Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’साठी आता ‘मोदी अस्त्र’

$
0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet : @UnmeshdMT

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या 'एसएल ग्रुप' या कंपनीने आता 'मोदी अस्त्रा'चा आधार घेण्याची व्यूहरचना आखली आहे. समांतर जलवाहिनीचे काम नव्याने सुरू करण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. जुलै महिन्यापर्यंत यातून मार्ग निघेल, असे सूत्रांनी सांगितले.

'एसएल ग्रुप'ने समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी 'स्पेशल पर्पज व्हेइकल' म्हणून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीतर्फेच समांतर जलवाहिनीचे काम केले जात होते. महापालिकेने या जलवाहिनीचा 'पीपीपी'तत्वावरील करार रद्द केल्यावर शहराची पाणीपुरवठा योजना सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेने करार रद्द केल्यानंतर समांतर जलवाहिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता व सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली असताना न्यायालयाच्या बाहेर तडजोड करून त्याच कंपनीच्या माध्यमातून समांतर जलवाहिनीचे काम करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी 'एसएल ग्रुप'ने 'औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी'च्या माध्यमातून विविध अधिकारी नियुक्त केले होते, पण ते जास्तकाळ टिकले नाहीत. आता या ग्रुपने निवृत्त आयएएस अधिकारी रोहित मोदी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मागर्दर्शनाखाली समांतर जलवाहिनीसाठीचा प्रस्ताव नव्याने तयार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नव्याने प्रस्ताव तयार करण्याबद्दल मुंबईत मंत्रालयात २२ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीला मोदी यांच्यासह कंपनीचे अन्य अधिकारी व महापालिकेचे अधिकारी, आमदार उपस्थित होते. त्यानंतर २६ मार्च रोजी देखील बैठक झाली. समांतर जलवाहिनीचे काम कसे करणार, याचा प्रस्ताव कंपनीने द्यावा, असे यावेळी ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. समांतर जलवाहिनीचे काम करण्याचे कंपनीचे नेमके नियोजन काय आहे, किती दिवसात संपूर्ण प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, मुख्य जलवाहिनीचे काम केव्हा आणि कसे सुरू केले जाणार आहे, हे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, पाणीपट्टीची रचना कशी असावी, शहरातील वितरण व्यवस्थेबद्दल कंपनीचे काय धोरण आहे आदी मुद्यांच्या आधारे कंपनीला नवीन प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. कंपनीचा प्रस्ताव आल्यावर शासनस्तरावर त्याची तपासणी केली जाईल. कंपनीने तयार केलेला प्रस्ताव महापालिकेच्या हिताचा आहे का, यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.

जुलैपर्यंत मार्ग निघण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; समांतर जलवाहिनीच्या खटल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात २३ मार्च रोजी सुनावणी होती. त्या दिवशी सुनावणी होऊन पुढील तारीख जुलै महिन्यातील मिळाली आहे. न्यायालयाच्या बाहेर या प्रकरणात तडजोड करण्याचे निश्चित झाल्यास कंपनीतर्फे जुलैपर्यंत प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाऊ शकतो. त्या प्रस्तावाची तपासणी करून न्यायालयापुढे मांडावयाची भूमिका निश्चित केली जाऊ शकते.

एक वर्षच शिल्लक राहीले

समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल महापालिकेने कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार; कंपनीने जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यापैकी दोन वर्षांचा कालावधी निघून गेला आहे. आता एक वर्षच शिल्लक आहे. न्यायालयाबाहेर तडजोड होऊन त्याच कंपनीकडून काम करून घेण्याचे ठरल्यास जलवाहिनी टाकण्याचे काम एका वर्षात कंपनीला पूर्ण करावे लागेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हे दाखल असलेल्यांचा मनविसेच्या मेळाव्यात सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेच्या विरोधात आंदोलन केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संघटनेच्या बुधवारी झालेल्या संवाद मेळाव्यात या कार्यकर्त्यांचा मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मनसेची मराठवाड्यातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेची मुंबईतील नेते मंडळी दोन दिवसांच्या दौऱ्यावर शहरात आली होती. या निमित्ताने मनविसेने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पानसे यांनी या मेळाव्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. 'काम करताना अडचणी येणारच, पण अडचणींवर मात करून काम करा,' असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांचा सत्कार केला. याप्रसंगी मनसेचे ठाणे येथील उपाध्यक्ष जावेद शेख, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांची उपस्थिती होती.

मनविसेचे जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी रियाज पटेल, चेतन पाटील, प्रवीण मोहिते, किशोर पांडे, विजय लाळे, अभिजित गायकवाड, निखील ताकवले, तुषार नरोडे, रितेश येरकड, अरविंद शेलार, महेश डोंगरे, ऋषिकेश वराडे, अमोल थिटे, स्वप्नील घोडके, ऋषिकेश टेपाळे, अतुल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहच सुचलं म्हणून : दीपस्तंभ

$
0
0

---

दीपस्तंभ

---

- मीना तांबोळी, औरंगाबाद

---

माझी आई आज वय वर्षे ८५ आहे. अगदी लहान वयातच लग्न झाले. काहीही समज नव्हती. शिक्षणही नव्हते. विशेष म्हणजे तिची आई ती लहान असतानाच गेली. वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली. पुढे बाराव्या वर्षी विवाह झाला. माझ्या वडिलांचा स्वभाव अत्यंत कडक, पण त्या काळात प्रेमाची माणसे होती. सगळ्यांच्या मदतीने तिचा संसार झाला. आम्ही सात भावंडे. चौघी बहिणी, तीन भाऊ असा परिवार. परिस्थिती सामान्य, पण अशाही परिस्थितीत तिने संसार केला. आम्हाला वाढवले. परिस्थितीची झळ आम्हाला लागू दिली नाही. घरी शेती असल्यामुळे गडी माणसे सतत राबत असाची, पण ती सगळ्यांना जीव लावायची. माणसे जोडणे हा तर तिचा स्वभावच आहे. कोणतेही संकट असो अडचण असो ती कधीच घाबरत नाही. सगळ्यांना सकारात्मक विचाराने समजून सांगते. माझ्या आई वडिलांनी खूप काम केले. अनेक जणांचे संसार उभे केले. माझे वडील थोर समाजसेवक होते. त्यांनी आम्हाला नेहमी सत्य-सदाचार आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली. त्यामुळे आम्ही सातही जण आजही त्यांच्या शिदोरीवर कटिबद्ध आहोत. अनेकांचे लग्न माझ्या वडिलांनी स्वतः खर्च करून लावून दिले. माझ्या आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ. तिची लोकांना देण्याची वृत्ती असल्यामुळे तिच्या भोवती सतत लोक असतात. एकटी कधीच नसती. प्रत्येकाला काही अडचण असली की, तिचा विचार लोक घेतात. अनेक प्रसंगातून तिने प्रत्येकाला मदत केली. तिची निरागस - निस्वार्थ वृत्ती ही संताप्रमाणे आहे. मी तर या विचाराची आहे की, माणसातला देव आपण बघत नाही. आपली बघण्याची दृष्टी कमी पडली. दृष्टिकोन चांगला असेल, तर नक्कीच चांगले विचार येतात.

माझा गुरू घराणा दत्त सांप्रदायिक आहे. समर्थ सद‍्गुरू दत्त महाराजांची कृपा आमच्यावर आहे. 'सद‍्गुरू सारिखा आसता पाठिराखा, इतरांच्या लेखा कोण करी.' माझ्या आईने हे सर्व आधी केले मग सांगितले. तिचा अंर्तभाव कळत नाही. ती नेहमी माझी मुले चांगली घडावी यासाठी धडपड करत असते. आज समाजातील सर्व आईना मला एकच संदेश द्यायचा आहे. मुलांची जास्त काळजी करू नका. त्यांना मनसोक्त उडू द्या. आपले अधिकार त्यांच्यावर गाजवू नका. त्यांना जगायला, जग वाचायला शिकू द्या. प्रेम आठत चालले आहे याची खंत वाटते. एक तर छोटे कुटुंब. वेळ उरला नाही. कोणाकडे सगळे निराश आहेत. त्यांचे एकच कारण आहे. एकत्र न येणं. विचारांची देवाण-घेवाण नाही. सतत टेन्शन. खूप पैसा आहे, पण सुख नाही. कारण पिढीच्या सुखाच्या व्याख्‍या फार वेगळ्या आहेत. मला यातून एकच जाणीव होती. भय इथले संपत नाही. आम्ही त्यावेळी सामान्य परिस्थितीत होतो, पण खूप सुखी होतो आणि आजही आहोत. कारण समाधान मानण्यावर आहे. परिस्थितीतवर आजिबात नाही. जे पण भगवंतांनी दिले ते प्रसाद समजून आम्ही उपभोगतोच. अनेक प्रसंग आमच्यावर आले आणि गेले. अपेक्षा, परिस्थिती, समाधान या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. गरजा कमी केल्या की, अपेक्षा राहात नाहीत. परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही आणि मग आपोआप समाधान मिळते. अवास्तव अपेक्षा ठेवल्या की, माणूस नेहमी बेचैन असतो. यात अनेक विषय आहेत. पैसा एकच नाही. मुलां-सुनांकडून नातेवाईक, शेजारी सगळेच आले. सर्व रोगावर नाम हेच औषध आहे. खरे तर आमची आई प्रेम स्वरूप, वात्सल्य सिंधू आहे. तिच्या पोटी पुन्हा जन्माची आम्हाला आस आहे. ही सगळी शिकवण खरे तर तिचीच. आमची आईच आमचा खरा दीपस्तंभ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा ना गोष्ट : राजा आणि पाडस

$
0
0

---

राजा आणि पाडस

---

- शिरीष देशमुख, मंगरूळ, ता. मंठा, जि.जालना

---

राजा दर सुटीच्या दिवशी शेळ्यामागं जायचा. बापासोबत. आजही गेला होता. सोबत एक वही पुस्तक आणि पेन. मास्तरांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी. गावाबाहेरच्या पडीक जमिनीवर त्याच्या बकऱ्या चरू लागल्या. तो आपल्या अभ्यासाचा पसारा मांडून एका झाडाखाली बसला. त्याचा आबा हर्र थिर्र करत शेळ्यांच्या आजूबाजूला फिरू लागला.

राजाने वही पुस्तक काढलं खरं, पण लगेच काही अभ्यास सुरू करण्याची त्याची इच्छा होईना. मग काय इकडे बघ...तिकडे बघ...आणि त्या तिकडे...त्या शेतात काही हरणं चरत होती. कोवळ्या लस्स हरभऱ्याचे शेंडे खुडून खात होती. आठ दहा हरणं आणि त्यांच्यामागे चार पाच पाडसं. इतक्यात शेतकरी आला. त्यानं बघितलं, हे प्राणी आपल्या धनाची नासाडी करत आहेत. तो संतापला. हातात भलं मोठं दांडकं घेतलं अन् हरणांमागे धावत सुटला. शेतकऱ्याच्या येण्याची चाहूल लागताच हरणंही सावध झाली. लांबच लांब उड्या घेत त्यांनी धूम ठोकली. राजाच्या शेळ्या जिथे चरत होत्या त्याच दिशेने हरणं धावत येऊ लागली. चवताळलेल्या शेतकऱ्यानं हातातली काठी फेकली. ती नेमकी एका पाडसाच्या पायावर बसली. अडखळून ते पाडस पडलं. हरणं थबकली. शेतकरी मागून येतंच होता. हरणं थांबली नाहीत. धावत सुटली. पाडसही त्यांच्यामागे धडपडत जाण्याचा प्रयत्न करू लागलं. बऱ्याच अंतरापर्यंत पाय फरकवत ते गेलं. शेतकरी थकला. धापा टाकत परत फिरला. हरणं खूप दूर गेली होती. आता पाडसाला मात्र पाय उचलेना. ते कडमडून एका खड्ड्यात पडलं. झाडाखाली बसलेला राजा हे सगळं बघत होता. तो धावतच त्या खड्ड्याकडे आला. आत बघितले. इवलूसं पाडस घाबरलं होतं. त्याचं काळीज धडधडा उडत होतं. राजा खड्ड्यात उतरला. पाडसाच्या जवळ गेला. त्याच्या मऊ अंगावरून मायेनं हात फिरवला. घाबरलेल्या पाडसाला थोडा धीर मिळाला असावा. राजानं त्याला उचलून जवळ घेतले. तो बकरीची पिल्ले उचलायचा तसं उचलून त्यानं पाडसाला छातीशी कवटाळलं. खड्ड्याच्या वर आला. झाडाखाली गेला. पाडस शांत बसलं होतं. राजानं शेळीचं वाटीभर दूध काढलं. पाडसापुढे ठेवलं. ते पीईना. मग वाटीत पाणी ठेवलं. पाडसानं ते पिलं. संध्याकाळी घरी परतताना राजासोबत त्याचा तो नवा मित्र देखील होता. दोन तीन महिने उलटले. पाडस बकऱ्यांसोबत चांगलंच रमलं. त्यांच्यासोबत चरायचं, पाणी प्यायचं, उड्या मारायचं. राजासोबत तर त्याची इतकी गट्टी जमली होती की त्याने शिट्टी मारताच ते उड्या मारत राजाजवळ जायचं. अन् त्याच्या गालाला चाटू लागायचं. राजानं पाडसाच्या गळ्यात एक छानसं घुंगरूही बांधलं होतं. 'गावात खूप वृक्षतोड होत आहे,' अशी कुणीतरी तक्रार केली होती. म्हणून त्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची एक गाडी गावात आली होती. शिवाराची पाहणी करताना त्यांना बकऱ्यांसोबत चरणारं हरणाचं पाडस दिसलं. अन् त्याच्या गळ्यातलं घुंगरूही. अधिकाऱ्यांनी राजाच्या आबाला दरडावलं. चौकशी केली. पाडसाला उचललं अन् गाडीत टाकलं. म्हणाले, 'वन्यजीवांना असं जवळ ठेवणं गुन्हा आहे...जेलात जावं लागेल.' राजाचा अडाणी आबा घाबरला. त्या लोकांनी पाडस नेलं.

संध्याकाळी बकऱ्या घेऊन आबा परतला. शाळेतून आल्यापासून राजा पाडसाची वाट बघत होता. शेळ्या येताच त्यांच्यामध्ये तो पाडसाला शोधू लागला. ते दिसलं नाही. आबाला विचारलं. आबांनी सगळी हकिकत सांगितली. ऐकताच राजाने टाहो फोडला. 'मला माझं पाडस पायजे,' असं म्हणत तो रडू लागला, पण आता ते शक्य नव्हतं. त्याचं पाडस वनविभागाकडे जमा झालं होतं. हळव्या मनाच्या राजाने त्यानंतर चार दिवस अन्नाचा घासही खाल्ला नाही. त्याची जेवणावरची वासनाच उडाली. आई आबा खूप आग्रह करायचे, पण राजाच्या घशाखाली घासच उतरत नव्हता. त्याला केवळ पाडसाचाच ध्यास लागला होता. इतका की त्याच्या ध्यासाने राजा आजारी पडला. त्याचं अंग तापाने फणफणलं. त्याचं शाळेत जाणं बंद झालं. आठ दिवसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी पुन्हा एकदा गावात आली. लोकांना वाटलं वृक्षतोडीचाच विषय असेल, पण गावात येताच त्यांनी राजाच्या घराचा पत्ता विचारला. पारावरच्या पोरांनी त्यांना राजाच्या घरी आणून सोडलं. अधिकारी गाडीतून उतरले. घरात गेले. समोरच्या बाजेवर राजा निजलेला होता. बाजूला बसलेली आई त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. अधिकाऱ्यांनी नमस्कार केला. राजाकडे बघून स्मितहास्य केले. आणि शिपायाला आवाज दिला. शिपायाने गाडीतून पाडसाला काढलं अन् राजासमोर नेऊन उभं केलं. पाडस दिसताच राजा ताडकन उठून बसला. त्यानं पाडसाला जवळ घेतलं कडकडून मिठी मारली. ते दृश्य पाहून अधिकाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, 'आम्ही इथून नेल्यापासून या पाडसाने ना चारा खाल्ला ना घोटभर पाणी पिलंय...आम्हाला वन्यजीव जगवायचे आहेत आणि हे पाडस तुमच्या जवळ असल्याशिवाय जगूच शकत नाही... काळजी घ्या त्याची.' आणि अधिकारी निघून गेले. राजाच्या अंगातला ताप एकाच झटक्यात उतरला. त्यानं अन् पाडसानं मिळून एकाच ताटात जेवण केलं. राजाच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुणी कुणाचा जीव जगवला हे मात्र तिलाही कळेना. राजाने पाडसाचा, की पाडसाने राजाचा?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबांचे एनजीओकडून सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या सर्वेक्षणामध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी केलेली कुचराई नुकतीच उघड झाल्यानंतर आता नव्याने सर्वेक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात चार एप्रिल रोजी नियोजन करण्यात येणार आहे.

आता प्रत्येक कुटुंबाला भेट देण्यासाठी संबंधित 'एनजीओ'च्या सदस्यासोबत एक सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहणार असून, नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरात एखाद्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होऊन मृत शेतकऱ्यांच्या छायेखाली असलेले कुटुंब उघड्यावर येते. या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रशासनाकडून आत्महत्य केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या सद्यस्थितीचा १५ नोव्हेंबर रोजी आढावा घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक बांधिलकी; तसेच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अशा कुटुंबांची काय परिस्थिती आहे, ही कुटुंबे स्वबळावर उभी राहिली आहेत काय, आर्थिक गरजा कशा आहेत, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न काय आहेत आदी माहिती शेतकरी कुटुंबाला भेट देऊन संकलित करण्यात आली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यासाठी एकाच दिवशी संपूर्ण मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले होते, मात्र हे सर्वेक्षण केवळ कागदोपत्रीच करण्यात आल्याचे नुकत्याच एका कार्यक्रमात उघड झाले होते. या कार्यक्रमास विभागीय आयुक्तांचीही उपस्थिती होती. घडलेल्या या प्रकारानंतर नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार आता चार एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीत सर्वेक्षणाबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी थंडबस्‍त्यात ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील सिलिंग, वर्ग दोन हस्तांतरणासंदर्भातच्या जमीन विक्री परवानगी प्रकरणात निलंबित करण्यात आलेले निवासी उपजिल्हाधिकाकारी विश्वंभर गावंडे तसेच ‌उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची तीन महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात पडली आहे. या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

दरम्यान, या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या सुमारे १२५ प्रकरणांची स्थितीही जैसे थे आहे. हे आदेश रद्द करून या जमिनी शासनाने ताब्यात घेणे अपेक्षित होते, मात्र यासंदर्भात अद्याप शासनस्तरावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कटके आणि गावंडे यांनी ज्या - ज्या प्रकरणात विक्री परवानगी दिलेली आहे, अशा प्रकरणांमध्ये सातबाऱ्यावर फेर घेणे, त्यानंतर सदर जमिनीचा वापर इतर कामांसाठी होणे किंवा सदर जमीन इतरांना विक्री होण्याची शक्यता व्यक्त करत, या सर्व परवानग्या रद्द करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत त्या रद्द करण्यात आल्या नाहीत. तसेच निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी अद्यापही सुरू झालेली नाही.

---

निलंबित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे प्रकरण ठप्प झाले असे म्हणता येणार नाही. याप्रकरणात पुढे काय करायचे आहे याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.

- पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीला पहाडे यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : न्यू प्रतापनगर काचिवाडा येथील खंडेलवाल दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ सदस्या सुशीला ‌अजितकुमार पहाडे (डोरनक्कलवाले) यांचे शुक्रवारी (३० मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कैलाशनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे, जावई असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीला ‘केके ग्रुप’तर्फे १५ हजारांची औषधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये (घाटी) असलेल्या औषधांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर के. के. ग्रुपने १५ हजार रुपयांच्या औषधींची भेट बुधवारी (२९ मार्च) मेडिसिन विभागाला दिली.

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अक्षीक्षक डॉ. भारत सोनवणे, विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, उपअधीक्षक डॉ. सय्यद अश्‍फाक, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. विकास राठोड यांच्या हस्ते या औषधींचा स्वीकार करण्यात आला. हा कार्यक्रम टेलीमेडिसिन कक्षात पार पडला. या वेळी के. के. गृपचे अध्यक्ष अखिल अहेमद उर्फ हाफिससाहेब यांच्यासह ग्रुपचे किशोर वाघमारे, जुनेद शेख, जमीर पटेल, शेख मेराज, शेख इद्रिस, मुन्शी पटेल, शेख सिराज, इरफान खान, अशू लाला, सोहेल पहेलवान, अन्सार शेख, विशाल जाधव यांची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. भट्टाचार्य यांनी आभार मानले. यानिमित्त, दात्यांनी अन्नदानाऐवजी प्रशासनाशी संपर्क साधून आवश्‍यक औषधी किंवा सामग्री दान करण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आश्वासन न पाळल्यास माथाडींचा बेमुदत संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसंदर्भात दिलेले आश्वासन सरकारने पाळाले नाहीत, तर बेमुदत संपावर जाण्याची तयारी आजपासूनच करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

राज्यातील ३६ जिल्हा माथाडी मंडळ संपवून एकच मंडळ स्थापन करण्याबाबतचा शासन आदेश रद्द करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ३६ जिल्हा माथाडी मंडळाचे विलिनीकरण, अन्य जाचक शासन आदेश रद्द केले जातील, माथाडी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तीन एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक घेऊ, असे लेखी आश्नासन सरकाराकडून मोर्चेकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यावर बोलताना आढाव यांनी, आश्नासन पाळाले नाही तर तीव्र आंदोलन करावे लागले, असा इशारा दिला. महामंडळाचे नेते सुभाष लोमटे, देविदास कीर्तीशाही, प्रवीण सरकटे, जगन भोजने, अली खान, देवचंद आल्हाट यांच्यासह राज्यातील माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमान मंदिर परिसर रोषणाईने उजळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

वडोदबाजार येथील जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरावर हनुमान जयंतीनिमित्त विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे मंदिर व परिसर प्रकाशमय झाला आहे. या मंदिराची रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

वडोदबाजार परिसरात दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिरात दर शनिवारी पहाटे अभिषेक, आरती, संध्याकाळी आरती केली जाते. दर शनिवारी वडोद बाजार परिसरातील भाविक महाआरतीसाठी उपस्थित असतात, तर आरती संपल्यानंतर उपवास असलेल्या भाविकांसाठी शाबुदाणा, फराळ प्रसाद वाटप केला जातो या ठिकाणी दर शनिवारी शाबुदाणा, फराळ वाटप करणारे भाविक ठरलेले असून, नीतिनियम या ठिकाणी शाबुदाणा, फराळ वाटप केले जाते. राम नवमीनिमित्त ही मंदिरात अभिषेक, आरती करण्यात येते.

यावर्षीच्या हनुमान जयंती शनिवारी आहे. त्यामुळे भविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हनुमान जयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यावरून पैठणमध्ये घमासान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

स्वच्छता होत नसल्याचा आरोप करत शहरातील दहा नंबर प्रभागातील नगरसेविकेने वार्डातील कचरा थेट नगर पालिका कार्यालयात आणून टाकला. त्यांच्या या कृत्याचा निषेध करून पालिका सफाई कर्मचाऱ्यानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका मैमुना बुरहान बागवान यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रभागात मागच्या दोन महिन्यांपासून नियमित सफाईं होत नसल्याचा आरोप करीत नगर पालिका कार्यालयात कचरा आणून टाकला. नगर पालिकेने त्वरित स्वच्छता मोहीम न राबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, शहरातील सर्व प्रभागात समान व नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. प्रभाग दहामध्ये नियमित सफाई होत नसल्याचा नगरसेविका मैमुना बागवान यांचा आरोप खोटा असून, शनिवारी हनुमान जयंती असल्याने शुक्रवारी शहरातील हनुमान मंदिर परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शनिवारी प्रभाग दहामध्ये स्वच्छता करण्यात येईल, असे नगरसेविका बागवान याना सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी पालिका कार्यालयात कचरा आणून टाकला, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक विनायक शिर्के यांनी दिली.

शहरात स्वच्छता होत नसल्याचा नगरसेविका मैमुना बगवान यांचा आरोप खोटा असून, पालिका कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा त्यांचा कृत्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या या गैरकृत्याच्य निषेधार्थ आम्ही शनिवारी आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अशोक पगारे यांनी दिली.

शहरात योग्य पद्धतीने सफाई करण्यात येते. नगरसेविका मैनुना बागवान यांचे पालिका कार्यालयात कचरा आणून टाकण्याचे कृत्य समर्थनीय नसून, यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणार आहोत.

- सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, नगर पालिका, पैठण

मागच्या दोन महिन्यांपासून प्रभाग क्रमांक दहामध्ये सफाई करण्यात आलेली नाही. नाइलजास्तव मला नगर पालिकेच्या कार्यालयात कचरा टाकावा लागला.

- मैनुना बागवान, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीर बाबा यात्रा महोत्सव; दणके अध्यक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री क्षेत्र शेंद्रा (कमंगर) येथे येत्या ४ एप्रिलपासून मांगीर बाबा यात्रा महोत्सवास सुरुवात होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव समिती अध्यक्षपदी योगेश दणके, तर स्वागताध्यक्षपदी राजू खाजेकर यांची निवड करण्यात आली आहे.

क्रांतीगुरू लहुजी साळ‌वे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली.उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष ज्योती जाधव, सुरेश कांबळे, आदित्य गालफाडे, राजेश त्रिभुवन, विनोद आठवे, कार्याध्यक्षपदी कल्पना त्रिभुवन, सुशीला पोळकर, भागीनाथ काळे, काकासाहेब नाडे, कोषाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, विजय आव्हाड, सहकोषाध्यक्षपदी छाया खाजेकर, सुवर्णा साबळे, सरचिटणीस कचरू कांबळे, सुरेश घोरपडे, गणेश भालेराव, प्रकाश शेजवळ, संजय साठे, भरत मानकर, मीना मिसाळ, कविता आव्हाड, मनीषा मानकर,कविता सोनवणे, सहसचिव आनंद चांदणे, मारोती तुपे, सुनील आव्हाड, सुर्यभान दणके, संजय भालेराव, नाना कांबळे, स्वागताध्यक्ष राजू खाजेकर, प्रमोद कांबळे, अरुणा मिसाळ, संदीप मानकर, विजय चांदणे आणि किशोर कांबळे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमान जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी शहरातील विविध भागातील हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही अनेक मंदिर समित्यांनी केले आहे. भद्रा मारोती येथे दर्शनासाठी शुक्रवारी रात्री लाखो भाविक पायी रवाना झाले.

शहरातील सुपारी हनुमान, पानदरिबा, पैठणगेट, स्मशान मारोती, बालाजीनगर, पदमपुरा, गारखेडा, सिडको-हडको, फकीरवाडी, गजानननगर, चिकलठाणा, शिवाजीनगरसह विविध भागातील मंदिरांमध्ये श्री हनुमान जयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक कॉलन्यांमध्येही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रॉक्सी टॉकीजसमोरील श्री कानफट्टे हनुमान मंदिरात श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त शनिवारी सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दुपारी साडेबारापासून महाप्रसाद देण्यात येईल. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे विश्वस्त मंडळ, श्री हनुमान व्यापारी गणेश मंडळ यांनी केले आहे. पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिरात शनिवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत अलकाश्री यांचे संगीतमय सुंदरकांड आणि भजनसंध्या कार्यक्रम होईल. यानिमित्त सहा एप्रिल रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सतीश व्यास आहेत. श्री विठ्ठल रखुमाई व श्री महारुद्र हनुमान मंदिर, ज्योतीनगर येथे श्री हनुमान जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरजाराम हळनोर संयोजक आहेत. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत गणेशबुवा रामदासी यांचे रामकथा निरुपण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कचनेर पौर्णिमा महोत्सव

$
0
0

कचनेर येथे आज

धार्मिक कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री. १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे दिनांक शनिवारी चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता बोलिया होऊन अकरा वाजता भगवंतांचा पंचामृत अभिषेक होईल. त्यानंतर नित्यनियम पूजा होईल. सायंकाळी भगवंतांची आरती करण्यात येईल. उपस्थित समाजबांधवांना सकाळी ११ ते दुपारी दोन यादरम्यान आनंदीलाल सेठी गुवाहाटी( आसाम) यांच्यावतीने महाप्रसाद दिला जाणार आहे. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्राच्या विश्वस्त व कार्यकारणी मंडळाच्या वतीने सचिव भरत ठोळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदकुमार, अर्दड हाजीर हो...!

$
0
0

हायकोर्टाचे आदेश न जुमानल्याने हजर राहण्याचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शाळा बंदीची सणसणाटी घोषणा करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी १९ एप्रिल रोजी अवमान याचिकेप्रकरणी व्यक्तीश: हजर राहावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. अरुण ढवळे यांनी दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या सेवा समाप्तीस खंडपीठाने अंतरिम आदेशाद्वारे संरक्षण दिलेले असताना, जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या सेवा समाप्त केल्या. त्यामुळे याप्रकरणी दाखल याचिकेबाबत हे आदेश देण्यात आले आहेत.

प्रस्तुत प्रकरणाची माहिती अशी की, मोहंमद मतीन व आनंद मैराळ यांची कनिष्ठ अभियंता म्हणून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २०११- २०१२ साली जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत नियुक्ती करण्यात आली होती. २०१५ साली त्यांनी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नियुत केलेल्या इतर कर्मचाऱ्यासोबत खंडपीठात रिट याचिका दाखल करून त्यांच्या सेवा नियमित करण्याची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांची बदली औरंगाबाद ज़िल्हा परिषद येथून अहमदनगर ज़िल्हा परिषद येथे करण्यात आली. खंडपीठाने २७ एप्रिल २०१६ रोजी अंतरिम आदेशान्वये याचिकाकर्त्यांच्या सेवा चालू ठेवण्याचे व नियमित वेतन देण्याचे निर्देश प्रतिवादींना दिले होते. त्यांनंतर याचिकाकर्त्यांची जून २०१६मध्ये अहमदनगर ज़िल्हा परिषदेतून औरंगाबाद जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली. त्याप्रमाणे ते औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाले. परंतु सप्टेंबर २०१६पासून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे त्यांनी खंडपीठाने २९ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत अवमान याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने सतीश तळेकर, उमाकांत आवटे काम पाहत आहेत तर प्रतिवादींतर्फे अतिरिक्त सह्हायक अभियोक्ता सुजित कार्लेकर, दिलीप बनकर पाटील काम पाहत आहेत

---

\B१९ एप्रिलला सुनावणी

\B---

खंडपीठाने सदरच्या प्रकरणात प्रथम दर्शनी अंतरिम निर्देशांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्यामुळे राज्याचे शिक्षण सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे नंदकुमार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांना सदर अवमान याचिकेच्या पुढील सुनावणीस यक्तीशः हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी १९ एप्रिल २०१८ रोजी ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिकलठाणावासीयांचा प्रकल्पाला विरोध

$
0
0

न्यायालयात दाद मागण्याचा बैठकीत एकमुखी निर्णय

---

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुग्धनगरीच्या जागेवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग प्लांट उभारण्यास चिकलठाणावासीयांनी विरोध केला आहे. या संदर्भात गुरुवारी रात्री सर्वपक्षीय नागरिकांच्या बैठक झाली. त्यात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील कचरा कुठे टाकायचा याचा निर्णय शासनाने नियुक्त केलेल्या समितीने घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शासनाने नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीची बैठक गुरुवारी झाली. त्यात दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकून तेथेच कचऱ्यावरचा केंद्रीय प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. संनियंत्रण समितीच्या निर्णयाची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा येथील नागरिकांनी एकत्र येत गुरुवारी रात्री सावता मंगल कार्यालयाच्या परिसरात बैठक घेतली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ज्या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत ग्रीन फिल्ड विकासाचे काम केले जाणार आहे, त्याच्या समोरच्या बाजूलाच कचऱ्यावर प्रक्रिया करणाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे, त्यामुळे स्मार्ट सिटीचे महत्त्व राहणार नाही. कचराडेपोमुळे नारेगाव - मांडकी व परिसरातील नागरिकांना तीन दशके त्रास सहन करावा लागला, असाच त्रास चिकलठाणावासीयांना सहन करावा लागेल. चिकलठाणावासीयांवर सातत्याने अन्याय झाला आहे. एमआयडीसीमध्ये या भागातील नागरिकांच्या जमिनी गेल्या, पण जमिनींना कवडीमोल भाव मिळाला, विमानतळाच्या कामासाठीही जमिनी संपादित केल्या. त्यावेळीही योग्य भाव मिळाला नाही. रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळीही अन्याय केला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला, तर अन्यायाच्या साखळीत आणखी एक साखळी गुंफली जाईल, त्यामुळे प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रस्त्यावर उतरून प्रशासनाला विरोध करण्यापेक्षा न्यायालयीन लढाई लढण्याचे देखील बैठकीत ठरविण्यात आले. सोमवारी या संदर्भात खंडपीठात धाव घेतली जाणार आहे.

चिकलठाणा शिवारातील दुग्धनगरीच्या जागेवर कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला, तर चिकलठाण्याचा विकास थांबेल. भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

- संजय चौधरी, माजी नगरसेवक

--

संनियंत्रण समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी झाली आहे. चिकलठाणा शिवारात प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास आमचा विरोध आहे. हा प्रक्रिया प्रकल्प नागरीवस्तीत येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे, अशी आमची भावना आहे.

- कारभारी जाधव, नागरिक

---

दुग्धनगरीच्या जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्यास आमचा विरोध आहे. एकाच ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याऐवजी शहराच्या चार दिशांना चार प्रकल्प उभारा आणि प्रक्रिया सुरू करा, अशी आमची सर्वानुमते भूमिका आहे.

- रवी कावडे, माजी नगरसेवक

---

कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे, पण कुणावर तरी अन्याय करून हे काम केले जाणे योग्य नाही. शिवाय शहराच्या चार भागात चार प्रक्रिया प्रकल्प उभे केले, तर कुणावरच अन्याय होणार नाही, असे आमचे म्हणणे आहे.

- मदन नवपुते, शहर उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागाची मार्च सरताना डागडुजी

$
0
0

चुटकीसरशी २० लाखांची फाइल मंजूर

---

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च संपण्यापूर्वी मंजूर झालेला निधी घाईगडबडीत खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने डागडुजी सुरू केली आहे. उपकरातून चालू आर्थिक वर्षात मंजूर केलेली २० लाखांची तरतूद करून घेण्यासाठी मंजुरीची फाइल चुटकीसरशी मंजूर करून घेण्यात आली. योजनांच्या नियोजनाचे मात्र अनेक कामे अडण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागात डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. आठवडाभरापूर्वी अचानकपणे हे काम सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालय दुरुस्तीच्या हेडमधून साडेतीन लाख रुपये मंजूर आहेत. त्यातून विभागाचे पत्रे बदलणे, अंतर्गत डागडुजी ही कामे करण्यात येत आहेत. याशिवाय उपकरातून फर्निचरसाठी २० लाखांची तरतूद ठेवण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात अगदी दोन दिवसांत ही २० लाखांची फाइल मंजूर करण्यात आली. हे काम सध्या सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्याकडे काहींनी तक्रार केली की, अनेक निविदा मंजूर असून त्या मार्गी लावण्यासाठी तांत्रिक बाबीत अडकल्या आहेत. कारण बांधकाम विभागात काम सुरू आहे. मार्च संपत असताना प्रशासकीय कामे मार्गी लावण्याऐवजी डागडुजीचे काम सुरू केल्याबद्दल अध्यक्षांनी बांधकाम विभागास अचानक भेट देऊन नाराजी व्यक्त केली होती. सदस्य, पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामांना प्रशासकीय अडचणी दाखविल्या जातात, पण प्रशासनाच्या कामाच्या बाबतीत मात्र तत्काळ अंमलबजावणी कशी काय केली जाते ? असा सवाल सदस्यांनी बोलून दाखविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभवार्ता

$
0
0

आलिशान प्रवासासाठी

रेल्वेची सेवा सुरू

नवी दिल्ली : आलिशान प्रवासासाठी रेल्वेने उपलब्ध करून दिलेली 'सलून कोच'ची सेवा शुक्रवारी प्रायोगित तत्त्वावर सुरू करण्यात आली. वातानुकूलित खोल्या, अॅटॅज्ड बाथरूम, स्वतंत्र किचन यासारख्या सेवा असलेल्या या विशेष डब्यातून सहा प्रवाशांनी प्रवास केला. दिल्ली ते जम्मू या प्रवासासाठी 'जम्मू मेल'ला या विशेष डब्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. या डब्यातून चार दिवसांचा विशेष प्रवास करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रियेसाठी २७ यंत्रे

$
0
0

सरकारकडून १० कोटींचा निधी; नऊ झोन कार्यालयांसाठी खरेदी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी शहरातील नऊ झोन कार्यालयांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे २७ यंत्र खरेदी करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून अल्पमुदतीची निविदा काढून ही खरेदी केली जाणार असून, यासाठी राज्य शासनाकडून दहा कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कंपोस्ट पिट तयार करून त्यात ओल्या कचऱ्यावर खत निर्मितीची प्रक्रिया केली जात आहे. सुमारे दीडशे कंपोस्ट पिट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय झोन कार्यालयांतर्गत निघणारा कचरा झोन कार्यालयाच्या परिसरातच संपवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक झोन कार्यालयासाठी तीन प्रकारची यंत्र खरेदी करण्याचे पालिकेच्या यंत्रणेने ठरविले आहे. श्रेडर, बेलिंग मशीन आणि स्क्रिनिंग मशीन अशी ही तीन यंत्र आहेत. श्रेडरचा उपयोग कटर सारखा केला जातो. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात मोठ्या आकाराचा कचरा असेल, तर प्रक्रिया करण्यासाठी त्याला लहान आकारात तोडावे लागते. त्यासाठी श्रेडर मशीन खरेदी केली जाणार आहे. सुक्या कचऱ्याच्या लाद्या तयार करण्यासाठी बेलिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी स्क्रिनिंग मशीन विकत घेतली जाणार आहे. एका झोन कार्यालयाच्या क्षेत्रात तीन प्रकारच्या तीन मशीन ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेने कामकाजाच्या दृष्टीने नऊ झोन कार्यालये तयार केली आहेत. नऊ झोनसाठी २७ यंत्र खरेदी केली जाणार आहेत. राज्य शासनाच्या जेएम पोर्टलवरून यंत्र खरेदीचा प्रयत्न करण्यात आला, पण पोर्टलच्या माध्यमातून यंत्र खरेदी शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर अल्पमुदतीची निविदा काढून यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठ - दहा दिवसात यंत्रांची खरेदी होईल असे मानले जात आहे.

---

\Bएम प्लस यंत्राचा डेमो सुरू\B

---

ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर एकाचवेळी प्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील एका कंपनीच्या एम प्लस यंत्राचा डेमो शुक्रवारपासून सुरू करण्यात आला आहे. मध्यवर्ती जकात नाका येथे हे डेमो यंत्र लावण्यात आले आहे. या यंत्राची क्षमता ४०० किलोची असून यंत्रात कचरा टाकल्यानंतर त्यापासून गॅस, तेल आणि खत एकाचवेळी निर्माण होते. यंत्र चालवण्यासाठी कंपनीचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा मित्रमंडळाची जमीन ताब्यात घेण्यास मनाई

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बांद्रा येथे मराठवाडा मित्रमंडळाला देण्यात आलेली ११ हजार चौरस मीटरची जमीन शासनाने परत घेण्याचा निर्णय मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिला. ही जागा ताब्यात घेण्यास धर्मादाय आयुक्त एस. जी. दिघे यांनी तात्पुरती मनाई केली आहे. शासन किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मित्रमंडळाची जागा ताब्यात घेऊ नये, असे निर्देश धर्मादाय आयुक्तांनी १२ मार्च रोजी दिले आहेत.

या जमिनीच्या मिळकत प्रक्रियेवरील मराठवाडा मित्रमंडळाचे नाव कमी करून त्यावर राज्य शासनाच्या नावाची नोंद घेण्याचे निर्देशही दिले होते. मराठवाड्यातील मुलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी वांद्रे येथील चेतन कॉलेजच्या समोरील ११ हजार चौरस मिटर जागा १९८१मध्ये मराठवाडा मित्रमंडळाला देण्यात आली होती. ११ वर्षांमध्ये वसतिगृह बांधण्यात यावे, अशी अट घालण्यात आली होती. या अटीचा भंग झाला होता. राज्य शासनाने या जागेवर इंजीनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचीही मान्यता दिली होती.

या जमिनीमध्ये डेव्हलपर्सची नियमबाह्यपणे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी घोळ घातल्याचे निष्कर्ष जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवले होते. या जमिनीतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार औरंगाबादचे डॉ. मोहनराव देशमुख यांनी केली होती. या जमिनीवर डेव्हलपरबरोबर करण्यात आलेल्या कराराला शासनाची परवानगी नव्हती आणि अटी-शर्तीचा भंग करण्यात आला होता. समृद्धी आर्केड या कंपनीशी करार करण्यात आला होता. या कराराअंतर्गत माजी मुख्यमंत्री आणि या मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या साखर कारखान्याच्या नावावर २५ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. साडेचार वर्षे ही रक्कम वापरल्यानंतर ती पुन्हा निलंगेकरांनी परत केली, असा आक्षेप नोंदविण्यात आला होता. संस्थेने आता शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

या जागेसंदर्भात मंडळाने ११ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा केला आहे आणि त्यावर ५९ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. ही जमीन मंडळाची आहे. मंडळाची जमीन ताब्यात घेताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आलेला नाही. ही जमीन ताब्यात घेतली तर मंडळाचे नुकसान होईल. सध्या ही जमीन मंडळाच्याच ताब्यात आहे. शासनाने जमीन परत घेतलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने किंवा जिल्हाधिकाऱ्यांना मराठवाडा मित्रमंडळाची जमीन ताब्यात घेण्यास पुढील सुनावणीपर्यंत मनाई करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

एकतर्फी आदेश दिल्याचा दावा

डॉ. मोहनराव देशमुख आणि माणिकराव गावंडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्याविरुद्ध आव्हान दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जागेबाबत आदेश करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व अवलंबिले नाही. कारणे दाखवा नोटीस न देता एकतर्फी न्यासाची जागा परत घेण्याचे आदेश दिले आहेत, हे अन्यायकारक आहे. मराठवाडा मित्रमंडळाच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी अंतरिम अर्ज मंजूर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळाची जमीन शासनाकडे जमा करण्यापासून तत्काळ परावृत्त करावे, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images