Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शुल्कवाढ रद्द करा; साहित्याची सक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. वाय. एस. खेडकर शाळा व्यवस्थापनाने पालकांना विश्वासात न घेता केलेली शुल्कवाढ रद्द करावी, शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदीची सक्ती थांबवावी, अशी मागणी करत पालकांनी बुधवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली. शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक दिवसांपासून पालक लढा देत असून शिक्षण विभाग दखल घेत नसल्याचेही पालकांनी आरोप केला.

शाळेने पालकांना विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, चौकशीसाठी महिला पालक शाळेत गेल्या असता त्यांना अपमानीत करून काढून देण्यात आले. मुलाचा दाखला घेऊन जा, शाळा मॅनेजमेंटमुळे चालते पालकांमुळे नाही असे सांगितले. विद्यार्थ्यांवर पालकांनी फी भरावी यासाठी मुख्याध्यापक, सुपरवायजर यांच्याकडून दबाव टाकण्यात येणार नाही. पालकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. याबाबत शाळेची चौकशी व्हावी व पालकांना न्याय द्यावा, असे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी पालकांच्या स्वाक्षरीचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायी, विषय समिती सदस्यांची आज निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ; तसेच पाच विषय समितींच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड गुरुवारी केली जाणार आहे. यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. स्थायी समितीमधून विद्यामान सभापती गजानन बारवाल यांच्यासह सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे, मनिषा मुंडे, संगीता वाघुले, सोहेल शेख, अजीम, किर्ती शिंदे हे सदस्य एक मे रोजी निवृत्त होतआहेत. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती गुरुवारी केली जाईल. त्याशिवाय विषय समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती देखील केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझर रिपोर्टर-औरंगाबाद

$
0
0

जिजाऊ चौक

रस्ता उखडल्याने त्रास

टीव्ही सेंटर येथील जिजाऊ चौक ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडलेला आहे. सध्या उन्हाळा जास्त असल्याने व्यावसायिक, वाहनधारक आणि पादचारी यांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. येथील अनेक वसाहितांसाठी हा एक प्रमुख मार्ग आहे. रस्ता उखडल्याने तेथे दगड जमा होत आहेत. त्यामुळे मोटरसायकल चारविणे कसरत ठरत आहे. याचा विचार करून महापालिकेने या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- एक वाचक, औरंगाबाद

सिडको बसस्थानक

ऑटोरिक्षाचालकांचा धुमाकूळ

खासगी प्रकारच्या कोणत्याही वाहनांना बसस्थानकात पूर्णपणे प्रतिबंध असतानादेखील खाजगी दोन, तीन व चारचाकी वाहने थेट सिडको बस स्थानकात प्रवेश करतात. केवळ प्रवेश नव्हे, तर ज्या प्लॅटफॉर्म बस थांबतात तेथेच ऑटोरिक्षामधील प्रवाशांची अशी चढ-उतार होताना दिसते. या छायाचित्रात २५ एप्रिल रोजी सकाळी सव्वानऊ वाजता ऑटो रिक्षामधून (क्रमांक एम एच २० बीटी ८५६१) थेट प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर सोडले. त्यामुळे बस चालकांना बस कोणत्या फ्लॅटफॉर्मवर लावावी, असा प्रश्न पडला, तर नवल वाटायचे कारण नाही. खाजगी सर्व प्रकारच्या वाहनांना बस स्थानकाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश बंदी असताना देखील; तसेच प्रवेशद्वाराजवळ सिक्युरिटी गार्डचा कडक पहारा असतानाही खाजगी वाहने बसस्थानकामध्ये पोचतातच कशी, हा मात्र खरोखरच संशोधनाचा विषय आहे, असे मत काही बस चालकांनी व्यक्त केले.

- रवींद्र तायडे, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख यांचा राजीनामा विधी विभागाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक ए.टी.के. शेख यांनी १५ दिवसांपूर्वी सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे दिला. शेख यांचा राजीनामा महापालिकेच्या सचिव विभागाने विधी विभागाकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी पाठवला आहे. कायदेशीर सल्ला प्राप्त होईपर्यंत शेख यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत एमआयएमला नवीन स्वीकृत सदस्याची नियुक्ती करता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी प्रकरणावरून ‘तो’ विद्यार्थी डिबार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉपी प्रकरणाबाबत पर्यवेक्षकाला मारहाण करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा एम. पी. एडचा विद्यार्थी सतीश वाघमारे याला परीक्षेतून तीन वर्षांसाठी 'डिबार' करण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करत आहे. या कारवाईचा अहवाल परीक्षा विभागाच्या 'माल प्रॅक्ट्रिस कमिटी'समोर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, अशा घटनांतर 'होम सेंटर' द्या, अशी मागणी प्राचार्य करणार असल्याचे कळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये मंगळवारी सचिन वाघमारे या विद्यार्थ्यांने पर्यवेक्षकाला मारहाण करून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर विद्यापीठानेही त्यावर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांमध्ये दाखल केलेला गुन्हा, कॉलेजच्या अहवालानुसार विद्यार्थ्यावर कारवाई निश्चित केली जाणार आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तीन वर्ष संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार नाही, अशी कारवाई केली जाऊ शकते. या प्रकारची कारवाई निश्चित करण्याचा विचार प्रशासनाने केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसा अहवाल तयार करण्यात आला असून त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. तसेच पोलिस आयुक्तांनाही अशा प्रकरणांबाबत विद्यापीठ स्वतंत्र एक अहवाल सादर करणार आहे. अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करताना विद्यापीठाची बाजुही विचारात घेतली जावी, अशी मांडणी अहवालात केली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत विद्यापीठाने तयारी पूर्ण केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कॉलेज आता नवीन मागणी पुढे करण्याची शक्यता आहे. 'होम सेंटर द्या', अन्यथा परीक्षा केंद्र नको, अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रावर बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी असतात. यात अनेकदा त्यांना आवर अडचणीचे ठरते. कॉपी आणल्यानंतर तपासणी करताना किंवा कॉपी पकडल्यानंतरही काहीजण अरेरावीची भाषा करतात. त्यामुळे 'होम सेंटर' दिल्यास विद्यार्थी कॉलेजचेच असतील ज्यांना नियंत्रित ठेवणे सोपे ठरू शकते. त्यामुळे ही मागणीही पुढे येण्याची शक्यता आहे.

प्राचार्यांची आज तातडीची बैठक

पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये चार दिवसांत दोन आत्महत्या करण्याच्या धमकीचे प्रकार समोर आले आहेत. २१ एप्रिल रोजी डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनमध्ये, तर २४ रोजी विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये आत्महत्येच्या प्रयत्नासह पर्यवेक्षकाला मारहाणही करण्यात आली. या घटनांबाबत प्राचार्यांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनमध्ये सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी आदी सर्व कॉलेजांच्या प्राचार्यांना बैठकीला निमंत्रिक केल्याची माहिती प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांनी 'मटा'ला दिली. कॉलेजांमध्ये प्राचार्यांना विविध पातळीवर येत असलेल्या अडचणींवरही बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे डॉ. फारुकी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या तावडीतून पळणाऱ्या मोबाईल चोराला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे पोलिसांच्या हाताला झटका मारुन हातकडीसह पळालेला मोबाईल चोर अमोल उर्फ सोनू सुनील चंडालिया याला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी ठोठावली.

प्रवाशाचा मोबाईल चोरी झाल्याबाबत औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीचा पोलिस शोध घेत होते. त्यावेळी मनमाड पोलिसांनी आरोपी अमोल उर्फ सोनू सुनील चंडालिया (रा. मनमाड) याच्याकडून संबंधित मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली. कोर्टाच्या परवानगीने पोलिस हे आरोपीचा ताबा घेण्यासाठी मनमाडला गेले. आरोपीला घेऊन येत असताना, हाथकडीला असलेली दोरी सीटच्या लोखंडी पट्टीवर घासली व औरंगाबाद रेल्वेस्थानकावर येताच जोराचा हिसका देत तो फरार झाला. प्रकरणात आरोपीविरोधात भादंवी कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मनमाड पोलिसांनी आरोपीला अटक करुन औरंगाबाद पोलिसांच्या हवाली केले. आरोपीला रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता आशिष दळे यांनी युक्तीवाद केला व सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीकडून पैसे वसूलीसाठी आईसक्रीमचा माल परस्पर लांबवला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आईसक्रीम कंपनीकडे कामाचे बिल बाकी असल्याने एका बहादराने कंपनीने औरंगाबादला पाठवलेला माल चालकाची फसवणूक करीत उतरवून घेतला. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हा प्रकार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या जीपीएस प्रणालीद्वारे चिकलठाणा येथील कंपनीत लपवून ठेवलेला हा माल शोधून घेत जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी रोजीत मवन यादव (वय २३ रा. भिवंडी, ठाणे) या चालकाने तक्रार दाखल केली आहे. यादव या सिकेल ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. २२ एप्रिल रोजी भिवंडी येथील यम्मू फूड्स कार्पोरेशन या कंपनीचे १८७ आईसक्रीमचे कॅरेट घेऊन वाटपासाठी यादव वाहन घेऊन निघाला होता. संगमनेर येथील एका दुकानात त्याने ३३ कॅरेट उतरवले. यानंतर उर्वरित मालासह तो औरंगाबादला आला. खोकडपुरा परिसरातील महानंद दूध डेअरीजवळ तो आला होता. यावेळी त्याला सरफराज शेख नावाची व्यक्ती भेटली. हा माल आपण मागवला असून त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आलो असल्याची थाप त्याने मारली. सरफराजने यादवला गाडीसहीत घरी नेले. या ठिकाणी त्याला रुममध्ये आराम करण्यास सांगितले. रात्रीतून हे वाहन नेत त्यातील १५४ कॅरेटचा माल सरफराज याने परस्पर उतरून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सरफराजने यादवला यम्मू कार्पोरेशनकडे माझे कार्डबोर्ड बनवल्याचे सत्तर हजार रुपयाचे बिल बाकी असून कंपनीने पैसे दिले नसल्याने हा माल उतरवून घेतल्याचे सांगितले. यादवने ही बाब कंपनीला व ट्रान्सपोर्ट मालकाला सांगितली. ट्रान्सपोर्ट मालकाने त्याला पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यास सांगितले. याप्रकरणी यादवच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

...

जीपीएस प्रणालीचा फायदा

ट्रान्सपोर्ट कंपनीचे शहरातील स्थानिक व्यवस्थापक देखील शहरात दाखल झाले. त्यांनी वाहनात जीपीएस प्रणाली असल्याचे सांगीतले.या प्रणालीवरून वाहन कोणत्या मार्गावर गेले तो मार्ग तपासण्यात आला. यावेळी चिकलठाणा झाल्टा रोडच्या मध्ये वाहन एका ठिकाणी काही वेळ उभे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहनचालकाला घेऊन हा मार्ग तपासला. यावेळी जुना बीड बायपास रोडवर वीर गुर्जर आईसक्रीम कंपनी असल्याचे निष्पन्न झाले. या कंपनीमध्ये पोलिसांनी चौकशी केली. यावेळी यादव याच्या वाहनातील आईसक्रीमचे कॅरेट तेथे दिसून आले. पोलिसांनी या ठिकाणावरून ११२ कॅरेट जप्त केले. यापैकी उर्वरीत ४२ कॅरेटचा माल सरफराजने सोमवारी न्यायनगर येथील अंकीता फूड्स येथे दिला असल्याचे सांगीतले. पोलिसांनी हा कॅरेटचा माल जप्त करून आरोपी सरफराज शेखला अटक केली. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन मांटे, संतोष रेड्डी, राजेश फिरंगे, राजेश चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

दबावाचा प्रयत्न

आईसक्रीमचा साठा शोधल्यानंतर पोलिस व ट्रान्सपोर्ट मॅनेजर त्या ठिकाणी गेले.यावेळी सरफराजसोबत असलेल्या एका व्यक्तीने दादागिरीची भाषा वापरत माल देण्यास नकार दिला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही मंडळी नरमली, कॅरेटचा साठा पुन्हा वाहनात ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवताप दिनी शहरात फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी (५ एप्रिल) क्रांतीचौकातून सिद्धार्थ उद्यानापर्यंत फेरी काढण्यात आली. आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. व्ही. एस. भटकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. विखे पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल पाटील, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पाडळकर, डॉ. राणे आदींच्या उपस्थितीत फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानिमित्त सिद्धार्थ उद्यान व आरोग्य संकुल (महावीर चौक) येथे आरोग्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथील कार्यशाळेत डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरानगरीत आजपासून महापालिकेचे टँकर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत उत्तरानगरीतील अधिकृत नळजोडणीधारकांना शुक्रवारपासून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी हमी महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली आहे. यावर समाधान व्यक्त करीत खंडपीठाने जनहितयाचिका आणि अवमान याचिकांची पुढील सुनावणी ३ मे रोजी ठेवली आहे. याप्रकरणी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.

उत्तरानगरीमधील रहिवासी व उच्च न्यायालयातील सात वकिलांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या भागातील रहिवाशांनी ९६ लाख रुपये कर भरूनही महापालिका पाणीपुरवठा करीत नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले होते. तसेच खंडपीठाच्या १९ डिसेंबर २०१६ च्या आदेशानुसार, आठ दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. परंतु, अद्याप पाणीपुरवठा केला जात नसल्याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. याचिकाकर्त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया आणि डी. एम. मुगळीकर, विद्यमान प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना वैयक्तिक प्रतिवादी केले आहे.

या जनहित याचिका आणि अवमान याचिकेवर गुरुवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली. या याचिकेत याचिकाकर्त्यांतर्फे अजित बी.काळे तर महापालिकेतर्फे संभाजी टोपे आणि शासनातर्फे सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे काम पाहत आहेत.

\B३४१ सदनिकांत नळजोडणी \B

प्रभारी पालिका आयुक्तांनी खंडपीठात पत्र सादर करून माहिती दिली की, त्यांनी बुधवारी उत्तरानगरी भागाला भेट दिली. येथील ५० टक्के भागाला एन-५ मधील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागात 'डी.आय.'जलवाहिन्या टाकण्यासाठीची निविदा ५ मे २०१८ रोजी उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उत्तरानगरीतील केवळ ३४१ सदनिकाधारकांनी अधिकृत अर्ज केले असून त्यांना रितसर नळजोडणी दिली आहे. त्यांच्यापैकी २५० पेक्षा जास्त लोकांना पाणीपुरवठा होत आहे. उच्च न्यायालयाने पाणी पुरवठ्यासाठीच्या तत्काळ उपाययोजनेबद्दल विचारले असता महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा मावळा’ची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

औरंगाबाद : मराठा मावळा संघटनेची बैठक सिंचन भवनाच्या सभागृहात बुधवारी सकाळी घेण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये औरंगाबाद व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थि होती. यावेळी संघटनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत मराठवाडा कार्याध्यक्षपदी, मराठवाडा सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रवीण बिरादार, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश गुलाबराव बन यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष भरत कदम पाटील, शहराध्यक्ष सोमनाथ पवार, गोरख गिरी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वाटपातील असमानता दूर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या अनेक गटांमध्ये विकास कामासाठी एक छदाम देखील मिळालेला नाही. ही असमानता दूर करून पाच मेपर्यंत निधी वाटप करावे, अन्यथा सात मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या दालनासमोर भर उन्हात कोणत्याही छताशिवाय बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्थायी समिती सदस्य मधुकर वालतुरे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र दिले आहे.

त्यांनी या पत्रात, जिल्हा परिषदेच्या अनेक सर्कलमध्ये गेल्या वर्षभरात विकास कामासाठी एक छदाम देखील मिळालेला नाही. निधी वाटपातील ही असमानता दूर करून पाच मेपर्यंत निधी वाटप न केल्यास सात मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. डोणगावकर यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडे नेहमी पत्रव्यवहार करून उंबरठे झिजवले आहेत. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत वारंवार आवाज उठवून पाठपुरावा केला असूनही सुस्त प्रशासन काहीही ठोस कार्यवाही करत नाही. नेवरगाव गटात तर सर्वच रस्त्यांच्या अक्षरशः चाळण्या झाल्या आहेत. जिल्हाभरात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रमाने निधी मिळणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीनंतर घाटीचे डॉक्टर रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीच्या अपघात विभागात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी बुधवारी (२५ एप्रिल) रात्री एका निवासी डॉक्टरला मारहाण केल्यानंतर व सहयोगी प्राध्यापकाला धक्काबुक्की केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व ३०० निवासी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी गुरुवारी विविध ठिकाणी निदर्शने तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

तीव्र वेदनांच्या तक्रारीमुळे तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असणारे मधुकर चांदणे (५५) यांना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगितल्यावरुन संतप्त नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला शिविगाळ, मारहाण केली. तसेच शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक यांच्या अंगावरही नातेवाईक धावून गेले. या प्रकरणाचा निषेध म्हणून घाटीतील सर्व ३०० निवासी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून सामुहिक रजेवर गेले. तसेच गुरुवारी निवासी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेमुळे गुरुवारी रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नसला तरी शुक्रवारपासून रुग्णसेवेवर परिणाम होणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

अपघात विभागासमोर पोलिस तैनात

या संदर्भात अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आदींनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे सुरक्षेचा प्रश्न मांडण्यात आला. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर १२ पोलिसांची अपघात विभागासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित रुग्णावर शून्य मिनिटांत उपचार सुरू झाले होते. अपघात विभागामध्ये रुग्णाचे ४० पेक्षा जास्त नातेवाईक असल्यामुळेच त्यांना बाहेर बसण्याची विनंती करताच संतप्त नातेवाईकांनी ६ सुरक्षा रक्षकांसमोरच निवासी डॉक्टरला मारहाण केली. मात्र एकही सुरक्षा रक्षक मदतीला धावून आला नाही. जोपर्यंत सुरक्षित वातावरण वाटत नाही, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही.

-डॉ. सुमेध अग्रवाल, मार्ड शहराध्यक्ष

ज्या निवासी डॉक्टरवर हल्ला झाला त्याने पोलिसांमध्ये तक्रार देणे गरजेचे आहे. कार्यतत्परता न दाखवणाऱ्या सुरक्षा रक्षकांची तक्रारही त्यांच्या वरिष्ठांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून, त्यांनी अपघात विभागात पोलिस नियुक्त केले आहेत. नातेवाईकांनी अपघात विभागात, रुग्णालयात शांतता पाळणे, गर्दी न करणेही तितकेच महत्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

या घटनेनंतर अपघात विभागाचा नोंदणी कक्ष सध्याच्या ठिकाणापेक्षा बाहेर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रुग्णाचा पेपर काढण्यात आल्यानंतर प्रत्येक रुग्णासोबत केवळ दोन ते तीन नातेवाईकांना सोडण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षकांचे ऑडिटही केले जाणार आहे आणि त्यानुसार सुरक्षा रक्षकांची संख्या-जागेचा पुन्हा एकदा विचार केला जाणार आहे.

- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आज मोर्चा

$
0
0

औरंगाबाद : सहकार कायद्यातून गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदा करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जे. सी. फ्रान्सिस यांनी दिली. पैठणगेट येथून सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. गुलमंडी, जुना बाजार, महापालिका, किलेअर्कमार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडणार आहे. मोर्चात गृहनिर्माण संस्थेच्या सदस्य, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन छात्रालयात पी. यू. जैन पुण्यतिथी

$
0
0

औरंगाबाद: चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर व्दारा संचलित उत्त्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय उस्मानपुरा येथे स्व. पी. यू. जैन यांना २५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ललीत पाटणी, चांदमल चांदीवाल, नरेंद्र अजमेरा, संदीप ठोले, विपीन कासलीवाल, अतुल सेठी, वर्धमान कासलीवाल, पीयूष कासलीवाल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अॅड. वृषभ जैन, सूत्रसंचालन मयुर लोहाडे केले, तर शक्तिराज काळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंदा नवीन अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक कॉलेज नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची पदवी, पदवीका घेऊन नोकरी मिळत नसल्याने कॉलेजमधील पन्नास टक्के जागा रिक्त राहत आहेत. कॉलेजांमधील गुणवत्ता घसरल्याने नोकरी व पदवीचा ताळेबंद बिघडला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात राज्यात एकही नवीन पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही,' असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी स्पष्ट केले.

शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये 'अॅडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मेकॅट्रॉनिक्स अभ्यासक्रम'च्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप डॉ. वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंचावर राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाविषयी नकारात्मक भावना आहे. रोजगारक्षम विद्यार्थी बाहेर न पडल्याने कॉलेजांमधील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. ही स्थिती बदलण्याकरिता अभ्यासक्रमातील बदल, उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे. गरज नसताना कॉलेजांची संख्या वाढल्यानेही जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे येत्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने येत्या शैक्षणिक वर्षात एकही नवीन कॉलेजला परवानगी न देण्याची राज्याची विनंती मान्य केली आहे. यासह कॉलेजांना 'एनबीए' संलग्नीकरण आवश्यक केले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. एफ. ए. खान यांनी केले.

\B'रिक्त जागांना कॉलेजच जबाबदार'

\B

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या जागा यंदा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या परिस्थितीला कॉलेजच जबाबदार आहेत, असे तंत्रशिक्षण मंडळाचे डॉ. विनोद मोहितकर म्हणाले. अभ्यासक्रमात बदल करूनही अशी स्थिती आहे. कॉलेजांनी काही नवीन बदल सूचविणे गरजेचे असते, परंतु तसे होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवतीची आत्महत्या; पती, सासुला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहित गर्भवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती स्वप्नील रमेश जोंधळे (२५, रा. रोकडिया हनुमान कॉलनी, औरंगाबाद) व सासू मालताबाई उर्फ छाया रमेश जोंधळे यांना दोन मे पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी गुरुवारी (२६ एप्रिल) दिले. पैशांसाठी होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती रुपाली स्वप्नील जोंधळे (१९) हिने मंगळवारी (२४ एप्रिल) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी पती तसेच आरोपी सासूला अटक करण्यात येऊन गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना दोन मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

…......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती मिरवणुकीत खून; दोघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून जयंती मिरवणुकीत तरुणाचा खून करणाऱ्या दोघा आरोपी भावांच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (२९ एप्रिल) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी गुरुवारी (२६ एप्रिल) दिले.

या प्रकरणी मृत आशिष संजय साळवे (२५, रा. रमानगर) याचा भाऊ सचिन संजय साळवे (२६, रा. रमानगर) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीचौकात राहूल हरिश्चंद्र जाधव याने स्टेज लावले होते. तिथे फिर्यादीचा भाऊ व मृत आशिष व त्याचे मित्र गेले होते आणि फिर्यादी तिथे गेला असता त्याला आशिष हा गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला, तर आरोपी अविनाश गौतम जाधव (२२) व आरोपी कुणाल गौतम जाधव (२०, दोघे रा. रमानगर) यांनी आशिष याला तीक्ष्ण हत्याराने पोटात वार करुन जखमी केल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले होते. त्यानंतर आशिष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा साथीदार नयन जाधव हा मृतावर शस्त्राने वार करताना दिसून आला आहे, तर आरोपी कुणाल हा दोन शस्त्रांनी मृतावर वार करताना दिसून आला आहे आणि दुसरे शस्त्र जप्त करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपी कुणाल याने गुन्ह्यात वापरलेले कपडे न देता दुसरेच कपडे पोलिसांच्या हवाली केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपीचे खरे कपडेही जप्त करावयाचे असल्याने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमीष दाखवून घातला ४६ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फुलंब्रीच्या भोईदेव शिक्षण संस्थेमध्ये अनेकांना शिक्षक व शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमीष दाखवून तब्बल ४६ लाखांडा गंडा घालणाऱ्या आरोपी राजेंद्र कोंडिबा वानखेडे याला गुरुवारी (२६ एप्रिल) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन मे पर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी माजी सैनिक दत्ता पोताजी चाकेवाड (६३, रा. हडको, नवीन नांदेड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमीष दाखवून आरोपी राजेंद्र कोंडिबा वानखेडे (३५, मूळ रा. हडको, एन ११, औरंगाबाद, ह.मु. नाशिक) याने जानेवारी २०१४ ते ऑगस्ट २०१४ दरम्यान फिर्यादीला १२ लाख रुपयांचा गंडा घातला. तसेच मनोज जोशी, निळकंठ लाडेकर, सुनिल कोठवरे, प्रभाकर पंडितवार आदींना नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याकडूनही ३४ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

आरोपी पाच महिन्यांपासून फरार

या प्रकरणी आरोपीला गुरुवारी अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पाच महिन्यांपासून फरार आहे. तसेच आरोपीने फसवणूक करुन मिळवलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला दोन मे पर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामार,दगडफेक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी व दगडफेक करण्यात आली. मंगळवारी रात्री नऊ वाजता मुकुंदवाडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी सचिन रामराव गायकवाड (रा. माळेगाव ता. बदनापूर) यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सचिन हा त्याचा मित्र आकाश खिल्लारे याच्या नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यावेळी नाचताना आकाशला अमर जगताप नावाच्या तरुणाचा धक्का लागला. या कारणावरून वाद होऊन अमर व त्याच्या तीन साथीदारांनी सचिन व आकाशला बेदम मारहाण करीत दगडफेक केली. यामध्ये डोक्याला मार लागल्याने सचिन गंभीर जखमी झाला. तसेच या भांडणात त्याच्या गळ्यातील अडीच ग्रॅमचे अशोक चक्राचे पेंडल पडून गहाळ झाले आहे. या प्रकरणी सचिनच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अमर व त्याच्या साथीदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने अमर संजय जगताप ( रा.मुकुंदवाडी) यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने त्यांना चौघांनी मारहाण करीत दगडफेक केली. यामध्ये अमर व त्याचे तीन मित्र जखमी झाले. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन गायकवाड, आकाश खिल्लारे, सन्नी मिसाळ व प्रविण कासार यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० मे पर्यंत होणार पोलिस आयुक्तालयाच्या नविन इमारतीचे हस्तांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालयाच्या नविन इमारतीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. येत्या १० मे रोजी ही नविन इमारत पोलिस विभागाकडे हस्तांतरीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान आयुक्तातील पोलिस आयुक्तांचे दालन देखील जमीनदोस्त करण्यात आले असून पोलिस आयुक्तांच्या जुन्या बंगल्यात सध्या त्यांचे तात्पुरते दालन उभारण्यात आले आहे.

तीन मजली असलेल्या पोलिस आयुक्तालयाच्या भव्य इमारतीचे काम तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कालावधीत सुरू करण्यात आले होते. या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पोलिस आयुक्तांचे दालन असणार आहे. त्याशिवाय नियंत्रण कक्ष, सायबर सेल, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा, प्रशासकीय कार्यालयाचा कारभार देखील याच इमारतीमधून चालणार आहे. आगामी काळात शहराला अतिरिक्त पोलिस आयुक्त पद निर्माण झाल्यास त्यांच्या दालनाची देखील व्यवस्था या इमारतीमध्ये करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे यांनी दिली. दहा मे रोजी ही नविन इमारत हस्तांतरीत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या या इमारतीत अंतर्गत फर्नीचरचे काम सुरू आहे. दरम्यान, जुन्या इमारतीच्या शिल्लक भागामध्ये सध्याच्या पोलिस आयुक्तांचे दालन होते. हे दालन देखील पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या दालनाची व्यवस्था पेट्रोलपंपामागे असलेल्या त्यांच्या जुन्या बंगल्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images