Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रोज पाणी देऊन पाणीपट्टी कमी करा

$
0
0

औरंगाबाद: समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी सरकारने आणखी १०० कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. तेव्हा अगोदर लवकरात लवकर काम पूर्ण करा. शहरतील प्रत्येक घराला रोज पाणी द्या. नागरिकांना कमीत कमी पाणीपट्टीचा बोजा टाका. कारण पाणी पुरवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, अशी मागणी शहरवासीयांनी 'मटा'शी बोलताना केली.

जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा असला तरी शहरवासींयाना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. अनेक नवीन वसाहतींना पाणी दिले जात नाही. हे अयोग्य आहे. सर्वांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत.

- अलका बडवणे

नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी सरकारने याआधीही पैसे दिलेले आहेत. आता पुन्हा देऊ केल्याचे वृत्त आहे, पण काम सुरू होऊन केव्हा संपणार आणि पुरेसे पाणी केव्हा मिळणार हाच खरा प्रश्न आहे. लोकांना परवडले या दराने पाणी मिळाले पाहिजे.

- मनीषा चौधरी

पाणी पुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही चार चार दिवसआड पाणी मिळते. ही चांगली बाब नाही. राजकारण न करता लोकांना नियमित व पुरेसे पाणी कसे दिले जाईल, याचा विचार व्हायला पाहिजे. अन्यथा पालिका काय कामाची.

- विकास कापसे

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला केव्हा सुरुवात होणार हाच खरा प्रश्न आहे. यापूर्वीही सरकारने निधी दिला, मात्र काम सुरू झाले नाही. किमान आतातरी तातडीने काम सुरू झाले पाहिजे. लोकांवर अतिरिक्त बोजा पडणार नाही याची काळजी घ्यावी.

- योगेश साबळे

पाणीपुरवठा योजनेचे काम ठराविक कंपनीने करावे असे प्रयत्न का होत आहेत? त्या कंपनीला फायदा व्हावा, हाच त्यामागील हेतू तर नाही ना, अशी शंका येते. हे काम सरकारी एजन्सीमार्फत करा. नागरिकांना कमीत कमी पाणीपट्टी आकारा म्हणजे झाले.

- प्रतीक गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार

$
0
0

औरंगाबाद : बँक परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा रविवारी (१५ एप्रिल) सत्कार करण्यात येणार आहे. शुभम सर अकादमीच्या वतीने यशप्राप्त विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तापडिया नाट्यमंदिर येथे सत्कार करण्यात येईल. यशप्राप्त केलेले विद्यार्थी बँक व अन्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तास ज्ञानयज्ञातून प्रज्ञासूर्याला अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन' व बीपीएमटी विभागाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच बीपीएमटी अभ्यासक्रमाच्या ८० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (१३ एप्रिल) सकाळी सात ते सायंकाळी सात असा अखंड १२ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'मायक्रोबायोलॉजी लेक्चर हॉल'मध्ये हा अनोख्या अभिवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजाजन सुरवाडे, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. राजश्री सोनवणे, डॉ. प्रभा खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त हॉलमध्ये सर्व वृत्तपत्रेही उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रांसह क्रमिक पुस्तकांचा अखंड अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अनोख्या अभिवादनाची संकल्पना डॉ. राजश्री सोनवणे यांनी मांडली आणि विद्यार्थ्यांनी ती संकल्पना तडीस नेली.

विद्यार्थ्यांना राज्य घटनेची प्रत

या अभिवादन कार्यक्रमाच्या समारोपाला उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय राज्य घटनेच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची महाविद्यालयात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या तीन घटनांत लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीच्या विविध तीन घटनांत चोरांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला. हे प्रकार नक्षत्रवाडी, पडेगाव व उत्तरानगरी येथे घडले. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरीची पहिली घटना पडेगाव अन्सार कॉलनी भागात २६ मार्च ते १२ एप्रिलच्या दरम्यान घडली. येथील आरीफखान दाऊदखान (वय २६, रा. अन्सार कॉलनी) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून ३० हजारांचे सोन्याचे दागिने व ३० हजारांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शेख वहीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्ष मिरधे हे करत आहेत. दुसरी घटना गुरुवारी दुपारी बारा ते पाच वाजेच्या दरम्यान नक्षत्रवाडीतील साईश्रद्धा इनक्ल्यु अपार्टमेंट येथे घडली. येथील सिद्धेश्वर सुकदेव भुमकर (वय २९) हे पत्नीसह नोकरीला गेले होते. या दरम्यान, चोरांनी घराचे कुलूप तोडून रोख दहा हजार व दागिने, असा पंधरा हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी चोरी मंगळवारी रात्री उत्तरानगर येथील एका बांधकाम साइटवर झाली. येथून ११ हजार रुपये किंमतीच्या लोखंडी सळया चोरीस गेल्या. या प्रकरणी दत्ता ढगे (वय २८, रा. गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएनईसी गेट परीक्षेत २९ विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) २९ विद्यार्थ्यांनी गेट परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यातील नोकरीसाठी ही अत्यंत महत्वाची परीक्षा मानली जाते. सत्कारमूर्ती काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले.

अभ्यासातील सुसंगतपणामुळे मला यश मिळाले आहे. असे मेकॅनिकलच्या सौरभ खैरनार याने सांगितले. तर कम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंगच्या रुचिका राजपाल हिने त्या त्या विद्या शाखेतील तांत्रिक विषयातील मूलभूत संकल्पनाचे ज्ञान समजून घेत पूर्ण अभ्यासक्रमांचा अभ्यास न करता महत्वाच्या विषयावर भर द्यावा, असे सांगितले. महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रताप बोराडे, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. विजया मुसंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिकारी डॉ. अभय कुलकर्णी, सिव्हिल इंजिनीरिंगच्या शाखा प्रमुख डॉ. संगीता शिंदे, डॉ. शुद्धशील घोष यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. रश्मी भोयर यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ तांबे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशक्त कैद्यांची सुटका; महानिरीक्षकांनी निर्णय घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारागृहातील अशक्त कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी राज्य सरकारच्या १० जानेवारी २००६ शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ६५ वर्षांवरील अशक्त पुरुष कैदी आणि ६० वर्षांच्यावरील अशक्त महिला कैद्यांच्या सुटकेसाठी कारागृह महानिरीक्षकांनी निर्णय घ्यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. विभा कंकनवाडी यांनी दिले.

राज्यातील कारागृहातील ६५ वर्षांवरील अशक्त पुरुष व ६० वर्षांवरील अशक्त महिलांना शिक्षेच्या मुदतीपूर्व सोडण्याची तरतूद राज्यसरकारने केली आहे. यासाठी १० जानेवारी २००६ रोजी गृह विभागाने अध्यादेशही काढलेला आहे. यानुसार प्रत्येक न्यायालयाच्या अंतर्गत वैद्यकीय समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कारागृह अधीक्षक आणि वरिष्ठ कारागृह अधिकारी अशा पाच जणांची समिती बैठक घेऊन अशक्त कैद्यांचा आढावा घेईल, त्यानंतर सरकारच्या अध्यादेशानुसार पात्र असलेल्या कैद्यांचा अहवाल सरकारला पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर अशक्त कैद्यांना मुदतपूर्व सोडण्याचे आदेश देते. असे असतानाही शासनाकडून कार्यवाही होत नसल्याने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील बंदी अंबरीश श्रीपादराव पाटील यांनी खंडपीठात अॅड. रुपेश जैस्वाल यांच्या मार्फत याचिका दाखल केली. याचिकेनुसार त्यांचे वय ६६ वर्ष असून, ते शारीरीकदृष्ट्या दुर्बल व अशक्त आहेत. त्यामुळे मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. याचिकेच्या सुनावणीनंतर कारागृह महानिरीक्षकांनी वैद्यकीय समित्या स्थापन कराव्यात, समितीच्या तीन महिन्यातून एकदा व वर्षातून चार वेळा बैठका घेऊन अशक्त कैद्यांना मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व पात्र असेल्या कैद्यांच्या मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश देऊन खंडपीठाने याचिका निकाली काढली.

\Bराज्यात २८ कारागृहे

\B

राज्यात २८ जिल्हा कारागृह, शंभर उपजिल्हा कारागृह आणि दहा खुले कारागृह आहेत. प्रत्येक कारागृहात पाच ते दहा टक्के कैदी अशक्त असून, खंडपीठाच्या निर्णयाने सर्वच कारागृहातील वयोवृद्ध अशक्त कैद्यांच्या संदर्भात आढावा घेणे बंधनकारक असल्याची माहिती अॅड. रुपेश जैस्वाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी जोड

$
0
0

-महाबोधी बुद्धविहार व भीम गर्जना उत्सव समितीतर्फे अभिवादन

स्थळ : कोकणवाडी, क्रांतीनगर

वेळ : सकाळी ९

-ऑल इंडिया एससी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे अभिवादन

स्थळ : रेल्वे स्टेशन परिसर

वेळ : सकाळी १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगल, यू ट्यूबवरदेशाची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोशल मीडियावरील गुगल व यू ट्यूबवर भारत देशाची बदनामी करणारी व्हिडियो क्लिप अपलोड केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ही क्लिप काढून सबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युथ स्टार फाउंडेशनने पोलिस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गुगल वेबसाइटवर 'नमक हराम देश' असे 'सर्च' केल्यास भारत देशाचा नकाशा व यू ट्यूबवर यासंदर्भात एक क्लिप दिसून येते. क्लिप टाकणाऱ्या व्यक्तीने 'नमक हराम' चित्रपटावरून कदाचित 'नमक हराम देश' असे म्हणत असल्याचे क्लिपमध्ये दिसून येते. हा प्रकार देशाची ही बदनामी करणारा असल्याचा आरोप यूथ स्टार संघटनेने केला आहे. हा प्रकार रोखण्यात यावा व सबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देताना यूथ स्टार फाउंडेशनचे आकाश पोळ पाटील, शिवराज शिंदे पाटील, कार्तिक रोठे, गणेश गायकवाड, गिरीश पोपळघट, आशीष बेदारकर, तनय न्यायधीश व मच्छिंद्र बोरूडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. आंबेडकर जयंतीदिनी सुटीसाठी स्वाक्षरी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी संपूर्ण भारतातील शासकीय, निमशासकीय; तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, या मागणीसाठी सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक व सामाजिक कार्यकर्ते जयेश मोरे यांनी नागसेनवन परिसरात शुक्रवारी स्वाक्षरी मोहीम राबवली. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सरकारी दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांची भेट शिष्टमंडळ घेणार असल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद केले. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाही. परिणामी, जयंती उत्सवामध्ये अनुयायी सहभागी होऊ शकत नाहीत, असेही जयेश मोरे यांनी सांगून जयंतीदिनी कायमस्वरुपी राष्ट्रीय सुट्टी घोषित झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिस्ट्री सोसायटीचा हेरिटेज वॉक रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठणी, हिमरू आणि बिदरी या तीन कलांना औरंगाबादच्या इतिहासात अढळ स्थान आहे. या तिन्ही हस्तकलांचा इतिहास आणि निर्मितीतंत्र जाणून घेण्याची संधी रविवारी (१५ एप्रिल) इतिहासप्रेमी नागरिकांना मिळणार आहे. निमित्त आहे हेरिटेज वॉकचे.

सातवाहनपूर्व काळापासून जगभर प्रसिद्ध असलेले महावस्त्र पैठणी, महंमद तुघलकाने दिल्लीहून आणलेल्या राजधानीबरोबरच वारसा म्हणून आलेले आणि इथलेच झालेले हिमरू विणकाम, पर्शियात उगम पावून बहामनी कालखंडात नावारुपाला आलेली बिदरी कला औरंगाबादेत अजूनही पाळेमुळे टिकवून आहे. या कलांना जाणून घेण्यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे रविवारी सकाळी सात ते दहा या वेळेत हिमायतबाग चौकातील हिमरू फॅक्टरी येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी या कलाप्रकारांच्या समृद्ध वारशाची माहिती देतील. इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या सचिव डॉ. बिना सेंगर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवन विकास’मध्ये बालकथामाला

$
0
0

औरंगाबाद: जीवन विकास ग्रंथालयाच्या बालकक्षात १४ एप्रिल ते २० या काळात जीवन विकास ग्रंथालय व अपना क्लब संस्कार प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 'बालकथामाला' घेतली जाणार आहे. या कथामालेत संदीप टेपाळे, यशोधरा काळे, डॉ. अपर्णा सराफ, प्रा. लीला शिंदे, डॉ. चंद्रज्योती मुळे, डॉ. वृंदा देशपांडे, संदीप जगताप हे बालकांना कथा सांगतील. संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कथामालेचा लाभ घेण्यासाठी संगीता मंडलिक, निलीमा बालेकर यांच्याशी बालकक्षात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उजळत्या दिशा’ पुस्तकाचे प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद: साहित्याची सेवा ही अंतर्मनातून करण्याची इच्छा असते तेव्हाच ती लेखणीतून व्यक्त होते, अशा दर्जेदार साहित्यात 'उजळत्या दिशा' या पुस्तकाचा समावेश होतो, असे प्रतिपादन प्रा. रमेश कुलकर्णी यांनी केले. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष आर. पी. दुसे लिखित या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रमेश दारव्हेकर, प्रभाकर सुभेदार, डॉ. शाम जावळीकर, व्ही. टी. चिकिरअप्पा उपस्थित होते. शाम जावळीकर, शैलजा देशपांडे, स्मिता कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. पुस्तकाला रजनी देशपांडे यांची प्रस्तावना आहे. रमेश दारव्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश दुसे व शाम जावळीकर यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी जोड १

$
0
0

- सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन सभा

स्थळ : डॉ. आंबेडकर पुतळा, भडकल गेट

वेळ : सकाळी ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली इच्छुक शिक्षकांचा सोमवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारने यंदा कुठल्याही दबावात न येता न्याय मिळवून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी, शैक्षणिक सत्र संपल्यानंतर लगेचच बदली आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी बदली इच्छुक शिक्षकांचा सोमवारी (१६ एप्रिल) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रक्रिया पाच एप्रिलपासून सुरू झाली आहे. या शासननिर्णयाने वर्षानुवर्षे दुर्गम भागात सेवेत असलेल्या, अपंग, गंभीर आजारी, विधवा, सेवाजेष्ठ असलेल्या,एकमेकांपासून दूर अंतरावर सेवेत असलेल्या पती पत्नींना एकत्र येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात शिक्षकांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की वर्षानुवर्षे सोप्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदली होण्याची भीती आहे, त्यामुळे काही शिक्षक संघटना विरोध करत आहेत. पण प्रशासनाने कुणाच्या दबावात न येता बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी एक ते तीन या वेळेत बदली समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात सरकारच्या बदली धोरणाच्या समर्थनार्थ शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समन्वयक महेश लबडे यांनी केले आहे. निवेदन देताना पांडुरंग गोर्डे, रामेश्वर गायकवाड,प्रदीप मोरे,नारायण बहिर,संभाजी पाटील,नितीन जावळे,विजय अणदुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी सहकारनगर भागात घडला होता. याप्रकरणी विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवकासह चौघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज शांतीलाल खाकोरडिया (वय ५७ रा. श्रीकृष्णनगर) हे शिवसेनेचे सिटीचौक वॉर्डाचे माजी नगरसेवक आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी सहकारनगर चौकात दोन गटात वाद झाला होता. यावेळी तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी धीरज खाकोरडिया यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांना चौघांनी हॉकी स्टिक, बॅट, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच या भांडणात खाकोरडिया यांची सोन्याची साखळी गहाळ झाली होती. या प्रकरणी खाकोरडिया यांची तक्रार जवाहरनगर पोलिसांनी दाखल करून घेतली नसल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश जवाहरनगर पोलिसांना दिले आहेत. या आदेशानुसार गुरुवारी संशयित आरोपी तनवीरसिंग राजपूत, शेख नाजेर (दोघे रा. सातारा), विक्रांत गढवे व जंजाळ नावाच्या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर जखमी करणे तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे तपास करीत आहेत.

\Bखकोरडियावरही गुन्हा \B

याच प्रकरणात ३ मार्च रोजी तनवीरसिंग राजपूत याने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलो असता चौघांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीत आरोपी म्हणून धीरज खाकोरडिया, सनी खाकोरडिया, भरत मेहता व विनोद भोज्जया यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी कार्यालयात पंधरा लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पंधरा लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संस्थाचालकाने कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने जुलै २०१५ ते मे २०१६ या कालावधीत हा प्रकार केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील दिलीप नारायण खोकले (वय ३२, रा. एन ८, हडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये जाणता राजा संस्थेचे अध्यक्ष अंगद जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिल्याचे व रोजगार उपलब्ध करून दिल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयात सादर केले. यानंतर कार्यालयातील कर्मचारी एस. आर. बारसे व आर. के. घोगरे यांनी हे प्रमाणपत्र खरे आहे का नाही, तसेच प्रशिक्षणार्थीना रोजगार मिळाला का नाही, याची सखोल चौकशी केली नाही. संस्थचालकासोबत संगनमत करून त्यांनी खोटा अहवाल सादर करीत शासनाची पंधरा लाखांची फसवणूक केली, अशी तक्रार आहे. खोकले यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अंगद जाधव, एस. आर. बारसे व आर. के. घोगरे यांच्या विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक ए. के. मोरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींची ठेव योजना गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुलीच्या जन्माचे स्वागत करा', 'बेटी बचाओ - बेटी पढाओ' अशा संकल्पना घेऊन राज्य आणि केंद्र सरकार काम करीत असताना महापालिका मात्र मुलींच्या जन्माबद्दल उदासीन असल्याचे चित्र आहे. मुलींच्या नावे जाहीर करण्यात आलेली स्व. मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा योजना अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे बंद पडल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. महापालिकेत शिवसेनेचा महापौर असताना ठाकरेंच्या नावची योजना बंद पडल्यामुळे संपात व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या दवाखान्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे २० हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवण्यासाठी २०१३-१४ यावर्षी महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालीन सभापती प्राजक्ता भाले यांनी स्व. मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेचे लोकार्पण २०१४-१५मध्ये करण्यात आले. दोन वर्षांत ६७ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर ही योजना बंद पडली. अर्थसंकल्पात तरतूद असताना देखील पालिकेच्या प्रशासनातर्फे योजना चालवण्यात आली नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून या योजनेचा लाभ देण्यात आला नाही.

बंद पडलेल्या या योजनेबद्दल नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न विचारला. आर्थिक तरतूद असताना ही योजना का बंद पाडली, असा सवाल त्यांनी केला. सभापती गजानन बारवाल यांनी या बद्दल उपायुक्त रवींद्र निकम यांना खुलासा करण्यास सांगितले. निकम म्हणाले, महिला बालकल्याण समितीच्या कारभाराची सूत्रे आताच माझ्याकडे आली आहेत, त्यामुळे मला याबद्दल काही सांगता येणार नाही. आरोग्य विभागाशी या योजनेचा संबंध आहे. सभापतींनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांना खुलासा करण्यास सांगितले. डॉ. पाडळकर म्हणाल्या, 'ती योजना महिला-बालकल्याण समितीच्या मार्फतच राबवली जाते. महापालिकेच्या दवाखान्यात किती मुलींचा जन्म झाला याची माहिती महिला बालकल्याण समितीला देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. सध्या ती योजना कार्यरत नाही.'

यावर शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, 'कन्या सुरक्षा योजना ही एकमेव योजना अशी आहे की ज्यामुळे राज्यस्तरावर महापालिकेचे कौतुक झाले. शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी या योजनेचा विशेष उल्लेख केला होता. असे असताना एक चांगली योजना बंद करण्याचे कारस्थान केले जात आहे. या योजनेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करा.'

प्रशासनाला आदेश देताना सभापती गजानन बारवाल म्हणाले, कन्या सुरक्षा योजना सुरू ठेवा, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद केली जाईल.

स्वच्छतागृहांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावा, असे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी पालिका प्रशासनाला दिले. महिलांच्या स्वच्छतागृहात पुरूष जातात, त्या ठिकाणी गलिच्छ शब्दात मजकूर लिहिला जातो. स्वच्छतागृहात कोण जाते यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही, असा मुद्दा नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी उपस्थित केला होता. सुरक्षेच्या दृष्टीने आवस्यक ती उपाययोजना करा असी मागणी त्यांनी केली, त्यावर सभापतींनी हे आदेश दिले. महिलांच्या स्वच्छतागृहात पुरूष जात असल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरूच

$
0
0

औरंगाबाद: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 'एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स' विरोधात, तसेच प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन बुधवारपासून पुकारण्यात आले आहे. शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारपासून आंदोलन पुन्हा सुरू होणार आहे. तीन दिवसांत विविध पक्ष संघटनाच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. मान्य होईपर्यंत कामबंद सुरूच राहील, असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा सुरडकर, कार्याध्यक्ष चंदन गणोरे, महिला कार्याध्यक्ष डॉ. सविता तांबे, कोषाध्यक्षा डॉ. रवींद्र बोर्डे, सचिव संदीप पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी

$
0
0

कन्नड: विनयभंगप्रकरणी आरोपी साहेबु महेमुद तडवी (रा. वडोद भिल्ल) यास कन्नड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. आर. ठाकूर यांनी सहा महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या आरोपीविरुद्ध १६ नोव्हेंबर २००८ रोजी पिशोर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास बीट जमादार डी. बी. इंगळे यांनी केला. सरकारी पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीस सहा महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंड भरल्यास ती रक्कम भरपाईपोटी फिर्यादीस द्यावे, असा आदेश दिला आहे. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. आर. कुर्लेकर यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून हेडकॉन्स्टेबल आर. एस. आपटे व कर्मचारी एस. डी. सुरवाडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धेस लुटणारा आरोपी जेरबंद

$
0
0

फुलंब्री: तालुक्यातील सुलतानवाडी येथील ९० वर्षीय महिला शारजाबाई गोविंदा चित्रक यांना ६ एप्रिल रोजी लुटणाऱ्या संशयित आरोपीला वडोद बाजार पोलिसांनी अटक केली आहे. संतोष लक्ष्मण डकले (वय २४, रा. डोंगरगाव कवाड ता. फुलंब्री), असे त्याचे नाव आहे. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक विवेक जाधव, संजय भोसले, विनोद तांगडे यांनी पकडले.

शारजाबाई चित्रक या दुपारी सुलतानवाडी येथे जाण्यासाठी पाथ्री येथे थांबल्या असता एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने त्यांना मी तिकडेच जात आहे, गावात सोडतो, अशी थाप मारून मोटारसायकलवरून नेले होते. डोंगरगाव रस्त्यावर आडरानात महिलेच्या गळ्यातील एक ग्रॅमचे ओम, दीड ग्रॅमच्या बाळ्या ओरबाडून घेतले होते. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील या करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images