Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

५० हजार रुग्ण उपचारापासून वंचित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्व खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे शहर परिसरातील तब्बल ४० ते ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचारापासून वंचित राहिले. डॉक्टरांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करीत शहरातील समस्त छोटे-मोठे खासगी क्लिनिक तसेच रुग्णालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र सर्व तात्कालीक सेवा देण्यात आल्या व एकही रुग्ण तात्कालिक आरोग्य सेवेपासून वंचित राहिला नाही, असा दावा डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून केला.
राज्यातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सह (आयएमए) ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट’तर्फे (एमएपीपीएम) बुधवारी (२२ मार्च) रात्रीपासून राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर सर्व खासगी क्लिनिक, तसेच छोट्या मध्यम व मोठ्या रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘आयएमए’चे सभासद असणारे वेगवेगळ्या विषयांचे सुमारे दोन हजार डॉक्टर संपावर होते. त्याशिवाय ‘आयएमए’चे सभासद नसणाऱ्या डॉक्टरांनीही संपात सहभाग नोंदविला. त्याचवेळी सर्व खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्येही दैनंदिन चाचण्या झाल्या नसल्याचा दावा करण्यात आला. परिणामी, शहर परिसरातील आणि बाहेरुन आलेल्या सुमारे ४० ते ५० हजार रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागल्याचे समोर येत आहे. मात्र आपत्कालिन रुग्णसेवा सुरू होती आणि आपत्कालिन रुग्णसेवा मिळाली नसल्याची एकही तक्रार समोर आली नसल्याचा दावा विविध संघटनांनी केला आहे.

रुग्णालयांची कॅज्युलिटी ‘फुल्ल’
शहरातील छोटे-मोठे क्लिनिक तसेच रुग्णालयांमधील ओपीडी बंद राहिल्यामुळे रुग्णालयांचा अपघात विभाग (कॅज्युलिटी) रुग्णांनी तुडुंब भरुन गेला होता. पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती जवळजवळ सगळ्याच रुग्णालयांमध्ये होती. अनेक रुग्ण बाहेर गावाहून दैनंदिन उपचारासाठी आले होते. मात्र, ओपीडी बंद राहिल्यामुळे त्यांचे हाल झाले व त्यांना उपचाराशिवाय परतावे लागल्याचे चित्र होते.

१८९ रेसिडेंटना निलंबनाची नोटीस
शहातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डॉक्टरांचा संपच सुरूच असल्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशानुसार व राज्य सरकारच्या आदेशानुसार १८९ निवासी डॉक्टरांवर निलंबनाची , अशी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, घाटीतील निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कळविण्यात आले.

आज सर्व खासगी रुग्णालयांची ओपीडी व नियोजित शस्त्रक्रिया बंदच होत्या; पण सर्व आपत्कालिन सेवा देण्यात आल्या. शुक्रवारपासून ओपीडी बंद राहतील, पण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना सर्व देवा देण्यात येतील. – डॉ. प्रवीण सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन

डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी सर्व क्लिनिक तसेच रुग्णालयांची ओपीडी बंदच होती. मात्र एकही रुग्ण आपत्कालिन सेवेपासून वंचित राहिला नाही. तशी एकही तक्रार नाही. – डॉ. दत्ता कदम, शहराध्यक्ष, आयएमए

जादुच्या काडीप्रमाणे रुग्णाचे आजार चुटकीसरशी बरे करावेत, अशी अपेक्षा डॉक्टरांकडून करणे आणि अपेक्षापूर्ती न झाल्यास त्याच्यावर हल्ला करणे अन्यायकारक आहे. – डॉ. कुलदीपसिंग राऊळ, शहर उपाध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना औरंगाबाद जालना रोडवरील शेकटा शिवारात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. विनोद सागर विश्वकर्मा (वय ४४, रा. जयभवानीनगर) व रामपाल बसंत पासवान (वय ३२ रा. मुकुंदवाडी) अशी मृतांची नाव आहेत.
पासवान व विश्वकर्मा हे दोघेही मुळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून औरंगाबादेत फर्निचरच्या कामानिमित्त आले आहेत. शेकटा येथून ते दुचाकीने (एम. एच. २० डीझेड ८६५२) औरंगाबादकडे येत होते. शेकटा शिवारातील हॉटेल मातोश्री समोरून जात असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एम.एच. १६ एई ५५७४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते दोघेही खाली पडून ट्रकखाली चिरडले गेले. घटनेनंतर चालक पसार झाला, तर माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, कर्मचारी रवींद्र साळवे, जाधव आदींनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांना पोलिस पाटील गीताराम जाधव यांनी सहकार्य केले. जखमींना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पासवान, व विश्वकर्मा या दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे, तर चालकाचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मुलाचा शोध सीआयडीमार्फत घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबईत कामासाठी गेलेले सुधीर शिंदे (वय ३६, रा. भावसिंगपुरा) हे तीन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. हरीश उर्फ हिरालाल छोटेलाल भंडारी याने कामाचे आमिष दाखवत बिल्डर बिरजू सुनके यांच्याकडे नेले होते, असा आरोप सुधीर यांचे वडील शशिकांत शिंदे यांनी केला. सुधीर याचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय घेऊन त्यांनी पत्रकार परिषदेत सीआयडी चौकशीची मागणी केली.
सुधीर शिंदे हे बांधकाम मजूर (मिस्त्रीकाम) असून त्यांचे लग्न झाले आहे. ते शहरात पालक, पत्नी, व दोन मुलांसह राहत होते. हरीश भंडारी हा रंगकामगार शिंदे यांच्या घरी कुटुंबासह भाड्याने राहत होता. भंडारी याने २९ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिक चांगले काम देण्याचे आमिष दाखवून सुधीर यांना मुंबईला नेले. सुधीर यांनी १८ डिसेंबर रोजी मुलासोबत संपर्क करून जीवाला धोका असल्याची माहिती दिल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर सुधीर व कुटुंबाचा संपर्क झालेला नाही.
‘सुधीर बेपत्ता होण्यापूर्वी सुनके यांच्याकडील कर्मचारी आनंद मिस्त्री यांनीही फोन करून सुधीर हा तीन-चार दिवसांपासून कामावर नसून ते तणावखाली असल्याचे सांगितले होते. आर्थिक अडचणीमुळे त्यावेळी लगेच मुंबईला जाता आले नाही. पण, २५ डिसेंबर २०१६ रोजी सुनके यांच्या मुरबाड येथील फॉर्महाउस येथे जाऊन चौकशी केली असता सुनके व भंडारी यांनी तो कामावर नसल्याचे सांगितले. त्यानंतर भंडारी यानेच मुरबाड पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद केली,’ अशी माहिती सुधीर यांच्या वडिलांनी दिली. भंडारी विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी २९ मार्च रोजी आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला राष्ट्रीय समाज पक्षाच्या अनुसूचित जाती व जमाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मारोती तुपे, आनंद चांदणे, सतीश भालेराव, सचिन दाभाडे, मधुकर भिवसेन यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर, आरा मशीन कर वसुलीसाठी सिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
थकित कर वसूल करण्यासाठी नगर पालिकेने एक ट्रक्टर व ट्राली, एक आरा मशीन सिल केली. सिल्लोड शहरात सील केली आहे. हे शहरातील मोठे थकबाकीदार आहेत. पालिकेने आतापर्यंत ३१२ लाख रुपयांपैकी १७४ लाख रुपयांची वसुली केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी दिली.
शासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकेने वसुलीसाठी पाच पथकांची निर्मिती केली आहे. थकबाकीदारांची यादी चौकात लावली जात असून आतापर्यंत १५३ नळ कापण्यात आले आहेत. १५ ते १८ मार्च या काळात शहरातील प्रत्येक झोनमध्ये शिबिर घेऊन, ढोल ताशे वाजवून वसुली करण्यात आली. मुख्याधिकारी अशोक कायंदे व कर्मचाऱ्यांनी शहरातील मोठे थकबाकीदार अब्दुल जब्बार कादर यांच्याकडील ७४ हजार ३८५ रुपयांच्या वसुलीसाठी त्यांचा ट्रॅक्टर व ट्राली जप्त केली. नजीर अहमद शेख यांची बेकरी सिल करण्याची कारवाई सुरू असताना ५० टक्के कर अदा केला, उर्वरित कर दोन दिवसात भरण्याची मुभा देण्यात आली. नसीब पठाण यांची आरा मशीन एक लाख ७८ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी सिल करण्यात आली. उपविभागीय कार्यालय, पुरवठा विभागाचे गोदाम, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहर पोलिस ठाणे या कार्यालयांच्या जप्तीसाठी पथक गेले होते, पण त्यांना कर भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात तीन सावकारांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
अवैध सावकारी करणाऱ्या तालुक्यातील तिघांच्या घरावर सावकारी सहायक निबंधक व सहायक निबंधक पैठण यांच्या पथकाने एकच वेळी छापे टाकले. या छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असून या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील चंपालाल भिकचंद राठी व त्यांचे पुत्र प्रवीण चंपालाल राठी यांच्याविरुद्ध व्याजापोटी जमीन हडपल्याप्रकरणी तालुक्यातील कुतुबखेडा येथील भीमा हिंमतराव काळे व अर्जुन हिंमतराव काळे यांनी तक्रार केली होती. तसेच सालवडगाव येथील दादासाहेब ठोबर व किरण दिनकर कोकणे या सावकाराच्या विरोधात बालाजी विनायक काळे यांनी सहायक निबंधक कार्यालय येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सावकार सहायक निबंधक व सहायक निबंधक कार्यालय पैठण यांनी तीन पथके स्थापन करून गरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान शहरातील प्रवीण चंपालाल राठी यांच्या नाथ गल्ली येथील निवासस्थानी, सालवडगाव येथील दादासाहेब ठोबर व किरण दिनकरराव कोकणे यांच्या घरी व कुतुबखेडा येथील सावकार उर्मिला शिवराम काकडे यांच्या घरी एकाच वेळी छापे टाकले. या पथकात एल. एम. कासार, पी. डी. झरेकर, ए. एम. जुमडे, जे. पी. कुरूप, बी. टी. राजळे व के. एस. काळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कारवाईचा प्रस्ताव
या छाप्यात तिन्ही सावकारांच्या घरी आक्षेपार्ह खरेदीखत, इसारपावती, मुखत्यारपत्र व सातबारा अशी कागदपत्रे सापडल्याची माहिती सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी दिली. या तिन्ही सावकाराच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयात कारवाई प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागमठाण येथे सावकारावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
येथील सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने तालुक्यातील नागमठाण येथील खाजगी सावकाराच्या घरातून ८ खरेदीखत, ११ कोरे बाँड, स्वाक्षरी केलेल्या विड्रावल स्लिप, सातबारे जप्त केले आहे.
नागमठाण येथील अर्जुन चव्हाण हे खाजगी सावकारी करीत असल्याची तक्रार गावातील महेंद्र कुलकर्णी यांनी विभागीय सहनिबंधकासह जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी सकाळी चव्हाण यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात शेतकऱ्यांच्या जमिनीचे ८ खरेदीखत, १००, ५० व २० रुपयांचे कोरे बाँड, हक्कसोडपत्र, कर्ज दिलेल्यांच्या सह्या असलेले नमुना नंबर ४, वेगवेगळे व्यवहाराची नोंद असलेली डायरी, फेरफार नक्कल, सात-बारे, जमिनीचे दाखले, शेतकऱ्यांच्या सह्या असलेले विविध बँकाचे विड्रावल स्लिप, दिवाणी न्यायालयातील तडजोडपत्र आदी कागदपत्रे सापडली. विभागीय सहनिबंधक आर. पी. सुरवसे व जिल्हा उपनिबंधक एम. पी. आघाव यांच्या सूचनेवरून, सहायक निबंधक एफ. बी. बहुरे, एन. एम. गढवे, सहकार अधिकारी व्ही. बी. राजपूत, ए. व्ही. पिंगट, संगीता शिंदे, सुरेश नागमवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त दस्ताऐवज व पंचनामा वरिष्ठ कार्यालयास सादर केल्याचे बहुरे यांनी सांगितले.

७० हजाराचे २० लाख
महेंद्र कुलकर्णी यांनी दोन एकर २० गुंठे शेतजमीन तारण ठेवत अर्जून चव्हाण यांच्याकडून तीन टक्के दराने ७० हजार रुपये २००७ मध्ये घेतले होते. चव्हाण यांच्याकडून घेतले होते. या ७० हजार रुपयांच्या कर्जापोटी व्याजावर व्याज लावत ते २० लाख झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अणेंचा कार्यक्रम उधळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे मराठवाडा राज्य निर्मितीसाठी आयोजित मेळावा आणि पुरस्कार सोहळ्यात विदर्भ राज्य आघाडीचे नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम गुरुवारी शिवसेनेच्या कार्यक़र्त्यांनी उधळून लावला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली व तिची तोडफोड केली.
मराठवाड मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत गायकवाड आणि मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबा उगले यांनी गुरुवारी मराठावडा महसूल प्रबोधिनी येथे या मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार होता. या कार्यक्रमाला गेल्या दोन‌ दिवसांपासून शिवसेनेने विरोध केला होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस, दुपारी तीनच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते महसूल प्रबोधिनीत पोचले. त्यांना गेटवर पोलिसांनी अडविले. ‘आम्ही व्याख्यान ऐकायला आलो आहोत, आम्हाला ऐकू द्या. अडवू नका,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी त्यांना तब्बल तीन तास गेटवर अडवून ठेवले. तेथे या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी पावणेपाचच्या सुमारास अॅड. अणे कार्यक्रमस्थळी आले. त्यांची गाडी कार्यकर्त्यांनी शासकीय डेअरी व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाजवळ अडविली. तेथे तिची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनी अणेंना सुरक्षा व्यवस्था पुरविली. गाडी कार्यक्रमस्थळावरून अणे उतरले होते त्या हॉटेलकडे सुरक्षित पाठवण्यात आली. तीन तास चाललेल्या या नाट्यानंतर आयोजकांनी पदाधिकाऱ्यांची भाषणे ठेवली. मराठवाड मुक्ती मोर्चाची कृती संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन घटनास्थळ सोडले. यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, श्रीकांत उमरीकर, बाबा उगले, अभिजीत गायकवाड व मुक्ती मोर्चाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डमडम तलावाची वेरूळमध्ये पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
मालोजीराजे भोसले गढीवर आयोजित शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर संस्थानचे मुधोजी राजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार वेरूळ येथील डमडम तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या आदेशाने तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड व पथकाने डमडम तलावाची पाहणी करून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला.
वेरूळ येथे मालोजी राजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळात तलाव खोदला आहे. या तलावाची रितसर कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध असल्याचे मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी त्याची दखल घेतली आहे. या तलावाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांना दिले. तहसीलदार जऱ्हाड, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एन. पी. कटके, सहायक अभियंता जी. एम. शेख, सहायक अभियंता एम. जी. मापारी, जिल्हा परिषद शाखा अभियंता आर. एम. अमृतकर, छावा संघटना अध्यक्ष किशोर चव्हाण, विवेकानंद कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. टी. आर. पाटील, महेंद्र दगडफोडे, तलाठी एन. बी. कुसनुरे, छावा संघटनेचे आशोक खानापुरे यांच्यासह ग्रामस्थांनी तलावाची पाहणी केली. हा अहवाल विभागीय आयुक्ताना सादर केला असून त्याच्या विकासासाठी शासकीय व खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही कॉलनीत कुंटणखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जयभवानीनगरातील लोकशाही कॉलनी परिसरातील एका वाड्यात कुंटणखान्यावर मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. कुंटणखाना चालक महिलेसह पाच पीडिता व दोन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
लोकशाही कॉलनीतील एका वाड्यात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त माणिक बाखरे, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते, पोलिस उपनिरीक्षक मीरा चव्हाण व पथकाने सापळा रचला. वाड्यावर दोन बनावट ग्राहक पाठवण्यात आले, त्यांच्याकडून खात्री पटताच निरीक्षक कांबळे यांनी पथकासह छापा टाकला. पोलिसांना कुंटणखान्याची चालक ५० वर्षीय महिला, पाच पीडित महिला, दोन ग्राहक सापडले. पोलिसांनी ११ हजार ७०० रुपये व अन्य साहित्य जप्त केले. ही महिला ही स्वतःच्या वाड्यात पीडित महिलांना बोलवून घेऊन देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी शाळांच्या प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील इंग्रजी शाळांच्या मान्यता प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एस. पाटील यांनी राज्य शासनाला दिले. नियमानुसार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रस्तावांविषयी निर्णय घेण्याचे खंडपीठाने निकालात स्पष्ट केले.
बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना व औरंगाबाद येथील १४ शिक्षण संस्थांनी नवीन इंग्रजी शाळेच्या मान्यतेसाठी, दर्जावाढीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी १५५१ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले. त्यातील १०८५ शाळांना २ जुलै २०१५ रोजी मान्यता देण्यात आली. इतर संस्थांना नोव्हेंबर २०१५पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्याचा आदेश देण्यात आला, पण त्रुटींची पूर्तता करूनही शिक्षणमंत्र्यांनी ८७९ शाळांचे प्रस्ताव फेटाळले, तर २०१६-१७ या कालावधीतील प्रस्ताव मंजूर केले. संस्थांतर्फे ज्ञानेश्वर पोकळे यांनी युक्तिवाद केला. त्यांना कुलदीप पाटील व डी. डी. सरवदे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅब व्यवसायात साडेसात लाखांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॅब व्यवसायासाठी कार खरेदी करण्यास भाग पाडून दोघांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी औरंगाबादच्या एक व पुणे येथील तीन, असे चौघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे व जून २०१६ मध्ये घडला.
तात्यासाहेब शिवराम भोसले (वय ४५ रा. कासलीवाल रानवारा, गारखेडा) हे शेतकरी आहेत. १६ मे २०१६ रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली समर्थ कॅबची जाहिरात त्यांच्या वाचनात आली. टुरिस्ट कार खरेदी करून चार वर्षांच्या करारावर महिना ७० ते ९० हजार रुपये कमवा, असे जाहिरातीत म्हटले होते. ही जाहिरात वाचल्यानंतर भोसले व त्यांचे मित्र किशोर नारायण खेडकर यांनी त्यातील फोन क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी त्यांना सावरकर चौकातील समर्थ कॅबच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे त्यांची प्राणेश कुलकर्णी यांच्याशी भेट झाली. कुलकर्णी यांनी ते समर्थ इंटरप्रायजेसचे भागीदार असून प्रीतम तपायले (रा. खराडी पुणे) या संचालिका असल्याचे सांगितले. भोसले व खेडकर यांना समर्थ कॅबमार्फत भुजबळ निस्सान पुणे येथून निस्सान सनी कंपनीची कार खरेदी करावी लागेल, असे सांगण्यात आले. कार खरेदीत एक लाखांची सुट मिळेल व आमच्या मार्फत आयटी कंपनीत भाडेकरारावर कार लावू, असे आमिष दाखवले. त्यासाठी दोघांकडून बुकिंगकरिता चेकद्वारे २० हजार रुपये घेतले. भोसले व खेडकर यांनी पत्नींच्या नावे बुकिंग केली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेकडून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज मंजुरीसाठी भुजबळ निस्सान या कंपनीने महाराष्ट्र बँकेकडे दोन लाख ३४ हजार रुपये भरल्याची बनावट पावती सादर केली. ही पावती सादर केल्यानंतर बँकेने भुजबळ निस्सानच्या खात्यात ७ लाख २४ हजार रुपये कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली. तसेच समर्थ कॅब औरंगाबाद यांनी देखील दोघांकडून एक लाख ३४ हजार रुपये रक्कम चेकद्वारे घेतली. यानंतर भुजबळ निस्सानने समर्थ कॅबकडे दोन्ही कार पोहोचवल्या व समर्थ कॅबने चार वर्षांचा करार दोघांकडून करून घेतला व ड्रायव्हर उपलब्ध झाल्यानंतर कार भाड्याने लावून असे सांगून बोळ‍वण केली.
दरम्यान, कार टुरिस्ट असल्याने तिच्या किमतीच्या चार टक्के एक्साईज ड्युटी रिफंड मिळते ही माहिती असल्याने भोसले यांना, ही कार २०१५ ची असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे भोसले यांच्या लक्षात आले. त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून संशयित आरोपी प्राणेश राघवेंद्र कुलकर्णी (रा. श्रेयनगर), प्रीतम तिपायले, समीर भुजबळ (संचालक भुजबळ निस्सान देहू रोड, पुणे) व राजकुमार भंडारी (सेल्स ऑफिसर, भुजबळ निस्सान पुणे) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक कल्याण शेळके हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखा विभागाची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेस्ट कंट्रोल आणि कंत्राटी वाहनचालकांच्या बिलांचे प्रकरण उघडकीस आल्यावर गुरुवारी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लेखा विभागाची झाडाझडती घेतली. आयुक्त लेखा विभागात सुमारे एक तास ठाण मांडून होते. त्यांनी काही व्हाउचर्स तपासले व बिलांच्या फाइल अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्या.
रामदास पेस्ट कंट्रोल या कंपनीच्या बनावट बिलाचे प्रकरण महापालिकेत काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. हे बिल १५ लाख ९८ हजार रुपयांचे होते. या प्रकरणात पालिकेने सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली असून, त्या आधारे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीचे व त्यांच्या बिलाचे प्रकरण उघडकीस आले. आयुक्तांची व स्थायी समितीची मान्यता न घेता ६२ वाहनचालकांची कंत्राटीपद्धतीने नेमणूक करण्यात आली. त्याचे सुमारे ४२ लाख ५० हजार रुपयांचे बिल काढण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणात आयुक्तांनी तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या दोन्ही प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त बकोरिया यांनी गुरुवारी लेखा विभागाची झाडाझडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; बकोरिया सुमारे एक तास लेखा विभागात होते. त्यांनी पेस्ट कंट्रोल प्रकरण व वाहनचालकांच्या बिलांच्या फाइल मागवून घेतल्या. त्याशिवाय पेमेंट केल्याचे व्हाउचर्स लेखा विभागातील कर्मचाऱ्यांकडून मागवले. त्यांची तपासणी केली. काही कागदपत्रे अधिक तपासणीसाठी ताब्यात घेतली.

इतरांना बाहेर काढले
कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी लेखा विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कुणाही थांबू नये, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार बिलांच्या चौकशीसाठी व मागणीसाठी आलेले कंत्राटदार, नागरिकांना लेखा विभागाच्या बाहेर काढण्यात आले. पेस्ट कंट्रोलप्रकरण, कंत्राटी वाहनभरतीचे प्रकरण, निवडणुकीच्या काळात विना निविदा साहित्य खरेदी ही सर्व प्रकरणे ऐरणीवर असताना बकोरिया यांनी लेखा विभागाची झाडाझडती घेतल्यामुळे लेखा विभाग अक्षरशः ढवळून निघाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांच्या अनुदानावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आधार देण्यासाठी शासन त्यांना अनुदान देत असतांना दुसरीकडे बँक प्रशासनाने नेमलेल्या समितीच्या लबाडीमुळे गरीब निराधारांचे अनुदानावर डल्ला मारण्याचा डाव गुरुवारी उघडकीस आला.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शहरामध्ये १३ हजार ५०० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते. यासाठी शहरामध्ये नेमण्यात आलेल्या बँक ऑफ इंडियाने शहरातील काही ठिकाणी खासगी तत्वावर एजंट नेमून केंद्र सुरू केले आहेत. मात्र या फ्रेंचायसीकडून लाभार्थ्यांना कमी रक्कम दिली जाते, प्रत्येक महिन्याला पैसे‌ मिळत नसल्याच्या तक्रारी योजनेच्या समितीकडे आल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी तहसीलदार डी. सी. मेंडके यांच्यासह समितीचे अध्यक्ष विकास कुलकर्णी, राजेंद्र दानवे, नरेश मगर, शाहू चित्ते, प्रीती तोतला, राखी सुरडकर या सदस्यांनी समतानगर व मिलकॉर्नर या केंद्रावर अचानक भेट देऊन पाहणी केली. येथे लाभार्थ्यांना नियमानुसार ६०० रुपयांऐवजी ५०० रुपये देत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी लाभार्थ्यांची विचारपूस केली असता त्यांना केवळ ५०० रुपये वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी या केंद्रामध्ये ३६ लाभार्थ्यांचे आधार कार्ड असल्याचे तसेच रजिस्टरमध्ये लाभार्थ्यांच्या नावे चार हजार, पाच हजार रुपयांच्या नोंदी असल्याचे आढळून आले. तसेच अनेक लाभार्थ्यांकडून कोऱ्या कागदावर अंगठ्याचे ठसे घेतले पण, त्यांना पैसेच दिले नसल्याचेही निदर्शनास आले. समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा संपूर्ण पंचनामा तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी केला. याप्रकरणी मेंडके यांना विचारले असता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड शहराचे वीज, पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
नगर पालिकेकडील एक कोटी १४ लाख ४५ हजार २१० रुपयांच्या थकबाकीसाठी महावितरणने खेळणा प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगर पालिकेने पलटवार करत सुमारे मालमत्ता कर व दंडाच्या वसुलीसाठी महावितरणच्या खोडकाई वाडी येथील ३३ केव्ही उपकेंद्राला सिल लावले.
नगर पालिकेची खेळणा प्रकल्प येथे पाणीपुरवठा योजना आहे. या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल २००९ पासून थकलेले आहे. पाणीपुरवठा योजनेची ८४ लाख ७४ हजार ९४० रुपये व जल शुद्धीकरण केंद्राची २९ लाख ७० हजार २७० रुपये, असे एकूण एक कोटी १४ लाख ४५ हजार २१० रुपयांचा थकबाकी महावितरणने काढली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने खेळणा येथील पाणीपुर‍वठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे शहरासह परिसरातील २३ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
महावितरणच्या या कारवाईला नगर पालिकेने खोडकाई वाडी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राला सिल लावून उत्तर दिले आहे. महावितरणने दोन वर्षांपूर्वी उपकेंद्राची निर्मिती केली. पण, त्यावेळी नगर पालिकेकडून रितसर परवानगी घेतली नाही. परवानगी, दोन वर्षांचा दंड व मालमत्ता कर याच्या वसुलीसाठी ही कारवाई केली.

२३ गावांना पाणीपुरवठा ठप्प
खेळणा प्रकल्पावरून पालोद, भराडी, वांगी येथील पाणीपुरवठा योजनेची वीज थकबाकी ३५ लाख रुपये आहे. शिवाय या गावांसह २३ गावांच्या पाणीपुरवठा योजनांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केल्याने सिल्लोड शहरासह २३ गावांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अर्धे शहर अंधारात
नगर पालिकेने खोडकाई वाडी येथील उपकेंद्राला सिल लावल्यामुळे अर्धे शहर अंधारात आहे. महावितरण व नगर पालिकेच्या वादात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या उपकेंद्रांवरून इतर गावांनाही वीजपुरवठा होते. नगर पालिकेच्या कारवाईमुळे त्या गावांच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगर पालिका दरमहा वीज बिल भरते. त्यामुळे महावितरणची थकबाकी नाही. न भरलेल्या बिलाचा तपशील महावितरणने द्यावा, खरेच थकबाकी असेल तर भरू.
- अब्दुल समीर, नगराध्यक्ष

खोडकाई वाडी येथे उपकेंद्र उभारणी करताना महावितरणने नगर पालिकेची परवानगी घेतलेली नाही. परवानगी, दोन वर्षांचा दंड व मालमत्ता कर याची १५ ते २० लाख रुपये थकबाकी होऊ शकते. या वसुलीसाठी उपकेंद्र सिल केले आहे.
-अशोक कायंदे, मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलची कन्नडमध्ये मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
संपामुळे बंद असलेल्या येथील लक्ष्मी मॅटर्निटी हॉस्पिटलचे शटर उचकटून आतील साहित्याची गुरुवारी अज्ञात जमावाने मोडतोड केली. हॉस्पिटल शेजारील बालाजी मेडिकल स्टोअर्सच्या काचा व फर्निचरची तोडफोड करण्यात आली.
मुख्य रस्त्यावरील डॉ. नीलेश जैस्वाल यांच्या लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी करीमनगर भागातील अमीना तन्जीम बेग या सात महिन्याच्या बालिकेला उपचारासाठी आणले होते. तिच्यावर बाह्यरुग्ण विभागात उलटी व ताप येत असल्याने तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. या मुलीची तब्येत खालावली. परंतु, शहरातील खासगी हॉस्पिटल गुरुवारी संपात सामील झाल्याने बंद होते. त्यामुळे या मुलीला औरंगाबाद येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर शहरातील खसागी हॉस्पिटल बंद का ठेवले, या कारणावरून अज्ञात १२ ते १५ जणांनी शटर उचकटून लक्ष्मी हॉस्पिटलची मोडतोड केली. संतप्त जमावाने मेडिकल स्टोअर्सलाही लक्ष्य केले.
या घटनेनंतर डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. डी. शिंदे, एस. जे. जाधव, दीपक जवळकर, डॉ. नीलेश जैस्वाल, डॉ. प्रवीण पवार, डॉ. मिलिंद पाटिल यांनी पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांची भेट घेवून निवेदन दिले. पोलिस निरीक्षक पुरभे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आज हॉस्पिटल बंद
या हल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड तालुका डॉक्टर्स असोशिएशनने शुक्रवारी शहर व ग्रामीण भागातील सर्व हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र मेडिकेयर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेयर सर्व्हिस इंस्टिट्यूशन अॅक्टनुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओळखपत्र, हॉलतिकीट तपासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या पदवी परीक्षेत तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याची प्रकरणे उघडकीय आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रत्येक परीक्षार्थीचे हॉलतिकीट, ओळखपत्र तपासण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. प्राचार्य, केंद्रप्रमुख, पर्यवक्षकांना याबाबत सूचना देणारे परिपत्रक विद्यापीठाने गुरुवारी जारी केले.
विद्यापीठातर्फे १६ मार्चपासून पदवी परीक्षा घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर ३० मार्चपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. पदवी परीक्षेत परीक्षार्थीऐवजी डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे प्रकार समोर आले. खुलताबाद, औरंगाबाद आणि आष्टी येथील परीक्षा केंद्रांवरील प्रकरणानंतर पदवी परीक्षेतील गैरप्रकारांची चर्चा चव्हाट्यावर आली. यानंतर आता परीक्षेत खबरदारी घेण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. परीक्षेदरम्यान प्राचार्य, केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने सूचनांचे परिपत्रक जारी केले.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाने काढलेल्या या परिपत्रकात परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत. पर्यवेक्षकाने परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे हॉलतिकीट, त्यावरील फोटो, संबंधित विद्यार्थ्याचे नाव, ओळखपत्र तपासावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही केल्यास परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.

परिपत्रकात काय म्हटले आहे
मार्च-एप्रिल २०१७च्या पदवी परीक्षांना सुरुवात झालेली आहे. आपल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी निकोप शैक्षणिक वातावरण ठेवणे गरजेचे आहे. परीक्षा नियमानुसार व सुरळीत पार पडाव्यात. अत्यंत महत्त्वाचे असे की, काही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परीक्षा दालनामध्ये विद्यार्थ्याने प्रवेश केल्यानंतर पर्यवेक्षकाने त्याचे ओळखपत्र तपासावे; तसेच हॉलतिकीट, त्यावरील फोटो व नाव तपासून हॉलतिकिटावर संबंधित पर्यवेक्षकाने स्वतःची; तसेच विद्यार्थ्यांची स्वाक्षरी वेळोवळी घ्यावी. त्यामुळे परीक्षा दालनामध्ये काही गैरप्रकार घडणार नाहीत. आवश्यकता असल्यास शासकीय, निमशासकीय; तसेच पोलिस संरक्षणासाठी संबंधित विभागाकडे सहकार्य मागावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भगतसिंगांचे विचार समजून घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वयाच्या २३व्या वर्षी भगतसिंग यांचे विचार अत्यंत परिपक्व होते. अस्पृश्यता, जातीय दंगली, युवक, राजकारण अशा विषयावर त्यांनी मांडलेली मते परखड होती. आजच्या स्थितीत जाती, धर्माच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा तरुणांना समजून घ्यावा लागेल आणि तसा लढा द्यावा लागेल, असा सूर भगतसिंग अध्यासनकेंद्रातर्फे गुरुवारी आयोजित परिसंवादात सहभागी वक्त्यांनी काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भगतसिंग अध्यासनकेंद्रातर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अस्पृश्यतेचा प्रश्न, जातीय दंगली, विद्यार्थी व राजकारण या विषयी भगतसिंगांची भूमिका’ विषयावर महात्मा फुले सभागृहात झालेल्या परिसंवादात डॉ. अशोक ढवळे (मुंबई), प्रा. तानाजी ठोंबरे (बार्शी), प्रा. जयदेव डोळे यांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, केंद्राचे संचालक डॉ. सुधाकर शेंडगे उपस्थित होते.
‘अस्पृश्यतेचा प्रश्न’ विषयावर बोलताना डॉ. ढवळे म्हणाले, ‘वर्ण व्यवस्थेमुळे जाती व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. जाती व्यवस्थेत भोतमांगे, रोहित वेमुला सारख्यांचे बळी घेतले जात आहेत. चित्र बदलायचे असेल तर भगतसिंगाचे विचार समजून घ्यावा लागेल.’
प्रा. ठोंबर यांनी ‘जातीय दंगली आणि त्यावरील उपाय’ विषयावर मत मांडले. ते म्हणाले,‘जातीय दंगली पेटविण्याचे काम राजकीय पुढारी आणि माध्यमे करत आली आहेत. जाती अंताच्या लढाईत भगतसिंगासारखी चिकित्सक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांकडे पाहिजे.’
प्रा. डोळे म्हणाले,‘शिक्षण आणि राजकारण यांचे नाते अतूट आहे. शिक्षण आणि राजकारण ही नवी पिढी घडविण्याची प्रक्रिया आहे. सकारात्मक परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात आले पाहिजे.’
डॉ. शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप चाळक यांनी आभार मानले. यावेळी प्रा. राम बाहेती, प्रा. पंडित तुपे, प्रा. भाऊसाहेब झिरपे, अॅड. अभय टाकसाळ, डॉ. अनंत वडघणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईचा खून, मुलास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरातील गहू दुकानात विकल्याने आई मुलाला रागावली आणि त्याचा राग डोक्यात घालून कोयत्याने सपासप वार करीत आईचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी गुरुवारी ठोठावली. आरोपीच्या पत्नीनेच आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली आणि शेवटपर्यंत आपल्या तक्रारीवर ठाम राहिली, हे विशेष.
याप्रकरणी आरोपीची पत्नी नानूबाई दादाराव साबळे (वय ४३, रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ जून २०१० रोजी दुपारी बाराच्या सुमारास, घरातला गहू दुकानात विकल्याने मृत बाळूबाई फकिरबा साबळे (वय ७०) या आपला मुलगा व आरोपी दादाराव फकिरबा साबळे (वय ४८, रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) याला रागावल्या. आई रागावल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी दादाराव याने शेजारी पडलेल्या कोयत्याने आपल्या आईच्या मानेवर, डोक्यावर तसेच कानावर गंभीर वार केले. यात त्या कोसळल्या व हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीची पत्नी नानूबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध वडोदबाजार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला व त्याला २४ जून २०१० रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून आरोपी अटकेतच होता. या प्रकरणी तपास अंमलदार पल्लवी बरगे यांनी सखोल तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

पत्नीचा साक्ष महत्त्वाची
या खटल्यात आरोपीची पत्नी व फिर्यादी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कालावधीचा साधा कारावास ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावर दरोडा; दोन लाखांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडेखोरांच्या सहा जणांच्या टोळीने भर दिवसा पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून व मारहाण करून दोन लाख रुपये पाठविल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली.
सावखेडगंगा येथील ओम साई हिंदुस्तान पेट्रोपंपावर ही घटना घडली. येथे दोन मोटारसायकलवर सहाजण आले. त्यांच्यापैकी एकाने तीनशे रुपयांचे पेट्रोल भरले. त्याने कामगार शिवाजी कडू याला धाक दाखवून सर्व रक्कम हिसकावून घेतली. त्याच्यासोबतच्या पाच जणांनी केबिनमध्ये घुसून रोकड मारहाण करून हिसकवली. एक मोटारसायकल वैजापूर, तर दुसरी श्रीरामपूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वैजापूरचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनला गळती; अर्ध्या साताऱ्यात निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सातारा गावाला पाणीपुरवठा करणारी ४० वर्ष जुनी व तीन इंचाची पीव्हीसीची मुख्य जलवाहिनी तीन दिवसांपूर्वी फुटल्यामुळे एक हजार घरांना पाणी मिळत नाही. यावर्षी भरपूर पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अर्ध्या गावात निर्जळी आहे. महापालिकेतर्फे सध्या नादुरूस्त पाइपची जोडणे, नवीन पाइप टाकणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे फुटलेली पाइपलाइन दुरुस्त न करता नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी आहे.
सातारा गाव व परिसरातील काही भाग सोडला, तर येथील रहिवाशांना बोअर, खासगी टँकर किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यावर्षी विहिरी शेजारी केलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामामुळे तसेच पाऊस चांगला झाल्यामुळे भरपूर पाणी आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. एकीकडे उन्हाळा असल्यामुळे शासन टँकरने पाण्याची व्यवस्था करीत असताना साताऱ्यात मात्र पाइपलाइन फुटल्यामुळे अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही. तीन इंचाची ही पाइपलाइन ४० वर्षापूर्वीची असून, रस्त्याखाली तीन फुटावर आहे. त्यावर आता काँक्रिटचे काम झालेले असल्याने पाइपलाइन फुटल्याचे स्पष्ट दिसत नाही. पाणीपुरवठा सुरू केला की रस्त्यावर पाणी जमा होत आहे. पीव्हीसीची ही पाइपलाइन जीर्ण झाल्याने कुठे ना कुठे गळती लागते. त्यामुळे ती बदलून नवीन लोखंडी पाइपलाइन करण्याची मागणी सोमीनाथ शिराणे, गंगाधर पारखे, विष्णू रहाटवाडे, विनोद सोळनर यांनी केली आहे.
दरम्यान, फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती सुरू केली आहे, पाणीपुरवठा एक-दोन दिवसात सुरळीत होईल, अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा उपअभियंता खाजा इलियास यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images