Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नडमध्ये दिग्गजांना धक्का

$
0
0

कन्नडमध्ये दिग्गजांना धक्का
म. टा. प्रतिनिधी कन्नड दि.९ : - तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत दिग्गजांच्या पॅनलला धक्का बसला. पं. स. माजी सभापती हर्षाली मुठ्ठे, बाजार समितीचे माजी उपसभापती गणेश शिंदे यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील हिवरखेडा नांदगीरवाडी येथील सरपंचपदाचे उमेदवार शेकनाथ आसाराम बडदे यांनी प्रतिस्पर्धी शहा दिलावर कडू यांचावर अवघ्या तीन मतांनी विजयी मिळविला. डोणगाव येथील सरपंचपदाचे उमेदवार जयश्री युवराज शेजवळ यांनी सुनीता रंगनाथ बनकर यांचा तीन मतांनी पराभव केला.
तालुक्यातील आडगाव जेहूर येथील सदस्यपदासाठी प्रभाग १ मधील मीनाबाई विष्णु पवार व मंगलबाई बाळू झिमन या दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने अरविंद राठोड या मुलाच्या हाताने चिठ्ठी काढून यामध्ये मंगलबाई बाळू झिनम यांना विजयी घोषित करण्यात आले. सरपंचपदाच्या निवडणुकीत वडनेर, देवपूळ, भोकनगाव, सारोळा, वासडी, भारंबा, डोणगाव येथे मोठी चुरस पाहवयास मिळाली. कन्नड शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांच्या मेहगाव तर मा. आ. किशोर पाटील यांना चिंचखेडा खुर्द मध्ये त्यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडीतून सोडले गोदावरीच्या पात्रात पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाशिक जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे सोमवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे दहा दरवाजे अर्ध्या फूटाने उघडून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
सध्या जायकवाडी धरणात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे हा साठा कायम ठेऊन येणारे पाणी सोडण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सरासरी ५०० ते ६०० क्युसेक आवक सुरू होती. त्यानुसार तेवढे पाणी सोडण्यात येत होते. पण, रविवारी रात्री नाशिक जिल्हा व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडल्याने नांदूर मधमेश्वरमधून १७०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. हे पाणी सोमवारी रात्री जायकवाडी धरणात येणार असल्याने जलसंपदा विभागाने सोमवारी संध्याकाळी सहा वाजता दहा दरवाजे उघडून पाणी सोडले. रात्री धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग कमी,अधिक केला जाईल, असे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्री-आयएएस ट्रेनिंगची ४ नोव्हेंबरला परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी ४ नोव्हेंबर रोजी प्रवेशपात्रता परीक्षा होणार आहे. यूपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात दरवर्षी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षीसाठी ४ नोव्हेंबरला प्रवेशपात्रता परीक्षा होत आहे. एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये १० अल्पसंख्याक, तर १० विद्यार्थ्यांना ‘बार्टी’च्या कोट्यातून प्रवेश दिला जातो. ‘सामान्य अध्ययन आणि अॅप्टिट्यूड टेस्ट’ पेपर होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत घेतली जाणारी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची व निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. preiasaurangabbad.org या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रवेशअर्ज भरतेवेळी ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्राचा लाभ द्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागसेनवनच्या वैभवाचे हेरिटेज वॉकमध्ये दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून उभारलेला नागसेनवन परिसर पाहताना तरुणाईचे भान हरपले. मिलिंद महाविद्यालय, ग्रंथालय, अजिंठा वसतिगृह, मिलिंद हायस्कूल या वास्तू पाहत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. ‘आंबेडकर हेरिटेज वॉक’ तरुणाईच्या सहभागाने लक्षवेधी ठरला.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभाग आणि भारतीय पर्यटन विकास मंडळाने ‘आंबेडकर हेरिटेज वॉक’ घेतला. मिलिंद महाविद्यालय येथून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता हेरिटेज वॉक सुरू झाला. मिलिंद महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य मोहम्मद शफी, ‘आयटीडीसी’च्या भावना शिंदे व पर्यटन प्रशासन विभागाच्या डॉ. राजेश रगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद महाविद्यालय स्थापन करण्यामागील आंबेडकरांची भूमिका रगडे यांनी विशद केली. मिलिंद महाविद्यालय, वस्तूसंग्रहालय, ग्रंथालय, अजिंठा वसतिगृह, मिलिंद हायस्कूल, बोधीवृक्ष, राउंड वसतिगृह या वास्तू पाहिल्यानंतर विद्यापीठ प्रवेशद्वार येथे ‘हेरिटेज वॉक’चा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. माधुरी सावंत, प्रा. सुभाष जाधव, प्रा. संदीप कापसे, बाबासाहेब जोगदंड आणि हर्षदा सातघरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणूक; भाजपचा शिरकाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांतील १७१० ग्रामपंचायत निवडणुकांची सोमवारी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये भाजपने अनेक ठिकाणी मुसंडी मारत यश मिळवले. शिवसेनेनेही आगेकूच कायम ठेवत मराठवाड्यात कडवे आ‍व्हान असणार असल्याचे दाखवून दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे.
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा पहिला टप्पा शनिवारी पार पडला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील १७१० ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले होते. यावेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीची उत्सुकता होती. ग्रामपंचायत निवडणुकीतही मोदी फॅक्टर चालणार की जनता विरोधात जाणार ? याबाबत दावे-प्रतिदावे केले जात होते. सरपंचपदाची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली नसल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या जागांच्या विजयाचे दावे केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना, जालना भाजप, परभणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, नांदेड काँग्रेस आणि शिवसेना, लातूरमध्ये भाजप व काँग्रेस, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप, तर हिंगोलीत सत्ताधारी आमदारांनी आपापले गड राखले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ जागी शिवसेनेचे सरपंच

$
0
0

पैठणमध्ये संमिश्र कौल; भाजपला नाकाराले
१३ जागी शिवसेनेचे सरपंच, आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात, मतदारांनी समिश्र कौल दिला. शिवसेना व राष्ट्रवादी समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत झाली तर भाजप समर्थित पॅनलला ग्रामीण भागातील मतदारांनी नाकारल्याचे चित्र निकालावरून पहावयास मिळाले.
सोमवारी तहसील कार्यालय येथे १२ टेबलावर व सात फेऱ्यात जवळपास दोन तासांत मतमोजणी पूर्ण झाली. अपेक्षेप्रमाणे या २२ ग्रामपंचायत २२ ग्रामपंचायती पैकी देवगाव, धनगाव, दिन्नापूर, हिरापूर, कृष्णापूर, शेकटा, तारूपिपळवाडी, वरवडी, मुधलवाडी, सालवडगाव, कुरणपिपरी, बिडकीन व जाभळी या १३ ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे सरपंच निवडून आल्याचा दावा आमदार संदीपान भुमरे यांनी केला आहे.
बोकुड जळगाव, वरवंडी, पोरगाव, गेवराई बाशी, धुपखेडा, चिंचाळा, आडूळ व नारायणगाव या आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादी समर्थित पॅनलच्या ताब्यात आल्याची माहिती माजी आमदार संजय वाघचौरे यांनी दिली. भाजप व काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत अपेक्षेप्रमाने यश मिळाले नाही. भाजप व काँग्रेस पुरस्कृत पॅनलला अनुक्रमे टाकली पैठण व नांदर या प्रत्येकी एकच ग्रामपंचायत जिंकता आली.
सरपंच पदी विजयी झालेले उमेदवार आडुळ ः शेख शमीम नासेर, बोकुड जळगाव -रामेश्वर शंकर लोखंडे, चिंचाळा - सतिष मुरलीधर काळे, दरेगाव - मंगल रामलाल कोठुळे, धनगाव - मीराबाई बापूसाहेब कातबने, धुपखेडा - कैलास यादवराव वाघचौरे, दिन्नपूर - बाबुराव माणिकराव खाटीक, गेवराई बार्शी - सुकन्या सखाराम वाघ, हिरापूर - इंदूबाई प्रभाकर लेंडे, जांभळी - गणेश शामा राठोड, कृष्णापूर - विष्णू बाबासाहेब जाधव, नांदर - मीना किशोर वैद्य, नारायणगाव - संजय श्रीमंत गवळी, पोरंगाव - दत्तात्रय मनोहर रंगदाळ, शेकटा - एकनाथ रंगनाथ भवर, टाकळी पैठण - महेश बाबासाहेब सोलाटे, तारू पिंपळवाडी - शिवाजी कल्याण कणसे, वरवंडी खुर्द - अशोक नांहुसिंग राठोड, मुधलवाडी - काकासाहेब बाबासाहेब बर्वे, सालवडगाव - चंद्रकला अंगद दळवे, कुरानपिंप्री - आस्मा रफीक पटेल
बिडकीन - सारिका मनोज पेरे
तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या बिडकिन ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लागले होते. येथे मनोज पेरे गटाने बाजी मारली. त्यांच्या पत्नी सारिका पेरे यांनी विरोधी गटाच्या उषा धर्मे यांचा १२५२ मतांनी पराभव केला. तर ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदारांच्या गटाच्या विरोधात कौल देण्याची परंपरा आडूळच्या गावकऱ्यांनी याही निवडणुकीत कायम ठेवली. आमदार गटाच्या सिंधुताई पिवळ यांचा विरुद्ध गटाच्या शमीम शेख यांनी २१२ मतांनी पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
येथील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याच फटका अंपग, वृद्ध व रुग्णांना बसत आहे. फलाट क्रमांक एकवरील बंद असलेल्या लिफ्टकडे रेल्वे विभागाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. फलाटांवर जाण्यासाठी दोन दादरे आहेत. त्यापैकी एका दादऱ्यावर सरकता जिना व दुसऱ्यावर लिफ्ट बसविण्यात आली आहे. फलाट क्रमांक एकवरील मनमाडकडील दिशेच्या दादऱ्यावर व फलाट क्रमांक दोनवर लिफ्ट आहे. मनमाडहून नांदेड किंवा पूर्णाकडे जाणाऱ्या सहा रेल्वे फलाट क्रमांक दोन आणि तीनवर उभ्या केल्या जातात. त्यामुळे या दोन्ही दादऱ्यावरून चढ उतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
फलाट क्रमांक एक वरील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अपंग, वृद्ध, महिला व रुग्णांना पायऱ्या चढून दुसऱ्या फलाटावर जावे लागते. लिफ्ट सुरू करण्याबाबत अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी पाठपुरावा केला. पण, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरमध्ये ३५ पैकी २० जागेवर भाजपाचे सरपंच

$
0
0

गंगापूरमध्ये ३५ पैकी २० जागेवर भाजपाचे सरपंच
म. टा. प्रतिनिधी, वाळुजमहानगर ः
गंगापूर तालुक्यात ३५ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. त्यातील २० सरपंच भाजपाचे असल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला दावा केला आहे. यापूर्वी टेंभापुरीमध्ये हिरा राधू सोनवणे, हैबतपूरात विठ्ठल शहादू काकडे, ढोरेगावात दिलीप रामभाऊ कांबळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ३२ ग्रामपंचायतीचे निकाल आज लागले.
जसजसे निकाल लागत होते तसे कार्यकर्ते गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारचे स्वागत करत होते. लिंबेजळगाव सय्यद अनिस अमीर, पेंडापूर बाळु बाबासाहेब एटकर, सुल्तानाबाद नवनाथ ओंकार गायके, अगरवाडगाव भाडसाहेब कुंडलिक नवरंग, मुद्देशवाडगाव नामदेव धोंडीराम दारूंटे, सिरजगाव कवीता बाबासाहेब कान्हे, वजनापूर उमादेवी प्रतापराव चव्हाण, भोयगाव ज्योती सतीष डेडवाल, बुट्टेवाडगाव ताराबाई वसंत खेडकर, पूरी हिराबाई मधुकर मोरे, दिघी रमेश कुंडलिक म्हसरूप, गवळीशिवरा अशोक दामोधर फाळके, शंकरपूर कहाटे देवचंद हिरालाल, टाकळी कदीम चंदेल अल्काबाई शिवाजी, शिवराइ गवळी पुष्पा ज्ञानेश्वर, दिनवाडा ठोंबरे गणेश हंसराज, आंबेगाव साखळकर मनोहर मुरलीधर, खडक नाराळा शिंदे नंदाबाई साहेबराव, सिंधी सिरजगाव तुपे सरस्वती साईनाथ, गळनींब कुढारे सुदंरलाल लक्ष्मण, शहापूर शिंदे श्रीमंत चंद्रभान, देवळी कऱ्हाळे रामकिसन शाह, सिरेसायगाव कांबळे र्इंदुबाई विश्वनाथ धामोरी बु शेळके आशामती गोरखनाथ, मोहोली यादव हिराबाई हरी सोलेगाव पवार कैलास रघुनाथ, पिंपरखेडा शिंदे सुवर्णा उत्तम, मलकापूर जाधव हिराबाई बाबासाहेब, लखमापूर खेडकर कवीता श्रीकांत, कोडापूर राउत विठ्ठल साहेबराव, नंद्राबाद पठाण शमाबी गुलाब, गुरूधानोरा साळवे दिलीप यादव असे निवडून आलेल्या सरपंचाची नावे आहेत.
दुपटीने जागा वाढल्याचा सेनेचा दावा
यापूर्वी ३५ पैकी आठ ग्रामपंचायती आमच्याकडे होत्या. या निकालात आमच्या जागा दुपटीने वाढल्याचा दावा शिवसेना तालुका प्रमुख दिेनेश मुथा यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिसभा निवडणुकीचा वाद चिघळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक रखडल्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. एका राजकीय गटाचे हितसंबंध सांभाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासन मुद्दाम विलंब करीत असून मतदारयादीतून प्रतिस्पर्धी पॅनलचे मतदार वगळण्यासाठी काही प्राध्यापक प्रयत्नशील असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेने अडचणीत सापडलेले कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अखेर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेणार असल्याचे जाहीर केले.
दोन महिन्यानंतर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले होते. ऑक्टोबर महिना निम्मा उलटल्यानंतरही निवडणूक प्रक्रिया वेग घेत नसल्याने प्राध्यापक संघटना आक्रमक झाल्या आहेत. मतदारयादी जाहीर करण्याच्या पहिल्या टप्प्यातच निवडणूक प्रक्रिया रेंगाळली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र निवडणूक विभाग कार्यरत झाला. मात्र, या विभागाचे काम संथ गतीने सुरू आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत निवडणूक घेऊन सप्टेंबर महिन्यात नवे प्राधिकरण अस्तित्वात येईल, असे शासन निर्देशात म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तांत्रिक अडचणी दाखवत निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकली. ऑक्टोबर महिन्यात वेळापत्रक जाहीर करून नोव्हेंबर महिन्यात प्राधिकरण अस्तित्वात येईल असे कुलगुरूंनी सांगितले होते. कुलगुरू दौऱ्यावर असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प आहे. निवडणूक प्रक्रियेच्या बैठकसुद्धा नियमित नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पदवीधर प्रवर्गातील मतदारयादी प्रसिद्ध झालेली नाही. तदर्थ प्राध्यापक आणि एमबीबीएस पदवीधारकांना वगळण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ‘बामुक्टा’ने केला आहे. यापूर्वी महिला मतदारांना नावाच्या तफावतीमुळे वगळण्यात आले होते. मात्र, आक्षेपानंतर कागदपत्रे मागवून पुन्हा यादीत समाविष्ट करण्यात आले. दोन राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेल्या प्रतिस्पर्धी पॅनेलची चुरस वाढली असून निवडणुकीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठ प्रशासन एका गटाचे हितसंबंध राखत असल्याचा आरोप झाल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावरून सोमवारी परतलेले कुलगुरू डॉ. चोपडे यांची प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवडणूक लवकर घेण्याची मागणी केली. मंगळवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळपर्यंत मतदारयादी आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ४० दिवसात निवडणूक घेणे बंधनकारक असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे.

‘बामुक्टा’ संतप्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टा) सोमवारी कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन देऊन तातडीने निवडणूक घेण्याची मागणी केली. नवीन विद्यापीठ कायदा २०१६ नुसार राज्यातील सर्व विद्यापीठांनी ३१ ऑगस्टपर्यंत प्राधिकरणाच्या निवडणुका घेऊन एक सप्टेंबर २०१७ पर्यंत नवीन अधिकार मंडळे अस्तित्वात आणण्याचे शासन निर्देश होते. मात्र, आपण सातत्याने प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई दाखवत निवडणूक लांबवल्याची शंका येते असे ‘बामुक्टा’ने निवेदनात म्हटले आहे. मतदारयाद्या छाननी प्रक्रियेत अडकल्या आहेत. निवडणुकीच्या विलंबास जबाबदार व्यक्तीला प्राध्यापकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे निवडणूक लवकर घोषित करावी. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल असे ‘बामुक्टा’च्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना सांगितले. यावेळी डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. अंकुश कदम, डॉ. राजेश करपे, डॉ. एम. जी. शिंदे, डॉ. एफ. एस. पठाण, डॉ. मधुकर चाबसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय अभियांत्रिकी 'एनबीए'ला जाण्‍ाार सामोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी कॉलेज ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’ला (एनबीए) सामोरे जाणार आहे. कॉलेजचे दोन पदवी, एक पदव्युत्तर विभाग या प्रक्रियेतून जाणार आहेत. ‘नॅक’च्या तुलनेत ‘एनबीए’ची प्रक्रिया सक्षम असल्याचे मानले जाते.
शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल हे पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तरस्तरावरील अप्लाइन मेकॅनिक्स हे विभाग एनबीएला समोरे जात आहेत. १३, १४ व १५ ऑक्टोबर, असे ‌तीन दिवस एनबीए टीम कॉलेजमध्ये येत असल्याने कॉलेजमध्ये लगबग सुरू आहे. हे कॉलेज २०१३पासून एनबीएसाठी प्रयत्न करत होते. यासाठी सर्व विभागांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते पण, तीनच विभाग प्रक्रियेसाठी पात्र ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. जागतिक पातळीवरील अभियांत्रिकी शिक्षणाचा विचार करत ‘एनबीए’ने २०१३पासून निकषांमध्ये बदल केले आहेत. पायाभूत सुविधांसह, पात्र शिक्षक, शैक्षणिक उपकरणांचा उपयोग, प्लेसमेंटची स्थिती, टिचिंग अँड लर्निंग अशा विविध पातळीवर शाखानिहाय तपासणीची प्रक्रिया होते. त्यानंतर संबंधित शाखेची गुणवत्ता ठरविली जाते.

अभियांत्रिकी कॉलेजांची ‘नॅक’ला पसंती

अभियांत्रिकी कॉलेजांना एनबीए करणे आवश्यक असताना अनेक कॉलेज ‘नॅक’ला पसंती देतात. नॅकतर्फे पूर्ण संस्थेचे अॅसेसमेंट करून श्रेणी दिली जाते. ‘एनबीए’ शाखानिहाय केले जाते. तसेच निकषही अतिशय कोटेकोर असतात त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेज एनबीए न करता ‘नॅक’कडे वळतात.

इंजिनीअरिंगसाठी ‘एनबीए’ अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याला जागतिक पातळीवर मान्यता आहे. ‘नॅक’ मिळवणं सोपे आहे परंतु, एनबीएची प्रक्रिया खडतर असते. नॅकमध्ये पूर्ण संस्थेसाठी तर एनबीएची प्रक्रिया एका शाखेपुरतीच होते.
-डॉ. प्राणेश मुरनाळ, प्राचार्य,
शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील ११७१ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ग चार संवर्गातील एक हजार १७१ कर्मचाऱ्यांना १२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात आली. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर दरमहा २१ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. या कर्मचाऱ्यांना एक वेतनश्रेणी मिळणार आहे.

या मागणीसाठी बहुजन कामगार शक्ती महासंघातर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. महासंघाचे मार्गदर्शक किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष अशोक हिवराळे, सचिव कैलास जाधव यांनी समयश्रेणी लागू करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. आयुक्त डी. एम. मुगळीकर व उपायुक्त अय्युब खान यांनी कालबद्ध पदोन्नती लागू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन सोमवारी निर्णय जाहीर केला. त्यानंतर महासंघातर्फे मुगळीकर व अय्युब खान यांचा सत्कार करण्यात आला. २४ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीसंदर्भात मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. ८६ कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

सफाई कामगारांना २२०० रुपये
सिडको हडको भागात बचतगटाच्या माध्यमातून साफसफाईचे काम करणाऱ्या कामगारांना दोन हजार २०० रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय सोमवारी महापौर भगवान घडमोडे व आयुक्त मुगळीकर यांनी जाहीर केला. कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांच्या नेतृत्वाखाली यासाठी पालिकेच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली. निर्णय जाहीर झाल्यावर आतषबाजी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत कमळ फुलले

$
0
0

फुलंब्रीत कमळ फुलले
१७ पैकी १० ग्रामपंचायतीत भाजपकडे सरपंचपद
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री ः
फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले अाहे. १७ ग्रामपंचायतपैकी भाजपला दहा, काँग्रेसला तीन, शिवसेनेला दाेन, अपक्ष एक व एक रिक्त असे बलाबल राहिले अाहे. ममनाबाद येथे सरपंच पद रिक्त अाहे.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतमध्ये खामगांव, पाथ्री, बिल्डा या ग्रामपंचायती सर्वत्र चर्चेत हाेत्या. येथे भाजप व काँग्रेस अशी लढत हाेती. या तिन्ही ग्रामपंचायती भाजपने बळकावल्या अाहेत. अाळंद ही एक माेठी ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली अाहे. मुर्शिदाबाद वाडी येथे काँग्रेस सदाशिव विटेकर हे सरपंच म्हणून विजयी झाले. मात्र, त्यांचे सर्व पॅनल पराभूत झाले. पराभूत उमेदवारात काँग्रेस तालुकाध्यक्ष सुदाम मते यांच्या पत्नी पराभूत झाल्या. तेथे भाजपचे कांताबाई सांडू जाधव या विजयी झाल्या. पाथ्री येथे जेष्ठ नेते द्वारकादास पाथ्रीकर यांचे चिरंजीव वरूण पाथ्रीकर यांचा पराभव झाला तर जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर यांचे चिरंजीव महेंद्र पाथ्रीकर हे विजयी झाले. खामगांव येथे खरेदी-विक्री संघाचे सभापती-अाबाराव साेनवणे यांच्या पत्नी शकुंतला साेनवणे यांचा ९०० मतांनी पराभव झाला येथे भाजपच्या नंदा मनाेहर साेनवणे या विजयी झाल्या.
विजयी सरपंच उमेदवार
गेवराई पायगा:- सरपंच ः सुषमा दिलीप जैस्वाल (भाजपा), शेवता खुर्द-बुद्रुक:- सरपंच ः जनाबाई राजु काळे (भाजपा), बिल्डा ः सरपंच ः कांताबाई सांडू जाधव (भाजप), चिंचाेली बु ः सरपंच- मिना विलास मते (शिवसेना), मुर्शिदाबाद वाडी ः सरपंच - सदाशिव माणिकराव विटेकर (काँग्रेस), गेवराई गुंगी ः सरपंच - अमाेल सुरेश डकले (काँग्रेस), वावना-पाडळी - सरपंच - साेमनाथ खुशालराव जाधव (शिवसेना), नरला - भावडी ः सरपंच- अरूण गंगाराम तुपे (भाजपा), अाळंद-नायगव्हाण ः सरपंच - भारती अजीनाथ शेळके (काँग्रेस), उमरावती ः सरपंच - तसलीमबी अक्रम पठाण (भाजप), पिरबावडा ः सरपंच - लिलाबाई संजय काळे (अपक्ष), शेलगांव-जानेफळ-ममुराबाद ः सरपंच - कृष्णा रामराव गावंडे (भाजपा), विरमगांव ः सरपंच - शाेभा भिकन कापसे (भाजपा), पाथ्री ः सरपंच - महेंद्र शिवाजीराव पाथ्रीकर (भाजपा), वाघलगांव ः सरपंच - विमल दत्तात्रय काकडे (भाजपा), ममनाबाद ः सरपंचपद रिक्त. खामगांव ः सरपंच - नंदा मनाेहर साेनवणे (भाजपा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा संप; दोन हजार ट्रक थांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जीएसटी आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांच्या देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शहरात ७० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरात दोन ते अडीच हजार ट्रकमधून होणारी मालवाहतूक बंद राहिली. यामुळे ३० ते ३५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा, ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे.
ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आवाहनानुसार सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपात सहभागी असलेल्या औरंगाबादमार्गे जाणाऱ्या ट्रक वाळूज एमआयडीसीमधील ट्रक टर्मिनलमध्ये उभ्या करण्यात आल्या. याशिवाय बीड बायपास आणि नगररोडवर ठिकठिकाणी, वाळूज, शेंद्रा येथील कंपन्यांच्या बाहेर ट्रक पार्क करण्यात आल्या.
दरम्यान, शहरातील मालवाहतूकदारांनी ७० टक्के कंपन्यांमधून माल लोड केला नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मालवाहतूकदारांचे अंदाजे सात ते नऊ कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाला. याशिवाय वाहतूकदारांवर अवलंबून असलेल्या उद्योग, व्यवसायाचे ३० ते ३५ कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सांगितले.
दरम्यान, बीड बायपास रोड, नगररोडवरून परराज्यातील व जिल्ह्यात ट्रक वाहतूक सुरू होती. आंदोलनाची संधी साधून अनेकांनी ट्रकची दुरुस्ती करून घेतली.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दोन ते अडीच हजार ट्रकची वाहतूक बंद राहिली. पहिल्याच दिवशी आंदोलनाला ७० टक्के यश मिळाले. या आंदोलनची शहरात मंगळवारी तीव्रता वाढेल.
-फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको, हडको भागातील बहुतांश वसाहतींसह जयभवानीनगरला गेल्या पाच, सहा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्यामुळे सोमवारी या भागातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक नागरिकांसह सिडको एन - पाच येथील जलकुंभावर धडकले. संतापलेल्या नागरिकांनी जलकुंभाच्या परिसरात उभे असलेले पाण्याचे टँकर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी टँकरची हवा सोडली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अटोक्यात आली. योग्य प्रकारे नियोजन करून पाणीपुरवठा करण्याचे यानंतर ठरविण्यात आले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी देखभाल दुरुस्तीसाठी ३६ तासांचा मेगाशटडाउन घेतला. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, परंतु त्यापूर्वी पासूनच सिडको एन - पाच, एन - सहा, एन - सातमधील विविध भागांना व जयभवानीनगरला पाणीपुरवठा होत नव्हता. शटडाउननंतर पाणीपुरवठा केव्हा सुरळीत होईल, याची शाश्वती नसल्यामुळे या भागातील नागरिक भाजपचे नगरसेवक शिवाजी दांडगे व मनिषा मुंडे, बाळासाहेब मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सिडको एन पाच येथील जलकुंभाच्या परिसरात जमा झाले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्याबद्दल जाब विचारला, पण कर्मचारी त्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फोन लावला व जलकुंभावर येण्याचे सांगितले, परंतु अधिकारी लगेचच आले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी जलकुंभाच्या परिसरात उभे असलेले टँकर पेटवण्याचा प्रयत्न सुरू केला, काहीजणांनी टँकरची हवा सोडली. दरम्यानच्या काळात पोलिस दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जलकुंभाच्या परिसरात दाखल झाले. तत्पूर्वी आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक नितीन चित्ते, दिलीप थोरात हे देखील जलकुंभाच्या परिसरात आले. त्यांनी नागरिक व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या पाच, सहा दिवसांपासून पाणीपुरवठा न झालेल्या परिसरात तात्काळ पाणीपुरवठा करण्याचे आदेश सावे व घडमोडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

सावे यांच्या कार्यालयात बैठक
आंदोलनानंतर आमदार अतुल सावे यांच्या बजरंगचौक येथील संपर्क कार्यालयात महापौर, भाजपचे नगरसेवक व पालिकेचे अधिकारी यांची बैठक झाली. सिडको, हडकोसह जयभवानीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी सावे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सणासुदीच्या काळात पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडमध्ये भाजप, काँग्रेसचे दावे प्रतिदावे

$
0
0

सिल्लोडमध्ये भाजप, काँग्रेसचे दावे प्रतिदावे
म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड ः सिल्लोड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत १८ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकाद्वारे काँग्रसने केला आहे तर १८ पैकी १२ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
काँग्रेसच्या दाव्यानुसार चारनेर, मोढा बुद्रुक, खुल्लोड,बोरगाव बाजार, सावखेडा, जळकी बाजार, जांभई, रेलगाव, सारोळा या ग्रामपंचयाती ताब्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर भाजपाच्या दाव्या नुसार शिंदेफळ, निल्लोड,पिंपळगाव पेठ, बोरगावकासारी, पिंपळदरी, धोत्रा,रेलगाव,मोढा(खुर्द),हट्टी-मोहळ,कासोद-धामणी,जांभई सारोळा, या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपाच्या पक्ष कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचा सत्कार प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,सभापती ज्ञानेश्वर तायडे,कारखान्याचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी, डॉ. मच्छिंद्र पाखरे,कमलेश कटारिया, गजनान राऊत यांनी केले तर कॉग्रेसच्या पक्ष कार्यालयात नगराध्यक्ष समीर सत्तार, शांतीलाल अग्रवाल, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती नंदकिशोर सहारे यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांडकीकरांचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
न्यायालयाचे आदेश असताना देखील महापालिकेने नारेगाव येथील कचरा डेपोचे अद्याप स्थलांतर केले नाही. कचऱ्यामुळे नागरिकांचे आोरग्य धोक्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत (१३ ऑक्टोबर) कचराडेपो स्थलांतरित केला नाही, तर कचऱ्याची एकही गाडी नारेगावात येऊ देणार नाही, असा इशारा मांडकीच्या नागरिकांनी महापालिकेच्या प्रशासनाला दिला. नागरिकांनी पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या दलनाच्या समोर ठिय्या आंदोलन केले.

नारेगाव येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्याबद्दल नारेगाव, मांडकीसह परिसरातील नागरिक महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. वेळोवेळी नागरिकांनी आंदोलन देखील केले आहे, पण आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी पालिकेत येऊन ठिय्या आंदोलन केले. त्यांनी आयुक्त मुगळीकर यांना निवेदन सादर केले. निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, कचराडेपोच्या स्थलांतराचे आदेश कोर्टाने २००३मध्येच महापालिकेला दिले आहेत, पण महापालिका या आदेशाकडे लक्ष देत नाही. कचराडेपो अद्याप स्थलांतरित केला नाही. त्यामुळे मांडकी, अंतापूर, गोपाळपूर, दौलतपूर, सहजतपूर, रामपूर, महालपिंप्री, कच्चेघाटी, पिरवाडी, वरूड, सुलतानपूर, पिसादेवी, पोखरी, पळशी, चिकलठाणा, ब्रीजवाडी, शिंदीबन, चौधरी कॉलनी या भागातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या तीन दिवसांत महापालिकेने कचरा डेपोसंदर्भात काही निर्णय घेतला नाही, तर १३ ऑक्टोबरपासून कचऱ्याची गाडी नारेगावच्या कचरा डेपोवर येऊ दिली जाणार नाही.

यावेळी मांडकी येथील मनोज गायके, साईनाथ चोथे, रवी गायके, अनिल दहिहंडे, भाऊसाहेब गायके, विठ्ठल गायके, बंडू गायके, भास्कर गायके, मोदीन शहा, कल्याण औटे, अशोक कुबेर, बाळू गायके, पुंडलिक गायके, रामेश्वर गायके यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमान पक्षाने खाते उघडले

$
0
0

खुलताबाद तालुक्यात आमदार बंब यांचा वरचष्मा
स्वाभिमान पक्षाने खाते उघडले
म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद ः तालुक्यातील १० पैकी ७ ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले. आमदार प्रशांत बंब यांचा या निवडणुकीत वरचष्मा दिसून आला. तालुक्यात भाजप सात, राष्ट्रवादी काँग्रेस एक, काँग्रेस एक, स्वाभिमान पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य निवडीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता श्री भद्रा मारुती भक्तनिवास सभागृहात पार पाडली. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडणूक झाल्याने सकाळपासून ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
भाजपचे पंचायत समिती उपसभापती गणेश जिजाबा अधाने व शिवसेनेचे संघटक गणेश भिकन अधाने यांच्या नेतृत्वाखालील विरमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत भाजपच्या सविता अधाने सरपंचपदी निवडून आल्या त्यांनी शिवसेना पुरस्कृत प्रियंका अधाने यांचा पराभव केला. तालुक्यातील १० पैकी ७ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. यात विरमगाव , पळसगाव, सुलीभंजन, कानडगाव, दरेगाव, पाडळी, येसगाव आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष
लोणी ता. खुलताबाद सरपंचपदासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षांचे सुदाम मामा सोनवणे यांच्या पॅनल मधील १० पैकी १० जागा जिंकून खाते उघडले आहे. सुदाम मामा सोनवणे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.
लोणी येथील प्रभाग क्रमांक एक मधील मंदाबाई ठोंबरे व ज्योती वाडेकर यांना २५६ समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे सोडत होऊन मंदाबाई ठोंबरे या विजयी झाल्या. विरमगाव येथील प्रभाग क्रमांक दोन मधील अनिता राजू अधाने व छाया देविदास अधाने यांना १२९ समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे सोडत होऊन छाया देविदास अधाने या विजयी झाल्या.
निवडून आलेले सरपंच
देवळाणा बुद्रुक अपक्ष नसरीन पठाण, विरमगाव भाजप सविता अधाने, कानडगाव भाजप स्वाती जाधव (बिनविरोध ), दरेगाव भाजप जयश्री बोर्डे, पळसगाव भाजप निमाबाई ताटू, मंदाबाई कर्दळ, लोणी स्वाभिमान पक्ष सुलतानबी शकील पटेल, सुलीभंजन भाजप सय्यद इलियास सय्यद युनूस, पाडळी भाजप बाबुराव वाहटूळे, चिंचोली राष्ट्रवादी कॉग्रेस ज्ञानेश्वर दुधारे, येसगाव भाजप सरुबाई खंडागळे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा महापौर युतीचाच; मुख्यमंत्र्यांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादचा आगामी महापौर शिवसेना-भाजप युतीचाच असेल, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत. या आदेशामुळे स्वतंत्रपणे महापौरपदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भाजपमधील नेते-पदाधिकाऱ्यांना चपराक बसल्याचे मानले जात आहे.
नांदेड येथील महापालिका निवडणूक प्रचार सभा आटोपून मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोमवारी रात्री आठ वाजता विमानतळावर आगमन झाले. थोडावेळ विमानतळावर थांबून ते पाथर्डीला रवाना झाले. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगरसेवक दिलीप थोरात, कचरू घोडके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौरपदाच्या निवडणूकीचा विषय निघाला असता, ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढवा, युतीचाच महापौर झाला पाहिजे,असे आदेश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी महापौरपद युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आले असून सेनेने नगरसेवक नंदकुमार घोडेले यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे भाजप व त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांना शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्पोरेट जगतात चॉकलेटला मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी कर्मचारी, पाहुणे सगळ्यांचे तोंड गोड करते. मग कार्पोरेट क्षेत्र तर मागे कसे असेल. आकर्षक पॅकिंगमधील ड्रायफ्रूट, मिठाई, चॉकलेट आणि भेटवस्तू यांना शहर-परिसरातील कारखाने, खासगी अस्थापना, शासकीय कार्यालये, राजकीय नेत्यांकडून मोठी मागणी असते. यातून चार दिवसांत कोट्यवधींची उलढाल अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या भेटवस्तूचे स्वरूप कॉर्पोरेट झालेले आहे. आकर्षक बॉक्समध्ये सजवलेले ड्रायफ्रूटस आणि मिठाई ग्राहकांना खुणावत आहे. मोठमोठी कार्यालये आणि कारखान्यांमधून बल्क स्वरुपात या गिफ्टची मागणी नोंदवली जाते. त्यामुळे एकाचवेळी मोठी उलाढाल होते. कॉर्पोरेट गिफ्टसाठी औरंगाबादचे मार्केट मुंबई - दिल्लीसह कोलकाता, इंदूर, भोपाळ, नागपूर या शहरांवर अवलंबून आहे. गिफ्टमध्ये मिठाईला मागणी आहेच, पण त्यापेक्षाही ड्रायफ्रूटला अधिक आहे. कारण ड्रायफ्रूट जास्त दिवस वापरता येऊ शकतात.

ड्रायफ्रूट बॉक्सची किंमत २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहे. बॉक्समध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार काजू, बदाम, पिस्ता, किसमिस, अंजीर, जर्दाळूचा समावेश केला जातो. दोनशे रुपयांच्या बॉक्समध्ये चार प्रकारचे ड्रायफ्रूट उपलब्ध करून दिले जातात. तीनशे रुपयांच्या बॉक्समध्ये सहा प्रकारचे ड्रायफ्रूटस मिळतात. दीड - दोन हजारांचा बॉक्स घेतल्यास बारा ते पंधरा प्रकारचे ड्रायफ्रूटस् उपलब्ध करून दिले जातात. चॉकलेटच्या गिफ्टबॉक्समध्ये मलेशियन चॉकलेटला अधिक मागणी आहे. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी चॉकलेट तुलनेने स्वस्त असतात. त्यांचे पॅकिंग देखील आकर्षक असते. चॉकलेटमध्ये मिल्क, हनी, कोकोनट, ऑरेंज फ्लेवरच्या चॉकलेटला अधिक मागणी आहे. कॅडबरी चॉकलेटस् देखील दिवाळी गिफ्ट म्हणून दिले जातात. चॉकलेटचा गिफ्ट पॅक १५० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ‘लूज चॉकलेटस्’ एक हजार रुपये किलो या दराने दिवाळी बाजारात उपलब्ध आहेत.

ड्रायफ्रुट बॉक्सच्या बरोबरीनेच मिठाई बॉक्सची मागणी दिवाळी गिफ्टसाठी आहे. १५० रुपयांपासून एक हजार रुपये किंमतीपर्यंतचे मिठाईचे गिफ्टबॉक्स उपलब्ध आहेत. एका बॉक्समध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार पाच प्रकारच्या मिठाईपासून पंधरा ते वीस प्रकारच्या मिठाईंचा समवेश केला जातो. त्यात प्रामुख्याने दुधापासून व काजूपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश असतो. काजू कमाल, दिलखूश बर्फी, काजू कजक, काजू कतली, सरमलाई, मुगदाल बर्फी, मिल्ककेक, कलाकंद, काजूरोल, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, पेढा आदी पदार्थांना दिवाळी गिफ्टसाठी मागणी असते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रूट गिफ्ट मार्केट थंड आहे. येत्या काही दिवसांत ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास वाटतो. ग्राहकांच्या मागणीनुसार गिफ्ट उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. - नरेंद्र कल्याणी, व्यापारी

मिठाईसाठी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. ग्राहक संतुष्ट व्हावा हा आमचा मुख्य उद्देश आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार चांगल्या दर्जाच्या व माफक किंमतीच्या मिठाई उपलब्ध आहेत. यंदा जीएसटीमुळे व्यवसायात थोडा फरक पडला आहे. - दीपक पवार, मिठाई व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीच्या बहाण्याने बनावट नोटा देऊन फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैसे भरण्यासाठी मदत करा, अशी विनंती करत ठगांनी दोघांच्या खऱ्या नोटा काढून घेऊन बनावट नोटा देत सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातला. हे प्रकार शनिवारी शनिवारी समर्थनगरमधील एक बँक व एटीएम सेंटरमध्ये घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अल्ताफ सत्तार (वय २५ रा. इंदिरानगर) हा तरू शनिवारी दुपारी समर्थनगरमधील एका बँकेत रक्कम भरण्यासाठी गेला होता. त्यावेली दोन अनोळखी तरूण त्याच्या जवळ आले व खात्यावर एक लाख ४० हजार रुपये भरायचे आहेत, पण आमच्याकडे ओळखपत्र नाही. त्यामुळे मदत करा अशी गळ घातली. अल्ताफ यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जवळील बनावट नोटा अल्ताफला दिल्या व तुझ्याजवळ नोटा आम्हाला दे, अशी गळ घालत ४५ हजार ६०० रुपये काढून घेतले. त्यानंतर ओळखपत्र घेऊन येतो, असे म्हणत दोघे निघून गेले. काही वेळाने अल्ताफने नोटा तपासल्या असत्या या बनावट असल्याचे आढळले. या घटनेच्या एका तासापूर्वी समर्थनगर परिसरातीलच एका एटीएम सेंटरमध्ये एका नागरिकालाही याचप्रकारे फसवण्यात आले. किसनराव दिपके (रा. दाभा, ता. जिंतूर, जि. परभणी) हे एटीएममधील सीडीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ दोन तरुणांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. आम्हाला बँकेत पावणेदोन लाख रुपये अर्जंट भरायचे ओळखपत्र नाही. त्यासाठी रक्कम भरण्यास मदत करा, असे सांगितले. त्यांच्याकडील पावणेदोन लाखांची रक्कम देत बोलण्यात गुंतवून ५८ हजाराच्या खऱ्या नोटा काढून घेत बनावट नोटा ठेवल्या. हे दोघे ओळखपत्र घेऊन येतो असे सांगत तेथून निघून गेले. फसवणूक झालेल्या दोघांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध
पोलिसांनी बँक व एटीएम सेंटरमधील संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आरे. त्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images