Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सोलापूरच्या नेत्यांचा उस्मानाबादमध्ये शिरकाव

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अर्थकारणाच्या माध्यमातून शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील नेते सक्रिय झाले आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये त्यांनी या 'अर्थकारणा'मागची महत्त्वाकांक्षा समोर आली आहे.

जावळेचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

$
0
0
पोलिस जमादाराच्या मुलाच्या आत्महत्येला बावीस दिवस उलटून गेले, तरी अद्याप कुठल्याही पोलिसांवर कारवाई झाली नाही. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या पत्रात पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.

अधिका-यांचे 'अगाध' ज्ञान कृषिमंत्री, सचिव झाले अवाक् !

$
0
0
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सक्षमीकरणासाठी झालेल्या कार्यशाळेत अधिकाऱ्यांच्या अगाध ज्ञानावर अवाक होण्याची पाळी आली.

गुरुजी, आता नकाशा तुम्हीच घ्या जोडून

$
0
0
दहावीच्या पुस्तकात भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेश वगळून तो छापण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शिक्षण मंडळाला जाग आली. हा बदल दुरुस्त करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, परंतु ही प्रक्रिया शाळा स्तरावरून होणार आहे.

आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ३ वर्षे सक्तमजुरी

$
0
0
आत्महत्येला कारणीभूत ठरल्यावरून एकाला कोर्टाने तीन वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. श्रीरंग भीमराव चिकटे (वय ५०) यांनी दोन वर्षांपूर्वी आरोपी रमेश नारायण इंगळे (रा. टाऊन हॉल, जयभीमनगर) याच्या मेहुणीला दहा हजार रुपये उसने दिले होते.

सिटीबसचा कारभारच पंक्चरलेला!

$
0
0
एसटी विभागाने शहर बस सेवा सुरू करण्यासाठी दोन वर्षे सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत एसटी विभागाने नियोजन न केल्यामुळे एक लाख १५ हजार सिटीबसच्या फे-या रद्द केल्या आहेत.

'केशर'ची चव अमेरिकेलाही चाखायला मिळणार

$
0
0
अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्याच्या केशर आंब्याची चव चाखण्याची संधी अमेरिकेतील नागरिकांनाही मिळत आहे. जालन्यातून सुमारे एक हजार 300 किलो केशर आंबे नुकतेच निर्यात करण्यात आले आहेत, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात रोडावली आहे.

'बॅँक ऑफ महाराष्ट्र'चे कर्मचारी १७ला संपावर

$
0
0
'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या व्यवस्थापनाच्या नकारार्थी भूमिकेविरोधात येत्या १७ जून रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे जॉइंट सेक्रेटरी दत्ता आफळे यांनी दिली आहे.

अज्ञात वन्यप्राण्याकडून १७ जणांना चावे

$
0
0
बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील आठ गावांत एका वन्यप्राण्याने धुमाकूळ घातला असून, या प्राण्याने सतरा जणांना चावा घेतला आहे. पाटोदा शिरूर तालुक्यात देशातील एकमेव मयूर अभयारण्य आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी या भागातील एका प्राण्याने आठ गावांमध्ये धुमाकूळ घातला.

पिककर्जासाठी 'BDCC' ला दोनशे कोटी रुपये द्या

$
0
0
बीड जिल्ह्यातील शेतक-यांना वाढीव पीक कर्जासाठी कर्जपुरवठा व्हावा, यासाठी दोनशे कोटी रुपयांची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेला द्यावी, अशी मागणी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

परळी तालुक्यात विवाहितेला जाळले

$
0
0
ट्रक घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी एकाने पत्नीला पेटविले. ही घटना परळी तालुक्यातील दावूदपूर येथे घडली. व्यंकटी खंडेराव नाकाडे असे आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी वैशालीचा या घटनेत मृत्यू झाला.

आज विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका

$
0
0
दहावीचा निकाल जाहीर झाला, पालकांची आणि विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी 'धावा-धाव' सुरू झाली. विशेषतः शहरातील नामांकित कॉलेजमध्येच प्रवेश मिळावा अशी विद्यार्थी, पालकांची धारणा आहे.

दलितवस्ती सुधार योजनेची यादी अखेर स्थगित

$
0
0
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर केलेली २०३ गावांच्या यादीतील ९६ प्रस्ताव वगळता अन्य प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रचंद गदारोळानंतर स्थगित ठेवण्यात आले.

पावसाळ्यात लढण्यासाठी आरोग्य विभाग तयार

$
0
0
पावसाळा सुरू झाला आहे. संभाव्य जलजन्य विकार, साथरोगांपासून बचाव व्हावा, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून पुढील चार महिन्यांत औरंगाबाद जिल्हा व विभागातील नागरिकांची कुठलीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. डी. एन. पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

दुचाकीचोरांकडून १८ दुचाकी जप्त

$
0
0
सिडको पोलिसांनी अटक केलेल्या तीन दुचाकीचोरांकडून आतापर्यंत १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरी केलेल्या या दुचाकी चोरटे आजूबाजूच्या खेडेगावात कमी किमतीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सलीम अली सरोवर होणार 'टूरिस्ट लेक'

$
0
0
दिल्ली गेटजवळील सलीम अली सरोवर आता 'टूरिस्ट लेक' होणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून या ठिकाणी बोटिंगच्या सुविधेसह पक्षी निरीक्षणाची संधीही पर्यटकांना मिळणार आहे. सरोवराशेजारीच जापनिज गार्डन विकसित केले जाणार असून त्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

अनधिकृत शिक्षक संघटनांच्या तालुकास्तरीय बदल्या रद्द करा

$
0
0
राज्य सरकारकडून केवळ तीन संघटना अधिकृत असल्याचे कळविले आहे. मग अन्य दहा, बारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तालुकास्तरीय बदल्यांमधून सूट दिली आहे. ती रद्द करून या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत यांनी केली.

शासकीय जागेवर नारेगावात अतिक्रमणे

$
0
0
नारेगाव येथील बहुतांश अतिक्रमणे शासकीय जागेवर आहेत. पालिकेच्या जागेवर सहा अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे पाडून घ्या, अशी नोटीस संबंधितांना बजावली आहे, असे पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

नैराश्यातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची

$
0
0
चिकलठाणा भागातील उत्तरानगरी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीला आला. आशुतोषसिंह (वय २५) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा बनारसचा आहे. जालना येथे तो इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता.

बनावट सातबाराप्रकरणात मुख्य सूत्रधार मोकाटच

$
0
0
बनावट सातबारा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची सहा दिवस पोलिस कोठडी मिळूनही पैठण पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत फार काही लागलेले नाही. दोन आरोपींशिवाय या प्रकरणात पोलिसांनी अन्य कोणालाच अटक केलेली नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images