Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सशुल्क दर्शनातून ३० लाखांची कमाई

$
0
0

सशुल्क दर्शनातून ३० लाखांची कमाई
तुळजाभवानी मंदिराची वाटचाल श्रीमंतीकडे
मोतीचंद बेदमुथा
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराची वाटचाल सध्या श्रीमंतीकडे सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सशुल्क दर्शन सुविधेतून देवस्थानला आतापर्यंत सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दोन महिन्यांत या सुविधेचा लाभ २९,६९३ भाविकांनी घेतला आहे.
यापूर्वी या मंदिरात ‘व्हीआयपी’ व तातडीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती. शिवाय यासाठी या अनेकांची मनधरणीही करावी लागत होती. यातूनच येथे अनागोंदी कारभार वाढला होता. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यांनी तुळजाभवानी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी येथील कारभार पारदर्शक करण्यावर भर दिला. पूर्वापार चालत आलेली ‘व्हीआयपी’ दर्शनाची सुविधा बंद करून त्यांनी येथे सशुल्क दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली. यासाठी प्रतिभाविक १०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्यासाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोयही करून देण्यात आली.
सशुल्क दर्शन सुविधेचा त्रास अन्य सामान्य भाविकांना होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या नव्या उपक्रमाचे भाविकांकडूनही स्वागत करण्यात आले. अल्पावधीतच या सुविधेला भाविकांची पसंती मिळाली. देवस्थानकडून या उपक्रमाचा फारसा गाजावाजा करण्यात आला नसतानाही भाविकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ३० हजार भाविकांनी सशुल्क दर्शन सुविधेचा लाभ घेत तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नाला हातभार लावला.

नवरात्रादरम्यान शुल्कात तिपटीने वाढ
तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर) सशुल्क दर्शनाचे शुल्क १०० रुपयांवरून वाढवून ३०० रुपये करण्यात आले आहे. तुळजाभवानी देवस्थान समितीने केलेली ही वाढ अव्यवहार्य असून, त्याचा फेरविचार करण्याची मागणी भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
नवरात्र महोत्सवादरम्यान तुळजापूर येथे भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. याचा परिणाम सशुल्क दर्शन सुविधेवर होऊन, या यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही दरवाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देवस्थानकडून देण्यात आले आहे. देशतिरुपती बालाजी व शिर्डी येथील साई बाबांच्या मंदिरासारख्या देशातील नामांकित देवस्थानांमध्येही विविध महोत्सवप्रसंगी भाविकांची संख्या वाढली म्हणून अशाप्रकारे सशुल्क दर्शनामध्ये दरवाढ केली जात नाही.

देवस्थानामध्ये सोयी- सुविधांची कमतरता
तुळजाभवानी देवस्थांनमध्ये भविकांसाठीच्या सोयीसुविधांची मोठी कमतरता आहे. मंदिर परिसरात स्वछतेचा अभाव असतो. दरवर्षी नवरात्र महोत्सवात भेडसावणाऱ्या या समस्या आहेत. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकामी प्रशासन व देवस्थान समिती अपयशी ठरत आहे. दरवर्षी या सोयी-सुविधांवर केवळ मलमपट्टी करून नवरात्र महोत्सव पार पडण्याचे काम केले जात आहे. आता तुळजाभवानी देवस्थान ची गणना ही ‘श्रीमंत’ देवस्थानांमध्ये करण्यात येते. विविध मार्गांनी उत्पन्नाचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे आता देवस्थानने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याकडे कसोशीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उद्घाटनाअभावी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या भक्त निवासचा वापर तातडीने सुरू करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ...अन् अफवांचे पाणी सुटले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. ही माहिती पूर्णपणे खोटी असून अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जायकवाडी धरणात सध्या ८८.१० टक्के पाणीसाठा आहे. तर प्रकल्पात येणारी पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे.

जायकवाडी धरणातील पाणी पातळी दररोज वाढत असल्यामुळे मराठवाड्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. दहा वर्षानंतर धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणाच्या वरच्या भागात दमदार पाऊस झाल्यास येत्या दोन दिवसात पाणी पातळी पूर्ण होऊ शकते. मात्र, सद्यस्थितीत नाशिक भागात पाऊस थांबल्यामुळे पाण्याची आवक मंदावली आहे. धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजता ८८.१० टक्के पाणीसाठा होता. जायकवाडीच्या पाणी पातळीवर सर्वांचे लक्ष असल्यामुळे अफ‍वा पसरल्या आहेत. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याच्या पोस्ट व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर फिरत आहेत. पाणी सोडल्याचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर असल्यामुळे आणखी गोंधळ उडाला आहे. धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता बी. एस. स्वामी यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. तसेच धरणातील पाण्याची आवक जास्त असल्यास तातडीने निर्णय घेऊ. विसर्ग सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना माहिती देण्यात येईल असे स्वामी यांनी सांगितले. सध्या गोदाकाठच्या गावांना इशारा देण्यात आला असला, तरी पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित आहे असे अभियंता अशोक चव्हाण यांनी कळवले आहे.

आवक कमी
जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी आहे. सध्या पाच हजार ३६४ क्यूसेक आवक सुरू असून जिवंत पाणीसाठा ६७.५३ टक्के आहे. गेल्या २४ तासातील पावसाचे प्रमाण शून्य टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत पुन्हा पाऊस सुरू झाल्यास आवक वाढून पाणी सोडण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महापौरांविरुद्ध ४२० दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुली खासगीकरणातून करण्याच्या गुपचूप मंजूर झालेल्या प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे सभागृहनेते गजानन मनगटे यांना या कृत्याबद्दल दोन दिवसांनी उपरती झाली आहे. हा प्रस्ताव रद्द करा, असे पत्र त्यांनी बुधवारी आयुक्तांना देत या फसवणुकीबद्दल महापौरांवर ४२०नुसार फौजदारी दाखल करण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.

मालमत्तांचे सर्वेक्षण, कर आकारणी, कर वसुलीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजूर केला. त्याचा भांडाफोड ‘मटा’ ने केल्यावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. वसुलीच्या कामाचे खासगीकरण करू नका, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली, पण महापौरांनी आपले म्हणणे रेटून नेल्याने प्रस्ताव मंजूर झाला. आता त्यानुसारच कार्यवाही होईल असे स्पष्ट करताना घाईगडबडीत सर्वसाधारण सभा संपवली. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ प्रस्तावाला विरोध करण्यात आघाडीवर होते. तेव्हा तुमच्याच सभागृहनेत्याने प्रस्तावावर स्वाक्षरी केली. सभागृहनेत्याला तुम्ही मानत नाही का, असा सवाल करून महापौरांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना कोंडीत पकडले. त्यानंतर आता बुधवारी मनगटे यांना केल्या कृत्याची उपरती झाली आहे.

मनगटे म्हणाले, ‘मालमत्तांचे सर्वेक्षण, आकारणी, वसुलीचे खासगीकरण व घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक कामाचे खासगीकरण हे दोन्ही प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्याच्या अटीवरच आम्ही स्वाक्षऱ्या केल्या. परंतु महापौरांनी आमची फसवणूक केली. प्रस्ताव चर्चेसाठी आणला नाही, गुपचूप तो मंजूर केला. जनतेची पिळवणूक करणारे, जनतेची फसवणूक करणारे प्रस्ताव मंजूर करायचे नाहीत असे शिवसेना पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे महापौरांनी मंजूर केलेला हा प्रस्ताव रद्द करावा, असे पत्र आपण आयुक्तांना दिले आहे.’

मुख्यमंत्र्यांना पत्र
‘वसुली कामाच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात गुपचूप मंजूर केलेला प्रस्तावही रद्द करा असे पत्रात नमूद केले आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री व नगर विकास खात्याच्या सचिवांना देखील आपण पत्र लिहिणार आहोत,’ असे मनगटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रस्तावही गुपचूप मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुली खासगीकरण प्रस्तावाच्या पाठोपाठ आता कचऱ्याचे संकलन व वाहतुकीचा प्रस्ताव देखील महापौर भगवान घडमोडे यांनी दोन महिन्यांपूर्वी गुपचूप मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या प्रतापामुळे महापालिका अवाक झाली आहे.

कचऱ्याचे संकलन व वाहतूक या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी २० जुलै २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐवनेळी मांडला व चर्चा न होऊ देता तो गुपचूप मंजूर देखील केल्याचे उघड झाले आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, ‘औरंगाबादची सध्याची लोकसंख्या पंधरा लाख आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरात कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. कचरा उचलून तो डंपिंग ग्राउंड पर्यंत नेण्यासाठी वर्षाला ८५ ते ९० कोटी रुपये खर्च होतो. एवढा खर्च होऊनही साफसफाईच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रदूषण वाढल्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आपल्या शहराचा क्रमांक २९९ आलेला आहे. ही बाब भूषणावह नाही. कचरा उचलण्यासाठी प्रतिटन सुमारे १४०० रुपये खर्च येतो. हा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कचरा वाहतुकीसाठी नवीन वाहने खरेदी करणे शक्य नाही. या परिस्थितीचा विचार करता कचरा उचलणे व त्याची वाहतूक करणे हे काम करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती करणे गरजेचे आहे.’ भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप या प्रस्तावाचे सूचक आहेत, तर सभागृहनेते गजानन मनगटे व एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी अनुमोदक आहेत.

कारणापुरता उतारा
महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेवून लगेचच त्याचा कारणापुरता उतारा देखील काढला व सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती करण्यासाठी ऑफर मागवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ऑफर आल्यानंतर त्या आधारे टेंडर काढले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची जागा बदलली; वाहनांचीही तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
अजिंठा लेणी टी पॉइंटच्या पार्किंगमधून वाहनचोरी होत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून तपासणी करून वाहने सोडली जात आहेत. वाहने चोरी होत असल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन ही तपासणी करण्यात येत आहे.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहने थांबवण्यासाठी अजिंठा लेणीबाहेर टी पॉइंट येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शॉपिंग प्लाझामध्ये पार्किंग केली जातात. या पार्किंगमधून येथील व्यापारी अजमल खान इस्माईल खान पठाण यांची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी जामनेर येथील साने गुरुजीनगर येथील रहिवासी चरणसिंग मच्छिंद्र राजपूत यांची दुचाकी चोरीस गेली. या चोऱ्यासंदर्भात १९ सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने २००२ पासूनची दुचाकी पार्किंगची जागा बदलली आहे. आता अजिंठा व्हिजिटर सेंटर येथे पार्किंग सुरू करण्यात आली आहे. तेथे बाहेर जाणारे प्रत्येक वाहन पावती असल्याची तपासणी करून सोडले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारसमितीत ज्वारी, बाजरीची आवक वाढली

$
0
0

बाजारसमितीत ज्वारी, बाजरीची आवक वाढली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद जाधववाडी येथे गेल्या चार दिवसांपासून बाजरी आणि ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. रोज सरासरी १५६ ते १६० क्विंटल बाजरी तर ५६ ते ६० क्विंकल ज्वारी येत आहे. शेतकरीवर्गाला याचा दिलासा आहे. अडत्यांनी बाजरीला ११२५ ते ११३० रुपये क्विंटल भाव दिला आहे. ज्वारीला १५०० ते २००० रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा, जालना, जळगाव, वैजापूर, औरंगाबाद जिल्हयासह काही प्रमाणात नाशिक-नगरहून ज्वारी, बाजरी आवक होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या अख्ख्या मुगालाही उच्च दर्जाचे मूग मानले जातात. रोज किमान १२५ क्विंटलहून अधिक माल येत आहे. बाजरीची आवक मराठवाड्यातून होत आहे. शेतकऱ्यांना बाजरीचा ११२५ ते ११३० रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. बाजरीची व मुगाची आवक या सप्टेंबर महिन्यात वाढत असते, यानंतर ज्वारी आणि गहू काही प्रमाणात येणे सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिन्यात घरांच्या किमती वाढणार

$
0
0

सहा महिन्यात घरांच्या किमती वाढणार

तयार घरांच्या किमती सध्या स्थिर; बांधकामांच्या नव्या योजनांवर जीएसटी, रेराचा होणार परिणाम

औरंगाबाद - आगामी सहा महिन्यांत नवे गृहप्रकल्प येणार नाहीत, याशिवाय आगामी सहा महिन्यानंतर घरांच्या किंमतीही वाढतील, असे संकेत शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईने दिले आहेत. नव्या गृहप्रकल्पां‍वर सध्या रेरा, महारेरा, रजिस्ट्री, जीएसटी (वस्तु व सेवा कर) यांचे भूत मानगुटीवर आहे.

क्रेडाईने सध्या ‘आस्ते कदम’ धोरण अवलंबले आहे. मंदी, दुष्काळ, या कारणांनंतर आता जीएटी, महारेरा, रेरा यांची कारणे पुढे येऊ लागली आहे. पाऊस झाला आहे, सगळीकडे सणासुदींचे वातावरण आहे, परंतु घरांच्या किंमती अजूनही महागच आहेत. असे असले तरी बांधलेली घरे ही जुन्या गृहप्रकल्पांतील अर्थात तीन-चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व यावर्षी बांधून संपलेल्या गृहप्रकल्पातील आहेत. हीच घरे किंवा गृहप्रकल्प विकून मोकळे होण्याच्या मन:स्थितीत सध्या शहरातील बिल्डर लॉबी आहेत. आगामी काळात घरे व जागा (रिकामे प्लॉटस) यांची उपलब्धता कशी असू शकेल याचे गणित सांगण्यास क्रेडाईचे सदस्य तयार नाहीत. नवे कर, स्मार्ट सिटीची वाटचाल, समांतर योजना, डीएमआयसी योजना, ऑरिक सिटी यावर सगळी सहा महिन्यांनंतरची गुंतवणूक अवलंबून आहे. यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी सध्या जी घरे उपलब्ध आहेत त्यातून घरे निवडणे, बँकांच्या होमलोनच्या उतरलेल्या व्याजदराचा फायदा घेणे, पंतप्रधान आवास योजनेसह विविध योजनांचा फायदा घेणे आवश्यक आहे, असे मत क्रेडाई सदस्य व्यक्त करत आहेत.
उपलब्ध घरे
सध्या शहरात मागणी तसा पुरवठा असे सरळ गणित आहे. गृहप्रकल्पांतून सुमारे ३०० हून अधिक १ बीएचके, २०० हून अधिक २ बीएचके आणि ३०० हून अधिक बंगले, रो हाऊस उपलब्ध आहेत. काहींचे रेरा रजिस्ट्रेशन झाले आहे. नव्या घरांसाठी काही बिल्डरांनी नव्या स्किम्सही सुरू केल्या आहेत.

रेरा, जीएसटी आणि रजिस्ट्रीचे दर वाढले आहेत. यामुळे भविष्यात घरांच्या क‌िंमती वाढतील. शहरात सध्या ३०० स्किमद्वारे १ बीएचके, २ बीएचके आणि बंगलो, रो हाऊस देखील उपलब्ध आहेत. कमीत १७ ते १८ लाख व जास्तीत जास्त ३० ते ३५ लाखांपर्यंत विविध स्किममध्ये घरे उपलब्ध आहेत. हे दर त्या-त्या एरीयानुसार वेगवेगळे असू शकतात, पण पंतप्रधान आवास योजनाही आहे. त्याचाही आधार घेता येऊ शकतो. यामुळे गृहखरेदी करून स्वप्न साकारायला काहीच हरकत नाही.
-रवी वट्टमवार, अध्यक्ष औरंगाबाद क्रेडाई
पुढील सहा महिन्यांत किमती नक्की वाढणार आहेत. नव्या स्किम सुरू होणे आजतरी दुरापास्त आहे. भविष्यात येतील यात काही वाद नाही, पण सध्या तयार घरांच्या विक्रीसाठी बिल्डर प्रयत्नशील आहे. ग्राहक देखील नवरात्र, दसरा, दिवाळीत घर खरेदी करत असतो. यामुळे शहरात उपलब्ध घरांची चाचपणी करत आताच गृहखरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे.
- देवानंद कोटगिरे, माजी अध्यक्ष, औरंगाबाद क्रेडाई


सध्या शहरात उपलब्ध घरांद्वारे ग्राहकांनी त्यांच्या मनातील घर खरेदी करायला हीच वेळ आहे. भविष्यात गृह किंमती वाढण्याचे संकेत आहेतच. यापेक्षा मला असे सांगावेसे वाटते की, घरांच्या बाबतीत मागणी आणि पुरवठा यांचे सरळ गणित बसू शकते अशी परिस्थिती आहे, घरे उपलब्ध आहेत. ‌भविष्यात हे गणित सरळ नसेल. नव्या स्कीम सुरू करताना दर वाढलेलेच असतील.
विकास चौधरी, उपाध्यक्ष, औरंगाबाद क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुत्थुट’ दरोडाप्रकरणी आरोपींना कोठडी

$
0
0

औरंगाबाद : रमानगरातील ‘मुत्थुट फिनकॉर्प’वर १५ महिन्यांपूर्वी पोलिसांच्या ड्रेसमध्ये दरोडा टाकणाऱ्या पाच दराडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यांना बुधवारी (२० सप्टेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२५ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.

१४ मे २०१६ रोजी ‘मुत्थुट फिनकॉर्प’च्या व्यवस्थापिका रिना रियाजू व इतर दोन महिला कर्मचारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयात असताना, दोन ते तीनजण पोलिसांच्या वेषात आले. ‘तुम्ही सोने गहाण ठेवताना ग्राहकाकडून कोणकोणती कागदपत्रे घेता,’ अशी विचारणा करत तुमच्या फायनान्स कंपनीच्या विरोधात चोरीची तक्रार प्राप्त झाली असून, व्यावस्थापिकेला कागदपत्र दाखविण्यास सांगितले. कागदपत्र पाहत असताना त्यातील एकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापण्याचा प्रयत्न केल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यामुळे काही रक्षकांनी तातडीने अलार्मचे बटन दाबले. त्यामुळे काहींनी कार्यालयात धाव घेतल्यानंतर पोलिसांच्या वेषातील दरोडेखोरांनी पिस्तुल काढून पळ काढला होता. व्यवस्थापिकेच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मोहम्मद शरीफ अब्दुल कादर कादरी, अर्शद कुमोद्दीन खान, सैफोद्दीन उर्फ शफी नवाबोद्दीन सय्यद, संतोष दशरथ विरकर, मोहम्मद दस्तगीर मोहम्मद यासीन या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती व त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीदरम्यान दरोडेखोरांच्या ओळख परेडमध्ये फिर्यादी व्यावस्थापिका व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले होते.

साहित्य जप्त करणे बाकी
या प्रकरणातील पाचही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दरोडेखोरांच्या ताब्यातून ‘सीपीओ’ची हार्डडिस्क, राउटर, कार जप्त करणे बाकी असून, आरोपींचे कोणी साथीदार आहे का, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने सर्व पाच आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांमका कालव्यातून आज पाणी सोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने दारणा समूहातील बहुतांश धरणातील पाणी पातळी वाढली आहे. या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यात सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी जलदगती कालव्यातून गुरुवारी सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात येणार आहे.
कालव्यात सुरुवातीला ३०० क्युसेक व त्यानंतर विसर्ग ७०० क्युसेक पर्यंत वाढवून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी १० ते १५ दिवस सुरू राहील. त्यामुळे पाण्याची मागणी केलेल्या ग्रामपंचायतींनी कालव्याच्या पाण्यातून तलाव भरुन घ्यावेत असे आवाहन नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. ए. पाटील यांनी केले आहे. पायथा ते माथा या धोरणानुसार कालव्याचे पाणी आधी गंगापूर तालुक्याला पुरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एरव्ही नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. पण, कालव्यात पाणी सोडल्यास गंगथडी भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होऊ शकतो, अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी रविवारी पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन पटवून दिली. त्यामुळे जलदगती कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय मंत्र्यांच्या आदेशाने झाल्याचा दावा जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीच्या शिक्षकांसाठी ‘चेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती असते. ती दूर व्हावी, जागतिक भाषा सहज, सोपी वाटावी म्हणून शिक्षण विभागाने ‘कंटिन्युअस हेल्प टू दी टीचर ऑफ दी इंग्लिश फॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) या उपक्रमाचा आरखडा तयार केला आहे. त्यात १५ हजार शिक्षकांना अध्यापनाचे धडे दिले जातील. त्याचा ३० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यापुढे प्रत्येक शाळेत शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

शालेय स्तरावर गणितासह इंग्रजीभाषेबाबत ही विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. कौशल्याधिष्ठित विषय शिक्षकांनाच अवघड असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे अवघड. अशावेळी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाच आधी विषयाचे धडे दिले जाणार आहेत. त्यानंतर त्यांनी त्यानुसार शाळेमध्ये अध्यापन करायचे आहे. इयत्ता नववीस दहावीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. विद्या प्राधिकरणाच्या पुढाकाराने ‘माध्यमिक शाळांमधील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण मदत’ प्रकल्पातून माध्यमिक शाळांच्या इंग्रजी विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिकस्तरावरील इंग्रजी शिकविण्याची पद्धत, शैक्षणिक साहित्य, विषयातील अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे अध्ययन कसे करायचे, भाषा विकास, वर्ग व्यवस्थापन आदी या प्रशिक्षणात शिकविले जाणार आहे. त्यासाठी इंग्रजी टिचर फोरमही तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजार शिक्षक एकत्र जोडण्यात आले असून, विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे सगळे शिक्षण आजपर्यंत ब्रिटिश कौन्सिलची मदत घेतली जात होती. हा प्रकल्प स्वतः शिक्षण विभागाचा असणार आहे. प्रशिक्षणानंतर शिक्षक शाळांमध्ये अध्यापनात यानुसार बदल करतील ज्याचा ३० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

शनिवारी ‘इंग्लिश डे...’

विषयाचे महत्त्व वाढावे यासाठी आठवड्यातील शनिवार हा शाळेमध्ये ‘इंग्लिश डे’ असेल. त्या दिवशी प्रार्थना, परिपाठ इंग्रजीतून करण्यात येणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थी, सहकाऱ्यांशी इंग्रजीतून संवाद साधणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याचा सराव होईल. त्याबाबत शासनस्तरावरून अद्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

या विषयावर लक्ष केंद्रित

शिक्षकांमध्ये भाषिक कौशल्याचा विकास, व्यावसायिक विकास, टेक्नोसॅव्ही होणे, नवीन क्षमता विकसित करणे, सोशल मीडियाचा अध्यापनासाठी उपयोग आदींचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. त्यासाठी ५० शिक्षकांचा एक गट असेल. तालुक्यातील शिक्षकांचा एक गट दर महिन्याला एकत्र येऊन इंग्रजीबाबत चर्चा करून अध्यापनात बदल करेल.

९, १०वी विद्यार्थी संख्या..........३० लाख
इंग्रजी विषय शिक्षक संख्या.....१५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचा आयुक्तालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेतनवाढ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सामली झाल्या होत्या. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले.
राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. मंत्रीपातळीवरील चर्चा निष्फळ ठरल्याने संपकऱ्यांमध्ये संताप आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे. या मोर्चाला प्रा. राम बाहेती, माधुरी क्षीरसागर, तारा बनसोड, देविदास जिगे, रशीद पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खोकडपुऱ्यातून सुरुवात झाली. पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चात अनिल जावळे, शालिनी पगारे, विलास शेंगुळे आदींची उपस्थिती होती.

झेडपीसमोर निदर्शने

मानधन वाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून ठिय्या दिला. या आंदोलनात कार्याध्यक्षा मंगला सराफ, मंदाकिनी तांबे, शोभा बोरसे, निर्मला एकबोटे, राजू लोखंडे यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झालेल्या दरवाढीविरुद्ध तालुका काँग्रेसतर्फे टी-पाॅइंटवर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. निदर्शनाचे नेतृत्व देवगिरी साखर कारखाऱ्याचे चेअरमन जगन्नाथ काळे यांनी केले.
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ रद्द करा, खरीप पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचे वीजबिल पूर्ण माफ करा, भारनियमन थांबवा, दिवाळीसाठी रेशन दुकानातून पाच किलाे साखर द्या आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पाेलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, शेख रज्जाक, लहू मानकापे, अश्फाक पटेल, रिजवान खान, शामराव साळुंके, इरफान शहा, सदाशिव विटेकर, सुनीता भागवत, मंगेश मेटे, सुभाष गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कन्नडमध्ये निषेध

कन्नडः इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्ध तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदार महेश सुधळकर यांना निवेदन देण्यात आले. अनेक पटीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ झाल्यामुळे राज्यातील जनता होरपळत आहे. सामान्य जनता, गरीब, मजूर यांच्यापुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्या तेलाच्या किंमतीत घट होत असतांना भाजप सरकार पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ करत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज देशमुख, सोशल मिडिया अध्यक्ष अविनाश काळे, शहराध्यक्ष आरेफ हाशमी, सुरेश जंगले, कार्याध्यक्ष शेख शहीद, रावसाहेब पवार, रावसाहेब शिंदे, कार्तिक जाधव, भरत पंडित यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभांचे हलते जिने, एक वर्षापूर्वी स्वच्छता

$
0
0

औरंगाबाद- शहराच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जलकुंभ देखभाल दुरुस्तीअभावी धोकादायक झाले आहेत. अनेक जलकुंभांचे जिने हलत असून जिना व जलकुंभांचा स्लॅब उघडा पडला आहे. बहुतेक जलकुंभांची स्वच्छता वर्षभरापासून झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर जलकुंभांबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सर्व जलकुंभ धोकादायक असल्याचे सांगितले. त्यामुळे जलकुंभ खरोखरच धोकादायक झाले असतील, तर त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे मत नगरसेवकांनी सभेत व्यक्त केले. सर्वच जलकुंभांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत एका महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची घोषणा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी केली. या पार्श्वभमीवर ‘मटा’ने काही जलकुंभांची पाहणी केली. त्यावेळी जलकुंभांची स्थिती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.

शहागंज

जुन्या औरंगाबाद शहराला शहागंज आणि जिन्सी येथील जलकुंभांमधून पाणीपुरवठा केला जातो. शहागंज येथील जलकुंभ भाजीमंडई परिसरात असून भूमिगत हौद आणि जलकुंभ अशी रचना आहे. या जलकुंभाचा जिना कमकुवत झाला आहे. जिन्याच्या पायऱ्या हलत असून जलकुंभ स्वच्छेसाठी एखादा धष्टपुष्ट माणूस जिन्यावरून गेला, तर तो कोसळेल, अशी स्थिती असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी लक्षात आणून दिले. या जलकुंभाचा स्लॅब अनेक ठिकाणी उघडा पडला आहे. भूमिगत हौद व जलकुंभाची स्वच्छता १५ जानेवारी २०१४ आणि १४ मे २०१५ रोजी केलेची नोंद आहे. त्यानंतर स्वच्छता करण्यात आलेली नाही.

जिन्सी

जिन्सी भागातील जलकुंभाची देखील दुरावस्था झालेली आहे. या जलकुंभाचा जिना धोकादायक असून पायऱ्या केव्हा पडतील याचा नेम नाही. जलकुंभाच्या पाइपला ठिकठिकाणी गळती लागली आहे. या जलकुंभाची स्वच्छता १४ नोव्हेंबर २०१४ आणि १३ मे २०१७ रोजी करण्यात आल्याची नोंद आहे.

क्रांती चौक

क्रांती चौकातील जलकुंभाची व्याप्ती मोठी आहे. सेव्हन हिल्सपासून खोकडपुरा- गांधीनगरपर्यंत आणि जवाहर कॉलनी, विष्णूनगर-बालाजीनगर पर्यंतच्या विविध वसाहतींना येथून पाणीपुरवठा केला जातो. क्रांती चौक वॉर्ड कार्यालयाच्या परिसरात तीन जलकुंभ आहेत. त्यांची अवस्था देखील नाजूक आहे. सर्वात जुन्या जलकुंभाची स्वच्छता २८ जुलै २०१५ आणि २८ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आली. इतर दोन जलकुंभांची स्वच्छता अनुक्रमे २९ जुलै २०१५ व २९ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आल्याची नोंद आहे. अशीच अवस्था इतर जलकुंभांची आहे.

शहरातील जलकुंभ व बांधकामाचे वर्ष

नक्षत्रवाडी १९८५-८६, कांचनवाडी १९८५-८६, इटखेडा १९८५-८६, वेदांतनगर १९८७-८८, कोटला कॉलनी १९७४-७५, क्रांती चौक १९९०, क्रांती चौक १९६०, क्रांती चौक १९७९, क्रांती चौक १९६०, क्रांती चौक-१ २००१, एसएफएस गारखेडा १९८४, जय विश्वभारती कॉलनी १९९२, ज्योतीनगर २००७-०८, शिवाजीनगर-जुनी १९९०-९१, शिवाजीनगर-नवीन २००८-०९, शिवाजीनगर १९९०-९१, मुकुंदवाडी १९८६-८७, संजयनगर १९८७-८८, चिकलठाणा आर-१ १९९७-९८, चिकलठाणा आर-२ १९७८-७९, मसनतपूर १९८६-८७, ब्रिजवाडी १९८६-८७, नारेगाव १९८६-८७, एन ५ आर-१ १९७८-७९, एन ५ आर-२ १९८७-८८, एन ५ आर-३ १९९३-९४, एन ५ (संप) १९८१-८२, मरीमाता (नवीन) २००३, मरीमाता (जुनी) १९८४, एन ७ आर-१ १९७५-७६, एन ७ आर-२ १९८०-८१, एन ७ आर-३ १९९३-९४, एन ७ (संप) १९९९-०२, हरसिद्धी २००१-०२, हर्सूल गाव (नवीन) १९९४-९५, हर्सूल गाव (जुने) १९९५-९६, हर्सूल जेल १९९४-९५, दिल्लीगेट (नवीन) १९७२, दिल्लीगेट (जुना) १९५४, हत्तेसिंगपुरा १९८३,
जिन्सी १९७४, जिन्सी (संप) १९७४, शहागंज १९७२, शहागंज (संप) १९७२, ज्युबलीपार्क १९७४, ज्युबलीपार्क (संप) १९७४, मेडिकल १९९४, विद्यापीठ १९८४, हनुमान टेकडी १९९२, पेठेनगर १९९२, स्लॉटर हाऊस १९९४, पडेगाव १९९२, राणा पेट्रोलपंप १९९२, हॉटेल मेडोज १९९२, मिटमिटा १९९२, गरमपाणी १९९४, बनेवाडी १९८५-८६, पुंडलिकनगर २००७-०८, गिरिजादेवी सोसायटी २००७-०८, एन ८ २००७-०८, जसवंतपुरा, सिल्क मिल कॉलनी, शासकीय तंत्र निकेतनजवळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावा मराठा संघटनेचे सरकारविरोधात मुंडण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असून हे दर तत्काळ कमी करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी भाजप सरकार विरोधात छावा मराठा युवा संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुंडण आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपुर्वी बुलेट ट्रेनसाठी भुमिपूजन करण्यात आले या ऐवजी शासनाने शेतकऱ्यांच्या हित जोपासणाऱ्या योजना आणाव्या. मराठा आरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. ज्ञानेश्वर गायकवाड पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात पाच जणांनी मुंडण केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी श्रीकांत माने पाटील, महादेव प्रधान, निलेश धस, दत्ता भोकरे पाटील यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीस गेलेले दागिने तक्रारदारास परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
एखाद्याच्या घरी चोरी झाल्यानंतर चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळणे दुर्मिळ असते. मात्र खुलताबाद येथील भद्रा कॉलनीतील रहिवासी देविदास वामन बोडखे यांना ८५ हजारांचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत.
बोडखे यांच्या घरातून चोरांनी जून २०१५मध्ये सोन्याचे दागिने चोरले होते. त्याची तक्रार खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. हे चोरीस गेलेले ला३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या हस्ते देविदास बोडखे यांना परत करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शफिक शेख यांनी करून आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून एक नेकलेस, एक चैन व दोन अंगठ्या जप्त केल्या होत्या. कोर्टाच्या आदेशानंतर हे दागिने परत करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश अंभोरे, पोलिस हवालदार पठारे, प्रकाश मोहिते, पोलिस शिपाई हनुमंत सातपुते, महिला पोलिस शिपाई गायकवाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांनी स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती

$
0
0

नागरिकांनी स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती
मनपाच्या दुर्लक्ष; नवरात्रीच्या उत्सवावर नागरीकांत नाराजी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवरात्र उत्सव तोंडावर येऊनही मनपा प्रशासनाने रस्त्याचे काम न केल्याने अखेर नवाबपुरा भागातील नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
नवाबपुरा वॉर्ड क्रमांक ४६ येथे जगंदबा मातेचे मंदिर आहे. गेल्या २५ वर्षांपासून या ठिकाणी राजकमल सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. रस्त्यावर मंडप टाकून येथील महिला वर्ग रासदांडिया साजरा करतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ड्रेनेज लाइन व पाइपलाइन साठी हा रस्ता खोदून ठेवण्यात आल्यानंतर या रस्त्याची डागडुजी मात्र करण्यात आली नाही. सहा महिन्यांपूर्वी मनपाच्या वतीने या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, पावसामुळे तो वाहून गेल्यामुळे रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे.
नागरिकांकडून दुरुस्ती
नवरात्र उत्सव दोन दिवसांवर आला आहे. येथील राजकमल नवरात्र उत्सवाच्या वतीने नवरात्रोत्सवाची तयारी देखील करण्यात येत आहे. मात्र, रस्ता खराब असल्याने येथील नागरिकांनी स्वखर्चाने या रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. यामध्ये जयसिंह होलिये यांनी पुढाकार घेतला. या कामी त्यांना जेष्ठ नागरिक नारायणसिंह होलिये, रत्तीसिंह चिरोटे, नीलेश चिरोटे, अनिल उने, प्रताप पवार, गोपालसिंह चिरोटे, मनोज चिरोटे आदींचे सहकार्य लाभले.

जगदंबा मातेचे येथे मंदिर प्राचीन आहे. नवरात्रीच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसेच महिला रात्री रासदांडिया खेळण्यासाठी येतात. खराब रस्त्यामुळे त्यांना अडचण येऊ नये म्हणून स्वखर्चाने या रस्त्याच्या डागडुजीचे काम आम्ही केले.
जयसिंह होलिये - राजकमल नवरात्र महोत्सव समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पाणीपुरवठा वेल्डिंगवर

$
0
0

शहराचा पाणीपुरवठा वेल्डिंगवर

जलवाहिनीवर तब्बल सात हजार ठिकाणी जोडण्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२१९ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर तब्बल सात हजार ठिकाणी वेल्डिंग करण्यात आले आहे. याशिवाय दोन्हीही जलवाहिन्यांचे आयुष्यमान संपले असून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या केव्हाही निर्माण होऊ शकते, असा माहिती वजा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

शहराला जायकवाडीच्या नाथसागरातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी १९७५ - ७६ यावर्षी ५६ दशलक्ष लिटरची योजना तयार करण्यात आली होती. या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतर शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९९१ - ९२ यावर्षी १०० दशलक्ष लिटरची नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान १२१९ मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. ही जलवाहिनी आता १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी म्हणून ओळखली जाते. या जलवाहिन्यांची कार्यक्षमता आणि शहराची पाणी पुरवठा व्यवस्था याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी पाणी पुरवठा विभागाकडे माहिती मागितली. या विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही जलवाहिनीची कार्यक्षमता ३० वर्षांपर्यंत चांगली राहू शकते. त्यानंतर कार्यक्षमता कमी होत जाते. त्याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवर होतो.

१२१९ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंतची लांबी ४५ किलोमीटर आहे. जलवाहिनी टाकताना साडेपाच ते सहा मीटर अंतराने वेल्डिंग करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनीची दिशा बदललेली आहे, त्याठिकाणी दोन ते तीन जॉइंट टाकण्यात आले आहेत. या संपूर्ण जलवाहिनीवर सात हजार ठिकाणी वेल्डिंग करण्यात आले आहे. जेव्हा जेव्हा वेल्डिंग निखळते तेव्हा तेव्हा नव्याने वेल्डिंग करावे लागते. जलवाहिन्या खूप जुन्या झालेल्या असल्यामुळे नवीन पाइपचा तुकडा टाकून वेल्डिंग करावे लागते. मागील एक वर्षात नवीन पाइपचा तुकडा टाकून पाच ठिकाणी वेल्डिंग करण्यात आले आहे.

शहरासाठी जायकवाडीहून टाकण्यात आलेल्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे वय आता ४२ वर्ष झाले आहे. त्यामुळे या जलवाहिनीची कार्यक्षमता ५० टक्क्यांहूनही कमी झाली आहे, असे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. १२१९ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे वय २५ वर्षे झाले आहे. या जलवाहिनीची जाडी ठिकठिकाणी तीन ते चार मिलिमीटरने कमी झाली आहे. तरीपण आवश्यक देखभाल दुरुस्ती करून ही जलवाहिनी कमी क्षमतेने आठ ते दहा वर्षापर्यंत उपयोगात आणता येऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात पाणी पुरवठा योजना

- जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली - १९७५ - ७६ मध्ये

- जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत १२१९ मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली - १९९१ - ९२ मध्ये

- औरंगाबाद शहराची रोजची पाण्याची गरज - १९० ते १९५ एमएलडी

- जलवाहिन्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे जायकवाडीतून रोज उपसा करण्यात येणारे पाणी - १५० ते १५५ एमएलडी

- औरंगाबाद शहरापर्यंत प्रत्यक्ष येणारे पाणी - १२५ ते १३० एमएलडी

- गरजे पेक्षा कमी मिळणारे पाणी - ६० ते ७० एमएलडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडीचा मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना पायपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या अंगणवाडी- बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चातील महिलांनी आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा ताबा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे वाहन अडकून पडले. पोलिस आंदोलकांना हटवत नसल्याने वाहनातून उतरून जिल्हाधिकारी पायी निघाल्याने पोलिसांची त्रेधातिरपट उडाली. कॉ. राम बाहेती व पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला कसाबसा रस्ता तयार करून दिला. पण, रागावलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पायीच जाणे पसंद केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा दुपारी सव्वा दोन वाजता विभागीय आयुक्तालयावर धडकला, मोर्चातील नेत्यांची भाषणे सुरू झाल्यानंतर मोर्चातील महिला विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसल्याने संपूर्ण रस्ता अडवला गेला. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या. हा प्रकार तब्बल दीड तास सुरू होता.
आंदोलकांनी रस्ता अडवल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय उपायुक्त, अनेक अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांची वाहने आयुक्तालयात अडकून पडली. आंदोलनाच्या कालावधीत जेवणाची सुटी असल्यामुळे आयुक्तालयातील काही कर्मचाऱ्यांना खोळंबून राहावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनानंतर काही वेळात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे वाहन आले. त्या वाहनाला आंदोलकांनी वाट करून दिली, ही संधी साधून अनेक वाहनधारकांनी आयुक्तांच्या वाहनामागून वाहने काढून सुटका करून घेतली.

जिल्हाधिकारी म्हणाले...

वाहनातू उतरून पायी निघालेले जिल्हाधिकारी पोलिसांना म्हणाले, मी जनतेमधील माणूस आहे. या घटनांमुळे मला फरक पडत नाही. मात्र, मी जिल्हाधिकारीही आहे; माझा रस्ता कोणीही अडवू शकत नाही. पोलिसांच्या नियोजनाबद्दल अडचण नाही, असा टोमणा मारल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी खजिल झाले.

पर्यायी मार्गाचा विचार

आयुक्तालयावर धरणे, आंदोलन आयोजित केल्यानंतर रस्ता बंद होतो. आंदोलन संपेपर्यंत अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना अडकून पडावे लागते. बुधवारी घडलेला प्रकार समजल्यानंतर पर्यायी रस्ता करण्याबद्दल विचार करणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम फेरीला मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नाही. शहरातील १०२ कॉलेजांमधील दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. अनुदानित कॉलेजांमधील यात सर्वाधिक जागांचा समावेश आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने सोमवारी रिक्त जागांची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर मंगळवारपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व थेट कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण, एटीकेटी, भरलेल्या अर्जात त्रुटी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी आहे. रिक्त जागांच्या तुलनेत विद्यार्थीच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. पहिल्या दिवशी एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्याची नोंद नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फेरीत किती प्रवेश होतील यावर प्रश्नचिन्ह आहे. अद्याप शहरातील कॉलेजांमध्ये दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक तीन हजार ७७४ कला शाखेच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर विज्ञान विषयाचा क्रमांक लागतो. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत या फेरीमध्ये ऑनालाइन अर्ज भरून याचदरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. नऊ जूनपासून प्रक्रिया सुरू असून, चार महिने प्रक्रिया चालते आहे. त्यानंतर ही रिक्त जागांचा आकडा मोठा आहे.

‘एटीकेटी’ ५९४
दहावीत दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सवलत देत अकरावीला प्रवेश दिला जातो. २०११पासून योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो आहे. यंदा ऑनलाइन प्रक्रियेत पहिल्या टप्प्या या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. नियमित फेरीनंतर या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यासह अंतिम फेरीतही या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष फेरीमध्ये एटीकेटी मिळालेल्या ५९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

एकूण कॉलेज....१०२
प्रवेश क्षमता......२४११०
रिक्त...............१००४१

रिक्त जागा
कला शाखा..... ३७७४
वाणिज्य...........१३१७
विज्ञान.............३६१८
एमसीव्ही..........१३३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांचे ऑनलाइन दर वाढले

$
0
0

बँकांचे ऑनलाइन दर वाढले
ऑनलाइन-‌डीजिटल पेमेंटला अडचणी
म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑनलाइन व्यवहार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरीता एनईएफटी आणि आटीजीएसचे दर कमी करण्यापेक्षा वाढवण्यावर बँकांनी भर दिला आहे. विशेषत: स्टेट बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांनी एनईएफटी आणि आरटीजीएस चार्जेसमध्ये वाढ केली आहे.
यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक भुर्दंड पडू लागला आहे. यामुळे डिजिटल पेमेंट सर्व्हिसला अडचणी येत आहेत. हा फटका जीएसटीमुळे वाढला असल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत. ऑनलाइनला किती शुल्क आकारले जातील याचा चार्टच शहरातील एसबीआयच्या सर्वच कॅश काऊंटरवर लावले आहेत.
एनईएफटीसाठी लागणारे दर
ट्रॅन्झॅक्शन्स प्रकार....... आता आकारले जाणारे चार्जेस...... आधी आकारले जाणारे चार्जेस

दहाहजार रुपयांपर्यंत...........२ रुपये ९५ पैसे.........१ रुपया फक्त

१० हजार १ लाख..............५ रुपये ९० पैसे.................३ ते ४ रुपये

एक लाख ते २ लाखापर्यंत............१७रुपये ७० पैसे.............१५ ते १५.५० रुपये

२ लाखावरील रक्कमेसाठी..... २९रुपये ५ पैसे............ २५ ते २६ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images