Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उस्मानाबाद लोकसभा लढविण्यास भाजप उत्सुक

$
0
0
उस्मानाबाद लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, मित्रपक्षाने संमती दिली आणि पक्षादेश झाल्यास या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास आपण स्वतः उत्सूक असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजित सिंह ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

उस्मानाबाद मेडिकल कॉलेजला यंदाही ‘टाटा’

$
0
0
राज्यात नव्या सत्र‌ात सुरू होणाऱ्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उस्मानाबादचा समावेश करण्यात आला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री मधूकर चव्हाणसह अन्य लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष शिवाय जिल्ह्यातील उपद्रवी राजकारण व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या घाणेरड्या राजकारणाचे हे फलित असल्याचे या निमित्ताने चर्चिले जात आहे.

दुचाकी चोरणाऱ्याला नागरिकांचा बेदम चोप

$
0
0
गॅरेजवरुन दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला नागरीकांनी रंगेहात पकडून बेदम चोप दिला. किलेअर्क भागात रविवारी सकाळी ही घटना घडली.

बंधुत्व वाढविण्याऱ्या साहित्याची गरज

$
0
0
समाजाला मार्गदर्शक ठरले असे अनेक साहित्यांची निर्मिती झाली आहे. या साहित्याच्या निर्मितीमूळे समाजात बदल घडून आला आहे. यामुळे समाजात मानव कल्याण आणि बंधुत्वता वाढविणाऱ्या साहित्य‌ निर्मितीची गरज असल्याचे मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद राबे हसनी नदवी यांनी व्यक्त केले.

साखर न दिल्यास कारखान्यांवर कारवाई

$
0
0
साखर कारखान्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साखर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कारखान्यांकडे साखरेच्या उपलब्धतेबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी खातरजमा करावी.

रिक्षा मीटर दर वाढवा

$
0
0
पेट्रोल, डिजेल, एलपीजी ऑईलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. रिक्षा देखभालीचा खर्चही वाढला आहे. यामूळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची बैठक घेऊन रिक्षा मिटरची वाढ करण्याची मागणी रिक्षा चालक संयुक्त कृति समितीतर्फे करण्यात आली.

ग्रामीण राजकारणावरील बाष्कळ प्रयोग

$
0
0
मराठी रंगभूमीची ‘गोष्ट सांगणारी रंगभूमी’ अशी कधीकाळी ओळख होती. रंगमंचाच्या आकृतीबंधाचा विचार न करता पाल्हाळीक कथनातून नाटक सादर करण्याचा प्रवाह बराच काळ अस्तित्वात होता.

‘ह्यातला विनोद गांभीर्याने घ्यावा’

$
0
0
समाजाला पर्याय नसलेली लग्नसंस्था वादालाही स्थान देणारी आहे. बदलत्या काळात पुरुषी अहंकार आणि स्त्रीचा स्वाभिमान यांची कसोटीच लागली आहे. समज-गैरसमजातून निर्माण होणारी नात्यातील दरी डॉ. प्रशांत शेंबेकर लिखित व शैलेश देशमुख दिग्दर्शित ‘ह्यातला विनोद गांभीर्याने घ्यावा’ या नाटकात दाखवली आहे.

तरुणीचा विनयभंग

$
0
0
तरुणीच्या मोबाईलवर वारंवार मेसेज पाठवून तिला त्रास दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजपासून एचआयव्ही तपासणी शिबिर

$
0
0
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ अचिव्हर्स आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे (घाटी) शहरात विविध ठिकाणी ‘एचआयव्ही चेकअप कॅम्प’चे (एचआयव्ही तपासणी शिबिर) आयोजन करण्यात आले आहे.

आरक्षण दरबाराकडे नेत्यांची पाठ

$
0
0
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रविवारी सर्वपक्षीय छावा मराठा आरक्षण दरबार आयोजित करण्यात आला होता; मात्र व्यक्तिशः निमंत्रण असूनही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दरबाराकडे पाठ फिरवली.

सलीम अली सरोवर खुले होणार

$
0
0
जैवविविधता कायद्याच्या कचाट्यात सापडलेले डॉ. सलीम अली सरोवर जानेवारीमध्ये आहे त्या स्थितीत नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे. हे सरोवर नूतनीकरणासाठी चार वर्षांपासून बंद करण्यात आले आहे.

राज्य नाट्य स्पर्धेची ‘फिनिक्स भरारी’

$
0
0
५३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची रविवारी रसिक आणि कलाकारांच्या जल्लोषात सांगता झाली. शेवटच्या दिवशी ‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ आणि ‘इन्स्पेक्टर जोशी’ या दोन नाटकांचे सादरीकरण झाले.

डेबिट कार्ड पासवर्ड; ऑनलाइन गंडा

$
0
0
डेबिट कार्डधारकाला कार्डची मुदत वाढवून देण्याचे आमीष दाखवत अनोळखी व्यक्तीने २५ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेडसर मुलाकडून वडलांची हत्या

$
0
0
वेडसर मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह वडलांच्या जीवावर बेतला. या मुलाने वडलांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री वैजापूर शहराजवळच्या भिल्लवाडा भागात घडली.

स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

$
0
0
वैजापूर शहरातील दुर्गावाडी परिसरात स्टोव्हच्या भडक्याने भाजलेल्या महिलेचे शनिवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. वैजयंताबाई नारायण जगदाळे (वय ३५) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.

'स्वाभिमानी रिपब्लिकन' स्वबळावर लढणार

$
0
0
आगामी लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत समाजाचे, शोषिताचे प्रश्न सोडविण्यासाठी झटून कामाला लागा, असे आवाहन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-युथ रिपब्लिकनचे नेते मनोज संसारे यांनी केले.

आरोग्य केंद्रातून डॉक्टर पुन्हा गायब

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीप चौधरी यांनी प्रशासकीय घडी बसविल्यानंतर आता सिस्टम लावण्याचा विडा उचलला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेचे पितळ चौधरींनी उघडे केले.

...तर राज्यात वर्षभरात NSD शाखा

$
0
0
महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, एका वर्षात एनएसडीची शाखा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे (एनएसडी) संचालक वामन केंद्रे यांनी रविवारी येथे केली.

डॉ. पैठणेच्या २ एजंटांचा शोध सुरू

$
0
0
बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. पैठणे याच्या पसार झालेल्या दोन एजंटाचा क्रांतीचौक पोलिस कसून शोध घेत आहे. रविवारी रात्री पोलिस या दोघांच्या शोधासाठी रवाना झाले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images