Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डॉ. पूजा मुळे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0
आंतरराष्ट्रीय दर्जाचा पीअर फुशार्ड अकादमीच्या ‘इंटरनॅशनल सीनिअर स्टुडंट अॅवॉर्ड’ने डॉ. पूजा बालाजी मुळे यांना नुकतीच दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

सिडकोतील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

$
0
0
खुलेआम सुरू असलेल्या गुंडगिरीच्या निषेधार्थ सिडको एम २ मधील व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. सर्वच दुकानदारांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवला.

दुधाची ‘माती’ करणाऱ्या एजन्सीला नोटीस देणार?

$
0
0
एलबीटीसाठी दूध विक्रेत्यांना नोंदणीची सक्ती करून दुधाची माती करण्याचा संशय असलेल्या सहकार एजन्सीला नोटीस पाठवण्याची तयारी पालिकेने केली आहे. दरम्यान, या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच सायंकाळी दूध विक्रेत्यांना त्रास देण्याचे प्रकार कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘एलबीटी’साठी अधिकाऱ्यांची ‘लूटमार’

$
0
0
बांधकाम परवानगीसाठी एलबीटी विभागाच्या (स्थानिक संस्थाकर) एनओसीची सक्ती करण्यात आलेली असल्यामुळे या एनओसीसाठी पालिकेचे काही अधिकारी अक्षरशः लुटमार करू लागले आहेत.

पोलिस मित्र संघटनेचा उद्या मोर्चा

$
0
0
पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस बोर्ड स्थापन करण्यात यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी पोलिस मित्र संघटनेतर्फे येत्या शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठवाडा मंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या

$
0
0
मराठवाडा विकास मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावा, असा ठराव मंडळाच्या बैठकीत बुधवारी (१८ डिसेंबर) मंजूर करण्यात आला.

क्रीडा स्पर्धा उद्यापासून रंगणार

$
0
0
अखिल भारतीय विद्यापीठ संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ डिसेंबर या काळात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ ‘खो-खो’ व टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत.

प्राणिसंग्रहालयाच्या जागेच्या मोजणीचा प्रस्तावच नाही!

$
0
0
मिटमिटा परिसरात प्राणीसंग्रहालयासाठी महापालिकेला शंभर एकर सरकारी जमीन मिळणार आहे; मात्र या जागेबाबात महापालिकेच्या स्तरावर फारशा हालचाली सुरू नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जागेची मोजणी सुरू करण्यात आली असली, तरी महापालिकेने त्यासंदर्भातील प्रस्ताव व मोजणी शुल्क जमा केलेले नाही.

आयुक्तांच्या गाडीचाही अंबरदिवा काढला

$
0
0
महापौरांच्या पाठोपाठ आता पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या गाडीचाही अंबरदिवा काढण्यात आला आहे. गाडीवरचा दिवा काढण्याची कार्यवाही आयुक्तांच्या बंगल्यातच करण्यात आली.

ठेकेदारांची मनधरणी

$
0
0
‘रस्त्यांची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करा व नवीन कामांनाही प्रतिसाद द्या,’ असे म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची मनधरणी केली. या संदर्भात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली.

पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0
वेरूळ शिवारातील माटेगाव धरणातील विहिरीचे खोदकाम करतांना लोखंडी चळ विहिरीत पडल्याने लोखंडी चळ काढण्यासाठी पाण्यात उडी मारल्याने एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

तीन शाळकरी मुले बेपत्ता

$
0
0
शाळेत जाण्यासाठी निघालेली तीन मुले मंगळवारपासून बेपत्ता झाली आहेत. ही तिन्ही मुले मसनतपूर भागातील असून ते नवीन शिकणारी आहेत. एम. सिडको पोलिस बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.

स्पेशल अॅग्री झोनची मात्रा

$
0
0
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने स्पेशल अॅग्री झोन (एसएझेड - साझ) संकल्पना तयार केली आहे. पाणलोट विकासाबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचे मॉडेल एसएझेडमध्ये मानवलोक संस्थेने तयार केले आहे.

लाखो रुपये पाण्यात

$
0
0
एकीकडे एसटीला तोटा होत असल्याने, प्रवाशी संख्या वाढवा, त्यासाठी प्रयत्न करा असे आदेश देऊन विविध प्रयोग राबविणाऱ्या एसटी महामंडळाने सिटी बसच्या नावाखाली मागील वर्षभरात लाखो रुपयांचे शेड उभारले; मात्र सिटी बसच चालविली नसल्यामुळे, एसटी विभागाने केलेला खर्च पाण्यात जात आहे.

मोटारसायकलची सीझेड सिरीज शनिवारपासून सुरू

$
0
0
वाहनांना चॉईस नंबर घेण्यासाठी, आरटीओ कार्यालयात होणारा गोंधळ थांबविण्यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धतीने चॉईस नंबरची विक्री सुरू करण्यात आली आहे.

दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हेगार गजाआड

$
0
0
जालना येथे दरोडा घालण्यासाठी गेलेल्या शहरातील चार आरोपींना जालना पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली. या आरोपींवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील हे अट्टल गुन्हेगार आहेत.

‘बिडकीन’चा मोबदला लवकरच मिळणार

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत करमाड येथील शेतकऱ्यांना लवकर मोबदला देण्यात आला. त्याचप्रमाणे बिडकीनसह पाच गावांतील शेतकऱ्यांना लवकर मोबदला देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही विभागीय आयुक्त संजीय जयस्वाल यांनी येथे दिले.

चिमुकल्यांनी जिंकली उप‌स्थितांची मने

$
0
0
एसबीओच्या चिमुकल्यांनी पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून वार्षिक स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस गाजवला. संत एकना‌‌‌थ रंगमंदिराचे स्टेज आज या चिमुकल्यांनी गाजवले. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवातच पारितोषिकांनी झाली.

पोलिस ठाण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

$
0
0
भिमनगर - भावसिंगपुरा भागासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यात यावे, या मागणीला नागरिकांचा पाठिंबा मिळावा यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबा तायडे यांनी स्वाक्षरी मोहीम अभियान सुरू केले आहे.

चित्रपटाचा सेवाकर रद्द करा

$
0
0
पक्षाच्या जाहिरनाम्यात सांस्कृतिक विभागाशी संबंधीत अनेक अडचणी सोडविण्यासाठी, चित्रपट व्यावसायिकांना लागू असलेला सेवा कर रद्द करावा, औरंगाबाद सह अन्य भागात मिनी स्टुडिओ उभारण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्याची मागणी सांस्कृतीक ‌सेलचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images