Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्जमाफी मिळाली नसल्याने आत्महत्या

$
0
0

वाळूज महानगरः गंगापूर तालुक्यातील पांढरओहळ येथील सीताराम राधाकिसन वल्ले (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने १८ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
वल्ले यानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होत. त्यांनी कर्जमाफीचा आॅलाइन अर्ज भरला होता, मात्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यानी वल्ले कुटुंबांच्या घरी जाऊन सांत्वन केले. त्यांना शासकीय मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादकरांना लागले धावण्याचे वेड

$
0
0

औरंगाबाद : वेरूळ, अजिंठा लेणींच्या सान्निध्यातील अशी ऐतिहासिक ओळख जगभरात असणाऱ्या औरंगाबाद शहरातील मॅरेथॉन स्पर्धेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठी धावण्याच्या व्यायाम करणाऱ्यांनी आता एक निष्णांत धावपटू असा नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे.

गेट गोइंग, औरंगाबाद ब्लॅक बक्स आणि एमजीएम या तीन संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे आता औरंगाबादची ओळख आजा धावपटूंचे शहर म्हणून होत आहे. व्यायामासाठी काही किलोमीटर चालणे, गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंग, योगासने अादींचा अवलंब केला जातो, परंतु काही वर्षांपासून त्यात बदल होत आहे. आता धावण्याच्या व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. विद्यापीठ परिसरात पहाटेपासूनच धावणे, वॉकिंगसाठी मोठी गर्दी होते. विविध भागातील क्रीडांगणे, विभागीय क्रीडा संकुल, एमजीएम संकुल, साई टेकडी, जळगाव रोड, कलाग्राम, चिकलठाणा औद्योगिक वसाहत अशा काही ठिकाणी दररोज धावताना अनेक मंडळी सहजपणे दिसत आहेत. विविध मॅरेथॉन स्पर्धांमुळे धावण्याचा सराव करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. हाफ मॅरेथॉन, फूल मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन अशा विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये औरंगाबादचे धावपटू लक्षणीय यश संपादन करीत आहेत. औरंगाबाद शहरातही विविध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित होत आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांमध्ये धावण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.

मॅरेथॉन क्रेझी अशी एक वेगळी ओळख औरंगाबादची निर्माण होत आहे. खरे तर याचे श्रेय गेट गोइंग या संस्थेला द्यायला हवे. २०११मध्ये गेट गोइंग ही संस्था महिलांनी महिलांसाठी स्थापन केली. स्थापनेनंतर काही दिवसांतच जागतिक महिलादिनानिमित्त पाच किलोमीटर अंतराची ‘वॉकेथॉन’ स्पर्धा केवळ महिलांसाठी घेण्यात आली होती. त्यात ८० महिलांनी सहभाग घेतला होता. आतापर्यंत गेट गोइंगने सहा हाफ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे. मॅरेथॉन स्पर्धांचे पायोनिअर म्हणून गेट गोइंगचे नाव घ्यावे लागेल. दोन वर्षांपूर्वी २०१५मध्ये दहा किलोमीटर अंतराची धावण्याची स्पर्धा गेट गोइंगने घेतली. त्यात धावण्याच्या स्पर्धेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मुंबई मॅरेथॉनसाठी क्लॉलिफायर म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. २०१३मध्येच औरंगाबाद ब्लॅक बक्स ही संस्था स्थापन झाली. या संस्थेने मॅरेथॉनला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. एमजीएम संस्थेतर्फेही नियमितपणे मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. त्यातही धावपटूंचा मोठा सहभाग असतो.

औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे गेल्यावर्षी दौलताबाद किल्ला ते वेरूळ लेणी अशी हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. पहिल्या प्रयत्नातच या स्पर्धेने औरंगाबाद शहराला एक वेगळी ओळख करून दिली. यंदा हा आकडा तीन हजारांच्या आसपास आहे. औरंगाबाद ब्लॅक बक्स ही संस्था स्थापन झाली तेव्हा अगदी मोजकेच सदस्य त्यात होते. आता या संस्थेचे एका मोठ्या कुटुंबात रुपांतर झाले आहे.

पूर्वी दोन-तीन किलोमीटर पळणेही शक्य होत नव्हते. नियमित सरावाने आता मॅरेथॉन स्पर्धेतही सहजपणे धावता येते. फिटनेससाठी धावण्याचा व्यायाम सुरू केला. धावणे हे आता जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले आहे. बंगळुरू येथील अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करू शकलो याचा मोठा आनंद आहे.
- विजय आघाव, वैशाली आघाव, अल्ट्रा मॅरेथॉनपटू

मॅरेथॉनची ओळख सर्वप्रथम औरंगाबादकरांना गेट गोइंगने २०११मध्ये करून दिली. त्यावेळी केवळ महिलांसाठी वॉकेथॉनचे आयोजन केले होते. काही वर्षांतच हाफ मॅरेथॉनच्या आयोजनामुळे धावपटूंची संख्या वाढली. त्यात महिलाही आघाडीवर आहेत हे उल्लेखनीय. आगामी काळात औरंगाबादची ओळख एक ‘मॅरेथॉन सिटी’ म्हणून होईल.
- डॉ. उमा महाजन, गेट गोइंग

फिटनेससाठी आम्ही काही जण एकत्र येऊन धावण्याचा व्यायाम करू लागलो. हैदराबाद मॅरेथॉननंतर आम्हाला आमची क्षमता कळाली. त्यानंतर औरंगाबाद ब्लॅक बक्स हा ग्रुप स्थापन केला. काही वर्षांतच अनेक जण या ग्रुपशी जोडले गेले. गुडघ्याचा त्रास असल्याने मी व्यायाम सुरू केला. वयाच्या ५६व्या वर्षी मी सहजपणे धावू शकतो.
- मुकुंद भोगले, उद्योजक

पाच वर्षांपूर्वी मी हैदराबाद मॅरेथॉन स्पर्धेत सर्वप्रथम सहभाग घेतला. त्या स्पर्धेत माझी क्षमता लक्षात आली. एबीबी ग्रुप स्थापन झाल्यानंतर यात वाढ होत गेली. कमरेचा त्रास होत होता. शिवाय वाढलेले वजनही चिंतेचा विषय होता. शिवाय स्लिप डिस्कचाही त्रास होता. त्यामुळे धावण्याचा व्यायाम सुरू केला. नियमित सरावाने अल्ट्रा मॅरेथॉनपटूपर्यंतचा प्रवास घडला.
- डॉ. अजित घुले, अल्ट्रा मॅरेथॉनपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उमंग अॅप’द्वारे काढा पीएफमधील रक्कम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भविष्यनिर्वाह निधीधारकांना तत्पर सेवा मिळावी म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातर्फे उमंग मोबाइल अॅप्लिकेशन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अॅपद्वारे पीएफ काढणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पीएफ खात्याचा तपशीलही अॅपच्या मदतीने जाणून घेणे, रक्कम अन्य खात्यात पाठविणे (ट्रान्सफर) यांसाठीही अॅपचा वापर करता येणार आहे.

पीएफधारकांना जलदगतीने सेवा देता यावी म्हणून भविष्य निर्वाह निधी विभागाने ‘उमंग’ मोबाइल अॅप तयार केले आहे. प्लेस्टोअरमधून हे अॅप डाउनलोड करावे लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे अॅपचे सर्वांसाठी खुले करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून पीएफधारक क्लेम (दावा) दाखल करू शकतो. खात्यात किती रक्कम (पीएफ) आहे, हेही पाहाता येणे शक्य आहे; तसेच रक्कम काढण्याची सुविधाही या अॅपवर देण्यात आली आहेत, अशी माहिती पीएफ विभागाचे आयुक्त एम. एच. वारसी यांनी दिली. दरम्यान, पीएफ काढण्यासह देशभरात दरवर्षी लाखो अर्ज येत असतात. ऑनलाइन प्रणालीमुळे नोकरदारांची मोठी समस्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मागासलेला’ शब्दाला निरोप द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपण मागास नाही. अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या मराठवाड्यात आहेत. त्यामुळे मागासलेला या शब्दाला कायमचा निरोप द्या, असे आवाहन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभूषण गोविंदभाई स्मृती पुरस्कार भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. चितळे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. एस. बी. वराडे अध्यक्षस्थानी होते. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी येथे मंगळवारी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ‘मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकास वाटा’ या विषयावर चितळे बोलत होते. कार्यक्रमाला ना. वि. देशपांडे, दिनकर बोरीकर, शरद अदवंत, मनोरमा शर्मा आदी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या विकासासंदर्भात चितळे यांनी, ऐतिहासिक, पौराणिक वारशाचे आपण वारसदार आहोत. सध्या आपण परिवर्तन, गतिमान अवस्थेतून जात असून, काही गोष्टीत तुलनेत आपण मागे असलो, तरी आपण मागासलेलो नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. रेल्वे सुविधेचे अपुरेपण हे मराठवाड्याच्या गतिमान विकास व्यवस्थेला अडसर ठरत आहे. त्यासाठी विकास प्रश्नांशी जोडलेल्या संस्था, संघटनांनी यावर आत्मचिंतन करून संचार विस्तारासाठी उपक्रम हाती घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केवळ पाण्याची कमतरता आहे, म्हणून विकास होत नाही, असे म्हणने चुकीचे आहे. इस्त्राइलसह अनेक देशात आपल्यापेक्षा कमी पाणी आहेत. पाण्याचा काटकसरीने वापरच नाही, तर त्याचा फेरवापर महत्त्वाचा आहे. या देशांनी केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचा अभ्यास आपल्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. विविध मुद्दे पुढे करून विकासाला खोडा करण्याचे काम होता कामा नये, अशी अपेक्षाही चितळे यांनी व्यक्त केली.

फलोत्पादन, दुग्धव्यवसायाला संधी
मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र हे गोदावरीवर अंवलबून आहे. आपल्याकडे उगम पावणाऱ्या नद्या या अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचा उगमस्थान सह्याद्रीत आहे, असे सांगत त्यांनी शासनाच्या पाण्याविषयी मार्गदर्शक पुस्तिकेत पाण्याचा तणाव, उजाड शेती अनुभवलेल्या लोकांचे प्रतिबंब दिसत नाही, असेही त्यांनी नमूद केले. भाजीपाला लागवड, दुग्धव्यवसाय या क्षेत्रात मराठवाड्याला मोठी संधी आहे. शेतकऱ्यांचे भावनिकीकरण जास्त प्रमाणात झाले. त्यांना वैज्ञनिक जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे, असे चितळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जिकल कंपनीला चौदा लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेल्स एक्झिक्युटिव्हने पुण्याच्या सर्जिकल कंपनीला १३ लाख ९८ हजाराचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. साहित्य विक्रीच्या रक्कमेचा अपहार करत संशयित आरोपीने बँकेत बनावट खाते उघडले होते. हा प्रकार फेब्रुवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत घडला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीप मानसिंगराव कोंडेदेशमुख (रा. खेड शिवपूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची अॅडवेन्ट हेल्थ केअर अँड हायटेक प्रॉडक्टस ही सर्जिकल साहित्य पुरवठा कंपनी आहे. त्यांनी जून २०१६मध्ये औरंगाबादसाठी अमानुल्ला मुस्तफाखान (रा. अलफैज मेडिकलजवळ, गणेश कॉलनी) याची सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती केली होती. शहरातील हॉस्पिटलला साहित्य पुरवठा करून बिल वसूल करण्याची जबाबदारी अमानुल्ला याच्याकडे होती. जुलै २०१७ मध्ये कंपनीच्या लक्षात आले की अमानुल्ला कंपनीचे पैसे वेळेवर पाठवत नव्हता. हॉस्पिटलकडून पैसे मिळाले नाही, चेकवर सही झाली नाही, असे सांगत टाळाटाळ करीत होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरात येऊन चौकशी असता त्याने विविध हॉस्पिटल व पेशंटच्या नातेवाईकांकडून दहा लाख ४८ हजार रुपये रोख वसूल केल्याची माहिती मिळाली. तसेच कंपनीचे दोन लाख ३० हजाराचे साहित्य अमानुल्लाच्या घरी गोदामात होते. त्यापैकी ५५ हजारांचे साहित्य लंपास केल्याचे दिसून आले. कंपनीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने कोंडेदेशमुख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित आरोपी अमानुल्ला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय योगेश धोंडे हे तपास करीत आहेत.

बनावट खाते

शहरातील एका हॉस्पिटलने अमानुल्लाला साहित्याच्या बिलापोटी ६५ हजारांचा चेक दिला होता. अमानुल्लाने महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बँकेमध्ये कंपनीच्या नावे बनावट खाते उघडले. या खात्यामध्ये चेक जमा करून वटवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातन नाणी पाहून इतिहासप्रेमी हरखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिव, मुघल, महम्मद गजनीकालीन नाण्यांबरोबरच थेट २६०० वर्षांपूर्वीच्या नाण्याचे समृद्ध दालन सोनेरी महलमध्ये थाटण्यात आले आहे. त्याला निमित्त आहे जागतिक वारसा सप्ताहाचे. नाण्यांचा वारसा पाहून इतिहासप्रेमी, विद्यार्थी व नागरिक हरखून गेले.

पुरातत्व विभागातर्फे जागतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोनेरी महलात नाण्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनातच मराठवाड्यातील किल्यांची माहिती असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. ते सर्वांसाठी खुले आहे.

नाण्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. औरंगाबाद येथील आशुतोष पाटील आणि जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी दिगर येथील प्रशांत विसपुते या दोघांनी जमवलेल्या नाण्यांचे प्रदर्शन सोनेरी महलात इतिहास प्रेमींना पाहण्यास मिळणार आहे.

आशुतोष पाटील हा बारावीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याला पुरातन नाणी जमा करण्याचा छंद जडला. त्याच्याकडे सुमारे साडेपाच हजार नाण्यांचा संग्रह आहे. त्याच्या संग्रहात २६०० वर्षांपूर्वीपासूनची नाणी आहेत. त्यात प्रामुख्याने पंचमार्ग, गुप्तकालीन, मगदकालीन, मौर्यकालीन, सातवाहनकालीन, मराठा राजवटीमधील, शिवकालीन (शिवराई), ब्रिटिश कालीन नाण्यांचा समावेश आहे. पुरातन काळातील नाणी जमवण्याचा जागतिक विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. विविध शस्त्र आणि पत्रांचे संकलन देखील आपल्याकडे आहे, असे त्याने सांगितले.

प्रशांत विसपुते यांच्याकडे दीड हजार नाण्यांचा संग्रह आहे. सुवर्ण नाणी त्यांच्या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. रामचंद्र यादव, महादेव यादव यांच्या काळातील ही नाणी असल्याचे विसपुते यांनी सांगितले. मोहम्मद गजनी यांनी काढलेले नाणे देखील त्यांच्या संग्रहात आहे. शिवकालीन, निजामकालीन व ब्रिटिशकालीन नाणी देखील या ठिकाणी पाहण्यास मिळतात.

प्रसिद्धीचा अभाव
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व खात्याने भरविलेल्या नाण्यांच्या प्रदर्शनाची पुरेशी प्रसिद्धी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी विशेष गर्दी नव्हती. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी आले पाहिजे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे, पण प्रदर्शनस्थळी विद्यार्थी कमी संख्येने होते. शासनाने दिलेला कार्यक्रम म्हणून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा होती.

नाणिक शास्त्र अभ्यासक्रम असावा
विविध काळातील नाण्यांचा समृद्ध वारसा देशाला लाभला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी पुरेशा सोई नाहीत. इतिहासाच्या अभ्यासक्रमात देखील नाण्यांसंदर्भात मर्यादित अभ्यास करता येतो. त्यामुळे इतिहासांतर्गतच नाणिक शास्त्र असा स्वतंत्र अभ्यासक्रम असला पाहिजे, अशी अपेक्षा आशुतोष पाटील याने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत ‘पास दाखवा, आत जा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मागच्या दोन आठवड्यांपूर्वी निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घाटीमध्ये ‘पास सिस्टीम’ लवकरच लागू होणार असून, त्यासाठी पाच हजार प्लास्टिक कोटेट पासची ऑर्डर देण्यात आली आहे. रुग्णाच्या आजारपणाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन पासची सुविधा देण्यात येणार आहे.

घाटीच्या प्रत्येक वॉर्ड-विभागात रुग्णांबरोबरच नातेवाईक-परिचितांची फार मोठी गर्दी असते आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि शेवटी रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होतो. हीच गर्दी मारहाणीसारखे गंभीर प्रकार घडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच घाटीमध्ये ‘पास सिस्टीम’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मेडिसिन व काही विभागामध्ये कागदाच्या पासची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. त्याहीपुढे जाऊन मोठे व प्लास्टिक कोटेट पास तयार करण्यात येऊन त्यांना मान्यताही देण्यात आली आहे. या प्रकारातील पाच हजार पासच्या निर्मितीची ऑर्डरही देण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ते उपलब्ध होतील असे चित्र आहे.

पूर्वी घेण्यात आलेला बारकोडिंगच्या पासचा निर्णय जास्तीच्या खर्चामुळे तूर्त रद्द करण्यात आला आहे. आता प्लास्टिक कोटेट पास संपूर्ण घाटीमध्ये वापरले जाणार आहे. यामध्ये गंभीर-अतिगंभीर रुग्णांसाठी दोन पास २४ तासांसाठी दिले जातील. त्याआधारे दोन नातेवाईक रुग्णाजवळ २४ तास सोयीनुसार राहू शकतील व एक पास भेट देणाऱ्यांसाठी दिला जाईल, तर कमी गंभीर रुग्णांना २४ तासांसाठी एक व भेट देणाऱ्यांसाठी एक पास दिला जाईल. या पासद्वारे एकावेळी एकालाच रुग्णाला भेटता येईल व एका पासद्वारे एकालाच रुग्णजवळ थांबता येईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

दोन दिवसाला गुटख्याचे अर्धेपोते
मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून घाटीच्या विविध वॉर्डांमध्ये जाताना नातेवाईक-परिचितांकडून गुटखा-तंबाखू-पान मसाला जप्त करणे सुरू झाले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या गेटवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, दर दोन दिवसाला गुटखा, तंबाखू, पान मसाला, बिडी, सिगारेटचे अर्धे पोते जमा होत आहे. या जमा केलेल्या तंबाखुजन्य पदार्थांची अन्न व औषधी प्रशासनाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार घाटी परिसरात विल्हेवाट लावली जात आहे.

पास हरवल्यास २०० रुपये दंड
घाटीतील आंतररुग्ण विभागात (आयपीडी) रुग्णांना दाखल केल्याबरोबर रुग्णांना पास दिले जातील. हा पास हरवला तर मात्र रुग्णांना २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. या पासमागे रुग्णहिताच्या अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधान सचिव हाजीर हो!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांना स्वखर्चाने हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश एस.पाटील यांनी दिले. शासनाच्या तिजोरीवर भार न टाकता स्वखर्चाने हजर रहावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील बंद पडलेल्या अपंग शाळेतील शिक्षकांनी समायोजन न झाल्याने; तसेच वेतन रोखल्याने खंडपीठात धाव घेतली आहे. वेळोवेळी संधी देऊनही म्हणणे सादर न केल्याने प्रकरणात खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील १६७ अनुदानित अपंग शाळा बंद पडल्या. त्यातील अडीच हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अपंग कल्याण आयुक्तांनी अतिरिक्त घोषित केले. हे सर्व कर्मचारी कायम आहेत. त्यांचे समायोजन झाले नाही; तसेच शाळा बंद पडल्यापासून त्यांचे वेतन व भत्ते मिळाले नाही. राज्य शासनाने दहा सप्टेंबर २००१ व २५ ऑक्टोबर २०१२च्या शासन निर्णयानुसार वेतन द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही समायोजन दूरच, परंतु वेतन, भत्ता मिळाला नाही. यावर्षी जुलै महिन्यात या अपंग शाळा बंद पडल्या होत्या. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले नाही व त्यांचे वेतनही मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन बिरादार यांनी याचिका दाखल केली.

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता, शासनातर्फे प्रकरणात काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. अॅड. सतीश तळेकर व अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी याचिकाकर्त्यांची बाजू सतिश तळेकर व प्रज्ञा तळेकर यांनी मांडली. याचिकेची सुनावणी चार डिसेंबर रोजी होणार आहे.

माहिती सादर केली नाही
खंडपीठाने २६ सप्टेंबर रोजी राज्य शासन, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अर्थखात्याचे सचिव; तसेच अपंग कल्याण आयुक्तांना नोटीस बजावली होती. पुढील सुनावणीपर्यंत वेतन व भत्त्यांविषयी माहिती सादर करण्याचे अंतिम आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासन कोणतीच माहिती सादर केली नाही. त्यानंतरही खंडपीठाने संधी दिली व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेतृत्त्व करण्याची क्षमता तरुणांमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय तरुणांमध्ये नेतृत्त्वाची क्षमता आहे. राजकारणात निवृत्तीचे वय असायला हवे, तर अनुभव, कार्यक्षमता, इच्छाशक्ती असल्यास राजकारणात वयाला बंधन नसते, अशा दोन्ही बाजू उत्तमपणे मांडत तरुणाईने ‘स्पीक फॉर इंडिया’ व्यासपीठावर वक्तृत्वाची छाप उमटविली. ‘फेडरेशन बँक’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या कार्यक्रमाची जिल्हास्तरीय फेरी मंगळवारी झाली.

देवगिरी इंजिनीअरिंगच्या सभागृहात ही स्पर्धा रंगली. जिल्ह्यातील विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदिवला. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्त्वगुणला वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात स्पर्धकांना विषयाची चिठ्ठी उचलायची होती. त्यावर दहा मिनिटे विचार करून विषय एका मिनिटात मांडायचा होता. अतिशय उत्तमरित्या आपला विषय मांडत तरुणाई अवांतर वाचनात कोठे कमी नसल्याचे दाखवून दिले. पहिल्या फेरीत ‘वेळेचे नियोजन’, ‘बीटकॉन’, ‘मेक इन इंडिया’, ‘रिअॅलिटी शो’, ‘सेल्फी कल्चर’, ‘खेळामधील पैसा’ असे विषय होते. यात ४२ स्पर्धकांनी आपली मते मांडली. त्यातून पुढील फेरीसाठी २० जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर या २० स्पर्धकांची पाच गटांत विभागणी करण्यात आली. टीममधील सदस्यांचे दिलेल्या विषयाच्या बाजुने आणि विरुद्ध असे दोन संघ करण्यात आले. ‘अवयवदान सक्तीचे हवे का’ विषयावर विद्यार्थ्यांनी सांगितले समाजाचे आपण देण लागतो या भावनेतून प्रत्येकाने अवयव दान करणे गरजेचे आहे. कोणाला तरी, आपण जीवनदान देतो. अवयवदान अधिकार असला तरी, अधिकारापेक्षा याकडे कर्तव्य म्हणून पहिले जावे, असे बाजू मांडतान सांगण्यात आले. देशातील आरोग्य व्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार, सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेता अशाबाबींवर घाईकरणे योग्य नसल्याचे स्पर्धकांनी मांडले. ‘आपली भावना व्यक्त करायला स्वातंत्र्य आहे का’ विषयावर आज विविध पातळीवर घातले जाणारे निर्बंध, दडपण, दबाव अशाबाबींमुळे स्वातंत्र्य म्हणता येईल का? असा प्रश्न करत आपल्या शैलित दोन्ही बाजू विद्यार्थ्यांनी मांडली. नेतृत्व करण्याचे वय असते त्याच काळात तरुणांकडे नेतृत्व देण्याची गरज आहे. नवीन कल्पना समोर येतील अन् देशाचा विकास होईल असे ‘राजकारण्यांच्या वयाच्याबाबतीत कायदा करावा का’ विषयावर स्पर्धकांनी मत मांडले. निर्णय क्षमता, इच्छाशक्ती, कार्यक्षमता असेल तर वयाचे बंधन कशाला, वयाचे बंधन घातल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात आले.

‘सोशल मीडियामुळे असहिष्णुतेला बळ मिळते का’ विषयावर मत मांडताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचे फायदे-तोटे सांगितले. नवीन तंत्रज्ञान हे आपल्याला जगाशी जोडते. त्याचा कसा वापर करू हे प्रत्येकावर असल्याचे मत मांडण्यात आले.

‘काळा पैसा अर्थव्यवस्थेला चांगला का’ विषयावर काळा पैसा हा अर्थव्यवस्थेला लागलेली कीड आहे. त्यामुळे देशाच्या विकासावर परिणाम होतो, असे परखड मत स्पर्धक विद्यार्थ्यांनी मांडले. विषयांची मांडणी, मुद्दे अन् उत्तम संवादाच्या माध्यमातून तरुणाईने उपस्थितांची दाद मिळविली. परीक्षक म्हणून प्रितम तांदुळजे, ए. आर. नलावडे, विशाखा नायनार यांनी काम पाहिले.

हे सहा शिलेदार पोहचले विभागीय पातळीवर
अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातून सहा विद्यार्थी विभागीय पातळीवर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर चौथमल, भरत रिडलॉन, अंकित म्हस्के, दिग्विजयसिंग राऊत, अदिनाथ प्रयाग, वैष्णवी भावठाणकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिपू सुलतान ‌मिरवणूक; आयोजकांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टिपू सुलतान जयंतीनिमित्त विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मिरवणूक सोमवारी सायंकाळी आझाद चौक ते रोशन गेट दरम्यान काढण्यात आली होती.
टिपू सुलतान यांची सोमवारी जयंती ‌होती, त्यानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने मिरवणुकीची परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. परवानगी नाकारली असताना सोमवारी सायंकाळी आझाद चौकापासून ही मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी पोलिस नाईक शेख अर्शद शेख लाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा जावेद बेग, कामगार संघटना, युवा मुस्लिम संघटना व इतर वीस ते पंचवीस तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुळाच्या दुरुस्तीसाठी आठ‌ दिवस ब्लॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी नांदेड - लिंबगाव - चुडावा - पुर्णा या मार्गावर आठ दिवसांचा ब्लॉक दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २५ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत दररोज अडीच तासांचा असेल.

यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार नाही. या ब्लॉकमुळे काही गाड्या अंशः रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पहिला टप्पा
- मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटे ते पहाटे चार वाजून १० मिनिटे
- बिकानेर-नांदेड सोमवारी अकोला ते पूर्णादरम्यान ७० मिनिटे उशिरा धावेल
- मनमाड ते सिकंदराबाद पूर्णा स्थानकावर ३५ मिनिटे थांबविण्यात येईल
- दौंड ते मनमाड रेल्वे पूर्णा स्थानकावर २० मिनिटे थांबविण्यात येईल
- हैदराबाद - अजमेर एक्स्पेस मंगळवारी मुदखेड-नांदेडदरम्यान एक तास ४० मिनिटे उशिरा धावेल
- निझामाबाद-लोकमान्य टिलक टर्मिनस एक्स्प्रेस सोमवारी मुदखेड ते नांदेडदरम्यान ७० मिनिटे उशिरा धावेल
- नरसापूर - नगरसोल एक्स्प्रेस रविवारी, मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी मुदखेड-नांदेडदरम्यान ७० मिनिटे उशिरा धावेल
- निझामाबाद-पुणे पॅसेंजर नांदेड येथे ३० मिनिटे थांबेल

दुसरा टप्पा
- सकाळी ११ वाजून ५० मिनिटे ते दुपारी दोन वाजून २० मिनिटे
- नांदेड ते औरंगाबाद रेल्वे एक डिसेंबर रोजी रद्द
- अमरावती - तिरुपती रेल्वे सोमवारी अकोला ते पूर्णा स्थानकांदरम्यान सव्वादोन तास उशिरा धावेल
- ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर रोजी अंकाई ते पूर्णा स्थानकांदरम्यान दोन तास ४० मिनिटे उशिरा धावेल
- काचीगुडा ते मनमाड पॅसेंजर नांदेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येईल. आणि तेथूनच परत नांदेड ते काचीगुडा पॅसेंजर म्हणून धावेल, मात्र गुरुवारी (३० नोव्हेंबर) ही रेल्वे नियमितपणे धावेल.
- मनमाड ते काचिगुडा पॅसेंजर पूर्णा रेल्वे स्थानकावरच थांबेल. परत पूर्णा रेल्वे स्थानकावरून पूर्णा ते मनमाड म्हणून धावेल. गुरुवारी (३० नोव्हेंबर) ही गाडी नियमितपणे धावेल
- इंटर सिटी एक्स्प्रेस ५० मिनिटे नांदेड येथे थांबेल
- इंटर सिटी एक्स्प्रेस ६० मिनिटे पूर्णा येथे थांबेल
- नगरसोल-नांदेड पॅसेंजर पूर्णा स्थानकापर्यंत धावेल आणि नांदेड येथून ही रेल्वे पुढील लिंक बनून धावेल (हा बदल गुरुवारी नसेल.)
- मालगाड्या गरजेनुसार थांबविल्या जातील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोऱ्या रोखण्यासाठी गोदाम चालकांना नोटीस

$
0
0

वाळूज महानगरः वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील विविध कंपन्यांच्या गोदामचालकांना सुरक्षा कारणावरून पोलिसांनी नोटीस जारी केल्या आहेत. माल घेऊन येणारे ट्रक गोदामाजवळ अंधारात उभे राहत असून त्यातून माल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांत हिंदुस्थान लिव्हरच्या गोदामात माल घेऊन आलेल्या ट्रकमधील मालाची अनेकवेळा चोरी झाली आहे. त्याची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाम परिसरता सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, परिसरात फोकस लाइट लावावा, पोलिस ठाणे व इतर आवश्यक नंबर दर्शनी भागात लावावेत, या उपाययोजनांमुळे चोरीचे प्रमाण कमी होईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. गोदामात आलेला माल ट्रकमधून रोज उतरवून घ्यावा, हे शक्य नसल्यास गोदाम परिसरात ट्रक व त्यातील माल सुरक्षित राहील अशी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, असे नमूद केले आहे. या नोटीसवर वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जी. पी. सोनटक्के यांची सही आहे.
ओम लॉजिस्टक, सृष्टी सिएट सोल्युशन, सार्को रोडवेज, कोका कोला, हेलिडॉन लॉजिस्टिक, रिलायन्स वेअर हाउस, श्रद्धा रोडलाइन्स, आयटीसी लॉजिस्टक, के. पी. रोडलाइन्स, मास कार्गो, हर्ष इंडस्ड्रीज या गोदामधारकांना नोटीस देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शताब्दीनगरातील शाळेबद्दल तोडगा काढण्यासाठी आज बैठक

$
0
0

शताब्दीनगरातील शाळेबद्दल तोडगा काढण्यासाठी आज बैठक
शाळा भरविण्यापासून नागरिकांनी शिक्षकांना रोकले
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
समाज मंदिरात शाळा भरविण्यावरून नागरिक व शिक्षक यांच्यात निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या बुधवारी शताब्दीनगरातच बैठक घेतली जाणार आहे. सकाळी दहा वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
समाज मंदिरात शाळा भरण्यास शताब्दीनगर मधील नागरिकांचा विरोध आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा भरवण्यासाठी शिक्षक त्या ठिकाणी गेले असता नागरिकांनी त्यांना विरोध केला. शिक्षकांच्या विरोधात त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारामुळे शिक्षक कमालीचे अस्वस्थ झाले. ही माहिती मिळाल्यावर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी वॉर्ड अधिकाऱ्यासह शताब्दीनगरात दाखल झाले, परंतु नागरिकांनी त्यांनाही विरोध केला. समाज मंदिरात शाळा भरवू दिली जाणार नाही. शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर नागरिक सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले. पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी नागरिकांची समजूत काढली व वाद मिटविला. या सर्व पार्श्वभूमीवर शाळेचा वाद मिटवण्यासाठी उद्या बुधवारी महापौरांच्या उपस्थितीत शताब्दिनगरात बैठक घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचपती, सासऱ्याच्या अतिक्रमणाची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील वीरगाव मुर्शदपूर गट ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती अनिल त्रिभुवन यांचे पती व सासऱ्याने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून विहीर खोदली आहे. दुसऱ्याच्या नावावरील घरकुल बळकावून सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांचे सरपंचपद त्वरित रद्द करावे, अशी मागणी वीरगाव येथील रहिवासी रोहिदास छबू त्रिभुवन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात केली आहे.
वीरगाव मूर्शदपुर गट ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित असून ऑगस्ट २०१६मध्ये भारती त्रिभुवन यांची सरपंचपदी निवड झाली होती. त्यांचे पती व सासरे नाना बाजीराव त्रिभुवन यांच्या नावावर गट नंबर ३१ व ३४ मध्ये शेतजमीन व विहीर आहे. पण, त्यांनी गायरान जमीन गट क्रमांक ३३मध्ये अतिक्रमण करून तेथे विहीर खोदली आहे. दुसऱ्याचे घरकुल बळकावून योजनेचा लाभ घेतला आहे. कोणत्याही लोकसेवकाला सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून सरकारी योजनेचा लाभ घेऊन पद भुषवता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अतिक्रमण केलेली जाग, विहीर व घरकुलाचा पंचनामा करावा. सरपंच भारती त्रिभुवन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे पद रद्द करावे, त्यांचे पती व सासऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रोच्या लागणनंतर छावणीत पाणीपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर थांबवण्यात आलेला छावणीचा पाणीपुरवठा तब्बल १२ दिवसानंतर मंगळवारपासून (२१ नोव्हेंबर) सुरू करण्यात आला. छावणीतील सातपैकी तीन वॉर्डात अवघ्या २० मिनिटांसाठी पाणी पुरवठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित तीन वॉर्डात बुधवारी पाणी पुरवठा केला जाईल, असे छावणी परिषदेकडून सांगण्यात आले.
दूषित पाणी पुरवठ्यामुळे छावणी परिसरात गॅस्ट्रोचा उद्रेक होऊन सहा हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना गॅस्ट्रोची लागण झाली. मात्र, जलवाहिनीचे लिकेज १६ नोव्हेंबर रोजी सापडले, तर जलवाहिनी बदलण्यासाठी सोमवार (२० नोव्हेंबर) उजाडला. महापालिकेने पाणी न सोडल्यामुळे सोमवारऐवजी मंगळवारी पाण्याची तपासणी करावी लागली. पाणी पिण्यास योग्य असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर छावणीच्या सम्पमध्ये (भूमिगत हौद) पाणी सोडण्यात आले. त्यातून तीन टाक्यांत पाणी चढवण्यात आले. मात्र पालिकेच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा अपेक्षेपेक्षा कमी आढळून आली. त्यामुळे क्लोरिनची मात्रा वाढवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेसहानंतर वॉर्ड क्रमांक एक, तीन व चारमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला. अर्थात, एरवी ४५ मिनिटांपर्यंत पाणी पुरवठा होत असला तरी मंगळवारी या तीन वॉर्डांमध्ये प्रत्येकी २० मिनिटे पाणी पुरवठा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आता बुधवारी उर्वरित दोन, पाच व सहा वॉर्डांमध्ये पाणी पुरवठा होणार असल्याचे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी ‘मटा’ला सांगितले. तसेच वेगवेगळ्या वस्त्यांमधूनही पाण्याची तपासणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाराव्या दिवशी गॅस्ट्रोचे २१ रुग्ण

छावणीच्या सामान्य रुग्णालयात १० नोव्हेंबरपासून गॅस्ट्रोचे रुग्ण येण्यास प्रारंभ झाला आणि आतापर्यंत हा आकडा सहा हजारांपुढे गेला आहे. यामध्ये दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (२१ नोव्हेंबर) २१ रुग्णांनी ‘ओपीडी’मध्ये तर ७ रुग्णांनी ‘आयपीडी’मध्ये उपचार घेतले. त्यामुळे रुग्णांचा ओघ अजुनही सुरूच असल्याचे स्पष्ट झाले.

संघ, ‘हेडगेवार’कडून तपासणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने छावणी परिसरातील रखमाजी जाधव यांच्या जागेमध्ये गॅस्ट्रोग्रस्तांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहर संघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, संभाजीराव मुळे, डॉ. अजय पांडे, अॅड. गोपाल पांडे आदींच्या पुढाकारातून ही तपासणी आठ दिवस सुरू राहणार आहे. शरिरास उपयुक्त जिवाणुंची मात्रा वाढवणाऱ्या ‘प्रो-बायोटिक्स’सह संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहेत, असे उपचार करणारे डॉ. अरविंद निधोनकर यांनी सांगितले.

सम्प तसेच तिन्ही टाक्या रसायनांचा वापर करून स्वच्छ व कोरड्या करण्यात आल्या आणि पाण्याची तपासणी करण्यात आल्यानंतरच त्यात पाणी सोडण्यात आले. महापालिकेच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा कमी आढळून आल्यानंतर पाण्यात क्लोरिन वाढवण्यात आले. वस्त्यांमधूनही पाण्याची तपासणी होईल.
-संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत एकनाथ कारखान्याचे विनापरवाना ऊस गाळप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
विनापरवानगी उसाचे गाळप सुरू केल्यामुळे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला साखर सहसंचालकांनी कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
संत एकनाथ साखर कारखान्याचा सचिन घायाळ शुगर कंपनी सोबत १८ गाळप करण्याचा भागीदारी करार झाला आहे. मात्र, यावर्षी कारखान्याच्या संचालकानी, सचिन घायाळ कंपनीसोबतचा करार रद्द न करता नाशिक येथील शीलाअतुल शुगर टेक. या कंपनीच्या ताब्यात कारखाना दिला आहे. या कंपनीने साखर आयुक्ताची परवानगी न घेता व संचालकाशी करार न करता सात नोव्हेंबरपासून गाळप सुरू केले आहे.
याची गंभीर दखल प्रादेशिक सहसंचालक (साखर) घेतली आहे. सहसंचालकांनी १७ नोव्हेंबर रोजी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना नोटीस बजावली आहे. साखर कारखान्याने २०१७-१८ या वर्षीचा गाळप परवाना मिळावा यासाठी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे ऑनलाइन अर्ज केला आहे. मात्र, सचिन घायाळ कंपनीसोबतचा करार रद्द झाला नसताना व यावर्षीचा गाळप परवाना दिला नसताना बेकायदा गाळप सुरू केले असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. विनापरवाना गाळप सुरू केल्याबद्दल तत्काळ खुलासा करण्याचे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

संत एकनाथ साखर कारखान्याकडे गाळप परवाना नसताना गाळप सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखान्याला नोटीस बजावली आहे.
-नीलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

संत एकनाथ साखर कारखाना व आमचा करार रद्द झालेला नाही. गाळप परवानगीसाठी आम्ही अर्ज केला आम्हाला लवकरच परवानगी मिळणार आहे. त्यामुळे परवानगी नसताना कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर ऊस द्यावा. त्याला आमची कंपनी जबाबदार राहणार नाही.
- सचिन घायाळ, चेअरमन, एस. जी. कंपनी

संत एकनाथ साखर कारखान्याला गाळप परवानगी मिळालेली नाही. परवानगीसाठी आम्ही अर्ज केलेला आहे. साखर आयुक्ताच्या नोटीसला योग्य उत्तर देण्यात येईल.
-तुषार शिसोदे, चेअरमन, संत एकनाथ कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीतून वाळू चोरी, तीन बैलगाड्या जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तीन बैलगाड्यांवर तहसीलदार महेश सावंत यांनी जप्तीची कार्यवाही केली. चोरीची वाळूवाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांविरुद्ध ही महसूल विभागाची पहिलीच कार्यवाही आहे.
शहरातील गोदावरी नदीच्या पात्रातून पाचशे बैलगाड्यांच्या सहाय्याने वाळूचोरीची बातमी ‘मटा’च्या अंकात छापून आल्यानंतर तहसीलदार महेश सावंत यानी जेसीबी मशीनच्या सहाय्याने नदीपात्रात खड्डे खोदून बैलगाडीच्या माध्यमातून होणारी वाळूचोरी रोखली होती. मात्र, बैलगाडी चालकांनी शहराबाहेरील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू चोरी सुरू केल्याची माहिती तहसीलदार सावंत यांना मिळाली. त्यांनंतर मंगळवारी बैलगाडीच्या सहाय्याने वाळूचोरी करणाऱ्या परमेश्वर अशोक तावरे, बाळू महादू बरसे व अशोक खुशालराव तावरे या तिघांवर कार्यवाही केली. या कार्यवाहीत बैलगाडी व बैलावर कार्यवाही केल्याची व पैठणच्या महसूल विभागाने चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यावर पहिल्यांदाच कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशक्रिया करताना फक्त मूठभर राख टाका

$
0
0

वाळूज महानगरः ‘दशक्रिया विधी करताना मृताचे जुने कपडे व साहित्य नदीत टाकू नये, तसेच फक्त मूठभर राख फक्त आणावी, उर्वरित राख शेतात टाकावी. त्यावर वृक्षारोपण करून स्मृती जपावी,’ असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीच्या घाटावर बांधलेल्या अस्थिकुंड, सभामंडप, सीसीटीव्ही कॅमेरा यांचे लोकार्पण रविवारी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वृक्षारोपण केल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अशी आठवण त्यांनी करून दिली. नदीच्या घाटावरील विकास कामांसाठी पालकमंत्र्यांच्या पर्यटन विकास निधीतून साठ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. हे काम जिल्हा परिषद सदस्य संतोष माने यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, दिनेश मुथा, जिल्हा परिषद सदस्या स्वाती निरफळ, मनीषा सिदलंबे, मंगलबाई राजपूत, मीनाक्षी गायकवाड, जनार्धन मेटे महाराज, सुभाष कानडे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकिंग क्षेत्रात पुन्हा ‘व्हीआरएस’चे वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील बँकिंग क्षेत्रात मार्च २०१८पर्यंत दहा हजार जण सेवानिवृत्त होत आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे बँक क्षेत्रात ‘सेल्फ ऑटोमेशन’वर भर देण्यात येत आहे. इंटरनेट वापराबरोबर ऑनलाइन व्यवहार वाढत आहेत. त्याचा परिणाम कर्मचारी भरतीवरही झाला आहे. दरवर्षी सेवानिवृत्त होत असताना त्या तुलनेत नवीन कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी अाहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असोसिएट बँकांच्या ‌विलिनीकरणानंतर सरकारी बँकांची संख्या कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. हा विचार अंमलात आणताना बँकांचे विलिनीकरण होईल, त्या बँकांत भविष्यात स्वेच्छानिवृत्ती योजना आणणार असल्याचेही मानले जात आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या स्टेट बँकांच्या विलिनीकरणानंतर सुमारे साडेतीन हजार कर्मचारी, अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नोकरीतून मोकळे झाले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ११५ जणांचा समावेश आहे. एकूण बँकिंग क्षेत्रात आता दरवर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांचीही संख्या वाढत आहे.

नोकरभरती मंदावली
बँकिंग क्षेत्रात २० ते २५ वर्षे भरती बंदच होती, पण २००९-२०१०पासून काही प्रमाणात नोकरभरती सुरू झाली. ती पुन्हा दोन ते तीन वर्षांपासून मंदावली आहे. बँकेतली नोकरी स्वीकारणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित तरुणांची संख्या खूप मोठी होती. त्यामध्ये एमबीए फायनान्स, मार्केटिंग, बीसीए, एमसीए, बीटेक, एमटेक आदी पदवीप्राप्त कर्मचारी होते, परंतु त्यांच्या शिक्षणाचा, कौशल्याचा योग्य उपयोग करून घेतला जात नाही. त्याऐवजी त्यांना साधे डेटा एन्ट्रीचे किंवा कम्प्युटर ऑपरेटरचे काम दिले जाते. शिक्षणाचा, विशेष कौशल्याचा बँकेतल्या नोकरीत उपयोग नाही. त्यामुळे कामाचे समाधान नसल्याने भ्रमनिरास होऊन एक-दोन वर्षांतच ते बँकेतील नोकरी सोडतात. त्यांना अन्य क्षेत्रात उत्तम नोकरी आणि पगारही मिळत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

एकूण बँकिंग क्षेत्रात सेवानिवृत्त होत असलेल्यांची संख्या मार्च अखेरीस दहा हजारापर्यंत जात आहे. स्टेट बँक विलिनीकरणादरम्यानही अनेक जण सेवानिवृत्त झाले आहेत. अजूनही काही बँकांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. तेव्हाही अनेक जण सेवानिवृत्त होतील आणि स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केलीच, तर अनेक जण त्या योजनेचाही फायदा घेऊ शकतील.
- जगदीश भावठाणकर, बँकिंग तज्ज्ञ व संचालक ‘बेट्रा’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षांत २७१० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
दुष्काळावर मात करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबवला जातो. गेल्या सहा वर्षांत या कार्यक्रमातून फक्त २७१० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यापोटी शासनाने सात कोटी ५६ लाख, ५४ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ४७ हजार आहे.
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती निर्माण होते. परिणामी, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत. मात्र, ठिबक सिंचन करून उपलब्ध पाण्याच्या वापर करत काही शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात केल्याचे तीन वर्षांत दिसून आले आहे. या योजनेनुसार ठिबक सिंचन व तुषार सिंचन साहित्य मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले जातात. पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करून उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही योजना लाभदायक आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ही योजना पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. पण, जनजागृती नसल्याने या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. गेल्या हा वर्षांत फक्त २७१० शेतकऱ्यांनीच योजनेचा लाभ घेतला, यावरून हे लक्षात येते. शिवाय शेतकऱ्यांना अनेकवेळा शेवटच्या आठवड्यात माहिती मिळते. पण, ऑनलाइन अर्ज पद्धतीमुळे ते योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे कृषी विभागाने या योजनेची जनजागृती गावागावात जाऊन करण्याची गरज आहे.

कंपन्यांचा शिरकाव

या योजनेत भाग घेताना शेतकऱ्यांना ठिबक संचाकरिता स्वतःचा वाटा भरावा लागतो. अनेकवेळा शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. याचा फायदा खासगी कंपन्यांनी उचलला आहे. काही खासगी कंपन्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून ठिबक व तुषार संच मिळवून देतात. पण, त्यानंतर शासनाकडून आलेले अनुदान ते हडप करतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images