Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ग्रामसभेची जबाबदारी घेण्यास शिक्षकांचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी शिक्षकांकडे देऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेही हे शिक्षकांचे काम नसल्याचे सांगत त्यावर बहिष्कार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक असतात, मात्र त्यांनीच याकामी हात झटकल्याने या ग्रामसभांचे कार्यवृत्तांत लिहिण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. याविरुद्ध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ग्रामसभेचे कार्यवृत्तांत लिहिण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, केल्यास कार्यवृत्तांत लिहिण्यास पूर्णपणे बहिष्कार राहील, असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांना दिले आहे.

संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप,कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेही हे काम शिक्षकांचे नसल्याचे सांगत ते करण्यास नकार दिला आहे. शिक्षकांनी बहिष्कार टाकलेले काम ग्रामसेवक किंवा तलाठ्यांकडून प्रशासन करवून घेणार आहे का, असा सवाल सेनेने केला आहे. ग्रामसभा आयोजित करण्याची जबाबदारी शिक्षकांकडे देऊ नये, अशी मागणीही सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार,सरचिटणीस सदानंद माडेवार, कार्याध्यक्ष संतोष आढाव पाटील आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ वी प्रात्यक्षिक परीक्षा, बहिष्काराचे सावट कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि प्रात्यक्षिक परीक्षा पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. परीक्षेचे हॉलतिकीट ३० जानेवारीपासून वितरित करण्यात येणार आहेत. परीक्षांवर शिक्षकांच्या बहिष्काराचे सावट कायम आहे.

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले. मंडळाच्या परीक्षांवर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू केली. दोन फेब्रुवारी रोजी ज्युनिअर कॉलेज बंद पाळणार आहेत, तर प्रात्यक्षिक परीक्षा न घेण्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यावर मंडळ अधिकाऱ्यांनी सावध पाऊले उचलित प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत होतील, असे सांगितले. परीक्षार्थींना मंडळाकडून ३० जानेवारीपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचे वाटप करण्यात येणार आहेत. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून एक लाख ६५ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठीची नोंदणी केली आहे.

हॉलतिकिटांचे वाटप

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे प्रवेशपत्रे व प्रात्यक्षिक परीक्षा साहित्य ३० जानेवारी रोजी मंडळातर्फे वितरित करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या वितरण केंद्रावर सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत हे वितरण करण्यात येणार आहे. ज्युनिअर कॉलेजांनी याची नोंद घ्यावी असे विभागीय मंडळाच्या सचिवांनी आवाहन केले आहे.

शासनाकडे ज्युनिअर कॉलेजस्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत शासनस्तरावर आमचा पाठपुरवा सुरू आहे, परंतु केवळ आश्वासन दिले जाते. त्यामुळे राज्यपातळीवर आम्ही दोन फेब्रुवारी रोजी ज्युनिअर कॉलेज बंद पाळत आहोत. त्यानंतर काय तो निर्णय होईल.

- भगवान इंगळे, ज्युनिअर कॉलेज संघटना, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या काही सेकंदात होणार रेटिनाची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सासवडे नेत्र रुग्णालय व ओंकार लॅसिक लेसर सेंटरमध्ये अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे अवघ्या काही सेकंदात रेटिनाची तपासणी शक्य झाली आहे. मध्य भारतात पहिल्यांदाच ओपटॉसडेटोना या नावाचे रेटिनाची सखोल तपासणी करणारे मशीन आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या ०.४ सेकंदात रेटिनाची तपासणी होऊ शकणार आहे. त्यामुळे रेटिनाचे व सुरुवातीच्या काळात आजाराचे निश्चित निदान होणार आहे. भविष्यातील उपचार ठरवण्यास त्यामुळे मदत होते. या अद्ययावत तपासणीचा लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन डॉ. मनोज सासवडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांकडून परिपत्रकाची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील ३६ जिल्हा माथाडी मंडळ संपवून एकच मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने हालचाली सुरू केल्याने मराठवाडा लेबर युनियनने तीव्र संताप व्यक्त करत, याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभ्यास मंडळ स्थापनेबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाची युनियनने गुरुवारी होळी केली.

क्रांतीचौक येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. कायद्यात कालानुरूप बदल करावे लागतात, त्यास विरोध नाहीच पण, शासनाचा हेतू शुद्ध नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. प्रा. एच. एम. देसरडा, देविदास कीर्तीशाही, अली खान, शेख रफीक शेख गफूर, प्रवीण सरकटे, कैलास लोखंडे, भरत गायकवाड, संदल खान, प्रकाश ससाने, सर्जेराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा मंडळ असूनही अद्यापही २५ टक्के कामगारांनाही संरक्षण दिले जात नाही, अशा स्थितीत एकच मंडळ असेल तर राज्यातील कानाकोपऱ्यात काम करणारा कष्टकरी कामगारांना कसा न्याय मिळेल, अभ्यास मंडळात कामगार तसेच कारखाना प्रतिनिधींना स्थान का दिले नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. मूठभर कारखानदारांच्या दबावापोटी शासन हा निर्णय घेत असून, यामुळे कामगारांना आत्महत्या कराव्या लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, हा कायदा वाचविण्यासाठी आता करो वा मरोचा लढा सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.

आज मूक मोर्चा

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात येणाऱ्या पालकमंत्र्यांचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्तालयावर शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहागंज येथून सकाळी आठ मोर्चा सुरू होईल. शासनाने आडमुठी भूमिका सोडली नाही, तर राज्यव्यापी बंद करावा लागले असा इशारा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपपेक्षा काँग्रेसची सत्ता बरी होती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भाजपपेक्षा काँग्रेसची सत्ता बरी होती, असं म्हणण्याची वेळ आली आहे. काँग्रेस शासनात सर्वसामान्यांना उशिरा न्याय मिळायचा. आता भाजपच्या काळात सर्वसामान्यांना न्याय नाहीच. भिडे, एकबोटे यांना कोर्टाने जामीन नाकारल्यानंतरही त्यांना अटक केली जात नाही,' असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पाटील शहरात क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'कोरेगाव भीमाची घटना झाल्यानंतर समाजात वाद पेटविणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून शिरूर कोर्टात भिडे आणि एकबोटेंविरोधात खासगी फौजदारी याचिका दाखल केली. या याचिकेवर २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या दोघांनाही सत्र न्यायलयाने जामीन नाकारला. यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. याच ठिकाणी सामान्य व्यक्ती असला असता, तर त्याला पोलिसांनी सोडले असते का ? मुख्यमंत्री संघाच्या इशाऱ्यावर काम करित आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

निवडणुका लढविणार

पाटील म्हणाले, 'राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्यभरात १२० शाखा आहेत. आगामी काळात धनगर, वंजारी, माळी आणि मुस्लिमांना सोबत घेऊन विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार येतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नराधम पित्याने केला मुलीवर बलात्कार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नराधम पित्याने स्वतःच्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी रात्री जवाहरनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे.

१४ वर्षांची ही मुलगी घरात झोपलेली होती. यावेळी तिच्या वडीलांनी बळजबरीने तिचे तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सकाळी कुटुंबियाच्या लक्षात आला. यापूर्वी देखील या नराधमाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. यावेळी नातेवाईकांनी त्याला चोप देखील दिला होता. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी वडिलाविरुद्ध बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडिलांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवानगरी क्रॉसिंग होणार इतिहासजमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवानगरी भागातील रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रुळांमधील स्लिपर हटविण्याला शनिवारी सुरुवात केली. येत्या दोन दिवसांत रेल्वे गेट काढून, रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी तयार केलेला रस्ता उखडण्यात येमार आहे. त्यामुळे हे रेल्वे गेट पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

शहानूरमिया दर्ग्याजवळील रेल्वे क्रॉसिंग गेट (क्रमांक ५४) बंद करू नये, अशी याचिका देवानगरीवासीयांनी केली होती. या याचिकेवर कोर्टाने रेल्वे गेट बंद करण्यासाठी रेल्वे विभागाला परवानगी दिली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर शनिवारी (२७ जानेवारी) रेल्वे विभागाचे विशेष पथक रेल्वे गेटवर काम करण्यासाठी पाठविण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळांमध्ये वाहनांना जाण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे स्लीपर हटविण्याचे काम सुरू केले. सिमेंटचे स्लीपर हटविल्यानंतर रेल्वे सिंगल पॅनल मशीन काढण्यात आले. याशिवाय सेफ्टी गार्डचेही पॅनल हटविण्याची काम दिवसभरात करण्यात आले.

येत्या दोन दिवसांत रेल्वे रूळाला जोडणारा रस्ताही उखडण्यात येणार आहे. शिवाय रेल्वे गेटही काढून या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहनांना प्रवेश होऊ नये, याची व्यवस्था केली जाणार आहे. गेट बंद केल्यानंतर या भागातील नागरिकांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता राहणार नाही. यामुळे या भागात लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम करावे, अशी मागणी देवानगरी मेट्रो असोसिएशनने केली आहे.

आधी पाच कोटी रुपये द्या

रेल्वे गेट क्रमांक ५४चा 'क्लोअर रिपोर्ट' घेतल्यानंतर रेल्वे विभागाकडे अडकलेले साडेबारा कोटी रुपये एमएसआरडीसीला मिळणार आहे. त्यातील पाच कोटी रुपयांमध्ये देवानगरी भागात भुयारी मार्ग तयार करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी देवानगरी भागातील नागरिकांनी एमएसआरडीसीचे विक्रम जाधव यांच्याकडे केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील यांनी दिली.

'गेट क्रमांक ५२'चे काय?

रेल्वे स्टेशनजवळील पैठण रोडवरील उड्डाणपुलाखाली गेट क्रमांक ५२ अद्याप सुरू आहे. रेल्वे गेट क्रमांक ५२का बंद केले जात नाही, असा प्रश्न देवानगरी भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या बांधणीची बस सिडकोला मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एसटी कार्यशाळेत पहिली 'एमएस बॉडी'ची बस तयार करण्यात आली आहे. ही बस औरंगाबाद विभागाला देण्यात आली असून, येत्या चार दिवसांत ही बस सिडको बस स्थानकाकडे सोपविण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने जुन्या बसची एमएस (स्टील) बॉडी विकसित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दापोडीला पहिली बस बांधण्यात आली होती. नवीन पद्धत आणि तंत्रज्ञानाप्रमाणे, विविध सोयी असलेली बस तयार करण्यात आली. ही बस औरंगाबादच्या सिडको बस स्थानकाला देण्यात आली होती. शिर्डी ते औरंगाबाद या मार्गावर बसला मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर औरंगाबादमधील चिकलठाणा कार्यशाळेतही अशा स्वरुपाच्या बसबांधणी सुरवात करण्यात आली. ही बस २५ जानेवारीला बांधून तयार करण्यात आली आहे. चिकलठाणा कार्यशाळेत तयार झालेली बस औरंगाबाद विभागाला देण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागाच्या यंत्रचालन विभागात सध्या बसच्या मशीनवर काम सुरू आहे. येत्या चार दिवसांत ते पूर्ण झाल्यानंतर आरटीओ पासिंग करण्यात येईल. त्यानंतर ही नवीन बस सिडको विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पाच बस तयार करणार

चिकलठाणा कार्यशाळेत तयार केलेल्या एमएस बॉडी बसमध्ये प्रवाशांसाठी सुविधा आहेत. ही बस आरामदायी आहे. बसमधील वातावरण हवेशीर असेल. बसमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाकडे माइक देण्यात आला आहे. विविध माहिती देण्यासाठी बसमध्ये डिजिटल फलक लावण्यात आला आहे. धोक्याची सूचना देण्यासाठी हुटरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या बसच्या यशस्वी बांधणीनंतर आणखी पाच बस तयार करण्यात येणार असल्याची माहिती चिकलठाणा कार्यशाळेतून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैलासनगर रस्त्याची 'ड्रॉइंगकोंडी'

$
0
0

८० हजारांचे बिल थकित, आराखडा देण्यास कंत्राटदाराचा नकार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कैलासनगर ते एमजीएम या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या कंत्राटदाराचे पैसे महापालिकेने दिले नाहीत. त्यामुळे त्या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाचे ड्रॉइंग (आराखडा) रोखून ठेवले आहे. याचा परिणाम म्हणून या रस्त्याचे काम पुन्हा संकटात सापडल्याचे मानले जात आहे.

लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमी आणि स्मशानभूमी ते एमजीएम या रस्त्याचे रुंदीकरण २०११-१२मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर लक्ष्मणचावडी ते स्मशानभूमी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले, पण स्मशानभूमी ते एमजीएम हे काम रखडले. हे काम सुरू करण्यात यावे यासाठी माजी महापौर प्रशांत देसरडा यांनी पाच वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. आमदार अतुल सावे यांनी देखील या कामासाठी पालिका आयुक्तांकडे वारंवार बैठका घेतल्या, स्थळपाहणी देखील केली. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी रस्त्याच्या कामाची निविदा (टेंडर) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. टेंडर मंजूर झाल्यावर लगेचच रस्त्याचे काम सुरू होईल, असे मानले जात होते, परंतु अद्याप काम सुरू झाले नाही. रस्त्याचे काम का सुरू झाले नाही, याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती समोर आली. केवळ ८० हजारांसाठी काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले. या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक आणि ड्रॉइंग पुणे येथील एका कंत्राटदाराने तयार केले आहे. महापालिकेने या कंत्राटदाराचे पेमेंटच दिले नाही. केलेल्या कामापोटी त्या कंत्राटदाराने महापालिकेकडे ८० हजार रुपयांची मागणी केली आहे. महापालिका पेमेंट देत नाही म्हणून त्याने रस्त्याचे ड्रॉइंग रोखून ठेवले. पैसे मिळाल्याशिवाय ड्रॉइंग देत नाही, अशी भूमिका कंत्राटदाराने घेतली आहे. ड्रॉइंग न मिळाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. हे काम पुन्हा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

अंदाजपत्रक व ड्रॉइंग तयार करणाऱ्या कंत्राटदाराचे पेमेंट महापालिकेने केले तर रस्त्याचे काम लवकर सुरू होऊ शकेल. दरम्यान या रस्त्याची पाहणी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने शुक्रवारी केली.

जालना रोडला समांतर रस्ता

कैलासनगर ते एमजीएम या रस्त्याचे काम झाल्यानंतर जालनारोडला समांतर रस्ता तयार होणार आहे. त्यामुळे जालना रोडवरील ताण कमी होणार आहे. वरद गणेश मंदिरापासून एमजीएम हॉस्पिटलपर्यंत सरळ रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. सिडकोकडे जाणाऱ्यांना या रस्त्याचा वापर करता येणार आहे. या समांतर रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे मानले जात आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांत जालना रोडवर प्रचंड ताण येत आहे. या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रसंग वारंवार घडतात. समर्थनगर ते एमजीएम हॉस्पिटल असा सरळ रस्ता उपलब्ध झाल्यास जालना रोडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.


कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम मिळालेल्या कंत्राटदाराबरोबर मी रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामाचे ड्रॉइंगच मिळाले नाही, असे यावेळी लक्षात आले. ड्रॉइंगविषयी विचारणा केली असता महापालिकेने संबंधित कंत्राटदाराचे बिल दिले नसल्याचे समोर आले. ड्रॉइंग मिळेपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे त्या कंत्राटदाराचे पेमेंट करावे, या मागणीसाठी मी महापौर व आयुक्तांची भेट घेणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने स्वतंत्र कनिष्ठ अभियंता देखील नियुक्त केला पाहिजे.

- प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाल्मी’त महासंचालक कधी नेमणार?

$
0
0

प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांच्यातील बेबनावाचा संस्थेच्या कामावर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृद व जलसंधारण आयुक्त दीपक सिंगला जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) प्रभारी महासंचालक आहेत. 'वाल्मी'चे महासंचालक सचिव दर्जाचे असल्यामुळे प्रभारी महासंचालक सिंगला यांना विशेषाधिकार नाहीत. त्यामुळे 'वाल्मी'ची प्रशासकीय घडी बसवण्यासाठी पूर्णवेळ महासंचालक नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यातील बेबनावाने संस्थेचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालय स्थापण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या नवीन विभागात तब्बल ३० हजार कर्मचारी असतील. मागील एक वर्षांत फक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. नवीन आयुक्त दीपक सिंगला यांनी नुकताच पदभार घेतला आहे. पैठण रोड परिसरातील 'वाल्मी' संस्थेत आयुक्तालय कार्यरत आहे. सिंगला रुजू होण्यापूर्वी 'वाल्मी'चे महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक आर. बी. क्षीरसागर यांना लाच घेताना अटक करण्यात आली. या घटनेने प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली. 'वाल्मी'तील प्राध्यापकांची गटबाजी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन चर्चेत आले. सध्या 'वाल्मी'च्या महासंचालक पदाची जबाबदारी सिंगला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रभारी महासंचालक सिंगला यांना विशेष अधिकार नाहीत. त्यामुळे संस्थेकडे जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यासाठी उपयुक्त संस्थेत महासंचालकांची तातडीने नियुक्ती आवश्यक आहे. या संस्थेचा कारभार 'प्रभारी' ठेवू नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राध्यापक भरतीचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यामुळे संस्था चर्चेत होती. संबंधित प्रकरण कोर्टात गेल्यानंतर अधिक वादंग निर्माण झाला होता. मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी महासंचालक व सहसंचालक यांनी लाच मागितली होती. प्रतिष्ठीत संस्थेत घडलेला प्रकार राज्यभर गाजला होता.

कर्मचारी कधी नेमणार?

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर जलसंधारण मंत्री, जलसंपदामंत्री आवर्जून 'वाल्मी' संस्थेला भेट देत असतात, मात्र जलसंधारण आयुक्तालयात कर्मचारी आणि 'वाल्मी'चे महासंचालक कधी नेमणार याबाबत कुणी भाष्य करीत नाही. जलसंधारण मंत्री राम शिंदे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 'जलयुक्त शिवार योजने'वर भरभरून बोलल्यानंतर शिंदे यांनी 'वाल्मी'वर बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची वेतनकोंडी

$
0
0

शालार्थ प्रणालीची वेबसाइट १५ दिवसापासून बंद

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शालार्थ वेतन प्रणालीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही वेबसाइट दहा जानेवारीपासून बंद असल्याने शाळांना पगाराची माहिती भरता आलेली नाही. परिणामी राज्यभरातील लाखो शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार उशिराने होण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी शालार्थ प्रणाली विकसित केली. त्या माध्यमातून दर महिन्याच्या १५ तारखेस शाळांकडून पगाराचे देयक वेतन पथकाकडे पोचते. हे देयक शालार्थमध्ये तयार होऊन त्याची प्रत वेतन पथकाकडे आवश्यक कागदपत्रांसोबत दिली जाते. यानंतर हे पथक याची तपासणी करून देयके मंजूर करते, मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणारी शालार्थ प्रणालीची वेबसाइट १५ दिवसापासून बंद आहे. काही शाळांचे पगार बिले अपलोड झालेली नाहीत. परिणामी, अनेक शाळा यापासून वंचित राहिल्या आहेत. वेबसाइट लवकर सुरू झाली नाही, तर राज्यातील शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन उशिरा होण्याची भीती निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न कायमच अडचणीचा ठरणारा मुद्दा आहे. गेल्या काही महिन्यांपासून याची घडी व्यवस्थित बसली होती. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही अडचण झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

शालार्थ प्रणाली लागून झाल्यानंतर प्रत्येक शाळेसाठी एक सिस्टीम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत शाळांनी वेबसाइटवर वेतनबिले अपलोड करणे आवश्यक आहे. त्याची तपासणी होऊन महिनाअखेरपर्यंत पगार ऑनलाइन जमा केले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दहा जानेवारी रोजी या वेबसाइटमध्ये अडचण निर्माण झाली. गेल्या १५ दिवसांपासून ही त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे, मात्र भारतातील तंत्रज्ञांना ते शक्य झालेले नाही. अमेरिकेतून आता या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे. गेले तीन दिवस सुट्या असल्याने त्रुटी दूर होऊ शकली नाही. सोमवारनंतर शालार्थ प्रणालीची वेबसाइट दुरुस्त होईल. त्यानंतर पगारबिले अपलोड करणे सुरू होईल. या प्रक्रियेला विलंब होऊन जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणे अवघड असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

शालार्थ प्रणालीची वेबसाइट १५ दिवसापासून बंद असल्यामुळे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांचे जानेवारीचे वेतन उशिरा होणार आहे. शिक्षकांच्या पगाराबाबतचा विलंब ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर कायमस्वरुपीचा तोडगा निघत नाही. शालार्थ वेतन प्रणालीद्वारे ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाही वेतन दिरंगाई ही सातत्याची बाब होत आहे. यात सुधारणा हवी.

- राजेश हिवाळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ


राज्यातील शाळा : १ लाख ११ हजार

शिक्षक : ५ लाख ५० हजार

विद्यार्थी : सव्वादोन कोटी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावी अभियंत्यांनी दाखविली स्वच्छतेची वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गावातील सांडपाण्याला स्वच्छ करून ते जमिनीत मुरविण्याचे तंत्र जेएनई कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या तरुणांनी गावकऱ्यांना शिकविले. शहरापासून जवळ असलेल्या, डोंगरांनी वेढलेल्या हातमाळी गावात रोसेयोच्या शिबिरातून विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून गावाला स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखविला आहे.

पाणी टंचाईची समस्या मराठवाड्यातील अनेक गावांत जाणवते. त्यावर अभियांत्रिकीच्या भाषेतून उत्तर देण्यासाठी अभियांत्रिकी कॉलेजची तरुणाईही प्रयत्न करते. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून जेएनईसीच्या विद्यार्थ्यांनी हातमाळी गावाची निवड केली. गावात सर्वात महत्त्वाची समस्या असलेल्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून जलसंधारणाचा उपाय करण्याचे निश्चित केले अन् ही तरुणाई कामाला लागली. सतत सात दिवस श्रमादानातून या विद्यार्थ्यांनी गावात शोषखड्डे निर्माण केले. गावात ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने घरातील सांडपाणी रस्त्यावर येते. अन् डासांचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात होता. गावातील हे चित्र लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सहा गट तयार करून शोषखड्ड्याचे काम हाती घेतले. काही विद्यार्थी शास्त्रोक्त पद्धतीने शोषखड्डे कसे तयार करतात याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना देत होते. शोषखड्ड्यांच्या माध्यमातून स्वच्छ केलेले पाणी जमिनीत मुरविण्याचे तंत्रही विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना शिकविले.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला काम विभागून देण्यात आले. सात दिवसांत विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यांवरून वाहणारे सांडपाणी थांबवून ते शोषखड्ड्यांमध्ये वळविले. यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच टिकाव, फावडे अशा वस्तू हातात घेतल्या होत्या. जवळपास शंभर विद्यार्थ्यांची टीम यासाठी प्रयत्न करत होती अन् त्याला यश आले. तरुणाईची धडपड पाहत गावकऱ्यांनीही आपल्या कामातून वेळ काढून या तरुणांसोबत श्रमदान केले. विद्यार्थ्यांच्या हे काम पाहण्यासाठी डॉ. विजयकुमार फड, कॉलेजचे डॉ. रवींद्र देशमुख, प्रा. अजय खके. प्रा. सुजीत मोरे, वृषाली कदम यांनी भेट दिली मार्गदर्शन केले.

अन् भिंती बोलू लागल्या...

एका टीमने गावातील शोषखड्ड्याचे काम केले तर, आपल्या मित्रांना मदत म्हणून आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनीही मदतीसाठी धावले. गावकऱ्यांना विविध मार्गदर्शक सूचना अन् संदेश देण्यासाठी या या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून भिंती बोलक्या केल्या. विद्यार्थ्यांच्या कुंचल्याने विजेची कमतरता लक्षात घेत सौरऊर्जेची गरज, स्वच्छ भारत, मुलींचे शिक्षण, आरोग्याची काळजी यासंदर्भातील संदेश भिंतींवर रंगविले.

हातमाळी गावात आम्ही शिबिराच्या निमित्ताने केलेले काम उत्तम होते. गावाकडच्या लोकांना किती श्रम करावे लागतात हे आम्ही अगदी जवळून पाहिले. श्रमदानातून आम्ही गावातील स्वच्छतेबाबतची परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला, त्यात यश मिळाल्याचे वाटते.

- अदिती कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वबळावर लढण्यास भाजप सक्षम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मते मिळाली. भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन शिवसेनेने २०१४मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली. त्या निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेला पुन्हा स्वबळ आठवत असेल, तर भाजपसुद्धा स्वबळावर सरकार आणण्यास सक्षम आहे,' असे परखड प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले. ते शहरात बोलत होते.

गुणीजन साहित्य संमेलनासाठी रविवारी शहरात आलेले जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी परखड प्रतिक्रिया दिली. 'शिवसेना गेली साडेतीन वर्षे सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेत टिका करीत आहे. शिवसेना भाजपचा जुना मित्र पक्ष असून त्यांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची भूमिका असते. शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असेल आम्हीसुद्धा सक्षम आहोत. पुढील निवडणुकीतही भाजपची एकहाती सत्ता राहील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील,' असे शिंदे म्हणाले. 'जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून टंचाईमुक्त महाराष्ट्र योजना राबविण्यात येत आहे. राज्याचा आर्थिक स्तर उंचावण्यास त्याची मदत होईल, असे शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहनप्रकाश, पृथ्वीराज चव्हाण उद्या शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रदेश काँग्रेस समितीने जाहीर केल्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्हास्तरीय शिबिर ३० जानेवारी रोजी होणार आहे. सिडकोतील सागर लॉन्स, अग्रसेन भवन येथे अनुक्रमे जिल्हा व शहर काँग्रेस, महिला आघाडी तसेच युवक आघाडीची स्वतंत्र शिबिरे होणार आहेत. या शिबिरासाठी काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले, 'प्रदेश काँग्रेसने दिलेल्या सूचनांनुसार शिबिराचे आयोजन केले आहे. सागर लॉन्स येथे जिल्हा काँग्रेसचे शिबिर होईल. याठिकाणी कार्यकर्त्यांना नोंदणी करूनच प्रवेश मिळणार आहे. प्रत्येकाला ओळखपत्र, ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. सिडकोतील अग्रसेन भवनात महिला आघाडीचे शिबिर होईल. याच ठिकाणी दुसऱ्या युवक काँग्रेसचेही शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत हे शिबिर होईल. शिबिरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ नेतेमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला डोकं वापरायचं नाही...!

$
0
0

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुले न शिकण्याचे कारण असो की, शाळाबाह्य मुलांची समस्या. तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तुम्हीच शोधायचे. मी, फक्त कोणी केलेले उपाय तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे टपालाचे काम करेन. अशा प्रश्नांवर उपाय शोधणारी महाराष्ट्रात एवढी डोकेवाली लोक आहेत तिथे, मला डोकं वापरायचं नाही. बिनडोक माणूस प्रधान सचिव राहू शकतो', अशी उपरोधक टोलेबाजी करत प्रधानसचिव नंदकुमार यांनी शनिवारी शिक्षकांचा वर्ग घेतला. ८० हजार शाळा सरकार बंद करणार या विधानाने गाजत असलेले नंदकुमार काय बोलणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले होते.

जिल्ह्यातील शंभरटक्के मुलांच्या मूलभूत क्षमता प्रभुत्व संपादनासाठी शनिवारी 'शिक्षक सुसंवाद कार्यशाळा' घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला पाच हजारपेक्षा अधिक शिक्षकांनी हजेरी लावली. राज्यातील ८० हजार शाळा बंद करू असे सांगणारे नंदकुमार काय बोलतील याकडे शिक्षकांचे लक्ष लागले होते. शिक्षकांच्या कार्यशाळेत अन् नंतरही शिक्षकांमध्ये चर्चा रंगली ती नंदकुमारांच्या उपरोधिक टोलेबाजीची. नंदकुमार म्हणाले, 'गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शाळांमध्ये मुले येत ती शिकली पाहिजेत. मुले शिकत नाहीत, त्यावर उपाय काय हेच शिक्षकांनी शिक्षण परिषदेमध्ये सांगितले पाहिजे. केंद्रप्रमुखांच्या पातळीवर याची देखरेख ठेवली जाईल. शाळाबाह्य ही समस्या आहे. गुणवत्तापूर्ण शाळेसाठी शिक्षकांनीच प्रयत्न करावेत. शिक्षकांना 'तुच आहे तुझं पाशी' हेच मी सांगतो, मी फक्त लेक्चर देतो. करणार तुम्ही आहात. उपाय शोधणारी येथीलच मंडळी आहेत. ते उपाय तुमच्यापर्यंत मी पोहचविणार. माझे काम टपालाचे आहे. तुमच्या प्रश्नाचे समाधानात्मक उत्तर तुम्हीच शोधायचे,' असे ते म्हणाले.

भागाकार ही येत नाही..

'आपल्याला सगळे येते, परंतु विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही,' असे सांगत नंदकुमार यांनी शिक्षकांचाही वर्ग घेतला. कार्यशाळेत शिक्षकांना काही भागाकार विचारात संवाद साधला. ८६४ ला ८ ने भागा, ९८१ ला ९ ने भागाकार केला तर उत्तर किती येते? असे प्रश्न विचारत त्यांनी शिक्षकांची तपासणी केली. शिक्षकांनी उत्तरे दिली. तसेच प्रश्न-उत्तरे, अडचणी काय आहेत हे विचारले. विशेष मुलांना शिकविणे, शाळाबाह्य मुले असे प्रश्न आले. याचे उत्तर शिक्षकांनीच शोधले असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांनी उपायही मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मशानभूमीत लघुशंका केल्याने हातपाय मोडले

$
0
0

औरंगाबाद :

स्मशानभूमीत लघुशंका केली म्हणून आदिवासी समाजातील एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये रविवारी घडली. या हाणामारीत त्याचे हातपाय मोडले असून या प्रकरणी पोलिसांनी नऊजणांना अटक केली आहे. आरोपींविरोधात जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दंगलीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

पिंपळखेडा येथे २१ जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. रावण वामन पवार या आदिवासी समाजातील व्यक्तीला नऊ जणांनी बेदम मारहाण केली. त्यात पवारचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. याप्रकरणी या नऊजणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पवार हा गंगापूर तालुक्यातील लांजी येथे राहत असून त्याची पत्नी गावची सरपंच आहे. २१ जानेवारी रोजी तो मोटारसायकलवरून पिंपळखेडा येथे नातेवाईकांना भेटायला गेला होता. तिथून परतत असताना एका स्मशानभूमीत तो लघुशंकेसाठी गेला असता त्याला काही गावकऱ्यांनी हरकत घेतली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पवार आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही वेळाने भांडणाचं पर्यवसान हाणामारीत होऊन त्याला लाठ्याकाठ्या, पट्टा आणि वायरने बेदम चोप देण्यात आला. त्यात त्याचे हातपाय मोडले.

काही गावकऱ्यांच्या मदतीने त्याने वाळूज पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ही घटना जातीय द्वेषातून झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश टाक यांनी सांगितलं.

ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा:

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद गुरुवारी

$
0
0

औरंगाबाद: अखिल भारतीय बौद्ध धम्म ज्ञानप्रसारक मंडळ व उपासक-उपासिकांच्या वतीने १८ वी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. एक फेब्रुवारीला मावसाळा (ता. खुलताबाद) येथे परिषद होणार आहे. या परिषदेला भदंत विमल रॅम्सी, भदंत धम्मतिस्स, भदंत डॉ. आनंद, भदंत धम्मगवेशी, भिक्खुनी खंत्तीखेमा, भदंत शाक्यपुत्र अमृतानंद, भदंत सागरबोधी, भदंत ज्ञानरक्षित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन एस. प्रज्ञाबोधी, सागर बोधी धम्मतिस्स सत्यबोधी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे वर्षानंतर उद्या दिसणार ‘रेड ब्लड मून’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासीय आणि खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. तब्बल दीडशेवर्षांनंतर उद्या बुधवारी (३१ जानेवारी) पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला 'रेड ब्लड सुपर ब्लू मून' पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती 'एमजीएम'च्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. यापूर्वी अशी खगोलीय घटना १८६६ मध्ये घडली होती.

औंधकर म्हणाले, 'पश्चिम आकाशात सूर्यास्त झाल्यावर पूर्व आकाशात चंद्र उगवेल. औरंगाबाद येथे सायंकाळी चंद्र उदय सहा वाजून १६ मिनिटांनी पहायला मिळेल. यावेळेस चंद्र खग्रास स्थितीमध्ये उगवणार असून, पूर्व क्षितिजाजवळ दाट वातावरण असल्याने सुरुवातीचे २० ते २२ मिनिट क्षितिजापासून दहा ते बारा अंशापर्यंत चंद्र पहायला मिळणार नाही. ३१ जानेवारी २०१८ रोजी चंद्र- पृथ्वी अंतर तीन लाख ६० हजार ९८५ किलोमीटरवर असणार आहे, यावेळेस चंद्रबिंब १४ टक्के मोठा दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत असताना पूर्व आकाशात उगवत असल्याने महाचंद्र तांबूस (रेड सूपर मून) आकाराने मोठा दिसणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार चंद्राचा पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश सायंकाळी चार वाजून १९ मिनिटे व २२ सेकंदांनी होईल. त्यानंतरचंद्राचा पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश झाल्यानंतर सहा वाजून २१ मिनिटे व ४७ सेकंदाने खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. सहा वाजून ५९ मिनिट व ५१ सेकंदाला खग्रास मध्यग्रहण व सात वाजून ३७ मिनिट व ५१ सेकंद या वेळेला खग्रास चंद्रग्रहण समाप्त होईल.'

छायाचित्र काढण्याची संधी

'सध्या हिवाळ्याचे दिवस असून सायंकाळी थंडीही भरपूर आहे. बुधवारी 'रेड ब्लड सुपर ब्लू मून'ची छायाचित्रे काढणे शक्य होणार असून अंगणात, टेरेसवर अथवा गावाबाहेरच्या शेतमळ्यातून चंद्राची छबी टिपता येणार आहे. एमजीएम परिसरातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्रात सायंकाळी साडेसहा वाजता 'रेड ब्लड सुपर ब्ल्यू मून' दुर्बिणीतून पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे औंधकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ९९ टक्के कापसाला बोंडअळी

$
0
0

मराठवाड्यात भरपाईसाठी १२२१ कोटींची गरज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे बोंडअळीने मोठे नुकसान केले असून, मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील सर्व आठ जिल्ह्यांचा अहवाल शासनदरबारी पाठवला आहे. यानुसार; मराठवाड्यात सुमारे ९९ टक्के कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले असून, 'एनडीआरएफ'च्या निकषानुसार नुकसान भरपाईपोटी तब्बल १२२१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश सात डिसेंबर रोजी प्रशासनाला देण्यात आले होते, मात्र तब्बल दीड महिन्यांनंतर पंचनामे पूर्ण करण्यात येऊन अहवाल पाठवण्यात आले आहेत. खरीप हंगामात मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्टरपैकी १७ लाख ८२ हजार ६७९ हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले. पहिल्या वेचणीनंतर बोंडअळीने हल्ला केला व यातील बहुतांश कापूस पीक हातचे गेले, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचा दबाव वाढल्यानंतर सरकारने डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिले होते, जानेवारी अखेरपर्यंत सहा जिल्ह्यांचे अहवाल तयार असताना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांचे अहवाल रखडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून नुकताच अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर विभागाचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित असलेल्या २६ लाख ९० हजार ९३९ शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी रुपये नुकसान भरपाईची आवश्यकता आहे. विभागात १७ लाख ६७ हजार ९५३ हेक्टरवरील कापसाचे बोंडअळीमुळे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भरपाईसाठी जिल्हानिहाय अपेक्षित निधी

जिल्हा..............शेतकरी संख्या.......अपेक्षित निधी

औरंगाबाद.........५७४५४५..........२९६ कोटी २५ लाख

जालना.............५२८८७३..........२७५ कोटी ३७ लाख

परभणी.............३५१११८..........१५७ कोटी ९७ लाख

हिंगोली.............८५७२३............३६ कोटी ६० लाख

नांदेड...............४२३५९९..........१७६ कोटी १२ लाख

बीड.................६९२०३८..........२५६ कोटी ५१ लाख

लातूर...............१०५२९.............८ कोटी ६० लाख

उस्मानाबाद.......२४५१८.............१३ कोटी ५१ लाख

एकूण...............२६९०९३९.........१२२१ कोटी ४ लाख

(निधी रुपयांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा संकटात

$
0
0

तीन फेब्रुवारीपर्यंत बिल भरण्याची मुदत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेकडे गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या वीज बिलाचे १४ कोटी थकित आहेत. ही थकबाकी भरावी अन्यथा येत्या तीन फेब्रुवारीनंतर पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी नोटीस महावितरणने महापालिकेला दिली आहे.

महापालिकेकडे पथदिव्यांची थकबाकी होती. त्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा वाद कोर्टापर्यंत गेला होता. नऊ कोटी रुपये थकबाकी भरण्याचे आदेश कोर्टाने महापालिकेला दिले होते, मात्र हे पैसे महापालिकेने अद्याप भरलेले नाहीत. ही थकबाकी असतानाच आता महापालिकेकडे गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजनेच्या विजेचे १४ कोटी रुपयांचे बिल भरलेले नाही. याबाबत महावितरणच्या शहर विभाग-एकने पाठपुरावा केला. अखेर पालिकेला वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली आहे. या नोटीसची मुदत तीन फेब्रुवारी आहे. त्यापूर्वी महापालिकेने वीज बिलाचे पैसे भरले नाहीत, तर पैठण आणि फारोळा येथील पाणीपुरवठा केंद्रांची वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेला थकित बिलासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बिल भरले नाही, तर वीज खंडीत करावी लागेल.

- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद जालना परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images