Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वादळ आले, शहरभर कचरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात शनिवारी सायंकाळी वादळवारे सुटले. वाऱ्याचा जोर इतका होती की रस्त्याच्या बाजूने साचलेले कचऱ्याचे ढीग कोसळले आणि कचरा वाऱ्याच्या वेगाने उडू लागला. कचऱ्यात प्लास्टिक आणि कॅरिबॅगचे प्रमाण अधिक असल्यामुळे बहुतेक रस्त्यांवर कॅरिबॅगचे अच्छादन असल्याचे चित्र होते.

१६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी निर्माण झाल्यामुळे कचराडेपोवरची कचरा वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यांच्या बाजूला, मोकळ्या जागांमध्ये पालिकेतर्फे कचरा साचवला जात आहे. कचऱ्याचे डोंगर तयार करून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. या प्रक्रियेमुळे कचऱ्याची दुर्गंधी नष्ट होते आणि कचऱ्याचे रुपांतर खतात होते असा दावा केला जात आहे. असे असले तरी रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे ढीग कायमच आहेत. शनिवारी सायंकाळी शहरात वादळवारे सुरू झाले. वादळाचा वेग इतका होता की वाहनचालकांना आपला जीव धोक्यात टाकून वाहने चालवावी लागली. काही फुटांपर्यंतचा रस्ता वादळामुळे उडालेल्या धुळीने झाकाळून गेला होता. त्यामुळे रस्त्यावर कोण कुठे आहे हे लक्षात येत नव्हते.

\Bरस्ते माखले

\Bधुळीबरोबर वादळवाऱ्यामुळे कचरा देखील उडाला. उडणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण इतके होते की रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येत होता. प्रमुख रस्ते कचऱ्याने माखून गेले होते. कचऱ्यावरचे संकट वादळावरच निभावले, पाऊस पडला असता किंवा गारपीट झाली असती तर संपूर्ण शहरात दुर्गंधी निर्माण झाली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन विविध घटनेत दोन महिलेचा विनयभंग

$
0
0

औरंगाबाद : छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध घटनेत दोन महिलांचा विनंयभंग झाल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

एका घटनेत सचिन तुपे व दोन महिलांनी आईला मारहाण केल्याचा आरोप करून एका महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत कैलास निकाळजे व दोन महिलांनी मागील भांडणाच्या कारणावरून घरात घसून ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी महिलेच्या मुलीचा विनंयभंग केला. या प्रकरणी तिघांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………

युवकाचे पलायन

औरंगाबाद : पाच एप्रिल रोजी १२ वाजेच्या सुमारास सीतानगर बजाजनगर येथे राहणाऱ्या संतोष नानासाहेब शिंदे यांच्या १७ वर्षीय मुलाला अज्ञातांनी फुस लावून पळवून लावले, अशी तक्रार वाळूज पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटार सायकल चोरी

औरंगाबाद : सुरेंद्र पन्नालाल गंगवाल (रा. ठाकरेनगर) यांनी आपली मोटार सायकल (एमएच २० बीबी ६५०२) एक एप्रिल रोजी घरासमोर एक एप्रिल रोजी उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती पळवून नेली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………

किरकोळ वादावरून मारहाण

औरंगाबाद : किरकोळ वादातून संतोष सुदाम बेठे (रा. मुकुंदवाडी) व त्यांच्या मुलास पाच एप्रिल रोजी राजू राठोड व अन्य तीन महिलांनी किरकोळ वादावरून शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………

\Bपादचाऱ्यास लुटले

\Bऔरंगाबाद : हिमायत बागेच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याजवळ पाच एप्रिल रोजी चारच्या दरम्यान राजेंद्र हिरालाल खंडेलवाल (रा. टीव्ही सेंटर, सिडको) येथे फिरण्यासाठी गेले असता या ठिकाणी जेवा, शेख बबला या दोघांनी खंडेलवाल यांना अडवले. त्यांच्या जवळील सात हजार रुपये, चार हजारांचा मोबाइल हिसकावून घेतला. याप्रकरणी दोघांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………

अर्भक फेकले

औरंगाबाद : सहा एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान सुभाषचंद्र बोसनगर, एन ११ हडको येथे अज्ञात व्यक्तीने महिला जातीचे नवजात अर्भक फेकले. या प्रकरणी दादाराव राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………………

एकाला मारहाण

औरंगाबाद : रोकडिया हनुमान कॉलनी येथे राहणाऱ्या काकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमास गेलेल्या अमित चंद्रकांत शहा हा पाळीव कुत्रा घेऊन परिसरात फिरत होता. यावेळी या कुत्र्याने एका कारवर घाण केली. त्यामुळे रोहन सरोदे याने अमित शहा व राजेंद्र शहा दोघांना चोप दिला. अमित शहाच्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई मेन्स आज

$
0
0

औरंगाबाद: राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन् परीक्षा रविवारी दोन सत्रात परीक्षा होणार असून शहरात १५ हजार १२० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)

आयआयटी, एनआयटीसंस्थामध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा शहरातील ३२ केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित रहायचे आहे. सकाळी ९.३० ते १२.३० दरम्यान पहिला पेपर तर, दुसऱ्या सत्रातील पेपर २ ते ५ या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्रात १२.४५ पासून प्रवेश असेल. विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा आज

औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे. औरंगाबाद केंद्रावरून १० हजार ७७७ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. शहरातील ३१ परीक्षा केंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली असून ३१ परीक्षा केंद्र आहेत. सकाळी १०.३० ते १ या वेळेत तर, दुसऱ्या सत्रातील ३ ते ५ या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायन्स यापैकी कोणतेही एक ओेळखपत्र व त्यांची छायांकीत प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये उशिराने प्रवेश दिला जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वाटपाच्या मुद्यावरून विशेष सभा बोलवावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता कोट्यवधींचे नियोजन केले आहे. निधी वाटपात अनेक सदस्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे निधीच्या नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी केली आहे.

यासंदर्भात दोन्ही पक्षांमधील काही सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना देण्यात येणार आहे.

या पत्रात म्हटले आहे, की जिल्हा परिषद बांधकाम विभाग विषय समितीने विविध लेखाशिर्षनिहाय जिल्हा रस्ते विकास आणि मजबुतीकरण अंतर्गत जवळपास ५० कोटींचे नियोजन केले आहे. मात्र, असे करताना लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतलेले नाही. तालुकानिहाय रस्त्यांची लांबी व रुंदी लक्षात घेऊनच नियोजन करणे क्रमप्राप्‍त होते, परंतु शासन निर्णयाचे उल्‍लंघन करून निधीचे नियोजन झालेले आहे. तसेच इतर लेखाशीर्ष गट क, ड, आणि जिल्हा परिषद उपकरातील कामांचेही अशोच प्रकारे नियोजन करून निधीची विल्हेवाट लावण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यक्षेत्रात एकही काम मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे. या कामांचे नियोजन करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, भाजप सदस्य एल. जी. गायकवाड, ज्योती चोरडिया, छाया अग्रवाल, रेखा नांदूरकर, उषा हिवाळे, मीनाताई गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ एप्रिलपूर्वी शिक्षकांचे वेतन करावे

$
0
0

औरंगाबाद: जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन १४ एप्रिलपूर्वी करावे, अशी मागणी महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन (मुप्टा) यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे केली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना जयंती उत्सव उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करता येवा यासाठी मार्च महिन्याचे वेतन १४ एप्रिल पूर्वी अदा करावे, अशी मागणी मुप्टाने केली आहे. निवेदनावर यावेळी गणपत जाधव, बबन वाकळे, कचरू बर्डे, संपत साबळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रियेसाठी २७ मशीनची निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या २७ मशीनच्या खरेदीची निविदा काढण्यात आली आहे. प्राप्त निविदा उघडण्याची तारीख २३ एप्रिल निश्चित असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मशीन प्राप्त होतील असे मानले जात आहे. एका झोन कार्यालय क्षेत्रात तीन मशीन ठेवण्यात येणार आहेत. पालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत.

शहरातीस कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने ८० कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. त्यातील दहा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून प्रत्येक झोन कार्यालयासाठी श्रेडिंग मशीन, बेलिंग मशीन आणि स्क्रिनींग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रेडींग मशीनचा उपयोग कटर सारखा केला जातो. बेलिंग मशीनच्या माध्यमातून सुक्या कचऱ्याच्या लाद्या तयार केल्या जातात. स्क्रिनींग मशीनच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात या तिन्हीही मशीन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मशीन्सच्या खरेदीसाठी तीन कोटी १६ लाख रुपयांच्या खर्चाला देखील मंजुरी दिली आहे. मशीन खरेदीबद्दलची पंधरा दिवसांच्या अल्पमुदतीची निविदा काढण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. खरेदीबद्दल इच्छुक पुरवठादाराबरोबर १३ एप्रिल रोजी प्रीबिड बैठक होणार आहे.

\Bबीडबायपासला सुका कचऱ्याचे केंद्र

\Bचिकलठाणा शिवारात दुग्धनगरीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध समुपदेशनाने नाहीसा करू आणि त्यांचे मन वळवू, अशी भूमिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे. सुका कचरा घेवून जाण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे चिकलठाणा, हर्सूल - सावंगी आणि बीडबायपास येथे सुका कचऱ्यासाठी केंद्र उभी करण्याची तयारी आयुक्तांनी दाखवल्याचे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’धोरणावर मंगळवारी बैठक

$
0
0

औरंगाबाद: समांतर जलवाहिनीसाठी नव्याने केल्या जाणाऱ्या कराराबद्दल धोरण ठरविण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी - पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत महापालिकेची भूमिका मांडलीजावी या उद्देशाने ही बैठक घेतली जाणार आहे.

समांतर जलवाहिनीचे काम एसएल ग्रुपच्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे करून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कंपनी आणि महापालिका यांच्यात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या बाहेर तडजोड करून त्याच कंपनीकडून काम करून घेण्याच्या दृष्टीने दोन - तीन वेळा अनौपचारिक बैठका देखील झाल्या. येत्या आठ - दहा दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात समांतर जलवाहिनीच्या नवीन कराराबद्दल चर्चा होऊन कराराचा मसुदा अंतिम केला जाणार आहे. कराराचा मसुदा तयार करण्याच्यादृष्टीने कंपनीने तयारी सुरू केली आहे. करारासंदर्भात महापालिकेचे देखील धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित अधिकारी व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. या बैठकीला आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम देखील उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पधरा हजारांची पर्स पळवली

$
0
0

औरंगाबाद: कासारी बाजार येथे पोत गोठविण्यासाठी गेलेल्या एका महिलेला थाप मारून तिचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली पॅर्स पळवून नेल्याचा प्रकार सिटीचौक भागात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालमंडी येथे राहणारी एक महिला सहा एप्रिल दुपारी साडेतीनच्या दरम्यान सेव्हन पीस व पन्नास सोन्याची मणी असलेली (किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये) पोत गोठवण्यास आल्या होत्या. या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती आले. सामाजिक कार्यकर्ता आहे. तुमचे दागिने सांभाळून ठेवा असे म्हणून त्यांच्याकडून वायरची पिशवी दिली. त्यात तुमचे दागिने सांभाळून ठेवा असे सांगितले. यावेळी दोघांनी पिशवी बदलून पंधरा हजारांचा गंडा घातला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणचे पितळ उघडे

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जोरदार सुटलेले वारे, पावसाच्या हलक्या सरीमुळे शनिवारी महावितरणची पोलखोल केली. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

मागील तीन महिन्यांपासून महावितरणचे कर्मचारी हे वीज बिल थकबाकी वसुलीच्या कामाला लागले होते. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेशी संबंधित कामे रेंगाळली आहेत. एक एप्रिलपासून या कामांकडे लक्ष देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र ते न झाल्याने वादळी वाऱ्याने महावितरणच्या कामाची पोलखोल केली. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा गायब झाला. कॅनॉट प्लेस येथे शिवा कॉर्नरसमोरील झाड रस्त्यामध्ये कोसळले. याशिवाय गारखेडा, सिडको एन ३, एन ४ या भागातही अशीच परिस्थिती होती. कांचनवाडी येथे वीजेचा पोल रस्त्यावर पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. उस्मानपुरा, क्रांतीचौक, समर्थनगर, रेल्वे स्टेशन, छावणी, या भागातला वीज पुरवठा अचानक गुल झाला. अनेक ठिकाणी चार ते पाच तासांपेक्षाही जास्त वेळ नागरिकांना अंधारात राहावे लागलं. वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करित होते. मात्र शहरातील अनेक ठिकाणी कंडक्टर फेल झाल्याने, तारांचे एकमेकाला घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

अघोषित भारनियमन

उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केले आहे. बीड बायपास, सातारा परिसर, देवळाई, शहानूरवाडी या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. संबंधित भागातील महावितरण कार्यालयात फोन केले असता, अनेकदा उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे महावितरणच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्मासाठी औरंगाबादमध्ये प्रचंड मोर्चा

$
0
0

औरंगाबाद :

महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्यात आले असून लिंगायत समाजातील ३५० जाती-पोटजातींमधील बांधवांनी आज औरंगाबादमध्ये प्रचंड मोर्चा काढला. मोर्चात औरंगाबादसह जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील लिंगायत व बसव प्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

लिंगायत धर्माला स्वतंत्रपणे शासनमान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे आयोजित व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर आणि परमपूज्य डॉ. माते महादेवी बेंगलेरू यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये समाजबांधवांसह राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. क्रांती चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. 'मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत', 'भारत देशा जय बसवेशा', 'एक लिंगायत, कोटी लिंगायत', 'लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे', 'समता नायक महात्मा बसवेश्वरांच्या विजय असो', अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून निघाला.

लिंगायत समाजाचा हा मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौक, अण्णाभाऊ साठे चौक येथून विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील मैदानावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चाच्यावतीने विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकूर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अल्पसंख्याक दर्जा हवाच!

लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमानी, मानवतावादी इतिहास आहे. मात्र त्याची माहिती लिंगायत बांधवाला नसल्यामुळे समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात मागे राहिला. म्हणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लिंगायत धर्माला शासनमान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी परमपूज्य डॉ. माते महादेवी बेंगलेरू यांनी केली. बौद्ध, जैन, ख्रिश्चन, इस्लाम, शीख या धर्मांना शासकीय मान्यता असल्यामुळे अल्पसंख्याकांसाठी असलेल्या सर्व वैज्ञानिक सवलती त्यांना मिळतात. परंतु १९५१ साली लिंगायत धर्माची शासकीय मान्यता रद्द केल्यामुळे लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्याकांसाठीच्या सवलती व हक्क मिळत नाहीत, हेच लिंगायत धर्मियांच्या सर्व समस्यांचे मूळ असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाचे खासगीकरण रोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रत्येकाला उच्च दर्जाचे शिक्षण देणे सरकारचे काम आहे, परंतु सरकार यापासून दूर जात शिक्षणाचे झपाट्याने खासगीकरण, बाजारीकरण करत आहे. खासगीकरण रोखण्यासाठी सर्वसमान्यांचा सरकारवर दबावगट असायला, असा सूर शिक्षण परिषदेत उपस्थितांच्या भाषणातून निघाला. यावेळी ५० शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेर्फे राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. सिडकोतील जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात हा सोहळा झाला. व्यासपीठावर आपच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन, ब्रिगेडियर सुधीर सावंत, स्वागताध्यक्ष विकास शिंदे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रदेश प्रवक्ता बाळासाहेब गरूड, कार्याध्यख राजेंद्र कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मेनन म्हणाल्या,'गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सरकारचे आहे, परंतु त्याला बगल देत शाळांचे खाजगीकरण वाढते आहे.'

ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले चांगले, 'गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. शिक्षणाचे खासगीकरण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.' व्यंकटराव जाधव म्हणाले, 'शिक्षणाबाबतची अनेक धोरणे शिक्षणाला मारक ठरत आहेत. बाजारीकरण करण्यापेक्षा चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा.'

यावेळी विकास शिंदे, गरूड, कानडे यांचेही भाषणे झाली. उपस्थितांच्या हस्ते ६३ जणांना विविध पुस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ५० शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यासह आरोग्यरत्न, कृषिरत्न, क्रीडारत्न पुरस्कार, समाजिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याला राज्यभरातील शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा लाख घनमीटर गाळउपसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धरणामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेच्या कामाचा मराठवाड्यात नुकताच प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी मंदगतीने काम होत होते, मात्र एप्रिलमध्ये कामांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सुरू असलेल्या १०८ प्रकल्पातील सहा लाख ४९ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुन्हा स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होण्याच्या दृष्टीने राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मराठवाड्यातही यंदाही विविध सदस्य संस्थांच्या माध्यमातून १२७७ ठिकाणी कामे करण्याचे नियोजन आहे. यातील सध्या १०८ ठिकाणांमध्ये काम सुरू करण्यात आले असून ३१५ कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात २३, जालना ५, परभणी १, नांदेड १०, बीड १६, हिंगोली ९, उस्मानाबाद जिल्ह्यात ३२ ठिकाणी, तर इतर ठिकाणी १२ कामे सुरू करण्यात आली आहेत. यातून साडेसहा लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यातील ३१५ ठिकाणी गाळ उपसा करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९०, जालना १०, परभणी २६, नांदेड २०, बीड ७०, हिंगोली १, उस्मानाबाद जिल्ह्यातील ९८ प्रकल्पांचा समावेश आहे.

\Bशेतकऱ्यांना मोफत गाळ

\B

धरणातील गाळ काढण्यासाठी शासनातर्फे १२ रुपये प्रति घनमीटर याप्रमाणे इंधन खर्च दिला जातो आहे, धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन दिला जात आहे. शेतकऱ्यांना केवळ वाहतूक खर्च अदा करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणगौर उत्सवानिमित्त मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ३० वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू ठेवताना महिलांनी माहेश्वरी संस्कृतीची झलक दाखवली. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने मानाची गणगौर मिरवणूक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष रेखा मालपाणी, सचिव छाया धूत,उषा जाजू, रेखा राठी, विजया तापडिया, शोभा बागला, अंजू बजाज, अंजू बलदवा उपस्थित होत्या. गुलमंडीतील महेश भवन ते राजाबाजारच्या बालाजी मंदिरापर्यंत बँडपथकासह मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेतील आठ महिलांनी गौर डोक्यावर घेतली होती. मार्गादरम्यान जागोजागी स्वागत करण्यात आले होते. बालाजी मंदिरात समाप्तीनंतर महिलांनी पारंपरिक घुमर नृत्य सादर केले. यावेळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत मनिषा जेठलिया, उज्ज्वला लखोटिया, सेजल खटोड विजेत्या ठरल्या. यावेळी प्रेमा असावा, अलका मालाणी, पुष्पा बाहेती, आभा नावंदर, सरोज बलदवा, मनिषा सोनी, सुनेत्रा हेडा उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तवाहिनीच्या जीवघेण्या आजारातून सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

७५ वर्षीय वृद्धाच्या थुंकीतून रक्त येत होते आणि छातीसह पाठदुखीच्या तीव्र वेदनांनी वृद्धाचा जीव तळमळत होता. रक्तदाबही खूप कमी झाला होता. सिटी स्कॅनमध्ये हृदयातून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीतील फुगा फुटण्याच्या मार्गावर असल्याचे व फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव सुरू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर विशिष्ट 'स्टेंट'द्वारे क्लिष्ट अँजिओप्लास्टी यशस्वी करून फुग्यातील रक्तप्रवाह कायमचा थांबवण्यात आला आणि वृद्धाची जीवघेण्या आजारातून 'एमजीएम'च्या डॉक्टरांनी मुक्तता केली.

नांदेड येथील रुग्णाच्या थंकीतून रक्त येत असल्याने तसेच तीव्र वेदनांमुळे त्याला आधी स्थानिक खासगी रुग्णालयात व नंतर औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिटी स्कॅनमध्ये हृदयातून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये फुगा तयार झाल्याचे व फुगा फुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे याच फुग्यातून फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव सुरू झाला होता व फुफ्फुसातूनच थुंकीमध्ये रक्त येत असल्याचे स्पष्ट झाले. हा फुगा फुटण्याच्या मार्गावर होता व फुगा फुटणे जीवघेणे ठरू शकत होते. त्यामुळे वेगळ्या प्रकारचा स्टेंट टाकून वेगळ्या प्रकारची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि फुग्याचा रक्तप्रवाह कायमचा बंद करण्यात आला. ही क्लिष्ट उपचार प्रक्रिया 'एमजीएम'मधील इंटरव्हेश्नल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत उदगिरे, इंटरव्हेश्नल रेडिओलॉजिस्ट डॉ. शिवाजी पोले, हृदय शल्यचिकित्सक डॉ. योगेश बेलापूरकर, भूलतज्ज्ञ डॉ. अजिता अन्नछत्रे यांच्या टीमने यशस्वी केली.

\Bलाखात सहाजणांना व्याधी

\B

या प्रकारच्या आजाराला 'एओर्टिक अन्युरिझम' असे म्हटले जाते आणि त्यावरील उपचार प्रक्रियेला 'एन्डोव्हॅस्क्युलर एओर्टिक स्टेंट ग्राफ्टिंग' असे म्हटले जाते. हा आजार रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे किंवा अनुवंशिक कारणांमुळे होऊ शकतो. एक लाख सर्वसाधारण व्यक्तींमागे सहा जणांना, तर एक हजार हृदयरोगींमागे एक ते दोन व्यक्तींना हा आजार असू शकतो. पुणे-मुंबईमध्ये किंवा महानगरांमध्ये याच शस्त्रक्रियेसाठी १० ते १२ लाखांचा खर्च येतो; परंतु 'एमजीएम'मध्ये पाच लाखांचा खर्च आला, असेही डॉ. उदगिरे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\B'जनआरोग्य'मध्ये समावेश नाहीच\B

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये या आजाराचा समावेश नाही. या आजारामध्ये वेगळ्या आकाराच्या 'स्टेंट'ची गरज असते आणि बऱ्याचदा तो तयार करुन घ्यावा लागतो. त्यामुळे या अँजिओप्लास्टीला जास्त खर्च येतो. मात्र यात रुग्णावर लवकरात लवकर उपचार झाले नाही तर रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही डॉ. उदगिरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक पोलिस आयुक्त थोरात यांचा महाराष्ट्र बँकेतर्फे सत्कार

$
0
0

औरंगाबाद: बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांचा सत्कार करण्यात आला. थोरात यांना राष्टपती पदक मिळाल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले. बँकेच्या शाखाधिकारी निता शिंदे यांनी हा सत्कार केला. यावेळी बँकेचे उपमहाव्यवस्थापक अक्षय नरवडे, सुरक्षारक्षक विवेक चौबे, वर्षा पाथरकर, विजय तुळशी, नारायण पवार, मनोज जाधव व सुरेश सुपेकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात दोन वर्षे रस्ते दुरुस्तीची

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन वर्षांचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ५० हजार किलोमीटचे रस्ते सुदृढ करण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद टप्प्याटप्प्यांने करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

पाटील म्हणाले,'राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. राज्यातील ५० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीबद्दल ठरविले जाईल. साधारणपणे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येईल. अर्थसंकल्पातून यासाठी तरतूद करण्यात येणार असून दोन वर्षांत ही कामे अपेक्षित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील.'

हायब्रिड अॅन्यूटीअंतर्गत दहा हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात तयार करण्यात येतील. प्रतिकिलोमीटर तीन कोटी रुपये रस्ता बांधणीसाठी खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार ३० हजार कोटी रुपये या योजनेंतर्गत खर्च होतील. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मान्यता दिली आहे. हायब्रिड अॅन्यूटीअंतर्गत निवडलेल्या रस्त्यांचे पॅकेज ज्या कंत्राटदाराला वितरित होईल. कंत्राटदाराला रस्ते बांधणीची रक्कम द्यावी लागेल. त्याचा परतावा राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्यांने दिला जाईल. एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम ही दोन वर्षांत तर उर्वरित ४० टक्के रक्कम पुढच्या दहा वर्षांत दिली जाईल. हायब्रिड अॅन्यूटीअंतर्गत रस्त्यांचे पॅकेज तयार केले आहेत. काही पॅकेजसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्याच्या मंजुरीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

……

\Bतिहेरी रस्ता दुरुस्ती

\Bहायब्रिड अॅन्यूटीअंतर्गत तीनपदरी रस्ते बनविले जातील. सद्यस्थितीत रस्त्यालगत असलेल्या साईडपट्ट्यांपर्यंत रस्ता विस्तारित केला जाईल. जेणेकरून जमीन संपादनाची आवश्यकता भासणार नाही. एरव्ही रस्ता रुंदीकरण करताना जमीन संपादनाचा मुद्दा अडचणीचा ठरतो. त्यात जमीन संपादनाचा मावेजा द्यावा लागतो. या योजनेंतर्गत सरकारवर आर्थिक बोजा पडणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत मोर्चा फोटो कॅप्शन

$
0
0

-लिंगायत समाजाचा मोर्चा झाल्यानंतर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली.

-क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चात रथावर आरूढ झालेले धर्मगुरू.

-मोर्च्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

- विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवकांनी छत्र्या उघडून धर्मगुरूंना सावली करून दिली.

-विभागीय आयुक्तालय व क्रांती चौक या दोन्ही ठिकाणी धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य व इतर धर्मगुरूंकडून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजा करण्यात आली.

- क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीची फेरपरीक्षा ११ एप्रिलपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने(बाटू) अभियांत्रिकीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. ११ ते १३ एप्रिलदरम्यान ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. प्रथम सत्रात २४ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिनाभरात फेरपरीक्षेची सुविधा विद्यापीठाकडन उपलब्ध करून दिली जाते.

विद्यापीठातर्फे डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील अभियांत्रिकी कॉलेज यंदा प्रथमच 'बाटू'शी संलग्न झाले आहेत. त्यानंतर पहिल्यांदा घेण्यात आलेल्या परीक्षांच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत घेण्यात आल्या; तसेच उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली. विभागीय पातळीवर उत्तरपत्रिका तपासणी केंद्र देण्यात आले होते. औरंगाबाद विभागातून अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा ६०+४० पॅर्टननुसार घेण्यात आली. पहिल्या सत्राचा बहुतांशी कॉलेजांचे निकाल ३५ टक्क्यांच्या आतमध्येच आहेत. एकूण २४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६० गुणांसाठीच्या पेपर नंतरही निकालाची टक्केवारी ३०च्यामध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नता होती तेव्हाही पहिल्या सत्राचा निकाल जास्त असे. 'बाटू'ची परीक्षा पद्धती, उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता असल्याने निकालाचा टक्का घसरल्याचीही चर्चा आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिनाभरात परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यास पुढिल वर्षात प्रवेशाची संधी मिळते.

\Bमहिनाभरात फेर परीक्षा\B

दहावी, बारावी, स्वायत्त संस्थांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात फेरपरीक्षा होत आहे. ११ ते १३ एप्रिलदरम्यान ही परीक्षा होणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून दोन सत्रात परीक्षा होणार आहे. सकाळी १० ते ११ व सायंकाळी ४.३० ते ५.३० अशा वेळेत परीक्षा होणार आहे. औरंगाबाद विभागातून दहा कॉलेजांनी 'बाटू'शी संलग्नीकरण स्विकारलेले आहे.

- परीक्षा… ११, १२, १३ एप्रिल

- सकाळचे सत्र : सकाली ते ११

- दुपारचे सत्र : दुपारी ४.३० ते ५.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई परीक्षेला १५ हजार विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा रविवारी (आठ एप्रिल) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आली. औरंगाबाद केंद्राहून १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रसायनशास्त्रात 'ऑरगॅनिक', भौतिकशास्त्रात 'मॉर्डन'वर आधारित प्रश्न अधिक होते, असे विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले.

आयआयटी, एनआयटीसंस्थामध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा शहरातील ३२ केंद्रावर घेण्यात आली. १५ हजार १२० विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. सकाळी सातपासून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात उपस्थित राहत होते. विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूचनांचा भडिमार आणि वेळेचे नियोजन करता करता विद्यार्थी, पालकांची तारांबळ उडाली. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उशिराने आल्याने त्यांना प्रवेश दिला गेला नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या चार-पाच होती. पहिल्या सत्रातील पेपर सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा यादरम्यान, तर दुसऱ्या सत्रातील पेपर दुपारी दोन ते पाच या वेळेत झाला. पहिला पेपर अभियांत्रिकी, तर दुसरा पेपर आर्किटेक्ट अभ्यासक्रमासाठी होता. लेखी (पेन व पेपर बेस्ड) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विविध सूचना प्रवेशपत्रावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले.

\B१५, १६ रोजी 'ऑनलाइन'

\Bलेखी परीक्षेनंतर १५ व १६ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या मुख्य परीक्षेतून दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात. या परीक्षेची उत्तरसूची २४ ते २७ एप्रिलदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेचा निकाल ३० व ३१ मे रोजी जाहीर होईल. मराठवाड्यात यंदा लेखीसह ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.

\Bमराठवाड्यातील परीक्षा केंद्र वाढली\B

जेईई मेन् परीक्षा रविवारी होत आहे. लेखी परीक्षा देशभरातील ११२ शहरांतून परीक्षा झाली. ऑनलाइन परीक्षा १५ व १६ एप्रिल होणार आहे. ही परीक्षा देशभरातील २५८ शहरांमधून होणार आहे. लेखी परीक्षेसाठी औरंगाबाद परीक्षा केंद्र आहे, तर ऑनलाइन परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबादसह परभणी, नांदेड, लातूर आणि बीड ही केंद्रे आहेत.

प्रश्नपत्रिका तशी अवघड होती. पेपर चांगला सोडविता आला, वेळ पुरला. केमिस्ट्रीत 'ऑरगॅनिक केमिस्ट्री', फिजिक्समध्ये 'मॉर्डन'वर आधारित प्रश्नांची संख्या अधिक होती.

- मानस पुरंदरे, परीक्षार्थी

जेईईमध्ये प्रश्नपत्रिकेत तार्किकवर आधारित प्रश्नांचा भरणा होता. प्रश्नपत्रिकेत काही ठराविक प्रश्नांची संख्या जास्तीची होती जसे की, गणिताच्या प्रश्नपत्रिकेत भूमितीशी संबधित प्रश्न अधिक होते. त्यामुळे भारमान (वेटेज) एका भागाला अधिक आहे, असे वाटले.

- देवश्री रॉय, परीक्षार्थी

प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी उच्च नव्हती. सर्वसाधारण प्रश्नांना वेटेज होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला असेल, असे वाटत नाही. त्यामुळे निकाल चांगला असेल.

- प्रा. धनंजय काळे, रसायनशास्त्र विषयतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्वालिटी सर्कल स्पर्धेमध्ये सृष्टी इंजिनीरिंग, गॅब्रिएल विजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या (क्यूसीएफआय) औरंगाबाद शाखेतर्फे आयोजित औद्योगिक सुरक्षाविषयक सादरीकरणाच्या स्पर्धेमध्ये मशीन गटात सृष्टी इंजिनीरिंग, औरंगाबाद तर 'मॅन' गटामध्ये नाशिकच्या गॅब्रिएल ऑटो यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उपविजेत्यात मशीन विभागात व्हेरॉक प्लांट एक तर 'मॅन' गटात बडवे प्लांट दोन, तृतीय क्रमांक मशीन गटात गुड इयर, औरंगाबाद आणि 'मॅन' गटात संजीव ऑटो, औरंगाबाद यांनी पटकावला.

'क्यूसीएफआय'च्या औरंगाबाद शाखेतर्फे महात्मा गांधी मिशनच्या आईन्स्टाईन सभागृहात आयोजित या सादरीकरण स्पर्धेचे उदघाटन औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक राम दहिफळे यांच्या हस्ते झाले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुरक्षा ही अनिवार्य असल्याने आपल्या जीवनाबरोबरच कार्यक्षेत्रातही सुरक्षेबाबत जागरूक असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. संभाव्य अपघात टाळण्याकरिता नियम आणि कार्यपद्धती यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. आपल्यामध्ये थोडासा बदल केला, कार्यपद्धती चांगली ठेवली, शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर अपघात नक्कीच टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. 'क्यूसीएफआय'चे औरंगाबाद शाखा अध्यक्ष नितीन किनगावकर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग नोंदविला. औद्योगिक सुरक्षा यात मशीन आणि माणूस असे दोन गट करण्यात आले होते. त्या अनुषंगाने झालेल्या सादरीकरणाचे परीक्षण अनिल ढसाळ, विकास चाटसे आणि सुदर्शन सांगळे यांनी परीक्षण केले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण बागला ग्रुपचे सोमन मजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र जोशी, सचिव मंगलदास चोरगे, कोषाध्यक्ष विलास चेके, सहसचिव अमोल गिरमे, सलील पेंडसे, मदन राजपूत, महेंद्र वानखेडे, सुधीर पाटील, विजय अडलक, महेश सेवलीकर यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images