Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रशासनामुळे स्वच्छतेत पिछाडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटीच्या बाता मारणारे आणि राणाभीमदेवी थाटात भल्याभल्या घोषणा करणारे शहराचे कारभारी आणि प्रशासनाला केंद्र सरकारने केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात जोरदार चपराक बसली आहे. देशभरातील शहरातून फक्त ७९४ गुण मिळवत औरंगाबाद तब्बल २९९ व्या स्थानी फेकले गेले आहे. या घसरणीला राज्यकर्त्यांनी प्रशासनाला जबाबादार धरले आहे.

आपले शहर पिछाडीवर जाण्यास तत्कालीन महापालिका आयुक्त, प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी अधिक योग्य पद्धतीने नियोजन करण्याची गरज होती. आता नवीन आयुक्त आले आहेत. त्यांना शहराची सर्व माहिती असून ते निश्चितच सर्वांना सोबत घेत चांगले काम करतील. याबाबत चर्चा ही झाली आहे. - चंद्रकांत खैरे, खासदार

स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद पिछाडीवर असणे ही बाब निश्चितच भूषणावह नाही. आमच्या वतीने अनेक भागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. आपले शहर क्रमवारीत अव्वल यावे, यासाठी आता अधिक सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेत कसोशीने प्रयत्न केले जातील. - अतुल सावे, आमदार

औरंगाबाद पिछाडीवर जाणे निश्चितच चांगली बाब नाही. किमान आतातरी हे शहर, पालिका आपली आहे असे मानून अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत शहर कसे स्वच्छ, सुंदर राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जे झाले त्यातून काहीतरी धडा घेणार की नाही. खरे तर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य तो समन्वय नव्हता, असे दिसते. परिणामी नियोजन तसेच या कामात लोकसहभाग करून घेता आला नाही. आता तसे होता कामा नये. शहराच्या प्रगतीसाठी ते योग्य नाही. - संजय शिरसाट, आमदार

स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद पिछाडीवर गेले, हे ऐकून कोणतेही आश्चर्य वाटले नाही. कारण तशी परिस्थितीच आहे. एका भागात दहा कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेची जबाबदारी असेल, तर प्रत्यक्षात तेथे दोनच कर्मचारी काम करताना दिसतात. अनेक ठिकाणी तर अधिकृत कर्मचारी दुसऱ्याच लोकांना पैसे देऊन हे काम करतात. दैनंदिन स्वच्छता अहवाल दिला जातो का, सुपरवायझर काय करतात, असे अनेक प्रश्न आहेत. वारंवार फोन करूनही अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही हा अनुभव आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून सुंदर - स्वच्छ शहरासाठी अधिक गंभीरपणे विचार करून वाटलाच होणे अपेक्षित आहे. - इम्तियाज जलील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पाणीपुरवठा सुरळीत करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सिडको-हडको परिसरात पाणी पुरवठ्याचा खंड नियमितपणे वाढत आहे. याबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी सभागृहनेत्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तत्काळ लक्ष देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसनेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांच्या दलनात सायंकाळी चार वाजता बैठक झाली. यात शिवसेनेच्या नगरसेविका सीमा खरात, ज्योती पिंजरकर, स्वाती नागरे यांनी सुरुवातीला सिडको-हडको परिसरातील पाणी प्रश्न मांडला. पाणी पुरवठ्यात या भागात नियमितपणे खंड पडत असून नागरिकांमध्ये संताप असल्याचे त्यांनी सांगितले. सीताराम सुरे, बन्सी जाधव, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, यशश्री बाखरिया यांनी आपापल्या वॉर्डात पाणी पुरवठा सुरळीत नसून पाण्याच्या समस्या मांडल्या. पालिकेला नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात काय अडचणी आहेत, असा प्रश्न केला. पालिकेकडे कर्मचारी कमी असल्याने पाणीपुरवठा करण्यास अपयश येत असल्याचे अधिकारी सरताजसिंग चहल यांनी सांगितले. पाणी पुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करा, अशा सूचना उपमहापौर स्मिता घोगरे यांनी दिल्या. यावेळी शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हा प्रमुख जयवंत ओक, लक्ष्मीनारायण बाखरिया, अरुण शेळके, बापू कवळे, ललित देशपांडे, नाना साळवे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेमू विस्ताराला ‘दमरे’चा खोडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना-नगरसोल डेमूच्या मनमाडपर्यंतच्या विस्तारीकरणाला दमरे अर्थात दक्षिण मध्य रेल्वेच्या आठमुठ्या धोरणाचा खोडा बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे मुंबई-लातूर रेल्वे बिदरपर्यंत नेता. मग डेमूचा विस्तार का रखडला, असा संतप्त सवाल प्रवासी संघटना करत आहेत.
जालना-नगरसोल डेमू रेल्वे जवळपास सहा तास नगरसोल किंवा तारूर रेल्वे स्टेशनवर उभी असते. या रेल्वेचा विस्तार मनमाडपर्यंत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे एक्सप्रेसने औरंगाबाद ते मनमाड आणि जालना ते मनमाड जाणाऱ्या प्रवाशांचा भार कमी होईल. सकाळी जनशताब्दी किंवा सचखंड एक्स्प्रेसमध्ये तिकीट कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना मनमाडहून मुंबई किंवा दिल्लीकडे जाण्यासाठी ही गाडी उपयोगी ठरेल. त्यामुळे डेमू मनमाडपर्यंत न्या, ही मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली. याबाबत नांदेड विभागाने भुसावळ रेल्वे विभागाशी संपर्क साधला. डेमू रेल्वे मनमाडपर्यंत न्यावी, असा प्रस्ताव दिला. भुसावळ विभागाने या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मध्य रेल्वेला पाठवून या गाडीला मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र, मागील पाच महिन्यांपासून हा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडेच पडून आहे. त्यामुळे डेमूचा विस्तार थांबलेला आहे.

पूर्णा, पाटण्याचाही प्रस्ताव थंड बस्त्यात
पूर्णा-पाटणा रेल्वे औरंगाबादहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, हा प्रस्ताव अदयापही दक्षिण मध्य रेल्वेने मंजूर केलेला नाही. यामुळे औरंगाबादला मिळणारी एक नवीन रेल्वे ‘द‌मरे’नेच रोखल्याची चर्चा विभागात सुरू आहे.

१२ मे रोजी बैठक
खासदारांची १२ मे रोजी रेल्वे महाव्यवस्थापक तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत जालना आणि औरंगाबादच्या खासदारांनी उपस्थित राहून डेमू, पूर्णा, पाटणा रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित केल्यास, हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ काढताना सापडली चिंचपूरमध्ये विहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील चिंचपूर येथील गाव पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढताना आठ फूट रूंद व आठ फूट खोल पाण्याने डबडबलेली जुनी विहीर सापडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून चिंचपूरमधील ग्रामस्थ लोकसहभागातून गाव परिसरातील तलावांतील गाळ काढत आहेत. येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम बुधवारी सुरू असताना जुन्या काळातील विहीर सापडली. या तलावातून आतापर्यंत ६०० ट्रिप गाळ काढण्यात आला. हा तलाव गावालगतच्या टेकडीजवळ आहे. भर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईच्या काळात विहीर सापडल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावातील नागरिकासह परिसरातील नागरिकही विहीर पाहण्यासाठी येत आहेत. सध्या ही विहीर कुतुहलचा विषय आहे. विहीरीची रचना जुन्या काळातील असून तलाव खोदण्यापूर्वीची ही विहीर असावी, असा अंदाज आहे. जलयुक्त शिवार योजनेत चिंचपूर गावची निवड करण्यात आलेली आहे. आम्हाला जीवंत पाण्याचे जलस्त्रोत सापडले आहे. शासनाने ही विहीर खोलीकरण व रुंदीकरणासाठी मदत करावी, अशी मागणी सरपंच प्रियंका जंजाळ यांनी केली आहे.

चिंचपूरचे पुनर्वसन
खेळणा प्रकल्पाचे काम १९६०-६१ या काळात सुरू झाले. तेव्हा चिंचपूर या गावाचे पुनर्वसन होत असतांना शेत शिवाराच्या सोयीनुसार दोन वस्त्यांमध्ये नागरिक राहायला गेले. दोन्ही गावच्या मध्यभागी ७२-७३ काळात एक छोटा पाझर तलाव तयार करण्यात आला. या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असतांना ही विहीर सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पाटलामु‍ळे खिसेकापू जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस पाटलाचे पाकीट मारल्यानंतर पोलिस पाटलाने पाकीटमाराला रंगेहात पकडले. मात्र पाकीटमाराचा साथीदार पाकीट घेऊन पसार झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी सात वाजता सिडको बसस्टँडमध्ये घडला. या झटापटीत पाकीटमाराने हाताला चावा घेतल्यानंतरही पोलिस पाटलांने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रकाश ज्ञानबा खंदारे (वय ३० रा. कोनाटी. पो. खळेगाव ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) हे पोलिस पाटील आहेत. खंदारे बुधवारी सकाळी सिडको बसस्टँड येथून मेहकरला जाणाऱ्या बसमध्ये चढले होते. यावेळी संशयित आरोपी शेख मुबारक शेख अब्दुल रहेमान (वय ३५, रा. रोशन गेट) याने त्यांच्या पँटच्या मागच्या खिशात असलेले पाकीट बळजबरीने हात घालून काढले व साथीदाराच्या दिशेने फेकून दिले. हे पाकीट घेऊन साथीदार पळून गेला. परंतु, खंदारे यांनी शेख मुबारक याला पकडले. यावेळी मुबारक याने खंदारे यांच्याशी झटापट केली तसेच सुटका करून घेण्यासाठी खंदारे यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. तरी देखील खंदारे यांनी त्याला पकडून ठेवले. पोलिस आल्यानंतर मुबारकला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी आरोपी मुबारक विरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुभाष चव्हाण हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीतर्फे एअर होस्टेसचे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी यंदा तीन नवीन योजना राबविल्या जाणार आहेत. स्पर्धा परीक्षा, एअर होस्टेस प्रशिक्षण आणि परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून विषय समितीने त्यास नुकतीच मंजुरी दिली.
समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण विषय समितीची बैठक झाली. जिल्हा परिषद उपकरातून यंदा ४ कोटी २० लाख, तर अपंगांसाठी एकूण उत्पन्नाच्या ३ टक्के म्हणजे २ कोटी १५ लाख रुपये असे ६ कोटी ३५ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली, अशी माहिती प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी दिली. यंदा सीइओ मधुकरराजे अर्दड यांच्या संकल्पनेतून तीन नवीन योजना राबविण्याचे ठरविले आहे. सर्व योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी आहेत. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत १० वीच्या पुढील विद्यार्थिनींना सहभागी होता येईल. योजनेसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीय मुलींना एअर होस्टेस ट्रेनिंगसाठी २५ लाखांची तरतूद केली असून यासाठी मुंबई, दिल्लीतून निविदा अपेक्षित आहेत. रदेशी भाषा (फॉरेन लँग्वेज) प्रशिक्षणाची तिसरी योजना आहे. या योजनेसाठीही २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या योजना पारदर्शीपणे राबविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

ग्रंथालयांसाठी दीड कोटी

ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये ग्रंथालये सुरू करण्याची योजनाही यंदा समाजकल्याण विभागाकडून राबविली जाणार आहे. यासाठी १ कोटी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली असून ७२५ ग्रंथालये अपेक्षित आहेत. या ग्रंथालयांमधून स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर ठेवली जातील. जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. एका ग्रंथालयासाठी २० हजार रुपये निधी दिला जाणार आहे, असे मडावी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर ठकाने घातला ३२ हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची थाप मारून माहिती मिळवत सायबर ठकाने तरुणाला ३२ हजार ५०० रुपयांला गंडा घातला. हा प्रकार मंगळवारी गारखेडा भागात घडला असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष जयप्रकाश शास्त्री (वय ३३, रा. मोरेश्वर हौसिंग सोसायटी, गारखेडा परिसर) यांच्याकडे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड आहे. त्यांना मंगळवारी दुपारी एका अनोळखी मोबाइलधारकाने कॉल केला. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले असून सुरू करण्यासाठी एटीएमच्या क्रमांकाची माहिती विचारली. संतोषला ही बाब खरी वाटल्याने त्याने समोरील व्यक्तीला ही माहिती दिली. यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ३२ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचा मॅसेज त्यांना आला. याप्रकरणी संतोष यांच्या तक्रारीवरून अनोळखी मोबाइलधारकाविरुद्ध पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायदयानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस‌ निरीक्षक अशोक मुदिराज तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी वाहनचालकांना लाखाचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरूद्ध वाहतूक विभागाने बुधवारी मोहीम राबवून एक लाख आठ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. यापैकी एकाला कोर्टाने सहा दिवस कैदेची शिक्षा सुनावली.
वाहतूक विभागतर्फे ३० एप्रिलपासून ही मोहीम राबवली जात आहे. रस्तोरस्ती वाहतूक पथकामार्फत ब्रेथ अनॉलाझरद्वारे ४५० वाहनचालकांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ६८ वाहनचालकांनी मद्य पिल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरूद्ध कार्यवाही करून कोर्टात खटले पाठविण्यात आले. एकूण ६८ खटल्यांपैकी ४६ खटल्यांत एक लाख आठ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल झाला. एका खटल्यात वाहनचालकाला ४१०० रुपये दंड व दंड न भरल्यास सहा दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. चालकाने दंड न भरल्याने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. काळी काच व सिटबेल्ट न लावणाऱ्या ४०६ वाहनचालकांवरही कारवाई झाली. त्यांच्याकडून एकूण ८१ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक वाहतुक आयुक्त सी. डी. शेवगण, निरीक्षक अविनाश आघाव, शिंदे, जारवाल, शिनगारे, सहायक निरीक्षक राठोड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्याने परत केले नऊ हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा माहिती अधिकाऱ्याला सापडलेली नऊ हजारांची रक्कम त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत सिडको पोलिसांच्या स्वाधीन केली. कनॉट मार्केट परिसरात जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांना बुधवारी रात्री ही रक्कम सापडली होती.
औरंगाबाद ‌जिल्हा माहिती केंद्र येथे मुकुंद चिलवंत हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते बुधवारी रात्री कनॉट मार्केट परिसरातून घरी जात होते. यावेळी त्यांना राजसारथी अपार्टमेंट समोर नऊ हजार रुपये सापडले. यामध्ये दोन हजार व पाचशेच्या नोटांचा समावेश होता. चिलवंत व सहायक जिल्हा माहिती अधिकारी श्याम टरके यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. आयुक्तांनी सबंधित पोलिस ठाण्यात ही रक्कम जमा करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार चिलवंत व टरके यांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. येथे ठाणे अंमलदार राजेश बनकर, समद पठाण, ढगे व खडसन यांच्याकडे ही रक्कम सुपूर्त करण्यात आली. ज्या व्यक्तीची ही रक्कम आहे त्याने ओळख पटवून रक्कम नेण्याचे आवाहन सिडको पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’ गावांनाही टँकरचा विळखा

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
Tweet : @ramvaybhatMT
औरंगाबाद ः शिवारातील पाणी शिवारात जिरवण्यासाठी मोठा गाजावाजा करून जिल्ह्यात २०१५- १६मध्ये २२८ गावांत जलयुक्त शिवार अभियानाचे काम सुरू करण्यात आले. या गावांत अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र यापैकी तब्बल ५५ गावांमध्ये यंदा ७२ टँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे.
दुष्काळी प्रदेश सुजलाम सुफलाम करण्याचा रामबाण उपाय असल्याचा प्रचार करीत सरकारने जलयुक्त शिवार योजनेवर वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च केले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी २२८ गावे निवडण्यात आली. या सर्व गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करण्यात आली. त्याबद्दल जिल्ह्याचा गौरवही करण्यात आला. आता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘जलयुक्त’ झालेल्या गावांपैकी तब्बल ५५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांत सध्या ७२ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये त्याच वर्षी कामे पूर्ण करायची आहेत, मात्र अनेक तालुक्यांत कामे कासवगतीने सुरू आहेत.
जलयुक्त शिवार योजनेसाठी शासनाने २०१५-१६मध्ये जिल्ह्यात तब्बल १३८ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले आहेत. या अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांपैकी टँकरग्रस्त बहुतांश गावे गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यांतील आहेत. खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यांत तुलनेत कमी पाऊस झाला त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच या तालुक्यांमध्ये टँकर सुरू करावे लागले होते, मात्र औरंगाबाद, सिल्लोड, वैजापूर या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला; तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामेही झाली. त्यानंतरही या तालुक्यांतील गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या गावांपैकी ‌चित्तेगाव, साजापूर, धोंडखेडा, फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव, आडगाव बुद्रुक, वावना, पैठण तालुक्यातील म्हारोळा, गंगापूर तालुक्यातील गाजगाव, शेकटा, बुट्टे वडगाव, मंजरपूर, कनकोरी, शहापूर, गवळी धानोरा, जिकठाण, आसेगाव, वैजापूर तालुक्यातील माळीसागज, बल्लाळी सागज, आघूर, सावखेडा, कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, मोहरा, औराळी, खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव, वडगाव, जाफरवाडी, सिल्लोड तालुक्यातील जंजाळा, पिंपळदरी, पिंपळपेठ, डकला, बाळापूर; तसेच सोयगाव तालुक्यातील वाकडी अशा एकूण ५५ गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

तालुकानिहाय चित्र
तालुका......निवडलेली गावे....टँकरग्रस्त गावे
औरंगाबाद.........२९..................०३
फुलंब्री...............२६..................०४
पैठण................२६..................०१
वैजापूर.............३१...................०९
गंगापूर.............२६...................१३
कन्नड..............२४...................०५
सिल्लोड............२८...................११
खुलताबाद.........२०...................०८
सोयगाव............१८...................०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादची स्वच्छतेत घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत औरंगाबाद महापालिकेची २९९व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. प्रशासनाने ‘टॉप टेन’मध्ये येण्याचा केलेला दावा सोडाच, पण गेल्यावर्षी ७३ शहरांपैकी ५६व्या क्रमांकावर असलेला क्रमांकही सांभाळता आलेला नाही. चुकलेले धोरण, स्वच्छतेच्या निकषांकडे केलेले दुर्लक्षामुळे औरंगाबादची घसरण झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प, सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची उद्दिष्टपूर्ती याबाबींचे केंद्रीय पथकाने सर्वेक्षण केले. या स्पर्धेतील सहभागी शहरांचे रँकिंग गुरुवारी जाहीर करण्यात आले. ४३४ शहरांच्या यादीत औरंगाबाद मागे पडल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी या सर्वेक्षणात शहर पहिल्या दहामध्ये असेल, असा दावा केला होता. स्पर्धेत विविध निकषांच्या आधारे गुण देण्यात आले. अनेक निकषांकडे प्रशासनाने डोळेझाक केली; तसेच कचऱ्यावरील प्रक्रियेबाबत महापालिका अपयशी ठरली आहे. स्पर्धेतील सगळ्या निकषांची पूर्तता करणे अपेक्षित होते, परंतु त्यातील एक-दोन निकषांवरच प्रशासनाने भर दिला. ओला व सुका कचरा वगळता, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विल्हेवाट, प्रोसेसिंग याकडे दुर्लक्ष केले. स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्टही महापालिका पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे गुणांची टक्केवारी कमी झाली. केवळ समिती येण्याच्याकाही दिवसापूर्वी जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले. पथक केवळ सार्वजनिक ठिकाणी भेटी देईल असे गृहित धरून काही ठराविक ठिकणीच कामे करण्यात आली. समितीसमोर हे सगळे पितळ उघडे पडले आणि शहराचा क्रमांक स्वच्छतेच्या यादीत घरसला.

स्पर्धेत केवळ ७९४ गुण
औरंगाबाद शहराची लोकसंख्या २०११च्या जनगननेनुसार ११ लाख ७५ हजार ११६ एवढी आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेत, स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्राच्या पाहणीत २००० पैकी ७९४ गुण मिळाले आहेत. देशपातळीवरच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण ४४ शहरांचा समावेश आहेत. त्यात औरंगाबादचे रँकिंग मागच्या वर्षीच्या तुलनेत घसरले आहे.

हा निकाल आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. ही कामगिरी समाधानकारक नक्कीच नाही. स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढवून अधिक चांगले कसे काम करता येईल, यावर आगामी काळात भर द्यावा लागेल. येत्या काळात चांगले काम झालेले दिसेल.
- डी. एम. मुगळीकर, आयुक्त, महापालिका, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन माहिती केंद्राला अवकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेने देशी-विदेशी पर्यटकांना माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या पर्यटन माहिती केंद्राला दहा महिन्यांत अवकळा आली आहे. स्वच्छतागृहाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची साधी सोयही येथे उपलब्ध झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे केंद्र अस्वच्छतेचे केंद्र बनले आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांना दहा महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी महापालिकेने स्टेशन रोडवर २० जून २०१६ रोजी पर्यटन माहिती केंद्राची उभारणी केली. पालकमंत्री रामदास कदम यांच्याहस्ते या केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्राची दहा महिन्यांत वाताहत झाली आहे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. स्वच्छतागृहांची दारे, कडी कोयंडे तुटले आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरातील या केंद्राला उपमहापौर स्मिता घोगरे यांनी गुरुवारी भेट दिली. माहिती फलक अस्ताव्यस्त पडलेले, दरवाजे निखळलेले, प्रतिक्षलयात स्वच्छतागृहाचा अभाव, स्वच्छतेसाठी शिपाई नाही. टेलिफोन, इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नसल्याचे समोर आले. पालिकेने या केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागातील सहा विद्यार्थ्यांना नियुक्त केले आहे. त्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यापैकी दोन विद्यार्थी काम सोडून गेले. केंद्रातील विविध प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा करून ते सोडवू, असे घोगरे यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव
महापालिकेने सुरू केलेल्या पर्यटन माहिती केंद्रातील सहापैकी दोन विद्यार्थी काम सोडून गेले. उर्वरित आर्थिक विवंचेत सापडले आहेत. पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने त्यांचे वेतन दिले नाही. महापालिका प्रशासन व विद्यापीठ यांच्यात समन्वयचा अभाव आहे. या विद्यार्थ्यांचे वेतन पर्यटनशास्त्र विभागाने करायचे की महापालिकेने, असा प्रश्न उपस्थित करून वेतन लांबविले. आता त्यांच्या वेतनाची प्रशासकीय प्रक्रिया झाली आहे, परंतु प्रत्यक्षात अद्याप हाती पैसे मिळेलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनचे पार्सल पोस्टातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना टपाल खात्याने सेवा सेवा उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दररोज ऑनलाइन शॉपिंगच्या सुमारे पाचशे पार्सलची डिलिव्हरी करण्यात येत आहे. ऑनलाइन शॉपिंगमार्फत खरेदी केलेल्या वस्तू ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे काम प्रामुख्याने टपाल विभागाकडे सोपविले जात आहे.
पोस्टाचे देशभर जाळे आहे. या विभागाची विश्वासार्हताही आहे. पोस्टाच्या सेवेचा लाभ आता ऑनलाइन शॉपिंग कंपन्याही घेत आहेत. त्यासाठी राज्यात आधुनिक पार्सल केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. टपाल खाते खासगी कुरिअर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
देशात ई-कॉर्मसचे प्रमाण वाढत अाहे. या क्षेत्रात सेवा पुरविण्यास टपाल विभागाने सुरुवात केली आहे. यामध्ये वस्तू पॅक करण्यापासून त्या संबंधितांपर्यंत पोचविण्यापर्यंतची सुविधा दिली जात आहे. फ्लिपकार्ट, मंत्रा, स्नॅपडील, स्टार सीजे, अमेझॉनसारख्या आघाडीच्या कंपन्यांना टपालाकडून सुविधा देण्यात येत अाहेत. राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत कंपन्याकडून बुकिंग होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबादेत प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगच्या डिलिव्हरीच्या सेवेचे प्रमाण जास्त आहे. दररोज सुमारे पाचशे पार्सल वितरित केले जात आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती पोस्ट मास्तर जनरल प्रवण कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर ‘सीईटी’ला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक भुर्दंड बसवणारा पदव्युत्तर प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. एकावेळी एकाच ठिकाणी परीक्षा देणारा विद्यार्थी इतरत्र प्रवेशासाठी प्रयत्न करू शकणार नाही. ‘सीईटी’चा निर्णय गैरसोयीचा असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी (प्रवेश परीक्षा) घेण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय गैरसोयीचा आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शैक्षणिक वर्षात ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय झाला.
सीईटीचा निर्णय तत्काळ रद्द करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. सतीश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शहराध्यक्ष राहुल तायडे, अमोल दांडगे, मयूर सोनवणे व दीपक बहीर यांची स्वाक्षरी आहे.

सीईटीचा निर्णय अचानक का?
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी इतर विषयात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करू शकतो, परंतु नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्याला एकावेळी एकाच ठिकाणी सीईटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करणे बंद होईल. ‘सीईटी’साठी ८०० ते एक हजार रुपये मोजून शिक्षण घ्यावे लागणार आहे. विद्यापीठाअंतर्गत विभागाचा अभ्यासक्रम व महाविद्यालयाचा अभ्यासक्रम वेगळा आहे. अचानक सीईटीचा निर्णय कशासाठी घेण्यात आला असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकारात्मकतेला दूर ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दररोजच्या जगण्यात आपल्याला अनेकदा नावडत्या बाबींचा सामना करावा लागतो. सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे आपल्या वागण्या-बोलण्यातही नकारात्मकता येऊ लागते. मात्र, सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम आपल्यातील नकारात्मकतेला दूर करा, समाधान आपोआप तुमच्या चेहऱ्यावर झळकू लागेल, असा असा मोलाचा सल्ला ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांनी आज दिला. एमजीएमच्या रुक्खिणी हॉलमध्ये उपस्थिताना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी ‘आयुष्याचा जमाखर्च’ या विषयाची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मांडणी केली. व्यासपीठावर राजयोगिनी संतोषदीदी, औरंगाबाद विभाग प्रमुख बी. के. मंगला व बी. के. शीला दीदी उपस्थित होत्या.
सध्या कलीयुग सुरू आहे आणि आपल्याला सतयुगात जायचे आहे. त्यासाठी फार मोठ्या गोष्टी, त्याग करण्याची गरज नाही, शिवानी दीदी म्हणाल्या. ‘सकाळी उठल्यापासून आपला सामना सकारात्मक आणि नकारात्मक बाबींशी होत असतो. आपल्याला त्यातून काय घ्यायचे आहे, हे आपण ठरवायचे. त्यातून आपण कलीयुगातच राहणार की सतयुगात येणार हे ठरणार आहे. एखाद्याने तुमच्याबद्दल चांगले उद्गार काढले नाही तरी तुम्ही मात्र त्याच्याबद्दल चांगलेच बोला. तुमचे बोलणे हेच आशीर्वाद ठरत असतात. एक वाईट वागला म्हणून दुसऱ्यानेही तसेच केले तर तसे करणाऱ्यांचीच संख्या वाढत जाईल’, असे शिवानी दीदी म्हणाल्या.

व्हॉट्सअप मेसेज डिलीट करा
मोबाइल ही आमच्यासाठी आज आवश्यक बाब झाली आहे, परंतु त्यावर दिवसभरात शेकडो, हजारो मेसेज अनावश्यकच असतात. इतरांची निंदा करणारे, इतरांवर विनाकारण बोचतील असे विनोद करणारे मेसेज, फोटो या मोबाइलवरून त्या मोबाइलमध्ये फिरत असतात. तेच ते मेसेज वाचून नकळतपणे आपले मनही तसा विचार करू लागते. अशा कोणताही उपयोग नसलेल्या गठ्ठ्याने येणाऱ्या मेसेजना न बघताच डिलीट करा. तुमच्या मनाला काही प्रमाणात शांतता मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गौताळ्यात बुधवारपासून होणार प्राणीगणना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मेहरबान, साहेबान, कदरदान. वाचा हो, वाचा. आपल्या लाडक्या गौताळा अभयारण्यात येत्या १० मेपासून सलग दोन दिवस सकाळी अकरापासून पाणथळावर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाणार आहे. निसर्गप्रेमींना अभ्यासासाठी ही सुवर्णसंधी असेल.
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, नीलगाय, सायाळ अशा प्रकारे प्राणी प्रामुख्याने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. या प्राण्यांची गणना बुद्धपौर्णिमेच्या दिवशी केली जाणार आहे. त्यासाठी पाणी असलेल्या सर्व नैसर्गिक व कृत्रिम अशा पाणवठा परिसरात मचान उभारण्यात आले आहे. गणनेसाठी मचानावर सलग २४ तास बसावे लागते. त्यामुळे सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी काय काळजी घ्यावी, यासाठी वन विभागाने त्यांना खास मार्गदर्शनही केले आहे. औरंगाबादसह कन्नड, चाळीसगाव या ठिकाणी यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते.
वाढत्या तपामानामुळे अनेक कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहे. तहान भागविण्यासाठी या वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागू नये, यासाठी पाणवठ्यात खासगी टँकर्सद्वारे गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, गणनेसाठी मचाण उभारणे, पाणवठ्यात पाणी टाकणे, आदी कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. या गणनेतून वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ किंवा घट झाली, याचा अंदाज मिळणार असून एखादा नवीन वन्यजीव अभयारण्यात वास्तव्यास आल्यास तेही कळेल.

प्राणीगणनेची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी रानडुकर, लांडगा, कोल्हा, भेकड, सायाळ, रानमांजार, ससा व असंख्य प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळून आले होते. यावर्षी कोणते नवी प्राणी सापडतात का, याची उत्सुकता आहे.
- पी. व्ही. जगत, सहायक वन संरक्षक (वन्यजीव)

२०१६ची गणना
बिबटे : ७
तडस : १२
नीलगाय : ७०
काळवीट : ९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवरील वेगाला स्पीड गनची वेसण

$
0
0

औरंगाबाद : बीड बायपासवरून वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवत असताल तर आता सावधान. वाहनांच्या वेगावर आता स्पीड लेझर गनची नजर राहणार आहे. बीड बायपास रोडवर गुरुवारी या लेझर स्पीड गनची चाचणी घेण्यात आली. गांधेली फाटा ते लिंक रोड यादरम्यान तीन लेझर गन बसवण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत बीड बायपास रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ आहे. जड वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस उपायुक्त दीपाली घाटे यांनी लेझर गनची चाचणी घेतली. यावेळी एसीपी सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, ए. डी. जहारवाल, शिनगारे, पीएसआय अमोल सातोदकर, देवरे, नवघरे, शेख, इंद्रोले आदींची उपस्थिती होती.

स्पीडगनची वैशिष्ट्ये
- कॅमेरा रेंजच्या ५०० मीटरपासून टारगेट फिक्स असते
- १५० मीटर अंतरापर्यंत नंबर प्लेटचा फोटो उपलब्ध होतो
- लेझर गन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहनांचा वेग मोजू शकते
- प्रती तास ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा मोजता येते
- वाहनांचा चार बाय सहा आकाराचा रंगीत फोटो काढता येतो, त्यावर वेळ व तारीख नमूद असते
- स्वच्छ वातावरणात दोनशे मीटर अंतरापर्यंतचा फोटो काढता येऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर पालिकेला दोन कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदा, सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसेच महापालिकांच्या विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आले. यावेळी वैजापूर नगर पालिकेला ब वर्ग नगर पालिका गटात औरंगाबाद विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पारितोषिक दोन कोटी रुपयांचे आहे.
या कार्यक्रमाला गृह (शहरे) तसेच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्र सिंग हे उपस्थित होते. ‘महाराष्ट्रात आतापर्यंत चार लाख शौचालये बनविण्यात आली आहेत. आतापर्यंत २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व शहरे तसेच गावे हागणदारी मुक्त करुन यावर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारी मुक्त राज्य करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तो निधी, मदत देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वैजापूर नगर पालिकेने राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार तरुणाची ३५ हजारांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुचाकीस्वार तरुणाला खाली पाडून मारहाण करीत दोन दुचाकीस्वारांनी सोन्याची अंगठी व रोख पाच हजार लुबाडले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी सात वाजता सिडको- एन ३ परिसरात घडला. या प्रकरणी पसार दुचाकीस्वाराविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल आसाराम तळेकर (वय २३, रा. एन ४, सिडको) हे दुचाकीवरून मंगळवारी सायंकाळी सात वाजता घरी जात होते. यावेळी सतीष नागरे यांच्या घरासमोर पाठीमागून यामाहा दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी अतुलच्या पाठीवर बॅटने वार केला व दुचाकीला धक्का देत खाली पाडले. यानंतर अतुलला ठार मारण्याची धमकी देत त्याच्या हातात असलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख पाच हजार रुपये हिसकावून घेतले. ऐजव हिसकावल्यानंतर ते आरोपी यामाहा दुचाकीवरून (एम एच २० डी वाय ६५४९) पसार झाले. अतुलच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी उपजिल्हाधिकारी लाचप्रकरणी अटकेत

$
0
0

निवासी उपजिल्हाधिकारी लाचप्रकरणी अटकेत
म. टा. प्रतिनिधी, जालना
सॉफ्टवेअरमध्ये डाटा एंट्रीचे देयक देण्याकरिता तीन लाख रुपयांची लाच मागतिल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदारांनी त्यांच्या एजन्सीमार्फत जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वही मधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र एनआयसीच्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा इंट्री करण्याचे कंत्राट घेतले होते. सदर कामाचे देयक मिळविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी बजेट नसल्याचा कारण पुढे केले व 30 लाखाचा धनादेश देण्यासाठी पंधरा टक्के याप्रमाणे ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्याने इतवारे यांनी दहा लाखांचा धनादेश देतो ते वटवून त्यातून माझी टक्केवारी द्या. त्यानंतर मी तुमचे उर्वरित बिल मंजूर करतो, असे सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रार दाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान १३ एप्रिल रोजी जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जावुन लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता इतवारे तडजोडीअंती तीन लाख रुपये स्विकारण्यास तयार झाले व अतिक अहेमद शेखला बोलवून तक्रारदाराला लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले. १४ एप्रिल रोजी बचत भवन शासकीय निवास स्थान येथे सापळा रचला असता अतिकने सापळ्याची चाहुल लागल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. रितसर कायदेशीर प्रक्रिया व परवानगी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे व अतिक शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधिक्षक डि.डि. गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रविण मोरे, आजीनाथ काशीद, विनोद चव्हाण, अशोक टहरे, संतोष धायडे, प्रदिप दौंडे, संजय उदगिरकर, नंदु शेंडीवाले आदींनी पार पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images