Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत पतीला तीन वर्ष सक्तमजुरी

$
0
0
पैशासाठी पत्नीचा छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पतीला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची ‌शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. बी. कचरे यांनी सुनावली.

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’बाबत आयुक्तांना निवेदन

$
0
0
मागील वर्षभरामध्ये शहराला सहन कराव्या लागलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात महानगरपालिकेने शहरात जास्तीत जास्त ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

नारेगावातील अतिक्रमणे ४८ तासांत पाडा

$
0
0
नारेगाव येथील पालिकेच्या मालकीच्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे येत्या ४८ तासांत पाडून टाका. याशिवाय त्या भागात जे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, त्यावरही कारवाई करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

कॉल सेंटर हॅकिंगने पावणेदोन लाखांची फसवणूक

$
0
0
कॉलसेंटरचा पासवर्ड हॅक करून अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल कॉलिंग केल्याचा प्रकार सिडको एमआयडीसी भागातील कॉलसेंटरमध्ये उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे बंद असलेल्या कॉलसेंटरमध्ये फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला आहे.

कंटेनर-दुचाकी अपघातात तीन जखमी

$
0
0
पडेगाव भागात बुधवारी दुपारी दीड वाजता कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले असून, याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘रास्ता रोको’मुळे वाहतूक कोंडी

$
0
0
पैठण रस्त्यावरील महानुभाव आश्रमाजवळील अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेचे गुरुवारी ‘रास्ता रोको’ केला. महानुभाव आश्रमाजवळ दुपारी बारा वाजता हे आंदोलन झाले.

पालिकेने पुन्हा सील केल्या

$
0
0
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. बुधवारी चार इमारतींना सील ठोकण्यात आले होते.

शहराच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

$
0
0
शहरातील कायदा व सुव्यवस्था, विकासात प्रशासनाची भूमिका, पर्यटन विकास यासह भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर ‘आपलं औरंगाबाद...जागर...शहर जाणीव जागृतीचा’ या कार्यक्रमात मंथन करण्यात आले असून शहराच्या विकासासाठी साऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन वक्त्यांनी केले आहे.

वाहक, चालकांना भत्त्याची ‘बक्षिसी’

$
0
0
‘एसटी जिवंत राहिली तर, एसटीचे कर्मचारी जिवंत राहतील’, या उद्देश्याने ‘कमवा आणि भत्ते मिळवा’ अशी योजना एसटी विभागाने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केली होती. मार्च-एप्रिल महिन्यात राबविण्यात आलेल्या या योजनेत, औरंगाबाद विभागात, चालक आणि वाहकांना सव्वादोन लाख रूपये वाटप करण्यात आले आहे.

तन्जीम- ए- इन्साफचे उद्यापासून अधिवेशन

$
0
0
तन्जीम- ए- इन्साफचे राज्य अधिवेशन नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात १५ व १६ जून रोजी होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय कमुनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. वर्धन करणार असून अब्दुल सत्तारही उपस्थित राहणार आहेत.

गढूळ पाण्याने नागरिक त्रासले

$
0
0
कधीकाळी शहराच्या विकासात आणि वैभवात महत्त्वाची भूमिका बजावण्यात चिकलठाणा एमआयडीसीचा सिंहाचा वाटा होता. एमआयडीसीचा विकास होत गेला, त्याबरोबर या भागात वस्ती वाढत गेली. आज हा परिसर शहरातील २२ क्रमांकाचा वॉर्ड म्हणून ओळखला जातो.

प्रमाणपत्र देण्यास वाहन निरीक्षक सक्षम

$
0
0
मोटार वाहन निरीक्षकांना एखाद्या वाहनांबाबत काही शंका वाटल्यास त्यांनी संबंधित मोटारवाहन उत्पादकांकडून प्रमाणपत्र मागावे, अन्यथा योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक सक्षम असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी सांगितले.

सरकारच्या आदेशास पेन्शनरांचा विरोध

$
0
0
मागासवर्गीय प्रवर्गातील सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रे दाखल न केल्यास पेन्शन थांबविण्यात येईल व कारवाई होईल, असा काढण्यात आलेल्या शासनाच्या आदेशास मराठवाडा पेन्शनर असोसिएशने विरोध दर्शविला आहे.

चोरटे घेताहेत मंगळसूत्रांवर लोन

$
0
0
दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांनी चोरलेल्या मंगळसूत्रांची विल्हेवाट लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सोन्यावर झटपट कर्ज देणाऱ्या खासगी वित्तीय संस्थेमध्ये हे सोने ठेवून कर्ज उचलण्याचे प्रकार घडत असल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटत आहे.

‘तक्रार पेटीत टाका’वर ‘ऊर्जा मंचा’ची नाराजी

$
0
0
जीटीएलच्या चिकलठाणा येथील कार्यालयात तक्रारी बॉक्समध्ये टाकण्यास सांगण्यात येत आहे. या पद्धतीत तक्रारीची पोच मिळत नसल्याने वीज ग्राहक मंचात दाद मागण्यात अडचणी येऊ शकते; त्यामुळे जीटीएलने कारभारात सुधारणा करण्याची मागणी ऊर्जा मंचाने केली आहे.

हेल्पलाइनमुळे गरजूंना मिळाला मोलाचा सल्ला

$
0
0
शैक्षणिक प्रवेश, छेडछाडीची तक्रार, वाहन चोरी, रुग्णालयाचा संपर्क क्रमांक, पोलिस ठाण्याचा पत्ता अशा विविध कारणांसाठी जिल्ह्यातील नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हेल्पलाइनची मदत घेतात.

चार शिफ्टमध्येपालिका कचरा उचलणार

$
0
0
महापालिका आता शहरातील कचरा चार शिफ्ट मध्ये उचलणार आहे. या योजनेचा सविस्तर अहवाल आज, शुक्रवारी आयुक्तांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली.

कामगारांच्या प्रश्नांसाठी आज ‘सीटू’चा मोर्चा

$
0
0
कंत्राटी पद्धत रद्द करा, यासह कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज, शुक्रवारी सीटू संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष कॉ. उद्धव भवलकर यांनी दिली.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा पेरणीयोग्य पावसाची

$
0
0
जून महिना अर्धा संपला तरी, जिल्ह्यात अपेक्षित पाऊस नसल्यामुळे पेरणी खोळंबली आहे. चांगला मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदी केली होती; मात्र सध्या पावसाअभावी पेरणीची कामे ठप्प असून जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

वैजापूर तालुक्यात पंधरा टक्के क्षेत्रावर पेरणी

$
0
0
वैजापूर तालुक्यात रोहिणी व मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; पण सर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images