Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिद्धार्थ तलाव बंदच, पंधरा लाखांचे नुकसान

$
0
0
पाण्याचे लिकेज काढण्यासाठी बंद केलेला महापालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहे. ऐन हंगामात जलतरण तलाव बंद राहिल्याने सुमारे १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

वीजेचे खांब पडून जिवीत हानी झाल्यास जबाबदारी तुमची राहील

$
0
0
सेव्हनहिल्सच्या उड्डाणपुलावरील वीजेचे खांब कोसळून जिवीत हानी झाल्यास त्याची जबाबदारी तुमची राहील. ही जबाबदारी स्वीकारून त्या पूलावरील दिवे सुरू करा, अशा शब्दात स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना ठणकावले.

'रस्त्यांच्या कामांचे गौडबंगाल' स्थायी समितीत गाजले

$
0
0
रस्त्यांच्या कामाचे गौडबंगाल आज (बुधवारी) झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गाजले. 'मटा'मध्ये वृत्त मालिकेच्या स्वरुपात रस्त्यांच्या कामाचे गौडबंगाल उघड केले जात आहे. 'मटा'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या झेरॉक्स प्रतीच नगरसेवकांनी सभागृहात सादर केल्या.

म्हणे, 'ते' पत्र आलेच नाही!

$
0
0
रस्त्यांच्या कामाबद्दल पालिकेचे बिंग फोडणारे 'ते' पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोल विभागातर्फे पालिकेत आलेच नाही, असे उत्तर देत उपअभियंत्याने पालिकेच्या स्थायी समितीचीच दिशाभूल केली. उपअभियंत्याचे विधान कसे चुकीचे आहे, याचा प्रत्येय 'ते' पत्र पाहिल्यावरच येऊ शकेल.

समन्यायी पाणी वाटपाचा जुलैच्या उत्तरार्धात अहवाल

$
0
0
गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी पाणीवाटप अभ्यास समितीचा अहवाल येण्यास जुलैचा उत्तरार्ध उजाडण्याची चिन्हे आहेत. या अहवालासाठी मोठ्या प्रमाणातील माहिती, आकडेवारी यांची पडताळणी व विश्लेषण करण्यात येणार आहे.

आधार कार्डांच्या नोंदणीचे जिल्ह्यात ५४ टक्के काम

$
0
0
आधार कार्डांच्या नोंदणीच्या कामाला औरंगाबाद जिल्ह्यात वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १९ लाख ९८ हजार नागरिकांनी आधार कार्ड नोंगणी केली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५४ टक्के आहे.

मेडिकल दुकानांचे परवाने परत करणार

$
0
0
अन्न औषध प्रशासनाविरोधात महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बीडमध्ये संघटनेच्या मराठवाडा विभागीय कार्यकारिणीची बैठक झाली.

उसतोडीच्या स्थलांतराचापोलिओ मुक्तीला अडसर

$
0
0
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्नापूर गावात रोहित रामभाऊ शेळके मुलाला पोलिओ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली असून, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय पथकप्रमुख डॉ. रवींद्र बनपेल बीडमध्ये दाखल झाले आहेत.

पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज

$
0
0
पर्यटन देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि दिवसेंदिवस विस्तारीत‌होत चाललेला व्यवसाय आहे. तेव्हा 'पर्यटन' ह्या विषयाची आवड असणाऱ्यांना भविष्या‌त कुठे कुठे संधी आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी म.टा. ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन व्यवस्‍थापन विभागासोबत संपर्क साधला.

पोलिस खाते की पुरातत्व

$
0
0
खुलताबाद पोलिस ठाण्याची इमारत आता शंभर वर्ष जुनी झाली असून, ही जीर्ण इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. ही इमारत रिकामी करण्याचा अहवाल २००४मध्ये देण्यात आला होता. त्यानंतरही पर्यायी जागा न मिळाल्यामुळे ठाण्यातील पोलिसांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

देशात एक लाख 'सीएं'ची गरज

$
0
0
नुकताच दहावीचा निकाल जा‌हीर झाला. विद्यार्थी आणि पालकांची धावाधाव सुरू झाली. कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा आणि कुठे संधी आहेत यांची चर्चा घराघरात सुरू झाली. वाणिज्य शाखेची आवड असणाऱ्यासाठीही करिअरच्या भरपूर संधी आहेत.

सीइओंनी स्वीकारली दालनाबाहेर येऊन निवेदने

$
0
0
घरगुती कारणांनी गेल्या आठवड्यात रजेवर गेलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर दोन दिवसांपूर्वी परतले. मात्र, बहुतांश अधिकारी सुटीवर असल्याने अनेक विभागांची कामे तुंबलेली आहेत. त्यामुळे गरजूंनी थेट सीइओ दालन गाठायला सुरुवात केली.

२ दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0
शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना सिडको पोलिसांनी बुधवारी पहाटे आडगाव माऊली गावातून अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

पावसाळ्याबरोबर टँकरही वाढले!

$
0
0
पावसाळा सुरू होऊन दीड आठवडा उलटला. जिल्ह्यात पावसाने हजेरीही लावली, मात्र ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठीच्या टँकरच्या संख्येत घट झालेली नाही. जिल्ह्यातील टँकरची संख्या ७३२पर्यंत पोचली आहे.

PHDसाठी ३०२२ विद्यार्थ्यांचे अर्ज

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तब्बल चार हजार पाचशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. यातील ३ हजार २२ विद्यार्थ्यांनी विषयाच्या माहितीसह पीएचडीसाठी विद्यापीठाकडे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.

विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू

$
0
0
जिल्ह्यातील लिंबाळी गावात अवैधरित्या आकडा टाकून घेतलेल्या विजेची तार अंगावर पडल्याने मायलेकाचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

पाच धोकादायक इमारतींना टाळे

$
0
0
धोकादायक इमारतींच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आज बुधवारी पाच इमारतींना पालिकेच्या पथकाने टाळे ठोकले. अन्य काही इमारतींबद्दलही अशीच कार्यवाही केली जाणार आहे.

केमिस्ट्रीशिवायही इंजिनीअरिंग

$
0
0
केमिस्ट्रीला पर्यायी विषय घेऊन खुल्या वर्गात किमान ४५ टक्के व आरक्षित वर्गात ४० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज इंजिनीअरिंग प्रवेशासाठी स्वीकारावेत, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बायोटेक्नोलॉजी, बायोलॉजी, व्होकेशनल आदी विषयांचा पर्याय घेतलेल्या राज्यातील पंधरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या आदेशाचा लाभ होणार आहे.

लोकसभेच्या तीन जागांवर ‘स्वाभिमानी’

$
0
0
दुष्काळात मातब्बर राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना आधार दिला नाही. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी भरीव मदत केली, तसेच आंदोलन करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून दिले.

‘अतिथी देवो भव’साठी पुढाकार घ्या

$
0
0
औरंगाबादमधील गेल्या पाच वर्षांचा प्रवास समाधानकारक आहे. दरवर्षी आम्ही सातत्याने चांगली कामगिरी केली. औरंगाबाद परिसरात टुरिझमला चालना देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण त्याचे मार्केटिंग व्यवस्थित होत नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images