Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

$
0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदिव्यांची वीज वैजापुरात खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
सात वर्षांपासूनच्या अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने गुरुवारी नगरपालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. पण, प्रशासक संदीपान सानप यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यासोबत चर्चा दोन ते तीन दिवसांत थकबाकी भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आश्वासनानुसार थकबाकी न भरल्यास पुन्हा वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे.
थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे वसुली मोहीम राबवली जात आहे. पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वसूचना न देता खंडित केला जा आहे, अशी तक्रार आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालये व शासकीय कर्मचाऱ्यांची निवास्थाने, पोलिस वसाहत यांच्याकडे अनेक वर्षांपासून थकबाकी आहे. मात्र, त्यांच्याकडून वसुली होत नसल्याने त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर टाकला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुली पथकाने गुरुवारी नगरपालिकेकडे मोर्चा वळवला. वैजापूर नगरपालिकडे २०१० पूर्वीची अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पथकाने नगरपालिकेची वीज कापली. त्यामुळे शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित केल्याने संपूर्ण शहराला अंधारात राहावे लागले असते. प्रशासक संदीपान सानप यांनी महावितरणच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांशी चर्चा केल्यानंतर कारवाई तूर्त स्थगित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद पालिकेची नाथषष्ठीसाठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाथषष्ठी यात्रा महोत्सवादरम्यान भाविक व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. महापालिकेची डॉग व्हॅन, स्वीपर ट्रक व फॉगिंग मशीन शहरात कार्यान्वित झाले आहे. यात्रेदरम्यान महापालिकेचे आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पाठवला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राहूल सूर्यवंशी यानी दिली.
नाथषष्टी यात्रेसाठी मुख्य तीन दिवसाच्या कालावधीत राज्यातून लाखो भाविक पैठण येते मुक्कामी येतात. त्यांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी नगर पालिकेची असते. नगर पालिकेकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने सुविधा पुरवण्यासाठी दरवर्षी कसरत करावी लागते. हे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी औरंगाबादचे महापौर भगवान घडमोडे यांची मंगळवारी भेट घेऊन मदत मागितली. महापौरांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे लोळगे यांनी सांगितले.
नगर पालिकेने मागणी केल्यानुसार बुधवारी औरंगाबाद महापालिकेची डॉन व्हॅन, फॉगिंग मशीन व स्वीपर ट्रक शहरात दाखल झाले, या यंत्राद्वारे कामकाजाला सुरुवात झाल्याचे मुख्याधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. यात्रा काळात आरोग्य पथक दाखल होणार असून भाविक व वारकरी यांना पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून महापालिकेचे पाण्याचे टँकर शहरात कार्यरत राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आठ दिवसांत अहवाल द्या’

$
0
0

‘आठ दिवसांत अहवाल द्या’
म. टा. प्रतिनिधी, लातूर
जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने आठ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्या आहेत.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पीक नुकसानीबाबत महसूल व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत खोत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, विभागीय कृषी सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, अहिल्या गाठाळ, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी (जि.प.) बी. एस. रणदिवे, आदी उपस्थित होते. खोत पुढे म्हणाले की, प्रशासनाने पंचनामे पूर्ण झाल्यानंतर गावनिहाय याद्यांचे वाचन प्रत्येक नुकसानग्रस्त गावांत शेतकऱ्यांसमोर करावे. याबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार असेल, तर त्याची तात्काळ दखल घ्यावी. पीक नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी यंत्रणेकडून एकत्रितपणे करावेत व पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही घ्यावी. औसा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना मोठ्या प्रमाणावर गहू, ज्वारी, द्राक्ष या पिकांचे, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले खोत यांनी पाहिले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही खोत यांनी सांगितले.
यावेळी खोत यांनी खरीप हंगाम २०१५ चा ६०९ कोटी रुपये पीकविमा, तर रब्बी हंगामाचा १०९ कोटी रुपयांचा पीकविमा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असून लवकरच प्रशासनामार्फत त्याचे वाटप होईल, अशी माहिती दिली. २०१६ च्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान लवकर मिळण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक जमदाडे यांनी लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीविषयी माहिती दिली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, लोहारा व उमरगा या चार तालुक्यांत, तर लातूर जिल्ह्यातील लातूर व औसा तालुक्यांत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती दिली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कदम यांनी लातूर तालुक्यातील ३,३०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे, तर औसा तालुक्यातील १९,८४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती देऊन दोन-तीन दिवसांत पूर्ण आकडेवारी येईल, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार संजय वारकड यांनी लातूर तालुक्यातील ढाकणी या गावांमध्ये वीज पडल्याने शुभम तानाजी सुरवसे यांचा मृत्यू झाला असून शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ‘आत्मा’ मार्फत जलजागृती सप्ताहनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘समूह शेतीसाठी शेत गटनिमिर्ती’या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांवर ट्रक घालणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवळाई चौकात जालन्याकडून येणारा हायवा ट्रक थांबवल्यानंतर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर ट्रक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायवा ट्रकचालकास बुधवारी अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (१८ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी दिले.
वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक (एम एच २१, एक्स ३४०४) हा २८ जानेवारी रोजी जालन्याकडून महानुभाव आश्रमाकडे जात असताना उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकातील मंडळ अधिकारी केशव डकले, तलाठी डी. डी. साळवे यांनी देवळाई चौकात अडवला. ‘ट्रक सातारा पोलिस ठाण्यात घे’ असे चालकाला सांगताच, ‘रस्त्यावरून बाजूला घेतो’, असे म्हणत चालकाने हायवा ट्रक थांबवला. दोन्ही अधिकारी जवळ जाताच चालकाने ट्रक रिव्हर्स घेतला आणि लगेच समोरुन येणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. यात काही अधिकारी जखमी झाले. त्यानंतर चालकाने ट्रक सुसाट वेगाने आडरस्त्याने देवळाई परिसरात नेला. कर्मचाऱ्यांनी ट्रकचा २० किलोमीटर पाठलाग केला व हा ट्रक सिंदोन-भिंदोनमार्गे शिवगडतांडा परिसरात सापडला. त्यात वाळू नव्हती. खासगी चालक बोलावून हा ट्रक सातारा पोलिस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी हायवा ट्रकचालक शेख हुसैन शेख निजाम (३०, रा. गोंदी, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला बुधवारी अटक करुन गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. बी. एन. कदम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमादार थापाच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चलनातून बाद झालेल्या एक कोटीच्या नोटा घरात दडवून ठेवणाऱ्या निलंबित पोलिस जमादार वीर बहादूर थापा व त्याच्या पाच साथीदारांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (२० मार्च) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहमंद यांनी गुरुवारी दिले.
जुन्या व चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी हे संशयित आरोपी, राजेश हरगोविंद ठक्कर (रा. सिडको, औरंगाबाद) यांच्याकडून २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता कारमधून रक्कम घेऊन पळाले होते. याप्रकरणी शेख फजल शेख युसूफ (वय २३, रा. किराडपुरा), जमील खान जलील खान (वय ३६, रा. बिसमिल्ला कॉलनी, नारेगाव), अब्दुल साजीद अब्दुल कय्युम (वय २५, रा. कैसरपार्क, नारेगाव), शेख सद्दाम शेख रियाज (वय २४, रा. रहिमानिया कॉलनी, किरडपुरा) यांना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, चौकशीत निलंबित पोलिस जमादार वीर बहादूर कुलबहादुकर गुरुंग (थापा) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे थापाला अटक करण्यात आली होती. तसेच साथीदार योगेश गजानन शेटे (रा. टी. व्ही. सेंटर, औरंगाबाद) यालाही अटक करण्यात येऊन, थापा याने गुन्ह्यात वापरलेली गाडी, मोबाइल जप्त करण्यात आला होता. एक कोटी रुपयातील उर्वरीत ६ लाख रुपयांची रक्‍कम वसूल करण्यासाठी आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींची कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केले असता, कोठडीदरम्यान आरोपींनी सहा लाखांची रक्कम साजिद अब्दुल उर्फ अंकल कैय्युम याच्याकडे दिल्याची कबुली दिली, तर साजिदने ही रक्‍कम त्याची पत्नी सुमय्याकडे दिल्याचे सांगत, तिने ते पैसे जाळून टाकले असावेत, असे सांगितले. तर, साजिदची पत्नी फरार झाली आहे. यावर सहायक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी युक्‍तीवाद करीत, आरोपींकडून सहा लाख रुपये हस्तगत करणे बाकी आहे. त्या नोटा नष्ट केल्या का, याची विचारपूस करणे, तसेच आरोपी साजिदच्या पत्नीचा ठावठिकाणा जाणून घेणे व व सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकार पक्षाकडून कोर्टात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका पुन्हा तपासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
बीड जिल्ह्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संबंधित व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या परीक्षेत (व्होकेशलन कोर्स) गैरप्रकार करणाऱ्यांच्या संस्था व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात विभागीय चौकशी, फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले. नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासून गुणांकन करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.
बीड जिल्ह्यात १०५ तंत्रशिक्षण संस्था असून, या संस्थांमार्फत विविध व्होकेशनल कोर्सेस चालवले जातात. व्यावसाय शिक्षण प्रशिक्षण संस्थांतर्गत चालवणाऱ्या जाणाऱ्या या विद्यालयांच्या १ जुलै रोजी घोषित झालेल्या निकालानंतर ‘कन्स्ट्रक्शन सुपरवायझर’ या कोर्समधील गैरप्रकार चव्हाट्यावर आला. त्यामुळे खालापुरी (जि. बीड) येथील प्रताप तंत्रशिक्षण संस्थंचे सचिव आत्माराम नामदेव बांगर यांच्यासह १८ शिक्षण संस्थांतर्फे खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
१ जुलै २०१६ रोजी जाहीर झालेल्या निकालात बीड येथील संत कन्हैय्या महाराज सामाजिक प्रतिष्ठान व संत कन्हैय्या महाराज सामाजिक प्रतिष्ठान या दोनच संस्थांचा निकाल शंभर टक्के लागला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १७० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यात तब्बल ८८ विद्यार्थी या दोन संस्थाचे आहेत. उर्वरित १०३ संस्थांचे ८२ विद्यार्थी आहेत. संत कन्हैय्या महाराज या दोन्ही संस्था पंडित टोपाजी मुने या तंत्रनिकेतनमधील कर्मचाऱ्याच्या पत्नी व भावाच्या नावाने आहेत. एप्रिल २०१६मध्ये झालेल्या परीक्षेत मुने हे स्वत: दोन्ही संस्थेच्या परीक्षेत केंद्रप्रमुख होते. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण विभागाच्या गुणदान समितीमध्येही ते सदस्य होते, असे याचिकेत नमूद केले आहे.
गैरप्रकार केल्याने दोन्ही संस्थांचा निकाल शंभर टक्के लागला, असा आरोप याचिकेत करण्यात आला. या प्रकरणाची समिती नेमून चौकशी करण्याची विनंती याचिकेत केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे एस. ए. डेंगळे, बाबासाहेब डेंगळे यांनी बाजू मांडली. शासनातर्फे ए. एस. शिंदे यांनी काम पाहिले.

कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई
यापूर्वी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने तंत्रशिक्षण सहसंचालकांसह त्रिसदस्यीय समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चौकशी करून खंडपीठात बंद लिफाफ्यात अहवाल सादर केला. या अहवालानुसार दोन्ही संस्थांनी गैरप्रकार केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. याप्रकरणी संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून, स्वतंत्र फौजदारी कारवाई करावी, अशी सूचना अहवालात करण्यात आली होती. हा अहवाल मान्य करून खंडपीठाने सर्व संबंधितांची ३० दिवसांत खातेनिहाय चौकशी करावी. त्याचप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी कारवाईही करावी. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका पुन्हा तपासाव्यात, विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला मारहाण; संघटनेकडून निषेध

$
0
0

औरंगाबाद : धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने निषेध केला. याप्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही संघटनेने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही संघटनेमार्फत व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक यंत्रणा कुचकामी ठरली असून, ही यंत्रणा बदलण्यात यावी; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांना तातडीने पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे आणि गंभीर रुग्ण वगळता इतरांना रुग्णालयात येण्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणीही संघटनेमार्फत करण्यात आली.
संघटनेचे प्रदेश प्रवक्ते व शहर कार्यकारिणीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. शिवाजी सुक्रे, शहर अध्यक्ष डॉ. गजानन सुरवाडे, सचिव डॉ. एम. एस. बेग, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. उद्धव खैरे आदींनी डॉ. म्हस्के यांना मंगळवारी निवेदन दिले.

आज मोर्चा, निदर्शने
धुळ्यातील निवासी डॉक्टरवर झालेल्या प्राणघातक मारहाणीच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) तसेच मार्ड संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घाटी परिसरातून पैठण गेटपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. तेथे निदर्शने करण्यात येणार असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घटनेच्या माध्यमातून पुन्हा क्रांतीची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यघटना तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात मोठी क्रांती घडविली. सध्या या राज्यघटनेतील तत्वांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून, देशात असंतोष निर्माण केला जात आहे. तो दूर करण्यासाठी पुन्हा एकदा राज्यघटनेचाच आधार घ्यावा लागणार आहे. घटनेच्या तत्वांची पूर्णपणे अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलन उभारून क्रांती करण्याची गरज अाहे, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांनी व्यक्त केले.
‌पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांच्या हस्ते मिलिंद समता पुरस्कार बाली यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, देशात राज्यघटनेचे पालन प्रामाणिकपणे केले जात नाही. यामुळे असंतोषाचे वातावरण नि‌र्माण झाले आहे. राज्यघटनेच्या तत्वांचा आपल्या फायद्यासाठी वापर केला जात आहे. देशातील संपत्ती ५८ टक्के श्रीमंतांच्या हातात आहे. जमिनी राजकारण्यांकडे आहेत. देशात औद्योगिक विकास; तसेच भूसुधारसारख्या योजना योग्य पद्धतीने राबविण्यात आल्या नाहीत. आरक्षण, बेरोजगारीमुळेच देशात असंतोष पसरला आहे. या असंतोषावर राज्यघटनेत उपाय सांगितले आहेत.
देशातील असंतोष दूर करण्यासाठी आंबेडकरी विचारांच्या जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना तयार करून एक क्रांती घडवून आणली. राज्यघटनेच्या तत्वांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा क्रांती करावी लागणार आहे. त्यासाठी देश-विदेशातील आंबेडकरी विचारांच्या व्यक्तींची एक शिखर परिषद आयोजित करण्याची गरज आहे. त्यामाध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी मांडलेल्या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. प्रधान यांनी सांगितले की, आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि आपल्या साहित्यातून समाजात आंबेडकरी विचार रुजविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळेच हा मिलिंद समता पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला अाला.

‘बाली यांचे भाषण महत्त्वाचे’
पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी भूषविले होते, मात्र ‘एल. आर. बाली यांच्यासारखे आंबेडकरी विचारवंत बोलणार अाहेत. त्यांचे भाषण महत्त्वाचे आहे. त्यांच्यानंतर मी भाषण करणे योग्य नाही,’ असे सांगून त्यांनी बाली यांच्यापूर्वी भाषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईची लॉटरी पद्धत जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेत शाळांकडून होणारी पालकांची हेळसांड थांबविण्यात यावी, आरटीईचे नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पिपल्स व्हाइस फॉर राइट टू एज्युकेशन’तर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत यंदाही अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेविरोधात पालकांनी निदर्शने केली. प्रवेशासाठी ६ मार्च रोजी काढण्यात आलेल्या लॉटरी पद्धतीवर आक्षेपही घेण्यात आला. या प्रक्रियेची पद्धत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रक्रियेमध्ये शाळा निवड पालकांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी उपाय योजना कराव्यात, चुकीचा पत्ता देणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळांवर कारवाई करावी, अर्जामध्ये दुरुस्तीसाठी पालकांना संधी द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले. यावेळी रवी गायकवाड, डॉ. संग्राम मोर्य, प्रा. सुनील वाकेकर, रवी मिसाळ, काकासाहेब शेजूळ, गौतम चाटसे, देविदास रजाळे, बाळासाहेब श्रीखंडे, पूनम पवार, आश्विनी वाहूळकर, अनिता पगारे, अनिरुद्ध जाधव यांची निवेदनावर नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विधी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून प्रो. एस. सूर्यप्रकाश यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विकासासाठी तात्पुरत्या स्वरुपात १ कोटी २ लाख रुपयांचा निधीही विद्यापीठाकडे सोपविण्यात करण्यात आला.
येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) विधी विद्यापीठ (लॉ युनिव्हर्सिटी) सुरू होत आहे. इंदूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठातील प्रो. एस. सूर्यप्रकाश यांची कुलगुरूपदी निवड झाली होती. त्यांनी आज रितसर पदभार स्वीकारला. सुरुवातीची दोन वर्षे या विद्यापीठाचे वर्ग शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरणार आहेत. विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तयार आहे. त्याबाबत त्याचा ४ मार्च रोजी आढावा घेतला होता. प्रो. एस. सूर्यप्रकाश हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ठरले आहेत.

‘क्लॅट’ची प्रक्रिया पूर्ण
पहिल्या वर्षी बीए एलएलबी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश प्रक्रियेतून दिले जावेत, यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. देशपातळीवरील विधी विद्यापीसाठी ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’ (क्लॅट) घेण्याची जबाबदारी यंदा पाटणा येथील चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीकडे आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव पाठविल्याची माहिती विद्यापीठाचे समन्वयक डॉ. एस. जी. गुप्ता यांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० हजार हेक्टरवरील पिकांची धुळधाण

$
0
0

औरंगाबाद : अवकाळी पाऊस व गारपिटीने बुधवारी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ३७० गावांना झोडपून काढले असून, तेथील तब्बल ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या घटनेत सहा जण ठार झाले असल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारीही काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील ३६ तालुक्यांमध्ये बुधवारी अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर २२ जण जखमी झाले आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये ३० जनावरे दगावली आहेत. पाऊस व गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासने विभागीय प्रशासनाला पाठवला आहे.

दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बीड जिल्ह्यातच अवकाळी पावसानेही कहर केला असून, जिल्ह्यातील बीड, पाटोदा, धारूर, परळी व केज तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात वीज पडून पाच जण ठार झाले. याच जिल्ह्यातील ७१४८ हेक्टर कोरडवाहू, ५३४ हेक्टर बागायती आणि २६३ हेक्टर फळपिकांना गारपिटीचा जोरदार फटका बसल्याचा अहवाल शासनदरबादी पाठवण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा या दोन तालुक्यांमध्ये अवकाळीचा जास्त फटका बसला. जिल्ह्यातील हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षे, मिरची या पिकांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील २३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, कळंब व उमरगा, लोहारा तालुक्यांना पावसाने झोडपले. आंबा, द्राक्ष, कांदा व खरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातीलही २२ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. हिंगोली जिल्ह्यात ०.१२ मिली मीटर, तर नांदेड जिल्ह्यात १.८० मिली मीटर पाऊस झाला.

आजही इशारा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांमध्ये गारपीट; तसेच वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

जिल्हानिहाय गारपीट झालेली गावे
जिल्हा....... पाऊस.... गारपीटग्रस्त गावे.......... बाधित क्षेत्र
परभणी..........६.७०............१७१.........................२२५५०
बीड...............५.५०.............९१..........................७९४५
लातूर.............७.१३.............७१..........................२३०००
उस्मानाबाद.....९.०१.............३७..........................६७७२

यवतमाळ, अकोल्यात गारपीट

नागपूर : गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील दारव्हा, नेर तालुक्यातील काही गावात बोरा एवढ्या गारा पडल्याने गहू, आंबा, संत्रा व चणा या पिकांचे मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, व आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून छपरेही उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबँकेला कोटीचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खातेदारांना मोबाइलच्या माध्यमातून इतरांशी पैशांची देवाण-घेवाण करता यावी म्हणून असलेल्या यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) या मोबाइल अॅपचा वापर करून बँक ऑफ महाराष्ट्रला १७ खातेदार व त्यांच्या साथीदारांनी तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. बँकचे शाखा व्यवस्थापक तुषार भुयार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन या खातेदारांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अॅप घोटाळ्याने गंभीर वळण घेतले आहे. या अॅपचा वापर करून खातेदारांच्या खात्यातून आतापर्यंत तब्बल ६ कोटी ७ लाख रुपये लंपास केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशाच प्रकारे गंडा घालण्यात आल्याचा प्रकार करमाड येथे उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेचे व्यवस्थापक भुयार यांच्या तक्रारीनुसार; हा फसवणुकीचा प्रकार ३० ऑक्टोबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ या कालवधीत झाला. महाराष्ट्र बँकेचे महा यूपीआय अॅप आहे. त्याचा वापर करून इंटरनेटद्वारे खातेधारकाला एक लाख रुपये कर्ज मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. या अॅपचा वापर करीत खातेधारकांनी त्यांच्या खात्यात रक्कम नसताना बँकेच्या पूल अकाउंटमधून कोट्यवधी रक्कम काढल्याचे भुयार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून गफार उस्मान पठाण (रा. पुनरपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड ), दिलीप आगाज, अजगर अली पाशू शेख, दिगंबर निवृत्ती भोसले, सिद्धश्वर दहिफळे, बालाजी गलांडे, दादासाहेब महानोर, ज्ञानेश्वर आगळे, गुलाब याकूब शेख यांच्यासह एकूण १७ खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर यांनी दिली.

१७ खातेदारांचे ११९ व्यवहार
यूपीआय अॅपमध्ये रक्कम पाठविणे व रक्कम मागविणे हे दोन पर्याय आहेत. रक्कम मागविणे पर्यायाचा वापर करून अॅप युजर बँकेच्या खातेदार असलेल्या अन्य अॅप युजरच्या खात्यातून रोज एक लाख रुपयांपर्यंत रक्कम मागवू शकतो. करमाड शाखेतील १७ खातेदार अॅप युजरनी अन्य खातेदारांच्या बँक खात्यांतून १ कोटी ५ लाख ७१ हजार ५ रुपये आपल्या खात्यात वळते केले. त्यासाठी त्यांनी ११९ व्यवहार केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससीत औरंगाबादकर चमकले

$
0
0

औरंगाबाद ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांत औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. गट ‘अ’, गट ‘ब’मध्ये औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून स्नेहल करकसे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळविला. गटविकास अधिकारीपदी उद्धव होळकरने राज्यातून पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर २०१६मध्ये लेखी परीक्षा आणि जानेवारीत मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. त्या परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला. गट ‘अ’, गट ‘ब’मध्ये १३० उमेदवारांना अंतिम यश मिळाले. या उमेदवारांची सहायक पोलिस आयुक्त, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, विक्रीकर निरीक्षक अशा विविध पदांसाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमधून सहायक पोलिस आयुक्तपदी डॉ. नीलेश पालवे, गटविकास अधिकारीपदी उद्धव होळकर, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे, उपशिक्षणाधिकारीपदी सागर मुंदडा, विक्रीकर निरीक्षकपदी विनोद खिल्लारे, स्वप्नील होटकर, कर सहायकपदी स्नेहल करकसे, नितीन काकडे, प्रीती कस्तुरे, शरद गायकवाड, शीला हिवाळे, दीपाली सेठाणे, आबासाहेब जाधव, सहायक निबंधकपदी सूरज जगदाळे, कक्षाधिकारीपदी रवींद्र भराटे यांनी यश मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये दिंड्या नाथषष्ठीसाठी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाथषष्ठी यात्रेला शनिवारपासून सुरुवात होत असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून वारकऱ्यांच्या दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. शहरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे २०० दिंड्या दाखल झाल्या. नगर पालिकेकडे जवळपास ५५० दिंड्यांनी नोंदणी झाली असून उर्वरित दिंड्या शनिवारी दाखल होतील.
राज्यातील मुख्य यात्रांपैकी असलेल्या नाथषष्ठी यात्रा उत्सवाला मंगळवारी तुकाराम बिजेच्या दिवशी रांजण पूजनाने औपचारिक सुरुवात करण्यात आली. मुख्य उत्सव शनिवार ते सोमवार, असा तीन दिवस आहे. मुख्य उत्सवात सहभागी होण्यासाठी शुक्रवारपासून राज्यभरातून पायी दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असूनही ४५० दिंड्या आल्या होत्या. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नगर पालिकेकडे ५५० दिंड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शहरात जवळपास २०० दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात दाखल झाल्या.

यात्रेची तयारी पूर्ण
नाथषष्ठी यात्रेसाठी यंदा राज्य शासनाने सव्वाकोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदा जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. नगर पालिकेतर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यात्रा मैदानात प्रथमच ४०० फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा मैदान व शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून वारकरी व भविकांना पाण्याची कमतरता भासू यासाठी ठिकठिकाणी तात्पुरती नळयोजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यानी दिली.

४० सीसीटीव्ही कॅमेरे
भाविक व वारकऱ्याना नाथ समाधी दर्शनासाठी कोणताही त्रास होवू नये यासाठी नाथ संस्थानतर्फे तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाथ समाधी मंदिर व परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नाथ संस्थानचे कर्मचारी त्यावर २४ तास नजर ठेवणार आहेत, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यानी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images