Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिसांच्या संयमाने उघडकीस आले रॅकेट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुन्हेशाखेच्या तीन कर्मचाऱ्यांना इंजिनीअरिंगचे पेपर सुरेवाडीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी सोडवले जात असल्याची माहिती मिळाली. मात्र, नगरसेवक सुरे यांची दोन घरे असल्याने ते पेचात पडले. त्यांनी संयम बाळगला. बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याने चक्क पोलिसांनाच लिफ्ट मागितली आणि रॅकेटचे बिंग फुटले.
गुन्हेशाखेचे पोलिस कर्मचारी योगेश गुप्ता, सिद्धार्थ ‌थोरात आणि लालखा पठाण यांना रात्री अकरा वाजता सुरेवाडी येथे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी इंजिनीअरिंगचा पेपर सामूहिकरित्या सोडवण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. मात्र, याची खात्री पटणेही आवश्यक होते. सुरे यांच्या घराची माहिती या कर्मचाऱ्यांनी घेतली. तर त्यांना दोन वेगवेगळे पत्ते मिळाले. पुन्हा हे कर्मचारी पेचात पडले. दोन्ही घरातील दिवे बंद होते. काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. हातातील माहिती सोडून देणे यांना पटत नव्हते. अखेर एक तासाने एका घरातून एक तरुण बाहेर पडला. पोलिसांनी त्याला अडवून ‘एवढ्या रात्री कुठे फिरतोस,’ अशी विचारणा केली. त्याने ‘आम्ही अभ्यास करतोय,’ असे सांगितले. या उत्तराने पोलिस कर्मचारी पुन्हा संभ्रमात पडले. त्यांनी पुन्हा त्या घरासमोर ठाण मांडले. अर्ध्या तासाने आणखी एक तरुण बाहेर पडला. तो बाहेरगावचा रहिवासी होता. त्याने चक्क या पोलिसांनाच लिफ्ट मागितली. त्याला लिफ्ट दिल्यानंतर त्याच्याकडून या कर्मचाऱ्यांनी बोलते करीत सगळी माहिती काढून घेतली.

...अन् शिरकाव केला
माहितीची खात्री पटल्याने सुरे यांच्या घरात पोलिसांनी शिरकाव केला. घरात शिरल्यानंतर आत विद्यार्थी पेपर सोडवताना आढळले. पीएसआय राजेंद्र बांगर यांना त्यांनी या घटनेची माहिती दिली. एसीपी रामेश्वर थोरात यांना माहिती ‌देण्यात आली. गुन्हेशाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे, पीएसआय विजय जाधव, सुभाष खंडागळे यांनी घटनास्थळ गाठले आणि या रॅकेट उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संप करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरांचा भाजीपाला, दुधाचा पुरवठा बंद झाल्यास हाहाकार उडेल, या भितीपोटी शेतकऱ्यांचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण, त्यास न जुमानत न्याय हक्कासाठी शेतकरी १ जूनपासून संपावर जाणारच, असा इशारा किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जूनपासून शेतकरी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बीड बायपास येथील कोहिनूर हॉल, पटेल लॉन्स येथे बुधवारी राज्यस्तरीय प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला राज्य समनव्यक विजय काकडे पाटील, जयाजी सूर्यवंशी, अॅड. प्रदीप देशमुख, सुभाष लोमटे, सुलभा मुंडे, पुणतांबा येथील धनंजय जाधव, धनंजय धोर्डे, नाशिकचे योगेश रायते, अॅड. प्रकाश पाटील, धर्मराज जगदाळे, विजय काकडे, अमृता पवार, प्रा. शिवाजी हुसे, शांताराम कुंजीर, शेख गुलाम अली यांच्यासह राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात येत्या आठ दिवसात सकारात्मक चर्चा करावी, अन्यथा नियोजनाप्रमाणे राज्यभर संप पुकाराला जाईलच, असा इशारा किसान क्रांतीचे सूर्यवंशी यांनी दिला.
निर्णायक लढा पुकारण्यात आला असून तो यशस्वी होण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे, असे मत या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे शेती मालास हमी भाव मिळावा, यासाठी कायदा व्हावा, असे मत कमल सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, संप स्थगित झालेला नाही. हे काही ठराविक लोकांचे आंदोलन नसून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी आंदोलन आहे, संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप पुणतांबा येथील धनंजय जाधव व धनंजय धोर्डे यांनी केला.
प्रत्येक तालुक्यात संपाबाबत जनजागृती करणे, बॅनर्स, पत्रके तयार करणे आदीबाबत चर्चा करून विविध समित्या तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. २१ व २२ मे रोजी ठिकठिकाणी फेरी काढण्यात येणार असून २३ मे रोजी पुणतांबा येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते ३० मे दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या मागण्यांसाठी लढा
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी
- उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
- फळे, भाजीपाला यांना हमी भावामध्ये समाविष्ट करा
-निर्यातीवरील बंधने काढून टाका
- दुधाला ५० रुपये प्रतिलिटर भाव द्या
-शेतीसाठी बिनव्याजी कर्ज द्या
- ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत चाचण्यांच्या सेवांची प्रतीक्षाच

$
0
0

अद्ययावत चाचण्यांच्या सेवांची प्रतीक्षाच
महिन्यात सेवा मिळण्याचे संकेत; आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत अद्ययावत चाचण्या होणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व रुग्णांना सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीच्या चाचण्यांच्या सेवा देण्याविषयी राज्य सरकारशी एचएलएल कंपनीचा ३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाच वर्षांसाठी करार झाला आहे. ९० दिवसांत म्हणजेच एक मे पर्यंत संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या सेवा सुरू होणे अपेक्षित होते; परंतु सद्यस्थितीत केवळ १५ जिल्ह्यांमध्ये या सेवा सुरू झाल्या आहे. परिणामी, औरंगाबादसह सुमारे २० जिल्यांमध्ये या सेवांची अजूनही प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कराराविषयीचे वृत्त सर्वप्रथम ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. ‘एचएलएल’ या सार्वजनिक कंपनीशी करण्यात आलेल्या करारानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व रुग्णांना गरजेनुसार सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीशी संबंधित चाचण्यांच्या सेवा ‘एचएलएल’ देणार आहे. त्यासाठी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात कंपनी स्वतःची प्रयोगशाळा व स्वतःची संपूर्ण यंत्रणा उभी करणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांतील रुग्णांचे रक्त-लघवीचे नमुने कंपनी स्वतः संकलित करुन त्यांचे अहवाल संबंधित आरोग्य केंद्र, रुग्णालयापर्यंत एका दिवसात देणार आहे. विशेष म्हणजे सर्व अहवाल ऑनलाईन पद्धतीने आधी उपलब्ध केले जाणार आहेत व अहवालांची हार्ड कॉपी दुसऱ्या दिवशी संबंधित केंद्र तसेच रुग्णालयात पोहोचती केली जाणार आहे. त्यातच सर्व तातडीच्या चाचण्यांचे अहवाल हे तीन तासांत दिले जाणार आहे. संबंधित डॉक्टर तसेच नोडल ऑफिसरलाही ‘एसएमएस’द्वारे हे अहवाल कळविले जाणार आहेत. या चाचण्यांमध्ये विविध प्रकारच्या ‘कॅन्सर’सह अत्याधुनिक समजण्यात येणाऱ्या हार्मोन चाचण्यांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर २५ ते ३० चाचण्या, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय पातळीवर सुमारे ५० ते ६० प्रकारच्या चाचण्या, तर जिल्हा रुग्णालय पातळीवर बहुतांश चाचण्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘एचएलएल’ कंपनीमार्फत प्रत्येक जिल्ह्यात तसेच मोठ्या तालुक्यांमध्येही प्रयोगशाळा उभ्या केल्या जाणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट तसेच तंत्रज्ञांची नियुक्ती कंपनीमार्फतच होणार असून, प्रयोगशाळेची जागा, उपकरणांची जबाबदारीदेखील कंपनीची असणार आहे.

नाममात्र शुल्कात मिळणार सेवा

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसह १८ घटकांना या चाचण्यांच्या सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. उर्वरित रुग्णांना अगदी नाममात्र शुल्कात या अत्याधुनिक सेवा मिळणार आहेत. सर्वांत अत्याधुनिक चाचण्यांसाठीदेखील २००-३०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क नसेल, असेही सूत्रांनी सांगितले.

आणखी महिना-दीड महिन्यात संपूर्ण राज्यात ‘एचएलएल’च्या सेवा मिळतील. काही तांत्रिक अडचणींमुळे या सेवांना विलंब होत आहे. मात्र कंपनीकडून नाममात्र शुल्कात बहुतांश अत्याधुनिक चाचण्यांच्या दर्जेदार सेवा मिळतील, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फच्या बैठकीत सदस्य, अध्यक्षांची खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वक्फ बोर्डाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यावर लवकरात लवकर निर्णय अपेक्षित आहे. तरीही बोर्डाची बैठक नियमित होत नाही, असा आरोप करत बोर्डाच्या सदस्यांनी अध्यक्ष एम. एम. शेख यांना लक्ष्य केले. यावरून अध्यक्ष व सदस्यांमध्ये खडाजंगी झाली.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची बैठक बुधवारी दुपारी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख हे होते. या बैठकीला आमदार बाबा जानी दुर्रानी, मौलाना गुलाम वस्तानवी, मौलाना जहीर अब्बास, हबीब फकीह, बोर्डाचे सीईओ अजमतुल्लाह कुरेशी यांची उपस्थिती होती. वक्फ बोर्डाची बैठक नियमित होत नाही, बैठक आयोजित न केल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न अजून निकाली काढले नाहीत, असा आरोप सदस्यांनी केला. बैठका घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे काम अध्यक्षांचे होते, अध्यक्ष बैठक लावण्यात असमर्थ आहेत का? अशी विचारणा सदस्यांनी केली. बोर्डाच्या दोन सदस्यांनी केलेल्या आरोपामुळे अध्यक्ष एम. एम. शेख यांनीही सदस्यांना कोर्टात असलेल्या प्रकरणाचा हवाला देत, कोर्टामध्ये प्रकरण दाखल केल्यामुळे बैठका होत नाही, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बैठक घेत नसल्यावरून सदस्य आणि अध्यक्षामध्ये खडाजंगी झाली. अखेर अध्यक्ष आणि ज्येष्ठ सदस्यांच्या विनंतीवरून वातावरण शांत झाले. त्यानंतर रात्री आठपर्यंत बैठक सुरळीत पार पडली. उद्या गुरुवारी बैठक सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीच्या आयोजनावरून काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पण, खडाजंगी किंवा वादावादी झाली नाही. उद्या बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निर्णयाची माहिती देण्यात येईल.
-एम. एम. शेख, अध्यक्ष, वक्फ बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथ महाराज पालखीमार्गात खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आष्टीचे आमदार भीमराव धोंडे हे नवीन तयार करण्यात येणारा पैठण-पंढरपूर हा पारंपरिक पालखी मार्ग त्यांच्या आष्टी मतदारसंघातून वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांनी केला आहे. पालखी मार्ग विकसित करताना या मार्गात कोणताही बदल करू नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.
पंढरपूर येथे आषाढी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराज यांची पालखी औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर या पाच जिल्ह्यांतून अत्यंत खडतर मार्गावरून प्रवास करते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालखी मार्गाप्रमाणे या मार्गाचा विकास करावा, अशी वारकरी व भविकांची खूप जुनी मागणी आहे. या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने संत एकनाथ पालखी मार्गाकरिता ७०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच वाद सुरू झाले आहेत. आष्टीचे आमदार भीमराव धोंडे हे पारंपरिक पालखी मार्गाला बगल देत, हा मार्ग त्यांच्या मतदारसंघात वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाथवंशज पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी केला आहे. शेकडो वर्षांपासून नाथांची पालखी शिरूर कासारनंतर राक्षसभुवन, इघनवाडी, खोल्यांची वाडी, डोळ्याची वाडी, चांगलवाडी ते रायमोह मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते. मात्र, नव्याने तयार करण्यात येणाऱ्या या मार्गात आष्टीचे आमदार भीमराव धोंडे बदल करण्याचा प्रयत्न करत असून पारपंरिक पालखी मार्गात बदल करून तो राक्षभुवन, कारेगाव, डोंगरकिनी ते तुबली फाटा असा करण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप रघुनाथ महाराजांनी केला आहे.
पालखी मार्गाचा विकास करताना मूळ मार्गात कोणताही बदल करू नये, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १५ मे रोजी लिहिले असल्याची माहिती त्यानी दिली. पालखी मार्गात बदल करण्याचा प्रयत्न केल्यास नवीन पालखी मार्गावरून नाथांची पालखी घेवून जाणार नसल्याचा इशारा पत्रात दिला आहे.

पैठणला भूमिपूजन करा
जूनच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचे गेवराई तालुक्यातील बालमटाकळी येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र, संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचे प्रारंभ स्थान पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्राजवळ असून या मार्गाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पैठणला घ्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, चंद्रकांत अंबिलवादे, बंडेराव जोशी, दिनेश पारीख यांनी केली आहे.

शेकडो वर्षांपासून संत एकनाथ महाराज पालखी यांची पालखी एका विशिष्ट मार्गावरून पंढरपूर येथे जाते. आता या मार्गाचा विकास करण्यात येणार असून काही राजकीय मंडळी पारपंरिक पालखी मार्गात बदल करून राजकीय फायदा घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत.
-रघुनाथ महाराज गोसावी, पालखी प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पोस्टमन मोबाइल अॅप्लिकेशन

$
0
0

पोस्टमन मोबाइल अॅप्लिकेशन

सुविधा केंद्राचे आज उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विभागात १८ ठिकाणी पोस्टमन मोबाइल अॅप्लिकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुना बाजार येथील मुख्य पोस्ट कार्यालयात उद्या (गुरुवारी) जनरल पोस्टमास्टर प्रणव कुमार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती या कार्यालयाचे प्रवर अधीक्षक ए. एच. शेख यांनी दिली.

औरंगाबाद हेड पोस्ट ऑफीस, छावणी औरंगाबाद, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, सिडको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गारखेडा, हर्सूल, क्रांतीचौक, सातारा परिसर, कांचनवाडी, बजाजनगर एमआयडीसी क्षेत्र, वाळूज, कन्नड, वैजापूर, जालना, जालना रेल्वे स्टेशन, भोकरदन आदी ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या

$
0
0

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या

शासनाला नोटीस, औरंगाबाद खंडपीठात याचिका

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत राज्य शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश न्या. कालिदास वडणे यांनी दिले.

के. जी. टू पी.जी. पर्यंतचे शिक्षण सर्वांनाच मोफत देण्यात यावे, महाराष्ट्रात गेल्या चार वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे सर्वांनाच शिक्षण घेणे अवघड झाले आहे. खुल्याप्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, सरकारी किंवा खासगी शाळा, महाविद्यालयातून हे शिक्षण मिळालेच पाहिजे, विद्यार्थ्यांना १४ व्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण घेता येते. मात्र, खासगी शाळा आणि महाविद्यालय हा नियम पाळत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेची सुनावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाकडून भावंडांचा १५ वर्षांपासून शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका २७ वर्षांचा तरूण १५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या भाऊ व बहिणीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची बहीण व भाऊ पद्मपुऱ्यातील शिशूसदनमध्ये होते. पण, २००४ नंतर त्यांचा संपर्क तुटला, त्यानंतर शोध घेऊनही ते सापडत नसल्याने या तरुणाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे.
अमोल बापुराव मगर, असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अर्जानुसार, बहीण निकिता (वय अंदाजे दीड वर्ष) व भाऊ अनिकेत (वय अंदाजे ८ महिने) पद्मपुरा येथील शिशूसदनमध्ये होते. हे शिशूसदन २००२ मध्ये बंद झाले व येथील सर्व मुलांना आधी पुणे व त्यानंतर यवतमाळला पाठवण्यात आले. २००४ पर्यंत बहीण-भावासोबत संपर्क होता. पण, त्यानंतर त्यांची कोणतीची माहिती मिळाली नाही. अमालने त्यांचा पुणे, यवतमाळ, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड येथे सांगितल्यानुसार शोध घेतला. पण, ते सापडले नाहीत.
पद्मपुऱ्यातील शिशुसदन असलेल्या जागेत आता मुलांचे अनुरक्षणगृह आहे. त्याने अनुरक्षणगृहात संर्पक साधला. पण, येथे रेकॉर्ड नसल्याने त्याला हडकोच्या रिमांड होममध्ये पाठवण्यात आले. रिमांड होमने जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले. अमोलने सोमवारी विभागाकडे भावंडांना शोधून देण्याचा अर्ज दिला. दोन दिवसात उत्तर न आल्याने त्याने वेदांतनगर पोलिस चौकी, एसपी व जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दिला. प्रत्येक ठिकाणी जुने रेकॉर्ड शोधण्यात हतबलता दाखवण्यात आली. वेदांतनगर पोलिसांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाशी संपर्क केला. पण, अर्ज येऊन फक्त दोन दिवस झाले असून जुन्या नोंदी काढायला थोड वेळ द्या असे विभागाने कळवले आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे ‘म.टा’ने संपर्क साधला असता दोन दिवसात जुने रेकॉर्ड तपासणे शक्य नाही, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. विभागाने पाठवलेल्या पत्राची तात्काळ दखल घेत अनुरक्षणगृहानेही रिमांड होमला पत्र दिले. रिमांड होमलाही रेकॉर्ड सापडले नाही, उलट त्या मुलानेच बहीण-भावाला कुठे पाठवण्यात आले याची काळजी घेणे गरजेचे होते, असे रिमांड होममार्फत सांगण्यात आले.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे ताटातूट

अमोल मगर मूळ कन्नड तालुक्यातील लिंब चिंचोली येथील आहे. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि आई व तिन्ही मुलांशी संबंध तोडला. २००१ मध्ये अमोलच्या आईचा मृत्यू झाला, तेव्हा अमोल ११ वर्षांचा होता. पण भावंडे खूप लहान असल्याने त्यांना शिशूसदनमध्ये ठेवले होते. अमोल काही काळ काकासोबत राहला, नंतर रेल्वेस्टेशनच्या पब्लिक हायस्कूलमध्ये शिकला. एक वर्ष हडकोच्या रिमांड होममध्ये होता. तेव्हापासूनच तो भावंडांचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेत आहे.

परिस्थितीमुळे माझ्या दोघा भावंडांना शिशुसदनमध्ये राहावे लागले. मी लहान होतो, मलाही फार कळत नव्हते. वाळूजला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. माझ्या भावंडाचांचा मी अनेक वर्षांपासून शोध घेत आहे. पण कोणीच नीट मदत करत नाही.
-अमोल मगर

अमोल मगरची तक्रार दाखल करण्यात आली. मी स्वतः महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधला. जुनी घटना असल्याने रेकॉर्ड मिळवायला उशीर लागेल. पण प्रयत्न सुरू आहेत.
-वर्षाराणी आजळे, पोलीस उपनिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ परभणी पालिकेत काँग्रेसमध्ये दिलजमाई

$
0
0


परभणी - महापालिकेत नंबर एकचा पक्ष होवूनही राष्ट्रीवादीच्या खेळीने हातची सत्ता निसटत चालल्याचे पाहून काँग्रेसमध्ये दिलजमाई झाल्याचे निवडणुकीवरून दिसून येते. अगदी सुरूवातीपासूनच सुरेश वरपुडकर यांना जिल्हा परिषदेप्रमाणेच मनपात देखील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचे राजकारण सुरू होते. त्यास काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. परंतु, ऐनवेळी वरपुडकरांनी आपल्या वरचष्म्यातून आखलेल्या डावपेचात सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी गळाला लागले. शिवाय, सेना, भाजपचीही साथ मिळाली. ज्यामुळे मीना वरपुडकर महापौरपदी विराजमान झाल्या.
६५ सदस्यीय परभणी महापालिकेसाठी झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसने ३१ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १८, शिवसेना ६ आणि भाजपने ८ जागा तसेच दोन जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे. सर्वात मोठा पक्ष होऊन देखील काँग्रेस पुढे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीसह सेना, भाजपने प्रारंभी कडवे आव्हान उभे केले होते. अगदी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीच्या पूर्व संध्येपर्यंत भल्या-भल्या राजकीय विश्लेषकांनी सुरेश वरपुडकरांना महापौरपद मिळविणे कठीण असल्याची शक्यता वर्तवली होती. माध्यमांनी देखील काट्याची टक्कर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने जोरदार तयारी करत निवडीप्रसंगी तगडा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, या निवडणुका अगदी सहजपणे पार पडल्याचे दिसून आले.
काँग्रेससह राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी सेना, भाजपला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ऐनवेळी सेना, भाजपचे सदस्य कोणाला सहकार्य करणार हे पाहणे सर्वांसाठीच औत्सुक्याचे ठरले होते. परंतु, माजी मंत्री सुरेश वरपुडकरांनी रात्रीतून खेळलेला डाव त्यांच्या पथ्यावर पडला. त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या नाराजांची समजुत काढली. माजी आमदार सुरेश देशमुख यांना विश्वासात घेतले. त्यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेले काँग्रेसचे नगरसेवक जागेवर स्थिरावले. त्यांच्यामध्ये एकवाक्यता घडवून आणली. त्यानंतर वरपुडकरांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वगळला. सेनेच्या नगरसेवकांना तटस्थ भूमिका घेण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांनी गळ घातली. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी देखील झाला. परिणामी, सेनेचा एकही नगरसेवक निवड प्रक्रियेत सहभागी झाला नाही. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने गैरहजर राहावे यासाठी केलेला प्रयत्न देखील यशस्वी झाला. त्यामुळे ६५ नगरसेवकांपैकी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेसाठी ५९ नगरसेवक हजर राहिले. ज्यामुळे सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी व्यतिरिक्त उपस्थित असलेल्या भाजप नगरसेवकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऐनवेळी सभागृहात भाजपच्या एका नगरसेवकाने मीनाताई वरपुडकर यांच्यासाठी हात वर करून समर्थन दिले. हे पाहून भाजपच्या इतर ७ नगरसेवकांनी देखील हात उंचावला. ज्यामुळे मीनाताई वरपुडकर यांनी काँग्रेसच्या ३२ नगरसेवकांसह भाजपचे ८ असे ४० जणांचे समर्थन घेवून राष्ट्रवादीच्या आलीया अंजुम गौस (१८) यांच्यावर विजय मिळवला.
दरम्यान, भाजपने काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात उपमहापौर पद मिळेल अशी अपेक्षा बाळगली होती. त्यामुळे महापौरपदानंतर पार पडलेल्या उपमहापौर पदासाठी भाजपने काँग्रेसच्या उमेदवाराविरूद्धचा अर्ज कायम ठेवला. मात्र, काँग्रेसचे माजूलाला यांचा अर्ज देखील कायम राहिला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजूलाला यांना मते देवून त्यांची निवड केली. तर भाजपच्या विद्या पाटील यांना भाजपची केवळ ८ मते मिळवता आली. या प्रक्रियेत राष्ट्रवादीने तटस्थ भुमिका घेतली. ज्यामुळे भाजपचा हिरमोड झाला.
येत्या काळात स्थायी समितीच्या सभापतीपदी तरी भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागेल, अशी अपेक्षा आता भाजप ठेवून आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे काँग्रेसमधील माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र गणेश देशमुख किंवा देशमुखांचे कट्टर समर्थक भगवान वाघमारे या दोघापैकी एकाची स्थायी समिती सभापती पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा नियंत्रकाची हकालपट्टी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी सामूहिक कॉपी प्रकरणाबाबत साई अभियांत्रिकी कॉलेजवर विद्यापीठाने तत्काळ कारवाई करावी, परीक्षा नियंत्रकाची हकालपट्टी करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
कॉलेज बंद करण्यासाठी काढलेल्या निवेदनावर निलेश आंबेवाडीकर, सागर सोळंके पाटील, विजय कांबळे, सूरज निकम, अजय रणनवरे, बुद्धभूषण गायकवाड, शुभम वैद्य, शारेख काजी यांची नावे आहेत. अभियांत्रिकी परीक्षेतील घटनेला विद्यापीठाचा परीक्षा विभाग दोषी आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांची हकालपट्टी करा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. महानगर मंत्री मोहन भिसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कुलसचिवांची भेट घेतली. निवेदनावर गजानन वाबळे, सुजय चिंचवणकर यांची नावे आहेत. या प्रकरणात मोठे रॅकेट असून त्याच्या मुळाशी जाऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. याप्रकरणात विद्यापीठाचा परीक्षा विभागही दोषी असून अधिकारी, संबंधित नगरसेवक, प्राचार्य यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सुनील राठोड, नितीन वाहुळे, रखमाला कांबळे, प्राजक्ता शेटे, सत्यजीत मस्के, लोकेश कांबळे आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘कैलासनगर-एमजीएम’ रस्त्याचे काम सुरू होणार

$
0
0

‘कैलासनगर-एमजीएम’ रस्त्याचे काम सुरू होणार

१३ कोटींची निविदा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामाची अखेर मनपा प्रशासनाने बुधवारी निविदा प्रसिद्ध केली. जालना रोडला पर्यायी असलेल्या या रस्त्याचे अनेक महिन्यांपासून काम रखडल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

पाच, सहा वर्षांपूर्वी रस्त्याची मार्किंग करून पाडापाडी करत रस्ता मोकळा करण्यात आला. तरीही आजपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. जानेवारीत महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत ही प्रक्रिया आठ, दहा दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मे उजाडला तरी रस्त्याच्या कामाची निविदा न निघाल्याने सुरुवात झाली नव्हती. अखेर आज ही निविदा निघाली आहे. ६० फूट रुंदीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविण्यात येणार आहे. या कामावर एकूण १३ कोटी ६७ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदेतील अटीनुसार रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण करायचे आहे. २०१२ मध्ये तत्कालिन पालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाडापाडीची मोहीम राबविली. त्यानंतर प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे काम रखडले होते. रस्ता खराब असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत होता. त्यात ४ महिन्यांपूर्वी महापौरांनी आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक घेत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज निविदा निघाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता झाला तर जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर बापू घडामोडे, आमदार अतुल सावे यांनी स्मशान मारोती मंदिरात जाऊन दर्शन घेतले मिठाई वाटण्यात आली. यावेळी कैलास गायकवाड, शिवाजी दांडगे, रमेश जायभाय, प्रशांत देसरडा, सखाराम पोळ, राजू वाढेकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ १७ सप्टेंबरला क्रांतीचाैकातील स्‍मारक हाेण्‍ाार ख्‍ाुले

$
0
0

१७ सप्टेंबरला क्रांतीचाैकातील स्‍मारक हाेण्‍ाार ख्‍ाुले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक येथील काला चबुतराजवळील जागेत उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या जागेच्या सौदर्यकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी या ठिकाणी ध्वजारोहणाने हे स्मारक खुले करण्यात येणार असल्याची माहिती स्मारक समितीचे समन्वयक उद्योजक राम भोगले व मानसिंग पवार यांनी दिली.

महापौर बापू घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेता गजानन मनगटे, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजू वैद्य, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार आदींच्या उपस्थितीत हे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, बिल्डर मिलिंद बापट आणि विजय शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यपालांच्या सूचनेनुसार तत्कालिन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या पुढाकाराने क्रांतीचौक येथे मराठवाड्यातील २१० फूट सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. त्यासाठी शासनाच्या निधीतून पैसे न घेता लोकसहभागातून हे काम करण्याचा निश्चय स्मारक समितीने केल्यामुळे शहरातील विविध २० नामांकित सामाजिक, व्यवसायिक आणि औद्योगिक संस्था एकत्र आल्या आहेत. एकूण ३ कोटी रुपये याकरता खर्च अपेक्षित आहे.

आतापर्यंत या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात १८५७ च्या बंडाच्या स्मरणार्थ तत्कालिन नगरपरिषदेने उभारलेला चौथरा, झाशीच्या राणीच्या पुतळ्यासाठी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चौथरे, त्यामागे स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती देणाऱ्या ग्रॅनाईटच्या भिंती, मध्यवर्ती राष्ट्रध्वजाच्या अष्टदिशेला अशोक स्तंभ, १८५७ च्या बंडातील काला चबुतरा येथे मृत्यूदंड दिलेले १२ जवान यांची नावे असलेला स्तंभ, उद्यान, दिव्यांगांना जाण्या-येण्यासाठीचा रॅम्प आदींचा समावेश आहे. यानंतर आता या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मनपाने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यासाठी शासनाची परवानगी मिळवून द्यावी आणि पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था कशी करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. यानंतर सर्व पदाधिकारी आणि स्मारक समितीचे समन्वयक यांनी क्रांतीचौक येथे जाऊन पाहणी केली.

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन

स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे आज स्मारकाबाबत महापौर दालनात पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले. या पॉवर प्रेझेंटेशनद्वारे या प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांमकातून पाणी आज सोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत मुंबई येथे बुधवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नाशिक पाटबंधारेे विभागाने नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाने बाष्पीभवनाचे कारण पुढे करून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाण्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यता नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखाली फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या शासनाने मुंबई येथे जलसंपदा र्राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, नाशिक व नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे अभियंता, कालवा सल्लागार समितीचे पंडित शिंदे, प्रतापराव साळुंके, दत्ता धुमाळ आदींची उपस्थिती होती. दरम्यान, हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे यश आहे. पण सर्व शिल्लक पाणी न सोडल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्ञानेश्वर जगताप यांनी दिला आहे.

शनिवारी तालुक्यात पाणी
कालव्यातून शिल्लक १३२० अब्ज घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती सल्लागार समितीचे प्रताप साळुंके यांनी दिली. नांदूर-मधमेश्वर धरणातून सोडलेले पाणी शनिवारपर्यंत वैजापूरच्या हद्दीत पोहचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीने परत घेतले ६९ प्लॉट

$
0
0

एमआयडीसीने परत घेतले ६९ प्लॉट
उद्योग न थाटल्याने कारवाई ; फक्त २०१७ मध्ये जप्त केले १६ प्लॉट
dhananjay.kulkarni@timesgroup.com
@dhananjaykMT
औरंगाबाद - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने मागील दोन वर्षांत विभागातील तब्बल ६९ प्लॉट (भूखंड) संबंधित उद्योजकांकडून परत घेतले आहेत. या भूखंडावंवर उद्योग न थाटल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील उद्योजकांना हे भूखंड वाटप करण्यात आले होते, परंतु त्यांनी या भूखंडावर उद्योग सुरूच केला नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांनुसार गेल्या दोन वर्षांपासून वितरित केलेल्या भूखंडांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्या संबंधित भूखंडापैकी पैठण एमआयडीसीतील तब्बल ३१ भूखंड परत घेण्यात आले आहेत. यानंतर भोकरदन, जाफराबाद, चिकलठाणा, शेंद्रा आणि वाळुजचा क्रमांक लागतो. शासनाने दिलेल्या भूखंडानंतर अनेकांनी दोन वर्षांत उद्योग थाटले आहेत, परंतु काहींनी उद्योग सुरू केले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
संबंधित प्लॉटधारक (भूखंडधारकांना) आधी नोटीस बजावण्यात आल्या. यानंतर त्यांचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे झाल्यावर या भूखंडांना परत घेण्यात आले. यासाठी भूखंड वितरित होत असलेले सर्व कागदपत्रे आधी रद्द करण्यात आले. नोटीस देण्यात आल्या होत्या. यानंतर हे सर्व भूखंड परत एमआयडीसीकडे आले आहेत. ज्यांना नोटीसी देण्यात आल्या, पण मिळाल्या नाहीत त्या भूखंडासंबंधी वर्तमानपत्रात माहिती देऊन, जाहिराती देऊन त्या प्रकाशित करण्यात आल्या. यानंतर कारवाई करून भूखंड शासनदरबारी परत घेण्यात आले.

भूखंडासंबंधी आम्ही आधी नोटीस दिल्या होत्या त्याला समर्पक उत्तरे न आल्याने आम्ही तब्बल ६९ भूखंड परत घेतले आहेत. यातून शासनाचा फायदा झाला असून काही ठिकाणी या जमीनी आता पुन्हा वापरासाठीहही उपयोगी पडतील यात काही शंका नाही.
- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक पुलांवरून वाहतूक सुरूच

$
0
0

ऐतिहासिक पुलांवरून वाहतूक सुरूच
चार गेट, तीन पुलांचा प्रश्न गंभीर; पालिका मात्र लक्ष देईना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
जुन्या शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या चार गेटमधून व पुलांवरून अद्यापही वाहतूक सुरूच आहे. या पुलांच्या बांधकामाबाबत अनेकदा घोषणा झाल्या, पण त्या लगेचच हवेत विरल्या. दिवसभरया गेटमधून सर्रास वाहतूक सुरू असल्याने या ऐतिहासिक गेटच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बारापुल्ला गेट, मकाई गेट, महमदू दरवाजा, कटकट गेट (इस्लाम दरवाजा) हे ते चार गेट आहेत.
हे ऐतिहासिक दरवाजे आता जिर्ण झाले आहेत. आठ-नऊ वर्षांपूर्वीच सर्वच दरवाजांना संरक्षित करण्याचे काम करण्यात आले होते. त्यातील काहींची देखभाल दुरुस्ती न झाल्याने ते पाडण्यातही आले. यात शताब्दीनगर भागातील खुनी दरवाजा, खास गेट यांचा समावेश आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित रहावा म्हणून उर्वरित गेटच्या बाजुला रस्ते करण्यात आले आहेत. यात दिल्ली गेट, रंगीन दरवाजा, पैठण गेट, रोशन गेटचा समावेश आहे. मात्र उर्वरित दरवाजांतून अद्यापही वाहतूक सुरू आहे. त्यात बारापुल्ला गेट, मकाई गेट, महमदू दरवाजा, कटकट गेट (इस्लाम दरवाजा) चार दरवाजांचा समावेश आहे.
मकाई गेट, महेमूद दरवाज आणि बारापुल्ला गेटवरून शहराच्या पश्चिमेकडे जात असताना तिथे असलेल्या ऐतिहासिक पुलांवरून अद्यापही वाहतूक सुरूच आहे. या तीनही पुलांचे व ३०० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या पुलांवरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित वाहतूक दिवसभर सुरूच आहे.
या तीनही पुलांच्या कामाबाबत तत्कालीन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी प्रयत्न केले होेते. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनीही या पुलांच्या कामासाठी पैसे देण्याची घोषणा केली होती. पुलाचे काम तेव्हाही सुरू झाले नाही. आमदार इम्तियाज जलील यांनीही या पुलांचा विषय उचलून धरलेला आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा विषय चर्चिला गेला. पालकमंत्र्यांनी पुलांच्या कामासाठी निधी देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापतरी कोणतेही पाऊल पुढे पडलेले नाही. या सर्वच पुलांवरून, गेटमधून वाहतूक सुरूच आहेे. ही वाहतूक धोकादायक असली तरी पालिक प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
कटकट गेटच्या रस्त्याचे काम रखडले
कटकट गेटच्या संरक्षणासाठी गेटच्या दोन्ही बाजुने रस्ता काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी गेटच्या बाजुली असलेली घरे, अतिक्रमणे हटविण्यात आली होती. रस्त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले. त्यानंतर अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत या भागातील नगरसेवक अजीम अहेमद यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘रस्त्याच्या कामाची निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर होणार आहे. त्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल.’
हेरिटेज कमिटीकडून पाठपुरावा हवा
औरंगाबादमधील खास गेट तोडल्यानंतर ऐतिहासिक वास्तू संवर्धन करण्यात याव्यात यासाठी शहरातील विविध संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी खासगेटच्या जागेवर आंदोलन केले होते. महापालिकेने शहरातील अन्य ऐतिहासिक वास्तू तोडू नये, जिर्ण झाल्याच्या नावाखाली पाडापाडी करू नये यासाठी महापालिकेच्या हेरिटेज कमिटीकडूनही पाठपुरावा होणे आवश्यक आहे.


कटकट गेटच्या रस्त्याच्या कामाची निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल.
नगरसेवक अजीम अहेमद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष विस्तारणार कसा?

$
0
0

पक्ष विस्तारणार कसा?
भाजप विस्तारक योजना मेळाव्याला अनेक पदाधिकारी, नगरसेवकांची दांडी; संघटकांनी मागितला अहवाल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने मेळावा आयोजित केला खरा, परंतु या मेळाव्याला पक्षाचे मोठे पदाधिकारी, नगरसेवकांनीच दांडी मारली. पदाधिकारी, नगरसेवकांनाच महत्त्वाच्या मेळाव्याला उपस्थित रहावेसे वाटत नसेल, पक्ष तळागाळापर्यंत पोहोचावा असे त्यांच्या मनात नसेल तर पक्षविस्तार होणार तरी कसा, असा प्रश्न या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दिनिमित्त त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे व पक्षाचा विस्तार असा दुहेरी योग साधण्यासाठी मराठवाड्यात सुमारे दोन हजार विस्तारकांची मोठी फळी भाजपाने तयार केली आहे. त्याच्या तयारी निमित्त विस्तारक योजना कार्यसमितीचा महत्वपूर्ण मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता, परंतु अपवाद वगळता अनेक पदाधिकारी, नगरसेवक त्यास उपस्थित नव्हते. त्यामुळे संघटकांनी त्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत याबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश शहर सरचिटणीसांना दिले आहे.
भाजपाने प्रत्येक जिल्ह्यात पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती तसेच विस्तार समिती स्थापन केली आहे. या कामात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येणार असून त्यासंदर्भात शहरातील सर्व पदाधिकारी, नगरसेवकांना माहिती देण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यसमितीची मेळावा घेण्यात आला. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, भाजप संघटक भाऊराव देशमुख, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये आदींच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले.
पक्ष विस्तारासाठी विस्तारक योजना महत्वपूर्ण असल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष लक्ष घातले आहे. त्यादृष्टीने स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत, परंतु कार्यसमितीचा हा मेळावा महत्वाचा असतानाही अपवाद वगळता अनेक नगरसेवक, पदाधिकारी हे उपस्थित नव्हते, हे विशेष. हीच बाब संघटक भाऊराव देशमुख यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत अनुपस्थित असणाऱ्यांची यादी व अहवाल तातडीने सादर करा, असे आदेश सरचिटणीस सुरेंद्र कुलकर्णी यांना दिले आहेत. मोठ्या प्रमाणात असलेली नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची अनुपस्थितीत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.
भाजपात घराणेशाही नाही
या बैठकीत बोलताना रहाटकर यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदयाचा विचार हा त्यांच्या जन्मशताब्दिनिमित्त समाजात पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपाध्याय यांनी घालून दिलेल्या तत्वावर भाजप कार्य करत असल्याचे नमूद केले. तर प्रदेश प्रवक्ते बोराळकर यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांना देत विस्तार योजनेबाबत मार्गदर्शन केले. भाजपात घराणेशाही नाही, असा दावा केला. प्रदेश चिटणीस मनोज पागांरकर, तनवाणी आदींची यावेळी भाषणे झाली. बसवराज मंगरुळे, गजानन बारवाल, जालिंदर शेंडगे, कचरु घोडके, उत्तम अंभोरे, मनिषा भन्साली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन स्वच्छता रँकिंगमध्ये पिछाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत औरंगाबादचे स्टेशन १७९ क्रमांकावर आहे. औरंगाबादपेक्षा परभणी, नांदेड, जालना, लातूर येथील रेल्वे स्टेशन अधिक स्वच्छ ठरले आहे.
देशभरातील रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतेचे त्रयस्‍थ संस्‍थेमार्फत करण्यात आलेला सर्वेक्षण अहवाल रेल्वे विभागाने बुधवारी जाहीर केला. मराठवाड्यातील लातूर रेल्वे स्टेशनचा क्रमांक देशभरात ७७ वा आहे. ‌दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी रेल्वे स्टेशनची स्वच्छता उत्तम आहे, परभणी रेल्वे स्टेशनचा क्रमांक ११५ वा आला. नांदेड स्टेशनचा क्रमांक १६१ व जालना रेल्वे स्टेशनचा क्रमांक १८६ ठरला आहे. स्वच्छतेच्या यादीत दक्षिण मध्य रेल्वे विभागात विजयवाडा स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सिकंदराबादचा क्रमांक देशात सातवा लागला.

अशी काढतात रँकिंग
रेल्वे स्टेशनची स्वच्छता, केलेल्या उपाययोजना आणि रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया या तीन बाबींवर रँकिंग ठरवली जाते. नांदेडने ३०५ गुण, परभणीला २९९, जालन्याला २८४, तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या प्रतिक्रियेत २७५ गुण मिळाले. प्रवाशांच्या प्रतिक्रियेत औरंगाबादला क्रमांक शेवटचा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार ठाकूर यांनी केले श्रमदान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
परंडा तालुक्यातील वॉटर कॅप स्पर्धेतील सहभागी झालेल्या सक्करवाडी गावाला भेट देऊन भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी श्रमदान केले. यावेळी ग्रामस्थाकडून करण्यात येत असलेल्या श्रमदानाचे कौतुक करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्याचे त्यांनी प्रयत्न केले.
बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या सक्करवाडीतील नागरिक गेल्या काही दिवसांपासून गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी सक्करवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी अर्धा तास श्रमदानाचे काम करीत दोन मीटर रुंदीचा चर खांदून काढला. त्यांच्या सोबत अॅड. सुभाष मोरे यांनी माती भरून वर टाकली. एवढेच नव्हे तर डिझेल व इतर खर्चासाठी आमदार ठाकूर यांनी २ हजार रुपयांची रोख रक्कम दिली. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थितीत असलेल्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी श्रमदान केले.
यावेळी गटविकास अधिकारी विजयसींह नलवडे, अॅड. सुभाष मोरे, पंचायत समिती सदस्य देवकर, अनिल पाटील, जोतीराम क्षीरसागर, बिभिषण शिंदे, अंगद सातपुते, पाणी फांऊडेशनचे अमोल अंधारे यांच्यासह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थितीत होते.


सक्करवाडी येथील ग्रामस्थांचा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाची चर्चा सर्वत्र होत आहे. येत्या काळात येथील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेईन.
सुजितसिंह ठाकूर, आमदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
रेणापूर तालुक्यातील खंलग्री शिवारात बिबट्याने केलेल्या हल्यात शेतमजूर देवीदास चिकटे हा जखमी झाला आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या घटनेने रेणापूर तालुक्यातील खलंग्री, रामेगाव, कारेपूर, तळणी, नरटवाडी या परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वन अधिकारी सी. जी. पोटुलवार म्हणाले की, मंगळवारी दुपारी खंलग्री परिसरातील शिवारात एक बिबट्या दिसून आला. त्याची माहिती ग्रामस्थाकडून मिळाल्यानंतर त्या परिसरात गर्दी झाली होती. गर्दीच्या गोंगाटाने बिवट्याने शेतमजूर असलेल्या देवीदास चिकटे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सहाय्यक वनसरंक्षक गुंडुराव साबळे यांच्या नेतृत्वाखाली खलंग्री परिसरात तीन सापळे लावले होते. त्याच प्रमाणे रात्रभर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या परिसरात शोध मोहीम घेतली, तरी बिबट्याला जेरबंद करता आलेले नाही.
बुधवारी पानगावजवळील इनामवाडी परिसरात बिबट्या दिसला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांच्या माहितीप्रमाणे शोध घेतला असता त्या उसाच्या फडात कुत्रे आढळून आले. वन विभागाच्यावतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांनी भिती न बाळगता माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी या भागात कधीही बिबट्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे भितीचे वातावरण असून हा बिवट्या कुठुन आला याची जोरदार चर्चा सुरू असून वन विभागही याची माहिती घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी संघटना संतापल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉपी प्रकरणाचा विद्यार्थी संघटनांनी जोरदार निषेध केला. या प्रकाराला परीक्षा विभागाचे काही कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करीत दोषींना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरीत आहे. विद्यार्थी संघटनांची विद्यापीठात वर्दळ वाढताच सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे विद्यापीठात नसल्यामुळे संघटनांनी कुलसचिवांना निवेदन दिले.
साई इंजिनीअरिंग कॉलेजातील विद्यार्थ्यांचे कॉपीप्रकरण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहे. उत्तरपत्रिका त्याच दिवशी कस्टोडियनकडे पाठवणे बंधनकारक असताना उत्तरपत्रिका दुसऱ्या दिवशी संस्थाचालकांकडे कशा आढळल्या, असा सवाल सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेने केला. या प्रकारात विद्यापीठाचे काही कर्मचारी सहभागी असून, त्यांची चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात ‘एनएसयूआय’चे नीलेश अंबेवाडीकर, ‘मनविसे’चे वैभव मिटकर, ‘राविकाँ’चे अक्षय पाटील, ‘एसएफआय’चे सुनील राठोड यांच्यासह राहुल तायडे, राजू जावळीकर, ऋषिकेश देशमुख, विशाल पाटील, सुशील बोर्डे, मयूर सोनवणे, करण धनपाल यांचा समावेश होता. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना मागण्यांचे निवेदन स्वीकारले. साई कॉलेजची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी संघटनांनी केली. विद्यापीठातील काही कर्मचारी संस्थाचालकांचे हस्तक असल्याने प्रशासनावर दबाव आणून सोयीचे परीक्षा केंद्र मिळवून पैसे कमावत आहेत. या प्रकाराचा अभ्यास करून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अंभोरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. साई कॉलेजच्या कॉपी प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाची विश्वासार्हता संपुष्टात येऊन विद्यापीठाची बदनामी झाली आहे. होम सेंटरचा निर्णय अचानक फिरवल्याने निर्णयक्षमतेवर गंभीर आरोप होत असल्याची टीका रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केली आहे.
या प्रकरणात नगरसेवक, संस्थाचालक व प्राध्यापक दोषी आहेत. शिवाय परीक्षा नियंत्रक डी. एम. नेटके व अनेक उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी यांचे रॅकेट कार्यरत आहे असा गंभीर आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन निकम यांनी केला आहे. याबाबत कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर अविनाश कांबळे, कुणाल भालेराव, प्रवीण हिवराळे, प्रा. प्रबोधन बनसोडे, विवेक सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.
उत्तरपत्रिका दुसऱ्या दिवशी संस्थाचालकांकडे आढळल्यामुळे विद्यापीठातील कर्मचारीसुद्धा या प्रकरणात सामील असण्याची शक्यता आहे. कॉपी प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीने केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, गणेश साळवे, मनोज शेजवळ यांनी कुलगुरुंना निवेदन दिले.

आज निदर्शने
साई इंजिनीअरिंग कॉलेजचे मास कॉपी प्रकरण विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारे आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शुक्रवारी निदर्शने करणार आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर दुपारी बारा वाजता निदर्शने करण्यात येतील असे विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images