Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ मराठवाडा संघाला विजेतेपद

$
0
0

मराठवाडा संघाला विजेतेपद
लोगो - अंधांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यजमान मराठवाडा संघाने शनिवारी अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात विदर्भ संघावर मात करून विजेतेपद पटाकावले. एमजीएम क्रीडा संकुलावर ही स्पर्धा झाली. अंध, अपंग प्रगती सोसायटी, ओंकार ब्लाईंड मेन्स इंडस्ट्रियल कॉपरेशन सोसायटी आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेत सहा विभागाचे संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाला ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि उपविजेत्या संघाला ८,००० रूपये व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे विविध वैयक्तिक बक्षीसांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी भारतीय अंध संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिस बेगचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याला ५,००० रूपये मानधन आणि स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवले. रोटरी क्लब ऑफ औरंगाबादच्यावतीने स्पर्धेदरम्यान खेळाडूंना पांढऱ्या १०० काठ्या भेट देण्यात आल्या. रोटरीचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी आयोजकांना या काठ्या सुपूर्द केल्या. बक्षीस वितरणाचे संचलन मानकेश्वर बडे यांनी केले, तर आभार मनोज सुरडकर यांनी मानले. याप्रसंगी आनंद वासे, पंकज मोहड, प्राचार्य डी. एन. गोडसे, गणेश सुरडकर, सुभाष कल्याणकर, डी. पी. जाधव, रमाकांत साटम, गजानन सोनवणे, शिल्पा राऊत यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा भाजपला दे धक्का

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर केंद्र आणि राज्यात सत्तेत सहकारी असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील संबंध सलोख्याचे होण्याऐवजी ताणले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने अधिवेशनात भाजपला चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यापुढे जात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सेनेच्या सर्व आमदारांना पाठवून पक्षाने आगामी निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिवसंपर्क अभियानातून मराठवाड्यात भाजपला धक्का देण्याचे तंत्र सेनेने स्वीकारले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत भाजपकडून ठोस भूमिका घेत नसल्याची भावना राज्यभर आहे. विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढून सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. तिकडे उत्तरप्रदेशात मात्र सत्तेवर आल्याबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. भाजपने मात्र याबाबत सावध पाऊल टाकण्याचे ठरवत विरोधक आणि सत्तेतील शिवसेनेला काहीच साध्य होऊ दिलेले नाही. दरम्यान सत्तेत राहूनही भाजपच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यातील अधिवेशनात राज्यात स्वतंत्र राहण्याची मागणी केली होती. त्यावेळी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचे संकेत दिले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत सेना - भाजपची युती झाली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्या पार्श्वभूमीवर जर मध्येच निवडणूक लागलीच तर आपली संपूर्ण तयारी राहावी या उद्देशाने सेनेने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेचे सर्व आमदार शनिवार आणि रविवार मराठवाड्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत बैठक होणार असून त्यानंतर ठाकरे पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्ती झाली नाही तर लढाई अटळ: उद्धव

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। औरंगाबाद

'शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही तर लढाई अटळ आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा अंत म्हणजे आपल्या सर्वांचाच अंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत कुणी पाहू नये असे म्हणत ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून औरंगाबादमधून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 'मी कर्जमुक्त होणार' हे आंदोलन राबविण्यात येत असल्याचेही ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवेसना संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाद्वारे 'मी कर्जमुक्त होणार' ही संकल्पना राबविणार असल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्ग उभारला जात असेल तर त्याला शिवसेनेचा विरोध राहील अशी भूमिकाही ठाकरे यांनी यावेळी मांडली. 'शेतकऱ्यांनी जमीन द्यायची नाही' अशी भूमिका घेतली तर त्याला आमचा पाठिंबा असेल असेही ठाकरे म्हणाले.

तूर खरेदीबाबतच्या अटी शिथिल करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सागितल्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही लक्ष्य

विरोधी पक्षांनी राज्यभरात काढलेल्या यात्रेवर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. सध्या राज्यात यात्रेचे पेव फुटले असून, विरोधी पक्षात गेल्यानंतर काहीजणांना शेतकऱ्यांचे दु:ख दिलू लागले आहे अशी टीका ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली आहे.

भागवत त्यांनी राष्ट्रपती होण्यास हरकत काय?

आरएसएसचे प्रचारक राज्यपाल होत आहेत, अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होण्यास काय हरकत आहे ? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भागवत यांना आपल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथनगर उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकनाथनगर रेल्वे क्रॉसिंग बंद करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन सुमारे १२ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. महापालिकेने शाहशोक्तामिय दर्ग्याजवळ नाल्यावर पूल बाधून निर्लेप कंपनीपर्यंत रस्ताही तयार करून दिला आहे. निर्लेप कंपनीच्या बाजुला रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार होता, मात्र त्यासाठी ४५ लाख रुपये कोणी भरायचे, यावरून एमआयडीसी आणि महापालिका यांच्या वाद सुरू झाला आणि पूल रखडला.
एकनाथनगर येथील रेल्वे क्रॉसिंग (क्रमांक ५३) येथे रोज वाहनांची गर्दी होते. सातारा गाव, एमआयटी आणि इतर संस्थांकडे एकनाथनगर भागातून वाहने जातात. दिवसभरातून अनेकदा रेल्वे क्रॉसिंग बंद करावी लागते. यामुळे एकनाथनगरात वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. गेट उघडे झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागतो. कांचनवाडी, नक्षत्रवाडीला जाण्यासाठी वाहनधारकांना रेल्वे स्टेशनच्या बाजुच्या उड्डाणपुलावरून महानुभव चौकातून जावे लागत आहे. याशिवाय अनेक वाहनधारकांना शहानूरवाडीच्या (संग्रामनगर) रेल्वे उड्डाणपुलावरून जावे लागत आहे. यामुळे दोन्ही उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होत असते.
औरंगाबाद शहरातून साताऱ्याकडे जाणाऱ्या चार रस्त्यापैकी एकनाथ नगर हा एक पर्यायी मार्ग आहे. एकनाथनगरातून बीड बायपास ओलांडल्यावर थेट सातारा गावात जाता येते. यामुळे रेल्वे क्रॉसिंग बंद करून रेल्वे उड्डाणपुल बांधल्यास वाहनधारकांची सोय होणार आहे. हा उड्डाणपुल तयार करण्यासाठी रेल्वे विभागाकडे सर्वेक्षणासाठी ४५ लाख रुपये जमा करायचे आहेत. हे पैसे कोण भरणार? या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या पुलाच्या कामासाठी मध्यंतरी प्रयत्न केला होता. एमआयडीसीने उड्डाणपुलासाठी पैसे भरावेत, अशी सूचना केली होती, मात्र रेल्वे स्टेशन एमआयडीसी हा परिसर औद्योगिक महामंडळाने महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. यामुळे पैसे भरण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली आहे.
महापालिकेने रेल्वेकडे पैसे न भरल्याने या पुलाचे काम अजूनही सुरूच झालेले नाही. यामुळे वाहनधारकांना रेल्वे क्रॉसिंगच्या अवघड परीक्षेतून दररोज मार्ग काढावे लागत आहे.

सातारा-देवळाईकडे जाण्यासाठी...
- शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग ः उड्डाणपूल करणे शक्य नाही. त्यामुळे रेल्वे येताना-जाताना या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडी होते.
- संग्रामनगर उड्डाणपूल ः सातारा परिसर, एमआयटी कॉलेज, श्रीयश कॉलेज, कमलनयन बजाज हॉस्पिटलकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर करण्यातय येतो. उड्डाणपुलावर गर्दी असते.
- एकनाथनगर क्रॉसिंग ः उड्डाणपूल नसल्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडी होते. पीर बाजारा ते रेल्वे क्रॉसिंग हा रस्ता अरूंद आहे. रस्त्यावर मोठे वाहन आल्यास हामखास वाहतूक कोंडी.
- रेल्वे स्टेशन उड्डाणपूल ः कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बिडकीन, पैठणकडे जाणाऱ्या वाहनांची पुलावर वर्दळ. वाळूजकडे जाण्यासाठीही या पुलाचा वापर. त्यामुळे पुलावर कायम गर्दी

एकनाथनगर उड्डाणपूल उभारल्यास...
- सातारा गाव, एमआयटी कॉलेज, श्रीयश कॉलेज, कमलनयन बजाज हॉस्पिटल, सुधाकरनगरकडे जाण्यासाठी विनाअडथळा पर्याय.
- संग्रामनगर उड्डाणपुलावरील गर्दी कमी होण्यास मदत. पर्यायाने शाहनूरमिया दर्गा चौकातील वाहतुकीवरील ताण कमी होईल
- हा उड्डाणपूल निर्लेप कंपनीपासून रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील रस्त्यापर्यंत असेल.
- पुलामुळे अरुंद रस्ता असलेल्या नागरी वसाहतीतून जाणे टळेल.

रस्त्याची सद्यस्थिती
- बीड बायपास ते निर्लेप कंपनी हा रस्ता महापालिकेने तयार केला आहे.
- निर्लेप कंपनीसमोरून लोहमार्गावर उड्डाणपूल उभारणे प्रस्तावित आहे.

एकनाथनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शहरवासीयांचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसी असो की महापालिका यांनी जनतेचा अंत पाहू नये. लवकरात लवकर या उड्डाणपुलाच्या कामाबाबत प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा शिवसेनेला आंदोलन उभारवे लागेल.
- नंदकुमार घोडेले, सदस्य, रेल्वे उपभोक्ता समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विशाखा’विषयी जनजागृती आवश्यक

$
0
0

म. टा. प्र्रतिनिधी, औरंगाबाद
महिलांचा कामाच्या ठिकाणी ‌‌होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेणारी विशाखा समिती प्रत्येक आस्थापनेमध्ये असावी, मात्र केवळ कायद्यावर काम करून समस्या सुटणार नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम होणे अतिशय आवश्यक आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या ट्रस्टने असं‌घटित महिला कामगारांचे घेतलेले सर्वेक्षण ‘महाराष्ट्र टाइम्स’ने कामगार दिनी प्रसिद्ध केले होते. या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया देताना रहाटकर म्हणाल्या, ‘कायद्याने एका दिवसात बदल होणार नाही. ही संथ प्रक्रिया असून, सातत्याने काम केल्यावरच जनजागृती होईल. पुरूषप्रधान मानसिकतेवर संस्‍कारांची गरज आहे.’

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ प्रतिबंध ह्या कायद्यातील तरतुदीनुसार असंघटित क्षेत्रातील महिलांनाही त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याची तरतूद केली आहे. शासकीय पातळीवर अनेक स्तरावर या कायद्याच्या जाणीवजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात असले, तरी हे प्रयत्न असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी होताना दिसून येत नाही. महिन्यातून किमान दोन वेळा स्थानिक समिती सदस्यांची बैठक असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी आयोजित केली जावी.
- रेणुका कड, समन्वयक, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट

दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ठिकाणी महिलांना थेट स्‍थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवता येते. अनेकदा महिला आमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत, म्‍हणून नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी भागासाठी मुख्याधिकारी किंवा उपमुख्याधिकारी व महानगरपालिकेसाठी वॉर्ड अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून आपल्‍या कार्यक्षेत्रातील अशा लहान आस्‍थापनेतील लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारतील. प्रशासकीयस्तरावर या महिलांच्या सुरक्षेबाबत वारंवार प्रयत्न केले जातील, मात्र यासाठी व्यापक जनजागृती अतिशय आवश्यक आहे.
- मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधिकारी, विशाखा समिती

असंघटित महिला वर्गापर्यंत विशाखा कायदा पोचला नाही, हे मान्यच करावे लागेल. केवळ यंत्रणाच नव्हे, तर कामगार संघटना म्हणून आम्ह‌ी कमी पडलो, असेही म्हणावे लागेल. आम्ही कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधतो व त्यांना कायद्याची माहिती देतो. सर्वेक्षणामुळे स्पष्ट होते की, पुरूषप्रधान व्यवस्थेमध्ये स्‍त्री दबावात असते. असंघटित क्षेत्रामध्ये न्याय मिळत ना‌ही. दुसरीकडे संघटित क्षेत्रातील उच्‍चशिक्षित महिलांना कायदा माहिती असला तरी त्यांनाही न्याय मिळतोच असे नाही.
- राम बाहेती, कामगार नेते

विशाखा कायदा अजून सर्वसामान्यांपर्यंत पोचला नाही, हे मान्यच करावे लागेल. यासाठी आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे. आम्ही नुकतेच सर्व विद्यापीठांमध्‍ये जनजागृती कार्यक्रम घेतले. आता सहज दिसणाऱ्या ठिकाणी सोप्या शब्दांमध्ये फलक लावण्याचा प्रयत्न आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण राज्यात श्रृतिका प्रसारित होतील. या नभोनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येईल. याशिवाय स्‍थानिक तक्रार निवारण समितीपर्यंत असं‌घटित क्षेत्रातील महिलांच्या तक्रारी पोचाव्या म्हणून नोडल ऑफिसरची नियुक्त करण्यात आली असून मुंबई व मराठवाड्यामध्ये तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यामुळे अगदी मनेरगा मजूर काम करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलेसही यंत्रणेपर्यंत पोचता येईल.
- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडच्या केंद्रांवर ‘नीट’ सुरळीत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नांदेड

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी सुरळीत पार पडली. नांदेड केंद्रांतर्गत या वर्षी पहिल्यांदाच परीक्षा झाली. नांदेड शहरात ३४ आणि मुदखेड येथील एक अशी एकूण ३५ परीक्षा उपकेंद्र निश्चित करण्यात आली होती. परीक्षेसाठी सुमारे १३ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
नांदेड केंद्रांतर्गत या परीक्षेसाठी सुमारे १३ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १३ हजार ६६८ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहीले. परीक्षेसाठी प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त, परीक्षा साहित्याच्या सुरक्षेसाठी तसेच तिच्या वाहतुकीसाठी पुरेशा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या परीक्षेसाठी आसपासच्या जिल्ह्यांतूनही विद्यार्थी आले होते. त्यामुळे, शनिवारी सायंकाळपासूनच शहरामध्ये गर्दी दिसून येत होती. रविवारी सकाळपासून परीक्षा केंद्रांचा शोध आणि वेळेत पोहोचण्याची धडपड असे चित्र सर्वच भागांमध्ये दिसून येत होते.
प्रशासनाकडून अत्यावश्यक बाब म्हणून आरोग्य पथके, परीक्षा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा राहील यासाठीचे नियोजन, वाहतुकीसाठी पुरेशा शहर वाहतूक बस, परीक्षा केंद्रांवरील पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल आठ जून रोजी जाहीर होणार आहे.
सुरुवातीला मराठवाड्यामध्ये ‘नीट’साठी औरंगाबाद हे एकच केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नांदेड हे केंद्र देण्यात आले. या निर्णयाचा फायदा झाल्याची भावनाही व्यक्त करण्यात येत होती.


‘मार्केटिंग’चे सर्व फंडे
‘नीट’साठी शहरामध्ये विविध भागातून विद्यार्थी आले असताना, खासगी शिकवणीवाले, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मार्केटिंगची एकही संधी सोडली नाही. खासगी कोचिंग क्लासच्या चालकांनी विद्यार्थ्यांसोबत फोटो काढून, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावले होते. तर काहींनी आपल्या प्रयत्नांमुळेच नांदेडला केंद्र मिळाल्याचा दावा केला होता. विद्यार्थी-पालकांसाठी काही जणांनी केंद्राजवळ फराळाची व्यवस्था केली होती. यामध्ये काही इंग्रजी शाळांचाही सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकमारू टेकडीजवळ सापडला मृत बिबट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
अजिंठ्याच्या डोंगररांगात असलेल्या शिरसाळा तांडा येते सात वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत सापडला. येथील शेकमारू टेकडीजवळ हा बिबट्या शनिवारी पाण्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे.
जंगलातील पाणी आटल्याने वन्य प्राण्यांचा शेतांमध्ये मुक्त संचार वाढला आहे. अंभई परिसरातील जनसा भागात शुक्रवारी बिबट्या दिसला होता. हा बिबट्या तोच असण्याची शक्यता आहे. या भागातील बिबट्याची संख्या कमी होत असतांना बिबट्या मृत झाल्याने खळबळ उडाली आहे. सिरसाळातांडा हे गाव सोयगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येते. या भागात कायम वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. उन्हाळ्यात जंगलातील पाणवठ्यात मुबलक प्रमाणात पाणी टाकले, तर वन्य प्राणी तहान भागेल यासाठी वनविभागाने कायम पाणी ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार अब्दुल सत्तार, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी काळे, वनपाल खरात, वनरक्षक कोळी, रामेश्वर साळवे यांनी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यंनी शवविच्छेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा केंद्रांबाहेर‘एनडीए’साठी स्टॉल्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेशासाठी रविवार औरंगाबादेत विविध पाच केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. याच विद्यार्थ्यांना हेरून ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण; तसेच तयारी करून घेणाऱ्या विविध संस्थांनी परीक्षा केंद्राबाहेर स्टॉल्स लावले होते.
‘संस्थेजवळ केवळ क्रीडांगण, स्वीमिंग टँक, अश्वारोहण म्हणजे एनडीएला प्रवेश नव्हे, बारीक कटिंग करणे म्हणजे एनडीएला प्रवेश नव्हे’ अशा आकर्षक मथळ्यासह विविध ‌सहा ते सात अॅकॅडमीचालकांचे स्टॉल परीक्षा केंद्रावर लावण्यात आले होते. परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींच्या पालकांना भेटून आपली अॅकॅडमी दुसऱ्यांपेक्षा कशी वेगळी आहे, या विषयीची माहिती स्टॉलवरील लोक देत होते. या अॅकॅडमीचालकांनी आकर्षक माहितीपत्रकही तयार केले होते. एनडीएशिवायही संरक्षण दलात अधिकारी, मर्चंट नेव्ही, इंजिनिअर, डॉक्टर, पायलट होण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याचा दावाही या अॅकॅडमी चालकांनी माहितीपत्रातून केलेला होता. प्रत्येक स्टॉलवरून ५० ते १५० पालकांनी चौकशी केली असल्याचे स्टॉलवरील प्रतिनिधींनी सांगितले. औरंगाबाद शहरासह इतर जिल्ह्यांतील अॅकॅडमी चालकांनीही येथे स्टॉल्स लावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोठडीतील मृत्यूप्रकरणात ‘पीआय’सह तिघांवर गुन्हा

$
0
0



परभणी : पोलिसांनी कोठडीमध्ये केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक एम. ए. रौफ यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परभणी पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात वाहन चोरी प्रकरणातील संशयीत आरोपी म्हणून पकडून आणलेल्या समशेर खान समीर खान पठाण (३७, रा. मदीना पाटीजवळ) याचा २५ डिसेंबर २०१६ रोजी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. त्यानुसार तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक भुमन्ना आचेवाड यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ मोहंमद बशीर, पोलिस हवालदार तुळशीराम एकनाथराव देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल अब्दुल मुश्ताक अब्दुल मजीद शेख यांची चौकशी केली. यामध्ये युवकाला मारहाण झाल्याचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निष्पन्न झाले होते. शिवाय, त्या युवकावर कुठल्याही ठाण्यात कसल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नव्हता. तसेच त्याला गुन्ह्याची कबुली दे म्हणून जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक आचेवाड यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२, ३३१, ४४८, ३४ भादंविनुसार नानलपेठ पोलीस ठाण्यातच गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास औरंगाबाद सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर करीत आहेत.
ही घटना घडल्यानंतर, परभणी शहरामध्ये दोन दिवस तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मारहाणीमध्येच समशेर खानचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, पोलिस ठाण्याजवळ जमावही जमला होता. दोषींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावाने दगडफेक केली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता. परिस्थितीतील गांभीर्य लक्षात घेऊन, समशेर खानच्या पार्थिवाचे नांदेडमध्ये शवविच्छेदन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२८५ वीज थकबाकीदारांना ‘शॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरण औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. बिले न भरणाऱ्या १ हजार २८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्याच्याकडे १ कोटी १६ लाख ९४ हजार रुपये थकित आहेत. या मोहिमेत महावितरणने १ हजार १०४ वीज ग्राहकांकडून १ कोटी १३ लाख ६७ हजार रुपये वीजबिलापोटी वसूल केले.
औरंगाबाद शहर मंडळांततर्गत वीज बिले न भरणाऱ्या ५६३ ग्राहकांचे कनेक्शन तोडले. त्यांच्याकडे ६८ लाख १४ हजार रुपये थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊन, नोटीस बजावूनही दखल न घेणाऱ्या १२ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केला. त्यांच्याकडे ६ लाख ३१ हजार रुपये थकित आहेत. त्याचबरोबर ५९१ ग्राहकांकडून ९८ लाख ६२ हजार रुपये वीज बिल वसूल करण्यात आले.
औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत १०८ ग्राहकांचा ४ लाख ३६ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला. वारंवार सूचना देऊन, नोटीस बजावूनही बील न भरल्याने १५ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केला. त्यांच्याकडे ९८ हजार रुपये थकित आहेत. महावितरणने १७२ ग्राहकांकडून ४ लाख ९१ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले.
जालना जिल्ह्यात बिले न भरणाऱ्या ६१४ ग्राहकांचा ४४ लाख ४४ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला. वारंवार सूचना देऊन, नोटीस बजावूनही दखल न घेणाऱ्या एका ग्राहकाचा वीजपुरवठा २३ हजार रुपये थकबाकीसाठी कायमस्वरुपी खंडित केला. त्याचबरोबर ३४१ ग्राहकांकडून १० लाख १४ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले.

...तर कठोर कारवाई
थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या परस्पर कनेक्शन जोडून घेतल्याचे प्रकार घडतात. असे करणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३नुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकला प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंजिनीअरिंग क्षेत्रात देशपातळीव आलेली मरगळ पाहता बारावीनंतर विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगपेक्षा मेडिकलला अधिक प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) आज घेण्यात आली. औरंगाबाद केंद्राहून २० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्याचवेळी याच केंद्राहून जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार होती.
करिअरबाबत विद्यार्थी जागरूक झाले आहेत. सद्यस्थितीचा विचार करत विद्यार्थी दहावी, बारावीनंतर कोणते करिअर निवडायचे याचाही विचार करताना दिसतात. इंजिनीअरिंग आणि मेडिकल हे सुरुवातीपासून बहुतांशी विद्यार्थ्यांचे आवडीचे क्षेत्र, परंतु आता विद्यार्थ्यांची आवड बदलत चालली आहे. मागील काही वर्षांत अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीच्या कमी झालेल्या संधीमुळे विद्यार्थी इंजिनीअरिंगपेक्षा मेडिकलकडे वळत असल्याचे चित्र आहे. रविवारी झालेल्या नीट परीक्षेच्या आकडेवारीहूनही पुन्हा हे समोर आले आहे. आयआयटीसह इतर अभियांत्रिकी कॉलेजांसाठी देशपातळीवर घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई-मेन) येत्या २ एप्रिलला देशभर घेण्यात आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या या परीक्षेला औरंगाबाद केंद्राहून १६ हजार विद्यार्थी बसले होते, तर आज झालेल्या ‘नीट’ला याच केंद्राहून २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मागील वर्षी राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आकडेवारीहून विद्यार्थी अभियांत्रीकी अभ्यासक्रमापेक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

प्रवेशातही अत्यंत चुरस
मेडिकल प्रवेशासाठी एका-एका गुणांसाठी स्पर्धा होते. त्यातुलनेत अभियांत्रिकीसाठी स्पर्धा तेवढी कठीण नाही. राज्यस्तरावर अनेक जागांवर अभियांत्रिकीचे प्रवेश होत नाहीत. गेल्या वर्षीही ६० हजारांपेक्षा अधिक अभियांत्रिकीच्या जागा रिक्त होत्या. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे चित्र मात्र यापेक्षा वेगळे आहे. एका-एका गुणांसाठीची स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागतो.

औरंगाबाद विभागातील परीक्षा
नीट............................२० हजार परीक्षार्थी
जेईई-मेन.......................१६ हजार परीक्षार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव वाहनांची शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी दाखल झालेल्या तीन स्पीड गनमुळे अनेक भरधाव वाहनांना ब्रेक लागला आहे. बीड बायपास रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शंभरपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई केल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी‘मटा’शी बोलताना दिली.
बीड बायपासवरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जड वाहनांवर दिवसभर बंदी घातली. ही बंदी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विनंतीवरून काही प्रमाणत शिथिल करण्यात आली. नूतन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बीड बायपासवरील जड वाहनांना प्रवेश बंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांनी या रस्त्यावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांना ब्रेक लावण्यासाठी तीन स्पीड गन तैनात केल्या आहेत. त्यांची पोलिस अधिकाऱ्यांमार्फत गुरुवारी चाचणी घेण्यात आली. गांधेली फाटा ते लिंक रोड या दरम्यान तीन ठिकाणी स्पीड लेझर गन बसविण्यात आल्या आहेत. बीड बायपास रोडवर वाहनांची वेग मर्यादा ताशी ४० किलोमीटर आहे. त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या शंभरपेक्षा जास्त दुचाकी, चार चाकी आणि जड वाहनांवर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या एका वाहनाला एक हजार रुपये दंड ठोठविण्यात आला. पोलिसांनी तीन दिवसांत एक लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा केला. या आदेशामुळे बीड बायपास रोडवरील वाहनांच्या वेगाला लगाम बसला आहे. शहरात शनिवारी अचानक ‘ऑल अलर्ट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या पद्धतीचे ऑपरेशन शहरात पहिल्यांदाच राबवण्यात आले. आगामी काळात महिन्यातून दोन ते तीन वेळेस ही मोहीम हाती घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. या मोहिमेत ७५० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या भावाचा भाज्यांना तडका

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
वाढत्या उन्हामुळे आवक घटल्याने शहरात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्व भाज्या सरासरी ८० ते ९० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. गवार व ठराविक भाज्यांनी तर नव्वदी गाठली आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची औरंगाबाद तालुका व जिल्ह्यातून भाज्यांची आवक एकदम घटली आहे. शिवाय गेल्या आठवड्यात नाशिकहूनही आवक कमी झाली. याचा परिणाम काही फळभाज्या ७०ते ८० रुपये किलो, काही ९० रुपये, तर पालेभाज्या १५ रुपये जुडी यादराने विकल्या जात आहेत. नाशिक, यावल, अहमदनगर, सिल्लोड, खुलताबाद आदी भागातून आवक उन्हामुळे मंदावली आहे. यामुळे हिरवी मिरची, फ्लॉवर, शिमला मिरची, भेंडी, टोमॅटोचे भाव वाढले आहे. एक किलो शिमला मिरची, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, कारल्यासाठी सरासरी ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहे. औरंगाबाद शहरात आजूबाजूच्या गावातून भाजीची आवक सुरू असली तरी ती तुरळक आहे, असे भाजीविक्रेते सांगत आहेत.
किरकोळ बाजारात औरंगपुरा येथे भाज्या गेल्या आठवड्यात ३० ते ४० रुपये किलो होत्या. शुक्रवारपासून किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपयांवर दर आले. काही ठिकाणी ४० रुपये किलो असलेल्या भाज्यांचे भाव ६० ते ७० रुपये तर, ५ ते १० रुपये जुडी असलेल्या पालेभाज्यांचे भाव १५ ते २० रुपयांवर पोहोचल्या आहेत. भाजी विक्री गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने घटल्याने भाव कडाडले आहेत, असे सिडको एन-३ स्थित संत सावता भाजी सेंटरचे जर्नादन जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनरेगा’ची मरगळ हटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मजुरांची कागदावरची संख्या, मस्टर, जॉबकार्डमध्ये गोंधळ, उशिरा देण्यात येणारी मजुरी; तसेच अपूर्ण कामांमुळे मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मरगळ कायम आहे. विभागात योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कामावरील मजूरांची संख्या वाढली असली, तरी मात्र गेल्या महिन्याभरापासून साडेसहा हजारापैकी केवळ १२८२ ग्रामपंचायतींमध्ये मनरेगाची कामे सुरू आहेत.
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लोकांच्या हाताला ‌काम देण्यासाठी मनरेगा योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे प्रयत्न विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सुरू केले. यासाठी आयुक्तांच्या आदेशाने मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ६ ते १२ मार्चदरम्यान मनरेगा सप्ताह राबवण्यात आला, मात्र त्यानंतरही कामामधील कासवगती कायम आहे. यामुळे विभागीय आयुक्तांच्या आवाहला अधिकाऱ्यांनी खो दिल्यामुळे मराठवाड्यात योजनेची मरगळ कायम आहे. मनरेगा सप्‍ताह सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यात १७ हजार मजूर काम करत होते, तर सप्‍ताहानंतरच्या तीन आठवड्यात प्रशासनाला केवळ ८८१ कामे जास्तीची सुरू करण्यात यश आले. आता दोन महिन्यांनंतर मजुरांचा आकडा दीड लाखांवर पोचला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, मात्र आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर अचानक वाढलेला मजुरांचा आकडा हा कागदोपत्री आहे, की प्रत्यक्ष हा संशोधनाचा विषय ठरेल.

पावसाळ्यात मजूर संख्येवरही परिणाम
विभागीय आयुक्तांच्या बैठकानंतर मनरेगावरील मजुरांची संख्या दीड लाखांवर पोचली असली, तरी येत्या काही दिवसांत पाऊस सुरू होईल. त्यामुळे मजूरसंख्येचा हा आकडा येणारा महिनाभर कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. त्यानंतर पुन्हा त्यात घट होईल.

मराठवाड्यात कोट्यवधींचा खर्च
दुष्काळाने नेहमीच होरपळणाऱ्या मराठवाडयात मनरेगासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. २०१६-१७साठी विभागात हा खर्च ४६० कोटी रुपयांवर गेला होता, मात्र यावर्षी मजुरी अदा करण्याचे प्रमाण केवळ २१.८० टक्के आहे. पूर्ण कामांची टक्केवारीही केवळ ६२ टक्के आहे.

दोन दिवसांत वाढले ५० हजार मजूर?
मार्च महिन्यामध्ये मनरेगा योजनवेर केवळ १७ हजार मजूर काम करत होते. एप्रिलमध्ये ही संख्या ५० हजार झाली, या संख्येत १ मे रोजी वाढ होऊन संख्या १ लाख ४० हजारांवर पोचली. त्यानंतर केवळ दोनच दिवसांमध्ये योजनेवरील मजूरसंख्या तब्बल ५० हजारांनी वाढले ३ मे रोजी मजुरांची संख्या १ लाख ५४ हजार असल्याचा दावा सरकारी अधिकारी करतात.

मराठवाड्याची स्थिती
जिल्हा.............सुरू असलेली कामे......मजूर उपस्थिती
औरंगाबाद.................७०५....................८२५६
जालना.......................४०६....................९८०२
परभणी......................६४८....................६०४०३
हिंगोली......................१६७.....................३१८५
नांदेड........................६७३....................१०६४१
बीड..........................१९८२...................३५६९६
लातूर........................१७६१...................२१२८९
उस्मानाबाद...............६३४.....................५१६२
एकूण........................६९७६..................१५४३९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षीप्रेमींना मातीची भांडी भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पक्ष्यांना दूरवर भटकंती करावी लागते. पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो. या परिस्थितीत प्रत्येकाने घराच्या परिसरात मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास पक्ष्यांना आधार मिळू शकतो. हा विचार कृतीत उतरवण्याचे काम पक्षीमित्र रमेश राऊत करीत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी पक्ष्यांबद्दल विशेष आस्था असलेल्या पक्षीप्रेमींना मातीची पसरट भांडी भेट दिली.
पक्षीमित्र रमेश राऊत पक्ष्यांच्या अन्नासाठी ते नेहमी विविध उपक्रम राबवतात. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मातीची भांडी वाटप केली. या उपक्रमाची सुरुवात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात डॉ. महेश शिवणकर व प्रशासकीय अधिकारी शोभा परांजे यांना मातीचे भांडे देऊन झाली. मागील आठ वर्षांपासून राबवलेल्या उपक्रमाचे शिवणकर यांनी विशेष कौतुक केले. ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राऊत यांनी हा उपक्रम हाती घेतला. उन्हाळ्यात पाणी व अन्न टंचाई असते. पक्ष्यांना टंचाईचा सामना करताना भटकंती करावी लागते. पाणी नसल्यास पक्षी मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर मातीच्या भांड्यात पाणी टाकून भांडे छत, बाल्कनी किंवा अंगणात सावलीत ठेवल्यास पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होते. पक्ष्यांबद्दल आस्था असलेल्या शंभर व्यक्तींना राऊत यांनी भांडी दिली. या उपक्रमाला प्राचार्य डॉ. खान, डॉ. गोविंद संगवई, प्रा. श्रीकांत शिराळकर, पुष्पा झाल्टे, भावना रसाळ, गंगाधर जमधडे, रामचंद्र पाठक, राजीव भास्कर, योगेश रामगिरवार, किशोर गायकवाड, अभिजीत कुमावत आदी उपस्थित होते.

मोलाचा आधार
मातीच्या पसरट भांड्यातून पाणी पिणे पक्ष्यांना सहजशक्य असते. या भांड्यात दररोज पाणी टाका आणि दोन दिवसाला न चुकता भांडे स्वच्छ करा, असे आवाहन पक्षीमित्र राऊत यांनी केले आहे. पक्षी संवर्धन करताना राऊत यांनी वेगळा संकल्प राबवत जागृतीचे काम केले. मातीचे भांडे शेकडो पक्ष्यांसाठी मोलाचा आधार ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमुक्तीसाठी सत्तेवर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेना सुरवातीपासून आग्रही आहे. विरोधी पक्षांनी नंतर मागणी केली. सत्तेत असूनही आम्ही शेतकरी हिताला प्राधान्य दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वी विधानसभेत कर्जमुक्तीबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. खरीप हंगाम सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. शेतकरी कर्जमुक्तीबद्दल लवकरात लवकर निर्णय घेतला गेला नाही, तर लढाई अटळ आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.
शिवसेनेच्या आमदारांनी दोन दिवस मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले,‘४ वर्षांनंतर मी पुन्हा शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. सध्या राज्यात यात्रांचे पेव फुटले आहे. तशा प्रकारची आम्ही मोहीम नाही. शिवसेनेचे पदाधिकारी मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करत आहेत. त्याचा आढावा अभियानातून घेण्यात आला. ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तेथील भागाची चर्चा होते. काय करायल हवे यासंदर्भात सूचना आल्या. विशेष म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी हे अभियान राबविले गेले. अभियनाची सुरवात मराठवाड्यातून केली, पण पुढे राज्यभर अभियान राबविले जाईल.’
‘शेतकऱ्यांचा अंत कुणी पाहू नये. अन्नदात्याचे होणारे हाल थांबविण्याची गरज आहे. पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षाच केली होती. आता आम्ही सत्तेत सहभागी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आमचा आग्रह आहे. शेतकरी कर्जमुक्ती हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वप्रथम शिवसेनेने मागणी केली. त्यानंतर विरोधक जागे झाले. अर्थात ते इतकी वर्षे सत्तेत होते पण त्यांना जमले नाही. आता आपले सरकार असल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. शेतकरी हितासाठी कुणीही सोबत आले तर त्यांचे स्वागत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी मला दिल्लीत येण्याची विनंती केली. आम्ही दिल्लीत गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कर्जमुक्तीबाबत निवेदन केले. सकारात्मक पाऊस असल्याचे पाहून आम्ही गप्प बसलो. महिना उलटून गेला तरी काहीच हालचाल झालेली नाही. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांना लागवड व मशागतीसाठी पैसा लागणार आहे. पूर्वीचे कर्जच माफ झालेले नाही. त्यात नवीन कर्जाचा डोंगर करून घेणे म्हणजे परिस्थिती आणखी बिघवण्यासारखे आहे. शिवसेनेला हे अजिबात मान्य नाही. महाराष्ट्रातील शेतकरी लवकरात लवकर कर्जमुक्त झाला पाहिजे. मागेल त्याला कर्ज देण्याची घोषणाही फोल ठरली. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शिवसेना त्यांच्या सोबत आहे. मराठवाड्यातील अहवालानंतर आम्ही राज्यभर ‘मी कर्जमुक्त होणारच’ ही संकल्पना राबविणार आहोत. त्याची दिशा आठवडाभरात स्पष्ट केली जाईल,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमुक्ती प्रश्नी जर सरकारमध्ये निर्णय झाला नाही तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार काय? असे विचारले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले,‘मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून आम्ही एक महिना वाट पाहिली. अजूनही वेळ गेलेली नाही. आता ताबडतोब शेतकरी कर्जमुक्ती जाहीर केली पाहिजे. तसे झाले नाही तर लढाई अटळ आहे.’

...तर काय हरकत आहे?
राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाला शिवसेनेला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नावही चर्चेत आहे. शिवसेना भूमिका बदलणार काय? असे विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले,‘हिंदूराष्ट्र संकल्पनेला आमचा कायम पाठिंबा आहे. राष्ट्रपतिपदी कणखर भूमिका घेणारी व्यक्ती असावी असे आमचे मत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राज्यपाल म्हणून जाऊ शकतात, तर भागवत यांनी राष्ट्रपती व्हायला काय हरकत आहे?’ असा सवाल उपस्थित करून त्यांनी त्यांना भागवतांच्या पाठिब्यांचा पुनरुच्चार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नीट’ परीक्षेसाठी शहरात आलेल्या विद्यार्थी व पालकांचे वाहतूक व्यवस्थेअभावी प्रचंड हाल झाले. शहर बस आणि रिक्षांची अपुरी संख्या असल्यामुळे परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी पायी चालत बसस्थानक गाठले. विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पालकांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात सावलीचा आसरा घेतला. हजारो विद्यार्थी असूनही पिण्याचे पाणी व वाहतूक व्यवस्था अभावानेच दिसली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश पूर्वपरीक्षा (नीट) रविवारी शहरात पार पडली. औरंगपुरा परिसरातील सरस्वती भुवन प्रशाला, शिशुविहार शाळा येथे परीक्षा केंद्र होते. या मध्यवर्ती भागात येण्यासाठी विद्यार्थी व पालकांना सकाळी प्रचंड धावपळ करावी लागली. रिक्षा आणि शहर बस नसल्यामुळे मिळेल त्या वाहनाने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. बुलडाणा, वाशिम, जळगाव, जालना, बीड या जिल्ह्यातील विद्यार्थी शनिवारी शहरात दाखल झाले होते. सकाळी साडेसात वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश असल्यामुळे अनेकजण रात्री उशिरापर्यंत शहरात आले. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात थांबून सकाळी सर्वांनी परीक्षा केंद्र गाठले. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल झाले. बसस्थानक गाठण्यासाठी अनेकजण रिक्षाची वाट पाहत होते. मात्र, रिक्षा नसल्यामुळे त्यांनी पायी जावे लागले. औरंगपुरा परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

माझ्या मुलाने मागील वर्षी नाशिक केंद्रावर ‘नीट’ परीक्षा दिली होती. यावर्षी भाची औरंगाबदला परीक्षा देत आहे. जळगाव केंद्र नसल्यामुळे इथे आलो. रात्री प्रवास करून सकाळी शहरात पोहचलो.
- सुभाष पाटील, भुसावळ

‘नीट’च्या परीक्षेची धास्ती वाटत होती; मात्र, पेपर एकदम चांगला गेला. परीक्षेची पूर्वतयारी केली असल्यामुळे उत्तरे सोडवताना अडचण आली नाही.
- प्रियंका सांगळे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. हेडगेवार पतसंस्थेत संस्थापक पॅनल विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
येथील डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रशांत कंगले यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक प्रगती पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी चेअरमन गोविंद धुमाळ व विद्यमान चेअरमन दामोदर पारीख यांच्या व्यापारी विकास पॅनलचा दुप्पट मतांनी पराभव केला.
या संस्थेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण २७५४ पैकी २२१६ मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पैठणचे सहायक निंबधक एस. ई. सोने यांनी काम पाहिले. त्यांना विजय राजपूत यांनी साह्य केले. चादर व इमारत नूतनीकरण कामात घोटाळा झाल्याच्या कारणावरून सभासदांनी दामोदर पारीख व गोविंद धुमाळ यांना नाकारल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणेः सर्व साधारण मतदार संघ-प्रशांत प्रभाकर कंगले (१५२०), भाऊसाहेब गणपतराव इंगळे (१४२७), रावसाहेब रंगनाथ मोटे (१३८८), सुभाष विनायकराव आव्हाळे (१३२४), प्रकाश भगवान बनकर (१२८२ ), शिवाजी मारुती भांडे (१२६३), मधुकर द्वारकादास नाईकवाडी (१२६२), केशव बाबा कदम (१२५७), महिला राखीव मतदार संघ- अंजलीबाई प्रमोद कंगले (१५११), मंगलबाई बाळासाहेब चव्हाण (१३६१),ओबीसी मतदार संघ- भगवान शंकर व्यवहारे (१२६९), अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- स्वानंद यशवंतराव चव्हाण (१३६१), विमुक्त जाती भटक्या जमाती शैलेंद्र गोकुळ खैरमोडे (१३८८),.
विद्यमान चेअरमन दामोदर पारीख, माजी चेअरमन गोविंद धुमाळ, संचालक विजय पोटे, घनश्याम आहुजा, जयवंत इंगळे, अनिल जोशी, के. के. मुळे या दिग्गजांचा पराभव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लातूर एक्स्प्रेस परळीपर्यंत?

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

मुंबई-लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत नेल्यावरून लातूर जिल्ह्यातील वातावरण तापलेले असतानाच, ही गाडी आता परळीपर्यंत नेण्यासाठी विचार होत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली. तर, याच मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सोमवारी सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत.
लातूर ते मुंबई प्रवासासाठी महत्त्वाची असणारी लातूर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा बिदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून, लातूर जिल्ह्यातील वातावरण तापले असून, जिल्ह्यातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हा विरोध सुरू असतानाच, आता ही गाडी बिदरऐवजी परळीपर्यंत नेण्याचा विचार होत आहे. वास्तवात, ही गाडी परळीपर्यंत नेण्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होत होती. याचाच विचार होत असल्याचे सांगण्यात येते. लातूरमधील असंतोषाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयात सोमवारी बैठक होत आहे. या बैठकीमध्येच रेल्वे परळीपर्यंत नेण्याच्या पर्यायावरही विचार होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
ही रेल्वे परळीपर्यंत नेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली. ‘रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची १६ एप्रिल रोजी भेट घेतली. त्यावेळी हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला होता. तसेच, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यांनीही पंधरा दिवसांपूर्वी प्रभू यांची भेट घेऊन बीडच्या रेल्वे बरोबरच लातूर एक्स्प्रेसच्या परळीपर्यंत विस्ताराचा मुद्दा मांडला होता. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते,’ याकडे डॉ. प्रीतम मुंडे यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, लातूर एक्स्प्रेस बिदरला नेण्याला विरोध करतानाच, ही रेल्वे परळीपर्यंत विस्तारीत करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासाठी ते सोमवारी सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत. सिकंदराबाद विभागामध्ये परळी वैद्यनाथ हे सर्वांत जास्त उत्पन्न देणारे स्थानक असून, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. मुंबईहून थेट रेल्वे नसल्यामुळे, भाविकांची गैरसोय होते. लातूर एक्स्प्रेस परळीपर्यंत आणल्यास त्याचा चांगला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई-लातूर-मुंबई या रेल्वेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असताना, ती बिदरपर्यंत वाढवण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच, परळी-मुंबई आणखी एक स्वतंत्र रेल्वे परभणी अथवा लातूरमार्गे सुरू करावी, परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम केवळ नगरच्या बाजूनेच होत आहे. ते परळीच्या बाजूनेही सुरू करून या कामाला गती द्यावी, या मागण्याही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांकडून परीक्षार्थींची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय अभ्यासक्रम राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) साठी मराठवाड्याच्या विविध भागातून शहरात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची रिक्षाचालकांनी लूट केली. बसस्थानक तसेच रेल्वेस्टेशनवरून अव्वाच्या सव्वा दर आकारून विद्यार्थ्यांची कोंडी केली.
शहरात रविवारी (७ मे) ‘नीट’ १० वाजेपासून सुरू होणार असली तरी सकाळी साडेसात पासूनच परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार होते. यामुळे शहराबाहेरचे बहुतांश मुलांनी शनिवारी रात्रीच औरंगाबाद शहर गाठून मिळेल त्या लॉजमध्ये मुक्काम केला. दरम्यान, सकाळी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसस्थानक तसेच रेल्वेस्टेशनपासून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ‌रिक्षावाल्यांनी मनमानी दर आकारले. रेल्वेस्टेशनवरून एन-९ येथील परीक्षा केंद्रावर येण्यासाठी शेअरिंग रिक्षामध्ये कुणाकडून ८० रुपये, तर कुणाकडून १२० रुपये आकारले. काही विद्यार्थ्यांना सेंटरची माहिती नसल्यामुळे आंबेडकरनगर ते बळीराम पाटील महाविद्यालय या हाकेच्या अंतरासाठीही विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० ते ३० रुपये घेतले. आम्ही बाहेरगावाहून आलो आहोत, किती दर आकारतात याची माहिती नाही त्यामुळे थोडे पैसे गेले तरी चालतील पण वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे महत्त्वाचे असल्यामुळे जादा दर द्यावे लागले, असे एका परीक्षार्थीने सांगितले.

सिडको चौकात जाम
दुपारी १ वाजता परीक्षा संपल्यानंतर सिडको बसस्थानकासमोर मोठा जाम लागला होता, विविध परीक्षा केंद्रांवरुन सिडको बसस्थानकापर्यंत रिक्षाने आलेल्या परीक्षार्थींना रिक्षावाले रस्‍त्यावरच सोडत होते. त्यामुळे, फूटपाथशेजारी रिक्षांची संपूर्ण रांग लागली होती. शिवाय बसस्थानकामध्ये झालेल्या गर्दीमुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरही रिक्षा, बस तसेच पादचाऱ्यांच्या गर्दीमुळे एकच कोंडी झाली होती.

परभणीहून एक दिवस आगोदरच औरंगाबाद शहरात आलो. रेल्वेस्टेशनपासून ते बळीराम पाटील महाविद्यालयापर्यंत माझ्याकडून शेअरिंग रिक्षामध्ये ७० रुपये आकारले. प्रत्यक्षात शेअरिंग रिक्षामध्ये ४० रुपये प्रतिसीट भाडे पडते. वेळेत पोचणे हे महत्त्वाचे होते.
-सदानंद घोडे, परीक्षार्थी

परीक्षेसाठी नांदेडवरून एक दिवस आगोदरच औरंगाबादला आलो. बळीराम पाटील महाविद्यालय सेंटर होते. रेल्वेस्टेशनवरील एका लॉजमध्ये आम्हा तिघांसाठी ५०० भाडे देऊन मुक्काम केला. सकाळी मात्र परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सकाळी रिक्षाचालकाने आंबेडकरनगर चौकापर्यंतच सोडले तेथून आम्हाला पुन्हा आंबेडकरनगर ते बळीराम पाटील केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतले. प्रत्यक्षात सेंटर अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
-अनिकेत भगत, परीक्षार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images