Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हायटेक जुगा-यांचा नवा फंडा

$
0
0
जुगार खेळणा-यांवर पोलिस नेहमीच कारवाई करतात. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जुगारीही हायटेक झाले असून इंटरनेटवर आता जुगार खेळण्यात येत आहे. या जुगारामध्ये फसवले गेल्यास आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मराठवाड्यात साखर उद्योगाला बळकटी

$
0
0
राज्याच्या साखर उद्योगात नवीन संशोधनातून विशेष सुधारणा केलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुढाकाराने मराठवाड्यात ऊस संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा नियोजित प्रकल्प जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात होणार असून त्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.

‘समांतर’च्या गंड्यात शासनालाही ठेंगा

$
0
0
‘समांतर’ जलवाहिनीच्या संदर्भात महापालिकेने कंत्राटदाराशी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय करार केला आहे, असे शपथपत्र राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे प्रधानसचिव श्रीकांत सिंह यांनी हायकोर्टात सादर केले आहे.

‘मौलाना आझाद’च्या संचालकांविरुद्ध गुन्हा

$
0
0
मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या संचालकांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात यूजीसीच्या निधीमध्ये ३७ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त एसीपी सय्यद मुजफरोद्दीन यांच्या तक्रारीवरून कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला बँकेला तिसऱ्या टप्प्याची आशा

$
0
0
भारतीय महिला बँकेची शाखा दुसऱ्या टप्प्यात स्थापन होण्याची शक्यता मावळली आहे. या टप्प्यात राज्यांच्या राजधानींना प्राधान्य देण्यात आले असल्याने औरंगाबादचा विचार एप्रिलमधील तिसऱ्या टप्प्यात केला जाऊ शकतो.

राजकारणाचे ध्रुवीकरण तिस-या पर्यायामुळे लगाम

$
0
0
‘तिसरा पर्याय सशक्त असेल तर, राजकारणाच्या ध्रुवीकरणाला लगाम बसू शकतो, हे नवी दिल्लीतील निवडणूक निकालामुळे समोर आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उपक्रमशील राहून पक्ष संघटना मजबूत करावी,’ असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले आहे.

टेन्शन खल्लास

$
0
0
सळसळता उत्साह संचारलेल्या तरुणाईच्या ऊर्जेला मंगळवारी महाराष्ट्र टाइम्सने ‘कार्निव्हल’च्या माध्यमातून एक अनोखी साद घातली आणि औरंगाबादच्या तीन कॉलेजांमध्ये ‘कल्ला’ झाला.

अण्णांना आमचा पाठिंबा

$
0
0
समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सुरू केलेल्या उपोषणाला औरंगाबादकरांनी पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या धरणे आंदोलनात सामील होऊन विविध संघटना व तरुणांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला.

प्रलंबित मागण्यांसाठी ‘शिक्षकभारती’चे उपोषण

$
0
0
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीने मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

इराणच्या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली घाटीच्या कामाची दखल

$
0
0
घाटी हॉस्पिटलमधील कान - नाक - घसा विभागातील तज्ज्ञांच्या क्षयरोगावरील शोधनिबंधाची इराणच्या आंतरराष्ट्रीय मासिकाने दखल घेतली आहे. डॉ. श्रीनीवास चव्हाण, डॉ. सुनिल देशमुख यांचा शोधनिबंध इराणच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

नाल्याच्या मोजणीचे २० लाख ‘नाल्यात’

$
0
0
शहरातील नाल्यांची हद्द मोजण्यासाठी नगरभूमापन व भूमिअभिलेख कार्यालयाकडे पालिकेने भरलेले वीस लाख रुपयांचे शुल्क नाल्यातच गेल्याचा आरोप सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला.

डॉक्टरांची हजेरी : आरोग्य केंद्रात रजिस्टर

$
0
0
मुख्यालयात वैद्यकीय अधिकारी राहतात की नाही, याची तपासणी आजवर कित्येक वेळा झाली. अडचणीत आले, की डॉक्टरमंडळी दौऱ्यावर गेल्याचे सांगतात.

शाळादुरुस्तीचे ‘तीन-तेरा’

$
0
0
‘डीपीडीसी’मधून शाळाखोल्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या निधीसाठीच्या प्रस्तावांमध्ये प्रचंड अनियमितता झाली. एकाच योजनेसाठी एकापेक्षा अधिक फायली सादर झाल्या. हे पहिल्यांदाच दिसून आले.

एसटीचा ‘प्रवासी डे’ साजरा

$
0
0
प्रवाशांची वाढ करण्याच्या दृष्टीने एसटी विभागातर्फे मंगळवारी ‘प्रवासी डे’ साजरा केला. यात अडीचशे कर्मचाऱ्यांनी विविध रस्त्यांवर थांबून प्रवाशांना बसमध्ये बसवून दिले.

सहाय्यक सचिव, उपसचिवांच्या बदल्यांचे आदेश

$
0
0
प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पॉलिटेक्निकच्या प्रश्नपत्रिकांना पाय फुटल्याचे स्पष्ट झाल्याने विभागीय तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव संदीप विश्वरुपे यांच्यासह दोन सहाय्यक सचिवांची बदली करण्यात आली. त्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती देण्यात आली असून तसे आदेश मंगळवारी आले.

महामार्गांवरील प्रवास ‘राम भरोसे’

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. या मार्गांवर अपघाताच्या घटना घडणारी ठिकाणे निश्चित करून, त्या ठिकाणी योग्य सूचना आणि उपाय योजना करण्याची गरज आहे.

आर्थिक दुर्बलांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवणार

$
0
0
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून ५ लाख करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. तारांकित प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला त्यांनी पुन्हा वाचा फोडली.

‘अॅलॉइज’ कंपनीत स्फोट

$
0
0
चित्तेगाव औद्योगिक वसाहतमधील औरंगाबाद अलॉइज प्रा. लिमिटेड कंपनी मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात एक ठार, तर चार जण जखमी झाले आहे. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

४ महिन्यांत ११२ कोटींच्या खर्चाचे आव्हान

$
0
0
जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत केवळ ६० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. उर्वरित चार महिन्यांत ११२ कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.

रंगकर्मींचा जीवनपट पडद्यावर

$
0
0
‘रंगमंचावर काम करणे एक ध्यास आहे. रंगमंचाशी असलेली रंगकर्मींची भावना आणि स्पंदने मांडण्याचा प्रयत्न ‘रंगकर्मी’ चित्रपटात केला आहे. रंगभूमीचा सुवर्णकाळ उभा करतानाच कलाकारांचे जगणे मांडणारा हा चित्रपट आहे’ असे प्रतिपादन अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images