहनतीच्या बळावर त्याच्यातील मिमिक्री आर्टिस्ट घडला. किंबहुना आवाज हीच त्याची ओळख ठरली. औरंगाबादेतील हुसेन कॉलनीत सद्दाम शेख राहतो. ज्ञानप्रकाश विद्यामंदिर शाळेत शालेय शिक्षण झाले. संत मीरा कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. अवतीभवतीच्या माणसांचे व वाद्यांचे आवाज काढण्याची सवय व आवड होती. मात्र, आवडीचे रुपांतर व्यवसायात होईल याची जाण नव्हती. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. केवळ शुल्क कमी असल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच घरच्या जबाबदारीचे ओझे अंगावर पडले. शाळेच्या सुटीत रसवंतीगृहात काम केले. कॉलेजात असताना केटरिंग व्यवसायात वेटरचे काम अनुभवले. केटरिंगमध्ये आचारी, पाहुणे, सहकारी यांचे हुबेहूब आवाज काढून सद्दाम सर्वांचा शीण हलका करायचा. बारावीत असताना कॉलेजात गॅदरिंगची तयारी सुरू होती. गाणे, नाटक, स्किटच्या तालमीत विद्यार्थी रंगले होते. केवळ टाइमपास म्हणून सद्दाम इतरांची नक्कल करीत होता. हा प्रकार प्रा. मुळे मॅडम यांनी पाहिला. ‘तुला गॅदरिंगमध्ये मिमिक्री करायची आहे,’ असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम पत्रिकेत नाव पाहून सद्दामच्या मनात भीती दाटली. प्राचार्यांची भेट घेऊन ‘मिमिक्री काय प्रकार असतो,’ अशी थेट विचारणा केली. तोपर्यंत ‘मिमिक्री’ शब्दसुद्धा माहीत नव्हता. प्राचार्यांनी धीर दिला आणि प्रोत्साहन दिले. सद्दामने ऐनवेळी कथानक तयार केले. लोकप्रिय कलाकार क्रिकेट खेळताना घडणारा संवाद रचला. केटरिंगचे जुने ब्लेझर घालून परफॉर्मन्स केला. काय आश्चर्य ! या परफॉर्मन्सने गॅदरिंग जिंकली. नऊ कलाकार असलेल्या नाटकाला ५० रुपये आणि मिमिक्री कलाकार सद्दामला ५० रुपये बक्षीस मिळाले. आयुष्यातील पहिलाच परफॉर्मन्स आणि पहिलीच कमाई. योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे करिअरचा मार्ग सापडला. अन्यथा, बारावीनंतर शिकण्याचासुद्धा आत्मविश्वास नव्हता.

‘माझे आवाजाचे कौशल्य पाहून मुळे मॅडम यांनी नाट्यशास्त्र विभाग किंवा संगीत विभागात प्रवेश घे असा सल्ला दिला. शहरातील सर्व कॉलेजात फिरल्यानंतर देवगिरी कॉलेजमध्ये गेलो. पहिल्यांदा प्रा. अनिलकुमार साळवे यांची भेट झाली. नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. कॉलेजचे आधीचे मिमिक्री आर्टिस्ट विद्यार्थी पास होऊन बाहेर पडले होते. त्यामुळे मला लवकर संधी मिळाली. प्रा. रामदास ठोके सरांनी चांगली तयारी करून घेतली, पण युवक महोत्सवात दुसरे बक्षीस मिळाले. यापूर्वी कॉलेजला पहिले बक्षीस मिळत होते असे सरांनी सांगितल्यानंतर जिद्दीला पेटलो. बारा-बारा तास तयारी केली अन् केंद्रीय युवक महोत्सवात प्रथम बक्षीस मिळवले. कोणताही मिमिक्री आर्टिस्ट काढतो तेच आवाज मी काढायचो. मात्र, आवाजाची संख्या वाढवून वैविध्य राखण्याचे आव्हान स्वीकारले. या तयारीचा खूप फायदा झाला,’ असे सद्दामने सांगितले. कॉलेजात संधी मिळत असली तरी कौटुंबिक जबाबदारी संपली नव्हती. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून सद्दाम गवंडीकाम काम करायचा. काम करून थेट कॉलेज गाठायचे. इतर मुलांना कळू नये म्हणून सिमेंटने भरलेली चप्पल स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर प्रॅक्टिस करायची. हा शिरस्ता अनेक दिवस पाळला. वादन, नेपथ्य निर्मिती, मिमिक्री, अभिनयात पारंगत असल्यामुळे धडपडीचे रुपांतर संधीत झाले. युवक महोत्सवात मूकाभिनय, प्रहसन, एकांकिका आणि मिमिक्री अशा चार प्रकारात बाजी मारली. तीन वर्षात अनेक बक्षीसे मिळवली. ‘कथा खैरलांजी’ नाटक, ‘ग्लोबल आडगाव’, ‘शेख मोहम्मद मराठी माध्यम’, ‘गांधीजींचा चष्मा’ एकांकिकांमुळे अभिनय करू शकतो याचा उलगडा झाला. चरितार्थासाठी सद्दाम ऑर्केस्ट्रात मिमिक्री करू लागला. तुटपुंजे मानधन देऊन अनेकांनी बोळवण केली, पण मिळालेल्या संधीचे सोने करायचे ही जिद्द कायम राहिली. ‘स्वरांजली ऑर्केस्ट्रा’चे पाशा खान यांनी योग्य मानधन देऊन संधीचे दार खुले केले. या कालावधीत एका खासगी वाहिनीच्या ‘कॉमेडी स्टार की खोज’ या शोसाठी सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. वीस दिवस वेगवेगळ्या गावात कॅम्पेन करण्याचे काम होते. सलग बारा तास अँकरिंग करून आवाज फाटला, प्रकृती बिघडली. मात्र, इलाज नव्हता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील १७ हजार स्पर्धकांतून टॉप १२ स्पर्धक निवडण्यात आले. या बारा जणांतून टॉप पाचजण निवडले जाणार होते. ही निवड फेरी नाशिक शहरात पार पडली. या फेरीचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी कौशल्यामुळे सद्दामला मिळाली. उपजत अभिनय गुण आणि आवाजातील वैविध्य पाहून संयोजकांनी त्याला महाराष्ट्राकडून स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला. ऐनवेळी सूत्रसंचालक स्पर्धक झाला आणि टॉप फाइव्हमध्ये निवडला गेला. अंतिम फेरी मुंबईत अभिनेता अजय देवगणच्या उपस्थितीत पार पडली. डीजे आणि ठेवणीतील जबरदस्त आवाज काढत सद्दामने अंतिम फेरीत पहिला क्रमांक पटकावला. ‘तेरी आवाज बढिया है,’ असे कौतुक अजयने केले. तेव्हा सद्दाम आपण स्वप्नात तर नाही ना या विचारात बुडाला. रोख २५ हजार रुपये बक्षीस मिळाले. शिवाय ‘अकबर-बिरबल’ मालिकेत अभिनयाची संधी पदरात पडली.

हा अनुभव सद्दामला खूप काही शिकवून गेला. औरंगाबाद शहरात राम झिंझुर्डे, सुजित देठे, नीलेश वाघमारे या मित्रांसोबत सद्दाम आता शॉर्टफिल्म निर्मितीतून वेगळी वाट शोधत आहे. ‘पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धे’तील काम पाहून दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी ‘चिवटी’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती टीममध्ये सद्दामला संधी दिली. सिनेमाचे खरे जग त्याने इथे अनुभवले. करिअरला योग्य दिशा देण्यासाठी ‘चिवटी’चा अनुभव कामी आला. आता डबिंग आर्टिस्ट आणि अभिनेता म्हणून स्थिर होण्यासाठी सद्दामची धडपड सुरू आहे. असे म्हणतात की, ध्येयाने प्रेरित व्यक्तीला प्रतिकूल परिस्थिती रोखू शकत नाही. अन् ध्येयापासून विचलित होणे, तर सद्दामच्या स्वभावात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट स्टेडियम मटा कँपेन: समिती स्थापनेच्या निर्णयाचे स्वागत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. या समितीत प्रशासकीय अधिकारी व कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या समितीत क्रिकेटच्या विकासात सक्रिय भूमिका बजावू शकतील अशांच सदस्यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा माजी खेळाडू, क्रिकेट संघटकांनी व्यक्त केल्या आहेत.
‘क्रिकेट स्टेडियम मटा कँपेन’ या मालिकेव्दारे क्रिकेट स्टेडियम मोहिमेला दिशा दिल्याबद्दलही क्रीडा वर्तुळात ‘मटा’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करण्यात आले आहे. माजी रणजीपटू अनंत नेरळकर म्हणाले, ‘स्टेडियमसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय ही सकारात्मक गोष्ट आहे. सुनील केंद्रेकर व ओम प्रकाश बकोरिया यांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे. क्रिकेटवरील त्यांचे प्रेम पाहता ते या प्रोजेक्टला योग्य दिशा निश्चित देतील यात शंकाच नाही. स्टेडियममुळे क्रिकेटच्या आधुनिक सुविधा निर्माण होतील. औरंगाबादच्या वैभवातही भर पडेल. जिल्हा क्रिकेट संघटनेचे कामकाजही अधिकृत होणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.’
क्रिकेट संघटक प्रभुलाल पटेल म्हणाले, ‘क्रिकेट स्टेडियमसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे पाऊल योग्यच आहे. या समितीमुळे क्रिकेट विकासाला योग्य दिशा लाभू शकेल. या समितीत क्रिकेट क्षेत्रात तळमळीने योगदान देऊ शकणाऱ्यांचा समावेश असावा. तरच ही मोहीम योग्य दिशेने वाटचाल करेल. स्टेडियम उभारणीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका मोलाची ठरणार आहे. वरिष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू दिनेश कुंटे यांनीही क्रिकेट स्टेडियमसाठी स्वतंत्र समिती नेमण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. कुंटे म्हणाले, ‘मटा कँपेनची खेळाडूंमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. खेळाडूंच्या आशाआकांक्षांना या मालिकेच्या माध्यमातून फुलविण्याचे काम झाले आहे. स्टेडियम कधी होणार यापेक्षा स्टेडियमसाठी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच एकत्रित होणे आवश्यक आहे. स्टेडियम उभारणीबरोबरच जिल्हा क्रिकेट संघटनेतील वाद मिटवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील वाटचाल सोपी होईल.’
‘क्रिकेट स्टेडियमसाठी स्वतंत्र समिती स्थापनेचा निर्णय म्हणजे एक चांगले पाऊल पडले आहे. चांगले पेरले तर चांगलेच उगवते. समितीत योग्य व्यक्तींचा समावेशही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. समितीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण काम झाल्यास स्टेडियमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल,’ असे वरिष्ठ क्रिकेट पंच अॅड. बाळासाहेब वाघमारे यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकांनी मटा कँपेनचे स्वागत केले आहे. विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे म्हणाले, ‘क्रिकेट स्टेडियम उभारणी ही अत्यंत चांगली मोहिम मटाने हाती घेतली आहे. या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होत नाही तोपर्यंत थांबता कामा नये.’

क्रीडा संघटकांचा पाठिंबा
जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, पंकज भारसाखळे, डॉ. मकरंद जोशी, शेख हबीब, प्रसाद कुलकर्णी, आबासाहेब सिरसाठ, राकेश खैरनार, राहुल तांदळे, संदीप जाधव, सचिन देशमुख, प्रवीण शिंदे, कुलजितसिंग दारोगा, उमेश ठक्कर, विजय गाडेकर, रवींद्र माळी, अविनाश बारगजे, गणेश कड, गोविंद शर्मा, दिनेश वंजारे, जसप्रितसिंग भाटिया, शाकेर राजा, विनोद माने, रियाजउद्दिन मोहंमद अशा अनेक क्रीडा संघटकांनीही या प्रोजेक्टचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांना रोखण्यासाठी समिती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी आता प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये त्रिस्तरीय समिती स्थापन करा, असे आदेश पोलिस उपायुक्त व्ही. के. परदेशी यांनी दिले आहेत.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर बनला आहे. शहरातील अनेक शाळा, कॉलेज प्रशासनानोही याबाबत आवाज उठविला आहे. या टवाळखोरांना रोखण्यासाठी शाळा, कॉलेजांमध्ये ‘शिक्षक, पालक व पोलिस’ समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना समोर आली होती. या सुचनेनुसार औरंगाबाद शहर, ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत ही समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसे आदेश पोलिस उपायुक्त व्ही. के. परदेशी यांनी काढले आहेत. देवगिरी कॉलेजचे चंद्रकांत गायकवाड यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

समितीचे काम
शाळा, कॉलेजांमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या व फिरणाऱ्या टवाळखोर मुलांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच पालक, शिक्षक, मुले व पोलिस यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती काम करेल. समिती वेळोवळी शाळा, कॉलेजमध्ये भेटी देवून तेथील अडी-अडचणी याबाबत चर्चा करेल. या भेटीचे नोंदी ठेवण्यात येणार आहेत. त्यासह दरमहिन्याच्या ५ तारखेला समिती अहवाल सादर करेल.

अनेक टवाळखोरांच्या टोळ्या शाळा, कॉलेजांबाहेर उभ्या असतात. मुलींनी शाळा, कॉलेजमध्ये यायचे की नाही, अशी स्थिती आहे. शिक्षकांना टवाळखोर जुमानत नाहीत. तक्रार दिली तरी त्यांना रोखण्यास प्रशासनाला अपयश येते. या घटना रोखण्यासाठी सक्षम ‘सपोर्ट सिस्टीम’ निर्माण करा. ‘शिक्षक-पालक-पोलिस’ समिती स्थापन करता येऊ शकते का, हा विचार मांडला होता. मागील वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही कार्यशाळाही घेतली होती. त्यावेळी छेडछाडीच्या घटनांचे आकडेवारीही मांडली होती. त्यावर आता पोलिस प्रशासनाकडून हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. - प्रा. चंद्रकांत गायकवाड, देवगिरी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मटसक्ती; पाचशे जणांवर कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेट न घालणाऱ्या पाचशेहून अधिक दुचाकीस्वारांविरुद्ध आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार वाहनचालकांविरुद्ध शनिवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात अधिक सक्तीने कारवाई करू, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार वाहतूक शाखेने शुक्रवारपासून कडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांत सुमारे एक हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासह ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसविणे, फ्रन्ट सीटवर प्रवासी यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे एक हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात पुण्यतिथी कार्यक्रमावरून राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत, तोडफोडीत झाले. कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातील गट उभा राहिला. त्यावरून भाजयुमो, अभाविपचे कार्यकर्ते संतापले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. व्यवस्थापन परिषद बैठक कक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. वादानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला. सुमारे चार तास हा गोंधळ सुरू होता.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात ‘एकात्म मानव जीवन दर्शन’ विषयावर डॉ. अशोक मोडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी रुजविण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत बहुजन क्रांती मोर्चाचे आनंद लोखंडे, सचिन शिंदे, कमलेश चांदणे, बलवंत शिंदे, दिनेश चांदणे, शेखर निकम, जयप्रकाश नारनवरे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला. प्रशासनाने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी केली नाही. मात्र, उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी केली, असा आरोप केला. यानंतर भाजयुमो, अभाविपचे कार्यकर्तेही उभे राहिले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन्ही गटातील सदस्यांना घेऊन व्यवस्थापन परिषद सदस्य बैठक कक्षात पोहचले. तोपर्यंत हा वाद इतर कार्यकर्त्यांना समजला आणि विद्यापीठात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परिषदेच्या दालनात जोरदार घोषणाबाजी आणि वाद वाढला. डॉ. मोडक यांचे व्याख्यान उधळल्याचे समजताच भाजयुमो, अभाविपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दाखल झाले. यामध्ये सचिन झवेरी, दीपक ढाकणे, हरीश वाघ, सागर पाले, कुणाल मराठे, अजित लोखंडे आदींचा समावेश होता. त्यांच्यासोबत प्रा. गजानन सानप होते. चर्चेदरम्यान वाद झाला आणि त्यानंतर तुफान हाणामारी झाली. दालनाच्या प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे नेते, कार्यकर्तेही दाखल झाले. घोषणांनी सारा परिसर दणाणला. विद्यापीठात सुमारे चार तास हा प्रकार सुरू होता.
सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर प्रकरणाची पोलिस ठाण्यात कोणी तक्रार करायची यावरून प्रशासनात पुरता गोंधळ दिसला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. सुहास मोराळे यांना बोलावले. 'मी तक्रार देणार नाही', असे डॉ. मोराळे यांनी सांगितले, तर मी प्रभारी आहे कशी तक्रार करू असे कुलसचिवांनी सुनावल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सुरक्षारक्षक परदेशी यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दाखल केला. त्यात अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड झाल्याची नोंद असल्याचे कळते.
पोलिस या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कुलगुरूंनी तोडफोड होत असताना मुख्य प्रशासकीय इमारतीतून काढता पाय घेतला. तक्रारीबाबत कुलसचिवांना घरी बोलावून चर्चा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाने आयोजित केलेला कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाडोत्री गुंडांच्या साह्याने उधळला. हा प्रकार निंदनीय आहे. एखाद्या महान व्यक्तीच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गुंडगिरीच्या माध्यमातून असा उधळणे हे योग्य नसून विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. - प्रा. गजानन सानप, भाजप

व्याख्यानादरम्यान आम्ही आक्षेप घेतला, त्यानंतर प्रकरण शांत झाले. भाजप, युवामोर्चा, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर वाद घातला. सभागृहाच्या काचा, दरवाजाची तोडफोड केली. - सचिन शिंदे, बहुजन क्रांती मोर्चा

या सगळ्या प्रकाराला कुलगुरू जबाबदार आहेत. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून संघाचे विचार पसरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला आमचा विरोध राहणारच. सोमवारी आम्ही त्याबाबत आणखी आंदोलन करणार आहोत. - अमोल दांडगे, राविकाँ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images