Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘राज्यघटनेमुळेच भारत एकसंघ’

$
0
0

औरंगाबाद : राज्यघटनेने गेली साडेसहा दशके भारताला एकसंघ बांधून ठेवण्याचे काम केले आहे. राज्यघटनेचे अस्तित्व असेल तोपर्यंतच भारत एकसंघ राहिल, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांनी गुरुवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागातर्फे आज ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान’ विषयावर एक दिवसाच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. विभागाच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर डॉ. सतीश दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. वाघमारे म्हणाले,‘जगातील सर्व राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून चांगल्या घटकांचा समावेश राज्यघटनेत केलेला आहे. त्यामुळेच भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात उत्कृष्ट आणि व्यापक स्वरुपातील लिखित राज्यघटना आहे. समा‌जातील प्रत्येक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी भारतातील विविधतेचा सखोल अभ्यास केला. घटना हा असा कायदा आहे, जो कधीही रद्दबदल होत नाही.’ राज्यघटनेबाबत फक्त सुशिक्षित लोकांनाच माहिती असून, चालणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला माहिती असणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या हक्क आणि कर्तव्याबाबत जागरूक रहायला हवे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले,‘समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य हे राज्यघटनेचे मूलभूत आधार आहेत.’ डॉ. दांडगे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना हा विषय विद्यापीठाने सक्तीचा करून सजग नागरिक होण्यासाठी पाऊल उचलले आहे.’ डॉ. ह. नि. सोनकांबळे सूत्रसंचालन केले. डॉ. शाम सिरसाठ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिकलठाण्यात पीटलाइन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी काळात चिकलठाणा रेल्वे स्थानकावर पीटलाइन होणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांची दुरुस्ती सहज शक्य होईल. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या शहरातून धावू लागतील.
शहरातून सध्या औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजर, औरंगाबाद रेणेगुंठा या दोन रेल्वे सुरू आहेत. या शिवाय दिल्ली, बेंगळुरू, अजमेर, जयपूर, मुंबई, जम्मू तावी या ‌ठिकाणी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनीही वारंवार केली. पीटलाइनसाठी पाठपुरावा केला. सल्लागार समितीचे सदस्य मंगेश कपोते आणि भावेश सराफ यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही ही मागणी केली. त्यानंतर विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी पीटलाइनबाबत सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले होते.
औरंगाबाद रेल्वे स्टेशन विभागांतर्गत नगरसोल आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशन या दोन्ही जागेचे पीटलाइनसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, येथे तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे चिकलठाणा सर्वेक्षण करण्यात आले आहे. येथे पुरेशी जागा आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. यामुळे चिकलठाणा पीटलाइन तयार करण्याचा घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवून पुन्हा एकदा सर्वेक्षण करून पुढील निर्णय घेण्यात येईल.

चिकलठाणा येथे पाण्याची सोय आहे. यामुळे पीटलाइनसाठी ही जागा निवडली. पुन्हा एकदा सर्वेक्षण करू. तांत्रिक उपयोगिता तपासू. त्यानंतर पीटलाइनचा निर्णय घेऊ.
- डॉ. ए. के. सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

औरंगाबाद येथे पीटलाइन व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करत आहे. जर चिकलठाण्यास पीटलाइन झाल्यास औरंगाबादला लांबपल्ल्याच्या गाड्या मिळण्यात अडचण येणार नाही. - ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा ‌रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे कंपनीवर प्राप्तिकरचा छापा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण रोडवरील एका नामांकित आणि प्रथितयश बियाणे कंपनीवर शुक्रवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. दिवसभर कागदपत्रांची छाननी करत तब्बल साडेसात कोटींची अघोषित संपत्ती, साडेचार कोटींच्या कराची थकबाकीसह एकूण १२ कोटींची वसुली केली.
नोटबंदीनंतर अघोषित संपत्तीविरोधात शहरातील विविध आस्थापनांसह ‌उद्योग, कोचिंग क्लास आणि इतर व्यावसायिकांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. या तपासणीत पैठण रोडवरील व शहरापासून जवळ असलेल्या एका नामांकित आणि प्रथितयश बियाणे कंपनीवर छापा पाडून नि‌यमित तपासणी करण्यात आली, अशी माहिती प्रा‌प्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली. यावेळी त्यांनी १२ कोटींची वसुली केल्याचेही सांगितले. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरासह परभणी, हिंगोली, लातूर, जालना येथील विविध उद्योग आणि आस्थापनांसह व्यावसायिकांकडूनही तब्बल १५ कोटींचा प्रा‌प्तिकर वसूल करण्यात आला. दरम्यान परभणी, हिंगोली, लातूर, जालना या शहरातील विविध कंपन्या, जर्दा व्यावसायिक, मद्य विक्रेत्यांसह विविध मोठ्या आस्थापनांवरही दोन आठवड्यापूर्वी कारवाई झाली आहे.

कडक कारवाई सुरू
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘३१ मार्चपर्यंत कारवाई अधिक कडक करण्यात येणार असून ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’,‘ पंतप्रधान स्वच्छ धन योजना’ यानुसार अघोषित संपत्ती जाहीर करण्याची मुभा विविध उद्योजकांना दिली आहे. यानुसार या योजनांतर्गत अघोषित संपत्तीही जाहीर करून नियमित कर भरणा करावा व मागे लागलेल्या ससेमिऱ्यापासून मुक्ती मिळवावी, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
उपजिल्हा रुग्णांलयाच्या हलगर्जीपणामुळे पानवडोद येथील एका रुग्णांच्या मृत्यू झाल्याची तक्रार नातलगांनी केली आहे. पण, या रुग्णावर उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचा सल्ला रुग्णाला दिला होता, असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिले आहे.
पानवडोदवाडी येथील घराच्या छतावरुन पडल्याने बालाजी संजय सूर्यवंशी (वय १५) याला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर रात्री डॉ. सपकाळ व डॉ. निलावाड यांनी उपचार केले. त्यानंतर सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्याचा सल्ला दिल्याची नोंद शुक्रवारी रात्री दोन वाजता करण्यात आली आहे. पण, रात्री दोनची नोंद असताना शुक्रवारी सकाळी सात वाजता रुग्णांस उपचारासाठी घेऊन जा, असे सांगितल्याचा आरोप रुग्णाचे वडील संजय सूर्यवंशी यांनी केला आहे. मृत मुलाचे मेहुणे गजानन सुखदेव मिसाळ यांनी रुग्ण दगावल्यानंतर रेफर करण्याचे सांगितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या रुग्णांला शहरातील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो मृत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नातलग व मित्रांनी धाव घेऊन हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला व संबधितावर गुन्हा दाखल होईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये फोन करून माहिती घेतली. शिवसेना गटनेते सुनील मिरकर, अल्पसंख्याक आघाडीचे शेख जाकेर यांनी मृताच्या नातलगांना धीर दिला. हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार संजय सूर्यवंशी यांनी शहर ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपद याचिका; १२ एप्रिलला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नगर पालिका अध्यक्षपदाच्या आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची पुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे. या याचिकेबाबत कोर्टाने शुक्रवारी पुढील तारीख दिली. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आणखी लांबणीवर पडली आहे.
मुंबई येथे ५ आक्टोबर रोजी झालेल्या राज्यातील नगर पालिका अध्यक्षपदांच्या सोडतीत वैजापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्यात बदल करत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी करून निवडणूक आयोगाच्या राजपत्रात तसा उल्लेख केला. या निर्णयाविरोधात नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी औरंगाबात खंडपीठात दाद मागितली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला शिवसैनिक रवींद्र पगारे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली आहे. आता या याचिकेची पुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुलत्याचा हात मोडला; पुतण्यांना शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
चुलत्याचा हात मोडल्याच्या आरोपावरून सिल्लोड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लांडगे यांनी पुतणे श्यामराव काकडे व संजय काकडे (रा. धानोरा) यांना दीड वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली.
या बाबत माहिती अशी की, २ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी साडे बारा वाजता फिर्यादी पांडुरंग काकडे हा त्यांच्या गट नंबर ७१ मधील शेतात काम करत होते. त्यावेळी श्यामराव काकडे व संजय काकडे हे आरोपी त्यांच्या शेतात आले. कडुबाईच्या केस मध्ये आमच्याविरूद्ध साक्ष का दिली, अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी फिर्यादीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या हातावर व पायावर काठ्यांनी मारहाण करून त्याचा उजवा हात फॅक्चर केला. फिर्यादीची मुलगी सुभद्रा व इतर लोकांनी भांडण सोडवून त्यांना सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक फौजदार एम. ए. शेख यांनी तपास करून सिल्लोड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता नितीन कोंघे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांची धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूर-मुंबई महामार्ग असताना आता मुंबईसाठी नवीन महामार्ग कशासाठी ? समृद्धी महामार्ग झाला तर शेतकरी उद्ध्वस्त होतील यामुळे समृद्धी महामार्ग नको, मोजणीसाठी फिरणाऱ्या पथकाला रोखावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन व विविध तालुक्यातील कृतीसमितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात सुमारे दोनशे शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली ३५ जणांचे शिष्टमंडळ भेटले व सक्तीने जमीन घेऊ नये, पथकांना रोखावे, हरकत घेणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, त्यांची सुनावणी घ्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी जमीन सक्तीने घेणार नाही, सक्तीने मोजणी करणार नाही तसेच शासनाला मागण्यांचे निवेदन पाठवले जाईल व जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचेही कळवले जाईल, असे आश्वासन डॉ. भापकर यांनी शिष्टमंडळास दिले.
शिष्टमंडळामध्ये वैजापूरचे भाऊसाहेब शिंदे, माळीवाड्याचे सुभाष बर्डे, पेकळवाडीचे दत्तू भवर, कॉ. गणेश कसबे, पळशीचे नानासाहेब पळसकर, जयपूरचे गजानन मते, सावंगीचे भाऊसाहेब जगदाळे, किसनराव सोळंके महाराज , कॉ. अशोक जाधव, कॉ. देविदास जिगे, सूर्यभान पल्हाळ आदींचा समावेश होता. या धरणे आंदोलनात कैलास कांबळे, अॅड. अभय टाकसाळ, रतन गायकवाड, अॅड. आसाराम लहाने, संतोष जाधव, मेजर सुखदेव बन, अॅड. मनोहर टाकसाळ, किसन मुळे, फुलसिंग राजपूत, महेश राजपूत, योगेश दांडगे, भाऊसाहेब पठाडे, कचरू बारवाल, पंडित काकडे, नारायण चौधरी आदी सुमारे २०० ते २५० शेतकरी, गावकरी, कार्यकर्ते हजर होते.

२९ मार्च रोजी लाँगमार्च
येत्या २९ मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व १० बाधित जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांची व्यापक बैठक ठाणे येथे होणार असून नागपूर पासून मुंबई पर्यंत लाँगमार्च काढण्याचा निर्णय त्यात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अणेंची कार फोडली; शिवसैनिकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अॅड. श्रीहरी अणे यांच्या कारवर दगडफेक केल्याप्रकरणी दोन शिवसैनिकांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली, त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली.
मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी खोकडपुरा येथील महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात गुरुवारी मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्‍घाटक म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता. अॅड. अणे यांची कार आल्यानंतर ती अडवून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अणे यांच्या कारची काच फुटून नुकसान झाले. शिवाय कार्यक्रमास उपस्थित न राहता अॅड. अणे यांना परत जावे लागले. याप्रकरणी शासनातर्फे पोलिस उपनिरीक्षक अनिल काचमांडे यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून शिवसैनिक राजू राजपूत व गणेश लोखंडे यांच्याविरुद्ध रस्ता अडवणे, दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजू राजपूत याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली, शुक्रवारी कोर्टात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेबुवारीच्या पगाराचा मार्चअखेरीसही वांदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वेतनाचे वेळापत्रक गेल्या तीन महिन्यांपासून बिघडले आहे. प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिक्षक प्रचंड अडचणीत आले आहेत. मार्च संपत आला तरी फेब्रुवारीचे वेतन झाले नसल्याने प्र्राप्तिकर भरण्यासाठी भुर्दंड भरावा लागत आहे. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीचे धनादेश बाऊन्स होण्याची नामुष्की काही शिक्षकांवर ओढावली आहे. यामुळे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
मार्च महिन्याचा शेवटच्या आठवडा असूनही अजून फेब्रुवारी महिन्याचे वेतन शिक्षकांना मिळालेले नाही. आजवर गृहकर्ज, संस्थेचे कर्ज व इतर हप्त्यांवर शिक्षक व्याजाचा भुर्दंड सोसतच आहे. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून शिक्षकांनी प्राप्तिकर कपात केलेली असताना सुद्धा तो पगारच अजून झाला नसल्याने मार्च अखेरपर्यंत प्राप्तिकर न भरल्यास दंड बसू नये यासाठी शिक्षकांनी पगाराच्या वायद्यावर 'रिटर्न्स'ची बोली लावून उसनवारी केली आहे. शिक्षकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा किती त्रास अजून सहन करावा ? याबद्दल शिक्षक सेना राज्य स्तरावर जाब विचारणार आहे. तसेच वेतन उशिरा करणाऱ्या यंत्रणेवर कडक कारवाई करण्याची मागणी शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, सरचिटणीस सदानंद माडेवार, संतोष आढाव, लक्ष्मण ठुबे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे आसाममध्ये हॉस्पिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’चे पूर्वोत्तर आसाममध्ये १०० खाटांचे हॉस्पिटल सुरू होणार आहे. यासंबंधी प्रतिष्ठान व ‘ओएनजीसी’ या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपनीसोबत नुकताच करार झाला आहे. येत्या दोन वर्षांत हॉस्पिटल उभे राहणार असून, हा देशातील सर्वांत मोठा सीएसआर प्रकल्प असणार आहे. टप्प्याटप्प्याने ३०० खाटांचे हॉस्पिटल साकारले जाईल. हा प्रकल्प ३१३ कोटींचा असेल, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
‘ओएनजीसी’ने डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सविस्तर पाहणी करून हा निर्णय घेतला आहे आणि संपूर्ण प्रकल्प उभारणीचा खर्च ‘ओएनजीसी’मार्फत होणार आहे. आसाममधील अत्यल्प व अतिशय महागड्या वैद्यकीय सोयी-सुविधांच्या पार्श्वभूमीवर देशसेवेची संधी म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातील पहिला टप्पा १०० खाटांचा असून, त्यासाठी ९९ कोटींचा निधी अपेक्षित आहे. २०१९ मध्ये हॉस्पिटल सुरू होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर हे हॉस्पिटल चालविण्यात येईल व नफा झाल्यास आसाममध्ये सामाजिक व वैद्यकीय उपक्रम राबविण्यात येणार आहेत आणि तसे लेखी पत्र ‘ओएनजीसी’ला देण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अत्यंत वाजवी शुल्कात सर्व मूलभूत वैद्यकीय सोयी-सुविधा, त्यानंतर हळू-हळू अत्याधुनिक-अद्ययावत सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. शिबसागर शहराजवळील ५० एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे व प्रमुख जबाबदारी डॉ. महेंद्रसिंह चौहान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या समितीमध्ये डॉ. अनंत पंढरे, डॉ. अश्विनीकुमनार तुपकरी, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा समावेश आहे. या प्रकल्पात सेवा देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञांनी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुपकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंढरे, डॉ. कुलकर्णी, डॉ. वैशाली खडके, डॉ. विकास रत्नपारखे, डॉ. प्रतिभा फाटक यांनी पत्रकार परिषदेत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएमए’ मागे; ‘रेसिडेन्ट’ वाटेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विविध मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे ‘आयएमए’च्या शहर शाखेने शुक्रवारी (१४ मार्च) संध्याकाळी सहा वाजता जाहीर केले. त्याचवेळी ‘आयएमए’चे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी दैनंदिन रुग्णसेवा पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, असे आवाहन करतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनीही आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनदेखील शहर शाखेतर्फे करण्यात आले.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डॉक्टरांनी (रेसिडेन्ट) संध्याकाळपर्यंत सामुदायिक रजा आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले नसले तरी, ते सकाळपर्यंत कामावर परततील, असे संकेत आहेत. मात्र हायकोर्टासह मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (२४ मार्च) कठोर शब्दांत फटकारल्यानंतरही निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे घेण्यावरुन ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू होते.
मुख्यमंत्र्यांनी ‘आयएमए’च्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत. मान्य केलेल्या मागण्यांनुसार, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘महाराष्ट्र पोलिस सिक्युरिटी कॉर्पोरेशन’च्या ११०० पैकी ७०० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती येत्या पाच दिवसांत, तर उर्वरित रक्षकांची येत्या १५ दिवसांत नियुक्ती केली जाणार आहे. हल्ल्यांच्या घटनांची सर्व कायदेशीर जबाबदारी घेण्यासह हल्ला झालेल्या डॉक्टरांवर मोफत वैद्यकीय उपचार केले जातील. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात तीन निवासी डॉक्टरांमागे सुरक्षा समिती नेमण्यात येईल. ‘अलार्म सिस्टीम’ व ‘पास सिस्टीम’ही लागू केली जाईल. त्याचवेळी ‘डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट’मध्ये तीन वर्षापर्यंतच्या सक्तमजुरीची तरतूद आहे. मात्र ही शिक्षा अपुरी असल्यामुळे सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांपर्यंत प्रसुती तसेच क्षयरोग रजा देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. दत्ता कदम, पुढील वर्षाचे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, उपाध्यक्ष डॉ. कुलदिपसिंग राऊळ, माजी शहराध्यक्ष डॉ. संजीव सावजी, डॉ. पर्सी जिल्ला कोषाध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार, आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुदमा तांडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील १४ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर तब्बल दोन महिने बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी (२३ मार्च) अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १८ जानेवारी २०१७ रोजी फिर्यादी व त्याची पत्नी मोलमजुरीसाठी कामाला गेली होती. ते कामावरून घरी परतल्यावर रात्री मुलगी शौचासाठी जाते म्हणून सांगून गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे त्याच रात्री हरवल्याची तक्रार फिर्यादीने कन्नड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध घेतला असता, २३ मार्च रोजी राजुरी (जि. नगर) येथील गट क्रमांक ४३९ येथे मुलीसोबत संशयित आरोपी किरण कडुबा मोरे (वय २२, रा. दाभाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा आढळून आला. याप्रकरणी, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व शरीरसंबंध ठेवल्याचा जबाब मुलीने दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयित आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३६६ (अ), तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले व कुठे-कुठे बलात्कार केला, कुणी मदत केली का, पळून नेण्यासाठी कोणते वाहन वापरले, दोन महिने काय केले आदींचा तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न सुरक्षा शिवनितीची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात प्रत्येकाला अन्न सुरक्षेची तसेच गड, किल्ल्यांची कडेकोट सुरक्षा होती. अलीकडे आपण कायदे, नियम केले तरीही शेतीसमोरचे संकट कायमच आहे, अशावेळी शिवकालीन नितीची प्रभावी, अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन व राजर्षी शाहु महाराज अध्यासन केंद्रातर्फे ' शिवकालीन शेती, जल व्यवस्थापन आणि वर्तमान संदर्भ' या विषयावर २४ व २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्‍घाटन डॉ दांगट यांच्या हस्ते शुक्रवारी (२४ मार्च) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. टी. एन प्रकाश, डॉ. सतीश पाटील, अमर हबीब, चंद्रकांत वानखेडे, डॉ. राम चव्हाण, सचिव डॉ. राजेश करपे, सहसचिव डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. दांगट म्हणाले, आज बरेच तरूण सुसंस्कारी, अभ्यासू आहेत ही नाण्याची एक बाजू असून दुसरी बाजू ही काळीकुट्ट आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपल्याला, समाजाला फायदा होतोय का, हे बघण्याचीही गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जमसामान्याचे कैवारी होते. महाराजांनी जगात सर्वात प्रथम जमीन मोजली व कसेल त्याला जमीन, या तत्वावर त्यांनी कसण्यासाठी जमीन देऊन खऱ्या अर्थाने शेती करण्यास प्रोत्साहित केले. आज कृषीचे उत्पादन आणि उत्पादक वाढलेले आहेत. परंतु, शेतकरी आज उपेक्षितच आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. आज शेतीच्या उत्पादकतेबरोबरच शेतीचा खर्चही वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच रक्कम शिल्लक राहत नाही. शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी याठिकाणी तयार झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सतीश पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांनी जो आदर्श निर्माण केलेला आहे. त्या माध्यमातून आपण शेतीचा विकास केला पाहिजे. या दोन महाराजांनी शेती विकासासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी सर्वसमावेशक, असा शेती विकासाचा कृती आराखडा तयार केला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपनीला गंडवणाऱ्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फायनान्स कंपनीसोबत केलेल्या करारातील अटी व शर्तींचा भंग करून कंपनीचा विश्वासघात केल्याच्या आरोपावरून सहा जणांविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मास फायनान्सचे विधी अधिकारी अ‍ॅड. प्रदीप कळसकर (रा. राणानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार देविदास गणपत मिरगे (रा. कोल्हाटी वडगाव), संदीप सुलताने (रा. पैठण रोड), कुलविंदर सिंग (एमआयडीसी वाळूज) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिरगे यांनी १० जुलै २०१६ रोजी कंपनीकडून व्यावसायिक कर्जाची मागणी केली होती. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ८ लाख ५२ हजार १८८ रूपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. करारानुसार ४५ दिवसांच्या आता कंपनीत मशीन बसवून फायनान्स कंपनीला कळविणे बंधनकारक होते. शिवाय, त्यांनी दिलेला हप्ताचा पहिला धनादेश बँकेत वटला नाही. मास फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर केवळ ७५ हजार रुपयांचे मशीन बसविल्याचे निदर्शनात आले. कंपनीचा विश्वासघात केल्याचे समजल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार दत्तात्रय बोटके करीत आहेत. याप्रकरणी सुलताने हे कर्जदाराचे हमीदार व सिंग हे मशीन व्यावसायिक आहेत.
दुसऱ्या प्रकरणात मनोज पंजाबराव टेकाळे (रा. गजानन नगर), अनिल काळे (रा. नांदेडा), एन. एस. इंटरप्रायजेसचे मालक साजेद (रा. सिडको वाळूज) यांनी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. दुर्गा इंडस्ट्रीजचे मनोज टेकाळे यांनी मार्च २०१६मध्ये फायनान्स कंपनीकडे व्यावसायिक कर्जाची मागणी केली होती. त्यांना १० लाख ६ हजार ८७५ रुपयांचे कर्ज मंजूर झाले. फायनान्स कंपनीच्या नियमानुसार मशीन बसविणे गरजेचे होते. शिवाय, त्यांनी दिलेले दुसऱ्या हप्त्याचे धनादेश वटले नाहीत. वसुली अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर कंपनीत कोणतीही मशिन बसविली नसल्याचे उघड झाले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुंडलिकनगर चौकीकडे वर्ग करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराकडून दुसऱ्याचा खून; प्रेयसी भाजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
रांंजणगाव शेणपुंंजी येथील सैलानीनगरात अनैतिक संबंधातून एका महिलेच्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराने खून केला. या घटनेनंतर बदनामीच्या भीतीपोटी महिलेने स्वतःला पेटवून घेतले. ही थरारक घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंंजी येथील वॉर्ड नंबर ६ मधील सैलानीनगर येथे एक महिला गेल्या ८ ते १० वर्षांपासून पती व अनुक्रमे १० व ७ वर्षांच्या मुलांसह राहते. या महिलेस भेटण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नवनाथ महाजन हा आला होता. त्याच दरम्यान पाच वर्षांपूर्वी या महिलेसोबत एका कंपनीत काम करणारा शिवा मोरे हा देखील तेथे आला. यावेळी शिवा याने नवनाथ याला तू येथे काय करतोस, असा जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी शिवा मोरे याने नवनाथ महाजन यास लाकडी दांड्याने मारहाण केली. या घटनेत नवनाथ हा गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर आपली बदनामी होईल या भीतीने या महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून घेऊन पेटवून घेतले.
सैलानीनगरमध्ये घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मन्सूर पठाण, हेडकॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण, रमेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी नवनाथ महाजन याला १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्समधून उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान जळालेल्या अवस्थेत त्या महिलेला तिचा भाऊ व कुसूमबाई वाल्मिकी सूर्यवंशी यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना नवनाथ महाजन याचा शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास मृत्यू झाला. महिला ५० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शिवा मोरे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगावात खळबळ
या घटनेची माहिती पसरल्यानंतर रांजणगाव शेणपुंजी व परिसरात खळबळ उडाली आहे. दोन प्रियकरांच्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला. शिवाय दोन लहान मुले असलेल्या विवाहित महिलेने स्वतःला जाळून घेतल्याने चर्चा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्रीभ्रुण हत्येचा कर्ज काढून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्त्री-भ्रुणहत्येचा निषेध करण्यासाठी आणि मुलीचा जन्म झाल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी एक दांपत्य व त्यांच्या समर्थकांनी क्रांतिचौकात अनोखे आंदोलन केले. सुमित पंडित आणि पूजा पंडित असे या दांपत्याचे नाव आहे. यासाठी दांपत्याने कर्ज काढले.
पंडित म्हणाले, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे स्त्री भ्रुण हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे, या घटनेच्या निषेधार्थ क्रांतिचौकात आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही ‘लेक वाचवा’ अभियान सुरू केले आहे. यात मुलीचा जन्म झालेल्या बापाची दोन महिने २१ दिवस दाढी कटिंग मोफत करून देण्याचा उपक्रम केला आहे. याशिवाय माझ्या मुलीच्या जन्माचा आनंदही आम्ही याद्वारे साजरा करत आहोत, आम्ही आमच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवले आहे. लेक वाचवा या अभियानांतर्गत व शुक्रवारच्या आंदोलनाकरिता कर्ज काढून बॅनर्स आणि पोस्टर्स वाटप केले आहेत. मुलगी जगावी, तिचे महत्त्व जगाला पटावे, हा या आंदोलनामागील उद्देश असल्याचे सुमित पंडित यांनी स्पष्ट केले. यावेळी क्रांतिचौकात तेली युवा संघटनेचे विशाल नांदरकर, संतोष सुरूळे, महावीर धुमाळ, गणेश हिरे, सरला कामे, भुषण वाघ, ईश्वर पेंढारे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हॉस्पिटलमध्ये बाळंतिणीचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे पैठण तालुक्यातील खांडी अंतरवेली येथील बाळंतिणीचे अतिशय हाल झाल्याची घटना शुक्रवारी (२४ मार्च) सकाळी घडली. निष्काळजीपणासह अर्धवट उपचाराचा आरोप बाळंतिणीच्या नातेवाईकांनी केला.
प्रसुतीवेदना सुरू झालेली सोनाली गोटे ही महिला गुरुवारी (२३ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागात आली. ‘सीएमओ’ने तिला तपासून स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात हलविण्याची सूचना केली व तिला स्त्रीरोग विभागात नेत असतानाच पॅसेजमध्ये तिची प्रसुती झाली. त्यानंतर तिला स्त्रीरोग विभागात हलविण्यात आले. मात्र, संपाचे कारण देऊन सकाळी सात वाजता घाईघाईत सुटी देण्यात आली. त्यामुळे तिला तिचे नातेवाईक गावाकडे घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर घेऊन गेले. मात्र बसस्थानकावर तिला तीव्र वेदना सुरू झाल्या. तसेच रक्तस्त्रावही सुरू झाला. त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तिला पुन्हा घाटीत आणले. मात्र घाटीत उपचारासाठी तिला सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. नंतर तिच्यावर उपचार करण्यात आले, पण अर्धवट व अपुरे उपचार करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अखेर सामाजिक कार्यकत्यांनी तिला तिच्या गावाकडे जाण्याची सोय करुन दिली.

संबंधित बाळंतिणीवर योग्य ते उपचार करण्यात आले. प्रसुती झाल्यानंतर तिला वॉर्डात दाखल करण्यात आले होते व सकाळी सातला ती न सांगताच निघून गेली. त्रास सुरू झाल्याच्या तक्रारीमुळे ती परत आली असता, तिला पुन्हा घाटीमध्ये दाखल करण्यात आले. सुटी देण्यायोग्य प्रकृती झाल्यानंतर तिची सुटी करण्यात आली व गावाकडे जाण्यासाठी मदतही करण्यात आली.
– डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष; डॉक्टरला कारावास

$
0
0

शासकीय हॉस्पिटलमध्ये नोकरीचे आमिष दाख‍वून पैसे घेतले व फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लाेड येथील डॉ. गोविंद राजपूत याला सिल्लोड न्यायालयाने दाेन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपयाचा दंड ठाेठावला.
या विषयी अधिक माहिती अशी, ऑक्टोबर २००७ मध्ये आराेपी डॉ. गाेविंद राजपूत याने सिल्लाेड येथे बालाजी क्लिनिक लॅबाेरेटरी चालविणारे फिर्यादी विजय भास्कर काेंडीगडी यांना वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगितले. माझी वरपर्यंत आेळख असल्याने शासकीय हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देताे, असे आमिष दाखवत तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने दाेन लाख ५५ हजार रुपयांचा धनादेश साक्षीदार माे. आरेफ यांच्या समक्ष डॉ. राजपूतला दिला. त्यावेळी आरोपीने एक महिन्यात नोकरीस लावू, असे सांगितले. परंतु, नंतर नोकरीबद्दल विचारणा केली असता काेणासमाेर पैसे दिले माहीत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपीने बँकेतून पैसे वळते केल्याचे कळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने डॉ. राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मांदळे यांनी सिल्लाेड न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सहायक सरकारी अभियाेक्ता विजय धनवट यांनी साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने डॉ. गोविंद राजपूत याला शिक्षा सुनावली. या खटल्यात पाेलिस निरीक्षक के. के. पाटील व पैरवी अधिकारी हेडकॉन्सटेबल पी. एन. थाेटे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरोगेटेड बॉक्स उद्योग संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्राफ्ट पेपरच्या किमतीत फेब्रुवारी २०१७ पासून लक्षणीय वाढ झाली आहे. कोणत्याही प्रकारची वाढीव मागणी नसताना कागद कारखान्यांनी सर्व प्रकारच्या दरात ७ रुपये प्रतिकिलोने वाढ केली. याचा फटका कोरोगेटेड बॉक्स बनविणाऱ्या उद्योगांना बसत आहे. याच्या निषेधार्थ २७ व २८ मार्च रोजी कोरोगेटेड बॉक्स उद्योग बंद राहणार आहेत.
गेल्या ३० वर्षांत कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कागदाची दरवाढ करण्यात आली आहे. बाजारपेठेत कागदाची मागणी अल्प असल्याने कागद कारखाने पंधरवड्यात ५ ते ६ दिवस बंद राहत आहेत. वाढीव दरापेक्षा कमी दरात ऑर्डर स्वीकारण्यास कारखाने तयार नाहीत परिणामी कोरोगेटर्सना कागद उपलब्ध होणे अवघड झाले आहे. ऑर्डर पूर्ण करण्यास त्यांना अपयश येत आहे. कागद कारखानदारांकडून मिळालेल्या महितीनुसार या सर्व परिस्थितीला आयात करण्यात येणाऱ्या टाकाऊ कागदाच्या किंमतीत वाढ, स्थानिक टाकाऊ कागदाच्या किंमतीत वाढ आणि कागद तयार करण्यास लागणारा खर्च कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कागदाच्या किमतीत ८ ते १० किलोमागे वाढ झाली आहे. कोरोगेटेड उद्योजकांना त्यांचे ग्राहक तूर्तास दरवाढ करून देण्यास तयार नाहीत. अशीच परिस्थिती राहिली, तर कोरोगेटेड उद्योग बंद पडण्याची भीती आहे.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा विभागातील विक्मा (वेस्टर्न इंडिया कोरोगेटेड बॉक्स मॅन्यफॅक्चरर्स असोसिएशन) संघटनेची बैठक २० मार्च रोजी झाली. भाववाढीच्या निषेधार्थ २७ व २८ मार्च रोजी कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
कोरोगेटेड इंडस्ट्रिजचे ग्राहक जर दरवाढ देण्यास तयार नसतील तर एप्रिल २०१७ पासून या ग्राहकांना उत्पादन पुरवठा बंद करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यावेळी विक्मा मराठवाडा अध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव सचिन अग्रवाल, अनिल लोया, परेश वाणी, इद्रिस संग्राम, केशव पारटकर, मनोहर धायधडक, महेश जैन आदी उपस्थित होते.

हजार कामगारांवर कुऱ्हाड ?
औरंगाबाद व मराठवाड्यात कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे ५० उद्योग आहेत. याठिकाणी सरासरी २० कामगार गृहित धरले तर १००० कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. याशिवाय प्रिटिंग, लॅमिनेशन आदी उद्योग कोरोगेटेड बॉक्स उद्योगावर अवलंबून आहेत. दरवाढीमुळे या उद्योगांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधी साठ्याची माहिती जाहीर फलकावर लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य सुविधा पुरविताना औषधी साठा, योजना, लसीकरण कार्यक्रम याची माहिती स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने फलकावर लावा. एखाद्या नागरिकास जर सुविधेबद्दल तक्रार करावयाची असेल तर त्या फलकावर अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाइल क्रमांक टाकावेत, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारी हाती घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सीइओ मधुकरराजे अर्दड, अतिरिक्त सीइओ सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, वासुदेव सोळंके, संजय कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. अॅड. डोणगावकर यांनी विभागनिहाय अधिकाऱ्यांची ओळख करून घेत विभागासाठीचे बजेट, तरतूद, आजवर किती खर्च झाले ? मार्च अखेर काही निधी शिल्लक राहणार आहे काय ? याचा आढावा घेतला. बैठकीनंतर अध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅड. डोणगावकर म्हणाल्या,‘मार्चएंडच्या अनुषंगाने सर्व विभागांची माहिती घेतली. जिल्हा परिषदेला मिळालेला निधी अखर्चित राहणे किंवा परत जाणे अशा स्टेजला आहे काय ? हे पाहिले. सीइओ व टीमने आर्थिक नियोजन चांगले केल्याने बहुतांश निधीचे नियोजन झालेल आहे. यापुढील काळात प्रशासन आणि आम्ही एकत्रपणे विकासकामांचे नियोजन करणार आहोत.’
कुठल्या विभागात अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या,‘शिक्षण विभागात खूप लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील झेडपी शाळांतील विद्यार्थ्याला दर्जात्मक शिक्षण देण्यावर माझा भर राहणार आहे. आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये आरोग्य विषयक योजना, लसीकरण कार्यक्रम तसेच औषधींचा साठा किती आहे याची माहिती देणारे फलक लावावेत, अशी सूचना मी केली आहे. ज्यामुळे नागरिकांना योग्य ती माहिती मिळेल. एखाद्या सुविधेबाबत तक्रार करावयाची असल्यास नागरिकांना अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाइल नंबर उपलब्ध देणारा बोर्डही लावण्याची सूचना केली आहे. विविध विभागांच्या कामांसंदर्भातील आढावा बैठक आठवड्यातून एकदा मी घेणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

महिन्यातून एक जीबीचा प्रयत्न
जिल्हा परिषदेतील कामकाज करताना बैठकांसाठीचे वेळापत्रक मर्यादित नसले पाहिजे. सर्वसाधारण सभा तीन महिन्यांतून एकदा घेतली जाते. ज्यामुळे आढावा घेण्यास खूप विलंब होतो. कामात सुसूत्रबद्धता आणण्यासाठी महिन्यातून एक सर्वसाधारण सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून झेडपीचा कारभार सुरळीत करण्याचे संकेत अॅड. देवयानी डोणगावकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images