Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ट्रॅव्हल्सची बसला धडक, १६ जखमी

$
0
0

वाळूज महानगर: औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला येथे एसटी बस व ट्रॅव्हल्सचा रविवारी पहाटे दोन वाजता अपघात झाला. या अपघातात सोळा प्रवासी जखमी झाले. पुणे-मेहकर बस (एम. एच. ४० ए क्यु ६२७२) ही ४० प्रवासी घेऊन औरंगाबादमार्गे मेहकरकडे जात होती. त्याचवेळी औरंगाबादकडे येणारी ट्रॅव्हल्स (एम एच २९ ए एन ८२८२) च्या चालकाने ओव्हरटेक करून ब्रेक लावल्यामुळे एसटी बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या अपघातात चालक लक्ष्मण चंद्रभान मोरे (वय ४८ रा. अंजनी बु ता. मेहकर) व बसमधील सोळा प्रवासी जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. त्या बसची नंबर प्लेट घटनास्थळी सापडली आहे. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघाताची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राजू वैष्णव हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकांवर कचरा टाकणाऱ्यांवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रात्रीच्यावेळी दुभाजक, रस्त्यावर कचरा टाकत असाल तर, सावधान. आता पालिका अशाप्रकारे कचरा टाकणाऱ्यावर नजर ठेवणार आहे. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी रविवारी पालिका प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन हे निर्देश दिले. या करिता अतिरिक्त कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.

महापालिकेत झालेल्या या बैठकीला उपायुक्त रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख विक्रम मांडुरके, वॉर्ड निरीक्षक, जवान उपस्थित होती. शहरात ठिकठिकाणी साठलेल्या संमिश्र कचरा, वेचकांच्या मदतीने वेगळा करण्यात यावा. कामगारांना आवश्यक गम बूट, हँड ग्लोज आदी साहित्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे, रात्रपाळीमध्ये रस्ता व दुभाजकावर कचरा टाकणारे नागरिक, व्यापारी, हातगाडीवाले यांच्यावर नजर ठेवावी. त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी देण्यात यावे. सफाई मजुरांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार द्या, ज्या प्रभागात सफाई मजुरांची गरज आहे तेथे मजूर देण्याचे नियोजन करावे. कंपोस्टिंग पीट व शेड मारून बांधकाम करण्यात येणार यावे अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद - औरंगाबाद विमानसेवा आता रोज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद ते औरंगाबाद ही विमानसेवा रोज सुरू करण्याचा निर्णय ट्रु जेट कंपनीने घेतला आहे. ही नियमित सेवा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हैदराबाद आणि तिरुपती बालाजी येथे जाणाऱ्या प्रवाशांना सोय होणार आहे, अशी माहिती औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाहून ट्रु जेट कंपनीची हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद ही विमान सेवा सुरू केली. हैदराबादहून तिरुपती येथे जाण्यासाठी संलग्न सेवा असल्याने या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळत होता. कंपनीने औरंगाबादसह बेंगळुरू, चेन्नई, विजयवाडा, राजमुद्री, मुंबई-नांदेड अशी विमान सेवा सुरू केली. त्यामुळे औरंगाबादहून सुरू असलेली हैदराबाद सेवा आठवड्यातून तीन दिवस करण्यात आली होती.

शिर्डी विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ट्रु जेट कंपनीचे विमान शिर्डीला थेट नेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती, मात्र विमान कंपनीने औरंगाबाद शहरातून असलेली सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेला २५ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक

- हैदराबादहून सायंकाळी सव्वासहा वाजता विमान औरंगाबादकडे निघेल. ते औरंगाबादला पावणेआठ वाजता पोचेल

- औरंगाबादहून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी विमान रवाना होईल. ते हैदराबादला रात्री साडेनऊ वाजता पोचेल

- विमान हैजराबादेत रात्री पोचणार आहे. यामुळे आखाती देश, पाश्चात्य देशांकडे जाणाऱ्या विमानांचे कनेक्शन प्रवाशांना उपलब्ध होईल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याच्या पारड्यात वाढीव निधीचे १८४ कोटी

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com

Tweet : @ramvaybhatMT

औरंगाबाद : बोंडअळी, गारपीटच्या अनुदानाची प्रतीक्षा करत असलेल्या मराठवाड्याच्या पारड्यात अर्थ विभागाने जिल्हा वार्षिक योजनेचा तब्बल १८४ कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. त्यामुळे २०१८-१९ वर्षात आता विकासकामांसाठी आठही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेशिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी तब्बल ११०३ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. राज्याची आर्थिक स्थिती वाचारात घेता वाढीव निधी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. या पार्श्वभूमीवर विभागाला १८४ कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. वाढीव निधीसंदर्भात नुकताच मुंबई येथे निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नियोजन विभागाच्या बैठकीत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत सादर केलेल्या आरखड्यात सुमारे ३४ कोटी रुपयांची कपात केली होती, २०१७-१८मध्ये मराठवाड्याचा १४६९ कोटी रुपयांचा आरखडा मंजूर करण्यात आला होता, त्यातुलनेत २०१८-१९ या वर्षासाठी खर्चात कपात करून १४३४ कोटी ८२ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला, तर सर्व ‌‌जिल्ह्यांनी मिळून अतिरिक्त ११०३ कोटी रुपयांची वाढीव निधीची मागणी केली. शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेनुसार प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्री, अधिकाऱ्यांनी आराखडा सादर केला. त्यासोबत अतिरिक्त मागणी मांडली होती. गेल्या काही दिवसांपासून कोणत्या जिल्ह्यांच्या पदरात किती निधी पडतो याची उत्सुकता लागली होती. यानुसार शासनाने कळवलेली आर्थिक मर्यादा; तसेच वाढीव मिळालेला निधी असे एकूण औरंगाबाद जिल्ह्याला २७३ कोटी २० लाख, जालना २०३ कोटी १६ लाख, बीड २३५ कोटी ८३ लाख, परभणी २३५ कोटी ८३ लाख, परभणी १५२ कोटी २९ लाख, उस्मानाबाद १९३ कोटी १९ लाख, लातूर २१३ कोटी ६९ लाख, हिंगोली १०० कोटी ७५ लाख, तर नांदेड जिल्ह्याला २४७ कोटी ९६ लाख मिळणार आहेत. मराठवाड्यासाठी आता १६१८ कोटी ८९ लाख रुपयांचा अंतिम आराखडा मंजूर केला आहे.

----.

मागणीनुसार मिळालेला निधी

जिल्हा....... अतिरिक्त मागणी.......... मिळालेला निधी

औरंगाबाद..............३५६.६१.............२८.२७

जालना....................२०१.४९.............३६.३

बीड.........................८८.९६..............१२.१३

परभणी.....................१२३.६५...............७.८२

उस्मानाबाद................११३.१३..............४५.०६

लातूर.......................१००.१................३४.६५

हिंगोली......................३२.००...............०७.०८

नांदेड.......................८८.००................१२.७६

एकूण...................११०३.८५................१८४.०७

(रक्कम कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ दशलक्ष इमेल आयडीचा पासवर्ड झाला लिक

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेसबुकवर असलेली ग्राहकांची माहिती लिक झाल्याच्या बातम्या सुरू आहेत. फेसबुकसह एसबीआय बँकेची माहिती आणि आधार कार्डाची माहितीही लिक झालेली आहे. इंटरनेट वापरणाऱ्या नऊ दशलक्ष ग्राहकांचा इमेल आयडी पासवर्ड लिक झाला असल्याची धक्का दायक माहिती सायबर सेक्युरिटीचे तज्ज्ञ अमर ठाकरे यांनी दिली.

शहर पोलिस विभाग, डीजीडाटा तसेच आर्या सायबर सेक्युरिटी या संस्थेच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर सोमवारी (२६ मार्च) भानुदास चव्हाण सभागृहात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्स मीडिया पार्टनर असलेल्या या कार्यक्रमात सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह हर्षल देशमुख यांचीही उपस्थिती होती.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अमर ठाकरे यांनी सांगितले, 'स्क्रीनवर सर्वसामान्य ग्राहकांचे इमेल, फेसबूक किती सुरक्षित आहेत याचे प्रात्याक्षिक दाखविले. यावेळी असुरक्षितपणे नेट हाताळल्यास ग्राहकांची वैयक्तिक माहिती लिक केली जात आहे. मोबाइल स्मार्ट झाला आहे. मात्र, ग्राहक स्मार्ट झाला आहे का?' मोबाइलवर येणारे संशयास्पद मेसेज, संगणक किंवा इंटरनेट वापरताना सोशल साइटवर न घेतलेली खबरदारी ग्राहकांसाठी डोकेदु:खी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्षभरात १६७ सायबर गुन्हे

सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले की, 'सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. फोनवरून लुबाडणूक करणे, तसेच प्रलोभन दाखवून फसवणूक करण्याचे गुन्हे जास्त आहेत. याशिवाय वैयक्तिक माहितीच्या आधारे फसविण्याच्याही घटना समोर येत आहे.' वर्षभरात १६७ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही गजानन कल्याणकर यांनी दिली.

…………

काय घ्यावी काळजी

- इमेल आयडीचा पासवर्ड दर १५ दिवसांनी बदलावा

- फेसबुकसारख्या सोशल साइटचा पासवर्ड संगणकावर रिमेंबर करून ठेऊ नये

- सोशल मिडियावर आलेली विनाकामाची लिंक डाऊनलोड करू नये

- सोशल मीडियावर येणारे मदत करण्याचे, लॉटरी लागण्याच्या आवाहनांवर लक्ष देऊ नये

असा झाला डाटा लिक

अॅप्पल - ४१०००

गुगल - १ लाख २६ हजार

मायक्रो स्फॉट - ४० हजार

अशी आहे संधी

सायबर सेक्युरिटीसाठी अनेक कंपन्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तसेच सायबर सेलमध्येही सायबर सेक्युरिटीच्या कर्मचाऱ्यांची गरज पडत आहे. यामुळे या क्षेत्रात युवकांना संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग पाच दिवस बँक व्यवहार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग सुट्या आल्याने २९ मार्चपासून दोन एप्रिलपर्यंत, पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे बँकांचे व्यवहार पूर्ण करणे, वार्षिक कर भरणा, करातील विवरणपत्र देणे, याशिवाय दैनंदिन बँकांचे व्यवहार करण्यास मंगळवार (२७ मार्च) आणि बुधवार (२८ मार्च) हे दोनच दिवस आहेत. यामुळे बँकांचे व्यवहार या दोन दिवसांतच उरकावे लागणार आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांच्या युनियन अधिकारी व स्थानिक सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी(२९ मार्च) महावीर जयंती, शुक्रवारी (३० मार्च) गुडफ्रायडे, शनिवारी (आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस), रविवारी(एक एप्रिल), सोमवारी (दोन एप्रिल) (अॅन्युएल क्लोजिंग) असे पाच दिवस सलग व्यवहारांना सुट्या आहेत. यामुळे बँकांमधील दैनंदिन व्यवहारासह एटीएम, धनादेश वटणे, ऑनलाइन व्यवहार यावरही परिणाम होऊ शकतो. यादरम्यान एटीएमवरील रोख संपू नये यासाठी सर्वच बँकां आणि संबंधित खासगी एजन्सीद्वारे बुधवारी एटीएममध्ये पुरेशी कॅश पुरवली जाणार आहे. शहरात ४००हून अधिक राष्ट्रीय व खासगी बँकांचे एटीएम आहेत. यात ही रोख रक्कम विविध रोकडभांडारांद्वारे बुधवारी पुरवली जाईल. सलग सुट्यांपूर्वी दोन दिवसच हाती असून, या दोन दिवसांत बँकांचे व्यवहार करून घ्यावेत असेही, सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतोत्सवात रसिक चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर येथील श्री गणेश सभा, अखिल भारती साहित्य परिषद आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसंतोत्सवात सोमवारी रसिक चिंब झाले. गजानन माधव मुक्तीबोध जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले.

तीन दिवसाच्या वसंतोत्सवानिमित्त रविवारी विंदा करंदीकर यांच्या कवितांचे वाचन झाले. या महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉ. पुरूषोत्तम भापकर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांची उपस्थिती होती. सोमवारी डॉ. माधव सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. डॉ. चंद्रदेव कवडे, डॉ. नारायण शर्मा यांची उपस्थिती होती. यात सुनील कुलकर्णी, डॉ. शिल्पा जिवरग, डॉ. विशाला शर्मा, डॉ. अपर्णा पाटील, डॉ. सुरेश मुंढे, डॉ. सुनील डहाळे, कचरू गरसोळे, संध्या मोहिते, कुंदन जगताप, मनोहर बन्सवाल आदी कलाकार सहभागी झाले होते.

रविवारी पहिल्या दिवशी पार्थ बावस्कर, प्रा. डॉ. वृंदा जोशी, गिरीश जोशी, नीलेश चव्हाण, प्रा. डॉ. अनिरुद्ध मोरे, सुषमा देशपांडे, शैलजा देशपांडे यांनी विंदांच्या गाजलेल्या कविता सादर केल्या. कवयित्री कस्तुरी कुलकर्णी-जोशी यांनी सुरेल स्वरात शारदा स्तवन सादर केले. प्रा. डॉ. वृंदा जोशी ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. भापकर आणि धानोरकर यांनी विंदांची एक एक कविता सादर करून उदघाटन केले. श्रिया जोशी, अदिती साखळे, वैष्णवी घाटनांद्रेकर, तृप्ती कुलकर्णी, सोहम वारे या बालकलाकारांनी विंदांच्या बाल कविता सादर केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मंगला वैष्णव, प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर, प्रा. डॉ. वृंदा जोशी, प्रा. डॉ. दत्तात्रय येडले आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाणिज्य वार्ता

$
0
0

'मातृश्री'चे १६ विद्यार्थी एनटीएसईमध्ये यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मातृश्री आयआयटी फाउंडेशनच्या १६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

राज्यभरातून ३८९ विद्यार्थी एनटीएसई लेव्हल २ साठी निवडले जातात. त्यात औरंगाबादचे ४४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यातील १६ विद्यार्थी हे मातृश्री फाउंडेशनचे असल्याचा आम्हाला आनंद आहे, असे संचालक शरद अग्रवाल यांनी नमूद केले. मातृश्री फाउंडेशनमधील ओम कुलकर्णी, अमेय देशमुख, यश अहिरराव, सिद्ध जैन, प्रसाद जोरे, ऋषिकेश बक्षी, देवांग शिंदे, देवेश राठोड, संदेश सोनी, आर्य राजेंद्र, रोहित धोंडगे, प्रसन्ना पाटील, हर्षल होळकर, उत्कर्ष कंडी, वैभव निकम व सिद्धांत हनवते यांचा समावेश आहे. सर्व गुणवंतांचा मातृश्री फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

-----------------------------

फोटो ओळ- एनटीएसईच्या गुणवंतांसोबत मातृश्री फाउंडेशनचे संचालक शरद अग्रवाल, प्रा. डॉ. आर. सी. जोशी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेची झोन कार्यालये रात्री दहापर्यंत सुरू राहणार

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी रात्री दहापर्यंत महापालिकेची झोन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. ३१ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा यावेलेत ही कार्यालये सुरू राहतील. दरम्यानच्या काळात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. प्रत्येक झोन अधिकाऱ्याला रोज दोन तास कचरा व्यवस्थापनात काम करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठे बातमी चौकट

$
0
0

सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका व व्याख्यात्या डॉ. रमा मराठे यांच्या व्याख्यानात काय ऐकाल?

-'अर्थपूर्ण' जगण्यासाठी समजून घेऊया

- मंगळावरचा 'तो' आणि शुक्रावरची 'ती'

- उच्च सामाजिक आणि भावनिक बुद्ध्यांक हेच तुमच्या यशस्वीतेचं रहस्य

- जीवनाची दिशा ठरवणारे करिअर मॅनेजमेंट

- मानसशास्त्रज्ञ म्हणजे मितवा अर्थात मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या

- सुपरस्टार मुलांच्या पालकांनी नेमकं काय केलं?

- वृद्धापकाळाची पूर्वतयारी व नियोजन

तारीख :२८ मार्च २०१८, बुधवार

वेळ : सायंकाळी ५.४५

स्थळ : तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - डॉ. राजेंद्र शेवाळे, सर्जन

आज स्वच्छता हागणदारीमुक्ती कार्यशाळा

$
0
0

क्षमता बांधणी जिल्हास्तरीय

कार्यशाळा आज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत औरंगाबाद जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. स्वच्छतेचे कार्य नियमित चांगल्या स्थितीत रहावे आणि निरंतर विकास होत रहावा, स्वच्छतेबाबत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे यासाठी जिल्हास्तरावर मंगळवारी संत तुकाराम नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी दहा वाजता ही कार्यशाळा होईल. ग्रामस्तरावर स्वच्छतेच्या बाबतीत शाश्वतता निर्माण व्हावी, ग्रामसेवकांच्या क्षमता बांधणीसाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघे संशयित परप्रांतीय निघाले अट्टल चोर

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल चोरचे आरोपी शोधण्यासाठी निघालेल्या सिडको पोलिसांच्या पथकाला जाधववाडीत दोन संशयित फिरताना आढळले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते अट्टल चोर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून चार मोबाइल जप्त करण्यात आले असून कोर्टाने या दोघांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी हेमचंद दपाडू चिरमाडे (रा. म्हसोबा नगर हर्सूल) यांच्या खिशातून जाधववाडी भाजीमंडी येथून मोबाइल चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. या तक्रारीनंतर सिडको पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जाधववाडी भागात चोरांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना दोन जण संशयितरित्या जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी सर्वजीत अर्जुन महातोर (वय २०) आणि धर्मवीर कुमार निवारण ठाकूर (वय २२, दोघे रा. कासंबरी, जि. लखनौ, उत्तर प्रदेश) या दोघांची झडती घेतली असता १५ हजार किमतीचा व्हिवो मोबाइल, ८ हजार किमतीचा सॅमसंग मोबाइल, ८५०० रुपयांचा व्हिवो आणि १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाइल असा एकूण ४१ हजारांचा ऐवज सापडला. या प्रकरणात दोघांची कसून चौकशी केली असता हे सर्व मोबाइल चोरल्याची त्यांनी कबुली दिली. ही कारवाई पोलिस कर्मचारी राजु बनकर, डोंगरे, इरफान खान, सुरेश भिसे, योगेश म्हस्के, राजू जाधव यांनी केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम.बी. अत्तार यांच्या कोर्टात सोमवारी हजर केले असता, कोर्टाने दोघांना २९ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात पोलिसांची बाजु मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्तांचे सर्वेक्षण भंपक

$
0
0

(फोटो- विधवा महिला कार्यक्रमात बोलत्या झाल्या.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या चार हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्याचा प्रशासकीय ढोल जोरात वाजवण्यात आला खरा; परंतु हे सर्वेक्षण झालेच नाही, याचा थेट पुरावा विभागीय आयुक्तांनाच शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या कार्यक्रमात मिळाला. त्यामुळे हे सर्वेक्षण पुन्हा एकदा ४ एप्रिल रोजी करण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांना जाहीर करावे लागले. आतातरी हे सर्वेक्षण खऱ्याअर्थाने होणार का पुन्हा कागदी घोडे नाचवले जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांसाठी सोमवारपासून (२६ मार्च) शहरात दोन दिवसीय कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महसूल प्रबोधिनीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अडीचशेपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत संवाद साधताना हे कागदोपत्री सर्वेक्षण उघड झाले. या प्रसंगी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या एकूणच आर्थिक-भावनिक-कौटुंबिक स्थिती-परिस्थितीची नेमकी कल्पना यावी व कुणाला नेमकी कशाची गरज आहे, या दृष्टिकोनातूनच विभागात आत्महत्या केलेल्या चार हजार कुटुंबियांचे सर्वेक्षण करुन प्रत्येक अधिकाऱ्याने एका कुटुंबाला दत्तक घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यातून १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी चार हजार कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले, असे सांगत भापकर यांनी, कितीजणांचे सर्वेक्षण झाले त्यांनी हात उंच करावेत, असे भर कार्यक्रमात आवाहन केले. मात्र अगदी दोन-चार महिलांनीच हात उंच केले. भापकरांनी खात्री करुन घेण्यासाठी पुन्हा एकदा समस्त महिलांना प्रश्न केला; पण तरीही महिलांचे हात काही उंच होईनात. थेट सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकल्यामुळे त्यांनी बाजू सावरुन घेत, पुन्हा ४ एप्रिल रोजी पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल, असे जाहीर केले.

\Bवारसाहक्क नोंदणी शिबिरांची मागणी\B

याच कार्यक्रमात, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या नावे शेतजमीन, मालमत्ता करण्याची मानसिकता नाही व यात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अशा महिला उघड्यावर येत आहेत. हे लक्षात घेऊन तालुकास्तरावर वारसाहक्क नोंदणी शिबिरे सुरू करावीत, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीचे औषध देऊन महिलेला लुटले

$
0
0

औरंगाबाद :

गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटना सोमवारी संध्यााकाळी सहाच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील पुष्पक गार्डन वसाहतीत घडली. या प्रकरणी शेख शबाना (४०) यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

शबाना याचे पती चालक असून ते बाहेर गेले होते. तर मुले कामानिमित्त घराबाहेर होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास एक महिला आणि तीन मुलांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. 'आमचे उधार पैसे कधी परत देणार' अशी विचारणा त्यांनी केली. कोणाचे काही देणे नसल्याने शबाना यांना कशाचे पैसे, असा प्रश्न पडला. तेवढ्यात समोरील महिलेने शबाना यांच्या तोंडासमोर गुंगीचे औषध असलेला रुमाल फिरवला आणि गळ्यातले सहा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र पळविले. काही वेळानंतर शुद्ध आल्यावर शबाना यांनी हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. यानंतर त्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशन गाठले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत

$
0
0

औरंगाबाद :

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात तिच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार प्रतिबंधक कारवाई करू नये यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार राजेंद्र दौलतसिंग राजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खासगी नोकरीला असून त्याच्या पत्नीने त्यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिस हवालदार राजेंद्र दौलत राजपूत यांने दहा हजार रुपयांची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदाराकडून २६ मार्च रोजी पोलिस हवालदार राजेंद्र दौलतसिंग राजपूत याला एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीजवळ तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिता वराडे, भरत राठोड, पोलिस हवालदार गणेश पंडुरे, पोलिस नाईक रविंद्र अंबेकर, हरिभाऊ कुऱ्हे, पोलिस शिपाई मिलिंद इपर यांनी कारवाई केली. लाच स्विकारणाऱ्या पोलिस हवालदार राजेंद्र दौलतसिंग राजपूत यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंभापुरी धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन स्थगित

$
0
0

औरंगाबाद :

टेंभापूरी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर स्थगित करण्यात आले.

श्रमिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखाली १९ मार्च रोजी टेंभापुरी धरणग्रस्तांचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. २० व २२ मार्च रोजी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना विविध मुद्द्यांचे लेखी पत्रही दिले. मात्र, सदर पत्र पुनर्वसन अधिनियमाशी सुसंगत नसल्याने आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली. यानुसार २३ रोजी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्यासोबत श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, सुभेदार मेजर सुखदेव बन, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी गोरखनातथ पडघन, भानुदास गाडेकर, रामनाथ ढोले, प्रभाकर साबळे यांची सकारात्मक बैठक झाली व एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सक्षम अधिकाऱ्यांसांबत पाटबंधारे प्रकल्पग्रस्त यंत्रणा यांच्यासह बैठक घेण्याचे पत्र यावेळी देण्यात आले. त्यानुसार आंदोलनकर्त्यांसमोर सदर पत्र वाचून आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याचे श्रमिक मुक्ती दलाने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाची लिफ्ट कोसळली, सात जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा कोर्टातील लिफ्ट तांत्रिक बिघाड होऊन काही कळायच्या आत अचानक चौथ्या मजल्यारून थेट तळमजल्यावर क्षणार्धात धाडकन कोसळली आणि लिफ्टचा दरवाजा आपोआप लॉक झाला. हा प्रकार लक्षात येताच पोलिस व इतरांनी प्रयत्न करून कसाबसा दरवाजा उघडला. त्यानंतर लिफ्टमधील जखमी व गुदरमरलेल्या सात जणांनी मोकळा श्वास घेतला. या घटनेत लिफ्टचे सिलिंगही तुटले आणि बहुतेकांना चांगलाच मुका मार लागला आहे. ही घटना जिल्हा कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत सोमवारी (२६ मार्च) सायंकाळी घडली.

जिल्हा कोर्टातील पाच-सव्वापाचची वेळ. कोर्टातील काम आटोपून घरी जाण्याचे वेध लागलेले. अशा स्थितीत पक्षकार, नागरिक, वकील, असे सातजण चौथ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसले आणि बहुतेकांना तळमजल्यावर उतरायचे होते. लिफ्टमध्ये सर्व सातजण बसले आणि तळमजल्याचे बटन दाबण्यात आले. मात्र क्षणार्धात लिफ्टचा नेहमीचा वेग अचानक कितीतरी पटींनी वाढला आणि काही कळायच्या आत लिफ्ट तळमजल्यावर कोसळली. त्याचक्षणी भला मोठा आवाज झाला आणि लोक सैरावैरा पळाले. काही क्षणात तो आवाज लिफ्टचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इतरांनी मदतीसाटी धाव घेतली. पण, तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा आपोआप लॉक झाल्याने तिच्यात अडकलेल्यांचा ओरडण्याचा आवाज, लिफ्टच्या आतून दारावरील थापा ऐकू येऊ लागल्या. प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नसल्याने अस्वस्थता आणखीच वाढत गेली. त्याच परिसरात न्यायालयीन कामासाठी आलेल्या पोलिसांनीही दार उघडण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल १० ते १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर दरवाजा कसाबसा उघडला. तिच्यात अडकून गुदमरलेल्या सातजणांची सुटका करण्यात आली. 'वाचलो एकदाचे' अशी बोलकी प्रतिक्रिया माणिकचंद आसाराम महतोले, ओमप्रकाश सखाराम बसैले, निर्भय सुरेश बसैले व इतरांनी व्यक्त केली. या सातजणांमध्ये एका महिलेचा समावेश होता व काहीजण साठी पार केलेले होते.

सिलिंग पडून लागला मार

दरम्यान, लिफ्ट कोसळून जोरात आदळळ्याने लिफ्टचे सिलिंगही कोसळले व त्याचा मार लिफ्टमधील नागरिकांना बसला. बहुतेकांच्या डोक्याला, खांद्याला मार लागल्याचेही दिसून आले. या प्रकारामुळे सर्व सातजणांना जबर धक्का बसला आहे. पण, वीज वाचल्याच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होत्या.

वारंवार तक्रारी, तरीही वारंवार बिघाड

लिफ्ट अचानक आणि कितीतरी वेळ बंद पडणे, दरवाजा लॉक होणे, असे प्रकार जिल्हा कोर्टात नेहमीच घडतात. दर दोन-चार दिवसांत कोणीतरी वकील, पक्षकार किंवा कोर्टाचा अधिकारी-कर्मचारी लिफ्टमध्ये अडकतो, असेही वकिलांनी या घटनेनंतर आवर्जून सांगितले. कोर्ट परिसरातील सर्व लिफ्टबाबत कमी-अधिक प्रमाणात असेच प्रकार घडतात. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत; तरीदेखील कायमस्वरुपी दुरुस्तीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी वकिलांनी बोलून दाखवल्या. लिफ्ट चालवण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जावी, अशीही वकिलांची मागणी आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा वकिलांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टच्या बातमीत कोट

$
0
0

लिफ्टच्या बातमीत कोट

…...

जिल्हा कोर्टाच्या इमारतीमध्ये ७ पैकी ३ लिफ्ट पूर्णपणे नादुरुस्त आहेत. लिफ्टमध्ये अडकण्याचे प्रकार रोजच होतात; पण लिफ्ट कोसळण्याचे छोटे-मोठे प्रकारही आतापर्यंत चार-पाचवेळा झाले आहेत. वकील संघातर्फे वारंवार तक्रार करुनही लिफ्टच्या देखभालीचे प्रमाण शून्य आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काहीही करण्यात आलेले नाही.

- अॅड. सुदेश शिरसाठ, सचिव, जिल्हा वकील संघ

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत येणे सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचा प्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबाद विभागात सोमवारी गठ्ठे परत आल्याचा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. तर,अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनामुळेही तपासणीचा आकडाही मंडळाचा आज मिळू शकला नाही.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनात सोमवारी अनुदानित शिक्षकांनीही उडी घेतली. तपासणीची प्रक्रिया करू, परंतु उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा करणार नाही, असा पवित्रा घेतला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रशासनाची विनाअनुदानित शिक्षकांच्या बहिष्कारामुळे धावपळ उडाली आहे. औरंगाबाद विभागात सर्वाधिक विनाअनुदानित ज्युनीअर कॉलेजांची संख्या आहे. तपासणीवरील बहिष्कारामुळे विभागातून सर्वाधिक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत येत आहेत. शनिवार, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी हा परत आलेल्या गठ्ठ्यांची संख्या हजाराच्या वर पोहचली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काय करायचे, असा प्रश्न मंडळाला पडला आहे.

विनाअनुदानित संस्थांमध्ये औरंगाबाद विभाग पुढे आहे. त्यामुळे बहिष्काराचा परिणाम राज्यात सर्वाधिक औरंगाबाद विभागात असल्याचे बोलले जाते. औरंगाबाद विभागात औरंगाबादसह, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. विभागात सुमारे ९५० विनाअनुदानित, स्वंयअर्थसहाय्यित ज्युनिअर कॉलेजांमधील विद्यार्थी बारावी परीक्षेला आहेत. तर, अनुदानित संस्थांची संख्या ३५० आहे. त्यामुळे तपासणीबाबत अनुदानित संस्थांमधील शिक्षकांवर तपासणीचा ताण पडतो अशी चर्चाही होते आहे.

\Bफोनवरून विनवणी

\B

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारामुळे गठ्ठे परत येत आहेत. राज्यभरात तपासणीचा मुद्दा समोर आला आहे. सोमवारीही मंडळाची राज्यपातळीवर बैठकीत याबाबत चर्चाही झाली. तर, विभागीय पातळीवर शिक्षकांना फोनवरून विनवणी करून तपासणीचा आग्रह करण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. विनाअनुदानित पेक्षा अनुदानित शिक्षकांनाच हा आग्रह करण्यात येत आहे. लगेच परत करू नका परंतु तपासण्यासाठी तर गठ्ठा घेऊन जा अशी विनवणी करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>