Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डायरी (०२ एप्रिल २०१८)

$
0
0

- अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन, महाप्रसाद.

स्थळ : दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जे-सेक्टर, मुकुंदवाडी

वेळ : सकाळी १० पासून

- भीमोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम.

स्थळ : विद्यापीठाचे सभागृह

वेळ : सायंकाळी ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपींना भर चौकात फाशी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संकेत कुलकर्णीच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ सिडको एन २ येथील घटनास्थळी रविवारी तरूण व नागरिकांनी निषेध सभेचे आयोजन केले होते. आरोपींना चौकामध्ये फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी संकेत कुलकर्णी याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या निषेध सभेला नागरिक तसेच राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संकेत कुलकर्णी याच्या खुनाला रविवारी दहा दिवस पूर्ण झाले आहेत. ज्या ठिकाणी संकेतला चिरडून ठार मारण्यात आले त्याच ठिकाणी या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये तरूण व महिलांचे प्रमाण उल्लेखनीय होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मृत संकेत कुलकर्णीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मान्यवरांनी आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संकेतचा खून हा मानवतेला काळीमा फासणारा आहे. आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. संकेतच्या खुनप्रकरणात पसार असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करावी, पोलिसांनी कोणतेही तपसात पळवाटा ठेवू नयेत, संकेत जायभायेला चौकातच फाशीची शिक्षा द्यावी, ज्या कोणी नागरिकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली आहे त्यांनी साक्षीदार म्हणून समोर यावे, असे आवाहन करण्यात आले. संकेत कुलकर्णीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना उर्वरित आरोपी पकडण्यासाठी अल्टीमेटम द्यावा, अन्यथा पुढील निषेध सभा पोलिस आयुक्तालयात घेण्यात येईल, असा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी दिला. राजकीय नेते मंडळींनी नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

या निषेध सभेला आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, नगरसेविका माधुरी अदवंत, माजी उपमहापौर संजय जोशी, माजी महापौर बापू घडमोडे, अनिल पैठणकर, संजय केणेकर, अनिल मुळे, राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, रवी गायकवाड, समीर राजूरकर, दामुअण्णा शिंदे, रेणुका घुले यांच्यासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

\Bमदत करणे शक्यच नव्हते\B

या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार मीरा पाटील व जयश्री शिरपुरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. संकेत कुलकर्णीला वारंवार कारने संकेत जायभाये चिरडत असताना मध्ये पडणे कोणालाही शक्यच नव्हते. जायभाये हा वेगात अंगावर कार आणत होता. हा प्रकार पाहून बघणाऱ्या मंडळीच्या तोंडून किंकाळ्या बाहेर पडत होत्या. नागरिकांना बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्यायच नव्हता, असे सांगत हा चित्तथरारक प्रसंगच समोर मांडला. हा प्रसंग ऐकताना अनेकांच्या अंगावर काटा आला.

\Bजमाव निशब्द झाला\B

निषेध सभेच्या शेवटी संकेत कुलकर्णीचे वडील संजय कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. आरोपींना लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. आरोपी संकेत जर पोलिसांना कबुली देत नसेल तर पोलिसांनी त्याला आपल्या स्वाधीन करावे, मी त्याच्याकडून कबूल करून घेतो, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढले. संजय कुलकर्णी भावना व्यक्त करीत असताना उपस्थित हजारोंचा जमाव हा पूर्णपणे निशब्द होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपडे चोरल्याचा आळा, मोलकरणीस कोंडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंधरा जोड कपडे चोरल्याचा आरोप करीत मोलकरणीला घरमालकिणीने तीन तास घरात कोंडल्याचा प्रकार सातारा परिसरात शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा या काळात घडला. याप्रकरणी घरमालकिणीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली हिरालाल जाटवे (वय २५ रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) या मोलकरीण आहेत. त्या सातारा परिसरातील कासलीवाल मार्वल येथे धनश्री गिरधारी यांच्याकडे काम करतात. सोनाली यांची दहावीची परीक्षा असल्याने त्यांनी एक महिन्याची सुटी घेतली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जागी काम करण्यासाठी दुसरी मोलकरीण गिरधारी यांना दिली होती. सुटी संपल्यामुळे शनिवारी सोनाली या कामावर परत आल्या. यावेळी गिरधारी यांनी त्यांना तू माझे पंधरा ड्रेस चोरले आहेत, तुझी येण्याची वाटच पाहत होते, बरी तावडीत आली, आता कशी घरी जाते असे म्हणत त्यांना तीन तास खोलीत कोंडून ठेवले. तीन तासानंतर सोनाली यांची गिरधारी यांनी सुटका केली. याप्रकारामुळे सोनाली यांनी सातारा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी धनश्री गिरधारी यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार पदार हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम नोट - सहा सिंगल बातम्या

$
0
0

जाब विचारणाऱ्याला सहा जणांकडून मारहाण

औरंगाबाद : भावाला का मारहाण करीत असल्याचे विचारणाऱ्याला सहा जणांनी डोके फोडून जखमी केल्याची घटना जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; २९ मार्च रोजी नऊच्या सुमारास मोतीकारंजा चौराहा येथे उमेश दिंगबर कौशल्य याच्या भावाला गणेश टाक,विशाल खैरनार, उमेश पुरी, लौकिक आडाणे, रवी पैठणकर, योगेश दिवटे हे कैलास नगर येथील मुले मारहाण करीत होती. भावाला मारहाण का करता, असे विचारण्यासाठी उमेश दिगंबर कौशल्य गेला असता, लोखंडी रॉडने रवी पैठणकर याने मारून त्याला जखमी केले. या प्रकरणात सहा जणांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………………

दुचाकीची चोरी

औरंगाबाद : सिडकोतील ठाकरे नगर येथे राहणारे व्यंकटेश धुळप्पा भोसगे यांनी आपल्या घरासमोर मोटरसायकल (एमएच २० एक्यू ७१९४) ही मोटारसायकल १८ मार्च रोजी रात्री लावली होती. १९ मार्चच्या सकाळी मोटार सायकल दिसून आली नाही. या प्रकरणात अज्ञात चोरटया विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………………………

रोख रक्कमेसह बिस्किटाची पाकिटे चोरली

औरंगाबाद : पडेगाव भागातील रामगोपाल नगरजवळ असलेल्या श्री सुपर शॉपी किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेली १३ हजार ७०० रुपये रोख रक्कम चोरून नेली; तसेच एक हजार रुपये किंमतीचे बिस्किटाचे पुडेही चोरून नेले. या प्रकरणात दुकान मालक राजेंद्र श्रीरामजीत प्रसाद यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………

जुगार चालविणारा अटक

औरंगाबाद : जाफर गेट भागात जुगाराचा अड्डा चालविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश सुरेश येल्लेकर (रा. कैसर कॉलनी) आहे. कल्याण नावाचा मटका जुगार राजेश चालवित होता. त्याच्याकडून मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या असून, त्याच्याकडून १४०० रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस कर्मचारी सतीश संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………

वाहन चालकावर गुन्हा

औरंगाबाद : हर्सूल टी पॉइंट येथे ३० मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एमएच २० एए ४१४६ ही गाडी सार्वजनिक रोडवर लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न वाहन चालकाने केला. रस्त्यावर अवैध पार्किंग केल्याने वाहनचालक अनीस खान बशीर खान याच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला पथदिव्यांचे सुधारित बिल द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

महावितरणतर्फे सिल्लोड नगर पालिकेला पथदिव्यासाठी मागील दोन वर्षांच्या कालावधीत आकारलेली बिले रद्द करून सुधारीत वीज बिल देण्याचा आदेश वीज ग्राहक मंचाच्या अध्यक्षा शोभा वर्मा, सचिव लक्ष्मण काकडे आणि सदस्य विलास काबरा यांनी दिले आहेत.

सिल्लोड नगर पालिकेने पथदिव्याचे बिल न भरल्यामुळे ऑगस्ट २०१७मध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. नगर पालिकेने 'पार्ट पेमेंट' केल्यानंतर तो पुन्हा जोडून देण्यात आला. सिल्लोड नगर पालिकेतर्फे वीजमीटरची पाहणी करण्यात आली. वीज बिलावर दाखविण्यात रीडिंग आणि प्रत्यक्ष मीटरवरील रीडिंग यात तफावत आढळून आल्यामुळे त्यानी महावितरणकडे बिल दुरुस्त करून देण्याची विनंती केली, पण महावितरणने त्याची दखल घेतली नाही. वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस पुन्हा देण्यात आल्यामुळे नगर पालिकेतर्फे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया याच्यामार्फत वीज ग्राहक मंचात तक्रार करण्यात आली होती.

महावितरणतर्फे नगर परिषदेला पथदिव्यासाठी देण्यात आलेल्या एकूण ५० जोडण्यांपैकी अनेक ठिकाणी मीटरवरील रीडिंग हे वीज बिलावर दाखविण्यात आलेल्या रीडिंगशी जुळत नसल्याचे दाखवून कापडिया यांनी मीटरचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ समितीची नेमणूक करावी, अशी विनंती मंचाकडे केली. मंचाने ही विनंती मान्य करून सुभाष मांगुळकर (निवृत्त अधीक्षक अभियंता, महावितरण), अहिरे (निवृत्त कार्यकारी अभियंता, महावितरण), राक्षसभूवनकर (निवृत्त, अधीक्षक), ऊर्जा मंच या सामाजिक संस्थेचे शरद चोबे आणि शेरखान पठाण या पाच तज्ज्ञांची समिती नियुक्त केली.

या समितीने सिल्लोड येथे जाऊन पथदिव्यासाठी लावण्यात आलेल्या सर्व मीटरचे निरीक्षण केले आणि अहवाल मंचात दाखल केला. यामध्ये ९० टक्के मीटर हे बंद असून, बिलावरील रीडिंग आणि मीटरवरील रीडिंग यामध्ये तफावत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्रयस्थ समितीतर्फे देण्यात आलेला अहवाल मान्य असल्याचे नगर पालिकेतर्फे सांगण्यात आले. आणि मीटर बसवण्यात आलेल्या तारखेपासून सुधारीत बिल देण्याचा आदेश पारीत करण्याची विनंती मंचास केली.

महावितरणतर्फे त्रयस्थ समितीने दिलेला अहवाल मान्य नसल्याचे सांगत, त्यांनी आकारलेले वीज बिल योग्य असल्याचा दावा पुन्हा करण्यात आला. ग्राहक मंचाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर त्रयस्थ समितीने दिलेला अहवाल मान्य केला आणि महावितरण कंपनीस मागील दोन वर्षांच्या कालावधीत आकारलेले पथदिव्याचे वीज बिल रद्द करून सुधारित बिल देण्याचा आदेश दिला.

निम्मे बिल कमी होणार

वीज ग्राहक मंचाच्या आदेशामु‌‌ळे महावितरणतर्फे सिल्लोड नगर पालिकेत आकारण्यात येत असलेले पथदिव्याचे वीज बिल ५० ते ६० टक्के कमी होणार आहे. मंचाने आपल्या आदेशात पथदिव्यासाठी लावण्यात येणाऱ्या मीटरची योग्य ती निगा व मीटरवरील नोंदी नियमीतपणे घेण्यासाठी महावितरण, सिल्लोड पालिका यांनी संयुक्त समिती तयार करावी व नागरिकांना पथदिव्याची योग्य सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असेही नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांना लाभला मार्चएंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात मार्च महिना संपताना दिव्यांगांसाठी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही विभागासमोर दिव्यांगांसाठी निवारा, आसनव्यवस्था करून दिली जात नव्हती. पण अचानक दोन दिवसांत ही सुविधा देऊन प्रशासनाने सुखद धक्का दिला आहे.

मार्च महिना संपताना आर्थिक ताळेबंद जुळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांमध्ये लगीनघाई सुरू झाली होती. बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे. या विभागाचे पत्रे बदलण्यात आले असून अंतर्गत दुरुस्ती व फर्निचरही बनविण्यात येत आहे. बांधकाम विभागालगत असलेल्या समाजकल्याण विभागासमोरही पत्रे टाकून निवारा बनविण्यात आला आहे. या विभागात दररोज दिव्यांग, वृद्ध, कष्टकरी मोठ्या संख्येने येतात. विभागात बसण्यासाठी दोन बाक आहेत. पण गर्दी झाली तर अनेकजण झाडाखाली बसून राहतात. पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या खोलीत ही सुविधा पुरवावी, अशी मागणी खूप दिवसांपासून करण्यात येत होती. पण प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नव्हते. दरम्यान आता समाजकल्याण विभागासमोरच चार पत्रे टाकून निवारा बनविण्यात आला आहे. अभ्यागतांना बसण्यासाठी बाक लावण्यात येत आहेत. पण या बाकांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’वर ‘डीपीसी’ मेहेरबान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्चएंडला जाहीर केलेला किती निधी येणार? याबाबत सर्वच सरकारी कार्यालयात उत्सुकता असते. जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) नियमित मंजूर केलेल्या निधीव्यतिरिक्त सरलेल्या आर्थिक वर्षात १६ कोटी रुपये अधिक मिळाले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक कामे मोठ्या प्रमाणावर होणार आहेत.

२९ मार्चपासून तीन दिवस जिल्हा परिषदेला राज्य सरकार व डीपीसीकडून मंजूर झालेला वेगवेगळ्या विभागाचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त झाला. त्यात ३१ मार्च रोजी डीपीसीकडून १६ कोटी रुपये अधिकचे देण्यात आले. ग्रामीण रस्ते दुरुस्तीच्या ३०५४ हेडअंतर्गत तीन कोटी, ५०५४ अंतर्गत ६ कोटी, विविध भूसंपादनासाठी तीन कोटी, सिंचन विभागांतर्गत महत्वाचे असलेल्या एमआयएन ६ हेडअंतर्गत कामे करण्यासाठी दोन कोटी, जनसुविधेच्या कामासाठी ९१ लाख, तर प्राथमिक शाळा खोली दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. हा निधी ३१ मार्च २०१८ रोजी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला. त्यामुळे पुढील वर्षभरात हा निधी वापरता येईल. जिल्हा नियोजन समितीने अपेक्षित रकमेपेक्षा १६ कोटी रुपये दिल्यामुळे पुढील वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या पातळीवर तरी 'अच्छे दिन' येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकृष्ण मिशन आश्रमात उन्हाळी शिबिर

$
0
0

औरंगाबाद: रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते १ मे दरम्यान हे शिबिर होणार आहे. बीड बायपास येथील आश्रमात हे शिबिर होणार आहे. विद्यार्थ्यांना असणारी एकाग्रचित्ताची गरज लक्षात घेत विद्यार्थ्यांचे मन आनंदी आणि शांत हवे या हेतुने या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. नृत्य, संगीत आणि वक्तृत्वाचे धडे दिले जाणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९ ते १२, दुपारी ४ ते ८ या वेळात आश्रमात संपर्क साधण्याचे आवाहन विष्णुपादानंद महाराजांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचा उद्या संसदेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिक्षण बचाओ'अंतर्गत देशभरातील शिक्षक तीन एप्रिल रोजी दिल्लीत संसदेवर मोर्चा काढणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही सहभागी होणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी एका पत्रकाद्वारे कळविल्याचे औरंगाबाद जिल्हा समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले.

खाजगीकरणाच्या वरवंट्याखाली शिक्षक कर्मचारी भरडून निघत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सरकारी, निमसरकारी शाळा बंद होत आहेत. कधी गुणवत्तेच्या नावाखाली, तर कधी कमी पटसंख्येच्या कारणांमुळे शाळा बंद करण्याचा धोरणाचे सरकार कडून अनाकलनीय समर्थन केले जात आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा बंद केल्यास शोषित, वंचित शेतकरी-शेतमजूर कामगारांच्या पाल्यांना आपल्या राहत्या गावात शिक्षण मिळणार नाही. धनदांडग्या श्रीमंत आणि भांडवलदारांच्या नफेखोर हितासाठी शासनाकडून शिक्षणाचे कंपनीकरण केले जात आहे. सरकारच्या मालकीच्या शाळेतून सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता असून, गरीब - श्रीमंतसाठीच्या वेगवेगळ्या शाळा हे भेदभावपूर्ण स्तरीकरण बंद करण्याची मागणी आहे. मोर्चात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणी बातमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुदान, तुकड्यांचा मान्यतेचा प्रश्न यांमुळे विनआनुदानित उच्चमाध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची धार कमी झाली असून तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

राज्यात विनाअनुदानित, अनुदानित शिक्षकांचे उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरू केले. सुरुवातील अनुदानित शिक्षकांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन मागे घेतले पुन्हा २६ मार्चपासून उत्तरपत्रिका परत जमा न करण्याचे आंदोलन सुरू केले. विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविले. मंडळाने याबाबत राज्य मंडळ कार्यालयालाही वस्तुस्थिती कळविली. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. याभेटी दरम्यान २० टक्के अनुदानाबाबत शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे कळते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरील संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शिक्षक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासत असल्याचे विभागीय मंडळ अध्यक्ष सुगधा पुन्ने यांनी 'मटा'ला सांगितले.

'निकाल' प्रक्रिया वेळेतच

निकालाची प्रक्रिया वेळेतच पूर्ण केली जाईल, असे मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. 'नीट', 'जेईई', 'सीईटी' परीक्षा आणि त्यानंतर त्यासाठीची प्रक्रिया सुरू होते. अशावेळी निकालानंतर गुणपत्रिकांचे वितरण, त्यानंतर गुणपडताळणीची प्रक्रिया या सगळ्या बाबींना लागणारा कालावधी लक्षात घेत प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. निकाल वेळेत जाहीर व्हावा या हेतूने मंडळ आपल्यास्तरावरही प्रयत्न करते आहे. परत आलेले गठ्ठे संबंधित विषयांच्या इतर शिक्षकांकडे पाठवित तपासणीची प्रक्रिया केली जात आहे.

शिक्षकमंत्र्यांसमोर संघटनेने प्रश्न मांडले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु आम्हाला लेखी आश्वासन दिलेले नाही. काही शिक्षकांनी उत्तरपत्रिका घेतल्या, परंतु जमा करण्याबाबत कोणता निर्णय झालेला नाही. शासनाने आमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहायला हवे, अशी आमची मागणी आहे.

- शिवराम मस्के, मुप्टा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काशिबेन यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : खाराँकुवा येथील रहिवासी काशीबेन द्वारकादास नागर (वय ९०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाकडून रिंगणात उतरण्याच्या इच्छेने अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचीच उमेदवारी कायम राहील. काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, भाजपकडून माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड यांची नावे सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही चाचपणी सुरू आहे, पण लोकसभेसाठी युती आणि आघाडी होणार की नाही यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

भाजपने २०१४ लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर मोठे यश मिळविले. त्यानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळविली. त्या पार्श्वभूमीवर २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा रिंगणात असतील. काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड इच्छुक आहेत. त्यांनी सहा महिन्यांपासून मतदारसंघात दौरे काढून मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र पक्षाकडून कुणाच्या पारड्यात उमेदवारी पडणार याबाबत अजून काहीच संकेत दिलेले नाहीत. काँग्रेसमधून माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र श्रेष्ठींचा नियम काँग्रेसमध्ये अंतिम असल्याने उमेदवारीचा संभ्रम कायम असणार आहे.

भाजपमधून माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड यांची नावांची पक्षपातळीवर चर्चा आहे. युती झाली नाही तर खैरेंना टक्कर देण्यासाठी ऐनवेळी बाहेरचा उमेदवार आयात करण्यात येऊ शकतो, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तविली. आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटते. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी दिली गेली तर आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. एकूणच जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला अनेक इच्छुक लागले असले तरी युती - आघाडीचे गणित कसे जुळते, यावर पुढची व्यूहरचना निश्चित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकाधीश मंदिराला सौर ऊर्जेचा प्रकाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुजराती बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री द्वारकाधीश मंदिर येथे आठ किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराच्या वीज बीलावर होणाऱ्या खर्चात एक लाख रुपयांची बचत होणार आहे.

खाराकुआँ येथील द्वारकाधीश मंदिरात आयोजित कार्यक्रमात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. गुजराती समाजाचे पुजारी शशिकांत महाराज यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रांतीचौक विभागाचे कार्यकारी अभियंता रेवतीकर यांच्यासह क्रांतीचौक विभागाने नांदुरे, वाघ, संस्थेचे सचिव शिरीष वकील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रकल्पाची माहिती देताना हेमंत कापडिया यांनी, सौर ऊर्जेचा प्रकल्प मंदिर परिसरात बसविल्यामुळे एक लाखा रूपयांची वीज बचत होणार असल्याचे यावेळी सांगितले.

सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी चार लाख रुपये खर्च आला आहेत. त्यापैकी सव्वा लाख रुपये रक्कम ही 'मेडा' या सरकारी संस्थेकडून अनुदान स्वरुपात परत मिळणार आहे. या प्रकल्पावर खर्च केलेली पूर्ण रक्कम येत्या तीन वर्षांत वसूल होणार असल्याची माहिती कापडिया यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदली प्रक्रियेपूर्वी धोरण दुरुस्त करावे

$
0
0

म. टा. प्रितनिधी, औरंगाबाद

राज्यातील शिक्षक बदली धोरण दुरुस्त करून प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. शिक्षक बदलीला शिक्षक भारती संघटनेचा विरोध नाही, पण २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशानुसार शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.

ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षक बदली धोरण राबविण्यासाठी नवीन अध्यादेश काढलेला आहे. त्याविरोधात मागील वर्षी शेकडो याचिका न्यायालयात दाखल केल्या. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. शिक्षकांची मागीलवर्षी उन्हाळी, दिवाळी सुटी व दसरा बदली प्रक्रियेमुळे वाया गेली. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. शिक्षक बदलीला शिक्षक भारती संघटनेचा विरोध नाही, पण २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशानुसार शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यात काही दुरुस्ती आवश्यक आहेत. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे बदल्यांची टक्केवारी असावी, सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्यात यावी, सोपे व अवघड शाळा यांचे स्पष्ट निकष ठरवावेत, बदलीतील खो-खो पद्धत बंद करावी, सेवाज्येष्ठतेने ठराविक जागा रिक्त दाखवून बदल्या कराव्यात, संवर्ग २ मध्ये ३० किलोमीटर अंतराच्या आत सेवा करणारे पती-पत्नी यांना बदली हवी की नाही असा नवीन टॅब द्यावा, बदली फॉर्म पंचायत स्तरावरच भरण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या.

हे बदल करूनच बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, संतोष ताठे, राजेश भुसारी, महेंद्र बारवाल, शेख अन्वर, प्रेमसिंग बारवाल, शरद शहापूरकर, नामदेव पवार आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागेल त्याला शेततळ्यांचे तीन तेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मागेल त्याला शेततळे' योजनेची शासन ढोल बडवून प्रशंसा करत असले तरी मराठवाड्यात या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. विभागातील ३९ हजार ६०० लक्षांकांपैकी केवळ २४ हजार ९४९ शेततळीच पूर्ण झाली असल्यामुळे या योजनेचा 'प्रशासकीय वेग' सर्वांसमोर आला आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ३९६०० शेततळे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. शेततळे बांधल्यानंतर प्रत्येक शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार होते. मात्र मार्च अखेरही विभागात केवळ २४ हजार ९४९ शेततळ्यांचे कामे पूर्ण झाली असून यातील २२ हजार ७०५ शेततळ्यांचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत, तर १५९५ कामे सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत शेततळ्यांची अशी अवस्था असून जून महिन्यात पावसाळ्यामध्ये शेततळ्यांची कामे पुन्हा थांबवण्यात येतील. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत किती शेततळे पूर्ण होतील हे पाहावे लागेल.

'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी प्रथम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीच्या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्वत पैसे खर्च करून शेततळे बांधावी लागली आहेत. ज्यांची शेततळे पूर्ण झाली आहेत अशा शेतकऱ्यांनाही पैशांसाठी प्रशासनाकडे खेट्या माराव्या लागत आहेत.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांचा वेग मंद आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात लक्षांकाच्या तुलनेत ७१ तर जालना जिल्ह्यात ८८ टक्के शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. लातूर जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

\Bमागेल त्याला शेततळे \B

\Bलक्षांक - ३९६००

सुरू असलेली कामे - १५९५

पूर्ण कामे - २४९४९\B

\Bजिल्हानिहाय संख्या\B

जिल्हा...............लक्षांक........................पूर्ण............. टक्के

औरंगाबाद.............९१००....................६४८७..................७१

जालना...................६०००....................५२६१.................८८

बीड.......................६५००......................४७८६...............७४

लातूर.....................४८००......................१५५५................३२

उस्मानाबाद................३७००....................२२२४.................६०

नांदेड.....................५०००…......................१४१८..................३५

परभणी....................……३०००.......................१४८६.................५०

हिंगोली…….....................१५००.......................१७३२..................६३

---------------------------------------------------------.

एकूण......................३९६००.................२४९४९.....................६३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वय, प्रकृती ओळखूनच पळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चाळीशीनंतर धावण्याचे सर्वोत्तम फायदे हे केवळ दहा मिनिटापर्यंतच मिळू शकतात आणि ६ ते ७.५ मैल प्रतीतास या गतीने दररोज अवघे दोन किलोमिटर धावणेही पुरेसे आहे. हे जागतिक पातळीवर विविध अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. यापेक्षा जास्त वेळ, गती व प्रमाणात धावणे हे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देणारे ठरू शकते, हेही पुरते सिद्ध झाले आहे. मुळात आपली वय-प्रकृती, रक्तदाब, मधुमेह, अनुवंशिकता आदी बाबींचे भान ठेऊनच मॅरेथॉन धावले पाहिजे,' असे सुस्पष्ट मत प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांनी व्यक्त केले.

'औरंगाबाद ब्लॅक बक्स' व 'आयएमए'च्या वतीने रविवारी आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्रसिद्ध अतीवदक्षतातज्ज्ञ डॉ. आनंद निकाळजे व डॉ. अजय अंबेकर यांनी डॉ. भागवत यांना बोलते केले. श्रोते म्हणून उपस्थित राहिलेल्या शहरातील नामवंत डॉक्टरांशी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिकांशी संवाद साधताना आणि अनेक शास्त्रीय अभ्यासांचे दाखले देत डॉ. भागवत म्हणाले, मॅरेथॉन धावण्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे जगभर आहेत आणि त्यामुळेच १९८४ पासून या संदर्भात जगभरामध्ये वेगवेगळे अभ्यास केले जात आहेत. मुळात ऐन विशीत किंवा तिशीत पळण्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता नगण्य आहे आणि या वयोगटामध्ये जे काही मृत्यू होतात ते हृदयाच्या संरचनात्मक (स्ट्रक्चरल) व्याधींमुळे होतात, हेही सिद्ध झाले आहे. मात्र चाळीशी-पन्नाशीनंतर मॅरेथॉन धावण्यामुळे हृदयावर 'अक्युट स्ट्रेस' येतो तसेच शरीराअंतर्गत सूज (इन्फ्लेमेशन) निर्माण होण्याची प्रक्रिया होत असते. त्याचवेळी शरिराअंतर्गत सायटोकाईन्स स्त्रवतात व रक्तवाहिन्यातील प्लॅक फुटून हृदयाचा झटका येऊ शकतो. मॅरेथॉन धावणाऱ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात साचतात, हेही दिसून आले. महत्वाचे म्हणजे ८२ टक्के मॅरेथॉन धावणाऱ्यांमध्ये मूत्रपिंडालाही तात्पुरती इजा होते, जी कालांतराने कायम राहाते की नाही, याचा मात्र अभ्यास झालेला नाही. या पार्श्वभूमीवर चाळीशीनंतर धावण्याचा अतिरेक हा जिवावर बेतू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही डॉ. भागवत म्हणाले. डॉ. मंगेश पानट यांनी आभार मानले.

\Bअती तिथे माती…\B

धावणे हा व्यायाम चांगलाच आहे; परंतु चाळीशीनंतर धावण्याचे सर्वोत्तम फायदे हे ५ ते १० मिनिटांपर्यंतच मिळू शकतात. त्यापेक्षा जास्त धावणे धोकादायक ठरू शकते. तसेच ६.५ ते ७ व ७.१ ते ७.६ मैल प्रती तास या वेगाने आणि आठवड्याला ९ ते १२ मैल म्हणजेच दररोज दोन किलोमीटर या प्रमाणात धावण्याचे सर्वोत्तम फायदे मिळतात. अर्थात, त्यापेक्षा जास्त म्हणजेच 'अती तिथे माती' हे लक्षात घ्या, असाही इशारा डॉ. भागवत यांनी या प्रसंगी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडीवर आज एमजीएममध्ये संवाद

$
0
0

औरंगाबाद: शहरातील कचरा समस्येवर 'कचराकोंडी जागर संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आर्यभट्ट हॉल, एमजीएम परिसर येथे हा कार्यक्रम होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महात्मा गांधी मिशन आणि शहरातील स्वंयसेवी संस्था संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कचराप्रश्नाचे जेष्ठ अभ्यासक व भाभा अॅटोमेटीक रिसर्च सेंटर मुंबई येथील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यावेळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माय वर्ल्ड’ गृहप्रकल्पाचे भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरील चिकलठाणा विमानतळासमोरील 'माय वर्ल्ड' या गृहप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (३० मार्च) मोठ्या उत्साहात पार पडला. मनजीत प्राइड माय वर्ल्ड टाउनशिपमध्ये हक्काचे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या औरंगाबादवासींसाठी संधी उपलब्ध झाली आहे.

एकाच परिसरात एक हजारापेक्षा जास्त फ्लॅट असलेल्या 'माय वर्ल्ड' टाउनशिपविषयी उत्सुक आहे. या प्रकल्पात अनेक सोयीसुविधा मिळणार आहेत. एक हजार ते दोन हजार ४०० चौरस फूट आकाराचे टू, थ्री, फोर बीएचके फ्लॅट याठिकाणी असणार आहे. प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आशू दर्डा, नवीन बगडिया, हनुमानप्रसाद बगडिया, भूपेंद्रसिंग राजपाल, माजी महापौर भगवान (बापू) घडामोडे, नितीन बगडिया, संचित राजपाल, विपीन बगडिया, राजेंद्रसिंग राजपाल, मनीष अग्रवाल, हिरामण रिठे, यमाजी रिठे, शांतीलाल रिठे यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थित होती.

'माय वर्ल्ड' गृहप्रकल्पात ८० टक्के मोकळी जागा ठेवण्यात आली असून, त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा राहणार आहे. प्रकल्पात ५०पेक्षा जास्त अॅमिनिटीज उपलब्ध असतील. मोठ्यांसाठी जॉगिंग, वॉकिंग ट्रॅक, स्पा-सलोन, स्टीम बाथ, जिम, मिनी थिएटर, मल्टीलेव्हल प्रीमियम क्लब हाउस यासारख्या असंख्य गोष्टी येथे देण्यात आल्या आहे. परवडण्यायोग्य दरात येथे हक्काचे घर खरेदी करता येणार. याठिकाणी सॅम्पल फ्लॅट तयार असल्याचे कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘पेपरलेस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गावात महत्वाचे असलेले ग्रामपंचायत कार्यालय आता पेपरलेस होणार आहे. ग्रामपंचायतींमधील कामांसाठीचे दप्तर आता सीलबंद होणार असून त्याची पूर्णत: अंमलबजावणी शुक्रवारपासून सहा एप्रिलपासून होईल. त्यामुळे ग्रामस्थाला आता एका क्लिकवर प्रमाणपत्राची प्रिंट हाती पडण्यास मदत मिळणार आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड ऑनलाइन करून सर्व रजिस्टर ग्रामपंचायतींमध्येच सीलबंद करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार एक एप्रिल म्हणजे रविवारपासून या कामाला सुरवात झाली. सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढचे चार दिवस हे काम चालेल. शुक्रवार सहा एप्रिलपासून नागरिकांना ३३ प्रकारची प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध असतील. एखाद्या ग्रामस्थाला कर भरायचा असेल किंवा जन्माचा दाखला, विवाहाचे प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर आता एका क्लिकवर ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्यांना प्रमाणपत्राची प्रिंट हातात मिळेल. या कामासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कामाला लागल्या आहेत. आपले सरकार योजनेत 'ई-ग्रामसॉफ्ट' ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींना ती पुरविण्यात आली आहे. जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र, गावातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर आकारणीचे प्रमाणपत्र, निराधार योजनांसाठी वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर्तणूक प्रमाणपत्र, वीजजोडणी ना हरकत प्रमाणपत्र, नळजोडणीची परवानगी, बेबाकी प्रमाणपत्र, स्वच्छतागृह असल्याचे- नसल्याचे प्रमाणपत्र, दारिद्य्ररेषेखालील, बेरोजगार प्रमाणपत्र, मालमत्तेचे फेरफार, बांधकाम परवानगी आदी ३३ सेवांची प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळणार आहेत. यासाठी फक्त २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे तिथे ऑनलाइन, तर जिथे नाही तिथे ऑफलाइन प्रणालीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ग्रामपंचायतीचे दप्तर ऑनलाइन झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे तत्काळ मिळू शकतील. नागरी सेवा, पंचायत नोंदणी पुस्तक, पंचायत लेखे, स्थावर मालमत्तेची माहिती, जड वस्तू नोंद, सभा व्यवस्थापन, संकलित अहवाल व माहिती, मदत यांचा यात समावेश आह.

- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धामुरी येथे आग; कारखाना खाक

$
0
0

बायोकोल कारखाण्याला आग लांखोचे नुकसान

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील धामुरी येथील साखर कारखान्याजवळील श्रीराम बायोकोल कारखान्यास रविवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आग लागली. औरंगाबाद पालिकेचे दोन व बजाज कंपनीच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. मात्र, त्यासाठी आठ तास लागले. ही आग सुमारे पाच एकर क्षेत्रावर पसरली होती.

येथे मुक्तेश्वर साखर कारखान्यातील भुसा, पेरसमड, पाचट यापासून बायोकोल तयार केले जाते. या आगीत बायोकोल व त्यासाठी लागनारे साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी कारखान्यात कोणतीच यंत्रणा नसल्याने कामगारांची धावपळ झाली. परिसरात वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आग पसरत गेली. कारखान्याकडे पाणीसाठा कमी असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. आग विझवण्यासाठी कारखान्यात प्रशिक्षित कामगार हवेत, असे बजाज अग्निशमन दल अधिकारी शांताराम कदम यांनी सांगितले. विमा कंपनीचे अधिकारी रॉबट रोड्रिंक्स यांनी पाहणी केली. वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार, कॉन्स्टेबल विजयसिंग जारवाल, तात्याराव शिंदे, वडनरे, राजू वैष्णव, भाऊसाहेब खरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images