Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लोकन्यायालयात ११९१ प्रकरणांत तडजोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय लोक न्यायालयात रविवारी (२२ एप्रिल) ८५८ प्रलंबित व ३३३ दाखलपूर्व अशा एकूण ११९१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन सात कोटी दोन लाख १७ हजार २२९ रुपये वसूल करण्यात आले. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण सात कोटी ६२ लाख १६ हजार ७५९ एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणे तडजोडीने मिटली.

जिल्हा न्यायालयात झालेल्या लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या वित्तीय संस्थांची रक्कम वसुल झाली; तसेच न वटलेल्या ५४६ धनादेशाच्या प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संबंधितांना रक्कम मिळाली. एकूण भूसंपादनाच्या ५० प्रकरणातील शेतकऱ्यांबरोबर नुकसान भरपाईबाबत तडजोड करण्यात आली. अपघातामध्ये जखमी झालेल्या एकूण ५१ प्रकरणांतील नागरिकांना व त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली. एकूण १७ कौंटुबिक प्रकरणांमध्ये संबंध पूर्ववत झाले. एकूण १२१ दिवाणी प्रकरणांतील पक्षकारांनी आपापले मतभेद मिटविले. विद्युत चोरीच्या ४४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि इतर फौजदारी प्रकरणांतील किरकोळ वाद संपुष्टात आले. अशा प्रकारे लोकअदालतीमुळे सर्व सामान्य पक्षकारांना त्यांचे मतभेद मिटवता आले व त्यांचा पैसा व वेळ वाचला. यानिमित्त लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, विद्युत चोरीची, धनादेशाचा अनादर झालेले, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती; तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये मोबाइल व बँकांसंदर्भातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष; तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी, जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील, एच. एस. महाजन, एस. डी. दिग्रसकर, एच. ए. पाटील, डी. एस. शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश एस. डी. इंदलकर, पी. पी. कर्णिक, ए. एस. खडसे यांच्यासह सी. एस. दातीर तदर्थ, ए. डी. साळुंखे, ए. व्ही. खारकर, एम. एस. काकडे, आर. एम. शिंदे, ए. एस. नेवसे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणाचे एस. डी. इंदलकर यांनी केले.

\Bन्यायाची जपवणूक करण्याचे आवाहन\B

प्रत्येकाच्या हक्काप्रती जाणीव ठेवून सगळ्यांनी न्यायाची जपवणूक केली पाहिजे. प्रलंबित खटल्यांमध्ये सामंजस्याने तडजोड करून जास्त संख्येने प्रकरणे निकाली निघू शकतात. सर्व पक्षकार, वकील, कंपनी, अधिकारी यांनी समजुतीने तडजोड करुन ही लोकअदालत यशस्वी करावी, असे आवाहन न्यायाधीश प्रकाश माळी यांनी या वेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा फोटो ..

टाऊन हॉल कचऱ्याचा फोटो

एव्हिएशन अकादमीसाठी सुरेश प्रभू यांना साकडे

$
0
0

औरंगाबाद : मराठवाड्यातील तरुणांना करियरच्या नव्या वाटा खुल्या करून देण्यासाठी औरंगाबादेत एव्हिएशन अकादमीला मंजुरी देण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे रविवारी निवेदनाद्वारे केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात देशात येणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्रातील संधी आणि त्या माध्यमातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना करियर घडवता यावे, यासाठी येथे एव्हिएशन अकादमीच्या उभारणीला मंजुरी द्यावी. ही अकादमी सुरू झाल्यास तिला यशस्वीपणे चालवण्याचे काम सीएमआयए आणि अन्य उद्योजक मिळून करतील. औरंगाबादेतील विमानतळाच्या सुविधेचा यातून अधिक चांगला वापर केला जाईल.

यावेळी 'सीएमआयए'चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक, उमेश दाशरथी, मानसिंह पवार आदींची उपस्थिती होती. जगातील ११० देशांमध्ये निर्यात करणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांच्या वृद्धीसाठी कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद आदी शहरांशी हवाई जोडणी करावी. औरंगाबाद आणि परिघातील पर्यटनस्थळांच्या भरभराटीसाठी ही नवी जोडणी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतीभवती---

$
0
0

\Bपाणी यायला वेळ लागतोच?\B

केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांसाठी शहरात होते. नियोजित सर्व कार्यक्रम झाले आणि त्यादृष्टीने माहिती देण्यासाठी व खात्याअंतर्गत सध्या काय निर्णय घेतले जात आहेत याची माहिती देण्यासाठी त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सर्व निवेदन केले आणि पत्रकारांना सांगितले तुम्ही आता विचारा काय विचारणार आहात. त्यावेळी एका पत्रकाराने विचारले, जीएसटी व नोटबंदीसह सध्या व्यापारी आणि उद्योजक खूप त्रस्त आहेत. तेव्हा प्र्भू म्हणाले, तसे काही नाही आमच्याकडे, तर चांगला फिडबॅक आहे. हे सांगताना त्यांनी कोणतेही काम व त्याचे रिझल्ट यायला वेळ लागतोच हे सांगण्याचा प्रयत्न करा. हे पटवून देण्यासाठी प्रभू यांनी सांगितले की, 'अहो नाशिकला पाऊस पडल्यावर इथे औरंगाबाद, पैठणला पाणी येतेच पण, वेळ तर लागतोच हो की नाही?' त्यावर सगळे हसले आणि हळूच प्रभू हे प्रश्नांना बगल देत आहेत याची जाणीवही पत्रकारांना झाली, पुढे अनेक प्रश्न विचारल्यानंतरही बातमी मिळेना, तेव्हा माध्यमाच्या एका प्रतिनिधीने पुन्हा प्रभुंचे वाक्य उच्चारले आणि त्यावर केंद्रीय उद्योगमंत्रीही दिलखुलास हसले.

-धनंजय कुलकर्णी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गावच्या विकासाकरिता पक्षभेद विसरण्याची गरज’

$
0
0

गांधेलीमध्ये ड्रेनेज लाइनचे भूमिपूजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विकास हा गावाचा झाला पाहिजे. विकासकामे करतांना मी या पक्षा तो त्या पक्षाचा हे मतभेद विसरून कामे केली पाहिजेत. येथे मोफत दळण गिरणी सुरू केली आहे,' असे मत आमदार शिरसाट यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील गांधेली येथे आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते ड्रेनेजलाइनचे भूमिपूजन व मोफत दळण गिरणीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अपंग व्यक्तींना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोफत गिरणी सुरू केली असल्याने आता सर्वांनी ग्रामपंचायतला कर भरून सहकार्य केले पाहिजे. कर भरला म्हणजे गावाचा विकास जोमाने होऊ शकतो,' असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, पंचायत समिती उपसभापती बाबासाहेब राठोड, शिवसेना उपतालुकाप्रमुख बळीराम पोले, शाखाप्रमुख संतोष चन्ने, विभागप्रमुख गणेश वाघ, गटनेता रघुनाथ वाघमोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आसाराम तळेकर, सरपंच शेख सरदार पटेल, उपसरपंच अमोल तळेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश चन्ने, वसंत सावंत, नारायण थेटे, सुधाकर तळेकर, शेख हुसेन, शेख भिकन पटेल, तुकाराम सांगळे, बळीराम पोले, कडूबा अण्णा, रंगनाथ शेजवळ, सय्यद चाँद व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात भूजल पातळीत दोन मीटरची घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वरुणराजाचा लहरीपणा तसेच जमिनीतून होत असलेल्या पाण्याचा बेसुमार उपशामुळे जिल्ह्याची भूजलपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी दोन मीटरने पाणीपातळी खालावली असल्याचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या पाहणीत समोर आले आहे. यंत्रणेने जिल्ह्यातील १४१ निरीक्षण विहिरींची तपासणी करून हा अहवाल सादर केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ८३ टक्के, असा समाधानकारक पाऊस पडला आहे. एकत्रितपणे मोठ्याप्रमाणावर दिसत असलेला पाऊस तुलनेत सोयगाव, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यात कमी पडला. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे परिणामी लघु तसेच मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. यामुळे ऐन फेब्रुवारी, मार्च महिन्यातच विहिरी आटल्या, बोअरवेल कोरडे पडले. या पाणीटंचाईच्या परिस्थितीत आज हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना शासनाच्या टँकरची वाट पहावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्याला भूजल पातळीची तपासणी केली जाते. यासाठी औरंगाबाद जि‌ल्ह्यातील १४१ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. या विहिरींची पाणीपातळी मार्च २०१८ अखेर तपासण्यात आली. या पाहणीमध्ये जिल्ह्यातील पाणीपातळी सरासरी दोन मीटरने घटली असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक ३.७६ मीटर पाणीपातळीची घट कन्नड तालुक्यात झाली आहे, तर पैठण तालुक्यात २.७० मीटर, सिल्लोड तालुक्यात २.३५ मीटर, औरंगाबाद १.०९, गंगापूर १.४५, खुलताबाद १.६१, फुलंब्री १.७६ आणि सोयगाव तालुक्यात २.३८ मिटरने पाणीपातळीत घट झाली असल्याचे समोर आले आहे.

\Bमध्यम-लघु प्रकल्प तळाला

\Bबाष्पीभवन आणि आवर्तनामुळे जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यातही दररोज घट होत आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये ९७५ दशलक्ष घनमीटर (४५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातून दररोज औरंगाबाद, जालना शहरासह ही दोन जिल्हे व अहमदनगर जिल्ह्यातील गावांची तहान भागवली जाते. शिवाय धरणातून उद्योग व सिंचनासाठी नियमित आवर्तने सोडण्यात आली आहे. जायकवाडीत सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पात ७.२८ दशलक्ष घनमीटर (४ टक्के), ९३ लघु प्रकल्पात १६.४० दलघमी (९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पाची ही स्थिती एप्रिल महिन्यातील असून मे महिन्यात स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

\Bतालुकानिहाय भूजल पातळी

\B

तालुका.......निरीक्षण विहिरी.............घट (मीटरमध्ये)

औरंगाबाद...........१६......................१.०९

गंगापूर..............१७.......................२.४५

कन्नड..............१८.......................३.४५

खुलताबाद.........०४.......................१.६१

पैठण...............२०........................२.७०

फुलंब्री.............१३........................१.९९

वैजापूर.............१६.......................२.३८

सिल्लोड...........१९.......................२.३५

सोयगाव............१८.......................१.९९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी अभ्यासक्रमाच्या उर्दू प्रशिक्षणाचा समारोप

$
0
0

औरंगाबाद: जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उर्दू माध्यमाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा नुकताच समारोप करण्यात आला. हे प्रशिक्षण ९ एप्रिलपासून सुरू होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वत: अद्ययावत ज्ञान आत्मसात करून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद (माध्यमिक) उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी माया सोनवणे यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेत शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उर्दू शिक्षण संस्थेचे अध्‍यक्ष मोहम्मद अय्युब, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इलहाजोद्दीन फारुकी आणि प्रा. मन्सूर मुस्तफा यांनी आपले विचार मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फोटो कॅप्शन पान ४

$
0
0

\Bखड्ड्यात रस्ता \B

खडकेश्वर ते भडकल गेट या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्याला जोडणाऱ्या ज्युबिली पार्ककडून येणाऱ्या रस्त्याचे नुकतेच काँक्रिटीकरण झाले आहे. पण, उर्वरित रस्त्याची अवस्था वाहने चालवण्यासारखी राहिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णू पाटील यांना ब्रायडन शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी कॉलेजमधील डॉ. विष्णू पाटील यांना साहित्य क्षेत्रातील ब्रायडन शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. अमेरिकेतील शॉ सोसायटीतर्फे ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जगप्रसिद्ध लेखक जी. बी. शॉ यांच्या विचारवेध साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य ही संस्था करते. जगभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातून डॉ. पाटील यांची निवड झाली. यशाबद्दल कॉलेजतर्फे प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरसीएच’चे कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातील 'आरसीएच'च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शनिवारी (२१ एप्रिल) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी या कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

गारखेडा भागातील पालिका शाळेची इमारत खाजगी संस्थेला भाड्याने देण्यासही मंजुरी देण्यात आली. बारवाल यांचा स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे जाता जाता त्यानी दोन प्रस्ताव मंजूर करून घेतले. यापूर्वी भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात ऐनवेळचे अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले होते. आता त्यांच्याचा पावलावर पाऊल ठेऊन बारवाल यांनीही स्थायी समितीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मंजूर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांचा मालमत्ता कर एमआयडीसी करणार वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचा मालमत्ता कर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसूल करणार आहे. त्यापैकी पन्नास टक्के हिस्सा महापालिकेला दिला जाणार असून, उर्वरित पन्नास टक्यांच्या हिस्स्यातून एमआयडीसी उद्योगांसाठीच्या नागरी सुविधा पुरविणार आहे. औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कारखाने असून, त्यांच्याकडून दरवर्षी शंभर कोटी रुपयांची वसुली मालमत्ता कराच्या माध्यमातून अपेक्षित आहे.

एमआयडीसीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसूल करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या १६ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मंजूर केलेल्या प्रस्तावाचा कारणापुरता उतारा सोमवारी एमआयडीसीला पाठवण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की, एमआयडीसीच्या चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण; तसेच पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिलेल्या निवेदनानुसार रस्ते, पथदिवे महापालिकेस हस्तांतरित झालेले आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती एमआयडीसीकडून करण्यासाठी महापालिकेची एनओसी आवश्यक आहे. सुभाष देसाई आणि इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीचे अधिकार एमआयडीसीला देण्यात यावेत. त्यातील निम्मा हिस्सा एमआयडीसीने महापालिकेस द्यावा. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या नागरी सुविधा एमआयडीसीने पुरवाव्यात. एमआयडीसी भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारावा.

दरम्यान, पालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार; औद्योगिक वसाहतीत सुमारे ५०० कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मालमत्ता कराच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये वसुल होण्याची अपेक्षा असते. एमआयडीसीच्या माध्यमातून ही वसुली झाल्यास पालिकेला ५० कोटी रुपये मिळू शकतील.

बंद कारखान्यांकडे चार कोटींवर कर थकित

एमआयडीसीमधील ५५ कारखाने बंद आहेत. या कारखान्यांकडे चार कोटी ७९ लाख ९२ हजार ५२७ रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. कर वसुलीसाठी बंद पडलेल्या कारखान्यांची खरेदी-विक्री होताना महापालिकेच्या 'एनओसी'शिवाय खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण करू नका, असे पत्र महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी एमआयडीसीच्या सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक फेब्रुवारी २०१८ रोजी पाठवले. अद्याप या पत्राचे उत्तर पालिकेला प्राप्त झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पक्ष बांधणी अधिक मजबूत करत बूथ बांधणीवर कसोशीने लक्ष द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी सोमवारी येथे केले.

पुराणिक यांनी प्रदेश संघटनमंत्री म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली. त्यांनी शहर, जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार प्रशांत बंब, प्रवीण घुगे, प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सविता कुलकर्णी, संजय खंबायते, राम बुधवंत, आदी उपस्थित होते.

संघटन अधिक मजबूत करा, बूथ बांधणीवर भर द्या, असे आ‌वाहन संघटनमंत्री पुराणिक यांनी करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी व्यक्तिगतही संवाद साधत परिचय करून घेतला. दरम्यान, ग्राम स्वराज अभियानांतर्गत १४ एप्रिलपासून जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ एप्रिल रोजी पंचायतराज दिन, २८ एप्रिलला ग्रामशक्ती अभियान यात प्रधानमंत्री आवास योजना, स्वास्थ सुरक्षा मिशन यांसह अन्य योजनांचा लाभ देण्याबाबत शिबिराचे आयोजन करण्यात येईल. दोन मे रोजी किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, यात शेती उत्पादन वाढीसाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन शिबिर घेतले जाईल. त्यासह अन्य कार्यक्रमाचे आयोजन हाती घेण्यात आले असून, पाच मेपर्यंत हा उपक्रम सुरू राहील, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदली धोरण; मुख्यमंत्र्यांकडे साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरणात दुरुस्ती करावी, अशी मागणी मराठवाडा जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

मुख्यमंत्री शनिवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. २७ फेब्रुवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात अनेक मुद्दे अडचणीचे आहेत. त्यामुळे शिक्षकांवर अन्याय होणार आहे. या अन्यायकारक बदली धोरणात दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नाबाबत आम्ही वर्षभरापासून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु, त्यांनी कुठलाही आवश्यक बदल धोरणात केला नाही. या धोरणामुळे विनाकारण अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षक विस्थापित होणार आहे यामुळे जिल्हा परिषद सरकारी शाळांचे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे शिष्टमंडळाने मांडले. निवेदनाची प्रत स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मराठवाडा कृती समितीचे नियंत्रक दिलीप ढाकणे, समन्वयक संतोष ताठे, सदानंद माडेवार, राजेश पवार, सुषमा राऊतमारे, लता पठाडे, रोहिणी विद्यासागर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात मंडळ अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या गणित, उर्दू माध्यमांच्या १४२० उत्तरपत्रिका जळाल्यानंतर संबंधितांना कसे गुण द्यायचे, यापेक्षा विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मागितली तर काय, असा प्रश्न मंडळाला पडला आहे. केजमध्ये ३ मार्च रोजी १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यंदाही गोंधळ समोर आला. ३ मार्च रेाजीच्या गणित, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. केज गटसाधन केंद्रावर सिल करून ठेवलेल्या उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली. शिक्षण मंडळाने चौकशी करत राज्य मंडळाला अहवालही पाठविला. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आहेत त्यांना गुण कसे द्यायचे याबाबत मंडळाने काहीच जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना चिंता सतावते आहे. इतर विषयांचे गुण लक्षात घेत सरासरी गुण दिले जातील, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. असे असले तरी, मंडळाला दुसराच एक प्रश्न पडला आहे की, या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मागितल्या, तर काय उत्तर द्यायचे. हा प्रश्न भेडसावत असल्याने मंडळ अडचणीत सापडले आहे. विभागीय मंडळाने याबाबत राज्य मंडळाकडून सल्ला मागितला आहे. विद्यार्थ्यांना निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकत प्रत मागता येते. निकालानंतर विद्यार्थ्यांनी हे विद्यार्थी नियमानुसार उत्तरपत्रिकेची मागणी करतील. अशावेळी काय उत्तर द्यायचे असा पेच पडला आहे. यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मागितली तर, काय द्यायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्याबाबत आम्ही राज्य मंडळाकडे विचारणा केली आहे. त्यांचे मत जाणून घेत आहोत, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

\Bअहवालानंतर निर्णयाला उशीर

\B

उत्तरपत्रिका जळीत प्रकरणानंतर कस्टोडियन यांचा पदभार काढून घेण्यात आला. चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने आपला अहवाल विभागीय मंडळाकडे, तर विभागीय कार्यालयाने राज्य मंडळाला पाठविला. याला दोन महिने होत आहेत. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताच निर्णय मंडळाने घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियोजन करून बंदीवान पळाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या बंदीवानांनी हा प्रकार योजनाबद्धरित्या केल्याचे दिसते. त्यांना भेटण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे मित्र येत होते. त्यातूनच पळून जाण्याचा कट शिजल्याचा संशय आहे. सोनू वाघमारे हा रेल्वे स्टेशन मालधक्क्यावरील दोन खुनांतील आरोपी आहे, तर अक्षय आठवले याच्यावर 'मकोका'नुसार कारवाई करण्यात आली आहे.

अक्षय आठवले हा 'मकोका'च्या कारवाईत अटकेत असून त्याला हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच्या छातीत बंदुकीचे छर्रे अडकल्याने उपचारासाठी वॉर्ड क्रमांक १० मध्ये १९ एप्रिल रोजी दाखल केले होते. सोनू वाघमारे याच्यावर खुनाच्या गुन्ह्याचे दोन आरोप असून जबरी चोरीच्या गुन्ह्यात एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सोनू हा देखील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. सोनूच्या पाठीत मोठी गाठ झाली असल्याने त्याला २९ मार्च रोजी याच वॉर्डात दाखल केले होते. येथे दोघांची मैत्री झाली. त्यांनी वॉर्डातून पळून जाण्याची योजना आखली. सोमवारी सकाळी दोघांच्या सुरक्षेसाठी मुख्यालयातील जमादार योगेश जोशी (वय ५३) हे बंदोबस्तावर होते. दोघांनी ठरवल्यानुसार, त्यांनी गोळी घ्यायची असून पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी जोशी यांच्याकडे केली. जोशींनी खिडकीतून पाणी दिले असता आणखी पाणी हवे, दरवाजा उघडून पाणी द्या, अशी मागणी आरोपींनी केली. जोशी यांनी दरवाजा उघडून पाणी दिले असता अक्षयने त्यांना गळा धरून खाली पाडले. अचानक झालेल्या हल्ल्याने जोशी घाबरले. दोघांनी त्यांना लॉकअपमध्ये बंद करीत वॉर्डाचा दरवाजा उघडून रस्त्यावर धाव घेतली. जोशी यांनी आरडाओरड केल्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी देखील आरडाओरड सुरू केली. दोन्ही आरोपींनी मकई गेटच्या दिशेने धुम ठोकली. येथे थांबलेल्या रुग्णवाहिकेचे चालक विनीत खरे, आकाश हिवराळे व शेख सलीम हा प्रकार पाहिला. त्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून अक्षय आठवले याला घाटी क्वॉटर्सजवळ पकडले. पण, सोनू वाघमारे पळून गेला. अक्षयला पुन्हा वॉर्ड क्रमांक १० मध्ये आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घाटीतील कर्मचाऱ्यानी लॉकअपमध्ये कोंडलेल्या जोशी यांची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच एसीपी ज्ञानोबा मुंडे, बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, राजेंद्र कत्तूल, एपीआय घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bअक्षयची गुन्हेगारी पार्श्वभूमी\B

अक्षय आठवलेजी कौटुंबीक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यात श्याम आठवले यांचा मृत्यू झाला होता. सहा महिन्यांपूर्वी अक्षय आठवले याने माळीवेस भागात भांडण केले होते. यामध्ये एअरगनच्या गोळीबारात अक्षय जखमी होऊन त्याच्या शरीरात तीन छर्रे घुसले होते. याप्रकरणी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करण्यात आली असून हर्सूल कारागृहात कच्च्या कैदेत ठेवले होते. तीनपैकी दोन छर्रे काढले असून तिसरा छर्रा काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

\Bमालधक्क्यावरील खुनाच्या दोन गुन्ह्यात सोनू आरोपी\B

पसार असलेला सोनू वाघमारे हा देखील कुख्यात गुन्हेगार आहे. रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर ९ जानेवारी २०१७ रोजी युसूफ जोसेफ कांबळे या मुलाचा, तर २१ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षक दत्तात्रय माधवराव पोकळे यांचा दगडाने ठेचून निघृण खून करण्यात आला होता. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यात सोनू आरोपी आहे. ही दोन्ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. तसेच त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा सिद्ध झाला असून त्याला एक वर्षाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. ही शिक्षा तो सध्या हर्सूल कारागृहात भोगत होता.

\Bदोघांवर सुरक्षेची जबाबदारी

\B

घाटी हॉस्पिचलचा वॉर्ड क्रमांक १० हा गुन्हेगारांसाठी राखीव आहे. येथे या दोन कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन पोलिस कर्मचारी नेमलेले होते. यामध्ये योगेश जोशी व बबन जाधव कार्यरत होते. जाधव हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते, यावेळी जोशी एकटेच असल्याची संधी साधत आरोपींनी पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिन येत्या १४ मे रोजी

$
0
0

औरंगाबाद : विभागीय स्तरावरील लोकशाही दिन येत्या १४ मे रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. विभागीय लोकशाही दिनासाठी विहित मुदतीत व विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले असतील अशा नागरिकांनीच १४ मे रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील, परंतु त्यांच्या प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर त्याच दिवशी लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय स्तरावरील विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. या महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतीपूर्वी अर्ज महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांच्या कार्यालयात किंवा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. हे अभियान २३ एप्रिल ते पाच मे यादरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जनजागृती करण्यात येणार आहे. त्याकरिता वाहतुकीशी संबंधित पॉम्पेट, स्टिकर, बॅनर तयार केले असून, शाळा, कॉलेज, रहदारीच्या ठिकाणी वाटप करून वाहनांवर, लावण्यात येणार आहेत. प्राणांतिक व गंभीर अपघात रोखण्याकरिता काय उपाय योजना कराव्यात, नियम न पाळल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याबाबत शाळा, कॉलेजमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या ‘एमआरआय’साठी शिर्डी संस्थानकडून १५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) 'एमआरआय'साठी शिर्डी संस्थानने १५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याचे अधिकृत पत्र सोमवारी प्राप्त झाले आहे. प्रशासनीय मान्यता मिळून या उपकरणाची खरेदी प्रक्रिया हाफकिन संस्थेमार्फत होऊन पाच ते सहा महिन्यांत उपकरण घाटीत दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.

५ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सात कोटींच्या 'सिटी स्कॅन'ला मान्यता देण्यात आली. याच बैठकीत निर्णय होऊन 'एमआरआय'साठी शिर्डी संस्थानला साकडे घालण्यात आले होते. मराठवाडा व खान्देशातील सर्वांत मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये हजारो गोरगरीब रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा विचार करुन संस्थानने हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बैठकीनंतर अवघ्या अडीच महिन्यांत संस्थानने तब्बल १५ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार तसेच पालकमंत्री सावंत यांच्या प्रयत्नांमुळेच घाटीला २२ कोटींची उपकरणे मिळणार आहेत, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bपाच वर्षे १०० टक्के देखभाल\B

दोन्ही उपकरणांच्या १०० टक्के देखभालीसह ही उपकरणे घाटीला उपलब्ध होणार आहेत. पाच वर्षांच्या देखभालीच्या करारासह ही उपकरणे उपलब्ध होतील. दोन्ही उपकरणे ही सध्याची अद्ययावत उपकरणे आहेत. 'एमआरआय' मशीन हे 'थ्री टेस्ला' क्षमतेचे सर्वांत आधुनिक उपकरण असणार आहे, असेही डॉ. येळीकर यांच्यासह क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्ज्वला गॅस नोंदणीस प्रारंभ

$
0
0

औरंगाबाद : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत परिबाजार येथे रविवारपासून नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत अडीचशे महिलांनी नोंदणी केली असून,

एक हजार गरजूंना मोफत गॅस जोडणी देण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिली. मंडळ उपाध्यक्ष अरुण तुपे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदित्य दहिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संतोष जाधव, संदीप निकम, संदीप पगारे, आवेज खान, काशिफ खान, बाळू शिंगाडे, अंकुश शिंदे उपस्थित होते. दरम्यान, पिरबाजारासह शहराच्या विविध भागात नोंदणी शिबिर घेण्यात येणार असून, गरजूंनी लाभ घ्यावा, असे आ‌वाहन गायकवाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशनच्या दुनियेत तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घागरा, चुडीदार, वेस्टर्न वुमेन्स वेअर परिधान करत रॅम्पवर कॅटवॉकद्वारे विद्यार्थिनींनी सादर केलेले नवनवीन डिझाइन तर, धोती, कुर्ता असा दिमाखदार भारतीय पोषाख परिधान करत रॅम्पवर उतरलेली तरुणाई, अशा रंगतदार वातावरणात एमजीएमचा 'कलाइडोस्कोप' फॅशन शो पार पडला.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनिंगतर्फे सोमवारी कलाईडोस्कोप-२०१८ फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. खादी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाच भाग असल्याने त्यांनीच डिझाइन केलेल्या कपड्यांचे हे प्रदर्शन होते. रुक्मिणी सभागृहात सायंकाळी फॅशन शोला सुरुवात झाली. संगीत,गीताचा ठेका अन् रॅम्ववर होणारा कॅटवॉक त्यात टाळ्यांचा गजर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा ठरला.

विद्यार्थिनींनी वेस्टर्न, घागरा, लेहंगा, डिझाइन कुर्ता, जॅकेट सादर केले. सध्याचे फॅशनला अनुसरून उत्तम डिझाइन फॅशन शोमध्ये पहायला मिळाल्या. ७०पेक्षा अधिक नवीन डिझाइन विद्यार्थ्यांनी सादर केल्या. शोचे आकर्षण ठरले लहान मुलांचे डिझाइन. लहान मुलांनी यात सहभाग घेत कॅटवॉक केला. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी लहान मुलांच्या कपड्यांचे डिझाइन तयार केले होते. प्रारंभी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, अनुराधा कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images